आजचं मार्केट – १० जुलै २०२४

.आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.१२ USA १० वर्षे बॉंड ४.३० आणी VIX १४.८० च्या आसपास होते. सोने Rs ७२५०० आणी चांदी Rs ९३३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक, कॉपर,अल्युमिनियम मंदीत तर लेड तेजीत होते. USA च्या फेडच्या अध्यक्षांनी सांगितले की गेल्या तीन महिन्यांचा डेटा रेटकट करावा असा नाही. पण व्याजाचे रेट जास्त ठेवणे अर्थव्यवस्थेसाठी योग्य होणार नाही.

चीनचा CPI MOM 0.२ ने कमी झाला. PPI MOM 0.२% ने कमी झाला PPI YOY 0.८ ने कमी तर CPI YOY 0.२% ने कमी झाला
FII ने Rs ३१४ कोटींची खरेदी तर DII ने Rs १४१६ कोटींची खरेदी केली.
KDDL या कंपनीने २.३७ लाख शेअर्स ( १.९% इक्विटी ) बायबॅक Rs ३७०० प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने करण्याची घोषणा केली. या बायबॅक मध्ये प्रमोटर्सही भाग घेतील.
NYKAA मध्ये १.४७ कोटी शेअर्सचे Rs २५६ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
मनकाइंड फार्मा मध्ये ३७.०१ लाख शेअर्समध्ये Rs ७७० कोटींचे डील झाले.
डेल्हीव्हरी मध्ये २.३४ कोटी शेअर्स मध्ये म्हणजे ३.१७% इक्विटीमध्ये लार्ज डील झाले.
RVNL च्या ३१.९१ लाख शेअर्समध्ये Rs १८१ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
IRB इन्फ्रा च्या ६.६५ कोटी शेअर्समध्ये Rs ४५२ कोटींचे लार्ज डील झाले.
M & M ने त्यांच्या XUV ७०० AX७ सर्व व्हेरीयंट ची किमत या मॉडेलला ३ वर्षे पुरी झाली म्हणून १० जुलै २०२४ पासून ४ महिने पर्यंत कमी केली.
आज एमक्यूअर फार्माचे 31% प्रीमियम वर ( IPO मध्ये Rs १००८ ला दिला) BSE वर आणी NSE वर Rs १३२५.०५ वर लिस्ट झाला.
बन्सल वायर्स चे BSE वर Rs ३५२.०५ आणी NSE वर Rs ३५६ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २५६ ला दिला होता. ज्यांना हे शेअर्स IPO मध्ये अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
शिल्पा मेडिकेअर च्या रायपुर युनिटला ब्राझिलियन रेग्युलेटरी ऑथारीटी कडून GMP सर्टिफिकेट मिळाले
डेल्टा कॉर्प चे पहिल्या तीमाही चे निकाल कमजोर आले. प्रॉफीट, उत्पन्न मार्जिन कमी झाले. कॅसिनो विभागाचे Rs १६९ कोटी ( Rs २२६ कोटी) झाले तर ऑन लाईन स्कील गेमिंग PLATFORM चे उत्पन्न FLAT राहिले.
RVNL ला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नागपूर मेट्रोसाठी LOA मिळाले. हे Rs १८७.३४ कोटींचे प्रोजेक्ट आहे. तसेच साउथ इस्टर्न रेल्वेच्या Rs २०२.८ कोटींच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली.
अदानी पोर्ट ला दीनदयाळ पोर्टच्या बर्थ नंबर १३ ची डेव्हलपमेन्ट ऑपरेशन आणी मेंटेनन्स साठी LOI मिळाले. याचे काम २०२७ मध्ये सुरु होईल.
‘MARATHON NEXTGEN’ ची विक्री ४५% ने कमी, कलेक्शन वाढले पण व्हल्यू कमी झाले.
हवेल्ल्स त्यांची क्षमता ३२.९ लाख KMS वरून ४१.२२ लाख KMS वाढवण्यासाठी Rs ३७५ कोटी गुंतवणूक करणार आहे.
JSW स्टीलचे उत्पादन कमी झाले क्षमता ९७% उपयोगांत आणली गेली.
HUL ने सांगितले की AI ची मदत घेऊन सप्लाय चेन जास्त कार्यक्षम केली जाईल.
नैसर्गिक रबराच्या किमती १३ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत. अनियमित आणी कमी/ जास्त पावसामुळे नैसर्गिक रबराचे भारतात उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे नैसर्गिक रबराची उपलब्धता कमी राहील. भारतात नैसर्गिक रबरासाठी मागणी १४.५० लाख टन आणी उत्पादन ८.५० लाख टन आहे. त्यामुळे आयात करणे क्रमप्राप्त आहे. टायर उद्योगाने सरकारकडे नैसर्गिक रबरावरची आयात ड्युटी कमी करण्याची मागणी केली आहे.
रशियाकडून खतांचा अव्याहत पुरवठा होईल . भारत रशियाकडून कोकिंग कोल आयात करेल.
संरक्षण उपकरणांच्या उत्पादनांत दोघांचे सहकार्य असेल. त्यात टेक्नोलॉजी ट्रान्स्फरचा समावेश असेल.
एनर्जी क्षेत्रांत दीर्घ मुदतीचे करार होतील.
ग्रीव्ज फायनान्स ने EV ओनरशिप फायनान्सिंग साठी ACKO बरोबर करार केला.
RVNL ने नेपाळमधील IMS कन्सल्टन्सी बरोबर MOU केले.
UP सरकारने EV आणी हायब्रीड कार संदर्भातील धोरणाबद्दल चर्चा करण्यासाठी संबंधितांची बैठक बोलावली.
अदानी पॉवर संबंधांत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डाची याचिका अपेलेट ट्रायब्युनलने फेटाळली.
TVS मोटर्सने APACHE ATR १६० रेसिंग एडिशन launch केली. या बाईकची किमत Rs १.२९ लाख + असेल.
सुप्रीम कोर्टाने दिल्लीमध्ये थ्री व्हीलर्सच्या रजिस्ट्रेशनच्या संख्येवर कॅपिंग विरुद्ध बजाज ऑटोने केलेला अर्ज रद्दबातल केला.
एशियन पेंट्स आणी बर्जर पेंट्स या कंपन्या २२ जुलै २०२४ पासून त्यांच्या उत्पादनाच्या किमतीत 0.७% ते १% एवढी वाढ करणार आहेत.
आज ऑटो, मेटल्स आणी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. तर FMCG, फार्मा, PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९२४ NSE निर्देशांक निफ्टी २४३२४ बॅंक निफ्टी ५२१८९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.