Monthly Archives: September 2024

आजचं मार्केट – १ ऑक्टोबर २०२४

.अमेरिकन मार्केट थोडेसे तेजीत होते रेट कसे कट करायचे याचा road map ठरला नाही त्यासाठी data बघून निर्णय घेतला जाईल चीनमध्ये ७ ऑक्टोबर पर्यंत बाजार बंद आहे हाँगकाँग आणि south कोरिया बाजार बंद आहे. DII ची खरेदी ६६४६ तर FII ची विक्री ९७९२ कोटी झाली. TCS – १० ऑक्टोबर रोजी interim dividend आणि रिझल्ट वर meeting आहे dividand साठी १८ oct रेकॉर्ड डेट आहे
TATA POWER – Rajasthan govt बरोबर करार केला १.२ लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
NTPC – २५ GW renewable energy साठी राजस्थान सरकार बरोबर MOU केले
HMA agro – SBI लोनची credit limit २५९ कोटी वरून ४४९ कोटी केली
सरकारने गॅस सीलिंग price १ oct ते ३१ मार्च साठी १०.१६ / MMBTU ठरवली पूर्वी ही किंमत ९.८७ होती. difficult areas मधून गॅस उत्पादन केल्यास वरील रेट मिळेल CNG , PNG मध्ये बदल नाही
BLS E services – Aadifields solution चे अधिग्रहण ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत होऊ शकले नाही condition precedent ची प्रक्रिया पूर्ण झाली नाही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अधिग्रहण पूर्ण होईल
Sebi नी F&O बाबत काही सांगितले नाही उलट म्युच्युअल फंडाना सवलती दिल्या
NTPC च्या सबसिडीयरीने शाजापुर येथे ५० MW चा solar power project सुरू केला
RBI नी gold loan बाबत त्रुटी दाखवल्या आहेत ३ महिन्यात सुधारणा करायला सांगितले याचा परिणाम मुधुट आणि mannapurm वर झाला
Steel strips ची विक्री ९.३५%नी कमी झाली
PB fintech, HMO model अंतर्गत २० ते ३५ टक्के हिस्सा hospital chain मध्ये घेणार आहे
Reliance नी partly paid शेअर साठी call money ची तारीख ७ ऑक्टोबर केली
RVNL नी २८३ कोटीच्या project sathi सर्वात कमी बोली लावली
Tata मोटर्स आणि अशोक ले land वगळता विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले
आज सेन्सेक्स ८४२६६,निफ्टी २५७९६,तर बँक निफ्टी ५२९२२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७१.३५ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.७० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.८७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७९ आणी VIX ११.७५ च्या आसपास होते. सोने Rs ७५१०० आणी चांदी Rs ९२००० च्या आसपास होते. कॉपर तेजीत तर झिंक आणी लेड मंदीत होते.

आज USA मध्ये चीपमेकर कंपन्यांचे शेअर्स वाढले. MICRON ने रेव्हेन्यू गायडंस चांगला दिला. जॉबलेस डेटा अनुकूल आला. चीनने RRR १० % वरून ९.५० % केला. US $ आणी जापनीज येनचा विनिमय दर US $१= जापनीज येन १४३.७ असा होता.
वारी रिन्युएबल चा आर्म वारी एनर्जीज ऑक्टोबर २०२४ मध्ये IPO launch करणार आहे.
आज अक्सेन्च्युअर या कंपनीचे उत्पन्न US $ टर्म मध्ये ३% ने तर रुपी टर्म मध्ये ६ % ने वाढली. कंपनीने शेअर बाय बॅक जाहीर केला. कंपनीने FY २५ साठी US $ टर्ममध्ये ३% चा गायडंस दिला. कंपनीने लाभान्शामाध्येही वाढ केली.
FII ने Rs ६३० कोटींची खरेदी केली आणी DII ने Rs २४०५ कोटींची खरेदी केली.
सोमवारपासून BEL आणी TRENT या कंपनीच्या शेअर्सचा समावेश निफ्टी मध्ये होईल आणी LTI माइंडट्री हे शेअर निफ्टीतून बाहेर पडतील.
