Monthly Archives: July 2024

आजचं मार्केट – २४ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८१.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ ८३.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.४७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२५ आणी VIX १२.३३ च्या आसपास होते. सोने Rs ६८८०० आणी चांदी Rs ८५२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी झिंक आणी लेड तेजीत तर अल्युमिनियम, कॉपर, टीन मंदीत होते.
FII ने Rs २९७५ कोटींची विक्री तर DII ने Rs १४१९ कोटींची खरेदी केली.
अल्फाबेट चे निकाल चांगले आले पण टेस्ला चे मार्जिन कमी झाले म्हणून शेअर पडला. इजिप्त आणी कतारमध्ये वाटाघाटी चालू असल्यामुळे क्रूडचा भाव कमी झाला.
HUL च्या व्यवस्थापनाने सांगितले की ब्युटी वेलनेस सेगमेंटची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी झाली. हॉर्लीक्स, बूस्ट कमजोर, पर्सनल केअर सेगमेंटचा रेव्हेन्यू कमी झाला. प्रीमियम पोर्टफोलिओमध्ये चांगली ग्रोथ आहे.
वेदान्ता २६ जुलै २०२४ रोजी दुसर्या इंटरिम लाभांशावर विचार करेल. जर हा लाभांश जाहीर झाला तर त्याची रेकॉर्ड डेट ३ ऑगस्ट २०२४ असेल.
टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्सने त्यांचा Rs ८१८ प्रती शेअर भावाने तुमच्या जवळ २६ शेअर असतील तर तुम्हाला १ राईट्स मिळेल या प्रमाणांत Rs ३००० कोटींचा राईट्स इशू जाहीर केला. या राईट्स इशुची रेकॉर्ड डेट २७ जुलै ठेवली असून हा ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान ओपन राहील.
ICICI पृ चे VNB Rs ४७२ कोटी, VNB मार्जिन २४% ( ३०% ) APE ३४.४% वाढून Rs १९६३ कोटी झाले.
संस्टार हा IPO ८२.९९ वेळा भरला.
SCHAFFLER चे प्रॉफीट ३.५% वाढून Rs २४५.४ कोटी झाले. मार्जिन १८.७% वरून कमी होऊन १७.९ % होते. रेव्हेन्यू १५.२% वाढून Rs २१०६.८० कोटी झाला.
युनायटेड स्पिरीट चे प्रॉफीट Rs ४७७ कोटींवरून Rs ४८५ कोटी झाले. रेव्हेन्यू ३.५% ने वाढून Rs २७६१ कोटी झाला.मार्जिन २६.७% वरून कमी होऊन २५.८% झाले व्हॉल्यूममध्ये चांगली ग्रोथ झाली.
DR रेड्डीज २७ जुलै २०२४ रोजी शेअर स्प्लिट वर विचार करेल.
ICICI सिक्युरिटीजचे प्रॉफीट ९५ % वाढून Rs ५९७ कोटी झाले.
गो FASHION चे प्रॉफीट वाढले ,उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
बजाज फिनसर्वचे प्रॉफीट १०% ने वाढून Rs १९४३ कोटींवरून YOY Rs २१३८ कोटी झाले. उत्पन्न ३५% ने वाढून Rs २३२८० कोटींवरून Rs ३१४८० कोटी झाले. NII Rs ८११० कोटींवरून Rs ९९२९ कोटी झाले. AUM Rs १२०५३ कोटी होते.
KEC इंटरनेशनलला त्यांच्या T & D बिझिनेस साठी पॉवर ग्रीड कडून ट्रान्स्मिशन लाईन साठी Rs १४२२ कोटींची ऑर्डर मिळाली.
फेडरल बँकेचे GNP QOQ २.१३% वरून २.११% झाले. NNPA QOQ 0.६ वर FLAT राहिले. प्रॉफीट Rs ८५४ कोटींवरून Rs १०१० कोटी तर NII Rs १९१९ कोटींवरून Rs २२९२ कोटी झाले. प्रोविजन Rs १५६ कोटींवरून Rs १४४ कोटी झाली. फेडरल बॅंक कर्जाच्या द्वारे Rs ६००० कोटी उभारेल.
थिरूमलाई केमिकल्स चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले.
CG पॉवरचे प्रॉफीट, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
राणे मद्रास तोट्यातून फायद्यात आली. Rs १४ कोटी तोट्याऐवजी Rs ३.४५ कोटी फायदा झाला. उत्पन्न कमी झाले. मार्जिन वाढले.
KPIT टेक चे QOQ फायदा, उत्पन्न, मार्जिन वाढले.
ग्लोबल हेल्थला जोगेश्वरी मध्ये ८८५९.१४ SQFT जमीन Rs १२५.११ कोटींना घेण्यासाठी परवानगी मिळाली.
वेलस्पन लिविंग Rs २२० प्रती शेअर या भावाने शेअर बायबॅकवर Rs २७८ कोटी खर्च करेल. कंपनीचे प्रॉफीट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
AURIONPRO चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले.
महिंद्र लाइफस्पेसला Rs ४ कोटी तोट्याऐवजी Rs १२ कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढले.
V गार्ड चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
पेट्रोनेट LNG चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
सिंजिन चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
CG पॉवर GG ट्रॉनिक्समध्ये ५५% स्टेक Rs ३१९ कोटींमध्ये घेणार.
रामकृष्ण फोर्जिंग्सचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
SBI लाईफ चे VNB Rs ९७० कोटी, VNB मार्जिन २६.८% APE Rs ३०३० कोटींवरून Rs ३६४० कोटी झाले
AXIS बँकेचे GNPA QOQ १.४३% वरून १.५४ % तर NNPA 0.31% वरून 0.३४% झाले.
फायदा Rs ६०३५ कोटी तर NII Rs १३४४८ कोटी झाले.
कर्नाटक बँकेचे प्रॉफीट Rs ३७०.७० कोटींवरून Rs ४००.३० कोटी झाले. NII Rs ८१४.७० कोटींवरून Rs ९०३.४० कोटी झाले. GNPA ३.५३% वरून ३.५४% झाले तर NNPA १.५८% वरून १.६६% झाले.
रिलायंस इंडस्ट्रीजला व्हेनिझूएलातून ऑईल ची आयात करायला USA ने परवानगी दिली.
अदानी ग्रीनच्या सबसिडीअरीने गुजरात मधील खावडा येथे २५० MW विंड क्षमता सुरु केली.
आलेम्बिक फार्माच्या सायकोटिक आजारांवरील ‘FLUPHENAZINE HYDROCHLORIDE TABLETS’ ना USFDA ची मंजुरी मिळाली.
IEX चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
बटरफ्लाय गांधीमतीचे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
टाटा टेलीचा तोटा Rs ३२३ कोटी झाला तर रेव्हेन्यू Rs ३२४ कोटी झाला.
इंद्रप्रस्थ GAS चे प्रॉफीट Rs ३८३ कोटींवरून Rs ४०१ कोटी झाले. उत्पन्न Rs ३५९६ कोटींवरून Rs ३५२० कोटी झाले. मार्जिन १४.५% वरून १६.५% झाले.
बँकिंग, FMCG, ऑटो मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले तर OIL &GAS, एनर्जी, PSE, रिअल्टी, फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०१४८ NSE निर्देशांक निफ्टी २४४१३ बॅंक निफ्टी ५१३१७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. . bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८२.४0 प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.९५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२४ आणी VIX १५.२८ च्या आसपास होते. सोने Rs ६८९०० आणी चांदी Rs ८५२०० च्या आसपास होती.
FII ने Rs ३४४४ कोटींची खरेदी तर DII ने Rs १६५२ कोटींची विक्री केली.
SBI लाईफ ने कॅन फिना होम्सचे १० लाख शेअर्स म्हणजे 0.७५% स्टेक Rs ८९७.९४ प्रती शेअर या भावाने घेतला.
MRPL चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
जना SFB चे प्रॉफीट, NII वाढले. GNPA आणी NNPA वाढले.
लेमन ट्री हॉटेल्सने गोंवा आणी पंजाब मध्ये हॉटेल्स सुरु केली.
कोटक महिंद्र बँकेचे जॉइंट MD सुब्रमनियम यांची फेडरल बँकेचे MD & CEO म्हणून २२ सप्टेंबर २०२४ पासून ३ वर्षांसाठी नेमणूक करायला RBI ने मंजुरी दिली.
CYIENT DLM चे प्रॉफीट ९८.१%, रेव्हेन्यू १८.७% वाढून Rs २५७.८ कोटी झाले. मार्जिन ९.२% वरून ७.७% झाले. ऑर्डर बुक Rs २१२६ कोटी झाले. डिफेन्स ग्रोथ ७९.६ % तर इरोस्पेस ग्रोथ ७८.१% राहिली.
सुझलॉनचे प्रॉफीट तिप्पट वाढून Rs ३०२ कोटी तर रेव्हेन्यू ५०% वाढला.
पॉवर मेक ला उत्तराखंड पेय जल निगम यांचे काम वाढल्यामुळे त्यांच्या ऑर्डरची रक्कम Rs ३६२ कोटींवरून Rs ५९४ कोटी झाली.
GENSOL गुजरातमधील ११६ MW सोलर प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली. हे प्रोजेक्ट २७ ठिकाणी चालेल.
ग्रीन LAM इंडस्ट्री चा रेव्हेन्यू १७.४% वाढून ६०४.७० कोटी झाला. LAMINNET बिझिनेस १३.२% ने वाढला पण व्हल्यू टर्म नुसार प्रॉफीट कमी झाले.
SRF चे प्रॉफीट कमी झाले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ३.६० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.
ग्लांड फार्माच्या ‘LATALOTROSTENE BUNOD’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
बजाज फायनान्स चे प्रॉफीट Rs ३९१२ कोटी ( Rs ३४३७ कोटी) NII Rs ८३६५ कोटी (६७१८ कोटी ) झाले. NPA 0.३७% वरून 0.३८% झाले.
HUL चे प्रॉफीट Rs २४७२ कोटींवरून YOY Rs २५३८ कोटी झाले. रेव्हेन्यू Rs १५१४८ कोटींवरून Rs १५३३९ कोटी झाला. मार्जिन २३.२% वरून २३.५% झाले. व्हॉल्यूम ४% ने वाढले.
थायरोकेअर चे प्रॉफीट YOY वाढले. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.

