Monthly Archives: August 2024

आजचं मार्केट – ३० ऑगस्ट २०२४

.आज क्रूड US $ ८०.१० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.३९ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८६ आणी VIX १३.५५ होते. सोने Rs ७१९०० आणी चांदी Rs ८४४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
आज USA मध्ये NASDAQ मंदीत तर डॉव जोन्स तेजीत होते. USA च्या GDP ग्रोथचे अनुमान ३% आले.
FII ने Rs ३२६० कोटींची खरेदी तर DII ने Rs २६९१ कोटींची खरेदी केली.
प्रेस्टीज इस्टेट Rs ५००० कोटींचा QIP तर MAX इस्टेट Rs ८०० कोटींचा QIP करणार आहे.
गार्डन रिच शिपबिल्डर्सने NHDICL ( NATIONAL हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) बरोबर डबल लेन मोड्युलर ब्रिजसाठी MOU केले.
थायरोकेअरने विमटा LAB बरोबर त्यांचा डायग्नोस्टिक आणी PATHOLOGY बिझिनेस अक्वायर करण्यासाठी करार केला.
M & M ने एन्टीड्रोन सोल्युशन एक्स्प्लोअर करण्यासाठी ‘SENTRYCS’ बरोबर करार केला.
RVNL ला Rs २०२ कोटींची ऑर्डर मिळाली.
इन्फोसिसने NVIDIA बरोबरची ‘हाय परफॉरमन्स जनरेटीव्ह AI इंट्रोड्युस’ करण्यासाठी भागीदारी वाढवली.
उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन करण्यावरील निर्बंध सरकारने उठवले. B-हेव्ही मोलासीस आणी C-हेव्ही मोलासीस मधून इथेनॉल उत्पादन होऊ शकेल. याचा परिणाम साखर उत्पादक कंपन्यांवर होईल.
प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी डीस्टीलरीजना टेक्निकल असिस्टन्स देते. त्यामुळे ह्या कंपनीच्या शेअरवर ही परिणाम होऊ शकतो.
RVNL ने पटेल एन्जिनीअरिन्ग बरोबर हायड्रो आणी इन्फ्रा प्रोजेक्ट्स साठी MOU केले.
ITI ला पश्चिम बंगालच्या राज्य निवडणूक आयोगाकडून ५०० EVM ची ऑर्डर मिळाली.
JAI कॉर्प ही कंपनी Rs ४०० प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने शेअर बाय बॅक वर Rs ११८ कोटी खर्च करेल.
NBCC 31 ऑगस्ट २०२४ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
स्पाईस जेटवरील सर्विलंस DGCA ने वाढवला.
LIC ला Rs ६०५.९८ कोटींची GST डिमांड नोटीस मिळाली.
हुडकोला इंफ्रास्ट्रक्चरसाठी कर्ज देण्यासाठी मंजुरी मिळाली.
NTPC च्या 350MV सोलर प्लांटपैकी १६० MV एवढा भैसारा सोलर प्लांट चालू झाला.
HAL ने ‘अरावाल्ली इंजिन’ या न्यू जनरेशन हेलिकॉप्टर इंजिन डेव्हलप करण्यासाठी ‘SAFAL’ बरोबर करार केला.
नाटको फार्माच्या कॅन्सरवरील जनरिक ड्रगला USFDA ची मंजुरी मिळाली.
अदानी पोर्टची सबसिडीअरी APSEZ ने ‘ASTRO ऑफशोअर ग्रुप’ मध्ये US $ १८.५ कोटींना ८०% स्टेक घेतला.
लेमन ट्री हॉटेलने अमृतसरमध्ये ६८ रुम्सचे हॉटेल सुरु करण्याकरता करार केला.
झायडस लाईफच्या ‘SCOPOLAMINE TRASDERMAL ‘या औषधाला USFDA ची अंतिम मंजुरी मिळाली. USA मध्ये या औषधाची विक्री US $ ६९.६ मिलियन्स ची आहे.
इंडिगो २ सप्टेंबर पासून दिल्ली टर्मिनस I वरून पुन्हा कामकाज सुरु करेल.
झायडस लाईफ च्या जारोड येथील इंजेक्शन युनिट ला GMP नियमांकडे दुर्लक्ष केले म्हणून USFDA ने वार्निंग लेटर दिले. हे इन्स्पेक्शन १५ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान झाले होते. USFDA ने सांगितले की डेटा इंट्रग्रीटीचा प्रॉब्लेम नाही.
जिओ फायनान्शिअल्स सर्विसेस लवकरच होम फायनान्स चा बिझिनेस सुरु करेल.
MSCI निर्देशांकांत चीन तैवान आणी कोरियाचे वेटेज कमी केले तर भारताचे वेटेज वाढवले.
आज फार्मा, रिअल्टी, PSE, OIL & GAS आणी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर FMCG मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८२३६५ NSE निर्देशांक निफ्टी २५२३५ बॅंक निफ्टी ५१३५१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ७३.७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.९८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८३ VIX १४.०४ च्या आसपास होते. सोने Rs ७२००० आणी चांदी Rs ८४५०० च्या आसपास होती. बेस मेटल्स आज तेजीत होती.
NVIDIA चे निकाल चांगले आले. रेव्हेन्यू वाढण्याचा वेग कमी झाला. अनुमान खूप ठेवले होते. अल्फाबेट, मेटा, APPLE, मायक्रोसॉफ्ट ह्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. हाथवे ने ‘बॅंक ऑफ अमेरिका’ चे शेअर्स विकले.
सोनाटा सोफ्टवेअर ला प्रीमियर हेल्थकेअर आणी वेलनेस कंपनीकडून मल्टी इअर, मल्टी मिलियन स्ट्रॅटेजीक आउटसोर्सिंग डील मिळाले.
सरकारने २३४ नवीन शहरांसाठी FM रेडीओ स्टेशनसाठी ऑक्शन होईल असे सांगितले . एकूण ७३० चानेल असतील. ग्रोस रेव्हेन्युच्या ४% लायसेन्स फी असेल.
रिलायंस आणी डिस्ने यांच्यातील डीलला CCI ( कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने मंजुरी दिली. रिलायंस, VIACOM 18 मेडिया, डिजिटल 18 मेडिया, स्टार इंडिया, आणी स्टार टेलीविजन यांचे हे JV आहे. रिलायंसकडे १६.३४% स्टेक आणी कंट्रोल असेल. नीता अंबानी या कंपनीच्या चेअरमन असतील.
PB फिनटेक मध्ये ७९.०९ लाख शेअर्सचा लार्ज ट्रेड झाला.
वेलस्पन लिविंगमध्ये ३.८ कोटी शेअर्सचा Rs ७८१ कोटींमध्ये लार्ज ट्रेड झाला.
इंडिगो मध्ये राकेश गंगवाल यांनी २.३५ कोटी शेअर्स (६.०७ % इक्विटी) Rs १११०३ कोटींमध्ये विकला.या डील ला १५० दिवसांचा लॉकइन पिरीयड असेल.
लेमन ट्री हॉटेल्सने मध्यप्रदेशातील उज्जैन येथे ७२ रूम्सच्या हॉटेल करता करार केला.
KABIL ने OIL बरोबर JV केले.
