आजचं मार्केट – ९ जुलै २०२४

आज क्रूड US $ ८५.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.७३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२९ आणी VIX १४.३७ च्या आसपास होते. सोने Rs ७२४००आणी चांदी Rs ९३४०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी कॉपर, झिंक आणी लेड तेजीत होते.

FII ने Rs ६१ कोटींची खरेदी तर DII ने Rs २८३७ कोटींची खरेदी केली.
गोदरेज कन्झ्युमरचा इंडिया बिझिनेस चांगला झाला. व्हॉल्यूम सिंगल डीजीट वाढले. तर व्हल्यूमध्ये मिडसिंगल डीजीट ग्रोथ झाली. होम केअर आणी पर्सनल केअर या दोन्हीही बिझीनेसमध्ये ग्रोथ झाली. इंडोनेशिया व्यवसाय प्रगतीपथावर आहे. GRUM ऑर्गनिक बिझिनेस व्हॉल्यूम डबल डीजीटने कमी झाला.
पिट्टी ENGG ने Rs ३६० कोटींचा QIP Rs १०५४.२५ प्रती शेअर दराने launch केला. यात ९० दिवसांचा लॉक इन पिरीयड आहे.
ज्युपिटर WAGON ने Rs ८०० कोटींचा QIP Rs ६८९.४७ फ्लोअर प्राईसने launch केला. या प्राईसमध्ये १.८२% ते २.८८% डायल्युशन होऊ शकेल.
MGL ने CNG १.५०/KG आणी PNG च्या किमती Rs १ ने वाढवल्या.
सेन्को गोल्डची रिटेल विक्री ११% ने वाढली. 6 नवी स्टोर्स ओपन केली. एकूण स्टोर्सची संख्या १६५ झाली. सेम स्टोर्स ग्रोथ ४% झाली. ट्रन्झक्सन व्हल्यू १२% ने वाढली .
KDDL ही कंपनी शेअर BUYBACK वर विचार करेल.
एक्झाईड आणी अमर राजा बॅटरी च्या किमती ३% ने वाढवणार आहेत.
अदानी एनर्जी कडून डायमंड पॉवरला Rs ९०० कोटींची ऑर्डर मिळाली. .
FMCG बिझिनेस विकल्यामुळे रेमंड ‘NODEBT’ कंपनी झाली.
उत्तर प्रदेश राज्य सरकारने मारुतीच्या हायब्रीड कार्स वरील रजिस्ट्रेशन चार्जेस माफ केले. यामुळे कार्स खरेदी करणार्यांना Rs ३.५० लाखापर्यंत फायदा होईल. तसेच मारुतीच्या 6 वर्ष जुन्या कार्स साठी कंपनीने 3 वर्षे आणी १ लाख KM ची वॉरनटी कंपनीने दिली आहे.
शाम मेटालिक्स चा स्टेनलेस स्टील व्हॉल्यूम १०० % ने वाढून ७०१५ टन झाला. अल्युमिनियम फॉइल्स चा व्हॉल्यूम ६.३% ने कमी होऊन ११७६ टन झाला.
कल्पतरू पॉवर NCD द्वारा Rs १००० कोटी उभारणार आहे.
L & T ला हिंदुस्थान शिपयार्ड कडून भारतीय नौसेनेसाठी फ्लीट सपोर्ट शिपच्या निर्माणासाठी Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
GM ब्रुअरीजचे पहिल्या तिमाहीत प्रॉफीट उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
चहाच्या किमतीत २०% वाढ झाल्यामुळे धूनसेरी टी, जयश्री टी, BBTC, MACLEOD रसेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
तांदुळाचे उत्पादन चांगले होईल. तांदुळाच्या निर्यातीवरील करांत सरकार सवलत देणार आहे अशा अपेक्षेने तांदूळ निर्यात करणाऱ्या कंपन्या KRBL, चमनलाल सेठिया, LT फुड्स, कोहिनूर फुड्स सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
ICICI लोम्बार्द्चे प्रीमियम इन्कम १५.९% ने वाढून Rs २२१७ कोटी, न्यू इंडिया अशुअरन्सचे ३.८% वाढून Rs ३००७ कोटी, बजाज फिनसर्व चे ७.७% ने वाढून Rs १२३४ कोटी झाले.
आलेम्बिक फार्माच्या ‘BROMFENAC ओप्थाल ला USFDA ची मंजुरी मिळाली.
RPP इन्फ्रा ला Rs ३११ कोटींची ऑर्डर मिळाली.
वेदांत १५ महिने मुदतीचे बॉंडस इशू करणार आहे.
इन्फिबीम इन्फिबीम डिजिटल मधील उरलेला २६% स्टेक खरेदी करणारआहे.
मेट्रोपोलिस हेल्थकेअरचा रेव्हेन्यू १३% ने वाढला. कंपनी DEBTFREE झाली. कंपनीकडे Rs १.४ BILIYAN चा कॅश रिझर्व आहे. .
रुल्का इलेक्ट्रिकल्स ला Rs २०७ कोटींची ऑर्डर मिळाली.
टोरांट पोवेर ARS स्टील & अलोईज इंटरनाशनल हे सोलर पॉवर जनरेटिंग प्रोजेक्ट सेट अप करणार आहेत.
K & R रेल ENGG ने दक्षिण कोरियातील UNECO या कंपनीबरोबर कॉम्पोझिट स्लीपर प्लांट साठी MOU केले.
इनोक्स विंड ला विंड टर्बाईन जनरेटर साठी गुजरात आणी राजस्थानातून ऑर्डर मिळाली.
मलेशिया एअरलाईनने AI पॉवर रेट इंटेलिजन्स साठी रेटगेन बरोबर मल्टी इअर पार्टनरशिप केली.
सेंच्युरी टेक्स्टाईल Rs १०० कोटी उभारणार आहे.
CESC ने TARIF ५.७% ने वाढवले
IT, OIL &GAS क्षेत्रांत प्रॉफीट बुकिंग झाले. ऑटो, फार्मा, रिअल्टी मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०३५१ NSE निर्देशांक निफ्टी २४४३३ बॅंक निफ्टी ५२५६८ वर बंद झाली.

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.