Torrent pharma चां फायदा, उत्पन्न margin वाढले

वेदान्ता २6 जुलै २०२४ रोजी दुसर्या इंटरिम लाभांशावर विचार करेल.

आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अंदाजपत्रक सादर केले.
डायरेक्ट TAXES मध्ये खालीलप्रमाणे महत्वाचे बदल केले. नवीन आयकर प्रणाली अंतर्गत पगारदार करदात्यासाठी STANDARD DEDUCTION Rs ५०००० वरून वाढवून Rs ७५००० केले.
TAX आकारणी खालील प्रमाणे केली जाईल.
उत्पन्न Rs ३ लाखांपर्यंत TAX लागणार नाही.
Rs ३ लाख ते Rs ७ लाख ५%
Rs ७ लाख ते Rs १० लाख १०%
Rs १० लाख ते Rs १२ लाख १५%
Rs १२ लाख ते Rs १५ लाख २०%
Rs १५ लाखांच्या पेक्षा जास्त ३० %
सेक्युरिटी ट्रान्झक्शन TAX १ ऑक्टोबर २०२४ पासून F & O सेगमेंट मध्ये फ्युचर्सच्या विक्रीवर 0.०१ % ऐवजी 0.०२% आकारला जाईल.ऑप्शन विक्रीच्या प्रीमियमवर 0.०६२५ % वरून 0.१ % केला.
शेअर बाय बॅक मध्ये झालेल्या प्रॉफीटवर आता आयकर आकारला जाईल.
शेअर मार्केट मधील शॉर्ट टर्म गैन्स वर आता २०% TAX आकारला जाईल.
२३ जुलै २०२४ पासून शेअर मार्केट मधील Rs १.२५ लाखापेक्षा जास्त असलेल्या LONG टर्म कॅपिटल गेन्स वर आता १२.५% TAX आकारला जाईल. Rs १.२५ लाख LTCG पर्यंत TAX आकारला जाणार नाही.
प्रॉपर्टी विक्रीतून होणार्या कॅपिटल गेन्स्वरील इंडेक्सेशन बेनिफिट रद्द केला.
एंजल TAX रद्द केला.
तंबाखू आणी तंबाखू उत्पादनावरील TAX मध्ये बदल केला नाही.
अग्रीकल्चर क्षेत्रासाठी १.५२ लाख कोटींची तरतूद केली.
आंध्र प्रदेश राज्याला अनुक्रमे Rs १५००० कोटीची मदत जाहीर केली.
श्रीम्प, श्रीम्प फीड यावरील कस्टम्स ड्युटी ५% केली.
स्कीलिंग लोन Rs ७.५ लाखापर्यंत मिळेल. हे कर्ज २५००० तरुणांना प्रतिवर्ष दिले जाईल.
ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सरकारी योजनेतून शिक्षणासाठी मदत मिळत नाही त्यांना स्वदेशात उच्च शिक्षणासाठी Rs १० लाखांपर्यंत लोन मिळेल.
इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशातील सर्वोत्कृष्ट ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना १२ महिने Rs ५००० प्रती महिना याप्रमाणे इंटर्नशिप मिळेल. त्यांना वन टाईम Rs ६००० मिळतील. त्यांच्या ट्रेनिंगचा खर्च
कंपनी करेल.
प्रथमच सर्विस करत असलेल्या तरुणाला Rs १५००० DBT दिले जातील . यासाठी त्याचा पगार Rs १ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे.
सरकारने फरटीलायझर सबसिडीसाठी Rs १.६४ लाख कोटींची तरतूद केली.
संरक्षणासाठी Rs ४.५६ लाख कोटींची तरतूद केली तर कॅपिटल खर्च ११.११ लाख कोटी झाला. मार्केट बॉरोईन्ग Rs ११.६३ लाख कोटी झाले. मध्यम वर्ग आणी लोअर मध्यम वर्गासाठी घर खरेदीसाठीय आणी इंटरेस्ट सबवेंशनसाठी Rs १० लाख कोटींची तरतूद केली.
GIS बेस्ड शहरी LAND रेकॉर्ड ठेवणार.
काशी विश्वनाथ, गया, बोधगया आणी राजगिर या तीर्थक्षेत्रांचा कायापालट जागतिक दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून करण्यात येईल.
पूर नियंत्रण आणी जलप्रदूषण यासाठी बिहार,आसाम,, सिक्कीम आणी उत्तराखंड या राज्यांना Rs ११५०० कोटी दिले जातील.
NTPC आणी BHEL हे सुपर क्रिटीकल अल्ट्रा थर्मल पॉवर प्रोजेक्ट AUSC टेक्नोलॉजी वापरून उभारतील.
सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत सोलर ROOFTOP १ कोटी घरात बसवले जाईल.
सोने आणी चांदीवरील कस्टम ड्युटी १५% वरून ६ % केली. PLATINUM वील कस्टम ड्युटी 6.४% केली.
बिहार मध्ये गया इंडस्ट्रीयल कॉरिडोर , पीर पेंठी २४०० MW पॉवर प्लांट, पटना पूर्णिया एक्सप्रेस हायवे, नवीन विमानतळ आणी मेडिकल कॉलेज यासाठी Rs २६००० कोटींची तरतूद केली.
MSME साठी मुद्रा लोनची रक्कम Rs २० लाख केली.
कॅन्सर साठी लागणार्या औषधांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केली. फुटवेअर, सोलर सेट आणी PANELS ला लागणाऱ्या सुट्या भागांवरील, PVC फ्लेक्स वरील कस्टम ड्युटी कमी केली.
मोबाईल, मोबाईल चार्जर वरील कस्टम्स ड्युटी कमी केली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०४२९ NSE निर्देशांक निफ्टी २४४७९ बॅंक निफ्टी ५१७७८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २२ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८३.२० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.०२ USA 10 वर्षे बॉंड यील्ड ४.२२ आणी VIX १५.४९ होते. सोने Rs ७३१०० आणी चांदी Rs ८९३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक तेजीत आणी लेड मंदीत होते. चांदीला औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाली तसेच चीनी अर्थव्यवस्था स्लो डाऊन फेजमध्ये असल्यामुळे चांदीचे भाव मंदीत आहेत.
विप्रोचा ADR ११.६ % ने पडला. डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बिडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सेलऑफ दिसून आला. कंपन्यांचे निकालही चांगले येत नाहीत. आता इस्रेल- हमास युद्धांत येमेन पडण्याची शक्यता आहे. चीनने लोन प्राईम रेट ३.९५% वरून ३.८५% केला. आणी ७ दिवसांसाठी रिव्हर्स रिपोर्ट १.८% वरून १.७% केला
FII ने Rs १५०६ कोटींची खरेदी तर DII ने Rs ४६२ कोटींची विक्री केली.
डिफेन्स म्युच्युअल फंड आणी एनर्जी म्युच्युअल फंड यांनी नवीन SIP घेणे बंद केले. आता या क्षेत्रांत फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी कमी झाल्या आहेत असे कारण सांगितले.
रिलायंस इंडस्ट्रीज चा रेव्हेन्यू ११.५% ने वाढला. प्रॉफीट ५.५% ने कमी झाले. मार्जिन १८.४% वरून कमी होऊन १६.७% राहिले.
रिलायंस जिओ चे अर्पूज FLAT १८१.७ राहिले. रिलायंस रिटेल चा रेव्हेन्यू ८.१% ने वाढला.
O टू C रेव्हेन्यू १.५७ लाख कोटी, मार्जिन ११.५% वरून ८.३% झाले. OIL &GAS रेव्हेन्यू Rs ६१७९ कोटी झाला तर मार्जिन कमी होऊन ८४.३% राहिले.
HDFC बँकेचे NII २.६% ने वाढले. GNPA १.२४% वरून १.३३% NNPA 0.३३% वरून 0.३९% झाले. ROA १.९६% वरून १.८८% झाले. अग्री बिझनेस मुळे फटका बसला. HDB फायनंशियल्सच्या IPO ला RBI ने मंजुरी दिली.
कोटक महिंद्र बँकेचे NII कमी होऊन Rs ६८४२ कोटी तर प्रॉफीट ६२४९ कोटी झाले. ठेवी १५.८% ने YOY वाढल्या पण गेल्या सहा तीमाहीन्च्या किमान स्तरावर तर एडवान्सेस १८.७% वाढले ही गेल्या सहा महिन्यातली कमाल वाढ आहे. प्रॉफीट मध्ये Rs ३५१९.९० कोटींचा वन टाईम गेन आहे. GNPA १.३९% वर FLAT राहिले NNPA 0.३५% होते.
YES बॅंकेचे NII १२.२% वाढले, प्रॉफीट ४६.७% तर प्रोविजन QOQ ५५.८% ने कमी झाली. ग्रॉस NPA १.७% वर FLAT तर नेट NPA 0.६ % वरून 0.५% झाले.
RBL बँकेचे प्रॉफीट २९% ने वाढून Rs ३७१.५० कोटी तर NII १९.५ % ने वाढून Rs १७०० कोटी झाले. GNPA कमी झाले तर NNPA FLAT राहिले. NIM ५.६७% च्या ऑल टाईम हाय स्तरावर होते. ROA १.१४% च्या २० तीमाहीच्या उच्च स्तरावर होते.
डोडला डेअरीचे प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
IOB चे प्रॉफीट वाढून Rs ५०० कोटींचे Rs ६३३ कोटी झाले. GNPA QOQ ३.१% वरून २.८९% झाले. NNPA 0.५७% वरून 0.५१% झाले.
IDBI चे GNPA ४.५३% वरून ३.८७%, NNPA 0.३४% वरून 0.२३% झाले. प्रॉफीट Rs १२२४ कोटींवरून Rs १७१९ कोटी झाले तर NII Rs ३९९७.६ कोटींवरून Rs ३२३२.८० कोटी झाले.
UCO बँकेचे प्रॉफीट Rs २२३.५ कोटींवरून Rs ५५१ कोटी झाले. NII Rs 200९ कोटींवरून Rs २२५३ कोटी झाले.GNPA ३.४६% वरून ३.३२% झाले तर NNPA 0.७८ होते.
