आजचं मार्केट – ८ जुलै २०२४

.आज क्रूड US $ ८६.६८ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ ८३.४० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.९१ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२९ च्या आसपास होते. VIX १३.७५ होते. सोने Rs ७२९०० च्या आसपास तर चांदी Rs ९३१०० च्या आसपास होती. सर्व बेस मेटल्स मंदीत होती .
USA मधील नॉन फार्म पेरोल कमी झाला. जॉब कमी झाले २.०६ लाख झाले. बेरोजगारी वाढून ४.१% झाली. यामुळे महागाई कमी होऊन सप्टेंबरमध्ये रेटकट होईल अशी अटकळ मार्केटने बांधली.
FII ने Rs १२४१ कोटींची खरेदी तर DII ने Rs १६४१ कोटींची विक्री केली.
सरकारचे FY २४-२५ साठी अंदाजपत्रक २३ जुलैला सदर होईल. १२ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे अधिवेशन होईल.
M & M वर Rs १९४४ कोटींची पेनल्टी लावली.
TCS ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी त्यांचे पहिल्या तीमाहिचे निकाल ११ जुलै २०२४ रोजी जाहीर करेल.
बॅंक ऑफ बरोडा चे एडवान्सेस ८.५% ने वाढून Rs ८.८२ लाख कोटी झाले. डीपॉझीट ५.२५% ने वाढून Rs ११.०५ लाख कोटी झाले.
अडानी विल्मरने प्रत्येक प्रकारच्या मार्केटला अनुरूप धोरण अवलंबल्यामुले १३% ग्रोथ व्होल्युममध्ये झाली. ब्रान्डेड एक्स्पोर्ट व्हॉल्यूम ३६% वाढले. फूड आणी FMCG व्हॉल्यूम २३% ने वाढून तर खाद्य तेलांचा व्हॉल्यूम १३% ने वाढला तर व्हाल्यू ग्रोथ १०% झाली.
इंडियन बॅंकेची डीपॉझीट ९.५% तर एडवान्सेस १२.७% ने वाढले.
सिग्नेचर ग्लोबल चे प्रीसेल्स व्हॉल्यूम २५५% वाढून Rs ३१२० कोटी तर कलेक्शन १०२% वाढून Rs १२१० कोटी झाले . कर्ज Rs १८० कोटीनी कमी होऊन Rs ९८० कोटी झाले. रिअलायझेशन Rs १५३६९ प्रती SQ FT झाले. युनिट विक्री ८% वाढून ९६८ युनिट्स झाली. TITANIUM SPR आणी सोहम प्रोजेक्ट्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नेसलेने Rs २.७५ प्रती शेअर इंटरीम लाभांश जाहीर केला.
L & T ला Rs १०००० कोटी ते Rs १५००० कोटी दरम्यान मिडलइस्ट मध्येन सोलर प्लांट साठी ऑर्डर मिळाली.
अजमेर रिअल्टीची विक्री ३६% ने वाढून Rs ३०६ कोटी तर कलेक्शन ४९% ने वाढून Rs १६५ कोटी झाले.
अपोलो हॉस्पिटल ‘अपोलो हेल्थ आणी लाइफस्टाइल’ मधील ३५.१२ लाख शेअर्स Rs १०३.२६ कोटींना घेणार आहे.
J & K बँकेच्या QOQ ठेवी कमी झाल्या एडवान्सेस कमी झाले पण दोन्हीही YOY वाढले.
युनियन बँकेच्या ठेवी YOY वाढल्या पण QOQ FLAT राहिल्या. एडवान्सेस ११.५% ने वाढले.
टायटन ची एकूण ग्रोथ ९% ज्वेलरी ग्रोथ ८% तर वाचेस आणी आयवेअर ची ग्रोथ १५% झाली. आयकेअर ची ग्रोथ ३% झाली. लग्नकार्यासाठी मुहूर्त कमी असल्यामुळे आणी सोन्याची किमत वाढल्यामुळे मागणीवर परिणाम झाला.
