आजचं मार्केट – १ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८५.४० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.40 च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.६७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४० आणी VIX १४.१४ च्या आसपास होते. सोने Rs ७१५०० तर चांदी Rs ८७००० च्या आसपास होती. अल्युमिनियम शिवाय बाकी बेस मेटल्स मंदीत होती.
USA मध्ये PCE २.६ (२.८ ) आला. NYKEE चे निकाल कमजोर आले.
चीनचा MFG PMI ५१.८ (५१.७) आला.
भारताचा MFG PMI ५८.३ (५७.५) आला.
गार्डन रिच शिपबिल्डर्सला बांगलादेशी सरकारकडून OI एडवांस्ड ओशन गोइंग टग च्या निर्माण आणी डिलिव्हरी साठी ऑर्डर मिळाली.
19 किलो LPG कमर्शियल सिलिंडरची किमत Rs १६ ने कमी केली.
बजाज ऑटो ची एकूण विक्री ५% ने वाढून ३.५८ लाख युनिट, डोमेस्टिक विक्री ८% ने वाढून २.१६ लाख युनिट, निर्यात १% ने वाढून १.४२ लाख युनिट झाली. कमर्शियल व्हेइकल्सची विक्री ५४८५१ युनिट झाली. २ व्हीलर्स ची विक्री ३% ने वाढून ३.०३ लाख युनिट झाली.
एस्कॉर्ट कुबोटाची एकूण ट्रॅक्टर विक्री २.६ % ने कमी होऊन ९५९३ युनिट तर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटची विक्री १०.६ % ने कमी होऊन ४४० युनिट झाली. निर्यात ५९.७% कमी होऊन २३४ युनिट झाकी. डोमेस्टिक विक्री १% ने वाढून ९३५९ युनिट झाली.
M & M ची एकूण विक्री ११% ने वाढून ६९३९७ युनिट झाली.SUVची विक्री २३% ने वाढून ४००२२ युनिट झाली तर ट्रक्टर विक्री 6% ने वाढून ४७३१९ युनिट झाली. डोमेस्टिक ट्रॅक्टर विक्री ४५८८८ युनिट आणी निर्यात २८% ने वाढून १४३१ युनिट झाली.
मारुतीची एकूण विक्री १२.४% ने वाढून १.७९ लाख युनिट झाली. डोमेस्टिक विक्री ६ .१% ने वाढून १.४८ लाख युनिट, निर्यात ६७% वाढून ३१०३३ युनिट्स झाली.
VST टिलर्स आणी ट्रॅक्टरची ट्रॅक्टर विक्री 6% ने कमी होऊन ५८२ युनिट झाली.
अतुल ऑटो ची विक्री १०७% ने वाढून २६२८ युनिट्स आली..
अशोक LEYLAND एकूण विक्री २% ने कमी होऊन १४९४० युनिट्स झाली. M & HCV विक्री ४.५% कमी होऊन ९५१९ युनिट तर LCV ची विक्री ३.१%ने कमी होऊन ५४२१ युनिट्स झाली.
आयशर मोटर्सची VECV ची एकूण विक्री १०.६ % ने वाढून ७४२४ युनिट्स झाली.
ट्रक, बसेस ची विक्री ४१% ने कमी होऊन ११० युनिट्स झाली. निर्यात ६८% ने वाढून ४२१ युनिट्स झाली. डोमेस्टिक विक्री ९.८% ने वाढून ६८९३ युनिट्स झाली.
टाटा मोटर्सची जून महिन्यासाठी डोमेस्टिक विक्री ८% ने कमी होऊन ७४१४७ युनिट्स झाली. कमर्शियल व्हेइकल्स ची विक्री ७% ने कमी होऊन ३१९८० युनिट झाली. निर्यात १३% ने वाढून १४५७ युनिट्स झाली. एकूण विक्री २.२९ लाख युनिट्स झाली.
इझी ट्रीपने उप टुरिझम बोर्डाबरोबर UP मध्ये पर्यटन वाढीसाठी MOU केले.
एशियन पेंट्स च्या मैसूर प्लान्टची क्षमता Rs १३०५ कोटींची गुंतवणूक करून ६,००,००० KL प्रती वर्ष एवढी केली.
ऑर्चीड फार्माने ‘CEFEPIME ENMETHZOBACTAM’ launch करण्यासाठी सिप्ला बरोबर करार केला.
झायडस लाईफने PERTZUMAB बायोसिमिलरचे कोमार्केटिंग करण्यासाठी DR रेड्डीज बरोबर लायसेन्सिंग अग्रीमेंट केले. झायडस लाईफ ‘SIGRIM’ आणी DR रेड्डीज ‘WOMAB’ या ब्रांड अंतर्गत मार्केटिंग करेल.