वेदान्ता २ सप्टेंबर २०२४ रोजी इंटररिम लाभांशावर विचार करेल.
Paytm ला परदेशातून फंड उभारायला मंजुरी मिळाली. पुन्हा एकदा पेमेंट एग्रीगेटर साठी अर्ज करायला सांगितले. Paytm पेमेंट सर्विसेस लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी मिळाली.
KEC ला मिडलइस्ट मधून Rs ११७१ कोटींची ऑर्डर मिळाली. आता कंपनीचे ऑर्डरबुक Rs १०००० कोटींवर गेले.
P & G हेल्थ चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ९५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
पिकॅडिली एग्रो ची व्हिस्की आता CRPF, BSF, SSB आणी ITBP च्या कॅन्टीन मध्ये उपलब्ध होईल.
जिलेट ला Rs ११६ कोटी प्रॉफीट,उत्पन्न Rs ६४५ कोटी झाले कंपनीने Rs ४५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
रिलायंस इंडस्ट्रीज ५ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या बैठकीत १:१ या प्रमाणांत बोनस शेअर इशू करण्यावर विचार करेल.
TCS ने ‘FASHION रिटेल PRIMAK’ बरोबर टेक्नोलॉजी ट्रान्स्फर साठी करार केला.
NBCC ने न्यू दिल्लीतील कमर्शियल स्पेस विकली.
LT फुड्स ने ‘नेचर बायोफुड्स’ मधील १७.५% स्टेक घेतला.
ऑरोबिंदो फार्माला Rs ७.०९ कोटींची तर अक्झो नोबल ला Rs ९.२७ कोटींची TAX डिमांड ऑर्डर मिळाली.
GENUS पॉवरला ५५.९ लाख स्मार्ट मीटर्स डीझाईन,सप्लाय,इन्स्टाल आणी मेंटेन करण्यासाठी Rs ४४७० कोटींची ऑर्डर मिळाली.
अन्नपूर्णा स्वादिष्ट ने मधुर कन्फेक्शनरी मध्ये Rs १८० कोटींना १००% स्टेक घेतला.
JSW एनर्जीला ४०० MW विंड/ सोलर हायब्रीड प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
डिक्सन टेक चीन मधील HKC या कंपनीबरोबर डिसप्ले मोड्यूल उत्पादन करण्याकरता JV करणार.
गाला प्रिसिजन एन्जिनीअरिन्ग या फेब्रुवारी 2009 मध्ये स्थापन झालेल्या, प्रिसिजन काम्पोनंटचे ( ( डिस्क, स्ट्रीप स्प्रिंग्स, कॉईल आणी स्पायरल स्प्रिंग्स आणी स्पेशल फासनिंग सोल्युशन्स) चा OEMS ला सप्लाय करण्याच्या कार्यक्षेत्रांत काम करणाऱ्या कंपनीचा Rs १६७.९३ कोटींचा ( फ्रेश इशू
Rs १३५ .३४ कोटी आणी Rs ३२.५९ कोटींचा OFS) २ सप्टेंबर २०२४ ला ओपन होऊन ४ सप्टेंबरला बंद होईल. शेअरची दर्शनी किमत Rs १० असून प्राईस बॅंड Rs ५०३ ते Rs ५२९ असून मिनिमम लॉट २८ शेअर्सचा आहे. कंपनीला FY २०२४ मध्ये Rs २२.३३ कोटी प्रॉफीट आणी Rs २०४.३८ कोटी उत्पन्न आणी PAT मार्जिन ११.८९% होते.
आज निफ्टीने इंट्रा डे २५१९२ ऑल टाईम हाय गाठला
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८२१३४ NSE निर्देशांक निफ्टी २५१५२ तर बॅंक निफ्टी ५११५२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ७९.६० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.६० USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८२ VIX १३.90 च्या आसपास होते. सोने Rs ७२००० आणी चांदी Rs ८५३०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मध्ये तेजी होती.
आज FII ने Rs १५०४ कोटींची खरेदी तर DII ने Rs ६०४.०० कोटींची विक्री केली.
CARYSIL UK हे CARYSIL ब्रासवेअरमधील ३०% स्टेक GBP ३.५० लाखांना घेणार. ७०% स्टेक एप्रिल २०२३ मध्ये घेतला होता.
UPL ची सबसिडीअरी UPL ग्लोबलने PT EXCEL meg इंडोनेशियामधील उर्वरीत २०% स्टेक US $ ६ .५ मिलियन्स ला घेतला. ऑक्टोबर २०२१ मध्ये ८०% स्टेक घेतला होता.
टाटानी RBI ला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट परत केले. Rs २०००० कोटींचे कर्ज फेडले. त्यामुळे आता टाटा सन्स अनलीस्टेड राहू शकते. Rs ३६३ कोटींचे नॉन कॉनव्हर्रटिबल डिबेंचर्स राहिले. Rs ४०५ कोटी SBI कडे जमा केले.
AWFIS ने नियती ग्रुप बरोबर ३ लाख SQFT ग्रेड I स्पेस लीज केली.
रोटो पंप्स ला Rs ११ कोटींची ऑर्डर मिळाली.
PNC इन्फ्राटेकला गंगा नदीवर पूल बांधण्यासाठी Rs ३८० कोटींची ऑर्डर मिळाली.
झायडस लाईफच्या ‘AMANTADINE’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
विप्रोने ‘AI रेडी PLATFORM’ मजबूत करण्यासाठी ‘DELL’ बरोबर करार केला.
इंसेक्टीसाईड इंडिया ३० ऑगस्ट रोजी शेअर बायबॅकवर विचार करेल.
E-PACK ड्युरेबल ने E-PAVO इलेक्ट्रिकल मध्ये २४% स्टेक घेतला.
GENSOL ने USA मध्ये ‘स्कोर्पियस TRACKERS’या नावाने सबसिडीअरी स्थापन केली.
ल्युपिनच्या हायपरटेन्शनवरील ड्रगला USFDA ची मंजुरी.
ओरीएंट टेक चे BSE वर Rs २९० वर आणी NSE वर Rs २९० ला लिस्ट झाला.
तानला PLATFORMने मेसेजिंग सर्विसेसचा दुरुपयोग टाळण्यासाठी ‘REGISTRATION.AI‘ हे मोड्यूल launch केले.
GMR एअरपोर्ट मध्ये GQG ने आणखी ४.५ कोटी शेअर्स खरेदी केले.आता त्यांचा स्टेक ५.१७% झाला.
NBCC 31 ऑगस्टला बोनस शेअर्स वर विचार करणार आहे.
ECOS (इंडिया) मोबिलिटी & हॉस्पिटैलिटी लिमिटेड या फेब्रुवारी १९९६ मध्ये स्थापन झालेल्या आणी CHAUFFEURED कार रेन्टल्स आणी एम्प्लोयी ट्रान्सपोर्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीचा Rs ६०१.२० कोटींचा ( ही पूर्णपणे OFS आहे ) IPO २८ ऑगस्टला ओपन होऊन ३० ऑगस्ट २०२४ ला बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs ३१८ ते Rs ३३४ असून मिनिमम लॉट ४४ शेअर्सचा आहे.