अदानी पोर्टला Rs १०० कोटींची ऑर्डर मिळाली.
GQG ला व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल SEC ने कंपनीला ‘CENSURE’ केले आणी US $ ५,००,००० दंड भरायला सांगितला. काही व्यक्तींना / संस्थांना ‘SEC’ बरोबर थेट संपर्क साधण्यासाठी अडथळे आणला असे SEC चे म्हणणे आहे. GQG ने ‘SEC’ मान्य वा अमान्य न करता दंड भरला.
आलेम्बिक फार्मा ला ‘PALIPERIDONE’या TABLETS साठी USFDA चे FINAL ANDA अप्रुव्हल मिळाले.
कौशल्य लॉजीस्टिकने Mcdonaldsबरोबर लेटर ऑफ इंटेनट केले.
RINL ( राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड) आणी SAIL यांचे मर्जर होणार आहे.
इथनोल च्या किमतीत सरकार वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. साखर उद्योगाने उसाच्या रसापासून / सिरप पासून तयार केल्या जाणार्या इथनोल ला Rs ७२.५० प्रती लिटर आणी B-हेवी मोलासीस पासून तयार होणार्या इथनोल साठी Rs ६६ प्रती लिटर ची मागणी केली आहे.
SEQUENT सायंटिफिक आणी वियश याचे मर्जर होणार आहे. वियास च्या १०० शेअर्समागे SEQUENT सायंटिफिक चे 56 शेअर्स मिळतील. या मर्जर नंतर SEQUENT सायंटिफिक ही कंपनी राहील. या मर्जर नंतर अनिमल फार्मा मध्ये R & D सकट एक मजबूत PLATFORM जागतिक स्तरावर उपलब्ध होईल.
रिलायंस इंफ्राला Rs ९५० कोटींच्या दामोदर VALLEY कॉर्पोरेशन विरुद्ध दिलेले आर्बिट्रेशन अवार्ड च्या बाजूने कोर्टाने निकाल दिला
MGL मध्ये LIC ने त्यांचा स्टेक ९.०३० % वरून ६.९३९ % केला.
मंगलोर केमिकल्सच्यायुरिया आणी अमोनिया प्लान्टमध्ये कामकाज पुन्हा सुरु झाले. रेलटेलला महाराष्ट्र रुरल डेव्हलपमेंट मंत्रालयाकडून १२ महिन्यात पूर्ण करण्यासाठी Rs १५६ कोटींची ऑर्डर मिळाली.
RITESच्या कन्सोर्शियम Rs 87.५८ कोटींची ऑर्डर DMRC च्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरले. यात RITES चा चा ४९% म्हणजे Rs ४२.९१ कोटी आहे.
ज्युबिलंट फार्मोवाच्या वाशिंगटन अलर्जी इम्युनो थेरपी युनिटचे १८ ते २५ सप्टेंबर दरम्यान झालेल्या इन्स्पेक्शन मध्ये USFDA ने कोणतीही त्रुटी दाखवली नाही.
नुवामा वेल्थ मधील 6.४% स्टेक E-CAP आणी एडेल फायनान्स ने Rs ६४५५ प्रती शेअर भावाने Rs १४६४ कोटींना विकणार याला ७५ दिवसांचा लॉक इन पिरीयड असेल.
प्रताप SNACKS मध्ये प्रमोटर्स कडून AUTHUM इन्व्हेस्टमेंट आणी मधु केला यांनी ४६% स्टेक घेतला.त्यामुळे २६% स्टेक साठी ओपन ऑफर येईल.
बायोकॉन ने डायबेटीस आणी ‘WEIGHT MANEGEMENT’ वरील औषध GLP 1 मिडल इस्ट मध्ये कमर्शियलाइझ्ड करण्यासाठी TABUK फार्मा बरोबर करार केला
KEC ने Rs ८७० कोटींचा QIP इशू Rs ९५५ प्रती शेअर किमतीने पूर्ण केला.