इंडसइंड बँकेचे कर्ज १६% ने वाढून Rs ३.४८ लाख कोटी, ठेवी १५% ने वाढून ३.९८ लाख कोटी झाल्या. कासा रेशियो ३९.९% वरून ३६.७% झाला.
NYKAA ने सांगितले की यावर्षी २२% ते २३% ग्रोथ राहील. ब्युटी व्हरटिकल ची रेव्हेन्यू ग्रोथ २२-२३% राहील पण FASHION व्हर्टिकल ची ग्रोथ २०% राहिल ब्युटी व्हर्टिकल ची GMV जास्त असेल तर FASHION व्हर्टिकल ची GMV कमी असेल.
मेरिको च्या पराश्युट ची ग्रोथ लो सिंगल डीजीट ग्रोथ तर सफोला मध्ये मिड सिंगल डीजीट ग्रोथ झाली व्हाल्यू अडेड हेअरऑईल चा सॉफट launch झाला कारण मार्केट मध्ये स्पर्धा खूप आहे.
डाबरच्या उत्पादनांसाठी खेड्यातून मागणी वाढत आहे. HPC आणी हेल्थकेअर बिझिनेसमध्ये हाय सिंगल डीजीट ग्रोथ तर आंतरराष्ट्रीय बिझीनेस्स्मध्ये चांगली ग्रोथ झाली.
मान इंडस्ट्रीजला आंतरराष्ट्रीय OIL & GAS कंपनीकडून API लाईन पंप साठी Rs ८५० कोटींची ऑर्डर मिळाली.
फेडरल बँकेने बजाज ALLIANZ बरोबर करार केला.
shalby चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
HDFC लाईफचे प्रीमियम ८% ने वाढले. APE २५.५% ने वाढले, रिटेल APE ३२.6% ने वाढले.
SBI लाईफ इन्शुरन्स प्रीमियम २२%ने वाढले. APE १६.6% ने वाढले तर रिटेल प्रीमियम 18.३% ने वाढले.
ICICI प्रू चा न्यू बिझिनेस प्रीमियम २३.५% ने वाढला टोटल APE १२.७% ने वाढला. रिटेल APE २२.८% ने वाढला.
LIC चा प्रीमियम १३.6% ने वाढला, APE २०.८% ने वाढले.
वारी रिन्युएबल टेक्नोलॉजी ४१२.५ MW सोलर प्रोजेक्ट राजस्थानांत मिळाले
पारदर्शकता आणण्यासाठी मॉडेल होमबायर अग्रीमेंट सरकारने तयार केले आहे. त्याला सुप्रीम कोर्टांत सुप्रीम कोर्टाच्या सहमतीसाठी सरकारने सादर केले.
गोदरेज इंडस्ट्रीज ने वल्लभ केमिकलचे खेडा येथील ETHOXYLATION युनिट २ Rs ४५ कोटींना बिझिनेस ट्रान्स्फर साठी करार केला.
BPCL चा GRM कमी होत आहे
साकर हेल्थकेअर ने DOSSIER हे उत्पादन परदेशी पाठवायला सुरुवात केली. .
PCBL ला इंडियन पेटंट ऑफिस कडून सरफेस मॉडिफाईड कार्बन BLACK ग्रेड्स THAT विल IMPROVE पर्फोर्मंस ऑफ रबर लिक्विड कंपाउंड साठी पेटंट मिळाले.
कल्पतरू पॉवर ची NHAI बरोबर Rs ७५० कोटींच्या ऑर्डर्ससंबंधात डीस्प्युट झाली
स्वान एनर्जी च्या शेअर्समध्ये ३९.१९ लाख शेअर्समध्ये तर RVNL मध्ये ३४.५२ लाख शेअर्सचे Rs १८१ कोटींमध्ये तर IRFC मध्ये ९३.५८ लाख शेअर्सचे Rs १८४ कोटींना लार्ज डील झाले.
JLR ची होलसेल विक्री ५% ने तर रिटेल विक्री ७% ने वाढली.
आज FMCG आणी एनर्जी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी तर मेटल्स आणी फार्मा, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९६० NSE निर्देशांक निफ्टी २४३२० बॅंक निफ्टी ५२४२५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. . bpphatak@gmail.com. . ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.