कंपनीला FY २४ मध्ये Rs ५२.६३ कोटी प्रॉफीट झाले असून उत्पन्न Rs ५६८.२१ कोटी झाले होते. PAT मार्जिन ११% होते. कंपनी ५०० कंपन्यांना इम्प्लोयी ट्रान्सपोर्टेशन सेवा पुरवते.
BAAZAR STYLE RETAIL या जुन २०१३ मध्ये स्थापन झालेल्या आणी FASHION रिटेलर म्हणून पुरुष, स्त्रिया लहान मुले यांचे कपडे, आणी इतर वस्तू आणी होम फर्निशिंग मार्केटमध्ये ओडिशा आणी पश्चिम बंगाल मध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीचा Rs ८३४.६८ कोटींचा IPO ( Rs १४८ कोटींचा फ्रेश इशू आणी ६८६.६८ OFS ) ऑगस्ट ३० ला ओपन होऊन सप्टेंबर ३, २०२४ ला बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs ३७० ते Rs ३८९ असून मिनिमम लॉट ३८ शेअर्सचा आहे. कंपनीला FY २४ साठी Rs २१.९४ कोटी प्रॉफीट आणी उत्पन्न Rs ९८२.६३ कोटी झाले होते. प्रॉफीट मार्जिन २.२३ % होते.
सरकारने साखरेच्या विक्री साठी कोटा २२ लाख टन वरून २३.५ लाख टन केला.
VI च्या AGR संबंधीत क्युरेटिव्ह पिटीशनची ३० ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे.
TITAN ने ‘DEE BEERS’ बरोबर नैसर्गिक डायमंड चे मार्केट डेव्हलप करण्यासाठी करार केला.
अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टला BALCO कडून छत्तीसगढमध्ये हौसिंग कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी Rs ३५० कोटींची ऑर्डर मिळाली.
झोमाटो ने ‘झोमाटो फॉर एन्टरप्रायझेस’ हा फूड एक्सपेन्सेस व्यवस्थापन करण्यासाठी PLATFORM launch केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० इंडस्ट्रीयल पार्क्सना मंजुरी दिली, १२ इंडस्ट्रीयल स्मार्ट सिटीजसाठी Rs २८६०२ कोटीची मंजुरी दिली.
ज्योती स्टक्चरला Rs १०६ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज IT आणी फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली आणी FMCG,एनर्जी आणी PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१७८५ NSE निर्देशांक निफ्टी २५०५२ बॅंक निफ्टी ५११४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ८१.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.८८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८१ VIX १३.७५ च्या आसपास होते. सोने Rs ७१८०० चांदी Rs ८५४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
लिबियामध्ये क्रूड चे उत्पादन बंद करणार म्हणून क्रूडमध्ये तेजी आली.
USA मध्ये ड्युरेबल गुड्स डेटा खूप चांगला आला.
FII ने Rs ४८३ कोटींची तर DII ने Rs १८७० कोटींची खरेदी केली.
अल्ट्राटेक सिमेंटला ६ बँकांनी एकूण US $ ५०० मिलियन्स सस्टेनेबिलीटी लोन मंजूर केले.
GPT इन्फ्रा ने OIP Rs १८३.८३ फ्लोअर प्राईसने launch केला.
HCL टेक ने XEROx बरोबर करार वाढवला.
लेमन ट्री हॉटेल्सने अयोध्येमध्ये ८० रूम्सच्या हॉटेलसाठी करार केला.
MEDIASSIST कंपनीच्या आर्मने PRARMOUNT TPA बरोबर शेअर परचेस अग्रीमेंट केले.
पिरामल कॅपिटल आणी हौसिंग फायनान्स लिमिटेड ला आयकर विभागाने DHFL च्या २०२० वर्षांत केलेल्या अक्विझिशन संबंधांत Rs ४६६ कोटी पेनल्टी लावली आहे.
Paytm च्या व्यवस्थापनाने सांगितले की ही नवी नोटीस नाही आम्ही चौकशीत सहकार्य करत आहोत.
झायडस लाईफ ने ५०% शेअर खरेदी करण्याच्या आधीच अधिग्रहण जाहीर केले.
उकल फ्युएल्स ने ब्लेअर मोटर्स बरोबर इलेक्ट्रिक काम्पोनंटआणी मोटार कंट्रोलर डिझाईन साठी करार केला.
सरकार डायव्हेस्टमेंट करणार नाही असे अनुमान होते. पण आता सरकार ८ खतांच्या कंपन्यांमध्ये डायव्हेस्टमेंट करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘सिगल’चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
PREMIER एनर्जी या एप्रिल १९९५ मध्ये स्थापन झालेल्या, इंटिग्रेटेड सोलर PANELS,मोड्यूल्स, CELLS चे उत्पादन,EPC सोल्युशन्स आणी O & M सोल्युशन्समध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीचा Rs २८३०.४० कोटींचा ( Rs १२९१ कोटींचा फ्रेश इशू आणी Rs १५३९ कोटींचा OFS) IPO २७ ऑगस्टपासून ओपन होऊन २९ ऑगस्टला बंद होईल. प्राईस बॅंड Rs ४२७ ते Rs ४५० असून दर्शनी किमत Rs १ आहे. मिनिमम लॉट ३३ शेअर्सचा आहे. कंपनीची ५ उत्पादन युनिट हैदराबाद मध्ये आहेत. कंपनीला Rs २३१.३६ कोटी प्रॉफीट आणी उत्पन्न Rs ३१७१.31 कोटी झाले होते. कंपनी IPO ची प्रोसीड्स 4 GW सोलर PV TOPCON मोड्यूल उत्पादन आणी 4 GW सोलर PV TOP CON CELL उत्पादन युनिट हैदराबाद मध्ये उभारण्यासाठी करेल.
TCS फिलीपाईनमध्ये TCS स्पेस स्टुडीओ स्थापन करणार आहे.
TRENT मध्ये ६.७८ लाख शेअर्सचे Rs ६९२५ प्रती शेअर या भावाने Rs ४७० कोटींचे लार्ज डील झाले.
HUL ला आयकर विभागाकडून Rs ९६२.५० कोटींची नोटीस मिळाली.
अदानी पॉवर ने अबुधाबीमध्ये अदानी पॉवर लिमिटेड मिडलइस्ट ही सबसिडीअरी स्थापन केली. ही कंपनी इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपनी म्हणून काम पाहिलं.
SEBI ने CDSL ला Rs १.३० कोटी सेटलमेंट रक्कम म्हणून भरायला सांगितले.
झी एन्टरप्रायझेस ने सोनी इंडिया बरोबर ट्रान्झक्शन रद्द करण्यासाठी सेटलमेंट केली.
श्रीराम फायनान्स ओव्हरसीज मार्केटमधून Rs १५० कोटी उभारणार आहे.
पारस डिफेन्स QIP द्वारा Rs 200 कोटी उभारेल.
ICICI प्रू ला Rs ४२९ कोटीची GST TAX डिमांड नोटीस मिळाली.
जिओ फायानंसियल्सने जिओ पेमेंट बँकेमधील स्टेक वाढवला तो ७८.९५ % वरून ८२.१७% केला.
आयशर मोटर्सने बैद्यनाथ ING बरोबर ५०० LNG ट्रक्ससाठी करार केला.
सरकारचा VI मधील सरकारचा स्टेक विकण्याची कोणतीही योजना नाही. Rs २४७०० कोटींची बॅंक GURANTEE माफ करण्यावर विचार होण्याची शक्यता आहे.