सोलारा ऍक्टिव्हफार्माचा तोटा कमी झाला रेव्हेन्यू वाढला मार्जिन वाढले.
VI ने १०% स्टेक VANTAGE टावर्स ला युरो १.३ बिलीयन्सला विकला.
महिंद्र लॉजीस्टिक्सचा तोटा कमी झाला रेव्हेन्यू FLAT राहिला मार्जिन कमी झाले.
नितीन स्पिनर्स चे प्रॉफीट, उत्पन्न, आणी मार्जिन वाढले.
TCS ने रोल्स राईस बरोबर हायड्रोजन रिसर्च प्रोग्रॅम साठी पार्टनरशिप करार केला.
MERLINEHAWK एअरोस्पेस आणी केरला स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन बरोबर गार्डन रिच शिप बिल्डर्सने करार केला.
इंडियन हॉटेल्स च्या व्यवस्थापनाने सांगितले की निवडणुका आणी त्याशी संबंधीत आचारसंहिता यामुळे सरकारी बिझिनेस कमी झाला. कडक उन्हाळा, लग्न कार्याचे कमी मुहूर्त यामुळे निकालांवर परिणाम झाला. येत्या तीन तिमाहीत ११% ते १५% ग्रोथ होईल असे अनुमान आहे.
मिडकॅप, स्मालकॅप, फार्मा, ऑटो, मेटल, PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर रिअल्टी, IT, FMCG, एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०५०२ NSE निर्देशांक निफ्टी २४५०९ बॅंक निफ्टी ५२२८० वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८४.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.९७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२० आणी VIX १४.३९ होते. सोने Rs ७३६०० तर चांदी Rs ९०८०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंकमध्ये तेजी होती लेडमध्ये मंदी होती.
इन्फोसिसचा ADR ८.३८% ने वाढला. USA मधील अनइंप्लॉयमेंट २.४३ लाख आली. रसेल २००० निर्देशांक २% पडला. जर कंपन्यांचा रिझल्ट सीझन चांगला झाला नाही तर मार्केटमध्ये दबाव वाढेल.
FII ने Rs ५४८४ कोटींची खरेदी तर DII ने Rs २९०४ कोटींची विक्री केली.
इन्फोसिसमध्ये ५.५३ लाख शेअर्सचा Rs १०२ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
DR रेड्डीजने टाकेडाबरोबर वोनोप्रोझाम या GASTRO वरील औषधासाठी करार केला.
पॉलीकॅबच्या व्यवस्थापनाने सांगितले की वायर आणी केबल बिझिनेसमध्ये ग्रोथ आहे. निर्यातीमध्ये डीग्रोथ आहे. निर्यात उद्योगांत मार्जिन जास्त असल्यामुळे या डीग्रोथ चा निकालावर परिणाम झाला. कंपनी या उद्योगांत कॉस्ट, क्वालिटी, आणी प्राईस लीडर आहे.
दालमिया भारत सिमेंटने सांगितले की त्यांनी सिमेंटच्या किमती कमी केल्या. JP असोसिएट साठी Rs ८४ कोटींची प्रोविजन केली. पॉवर फ्युएलचा खर्च कमी झाला.
पर्सिस्टंट सिस्टिम्स ने सांगितले की ते भागीदारीचा आवाका आणी स्तर वाढवत आहेत. AI लेड PLATFORM DRIVEN सर्विसेस देण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. उद्योगामधील गुंतवणूक वाढवत आहेत.
टाटा टेकने सांगितले की ट्रांजीशन पूर्ण झाले आहे. आता ते कोअर बिझीनेसवर लक्ष केंद्रित करू शकतील.
सागर सिमेंट चा तोटा कमी झाला. रेव्हेन्यू ३.८% ने वाढला. सेल्स व्हॉल्यूम ८.५% वाढला. क्षमता उपयोग ४९% राहिला.
SANSTAR या कंपनीचा IPO १९ जुलै रोजी ओपन होऊन २३ जुलै २०२४ रोजी बंद होईल. दर्शनी किमत Rs २ असून १५० शेअर्सचा मिनिमम लॉट आहे. प्राईस बॅंड Rs ९० ते Rs ९५ आहे.ही कंपनी प्लांटबेस्ड स्पेशालिटी प्रोडक्टस्, इंग्रेडीयंट सोल्युशन प्रोवायडर फॉर फूड अप्लिकेशन आणी एनिमल न्युट्रिशन क्षेत्रांत काम करते. IPO ची रक्कम मुख्यतः कंपनीच्या धुळे येथील क्षमता विस्तारासाठी वापरली जाईल. गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, गुलशन पॉली, सुखजित स्टार्च या या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर काही कंपन्या आहेत.
तानला चे प्रॉफीट वाढले रेव्हेन्यू वाढले मार्जिन कमी झाले.
झायडसच्या Baroda येथील युनिटला USFDA ने केलेल्या १५ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यानच्या तपासणीत OAI ( ऑफीसियल अक्शन इनीशीएटेड ) दिला.
शनिवार २०/07/२०२४ रोजी HDFC बॅंक आणी कोटक महिंद्र बॅंक त्यांचे पहिल्या तीमाहिचे निकाल जाहीर करतील.
टाटा कन्झ्युमरचा २३ जुलै २०२४ पासून Rs ३००० कोटींचा राईट्स ओपन होईल.
वेदान्ताच्या QIP मध्ये Rs २३००० कोटींच्या बोली आल्या.
VST २५ जुलै रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
आज एलकॉन ENGG च्या शेअर्स स्प्लिटची एक्स डेट आहे.
Paytm ने फ्लेक्सीबस बरोबर पार्टनरशिप करार केला.
महाराष्ट्र एनर्जी dept कडून शक्ती पंप्सला Rs ३४ कोटींची ऑर्डर मिळाली.
सेबीने पिवळ्या मटरमध्ये वायदा launch करायला परवानगी दिली. येत्या महिन्याभरात NCDEX वर हा वायदा launch होईल. सरकारने पिवळ्या मटरच्या आयातीला परवानगी दिल्यामुळे याचे मार्केटमध्ये भाव कमी झाले. ही आयात कॅनडा आणी रशिया मधून होते.
नझारा टेक पेपर बोट मध्ये Rs 300 कोटींना ४८.४२ % स्टेक खरेदी करणार आहे.
ATHER लिमिटेड चे प्रॉफीट , उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
फेड बॅंक फायनान्शिअल चे प्रॉफीट वाढले, NII वाढले, ग्रॉस आणी नेट NPA वाढले.
डिविज LAB च्या विशाखापट्टणम युनिटचे इन्स्पेक्शन USFDA ने ११ जुलै ते 19 जुलै दरम्यान पूर्ण केले.
अतुल लिमिटेड चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सिएटचा फायदा 6.6% ने तर उत्पन्न ८% ने वाढले मार्जिन कमी झाले.
ब्ल्यू डार्ट चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
KPI ग्रीनला 100MW हायब्रीड कॅप्टिव सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
Paytmचा लॉस YOY Rs ३५९ कोटींवरून Rs ८३९ कोटी झाला. उत्पन्न कमी झाले.
अल्ट्राटेक सिमेंटचे प्रॉफीट Rs १६८८ कोटींवरून १६९५ कोटी झाले. उत्पन्न Rs १७७३४ कोटींवरून १८०६९ कोटी झाले. मार्जिन १८.४% वरून १६.८% झाले. डोमेस्टिक व्हॉल्यूम 6% ने वाढले
झायडस लाईफच्या ‘NDA ZITOVIMET एक्स्टेंडेड रिलीज ला USFDA ने मंजुरी दिली.
BPCL चे प्रॉफीट कमी होऊन Rs ३०१५ कोटी झाले. उत्पन्न Rs १.१३ लाख कोटी ( Rs १.१६ लाख कोटी) झाले. मार्जिन QOQ ८% वरून ५% झाले. GRM US $ ७.८६ प्रती बॅरल राहिले.
झायडस लाईफ च्या १५ जुलै ते १९ जुलै अहमदाबाद युनिटच्या इन्स्पेक्शन नंतर USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.
विप्रोचे प्रॉफीट QOQ Rs २८३५ कोटींवरून ३००३ कोटी झाले. उत्पन्न QOQ २२०७९.६० कोटींवरून
Rs २१८९६ कोटी झाले. मार्जिन १६.४% वरून १६.५% झाले. US $ रेव्हेन्यू कमी होऊन US $ २६२.५ कोटी झाले. CC रेव्हेन्यू १% ने कमी झाला.
JSW स्टील चे प्रॉफीट Rs २४२८ कोटींवरून कमी होऊन Rs ८६७ कोटी झाले. उत्पन्न Rs ४२२१३ कोटींवरून वाढून Rs ४२९४३ कोटी झाले. मार्जिन १६.७% वरून कमी होऊन १२.८% झाले.
इंडियन हॉटेल्स चा फायदा Rs २२२ कोटींवरून वाढून Rs २४८ कोटी झाला. उत्पन्न Rs १४६६ कोटींवरून Rs १५५० कोटी झाले. मार्जिन २८% वरून वाढून २९% झाले.
ज्युबिलंट इंग्रेव्हिया प्रॉफीट उत्पन्न, मार्जिन वाढले. कंपनीला Rs ३९६ कोटी वन टाईम गेन झाला.
महिंद्र EPC तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
निपोन लाईफ चा YOY फायदा वाढला, उत्पन्न वाढले,
ONGC ने अझरबैजान मधील अझेरी, चिराग आणी गुंसली मध्ये US $ ६० मिलियनला स्टेक खरेदी करणार.
आज मेटल्स, OIL & GAS,ऑटो, इन्फ्रा, PSE, रिअल्टी, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०६०४ NSE निर्देशांक निफ्टी २४५३० बॅंक निफ्टी ५२२६५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १६ जुलै २०२४

