आजचं मार्केट – ३ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८६.७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०५.७१ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४३ आणी VIX १३.६३ होते. सोने Rs ७१७०० तर चांदी Rs ८८४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी कॉपर, अल्युमिनियम, झिंक आणी लेड तेजीत होते.

चीनचा सर्विसेस PMI ५१.२ (५४) आला.
आज USA मधील मार्केट अर्धा दिवस ओपन असेल तर उद्या USA च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बंद राहील. काल NASDAQ १५० बेसिस पाईंट वाढला. काल टेस्ला १०% तर अमेझॉन, अल्फाबेट, मेटा, APPLE मायक्रोसॉफ्ट हे शेअर्सही वाढले.
FII ने Rs २००० कोटींची विक्री तर DII ने Rs ६४८ कोटींची खरेदी केली.
HDFC बँकेतील FII होल्डिंग ५४.८३% झाले. MSCI इंडेक्स मध्ये HDFC बँकेचे वेटेज वाढण्यासाठी FII होल्डिंग ५५% पेक्षा कमी होणे आवश्यक होते. US $ ३ बिलियन ते US $ ४ बिलियन एवढा इन्फ्लो येण्याची शक्यता आहे. HDFC बँकेमध्ये फोरीन इन्व्हेस्टमेंटची मर्यादा ७४% आहे.
D -मार्ट चा रेव्हेन्यू 18% ने वाढून Rs १३७११ कोटी झाला. स्टोर्सची संख्या ३७१ झाली. राजकोटमधील एक स्टोर्स बंद आहे.
कोटक महिंद्र बॅंकेच्या K इंडिया ऑपॉर्च्युनिटी फंड कोटक महिंद्र इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापन करते. KINGDON च्या फायद्यासाठी आणी त्याच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करत होती. पण कोटक महिंद्र बँकेने किंवा K इंडिया फंडाने त्याचे हायडेनबर्गशी संबंध आहेत हे डिस्क्लोज केले नाही.
भारताचा जून महिन्यासाठी सर्विसेस PMI ६०.५ (६०.४) आणी कॉम्पोझीट PMI ६०.९ ( ६०.५ ) होते.
IEX ने सांगितले की त्यांच्या व्हॉल्यूम मध्ये २४.७% वाढ झाली. ग्रीन मार्केट व्हॉल्यूम ७४४ युनिट (२७२ युनिट) आणी मार्केट व्हॉल्यूम 1८.२% ने वाढून ४८४९ युनिट झाला.
M & M फायनान्स ची डिस्बर्समेंट ३% ने वाढून Rs ४३७० कोटी आणी कलेक्शन कार्यक्षमता 95% ( ९६% ) राहिली.
येस बँकेच्या एडवान्समध्ये १४.८% आणी डीपॉझीट २०.८% ने वाढले. CASA रेशियोमध्ये सुधारणा झाली.
KEC इंटरनॅशनलच्या T & D आणी रिन्युएबल्स बिझिनेससाठी Rs १०१७ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या. राजस्थानांत ६२५ MWp सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली. FY २५ मध्ये ऑर्डर Rs ५००० कोटींच्या मिळाल्या.
हिंदुस्थान झिंकचे खनिज धातू उत्पादन २% ने वाढून २६३ KT रिफाईनड मेटल उत्पादन १% वाढले तर चांदीचे उत्पादन ७% ने कमी होऊन १६७ टन झाले.
RVNL सेन्ट्रल रेल्वेच्या Rs १३२.५९ कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.
MOIL ची विक्री YOY १४ .0८ % वाढली तर उत्पादन ७.८% ने वाढून ४.७ लाख टन झाले.
वारी रिन्युएबल ला ९०० MW मोड्यूल्स सेरेंतिका रिन्युएबल ला सप्लाय करण्यासाठी राजस्थानातून ऑर्डर मिळाली.