झायडस लाईफ ने लखनौ CSIR- सेन्ट्रल ड्रग रिसर्च INSTITUTE यांच्या बरोबर OSTEOPOROSIS रिझलटींग फ्रॉम क्रोनिक किडनी डिसीजसाठी ओरल ड्रगचे संशोधन करण्यासाठी करार केला.
SJVN ने महाराष्ट्र राज्य सरकार बरोबर २ करार केले.
थांगामाईल ज्वेलरी Rs ६०० कोटींचा राईट्स इशू आणणार आहे.
अदानी ग्रीन ने टोटल एनर्जीबरोबरचे ११५० MWac JV पूर्ण केले. अदानी ग्रीन गुजरात मधील खावडा च्या सोलर प्रोजेक्ट मध्ये ५०% स्टेक घेणार आहे.
इन्फोसिसने ‘SALLY BEAUTY’ बरोबर ‘एन्टरप्राइझ स्केल IT हायपर ऑटोमेशन एफिसियंट’ साठी करार केला.
NTPC ग्रीनने ‘MAHAPREIT’ बरोबर १० GW च्या रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी करार केला.
PTC इंडस्ट्रीजला M७७७ अल्ट्रा लाईटवेट होवित्झरच्या TITANIUM कास्टिंग साठी BAE इंडस्ट्रीज कडून ऑर्डर मिळाली.
आज रिअल्टी, बँकिंग आणी FMCG मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले तर OIL & GAS, PSE, फार्मा, IT, मेटल्स मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८५५७१ NSE निर्देशांक निफ्टी २६१७९ आणी बॅंक निफ्टी ५३८३४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०२४

.आज क्रूड US $ ७३.३७ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६८ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.९२ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७८ आणी VIX १२.५० होते. सोने Rs ७५३०० आणी चांदी ९२३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.USA मार्केट रेकॉर्ड हायवरून खाली आले. होमलोनसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ११% ने वाढली. चीन संबंधीत शेअर्स पडले. हेज फंडांचे shorting वाढले.इस्रायलआणी लेबानन यांच्यात शांततेसाठी बोलणी सुरु झाली. लीबियाकडून क्रूडचा पुरवठा वाढला त्यामुळे क्रूडची किमत कमी झाली.

अदानी ग्रीन मधील स्टेक प्रमोटर्सनी वाढवला.
प्रेस्टीज ने ‘ प्रेस्टीज पाईन फॉरेस्ट ‘ launch केली
FII ने Rs ९७४ कोटींची विक्री तर DII ने Rs १७७९ कोटींची खरेदी केली.
वेदान्ता चौथ्या अंतरिम लाभांशावर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी विचार करेल. या लाभान्शासाठी १६ ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट जाहीर झाली.
फाईव स्टार फायनान्स मध्ये P. E. इन्व्हेस्टर्स १९ .२२% स्टेक Rs ७६८ फ्लोअर प्राईसने Rs ४३१६ कोटींना विकणार. यासाठी १ वर्ष लॉकइनपिरीयड ठेवला आहे.
चीन त्यांच्या TOP बँकांमध्ये US $ १४२ बिलियन INJECT करण्याच्या विचारात आहे.
JLR त्यांच्या UK मधील EV प्लांटचे ‘RETOOLING’ करणार आहे.
अल्केम LAB नोव्हार्तीस इंडिया ला त्यांच्या स्विसपेरेंट कडून Rs २००० कोटींना घेण्याची योजना/विचार करत आहे. नोव्हार्टीस खरेदी करण्याच्या स्पर्धेत DR. रेड्डीज आणी झायडस लाईफ ह्या कंपन्या आहेत.
ITC ची मार्केट कॅप Rs ६ .५ लाख कोटींच्या वर गेली.
रॉयल ऑर्चीड राजस्थानामध्ये चीतोडगढमध्ये 5 स्टार हॉटेल सुरु करणार आहे.
PB फाईनटेक हेल्थकेअर बिझिनेस मध्ये पदार्पण करण्याचा विचार करत आहे.
JBM ऑटोने सिंगापूरमध्ये त्यांचा आर्म इन्कॉर्पोरेट केला.