भारती एअरटेलने त्यांच्या प्रीमियम युजर्सना APPLE TV+ आणी APPLE म्युझिक उपलब्ध करण्यासाठी करार केला.
डाटामाटीक्स्ने मायक्रोसॉफ्ट बरोबर AI सोल्युशन्स थ्रू COPILOTS साठी करार केला.
RVNL दक्षिण रेल्वेच्या Rs १११ कोटींच्या प्रोजेक्ट्स साठी लोएस्ट बीडर ठरली.
पॉली मेडीक्युअरने सांगितले की ते QIP ची रक्कम भांडवली गुंतवणूक आणी एक्विझिशन साठी वापरतील. त्यांनी US $ २० लाखांचे USA मध्ये निर्यातीचे लक्ष्य निश्चित केले आहे. क्रिटीकल केअर कार्डीओ विभागावर आमचा भर असेल. कंपनीकडे ४ प्रोडक्टस् साठी USFDA ची मंजुरी आहे.
आज मिडकॅप, स्मालकॅप, फार्मा, केमिकल क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली रिअल्टी IT आणी बँकिंग शेअर्समध्ये मामुली खरेदी झाली.FMCG मेटल्स, एनर्जी क्षेत्रात प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१७११ NSE निर्देशांक निफ्टी २५०१७ आणी बॅंक निफ्टी ५१२७८ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०२४

.आज क्रूड US $ ८०.०० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.८० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.५५ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ३.७८ आणी VIX १३.७३ च्या आसपास होते. सोने Rs ७२२०० आणी चांदी Rs ८६००० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.
USA मध्ये जेक्सन होल च्या मिटींगमध्ये फेडचे अध्यक्ष JEROME पॉवेल यांच्या भाषणाकडे मार्केटचे लक्ष होते. त्यांनी सांगितले की ‘ आता फेडचे धोरणात एड्जस्टमेंट करण्याची वेळ आली आहे. आपल्या ध्येयाकडे प्रवासाची दिशा निश्चित आहे. रेट कट करण्याची वेळ आणी प्रमाण जो डेटा वेळोवेळी येईल त्यावर अवलंबून असेल. त्यांचे ‘रेट कट करण्याची वेळ आली आहे’ याच वाक्याची मार्केट आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे मार्केटमध्ये तेजी आली.
इझ्रायल आणी हमास यांच्यातील जिओपोलिटिकल तणाव वाढत आहे.
FII ने Rs १९४४ कोटींची तर DII ने Rs २८९६ कोटींची खरेदी केली.
भारताच्या मार्केटमध्ये या आठवड्यात मासिक एक्सपायरी आहे.
AU SFB मध्ये १.२७ कोटी शेअर्सचे Rs ८०४ कोटींचा लार्ज ट्रेड झाला.
CGQ ने अंबुजा सिमेंट मध्ये २.६ कोटी शेअर्स (१.८ % इक्विटी ) खरेदी केले.
HS बंगा यांनी NYKAA मधील १.४३% स्टेक ब्लॉक डील च्या माध्यमातून विकला.
मेडप्लसमध्ये १.४२ कोटी शेअर्सचा लार्ज ट्रेड Rs ८८२ कोटींना झाला.
JSW एनर्जीची सबसिडीअरी JSW एनर्जी ला २५० MW प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
युनो मिंडा ‘टोकाई रिको मिंडा’ बरोबर JV करून नवीन प्लांट उभारणार आहे. ‘
‘इंटर आर्क बिल्डींग प्रोडक्टस् चे BSE वर Rs १२९१ आणी NSE वर Rs १२९९ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये शेअर Rs १२०० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
शिल्पा मेडिकेअरने ‘NORVDCA TABLET’ ची फेज III क्लिनिकल स्टडीची ट्रायल पूर्ण केली. हे नॉन अल्कोहोलिक FATTY लिव्हर साठी औषध आहे.
DR रेडीजच्या श्रीकाकुलम युनिटला १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये ३ त्रुटी दाखवून USFDA ने फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
झायडस लाईफने स्टर्लिंग बायोटेकमध्ये ५०% स्टेक घेतला.
FDC च्या बद्दी युनिटला USFDA ने फॉर्म नंबर ४८३ इशू केला पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही. जिओ फायानंशियल्स सध्याची FII लिमिट पेड अप कॅपिटलच्या १७.५५% होती ती ४९% पर्यंत वाढवण्यासाठी मंजुरी मिळाली.
ONGC च्या कृष्णा नदी क्लस्टर II च्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये उत्पादन सुरु झाले.
लेमन ट्री सुरत मध्ये १७५ रुम्सचे हॉटेल सुरु करणार आहे.
आलेम्बिक फार्माच्या ‘BETAMETHASONE VALERATE ‘ ला USFDA ची मंजुरी मिळाली.
जय कॉर्प २९ ऑगस्टला शेअर बायबॅक वर विचार करेल.
SBI MF ला करुर वैश्य बँकेत ९.९९% स्टेक घेण्यासाठी RBI ने मंजुरी दिली.
३० सप्टेंबर २०२४ पासून निफ्टी मध्ये BEL आणी TRENT चा समावेश होणार आहे. आणी डिविज LAB आणी LTI माइंडट्री निफ्टी मधून बाहेर पडतील.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया Rs १२०० प्रती शेअर या भावाने शेअर बाय बॅक वर Rs १५९ कोटी खर्च करेल.या बाय बॅक साठी ४ सप्टेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
KEC ला त्यांच्या T & D बिझिनेस साठी Rs १०७९ कोटींची ऑर्डर मिळाली एकूण ऑर्डर बुक Rs ८७०० कोटींचे झाले.
FTSE ऑल वर्ल्ड इंडेक्स मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र, BDL, सेन्ट्रल बॅंक, कोची शिपयार्ड, एन्ड्युरन्स टेक, हुडको, IRB इन्फ्रा, KEI इंडस्ट्रीज, एस्कॉर्टस, G E T & D, हिताची एनर्जी, LLYODS मेटल, मोतीलाल ओसवाल या कंपन्या २३ सप्टेंबर २०२४ पासून समाविष्ट होतील.
Paytm चे संस्थापक शेअर शर्मा यांना आणी Paytm च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना SEBI ने कारणे दाखवा नोटीस पाठवली यात काही माहिती न दिल्याचे आणी प्रमोटर्सविषयी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आरती ड्रग्स ने Rs ९00 प्रती शेअर या दराने ६.६५ लाख शेअर्स टेंडर ऑफर रूटने शेअर बाय बॅक जाहीर केला या शेअर बाय बॅकवर कंपनी Rs ५९.८५ कोटी खर्च करेल आणी या बाय बॅक साठी ५ सप्टेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
अकुम्स ड्रग्स तोट्यातून फायद्यात आली. Rs १८७ .४ कोटी तोटा होता तो Rs ६० कोटी फायदा झाला. रेव्हेन्यू ५% ने वाढून Rs १०९१ कोटी झाला.
मंगलम ड्रग्सच्या मलेरिया निर्मुलन प्रोजेक्टला GRANT मिळाली.
BHEL ला एकूण Rs ११००० कोटींच्या ३ ऑर्डर मिळाल्या.
