आजचं मार्केट – २ जुलै २०२४

.आज क्रूड US $ ८७ .२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.६० USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४५ आणी VIX १४.०० च्या आसपास होते. सोने Rs ७१७०० आणी चांदी Rs ८७७०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी झिंक आणी लेड तेजीत होते.

USA मार्केटमध्ये टेसला, APPLE, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन च्या शेअर्समध्ये तेजी होती. . US $ आणी जापनीज येनचा विनिमय दर US $१= जापनीज येन १६१.६२ इतका झाला.
FII ने Rs ४२६ कोटींची विक्री तर DII ने Rs ३९१७ कोटींची खरेदी केली.
IMD ने सांगितले की जुलै २०२४ या महिन्यात पाउस सामान्य स्तरावर पडेल.आणी सर्व भारतात पोहोचेल
L & T ची सबसिडीअरी L & T एनर्जी आणी हायड्रोकार्बनला सौदी आरामको कडून MGS GAS कॉम्प्रेशन सिस्टीम साठी JAFURAH PACKAGE 1 आणी ३ साठी Rs ३५००० कोटींची ऑर्डर मिळाली.
HCL TECH ने IBM बरोबर AI सपोर्टसाठी करार केला.
साउथ इंडियन बँकेची डीपॉझीट ८.४% ने तर एड्वान्सेस ११.३% वाढले. CASA डीपोझीट ५.९% ने वाढली पण CASA रेशियो 0.७७% ने कमी झाला.
TD पॉवर ला Rs ९३ लाखांची ऑर्डर मिळाली.
अलाईड ब्लेंडर्स चे BSE वर Rs ३१८.१० तर NSE वर Rs ३२० वर लिस्टिंग झाले. या कंपनीने Rs २८१ ला शेअर्स दिले होते. त्यामुळे ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
हिरोमोटो ची विक्री १५% ने वाढली ५.०३ लाख युनिट्स झाली, डोमेस्टिक विक्री १६% ने वाढली ४.९१ लाख झाली. निर्यात कमी होऊन १२०३२ युनिट्स झाली. ग्लोबल बिझिनेस ४४%ने वाढला कारण कंपनीने नेपाल, कोलंबिया, तुर्किये आणि MEXICO च्या मार्केटमध्ये कंपनीने प्रवेश केला आहे.
TVS मोटर्सची एकूण विक्री ३.३४ लाख युनिट्स झाली. टू व्हीलर विक्री 6% ने वाढून ३.२२ लाख झाली. EV विक्री १०% ने वाढून १५८५९ युनिट्स झाली निर्यात ३.९% ने कमी होऊन ७६०७४ युनिट्स झाली.
TCS ने ‘सिडनी MARATHON’ साठी करार केला.
रॉयल एन्फिल्ड चे सेल्स ५% ने कमी होऊन ७३१४१ युनिट्स आणी निर्यात २७% ने कमी होऊन ७०२४ युनिट्स झाली.
CSB बँकेची डीपॉझीट २२.२% ने वाढून Rs २९९२० कोटी झाली. एड्वांसेस १७.८% ने वाढून Rs २५०९९ कोटी झाले. CASA रेशियो १.३% ने कमी झाला. गोल्ड लोन्स्मध्ये २४% वाढ झाली.
सरकारने क्रूडवरील विंडफॉल TAX Rs ३२५० प्रती टन वरून Rs ६००० केला.
सेबीने डिस्काऊंट ब्रोकर्स आणी डीप डिस्काऊंट ब्रोकर्स आकारत असलेले ट्रान्झक्शनचार्जेस सर्व ग्राहकांसाठी युनिफॉर्म असावेत असे सांगितले. ते ग्राहकाच्या शेअर मार्केट मधील व्हॉल्यूमवर आधारीत असू नयेत असे सांगितले.
विप्रोचे रेटिंग CLSA ने डबल अपग्रेड केले. अंडरपरफॉर्मर वरून आउट परफॉर्मर केले.विप्रो 19 जुलै २०२४ रोजी त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.
पतंजली फूड ही Rs ११०० कोटींमध्ये पतंजली आयुर्वेद लिमिटेड चा होम आणी पर्सनल केअर बिझिनेस घेणार आहे.
सकुमा एक्स्पोर्टने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरला ४ शेअर बोनस शेअरची घोषणा केली.
CAMSने असेट मनेजमेंट बिझिनेस क्लाउड नेटिव्ह PLATFORM वर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी गुगल बरोबर कोलाबोरेशन करार केला.
IOC केमिकल्स च्या ‘FENOFIBRATE’ हे उत्पादन चीन मध्ये निर्यात करण्यासाठी चीनच्या NMPA कडून परवानगी मिळाली.
DCX सिस्टिम्सला इलेक्ट्रोनिक मोड्यूल्स साठी Rs १२५० कोटींची ३ वर्षे मुदतीची ऑर्डर L & T कडून मिळाली.
NMDC चे उत्पादन ३.७ (३.४८)MT , विक्री ४.१ (३.७३)MT एवढी जून महिन्यात झाली. कंपनीने लम्प च्या किमती Rs ५०० ने कमी करून Rs ५९५० तर फाईन च्या किमती Rs ५०० ने कमी करून Rs ५११० केली.
CDSL ने १:१ बोनस जाहीर केला. CDSL ने त्यांच्या Rs २२ लाभांशासाठी १६ जुलै ही रेकोर्ड डेट निश्चित केली.
सरकारने HAL साठी ९४ आयटेम्स ची घोषणा केली.
पूर्वांकराने BOTANICO आणी CAPELLA या प्रोजेक्ट launch करण्याची घोषणा केली.
आज फार्मा, IT, रिअल्टी, OIL &GAS, एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर बँकिंग, मेटल्स, FMCG,मिडकॅप, स्माल कॅप यामध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९४४१ NSE निर्देशांक निफ्टी २४१२३ आणी बॅंक निफ्टी ५२१६८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.