इन्फोसिस बंगलोर मध्ये टेक हब सुरु करणार आहे.
अदानी एन्टर प्रायझेस ने सेल्फ सस्टेनिंग एविएशन इको सिस्टीम भारतात बनवण्यासाठी ‘BOMBARDIER’ बरोबर एअरक्राफ्ट सर्विसेस आणी MRO साठी कॉलोबोरेशन केले.
ASK २७-२८ सप्टेंबरला OFS द्वारे 6.०५% स्टेक Rs ४३३ फ्लोअर प्राईसने विकणार आहे. यासाठी ग्रीन शू ऑप्शन ५.५ +0.५५ ठेवले आहे.
IDFC फायनंशियल होल्डिंग चे IDFC मध्ये मर्जर, नंतर IDFC फर्स्ट बँकेत मर्जर करण्यासाठी कंपनी लॉ बोर्ड ट्रायब्युनल चेन्नई ची मंजुरी मिळाली
कर्नाटक सरकारने नवीन EV धोरणा अंतर्गत २५ लाख किमतीच्या गाड्यांना रोड TAX मधून सवलत देण्याचे ठरवले आहे.
आज ऑटो, मेटल्स, FMCG, IT, बँकिंग आणी OIL &GAS क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८५८३६ ( इंत्राडे हाय ८५९३०) NSE निर्देशांक निफ्टी २६२१६ ( इन्त्राडे हाय २६२५०) आणी बॅंक निफ्टी ५४३७५ ( इन्त्राडे हाय ५४४६७) वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.९५ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८३.५२ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.२८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७४ आणी VIX १३.०८ च्या आसपास होते. सोने Rs ७५२०० आणी चांदी Rs ९२३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

इझी ट्रीप प्लानरमध्ये ४.५४ कोटी शेअर्सचे Rs १७६ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
KPR मिल्स मध्ये १.0६ कोटी शेअर्सचे ( ३.१२% इक्विटी) चे Rs ९८८ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
KEC ने Rs ८७० कोटींचा QIP Rs ९५५ प्रती शेअर फ्लोर प्राईसने LAUNCH केला.
GILLET कंपनीचा P & G बंगला देश बरोबर केलेला करार 31 डिसेंबर २०२४ पासून संपेल. .
टाटा ELEXI ने पहिले RDK -B इंटिग्रेशन LAUNCH केले.
सुपरटेक च्या १७ बिल्डींग अर्धवट बांधलेल्या स्थितीत आहेत. त्याचा २७००० खरेदीदारांना फटका बसला आहे. NBCC ने हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अर्ज केला आहे.
रिलायंस कॅपिटलने ४६.२ कोटी शेअर्स Rs १५२५ कोटींना इशू केले.
होम क्रेडीट इंडिया फायनान्स मध्ये TVS होल्डिंग ने ८०.७४%, STPL ने ८.४७% आणी PI ग्रुपने १०.७९ % स्टेक खरेदी केला.
रिअल इस्टेट च्या संदर्भांत आज GOP ( ग्रुपऑफ मिनिस्टर्स ) ची बैठक होती. Rs ४५ लाखाची मर्यादा Rs ७५ लाख करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता पण जमिनीचे व्हल्यूएशन झाले नाही.
स्वीगी आणी हुंदाई या कंपन्यांच्या IPO ना सेबीने परवानगी दिली.हे IPO ऑक्टोबर २०२४ मध्ये येतील. डेल्टा कॉर्प हॉस्पिटलिटी आणी रिअल इस्टेट व्यवसाय अलग करणार. डेल्टा कॉर्पच्या एक शेअरमागे डेल्टा PENLAND चा एक शेअर मिळेल.
MCXने १ ऑक्टोबर २०२४ पासून TRANSACTION चार्जेस मध्ये बदल केला. १.७५ ते २.6 ह्या रेंजमध्ये चार्जेस असतील फ्युचर कॉन्त्रक्ट्ससाठी सध्या चार्ज २.१० प्रती लाख टर्नओव्हर आहेत. ऑप्शनसाठी सध्या Rs ४१.८0 प्रती लाख प्रीमियम टर्नओव्हर वर असतील. .