आज मिडकॅप, स्मालकॅप, बँकिंग, मेटल्स, रिअल्टी, IT, एनर्जी, PSE, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१६९८ NSE निर्देशांक निफ्टी २५०१० आणी बॅंक निफ्टी ५११४८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ७७.२० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.४२ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८५ आणी VIX १२.९५ च्या आसपास होती. सोने Rs ७१४०० आणी चांदी Rs ८४००० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
USA मध्ये NASDAQ 300 पाईंट आणी डॉऊ जोन्स १७७ पाईंट पडले. जॉबलेस क्लेम २.७२ लाख आले.
FII ने १३७२ कोटींची खरेदी तर DII ने २९७२ कोटींची खरेदी केली.
झोमाटो ‘इंटरसिटी लीजंड्स’ बिझिनेस बंद करणार. त्यांना दोन वर्षांत ‘प्रॉडक्ट मार्केट फिट’योग्य मिळाले नाही.
पॉवर मेक या कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरमागे १ बोनस शेअरची घोषणा केली. या साठी २८ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
अदानी पॉवर LANCO अमरकंटक पॉवर Rs ४१०१ कोटींना खरेदी करणार आहे.
सरकार हिंदुस्थान झिंक मधील त्यांचा २९.३% स्टेक टप्प्याटप्प्या ने विकणार आहे.
भिकाजी फुड्स अरीबा फुड्सचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे.
अंबुजा सिमेंटमध्ये ५.१२ कोटी शेअर्सचे ( २.८४% इक्विटी) चे Rs ६२५.५० प्रती शेअर या दराने Rs ३२०४ कोटींचे डील झाले.
लेमन ट्री हॉटेल्सने MP मध्ये २०२६ पासून सुरु होणार्या हॉटेलसाठी करार केला.
भारती एअरटेलला दिलेल्या GST डिमांड नोटिसीची रक्कम Rs ६०४.२५ कोटींवरून Rs १९४ कोटी केली.

विप्रोने जॉन लेविस बरोबर IT इन्फ्रा साठी करार केला.

जैन इरिगेशनने डीजीज रेझिस्टन्स कॉफीसाठी कॉफी बोर्डाबरोबर करार केला.
रेलटेलला UP पोलीस रिक्रुटमेंट प्रमोशन बोर्डाकडून ५२.६६ कोटींची ऑर्डर मिळाली.
जिंदाल SAWने १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लिट केले.
हिंदाल्को रायगड रिफायनरी मध्ये Rs १००० कोटी गुंतवणार. ही २०२७ मध्ये कमिशन होईल.
प्रिझम जॉन्सन सनबाथ SANITARY खरेदी करणार.
पिकॅडिली अग्रोला त्यांच्या इंद्र व्हिस्कीला ‘व्हिस्की ऑफ द इअर’ चे बक्षीस मिळाले.
पॉलीमेडी क्युअर Rs १००० कोटींचा QIP करणार आहे.
SBI लाईफला Rs २४५ कोटींची TAX नोटीस मिळाली.
सरकारने शुगर QUOTA पॉलीसिमधील बदलाच्या ड्राफ्ट वर २३ सप्टेंबर २०२४ पर्यंत मते मागवली.
सन फार्माच्या त्वचा रोगासाठी औषध ‘STARIZO’ launch केले.
टाटा टेक मध्ये २.८१% इक्विटी म्हणजे १.१४ कोटी शेअर्सचे लार्ज डील झाले.
सेबीने रिलायंस कम्युनिकेशन, रिलायंस कॅपिटल, रिलायंस नाव्हलचे ट्रेडिंग सस्पेंड केले आहे.
SEPC ला हुत्ती गोल्डमाईन्स कडून नवीन सर्क्युलर शाफ्ट आणी संपूर्ण वाईंडिंग इंस्टालेशन च्या २०१३ मध्ये अर्ज केलेल्या ऑर्डर साठी अक्सेपटन्स सरटिफीकेट मिळाले.
आज मेटल्स, FMCG, रिअल्टी, IT, OIL & GAS मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. ऑटो एनर्जी फार्मा क्षेत्रांत खरेदी झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१०८६ NSE निर्देशांक निफ्टी २४८२३ बॅंक निफ्टी ५०९३३ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०२४

.आज क्रूड US $ ७६.३० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.१८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८० आणी VIX १३.२१ च्या आसपास होते. सोने Rs ७१७०० आणी चांदी ८४८०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
फेडच्या मीटिंगच्या मिनिट्स मध्ये पॉझीटीव्ह आउटलुक दिसून आला. ऍन्युअल जॉब डेटाप्रमाणे ८.१८ लाख नोकऱ्या कमी झाल्या.
चीन चे GDP ग्रोथ आणी PMI कमजोर आले. चीनमधील सेफोरा ही कंपनी ३% कर्मचारी कमी करणार आहे. कारण मालाला मागणी नसल्यामुळे विक्री होत नाही.
भारताचा ऑगस्ट महिन्यासाठी मन्युफाक्चरिंग PMI ५८.१ वरून ५७.९ झाला.
झोमाटोने ‘Paytm’ चा एन्टरटेन्मेंट टीकेटींग बिजनेसRs २०४८ कोटींना विकत घेतला.
झेन टेक Rs ८०० ते Rs १००० कोटींचा QIP Rs १६०१.00 ( १०.२% डीस्काउंट CMP वर) करणार आहे.
RVNL आणी मलेशियाची कंपनी ‘DHAYA MAJU INFR A’ यांनी रेल्वे रोलिंग स्टोक उत्पादनासाठी MOU केले. त्यामुळे RVNL चा एशियन मार्केटमध्ये प्रवेश झाला.
BEML ने इंडियन नेव्ही बरोबर एडव्हांस्ड मरीन अप्लिकेशन फॉर डिफेन्ससाठी आणी मलेशियाच्या SMH रेलबरोबर रेल आणी मेट्रो सोल्युशन्स साठी MOU केले.
PROCTER & GAMBLE हेल्थ ने Rs ६० प्रती शेअर लाभांश जाहीर केला. कंपनीने Rs २० कोटी वन टाईम लॉस बुक केला. कंपनीचे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
इरेडा Rs ४५०० कोटी FPo ,राईट्स, QIP द्वारा Rs ४५०० कोटी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.
हुडको ने यमुना एक्सप्रेस वे बरोबर करार केला.
अल्केम LAB मध्ये ८.५ लाख शेअर्सचे Rs ४८७.२३ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
ISOPROPYL अल्कोहोल च्या चीनमधून होणाऱ्या आयातीवर ५ वर्षांसाठी एन्टी डम्पिंग ड्युटी लावली. याचा फायदा दीपक फरटीलायझर, दीपक नायट्रेट यांना होईल.
AWFIS ने कोलकाता येथे दोन CO-WORKING सेंटर सुरु केले. हे ६६८४६ SQF जागेत सुरु केले.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन २४ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर बाय बॅकवर विचार करेल.
पॉवर मेक २२ ऑगस्टला बोनस शेअर इशू करण्यावर विचार करेल.
L & T ने थेल्स बरोबर करार केला.