आज क्रूड ८४.७९, डॉलर इंडेक्स १०४.३०,बाँड यिल्ड ४.२१, व्हिक्स – १४.२० होते

पॉवेल म्हणाले ,’ २% महागाईचे टार्गेट आहे त्या दिशेने वाटचाल सुरू आहे गोल्डमन सॅक्स चां रिझल्ट चांगला आला Russell २००० मध्ये तेजी होती
Vedanta – qip करणार आहे ४.१% हिस्सा विकणार आहे फ्लोअर price ४६१.२६ त्यांनी आता रक्कम १ बिलियन डॉलर केली
JIO- प्रॉफिट वाढले उत्पन्न कमी झाले
Spicejet – तोट्यातून फायद्यात आली revenue कमी झाला
Angel – फायदा,उत्पन्न,margin वाढले
HUL – water purification business, AOsmith
India ला ७२ मिली डॉलरला विकायला मंजूरी मिळाली
LUPIN – अमेरिकेतील commercial women ‘s health speciality business आणि ‘ solosec ‘ सहित EVofem bioscience ला divest करणार यातून त्यांना ८४ मिलियन डॉलर मिळतील
Hatsun ऍग्रो – प्रॉफिट उत्पन्न मार्जीन वाढले ६ रुपये दिविडांद दिला
Unichem लॅब – गोवा facility साठी USFDA नी ५ त्रुटी दाखवल्या या त्रुटी procedural आहेत data integrity issue नाही
विंडफॉल टॅक्स ६००० वरून ७००० प्रत्येक टनाला केला petrol, डिझेल आणि ATF वर टॅक्स मध्ये बदल नाही MRO धोरणाच्या अंतर्गत विमान आणि इंजिनाच्या भागांना ५ % GST लागेल
ASTER DM – व्हिसल ब्लोअरने तक्रार केली म्हणून फॉरेन्सिक inspection केले जाणार आहे
UP सरकारने EV वरील सबसिडी २०२७ पर्यंत वाढवली व्होडाफोन AGR बद्दल याचिका दाखल करणार आहे त्यांचे AGR dues ७०३०० कोटी आहेत त्याचा सगळ्या टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल
Related party transactions संबंधात सेबीनी. PAYtm ला नोटीस दिली त्यामुळे शेअरचां भाव पडला
Rites ला ४२.५३ कोटीची ऑर्डर मिळाली
Century textile ची subsidiary बिर्ला estate नी gurugram मध्ये ५ एकर जमीन १४०० कोटीला घेतली
Jyothi structure ला गुजरात मधून transmission line सप्लाय करण्यासाठीं ११७ कोटीची ऑर्डर मिळाली
Cipla- IT department कडून व्याजासकट ७७३ कोटीची नोटीस दिली
Himadri chemical – फायदा, उत्पन्न, margin वाढले
Century textile – तोट्यातून फायद्यात आली ५.९ कोटी तोटा होता त्याचा ७.८ कोटी फायदा झाला उत्पन्न ८९४.५ होते ते वाढून ११४९ कोटी झाले margin १५.८% वरून ९.३ %झाले
Bajaj auto चां रिझल्ट चांगला आला profit १६६५ चे १९८८ कोटी झाले उत्पन्न १०३०४ कोटींचे ११९२८ कोटी तर margin १८.९६% वरून २०.८५% झाले
Spectrum auction झाला त्याची रक्कम १० दिवसात किंवा २० वर्ष हप्त्याने द्यावी लागेल अशी नोटीस दिली भारतीने ६८५६ कोटी, jio नी ९७३ कोटी तर VI नी ३५१० कोटी द्यायचे आहेत
Maharashtra energy department कडून शक्ती पंपला ३४ कोटीची ऑर्डर मिळाली
Jubilant ingrevia चां रिझल्ट कमजोर आला
FMCG, auto, reality मध्ये तेजी तर बँका,फार्मा,IT, metal यात मंदी होती
आज सेन्सेक्स ८०७१६, निफ्टी २४६१३ , बँक निफ्टी ५२३९६ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १५ जुलै २०२४

.आज क्रूड ८२.६३ $, बाँड यील्ड ४.१८ , डॉलर इंडेक्स १०४.११, vix – १४.३१ तर रुपी डॉलर ८३.६१ होते. जपान मार्केट मरीन डे निमीत्त बंद होते Dow प्रथमच ४०००० च्या पातळीला पोहोचले ट्रम्प यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना झाली आता त्यांच्या बाजूने US मधील जनता जाईल सहानुभूती मिळेल त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल

सिटी, फार्गो,JP Morgan यांचे रिझल्ट चांगले आले असे म्हणता येत नाही
China चां GDP ५.३ %वरून ४.७ % आला IIP ५.३% आला भारताचा WPI ३.३६ % जून मध्ये आला हा मे मध्ये २.६१ % होता direct tax collection २३.२४% आणि GST collection ११.३ % वाढले
Zomato ने platform fee २०% वाढवली ५ रुपयाची ६ रुपये केली बँगलोर आणि दिल्ली येथे वाढवली म्हणून शेअर तेजीत होता
Hindalco त्यांची कलव्याची जमीन बिर्ला इस्टेट प्रायव्हेट लिमटेडला ५८५ कोटीला विकणार आहे
वरुण ब्रिवरेजीसनी झाबिया मध्ये प्रॉडक्ट विक्री करार केला
APL अपोलो कमर्शिअल पेपरच्या माध्यमातून २०० कोटी गोळा करणार आहे
Goa carban चे मेंटेनन्स साठी बंद असलेले युनिट पुन्हा सुरू झाले
DEEP industry ला ONGC कडून ८२ कोटींची ऑर्डर मिळाली
भन्साली engineering che प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलें तर margin कमी झाले
PTC ही ७०० कोटीचा QIP करणार आहे
DMart प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला margin फ्लॅट राहिले
IREDA चे AUM ,NII,profit वाढले इतर उत्पन्न ३० कोटी झाले
LUPIN च्या गुजरात येथील दभासा facility la EIR मिळाला तपासणी ८ ते १२ एप्रिलला झाली होती
EMS ला उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन कडून १४३ कोटींची ऑर्डर मिळाली
Aurobindo pharma १८ जुलै रोजी BUY back वर विचार करणार आहे त्यामुळे तेजी होती
MSRTC कडून अशोक ले land ला २१०४ बस साठी ९८१ कोटींची ऑर्डर मिळाली
ZEN technology ने ग्लोबल मार्केट साठी २ प्रोडक्ट लाँच केले
HDFC AMC चे प्रॉफिट, उत्पन्न,margin वाढलें रिझल्ट
सुंदर आला
HDFC LIFE चां रिझल्ट चांगला आला
सुझलांनने विंड turbine supply आणि मेंटेनन्स साठी CESE बरोबर करार केला
उदयपूर सिमेंट फायद्यातून तोट्यात गेली उत्पन्न आणि margin वाढले
आज ऑईल,गॅस, रिॲलिटी,फार्मा,सरकारी बँका, एनर्जी ऑटो मध्ये तेजी तर IT मध्ये मंदी होती
सेन्सेक्स ८०६६५,निफ्टी २४५८६,तर बँक निफ्टी ५२४५५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १२ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८५.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.३७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२२ आणी VIX १३.८३ च्या आसपास होते. सोने Rs ७३२०० आणी चांदी Rs ९३७०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक आणी लेड मध्ये मंदी होती.

USA मध्ये CPI ३% आणी कोअर CPI ३.३ झाला.महागाई वाढण्याचा वेग कमी झाला. रसेल २००० हा ३.५% ने वाढला. जापनीज येनचा US $ बरोबर चा विनिमय दर US $ १ = १६२ जापनीज येन वरून जापनीज येन १५९ झाला. जापनीज येन मजबूत झाला.