PC ज्वेलर्स ३० सप्टेंबर २०२४ रोजी शेअर्स स्प्लिट वर विचार करेल.
झी एन्टरटेनमेंट ने मुक्ता आर्ट्स बरोबर ३७ फिम्स साठी सटलाईट आणी मेडिया राईट्स साठी 6 वर्ष मुदतीचा करार केला.
हिंदू फुड्सने त्यांच्या नाशिक मधील सूप, स्पाईसेस आणी सिझनिंग उत्पादनाचे मर्जर केले.
कॉरोमोंडेल BAOBAB माइनिन्ग मधील ८.८२% स्टेक US $ ६५ लाखांना घेणार आहे.
आज एनर्जी, रिटेल, मेटल्स मध्ये तेजी होती. तर मिडकॅप आणी स्माल कॅप मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८५१६९ NSE निर्देशांक निफ्टी २६००४ आणी बॅंक निफ्टी ५४१०१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.७१ च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.५४ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.९५ आणी USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७४ आणी VIX १३.३९ च्या आसपास होते. सोने Rs ७४५०० च्या आसपास तर चांदी Rs ९०००० च्या आसपास होते. बेस मेटल्स तेजीत होती.

USA मध्ये डॉव जोन्स आणी NASDAQ मध्ये रेकॉर्ड तेजी होती. चीनने ७ दिवसांचा रिव्हर्स रेपो रेट १.७० आणी १४ दिवसांसाठी १.९५ वरून १.८५ केला . चीनच्या सेन्ट्रल बॅंक PBOC ने अर्थव्यवस्थेत युआन २३४.६ बिलियन INJECT केले. चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदीची भीती आहे. PBOC नजीकच्या भविष्यात रिझर्व रिक्वायरमेंट रेशियो 0.५० ने कमी करण्याची शक्यता आहे. .
आज नॉर्दर्न आर्क चे BSE वर Rs ३५१ वर तर NSE वर Rs ३५० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २६३ ला दिला होता.
ARCADE डेव्हलपर्स चे BSE वर Rs १७५.९० आणी NSE वर Rs १७५ वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये हा शेअर Rs १२८ ला दिला होता.
वेस्टर्न कॅरीयर्सचे BSE वर Rs १७० तर NSE वर Rs १७१ वर लिस्टिंग झाले हा शेअर IPO मध्ये Rs १७२ ला दिला होता.
JTL ही कंपनी ३ ऑक्टोबरला स्प्लिट आणी बोनस वर विचार करेल.
IEX कपलिंगचा विचार करत आहे.
रतन इंडियाच्या RVI EV मोटारसायकल ला १६००० बुकिंग मिळाले.
अपोलो सिंदुरी हॉटेल्स चे फायनंशियल्स चांगले आले.
स्पाईस जेट ने इंजिन लीजिंग कंपन्यांबरोबर US $ १६.७ मिलियन च्या देण्याबद्दल सेटलमेंट केली
टाटा पॉवर ला त्यांच्या ‘सेल्फ जनरेटिंग ट्रान्सफॉर्मर BREATHER’ साठी २० वर्षांसाठी पेटंट मिळाले. आज पासून GST कौन्सिलची मीटिंग गोव्यामध्ये सुरु होईल.
फर्स्ट सोर्स ने ‘ASCENSOS UK’ मधील १००% स्टेक GBP ४२ मिलीयांस ना घेण्यासाठी करार केला.
GR इन्फ्रा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या Rs ९०३.५३ कोटींच्या प्रोजेक्ट साठी लोएस्ट बीडर ठरली.
ASTRAZENECA च्या ‘DURVALUMAB सोल्युशन’ या मोठ्या माणसांच्या कॅन्सर साठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या मार्केटिंग आणी डीस्ट्रीब्युशन साठी CDSCO ने मंजुरी दिली.
पॉवरग्रीड खावडा पुलिंग स्टेशन १ आणी पुलिंग स्टेशन ३ साठी ट्रान्स्मिशन सिस्टीमसाठी यशस्वी बीडर ठरली.