वेलस्पन एन्टरप्रायझेसला BMC ( बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन) कडून १५९.७५ कोटींची ऑर्डर मिळाली
THAILAND, कोरिया, चीन मधून येणाऱ्या ECH ( एपिक्लोरोहायड्रीन ) वर एन्टीडम्पिंग ड्युटी लावण्याची शिफारस केली . याचा फायदा एपिग्रल, ग्रासिम, DCM श्रीराम यांना होईल.
फ्युजन मायक्रो फायनान्सला दिलेली GST डिमांड नोटीस रद्द केली.
तेजस नेटवर्क ही कंपनी टेलीकॉम इक्विपमेंट उत्पादन क्षेत्रांत प्रवेश करणार आहे.
ट्रान्सफॉर्मर्स & रेक्टीफायर्स ला अर्सेलर मित्तल मेक्सिको कडून US $२.८० मिलियन्स आणी LINXOL
ग्लोबल स्वीडन कडून US $ १४.०० मिलियन्स ची निर्यात ऑर्डर मिळाली.
पारस डिफेन्सला DPIIT ( डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड) कडून औद्योगिक लायसेन्स मिळाले. कंपनी नवी मुंबई येथे उत्पादन युनिट सुरु करेल.
आरती ड्रग्स २६ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर बाय बॅक वर विचार करेल.
GAIL ने ‘PETRON SCIENTECH’ बरोबर भारतात बायोइथिलीन प्लांट भारतात उभारण्यासाठी MOU केले.
TVS मोटर्सने नवीन ज्युपिटर ११० CC LAUNCH केली. याची किमत Rs ७३७००+ आहे.
GE आणी HAL मध्ये जेट इंजिन्स (GE-F 404) चे भारतात उत्पादन करण्यासाठी करार होण्याची शक्यता आहे.
विपुल ऑर्गनिकस राईट्स इशू विचार करेल.
न्युक्लीअस सोफ्टवेअर Rs ७२.३५ कोटी बाय बॅक वर खर्च करणार त्यामुळे शेअर पडला.
डाबरने त्यांच्या तमिळनाडूतील प्लान्ट Rs ४०० कोटी गुंतवणूक करून प्लांट उभारण्यासाठी तामिळनाडू राज्य सरकारबरोबर MOU केले.
आज मिडकॅप स्मॉलकॅप मेटल, बँकिंग,FMCG, मध्ये खरेदी तर एनर्जी, OIL & GAS, PSE IT मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१०३५ NSE निर्देशांक निफ्टी २४८११ बॅंक निफ्टी ५०९८५ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ७७.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०१.१६ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८१ आणी VIX १३.८९ च्या आसपास होते सोने Rs ७२००० आणी चांदी Rs ८५००० च्या आसपास होती. बेस मेटल्स झिंक, अल्युमिनियम लेड कॉपर तेजीत होती.
जपानचा आयात निर्यात डेटा कमजोर आला. निर्यात कमी झाली आणी आयात वाढली. जपानने त्यांच्या चलनाचे मूल्य वाढवले आहे.
FII ने Rs १४५८ कोटींची विक्री तर DII ने Rs २२५२ कोटींची खरेदी केली.
PNB हाउसिंग च्या शेअर्समध्ये १.३९ कोटी शेअर्समध्ये Rs ११०० कोटींचे लार्ज डील झाले.
TRENT मध्ये २.४६ लाख शेअर्समध्ये Rs १६७ कोटींचे लार्ज डील झाले.
सायंट DM मधील सायंट ही कंपनी त्यांचा १४.५ % स्टेक Rs ७४८.६५ प्रती शेअर या भावाने Rs ८६०.९० कोटींना ब्लॉक डील द्वारा विकणार आहे. ९० दिवस लॉकईन पिरीयड आहे. प्रमोटर होल्डिंग ६६.६६ वरून ५२.१६ % होईल.
NHPC तिस्ता -V पॉवर स्टेशन मध्ये LANDSLIDE मुळे TAIL RATE TUNNEL गेटचे आणी GIC बिल्डींगचे नुकसान झाले.
GET &D इंडिया चे प्रमोटर्स GE ग्रीड ALLIANCE BV आणी ग्रीड इक्विपमेंट PVT LTD. त्यांचा मायनॉरिटी स्टेक विकण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहेत.
EXIDE ‘EXIDE एनर्जी सोल्युशन्स मध्ये राईट्स इशू द्वारा Rs ७४.९९ कोटी गुंतवणार आहे. EXIDE ने आतापर्यंत Rs २६५२.२४ कोटी गुंतवले आहेत.
GENUS पॉवरला Rs ३६०८.५० कोटींच्या ३ ऑर्डर्स मिळाल्या.
ओला इलेक्ट्रिक च्या दोन ए-स्कूटर्स अनुक्रमे S 1 x 3 KWH आणी S 1 x 4 KWH या मॉडेल्स ला ऑटो आणी ऑटो कॉम्पोननट्स साठी PLI योजनेअंतर्गत सर्टीफिकेशन मिळाले.
युनायटेड ब्रुअरीज ने कर्नाटकामध्ये या महिन्यापासून बीअरचे HEINKEN सिल्व्हर, आणी HEINEKEN ओरिजिनल ब्रान्ड launch केले.
L & T ला दिलेली Rs २२३७ कोटींची GST डिमांड नोटीस कोर्टाने रद्द केली.
टाटा पॉवर चे रेटिंग S & P ने वाढवले आणी आउटलुक पोझीटीव्ह केला.
DR रेड्डीज ने स्वस्त एंटी मलेरिया औषध डेव्हलप करण्याकरता करार केला.
पेट्रोनेट LNG ने श्री लंकेमधील LTL होल्डिंग बरोबर LNG सप्लाय करण्यासाठी ५ वर्षे मुदतीचा करार केला.
रेटगेनने थाई एअरवेज बरोबर मल्टी इअर मुदतीचा करार केला.
टाटा मोटर्सने २००८ मध्ये ‘A’ क्लास ऑर्डीनरी शेअर्स इशू केले होते. या शेअर्सची किमत टाटा मोटर्सच्या ऑर्डीनरी शेअर्सच्या CMP पेक्षा १० % कमी होती. ‘A’ क्लास शेअर्सना १/१० वोटिंग राईट्स दिले म्हणजे तुमच्याकडे १० शेअर्स असतील तर तुम्हाला १ वोटसाठी अधिकार मिळेल. ‘A’ क्लास शेअर्स वर ऑर्डीनरी शेअर्स वरील लाभान्शापेक्षा ५% लाभांश जास्त दिला जाईल.
हे शेअर्स नंतर टाटा मोटर्स DVR या नावाने एक्सचेंजवर लिस्ट झाले. यानंतर टाटा मोटर्सने २०१० मध्ये QIP द्वारे आणि २०१५ मध्ये राईट्स इशू द्वारा ‘A’ क्लास शेअर्स इशू केले. या नंतर सेबीने डिफरन्शियल वोटिंग राईट्स असणारे शेअर्स इशू करण्यावर बंदी आणली.