FII ने Rs ११३७ कोटींची विक्री तर DII ने Rs १६७६ कोटींची खरेदी केली.
आनंद राठी चे प्रॉफीट ३७.९% वाढवून Rs ७३.०२ कोटी झाले. रेव्हेन्यू ३५.८% ने वाढून Rs २३७.६ कोटी झाला. AUM ५९% ने वाढून Rs ६९०१८ कोटी झाले. म्युच्युअल फंड रेव्हेन्यू ७०% ने वाढून Rs ८९ कोटी झाला. मार्जिन ४१.३% ( ४१.९% ) राहिले. ACTIVE ग्राहक १९% ने वाढले.
प्रेस्टीज ची विक्री व्हॉल्यूम आणी व्हल्यू दोन्हीमध्ये कमी झाली. १३६४ युनिट्स ची विक्री झाली. रिअलायझेशन १६% ने वाढून Rs ११९३४ प्रती SQFT झाले. PLOT चा दर ४६% ने वाढून Rs ७२८५ प्रती SQ FT झाला. कलेक्शनध्ये ६% वाढ झाली.
अदानी विल्मर ओंकार केमिकल्स मधील ६७% स्टेक Rs ५६ .२५ कोटींना घेणार आहे.
GTPL चे प्रॉफीट ७३.३% कमी होऊन Rs १४.२ कोटी तर रेव्हेन्यू ८.९% ने वाढला. मार्जिन १३.४% ( १५.४% ) होते. सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू ७% ने वाढून Rs ३१९.३० कोटी झाला. डिजिटल सब्स्क्रायबर्स
६ % ने वाढून ९६ कोटी झाले.
ओरीएन्टल रेलची सबसिडीअरी ओरीएंट फौंड्रीला इंडियन रेल्वेकडून Rs ४३२ कोटींची ऑर्डर मिळाली.
LT फुड्स ने UK मध्ये हार्लो येथे सबसिडीअरीची स्थापना केल. नवीन प्लांट सुरु केला. . यातून दर वर्षी GBP १० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.
बोईंग कंपनीने सांगितले की त्यांच्या बोईंग ७४७ या विमानाच्या व्हरायंटच्या डिलिव्हरीमध्ये ६ -७ महिने उशीर होण्याचा संभव आहे.
इन्फोसिसला डेलावेअर लेबर DEPT कडून ऑर्डर मिळाली.
MIRAE AMC ला उत्कर्ष SFB मध्ये ९.९५ % स्टेक घेण्यासाठी RBI ने मंजुरी दिली.
VI ने सरकारला Rs २४७४७ कोटींच्या बॅंक गारंटी देण्यासंबंधात सवलतीसाठी विनंती केली आहे.
AB FASHION ‘GOODVIEW FASHION मध्ये US $ ३५ मिलियनला स्टेक खरेदी करणार आहे.
आझाद ENGG ने ‘GLE VERNOVA ‘ बरोबर Rs २९० कोटींचे रोटेटिंग एअरफॉइल साठी ७ वर्षांसाठी डील केले.
ITI ने सेल DEED द्वारा बंगलोर येथील LAND & बिल्डिंग Rs 200 कोटींना C -DOT ला ट्रान्स्फर केली .
कोल इंडिया ने ए-ऑक्शनचे नियम सोपे केले. अर्नेस्ट मनीची रक्कम कमी केली आणी ए-ऑक्शन ची QUANTITY वाढवली.
CYIENT ने त्यांच्या सेमीकंडक्टर बिझीनेसचा क्षमता विस्तार करण्याचे योजले आहे. या साठी एक वेगळी सबसिडी स्थापन करेल.
स्टरलाइट टेक्नोलॉजी च्या ग्लोबल सेविसेस ऑपरेशन्सच्या डीमर्जरला शेअरहोल्डर्सनी मंजुरी दिली.
ज्युपिटर WAGONS Rs ८०० कोटींचा QIP करेल.
उद्या D- मार्ट आणी HDFC लाईफचे निकाल जाहीर होतील. सोमवारी HDFC बॅंक, HDFC AMC आणी JIO फायनान्स त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
BEL ला ‘THALES RELIANCE DEFENSE SYSTEM’ कडून EURO २.५७ कोटींची ऑर्डर मिळाली.
अडाणी पोर्टने सांगितले की नजीकच्या भविष्यात इक्विटी उभारण्याची योजना नाही. त्यांचा Rs १०००० कोटींचा प्रती वर्षी कॅश इनफ्लो आहे.विझीनजाम पोर्ट फेज १ मध्ये Rs ४००० कोटी गुंतवले आहेत , २०२८ पर्यंत आणखी Rs २०००० कोटी गुंतवणूककेली जाईल. लॉजिक्सत्ष्टीक आणी वेअरहाऊस बिझिनेस मध्ये चांगली ग्रोथ आहे.
आज TCS च्या चांगल्या निकालानंतर IT क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगल्या प्रमाणांत खरेदी झाली.
बँक्स, मिडकॅप, रिअल्टी, ऑटो, पॉवर क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाली.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०५१९ NSE निर्देशांक निफ्टी २४५०२ बॅंक निफ्टी ५२२७८ वर बंद झाले.
. भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – ११ जुलै २०२४

आज क्रूड US ८५.७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.९२ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.२९ VIX १४.१३ च्या आसपास होते. सोने Rs ७२८०० आणी चांदी Rs ९३४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी झिंक, लेडमध्ये तेजी होती.