M & M ने VW आणी स्कोडा बरोबर भारतात गाड्या ( कार्स) बनवण्यासाठी करार केला.
ONGC, RIL आणी UK मधील BP च्या कन्सोर्शियम ने OALPIX अंतर्गत बोली लावली . एकंदर २८ ब्लॉक्स साठी ऑकशन होणार आहे.
भारती एअरटेल १७०० टोवर उभारणार आहे.
PNB ने फ्लोअर प्राईस 10९ .१६ ने Rs २५०० कोटींचा QIP जाहीर केला.
BGR ला मिळालेलं Rs ४४० कोटींचे कॉन्त्रकट पाण्याची गुणवत्ता आणी एक्झिक्युशन मधील उशीर या कारणांसाठी रद्द होण्याची शक्यता.
आज IT ,ऑटो, OIL &GAS,मेटल्स PSE क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८४९१४ NSE निर्देशांक निफ्टी २५९४० आणी बॅंक निफ्टी ५३९६८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७५.०५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.४५ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.४९ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७५% VIX १३.४० च्या आसपास होते. सोने Rs ७४२०० आणी चांदी Rs ९०००० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.

आज USA मधील सर्व निर्देशांक डॉव जोन्स, NASDAQ, S & P मध्ये थोडी मंदी होती.
USA मार्केटचे डेटा, अध्यक्षीय निवडणूक, कॉर्पोरेट अर्निन्ग्स वर लक्ष असेल.
फेड नोव्हेंबर २०२४ आणी डिसेंबर २०४ मध्ये प्रत्येकी 0.२५% रेट कमी करेल. फेडचां अप्रोच न्युट्रल असेल. फेडने रेट कमी केल्यावर MORTGAGE रेट्स कमी होऊन फेब्रुवारी २०२३ च्या स्तरावर आले. ह्या रेटकट चा हौसिंग मार्केट वरही परिणाम होईल.
चीनचे स्टेट गव्हर्नमेंट रेट कट करायला तयार नाही.
कार्स साठी जे हार्डवेअर, सोफ्ट वेअर लागते त्यावर बंदी घालणार.
सेबीने ७ सरकारी कंपन्यांना ASM मध्ये घातले. १००% मार्जिन, ५% सर्किट लागेल.
FEDEX गायडंस कमी करत आहे. शिपमेंट कमी होत आहेत. लॉजिस्टिक्सचे शेअर्स मंदीत गेले.
FII ने Rs १४०६४ कोटींची खरेदी केली तर DII ने Rs ४४२७ कोटींची विक्री केली.
रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या पार्टली पेड शेअर्सवरील कॉल मनी भरण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वाढवली.
JSW इंफ्राने सांगितले की विस्तार योजनेसाठी DREDGER ची डिलिव्हरी घेतली.
VI ने US $ ३.६ बिलीयन्स चे डील कनक्ल्युड केले. नोकिया, एरिकसन, SAMSANG बरोबर 4 G, 5 G च्या उपकरणांच्या सप्लायसाठी करार केला.
टाटा स्टील च्या ओडीशामधील कलिंगनगर मध्ये ब्लास्ट फर्नेस चे युनिट सुरु केले. त्यामुळे क्रूड स्टील ची क्षमता ३ MTPA वरून ८ MTPA पर्यंत वाढेल. या प्रोजेक्टमध्ये Rs २७००० कोटींची गुंतवणूक केली.
अदानी टोटल GAS ला सिटी GAS डीस्ट्रीब्युशन बिझनेससाठी US $ ३७५ मिलियन्सचे MAIDEN ग्लोबल फायनान्सिंग मिळाले. हे फायनान्सिंग ‘BNP पारीबास’, DBS बॅंक, MIZUHO बॅंक, MUFG बॅंक, सुमितोमो मित्सुबिशी बँकिंग कॉर्पोरेशन कडून मिळेल.
रामको सिमेंटने ग्राईडिंग क्षमता २३.१४ वरून २४.०४ केली.