अलीकडेच टाटा मोटर्सने टाटा मोटर्स आणी त्यांच्या शेअरहोल्डरमध्ये एक स्कीम ऑफ अरेंजमेंट आणली आहे. या स्कीमची रेकॉर्ड डेट १ सप्टेंबर २०२४ ही ठरवली आहे. या योजनेद्वारा तुमच्या जवळ असलेल्या १० टाटा मोटर्सच्या DVR उर्फ ‘A’ क्लास ऑर्डीनरीशेअर्स ऐवजी कंपनी तुम्हाला ७ टाटा मोटर्सचे ऑरडीनरी शेअर्स देईल. २००८ मध्ये १० % असलेला डीसकौंट ४४%पर्यंत पोहोचला आहे. टाटा मोटर्सच्या CMP Rs १०८६ समोर टाटा DVR ची किमत Rs ७५० होती. या स्कीम ऑफ अरेंजमेंटनंतर टाटा मोटर्सच्या सर्व शेअरहोल्डर्सचे वोटिंग आणी इकोनोमिक अधिकार समान होतील.
फ्री फ्लोट ऑफ ऑर्डीनरी शेअर्स 18% ने वाढेल.
उर्जा ग्लोबलने EV स्कूटर PRE LAUNCH केली.
धनुका अग्रीटेकला Rs १०० कोटींच्या टेंडर ऑफर रूटने बाय बॅक साठी मंजुरी मिळाली.
इंडोको रेमिडीजच्या ‘LOFEXIDINE TABLETS’ ना USFDA ची ANDA मंजुरी मिळाली.
मार्कसंस फार्माच्या RELONCHEM युनिटला त्यांची उत्पादने मार्केट करायला मंजुरी मिळाली.
इंडियन नेव्हीने BEML बरोबर करार केला.
हिंदुस्थान झिंक ला TAX डिपार्टमेंट ने Rs २६.१२ कोटींची पेनल्टी लावली.
ICICI सिक्युरिटीज च्या शेअरच्या डीलिस्टिंग ला मुंबई NCLT ने मंजुरी दिली. कंपनीने सेबी कडे Rs ७० लाख सेटलमेंट रक्कम म्हणून दिली.
टाटा मोटर्सने २५० फास्ट चार्जिंग सर्विस स्टेशन्स लावण्यासाठी करार केला.
EMBASSY ऑफिस पार्क या कंपनीने बंगलोर मध्ये कॉमन वेल्थ बॅंक ऑफ ऑस्ट्रेलिया ला १.४ MSF जागा लीजवर दिली.
ONJC, ‘ONGC पेट्रो’ चे ‘कंपल्सरी कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स’ Rs ७७७८ कोटींना बायबॅक करणार आहे. हे डिबेंचर्स फायनांशियल इनस्टीट्युशनकडून खरेदी केले जातील. या डिबेंचर्सच्या खरेदी नंतर ONGC चा ONGC पेट्रो मध्ये ८१.३% स्टेक होईल.
हिंदुस्थान झिंक ने झिंकपासून बॅट्री टेक्नोलॉजी साठी JNCASR ( जवाहरलाल नेहरू सेंटर फोर एडवान्स्ड सायंटिफिक रिसर्च ) बरोबर करार केला.
अंबर एन्टरप्रायझेस ने दक्षिण कोरियाची कंपनी ‘YUJIN’ बरोबर रेल्वेच्या गिअर्स उत्पादनाकरता करार केला.
JNK इंडियाला अदानी ग्रुपची कंपनी मुंद्रा पेट्रोकेम कडून ऑर्डर मिळाली.
L & T ला त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रा बिझिनेस साठी ऑर्डर मिळाली.
बँकिंग, PSU बँका, रिअल्टी आणी it क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. FMCG, फार्मा मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०८८१ NSE निर्देशांक निफ्टी २४७७० आणी बॅंक निफ्टी ५०६८५ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०२४

आज क्रूड US $ ७७.६० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०१.८७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८६ VIX १४.०१ च्या आसपास होते सोने
Rs ७२००० आणी चांदी Rs ८४८०० च्या आसपास होती. बेस मेटल्सपैकी झिंक तेजीत तर कॉपर मंदीत होते.
FII ने Rs २६६७ कोटींची विक्री तर DII ने Rs १८०३ कोटींची खरेदी केली.
ANTFUN ने झोमाटोमध्ये २१ कोटी शेअर्स ( २.४% इक्विटी ) Rs २५१.६० प्रती शेअर या भावाने ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकले.
‘ALBENDAZOLE’ API साठी सिक्वेंट सायंटिफीकला WHO (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) कडून मंजुरी मिळाली.
कोफोर्ज ने सेल्स्फोर्स बरोबर इनोव्हेटिव्ह सस्टेनेबिलिटी सोल्युशनसाठी करार केला.
HCL टेकचे CFO प्रतीक अगरवाल यांनी राजीनामा दिला.
पोलीमेडीक्यूअर QIP द्वारा Rs १८०० कोटी उभारणार आहे.
नवनीतचा बायबॅक आजपासून सुरु होईल.
सरस्वती साडीचा शेअर BSE वर Rs 200 वर तर NSE वर Rs १९४ वर लिस्ट झाला. हा शेअर IPO मध्ये Rs १६० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना बर्यापैकी लिस्टिंग गेन्स झाले.
VST च्या १ शेअरला १० बोनस शेअर्स इशुसाठी ३० ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
CDSL च्या १:१ बोनस इशूची २४ ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
ग्रीव्ज कॉटनच्या सबसिडीअरीने EV फायनान्ससाठी ‘EVFIN’ हा PLATFORM launch केला.
स्वीडन मध्ये STOCKHOME येथे ‘TCS’ ने ‘TCS SPACE स्टुडीओ’ launch केला.
हिंदुस्थान झिंक ने Rs १९ प्रती शेअर दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला. २८ ऑगस्ट २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चीट केली. यासाठी कंपनी Rs ८०२८ कोटी खर्च करेल.
न्युक्लीअस सॉफटवेअर २२ ऑगस्ट २०२४ रोजी शेअर बाय बॅक वर विचार करेल.
सफायरने त्यांच्या शेअरस्प्लिटसाठी ५ सप्टेंबर ही रेकॉर्ड डेट जाहीर केली
HI टेक पाईप्सने Rs ६०० कोटींचा QIP करणार आहे. आणीRs १०० कोटींची पाईप सप्लाय करण्यासाठी ऑर्डर मिळाली.
इंडसइंड बँकेला असेट मनेजमेंट सबसिडीअरी स्थापन करण्यासाठी RBI कडून मंजुरी मिळाली.
ग्रान्युअल्सच्या अल्सर वरील औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली.
मार्कसन्स फार्माच्या गोवा युनिटला ९ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने EIR दिला.
जून २०२४ महिन्यात भारती एअरटेल ने १२.५२ लाख ग्राहक, जिओने १९.११ लाख ग्राहक जोडले तर VI ने ८.५० लाख ग्राहक गमावले.
टेक महिंद्रा ला १०३ एकर जमीन Rs ५३५ कोटींना विकण्यासाठी मंजुरी मिळाली.
HG इंफ्राला Rs ७८१ कोटींची ऑर्डर मिळाली.
मिडकॅप, स्माल कॅप, बँकिंग, IT, फार्मा, ऑटो, PSE मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०८०२ NSE निर्देशांक निफ्टी २४६९८ बॅंक निफ्टी ५०८०३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ ऑगस्ट २०२४

.आज क्रूड US $ ७९.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.१७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.८८ आणी VIX १४.६३ च्या आसपास होते. सोने Rs ७१६०० तर चांदी Rs ८३८०० च्या आसपास होती. बेस मेटल्समध्ये तेजी होती.
