आजचं मार्केट – ५ जुलै २०२४

आज क्रूड us$८७.१० प्रती बॅरल,us $ १ =Rs ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.०८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३७ आणी VIX १२.९० च्या आसपास होते. सोने Rs ७२५०० आणी चांदी Rs ९०६०० च्या आसपास होती.
FII ने Rs २५५६ कोटींची खरेदी तर DII ने Rs २३७५ कोटींची विक्री केली.
HDFC बँकेच्या शेअर्समध्ये २५.५५ लाख शेअरचे Rs ४२९ कोटींचे लार्ज डील झाले.
माझगाव डॉक च्या शेअर्समध्ये ३.८० लाख शेअर्सचे Rs २१३ कोटींना लार्ज डील झाले. NBCC मध्ये २०.१६ लाख शेअर्सचे Rs ३८ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
IXIGO चे पर्फोर्मंस हायलाईट आणी चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
HDFC बँकेची डिपॉझिट FLAT राहिली एडवान्स कमी झाले. CASA रेशियो कमी झाला.
RBL बँकेची डीपॉझीट 18% ने वाढली CASA वाढली एडवान्सेस वाढले रिटेल एडवान्सेस 31% तर होलसेल एडवान्सेस २% होते.
PNB च्या ठेवी ८.५% तर ग्लोबल एडवान्सेस १२.७% ने आणी डोमेस्टिक एडवान्सेस १२.१% ने वाढले. पूनावाला फिनकॉर्प ची डीस्बर्स्मेंट ५% ने AUM ५२% ने आणी लिक्विडीटी सरप्लस Rs ५२०० कोटी झाले.
IDBI चा एकूण बिझिनेस १५% ने वाढला ठेवी १३% ने एडवान्सेस १७% ने CASA डीपॉझीट ५% ने वाढले.
UCO बँकेचा एकूण बिझिनेस ११.५% ने, एडवान्सेस १७.७८% ने ,डीपॉझीट ७.४% ने, CASA रेशियो ३८.६२% ( ३८.१०) झाले.
रेमंड व्हर्टिकल डीमर्जर करणार आहे. रेमंड आणि रेमंड रिअल्टी वेगळे होतील. रेमंड रिअल्टीचे वेगळे लिस्टिंग होईल. रिअल इस्टेट चा रेव्हेन्यू Rs १५९३ कोटी आहे.
लॉईडस मेटल्सने Rs ७३२.0६ प्रती शेअर फ्लोर प्राईस ने QIP launch केला.
बोरिवलीमधील ७ हौसिंग सोसायटीज महिंद्र लाईफ स्टाईल डेव्हलप करेल. या प्रोजेक्टची व्हल्यू Rs १८०० कोटी आहे.
अहलुवालिया CONTRACT ला Rs ५७२ कोटींची ऑर्डर मिळाली.
RVNL ने दिल्ली मेट्रो रेल बरोबर त्यांच्या भविष्यातील प्रोजेक्टसाठी करार केला.
इरकॉन ला ला RVNL कडून Rs ७५०.८ कोटींची ऑर्डर मिळाली.
BGR एनर्जी ने Rs १००० कोटींचा राईट्स इशू जाहीर केला.
LIC ने IDFC1st बँकेतील स्टेक 0.२% ने वाढवला.
बजाज ऑटो आज CNG वर चालणारी बाईक launch करणार आहे.
ESAF बँकेचे एडवान्सेस १४.३०% ने तर ठेवी ३५% ने वाढल्या.
झोमाटोने इंटरसिटी सेवा सुरु केली.
सोलर ने दक्षिण आफ्रिकेमधील कंपनी ‘PROBLAST BS’ मध्ये स्टेक खरेदी केला.
TRENT रिलायंस शॉप स्टॉप भारतात launch करेल.
zaggle प्रीपेड ने हिरोमोटो बरोबर करार केला.
थरमॅक्सला जिंदाल एनर्जी बोट्स्वाना कडून २x ५५० TPH बॉयलर साठी Rs ५१३ कोटींची ऑर्डर मिळाली.
उत्कर्ष SFB ची डीपॉझीट ३०% ने वाढून Rs १८१६३ कोटी तर एडवान्सेस ३०.0 ६ % वाढून Rs १८७९८ कोटी झाले. CASA ठेवी २७% ने वाढून Rs ३४५३ कोटी झाल्या.
धनलक्ष्मी बँकेचे एडवान्सेस ६% ने वाढून Rs १०६४४ कोटी तर ठेवी ७.७% ने वाढून Rs १४४४० कोटी झाल्या. गोल्ड लोन्स २८.६६% ने वाढली
बजाज ऑटोने फ्रिडम १२५ CNG बाईक launch केली. या बाईकची किमत Rs ९५०००+ आहे.
CPSE, मेटल्स, FMCG, OIL & GAS, फार्मा, एनर्जी, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर बँकिंग शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९९६ NSE निर्देशांक निफ्टी २४३२३ बॅंक निफ्टी ५२६६० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.