ग्लेनमार्क फार्माच्या छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद युनिटची ९ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने फॉर्म नंबर ४८३ इशू केला पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही.
आरती ड्रग्स च्या तारापूर API मन्युफाक्चरिंग युनिटच्या १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने ७ त्रुटी दाखवून FORM नंबर ४८३ इशू केल्या. पण या त्रुटीमध्ये डेटा इंटेग्रीटीचे इशू नाहीत.
BHELला NTPC कडून ८०० MW थर्मल पॉवर प्रोजेक्ट साठी Rs ६१०० कोटी उभारले.
ONGC च्या अझेरी चिराग डीपवाटर गुणशाली अझरबैजान मध्ये ४ टन क्युबिक फीट नैसर्गिक GAS रिसोर्सेस आहेत.
मनकाइंड फार्मा NCD द्वारे Rs १०००० कोटी उभारणार आहे.
KEC INTERNATIONAL ला Rs १००३ कोटींची ऑर्डर मिळाली आता त्यांचे ऑर्डर बुक १२३०० कोटी झाले.
भारत फोर्ज ने ‘SUNSURE एनर्जी” बरोबर करार केला.
ASTER DM हैदराबादमध्ये स्त्रिया आणी लहान मुले यांच्यासाठी हॉस्पिटल सुरु करणार आहे.
KEI च्या राजस्थान मधील अलवर येथील प्लांटमधून कमर्शियल उत्पादन सुरु झाले.
इंडिया ग्लायकोल ने अमृत डीस्टीलरीज बरोबर करार केला.
बायोकॉनच्या बंगलोर येथील API प्लांटच्या १६ सप्टेंबर २०२४ ते २० सप्टेंबर २०२४ दरम्यान केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये ३ त्रुटी दाखवल्या.
MCA ( मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स) ने भिकाजी फुडला होलली ओन्ड सबसिडीअरी काढण्यासाठी परवानगी दिली.
CROPSTER एग्रो ने एका शेअरमागे २ बोनस शेअर्सची घोषणा केली.
PSP प्रोजेक्टला Rs ५५४.९२ कोटींची ऑर्डर मिळाली. यावर्षी कंपनीला Rs १४४४ कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या.
NBCC ला Rs १२६१ कोटींची ऑर्डर मिळाली.
डोम्स ने युनिक्लन हेल्थकेअर मध्ये ५१.७७% स्टेक घेतला.
HFCLने जनरल एटोमिक एअरोन्यूटिकल सिस्टीमबरोबर डील केले.
OIL & GAS, ऑटो, बँकिंग आणी रिअल्टी क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
वेस्टर्न कॅरियर्स या कंपनीचे शेअर्स उद्या लिस्ट होतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८४९२८, NSE निर्देशांक निफ्टी २५९३९ आणी बॅंक निफ्टी ५४१०५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.४० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.६७ च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०१.१० आणी USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.७२ आणी VIX १२.३५ च्या आसपास होते. सोने Rs ७२८०० आणी चांदी Rs ८८४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
फेडने त्यांच्या व्याजदरांत साडेचार वर्षानंतर 0.५० % ची कपात केली. आता फेडचे रेट ४.७५% ते ५% च्या दरम्यान असतील. फेडने सांगितले की २०२४ मध्ये आणखी एकवेळा 0.५०%, २०२५ मध्ये १% आणी २०२६ मध्ये आणखी 0.५०% रेट कट करण्याचे अनुमान केले आहे. २०२६ पर्यंत २.७५ % ते ३% पर्यंत रेट कट केला जाईल.
USA च्या अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची लक्षणे दिसत नाहीत. महागाई नियंत्रणात आहे. महागाई कमी होत आहे. जॉब ग्रोथ स्लो आहे. बेरोजगारीचा दर ४.४% पर्यंत जाईल असे अनुमान आहे.
FII ने Rs ११५४ कोटींची आणी DII ने Rs १५२ कोटींची खरेदी केली.
आंध्र प्रदेश राज्य सरकारने नवीन लिकर ( मद्यार्क) पॉलिसीला मंजुरी दिली.