शुक्रवारी USA फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल JACKSON हॉल मध्ये भाषण आहे. ते या भाषणांत काय धोरण जाहीर करतात याकडे मार्केटचे लक्ष असेल. सप्टेंबर २०२४ मध्ये रेटकट होईल या अपेक्षेने सोन्याचे भाव वाढले.
FII ने Rs ७६७ कोटींची खरेदी तर DII ने Rs २६०६ कोटींची खरेदी केली.
सरकारने क्रूड वरील विंडफॉल TAX Rs ४६०० प्रती टन वरून Rs २१०० प्रती टन केला. पेट्रोल डीझेल आणी ATF वरील करांत कोणताही बदल केला नाही.
GENUS पॉवर च्या सबसिडीअरीला एकूण Rs २९२५ कोटींच्या ३ प्रोजेक्ट्स साठी LOA मिळाले.
एस्कॉर्टस UP मध्ये ग्रीनफिल्ड युनिट साठी इंडस्ट्रीयल जमीन घेणार आहे. कंपनी या प्लांटमध्ये Rs ४५०० कोटींची गुंतवणूक करेल. या प्लांटमधून Rs १०००० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे आणी १४०० लोकांना नोकऱ्या मिळतील.
हिंदुस्थान झिंकचा OFS आज रिटेल गुंतवणूकदारांसाठी ओपन असेल. कंपनी ग्रीन शू ऑप्शन अंतर्गत १.९५% शेअर्स अधिक विकेल.
भारतीय सेनेने Rs ६५०० कोटींची संरक्षण उपकरणे खरेदी करण्यासाठी टेंडर काढले . या टेंडरमध्ये भारत फोर्ज, L & T सहभागी होण्याची शक्यता आहे.
सरकारने ठाणे, पुणे आणी बंगलोर येथील मेट्रो प्रोजेक्ट्स ला मंजुरी दिली. याचा फायदा BEML, टीटाघर रेल सिस्टिम्सला होऊ शकतो.
बागडोगरा आणी बिहार मध्ये विमानतळासाठी मंजुरी दिली. याचा फायदा GMR, कल्पतरू प्रोजेक्ट्स यांना होऊ शकतो.
DCX ला Rs १०७ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
कॅप्लीन पाईंटच्या गुमिडीपिडी प्लांटला ANVISA या ब्राझिलियन रेग्युलेटरीऑथोरिटीकडून झीरो ऑब्झर्व्हेशन सर्टिफिकेट मिळाले.
ज्युबिलंट फार्मोवाचा आर्म ज्युबिलंट BIOSYS, ‘PIERRE FABRE LAB’ मध्ये ८०% स्टेक युरो ४.४ मिलियन्स ला घेणार आहे.
STREE – 2 ला चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा फायदा PVR इनोक्स ला होईल.
JSW सिमेंटने Rs ४००० कोटींच्या IPO साठी DRHP फाईल केले.
ओरिएंट टेक्नोलॉजी या जुलै १९९७ मध्ये स्थापन झालेल्या IT सोल्युशन प्रोवायडर कंपनीचा Rs २१४.७६ कोटींचा IPO ( यांत Rs १२० कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ९४.७६ कोटींचा OFS) २१ ऑगस्टला ओपन होऊन २३ ऑगस्टला बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs १९५ ते Rs २०६ असून मिनिमम लॉट ७२ शेअर्सचा आहे. शेअरची दर्शनी किमत Rs १० आहे. शेअरचे लिस्टिंग २८ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. FY २४ साठी Rs ४१.४५ कोटी प्रॉफीट, आणी Rs ६०६.८६ कोटी उत्पन्न झाले, मार्जिन ६.८% होते. IPO चे प्रोसीड्स ऑफिस खरेदी आणी इतर भांडवली गुंतवणुकीसाठी वापरले जातील.
इंटर आर्क बिल्डींग प्रोडक्टस् लिमिटेड या १९८३ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचा Rs ६००.२९ कोटींचा IPO ( यांत Rs 200 कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ४००.२९ कोटींचा OFS ) १९ ऑगस्टला ओपन होऊन २१ ऑगस्टला बंद होईल. IPO चा प्राईस बॅंड Rs ८५० ते Rs ९०० असून मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. शेअरची दर्शनी किमत Rs १० असून या शेअरचे लिस्टिंग २६ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. कंपनी टर्नकी प्रीएन्जिनीअरिन्ग स्टील कन्स्ट्रक्शन सोल्युशन प्रोवाईड करते. या सेक्टरमध्ये डिझाईन, ENGG, MFG, आणी ऑन साईट प्रोजेक्ट व्यवस्थापन करते. कंपनीचे चार प्लांट आहेत. FY २४ साठी कंपनीला Rs ८६.२६ कोटी प्रॉफीट, रेव्हेन्यू Rs १३०६.३२ कोटी होते.
IPO प्रोसीड्सचा उपयोग कंपनीच्या ४ प्लांटमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी वापरला जाईल.
स्ट्राइड्स फार्माच्या चेन्नई प्लांटला USFDA ने EIR दिला.
LIC ने हिंदुस्थान कॉपरमधील स्टेक ६.७१% वरून ६.०८ % केला. स्टेक 0.७३% ने कमी केला.
IRCTC ने रेलनीर चे ३ नवीन प्लांट सुरु केले आणी सध्याच्या प्लांट्स ची क्षमता वाढवली. कंपनीच्या कॅटरिंग बिझीनेस्स्मध्ये १७% तर E -कॅटरिंग बिझिनेसमध्ये ४० % ची वाढ दिसली. सध्या IRCTC रोज ५०००० लंच तयार करून पुरवते. IT बिझिनेसमध्ये १३% वाढ दिसली. टुरिझम सेक्टरमध्ये भारतगौरव ट्रेन निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बंद ठेवायला लागल्याने डीग्रोथ झाली. IRCTC आयोजित टूर्स ची संख्या ६० वरून १०० केली.
जुलै २०२४ मध्ये इंडीगोचा मार्केटशेअर ६०.८% वरून ६२% झाला तर स्पाईस जेटचा मार्केट शेअर ३.८% वरून ३.१% झाला.
NIBE ने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिपयार्ड इन्फ्रा बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर Rs १२०० कोटींचा करार केला.
ऑरोबिंदो फार्मा त्यांच्या चीनमधील प्लांटचे कमर्शियलायझेशन FY २५ च्या तिसर्या तिमाहीत करणार आहे.
झेन टेकला माईन डिटेक्शन सिस्टीम साठी पेटंट मिळाले.
मिश्र धातू निगम ला Rs २८५ कोटींची ऑर्डर मिळाली. आता त्यांचे ऑर्डर बुक Rs २०८८ कोटींचे झाले. ONGC ने व्हिएतनाम बरोबर OIL & GAS उत्पादनासाठी असलेल्या कराराची मुदत २०३९ पर्यंत वाढवली.
आज मार्केट एका छोट्या रेंज मध्ये फिरत होते. मेटल, OIL &GAS, एनर्जी, IT, फार्मा मध्ये खरेदी तर ऑटो आणी बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०४२४ NSE निर्देशांक निफ्टी २४५७८बॅंक निफ्टी ५०४२२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७