झोमाटोच्या फायानंशियल आर्म ने NBFC चा व्यवसाय करण्याकरता दिलेला अर्ज मागे घेतला.
थायरोकेअर ‘POLO LABS’ चा डायग्नोस्टिक आणी पैथोलॉजिस्ट सर्विसेस् बिझिनेस स्लंप सेल तत्वावर Rs ४२६ कोटींना घेणार आहे.
डेल्टा कॉर्प ९ जुलै ला पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करेल.
पर्सिस्टनट सिस्टीमने स्टारफिश असोसिएट्स मध्ये १००% स्टेक खरेदीसाठी करार केला. US $ २.07 कोटींचे अपफ्रंट पेमेंट करणार.
मॉसचीफ ने CDAC बरोबर करार केला.
पुणे येथे १९८१ मध्ये स्थापन झालेल्या EMCURE फार्माचा Rs १९५२ कोटींचा IPO (Rs ११५२ कोटींचा OFS आणी Rs ८०० कोटींचा फ्रेश इशू) ३ जुलै २०२४ ला ओपन होऊन ५ जुलै २०२४ रोजी बंद होईल. IPO चा प्राईस बॅंड Rs ९६० ते Rs १००८ असून १४ शेअर्सचा मिनिमम लॉट आहे. कंपनीची १३ मन्युफाक्चरिंग युनिट्स असून ७० देशांत बिझनेस आहे. विशेषतः युरोप, कॅनडा आणी USA मध्ये कंपनीचा विस्तार आहे. गायनॉकॉलॉजी आणी HIV ANTI -व्हायरल थेरपी मध्ये कंपनी ३ ऱ्या नंबरवर आहे. कंपनी कॉर्डीयालॉजी मध्ये झपाट्याने प्रगती करत आहे. कंपनीचे उत्पन्न ४८% डोमेस्टिक बिझिनेस आणी ५२% आंतरराष्ट्रीय बिझीनेस मधून येते. मार्जिन 18% ते 19% आहे.
आज पासून बन्सल वायर्स या १९८५ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचा (Rs ७४५ कोटींचा फ्रेश इशू ऑफ शेअर्स) IPO ३ जुलै २०२४ ला ओपन होऊन ५ जुलै २०२४ रोजी बंद होईल. याचा प्राईस बॅंड Rs २४३ ते Rs २५६ असून मिनिमम लॉट ५८ शेअर्सचा आहे.ही कंपनी हाय कार्बन स्टील वायर , लो स्टील कार्बन वायर, आणी स्टेनलेस स्टील वायर बनवतात. त्यांची ४ उत्पादन युनिट्स असून ५ वे युनिट लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यांची ३००० पेक्षा जास्त उत्पादने आहेत. ५० देशांत बिझीनेसचा विस्तार आहे.
Paytm ने मर्चंट साठी हेल्थकेअर आणी इन्कम प्रोटेक्शन प्लान launch केला.
HDFC बँकेच्या शेअर्समध्ये १.१७ कोटी शेअर्समध्ये Rs २०९० कोटींचे लार्ज डील झाले.
व्रज आयर्न चे NSE वर Rs २४० वर लिस्टिंग झाले.
M &M ने EV पेंट प्लांट साठी ABB च्या PIXEL PAINT टेक्नोलॉजीची निवड केली.
गुजरात GASने इंडस्ट्रीयल GAS च्या किमती Rs २/SCM प्रमाणे वाढवल्या आता हा दर Rs ४४.६८ प्रती SCM झाला.
कोलबेस्ड पॉवर प्लांट लावण्यासाठी US $ ३३ बिलियनची उपकरणे पॉवर कंपन्यांकडून खरेदी करण्याची सूचना.
मिडकॅप, स्माल कॅप, बँकिंग, CPSE, मेटल्स, FMCG, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९८६ NSE निर्देशांक निफ्टी २४२८६ आणी बॅंक निफ्टी ५३०८९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.