फेडच्या अध्यक्षांनी सांगितले की अर्थव्यवस्था तेव्हढी हॉट नाही. महागाई कमी होत आहे . मार्केट्ची अशी अटकळ आहे की सप्टेंबर आणी डिसेंबर २०२४ मध्ये असे २ रेटकट होण्याची शक्यता आहे.
चीनने एक बैठक बोलावली आहे. चीनचे सरकार ३ ट्रीलीयनचे PACKAGE देण्याची शक्यता आहे.त्यामुळे रिअल इस्टेटला उत्तेजन मिळेल. पण चीनच्या करन्सीवर विपरीत परिणाम होईल.
IRCTCच्या तिकिटाबरोबर आता मेट्रोचे तिकीट मिळेल हे तिकीट ४ दिवस चालेल. यासाठी IRCTC, DMRC, CRIS यांनी समझौता केला आहे.
अंदाजपत्रकांत शिपिंग उद्योगाला मोठा वाव दिला जाण्याची शक्यता आहे. शिपबिल्डींग उद्योगाला दिलेली १००० हरित नौका योजनेंतर्गत २०% मदत मेरी टाईम फंडातून मदत दिली जाईल. ही योजना २०२६ च्या पुढेही वाढवू शकतात. स्वस्त दरांत कर्ज मिळू शकेल.
आज FII ने Rs ५८४ कोटींची खरेदी तर DII ने Rs १०८२ कोटींची खरेदी केली.
कल्पतरू प्रोजेक्ट्स च्या JV ला Rs २९९५ कोटींची ऑर्डर मिळाली.
कीस्टोन रिअल्टर्सने कसारामध्ये ८८ एकर जमीन Rs ९१ कोटींमध्ये खरेदी केली.
HPL इलेक्ट्रिकल्स ला Rs २१०१ कोटींची ऑर्डर मिळाली.
SHALBY ने आशा पारेख हॉस्पिटल ३० वर्षांसाठी लीजवर घेतले.
GE पॉवर त्यांचा GAS आणी हायड्रोपॉवर बिझिनेस अलग करून विकणार आहेत.
इस्ट इंडिया हॉटेल्सच्या ओबेरॉय राजविलास जयपूर मधील हॉटेल ला TRAVEL +LEISURE, USA कडून बेस्ट हॉटेल ऑफ वर्ल्ड अवार्ड मिळाले.
ग्लेनमार्क फार्मा ग्लेनमार्क लाईफसायन्सेस मधील ७.८४% स्टेक Rs ८१० प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने OFS च्या माध्यमातून ११ जुलै आणी १२ जुलै २०२४ रोजी विकणार आहेत. सध्या प्रमोटर्सचा स्टेक ८२.८५% आहे.
केसोरामला Rs ६२ कोटी लॉस झाला ( Rs ३२.४ कोटी लॉस), रेव्हेन्यू १२%ने कमी होऊन Rs ८७९ कोटी ( Rs ९९९ कोटी) मार्जिन ८% ( १०.५% ) राहिले. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर आले.
टाटा एलेक्सी चा फायदा कमी झाला. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
JTL चे रेव्हेन्यू २% वाढून Rs ५१५ कोटी झाला. व्हॉल्यूम ११% ने वाढले. मार्जिन ७० बेसिस पाईंट ने वाढून ७.७% झाले. कंपनीने वारंट चे Rs २७० प्रती शेअर्समध्ये रुपांतर केले.
NBCC ला जवाहर नवोदय विद्यालयाकडून Rs ३६.१ कोटींची ऑर्डर मिळाली.
सुला चे रेव्हेन्यू ९.७% ने वाढून Rs १२९.६ कोटींच्या कमाल स्तरावर आले. ओन ब्रान्डs चा रेव्हेन्यू २.७% ने वाढला. लोकसभा निवडणुका आणि उष्णतेच्या लाटेचा आणि ड्राय डे चा परिणाम झाला.
पॉवर ग्रीड बॉंड इशू करून Rs १६००० कोटी उभाणार आहे.
SBI ने ७.३६ कुपन रेटच्या इन्फ्रा बॉंड द्वारा Rs १०००० कोटी उभारले. हे बॉंड ३.६ % ओव्हरसबस्क्राईब झाले.
झायडस लाइफच्या ‘DIROXIMEL FUMARATE ‘ या उशिरा रिलीज झालेल्या औषधाच्या विक्रीसाठी USFDA ची संमती मिळाली.
IRB इन्फ्राचे टोल कलेक्शन ३४.९% ने वाढले.
सोना BLW ने तिचा आर्म ‘COMSTAR ऑटोमोटिव्ह’ साठी US $ २.८ मिलीयनची कॉर्पोरेट गारंटी सिटी बँकेला दिली.
अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टला लाल बहादूर एअरपोर्ट टर्मिनल साठी एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून Rs ८९३ कोटींची EPC ऑर्डर मिळाली.
INDEGENE ने मायक्रोसॉफ्ट बरोबर जनरेटिव्ह AI साठी करार केला.
THERMAX ने वेब्रो पॉलीमरबरोबर फ्लोरिंग केमिकल्स साठी करार केला.
वेदान्ता NCD द्वारे Rs १००० कोटी उभारेल. वेदांत Rs ८००० कोटींचा QIP launch करणार आहे.
नेलको चे प्रॉफीट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झाले.
सरकार हायड्रोजनवर चालणाऱ्या ग्रीन शिप्ससाठी सवलत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोचीन शिपयार्डने हायड्रोजनवर चालणारे जहाज बनवले आहे.
DRDO ने ७ प्रोजेक्ट खाजगी उद्योगांना दिली आहेत. ही प्रोजेक्ट्स टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट फंडातून दिली आहेत. DRDO ने डेटा PATTERNS ला रडार सिग्नल प्रोसेसिंग प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी DRDO प्रोजेक्ट दिले.
GNA AXLs चे प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
TCS चे प्रॉफीटQOQ Rs १२४३४ कोटींवरून कमी होऊन Rs १२०४० कोटी झाले. रेव्हेन्यू QOQ Rs ६१२३७ कोटींवरून Rs ६२६१३ कोटी झाले. मार्जिन QOQ २६% वरून कमी होऊन २४.७ % होते. नेट हेड कौंट एडिशन ५४५२ झाली. एट्रीशन कमी होऊन १२.१% झाले. US $ रेव्हेन्यू US $ ७५० कोटी.( US $ ७३० कोटी ) , CC revenue growth २.२%
आज रिअल्टी, ऑटो, फार्मा, पॉवर क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९८९७ NSE निर्देशांक निफ्टी २४३१६ बॅंक निफ्टी ५२२७० वर बंद झाले.
. भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १० जुलै २०२४

.आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.१२ USA १० वर्षे बॉंड ४.३० आणी VIX १४.८० च्या आसपास होते. सोने Rs ७२५०० आणी चांदी Rs ९३३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक, कॉपर,अल्युमिनियम मंदीत तर लेड तेजीत होते. USA च्या फेडच्या अध्यक्षांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांचा डेटा रेटकट करावा असा नाही. पण व्याजाचे रेट जास्त ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी योग्य होणार नाही.

