आजचं मार्केट – २८ जून २०२४

आज क्रूड US $ ८७.१० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १ =Rs ८३.४० च्या आसपास होते.
USA $ निर्देशांक १०५.७७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३१ आणी VIX १४.२० च्या आसपास होते. सोने Rs ७१४०० आणी चांदी Rs ८७१०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मध्ये म्हणजे कॉपर आणी लेड मध्ये तेजी होती.तर अल्युमिनियम आणि झिंक मध्ये मंदी होती.
मिड्ल इस्ट मधील जिओ पॉलिटिकल संकटामुळे क्रूडच्या दरांत वाढ होत आहे. ओपेक+ आणी सौदी अरेबियाची क्रूडचा दर US $ ९० च्या आसपास असावा अशी इच्छा आहे.
USA मध्ये जॉबलेस क्लेम २.३३ लाख आले . NYKEE ने अनुमान कमी केले.
JP मॉर्गन ग्लोबल बॉंड इंडेक्स मध्ये भारताचा समावेश होण्याची शक्यता आहे.
FII ने Rs ७६५९ कोटींची खरेदी तर DII ने Rs ३६०६ कोटींची विक्री केली.
SAMHI हॉटेल्स मधील ३% स्टेक GTL कॅपिटल Rs १८७.०७ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने Rs १२० कोटींना विकणार आहे.
HCL TECH मधील 0.४६% स्टेक म्हणजे १.२४ कोटी शेअर्स Rs १४१४.९० प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने Rs १७५६.५० कोटींना विकणार आहे.
JSW इन्फ्रा नवकार कॉर्पोरेशन मधील ७०.३७% स्टेक घेणार आहे.
RBL बॅंक Rs ३५०० कोटी उभारेल तर AU स्माल फायनान्स बॅंक Rs ५००० कोटी QIP द्वारा उभारेल.
युनिकेम LAB ला युरोपीयन कोर्टाने पेटंट डिस्प्युट सेटलमेंट संदर्भात कंपनीच्या विरुद्ध निकाल दिला. अंबुजा सिमेंटमध्ये
अदानी सिमेंटेशनच्या मर्जरला मंजुरी मिळाली याचा स्वाप रेशीयो १ अंबुजा सिमेंटच्या शेअरला १७४ अदानी सिमेंटेशनचे शेअर्स असा आहे.
भारत सरकारने सुरक्षा उपकरणांच्या आयातीवरील सूट २०२९ पर्यंत वाढवली.
ल्युपिंनला युरोपीयन कोर्टाने लावलेला युरो ४ कोटींचा दंड माफ करण्यात आला.
VI मध्ये ३.04 कोटी शेअर्सचे Rs ६२ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
पॉलीकॅब मध्ये ३८.०२ लाख शेअर्सचे Rs २५५० कोटींचे लार्ज डील झाले.
अदानी पोर्टमध्ये ७१.३५ लाख शेअर्सचे Rs १०४८ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
भारती एअरटेलने त्यांच्या TARIF मध्ये २०% दरवाढ ३ जुलै २०२४ पासून केली. कंपनीने Rs 300 अर्पुज चे लक्ष्य ठेवले आहे. भारती HEXACOM ने सर्कल दरांमध्येही वाढ केली .
रिलायंस जिओ ने TARIF मध्ये १२%-२५% एवढी वाढ केली.
सेबी ने लिक्विडीटी आणी व्हॉल्यूम यांच्यावर आधारीत F & O सेगमेंटसाठी एन्ट्री आणी एक्झिटसाठी नवीन नियम मंजूर केले.
IPKA LAB ला युरोपियन कोर्टाने Rs १२५ कोटींचा दंड लावला.
STANLEY लाइफस्टाइल चा शेअर IPO मध्ये Rs ३६९ ला दीला आहे. BSE वर Rs ४९९ आणी NSE Rs ४९४.९५ लिस्ट झाला.
CDSL २ जुलैला बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
JNK ला Rs ३५० कोटी ते Rs ५०० कोटींची ऑर्डर रिलायंस कडून मिळाली.
मिल्क फुड या कंपनीने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट , १:१ बोनस शेअर आणी Rs २.५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
इरेडा आणी हुडको यांना अंदाजपत्रकात इन्कमटॅक्स च्या सेक्शन ५४ अंतर्गत आणण्याची शक्यता असल्यामुळे यांच्या बॉंड खरेदीवर आयकरामध्ये सुट मिळण्याची शक्यता आहे.
भेलला झारखंड मध्ये थर्मल प्रोजेक्टसाठी Rs १३३०० कोटींची ऑर्डर मिळाली.
GMR ला NHAI कडून हैदराबाद विजयवाडा एक्स्प्रेस ची १३८७ कोटींची ऑर्डर मिळाली. पहिल्या टप्प्यांत Rs ८५० कोटी आणी दुसर्या टप्प्यात Rs ५३७ कोटी मिळतील.
ब्रिगेड एन्टरप्रायझेसने येलहांका बंगलोरमध्ये ‘ब्रिगेड इन्सिग्निया’ ही प्रीमियम रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट launch केली. यातून ब्रिगेडला Rs ११००कोटीन्चे उत्पन्न अपेक्षित आहे.
कृष्णा मेडिकल ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये विभाजन केले.
कोची शिपयार्डची सबसिडीअरी UCSL ने नॉर्वेची कंपनी ‘WILSON ASA’ बरोबर ६३०० TDW ड्राय कार्गो वेस्सलच्या डिझाईन आणी उभारणी साठी करार केला.
BEL ला Rs ३१७२ कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकार IRFC, NFL, RCF, माझगाव डॉक्स मधील १०% स्टेक OFS च्या माध्यमातून विकण्याची शक्यता आहे.
नझारा टेक्नोलॉजी च्या सबसिडीअरीने ‘FREAKS 4 U’ मधील उरलेला ८६.४९% स्टेक Rs २७१.४८ कोटींना शेअर SWAP द्वारा घेणार आहे.
आलेम्बिक फार्माच्या DOXYCYCLINE साठी ४०mg कॅप्सूल्स साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
रिलायंस ची मार्केट कॅप आज Rs २१ लाख कोटी झाली.
क्रॉम्पटन ने लेड बॅटन लाईटचे नवीन व्हरायंट launch केले.
HDFC लाईफ ला आयकरखात्याकडून AY २०२१-२०२२ साठी Rs १४९५ कोटींची TAX डिमांड नोटीस मिळाली.
NHPC ने 200 MW सोलर पॉवर प्रोजेक्ट साठी GUNVL बरोबर Rs ८४७ कोटींचे पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
हेल्थ केअर ग्लोबलने VIZAG HOSPITAL मध्ये ५१% स्टेक घेतला.
मिडकॅप, स्माल कॅप,रिअल्टी PSE, मेटल्स मध्ये खरेदी झाली. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९०३२ NSE निर्देशांक निफ्टी २४०१० आणी बॅंक निफ्टी ५२३४२ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.