गोदरेज प्रॉपर्टीजने पुण्यामधील ११ एकर जमिनीचे लीझहोल्ड राईट्स घेतले. यातून Rs १८०० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच कंपनीने बँगलोरमध्ये ७ एकर जमीन खरेदी केली. यातू Rs १२०० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे.
नवीन फ्लुओरीन Rs ७५० कोटी QIP द्वारा उभारेल तर पॉली मेडीक्युअर QIP द्वारा Rs १००० कोटी उभारेल.
NEOJEN मधील प्रमोटर्सने ५.७% स्टेक विकला. SBI म्युच्युअल फंड आणी व्हाईट ओंक ग्रुपने घेतला.
टाटा स्टील US $ ५६५ मिलियन च्या DEBTचे टाटा स्टील होल्डिंग मध्ये इक्विटी शेअर्समध्ये २०२५ मध्ये कन्व्हर्ट करणार. टाटा स्टील होल्डिंग ही होलली ओनड सबसिडीअरी बनेल.
अल्ट्राटेक सिमेंट आंध्र प्रदेशमधील ताडीपत्री युनिटची क्षमता ३.३५ MTPA क्लीन्कर आणी ग्राईन्डींग १.८ MTPA ने वाढवली.
अजंता फार्माने ४.५ लाख शेअर्स तारण म्हणून ठेवले.
NMDC ने जुलै महिन्यासाठी आयर्न ओअर ची किमत Rs ५०० प्रती टन एवढी कमी केली.
TVS मोटर्स ने TVS क्रेडीट सर्विसेस मध्ये Rs २८२२८२.६७ कोटी गुंतवले. TVS क्रेडीट सर्विसेस मध्ये ६८.९४ लाख शेअर्स खरेदी करून TVS मोटर्सचा स्टेक ८०.५३% वरून ८०.६९% केला.
JSW एनर्जीची सबसिडीअरी JSW NEO एनर्जीला ३०० MW विंड सोलर हायब्रीड क्षमतेच्या प्रोजेक्टसाठी SJVN कडून LOA मिळाले.
MOIL ने फेरो ग्रेड्सच्या किमती २% ने वाढवल्या.
VI ४ जुलै २०२४ पासून टारीफमध्ये १०% ते २३% वाढ करेल.
ICICI प्रू ला Rs 364 कोटींची तर BOB ला Rs १०६८ कोटींची TAX डिमांड नोटीस मिळाली. HDFC लाईफला महाराष्ट्र सरकारकडून TAX डिमांड नोटीस मिळाली.
आलेम्बिक फार्माच्या ‘BOSUTINIB’ ला USFDA ची मंजुरी मिळाली.
L & T ला ONGC कडून Rs १००० कोटी – Rs २५०० कोटी दरम्यान पाईपलाईन प्रोजेक्ट साठी ऑर्डर मिळाली.
RITES ला Rs २७ कोटींची ऑर्डर मिळाली.
सरकारने जुलै २०२४ महिन्यासाठी नैसर्गिक GAS च्या किमती US $ ८.४४ प्रती mBtu वरून US $ ८.२४ प्रती mBtu केली. किमतीत थोड्या प्रमाणावर कपात केली.
REC ची लोन डिस्बर्समेंट २७.८९% वाढली तर लोन संक्शन २४.१७% ने वाढले.
करुर व्यास बँकेची डिपॉझिट १४.४१ % ने वाढून Rs ८०७१५ कोटी तर एडवान्सेस १६.६ % वाढून Rs ६६९५६ कोटी झाले. CASA रेशियोमध्ये ५.६ % वाढ झाली.
WOCKHARDT ने सांगितले की त्यांचे इन्व्हेस्टिगेशनल ड्रग ची यशस्वी ट्रीटमेंट USA मधील एका इम्युनोकॉम्प्रोमाईज्द कॅन्सर रुग्णावर झाली
शिपिंग मंत्रालयाने भारतातील सर्व बंदरांची क्षमता आणी दर्जा वाढवायला आणी टर्न अराउंड टाईम कमी करायला सांगितले. ड्रेजिंग कॉर्पोरेशनला ड्रेजिंगचा टर्न अराउंड टाईम कमी करायला आणी नद्यांचे ड्रेजिंग करण्याची शक्यता पडताळून पहायला सांगितले.
आज मिडकॅप, स्मालकॅप, IT, मेटल्स आणी FMCG या क्षेत्रातील शेअर्स मध्ये खरेदी तर एनर्जी, CPSE, आणी रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९४७६ NSE निर्देशांक निफ्टी २४१४२ बॅंक निफ्टी ५२५७४ वर बंद झाले.
. भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.