चीनचा CPI MOM 0.२ ने कमी झाला. PPI MOM 0.२% ने कमी झाला PPI YOY 0.८ ने कमी तर CPI YOY 0.२% ने कमी झाला
FII ने Rs ३१४ कोटींची खरेदी तर DII ने Rs १४१६ कोटींची खरेदी केली.
KDDL या कंपनीने २.३७ लाख शेअर्स ( १.९% इक्विटी ) बायबॅक Rs ३७०० प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने करण्याची घोषणा केली. या बायबॅक मध्ये प्रमोटर्सही भाग घेतील.
NYKAA मध्ये १.४७ कोटी शेअर्सचे Rs २५६ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
मनकाइंड फार्मा मध्ये ३७.०१ लाख शेअर्समध्ये Rs ७७० कोटींचे डील झाले.
डेल्हीव्हरी मध्ये २.३४ कोटी शेअर्स मध्ये म्हणजे ३.१७% इक्विटीमध्ये लार्ज डील झाले.
RVNL च्या ३१.९१ लाख शेअर्समध्ये Rs १८१ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
IRB इन्फ्रा च्या ६.६५ कोटी शेअर्समध्ये Rs ४५२ कोटींचे लार्ज डील झाले.
M & M ने त्यांच्या XUV ७०० AX७ सर्व व्हेरीयंट ची किमत या मॉडेलला ३ वर्षे पुरी झाली म्हणून १० जुलै २०२४ पासून ४ महिने पर्यंत कमी केली.
आज एमक्यूअर फार्माचे 31% प्रीमियम वर ( IPO मध्ये Rs १००८ ला दिला) BSE वर आणी NSE वर Rs १३२५.०५ वर लिस्ट झाला.
बन्सल वायर्स चे BSE वर Rs ३५२.०५ आणी NSE वर Rs ३५६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २५६ ला दिला होता. ज्यांना हे शेअर्स IPO मध्ये अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
शिल्पा मेडिकेअर च्या रायपुर युनिटला ब्राझिलियन रेग्युलेटरी ऑथारीटी कडून GMP सर्टिफिकेट मिळाले
डेल्टा कॉर्प चे पहिल्या तीमाही चे निकाल कमजोर आले. प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन कमी झाले. कॅसिनो विभागाचे Rs १६९ कोटी ( Rs २२६ कोटी) झाले तर ऑन लाईन स्कील गेमिंग PLATFORM चे उत्पन्न FLAT राहिले.
RVNL ला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नागपूर मेट्रोसाठी LOA मिळाले. हे Rs १८७.३४ कोटींचे प्रोजेक्ट आहे. तसेच साउथ इस्टर्न रेल्वेच्या Rs २०२.८ कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.
अदानी पोर्ट ला दीनदयाळ पोर्टच्या बर्थ नंबर १३ ची डेव्हलपमेन्ट ऑपरेशन आणी मेंटेनन्स साठी LOI मिळाले. याचे काम २०२७ मध्ये सुरु होईल.
‘MARATHON NEXTGEN’ ची विक्री ४५% ने कमी, कलेक्शन वाढले पण व्हल्यू कमी झाले.
हवेल्ल्स त्यांची क्षमता ३२.९ लाख KMS वरून ४१.२२ लाख KMS वाढवण्यासाठी Rs ३७५ कोटी गुंतवणूक करणार आहे.
JSW स्टीलचे उत्पादन कमी झाले क्षमता ९७% उपयोगांत आणली गेली.
HUL ने सांगितले की AI ची मदत घेऊन सप्लाय चेन जास्त कार्यक्षम केली जाईल.
नैसर्गिक रबराच्या किमती १३ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत. अनियमित आणी कमी/ जास्त पावसामुळे नैसर्गिक रबराचे भारतात उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नैसर्गिक रबराची उपलब्धता कमी राहील. भारतात नैसर्गिक रबरासाठी मागणी १४.५० लाख टन आणी उत्पादन ८.५० लाख टन आहे. त्यामुळे आयात करणे क्रमप्राप्त आहे. टायर उद्योगाने सरकारकडे नैसर्गिक रबरावरची आयात ड्युटी कमी करण्याची मागणी केली आहे.
रशियाकडून खतांचा अव्याहत पुरवठा होईल . भारत रशियाकडून कोकिंग कोल आयात करेल.
संरक्षण उपकरणांच्या उत्पादनांत दोघांचे सहकार्य असेल. त्यात टेक्नोलॉजी ट्रान्स्फरचा समावेश असेल.
एनर्जी क्षेत्रांत दीर्घ मुदतीचे करार होतील.
ग्रीव्ज फायनान्स ने EV ओनरशिप फायनान्सिंग साठी ACKO बरोबर करार केला.
RVNL ने नेपाळमधील IMS कन्सल्टन्सी बरोबर MOU केले.
UP सरकारने EV आणी हायब्रीड कार संदर्भातील धोरणाबद्दल चर्चा करण्यासाठी संबंधितांची बैठक बोलावली.
अदानी पॉवर संबंधांत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची याचिका अपेलेट ट्रायब्युनलने फेटाळली.
TVS मोटर्सने APACHE ATR १६० रेसिंग एडिशन launch केली. या बाईकची किमत Rs १.२९ लाख + असेल.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीमध्ये थ्री व्हीलर्सच्या रजिस्ट्रेशनच्या संख्येवर कॅपिंग विरुद्ध बजाज ऑटोने केलेला अर्ज रद्दबातल केला.
एशियन पेंट्स आणी बर्जर पेंट्स या कंपन्या २२ जुलै २०२४ पासून त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत 0.७% ते १% एवढी वाढ करणार आहेत.
आज ऑटो, मेटल्स आणी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. तर FMCG, फार्मा, PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९२४ NSE निर्देशांक निफ्टी २४३२४ बॅंक निफ्टी ५२१८९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – ९ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८५.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.७३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२९ आणी VIX १४.३७ च्या आसपास होते. सोने Rs ७२४००आणी चांदी Rs ९३४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी कॉपर, झिंक आणी लेड तेजीत होते.

