आजचं मार्केट – ४ जुलै २०२४

.आज क्रूड US $ ८६.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.२८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३७ आणी VIX १३.06 च्या आसपास होते. सोने Rs ७२४०० आणी चांदी Rs ८९९०० च्या आसपास होती बेस मेटल्स पैकी झिंक आणी लेड तेजीमध्ये होते.

सेलो वर्ल्ड ने QIP launch केला.
इनोक्स विंड मध्ये Rs ९०० कोटी गुंतवल्यामुळे ही कंपनी कर्ज मुक्त झाली.
IDFC ने Rs १ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीने ४ जुलै रेकॉर्ड डेट जाहीर केली
USA मध्ये खाजगी नोकऱ्या १.५० लाखने वाढल्या पण अपेक्षेपेक्षा कमी वाढले. अर्थव्यवस्था स्लो होत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये रेट कट होण्याची शक्यता आहे. सर्विस PMI ४८.८ झाले.
FII ने Rs ५४८४ कोटींची खरेदी तर DII ने Rs ९२४ कोटींची विक्री केली.
बजाज फायनान्स चे ग्राहक Rs ८८.११ मिलियन ( Rs ७२९८ मिलियन), लोन्स १०% ने वाढून Rs १०.९८ मिलियन (Rs ९.९४ मिलियन), AUM 31% ने वाढून Rs ३.५४ लाख कोटी झाले. डीपॉझीट २.६ % ने वाढून Rs ६२७५० कोटी झाली. लिक्विडीटी सरप्लस Rs १६२०० कोटी झाले.
बंधन बँकेचे एडवान्सेस YOY २१.८% ने तर डीपॉझीट २२.८% आणी CASA १३.८% ने वाढले. पण QOQ सर्व कमी झाले.
वेदांताचे अल्युमिनियमचे उत्पादन YOY ३% ने तर अल्युमिना चे उत्पादन ३६% ने ( QOQ ११% ) मेटल्सचे उत्पादन YOY २% ने (QOQ १२% ने कमी) वाढले.
ITD सिमेंटेशनचे प्रमोटर्स त्यांचा स्टेक विकणार आहेत.
सूर्योदय SFB ची लोन्स, ठेवी, डीस्बर्स्मेंट, कलेक्शन क्षमता, सर्व वाढले. NPA कमी झाले.
L % T फायनान्स ची डीस्बर्स्मेंट ३३% ने लोन्स 31% ने वाढली आणी रिअलायझेशन 95% ( ८२% ) झाले.
सुरेज एस्टेट ने CCI बरोबर CCI भवनचे ७,८,९ हे मजले विकण्यासाठी करार केला.
ब्रिगेडने बंगलोरमध्ये ८ एकर जागा डेव्हलप करण्यासाठी करार केला. यातून Rs ११०० कोटी उत्पन्न
अपेक्षित आहेत.
G E T & D ला SAS फ्रान्सकडून हाय व्होल्टेज प्रोडक्ट पुरवण्यासाठी आणी देखरेख करणे यासाठी युरो ६४ मिलियनची २ वर्षे मुदतीची ऑर्डर मिळाली. अशीच ऑर्डर मध्यपूर्वेतील देशांकडून २६ मिलियनची २ वर्ष मुदतीची ऑर्डर मिळाली.
HUDCO ला सरकारच्या रुरल हाउसिंग योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे.
इंडियन हॉटेल्स मध्ये ६ .२१ लाख शेअर्सचे Rs ३७ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
माझगाव डॉक्स ची मार्केट कॅप Rs १ लाख कोटी झाली. दक्षिण भारतात सिमेंटच्या किमती विशेषतः आंध्र आणी तेलंगणा मध्ये कमी केल्या.
JSW एनर्जीने SJVN बरोबर पंजाबमध्ये पॉवर सप्लाय करण्यासाठी करार केला.
NBCC ला Rs ३६ कोटींची ऑर्डर मिळाली.
आलेम्बिक फार्माच्या ‘LIVOSINB’ या रक्ताच्या कर्क रोगावरील औषधाला USFDA ची मंजुरी.
सनफार्माच्या ‘NIDLEGY’ च्या मार्केटिंगला युरोपीयन मेडीसीन एजन्सीची मंजुरी.
लिस्टिंगच्या दिवशी प्रीओपन सेशनमध्ये SME PLATFORM वर ओपनिंग प्राईस साठी IPO पेक्षा
९0% जास्त रकमेची कॅप.
इक्विटास बँकेची डीपॉझीट ३५.४% ने वाढून Rs ३७५२४ कोटी तर एडवान्सेस १७.८% ने वाढून ३४८७२ कोटी. CASA डीपॉझीट ४९.८६% वाढून १.३३ लाख कोटी झाली. पण CASA रेशियो मात्र ३२% वरून ३१ % झाला.
स्टार हेल्थ आता ५० शहरांमध्ये होमहेल्थकेअर सर्विसेस सप्लाय करणार आहे.
ड्रेजिंग कॉर्पोरेशनला कोचीन पोर्ट ऑथोरीटीकडून Rs १५७ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज फार्मा आणी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर FMGC, इन्फ्रा, मेटल्स, आणी NBFC मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८००४९ NSE निर्देशांक निफ्टी २४३०२ बॅंक निफ्टी ५३१०३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.