FII ने Rs ६१ कोटींची खरेदी तर DII ने Rs २८३७ कोटींची खरेदी केली.
गोदरेज कन्झ्युमरचा इंडिया बिझिनेस चांगला झाला. व्हॉल्यूम सिंगल डीजीट वाढले. तर व्हल्यूमध्ये मिडसिंगल डीजीट ग्रोथ झाली. होम केअर आणी पर्सनल केअर या दोन्हीही बिझीनेसमध्ये ग्रोथ झाली. इंडोनेशिया व्यवसाय प्रगतीपथावर आहे. GRUM ऑर्गनिक बिझिनेस व्हॉल्यूम डबल डीजीटने कमी झाला.
पिट्टी ENGG ने Rs ३६० कोटींचा QIP Rs १०५४.२५ प्रती शेअर दराने launch केला. यात ९० दिवसांचा लॉक इन पिरीयड आहे.
ज्युपिटर WAGON ने Rs ८०० कोटींचा QIP Rs ६८९.४७ फ्लोअर प्राईसने launch केला. या प्राईसमध्ये १.८२% ते २.८८% डायल्युशन होऊ शकेल.
MGL ने CNG १.५०/KG आणी PNG च्या किमती Rs १ ने वाढवल्या.
सेन्को गोल्डची रिटेल विक्री ११% ने वाढली. 6 नवी स्टोर्स ओपन केली. एकूण स्टोर्सची संख्या १६५ झाली. सेम स्टोर्स ग्रोथ ४% झाली. ट्रन्झक्सन व्हल्यू १२% ने वाढली .
KDDL ही कंपनी शेअर BUYBACK वर विचार करेल.
एक्झाईड आणी अमर राजा बॅटरी च्या किमती ३% ने वाढवणार आहेत.
अदानी एनर्जी कडून डायमंड पॉवरला Rs ९०० कोटींची ऑर्डर मिळाली. .
FMCG बिझिनेस विकल्यामुळे रेमंड ‘NODEBT’ कंपनी झाली.
उत्तर प्रदेश राज्य सरकारने मारुतीच्या हायब्रीड कार्स वरील रजिस्ट्रेशन चार्जेस माफ केले. यामुळे कार्स खरेदी करणार्यांना Rs ३.५० लाखापर्यंत फायदा होईल. तसेच मारुतीच्या 6 वर्ष जुन्या कार्स साठी कंपनीने 3 वर्षे आणी १ लाख KM ची वॉरनटी कंपनीने दिली आहे.
शाम मेटालिक्स चा स्टेनलेस स्टील व्हॉल्यूम १०० % ने वाढून ७०१५ टन झाला. अल्युमिनियम फॉइल्स चा व्हॉल्यूम ६.३% ने कमी होऊन ११७६ टन झाला.
कल्पतरू पॉवर NCD द्वारा Rs १००० कोटी उभारणार आहे.
L & T ला हिंदुस्थान शिपयार्ड कडून भारतीय नौसेनेसाठी फ्लीट सपोर्ट शिपच्या निर्माणासाठी Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
GM ब्रुअरीजचे पहिल्या तिमाहीत प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
चहाच्या किमतीत २०% वाढ झाल्यामुळे धूनसेरी टी, जयश्री टी, BBTC, MACLEOD रसेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
तांदुळाचे उत्पादन चांगले होईल. तांदुळाच्या निर्यातीवरील करांत सरकार सवलत देणार आहे अशा अपेक्षेने तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्या KRBL, चमनलाल सेठिया, LT फुड्स, कोहिनूर फुड्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
ICICI लोम्बार्द्चे प्रीमियम इन्कम १५.९% ने वाढून Rs २२१७ कोटी, न्यू इंडिया अशुअरन्सचे ३.८% वाढून Rs ३००७ कोटी, बजाज फिनसर्व चे ७.७% ने वाढून Rs १२३४ कोटी झाले.
आलेम्बिक फार्माच्या ‘BROMFENAC ओप्थाल ला USFDA ची मंजुरी मिळाली.
RPP इन्फ्रा ला Rs ३११ कोटींची ऑर्डर मिळाली.
वेदांत १५ महिने मुदतीचे बॉंडस इशू करणार आहे.
इन्फिबीम इन्फिबीम डिजिटल मधील उरलेला २६% स्टेक खरेदी करणारआहे.
मेट्रोपोलिस हेल्थकेअरचा रेव्हेन्यू १३% ने वाढला. कंपनी DEBTFREE झाली. कंपनीकडे Rs १.४ BILIYAN चा कॅश रिझर्व आहे. .
रुल्का इलेक्ट्रिकल्स ला Rs २०७ कोटींची ऑर्डर मिळाली.
टोरांट पोवेर ARS स्टील & अलोईज इंटरनाशनल हे सोलर पॉवर जनरेटिंग प्रोजेक्ट सेट अप करणार आहेत.
K & R रेल ENGG ने दक्षिण कोरियातील UNECO या कंपनीबरोबर कॉम्पोझिट स्लीपर प्लांट साठी MOU केले.
इनोक्स विंड ला विंड टर्बाईन जनरेटर साठी गुजरात आणी राजस्थानातून ऑर्डर मिळाली.
मलेशिया एअरलाईनने AI पॉवर रेट इंटेलिजन्स साठी रेटगेन बरोबर मल्टी इअर पार्टनरशिप केली.
सेंच्युरी टेक्स्टाईल Rs १०० कोटी उभारणार आहे.
CESC ने TARIF ५.७% ने वाढवले
IT, OIL &GAS क्षेत्रांत प्रॉफीट बुकिंग झाले. ऑटो, फार्मा, रिअल्टी मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०३५१ NSE निर्देशांक निफ्टी २४४३३ बॅंक निफ्टी ५२५६८ वर बंद झाली.

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७