IREDA ला दिपम कडून QIP रूट ने ४५०० कोटी उभारण्यासाठी मंजुरी मिळाली.
गार्डन रिच शिपबिल्डर्सला ‘कार्स्टन रेहडर SCHIFFS MAKER’ आणी ‘REEDEREI GMBH &CO KG’ जर्मनी कडून ४ मल्टिपर्पज व्हेसल साठी कन्फर्मेशन मिळाले. US $ ५४ मिलियन्स ची पुन्हा ऑर्डर मिळेल. एकंदर ऑर्डर US $ १०८ मिलियन्स ची असेल. कंपनीला शेड्यूल ‘B’ मधून काढून शेड्यूल ‘A ‘ मध्ये घातले.
नजारा प्रेफरन्शियल इशुद्वारा Rs ९०० कोटी उभारणार आहे. ‘SPORTSKEED’ मध्ये १९.३५% स्टेक Rs १४५.५ कोटींना घेणार. त्यासाठी ५०% कॅश आणी उर्वरीत ५०% रकमेसाठी शेअर्स इशू करणार. ‘अबसोल्युट स्पोर्टमध्ये नजाराचा स्टेक ९१% होईल.
GE T & D चे प्रमोटर्स ग्रीड इक्विपमेंट आणी GE ग्रीड अलायन्सेस ११.७% स्टेक OFS च्या माध्यमातून विकणार. फ्लोअर प्राईस Rs १४०० असेल. ग्रीन शू ऑप्शन ३.९% असेल. हा OFS १९ सप्टेंबर आणी २० सप्टेंबरला ओपन असेल.
आदित्य बिर्ला फायनान्स आणी आदित्य बिर्ला कॅपिटल या कंपन्यांच्या मर्जरला RBI ने मंजुरी दिली.
NTPC ग्रीनचा Rs १०००० कोटींचा IPO येणार आहे. यांत OFS नसेल.
DCX सिस्टिम्सला इझरेल मधील कंपनीकडून Rs 154 कोटींची ऑर्डर मिळाली.
पॉवर ग्रीड मध्यप्रदेशांत कुरवार येथे ७६५ KV आणी ४०० KV/200 KV चे सबस्टेशन आणी D/C ट्रान्स्मिशन लाईन मध्यप्रदेशांत टाकणार.पॉवर ग्रीड इंटरस्टेट ट्रान्स्मिशन सिस्टीम साठी यशस्वी बीडर ठरली.
BL कश्यप ला Rs २२१ कोटींची २० महिन्यात पूर्ण करायची ऑर्डर मिळाली. कंपनीचे ऑर्डर बुक Rs ३५४६ कोटींचे आहे.
ION एक्स्चेंज ला अदानी पॉवर कडून Rs १६१.२ कोटींची ऑर्डर मिळाली.
आवास हौसिंग NCD च्या माध्यमातून Rs ६३० कोटी उभारणार.
लेमन ट्री हॉटेल्सने विजयवाडा येथे ४४ रूम्सच्या हॉटेलसाठी लायसेन्सिंग करार केला.
सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांनी AGR ड्युज संबंधीत केलेली क्युरेटिव्ह याचिका रद्द केली. ही याचिका AGR ड्युजची रक्कम तपासून पुन्हा निश्चित करण्यासाठी केलेली होती. VI कडे AGR ड्युजची Rs ७०३२० कोटींची बाकी आहे.
इंडोनेशियाने पाम ऑईल ( क्रूड आणी रिफाईनड ) वरची एक्स्पोर्ट ड्युटी कमी केली.
IDFC Ist बँकेने ‘PREMIERE मेटल कार्ड अश्व’ launch केले.
शिपिंग उद्योगाच्या प्रश्नांत सरकार लक्ष घालणार असल्यामुळे आज शिपिंग चे शेअर्स वर होते
मोतीसन्स ज्वेलर्सने त्यांच्या १ शेअरचे १० शेअर्समध्ये स्प्लिट केले.
रेलिगेअर ही DEBT-FREE कंपनी झाली.
उनो मिंडा इंडोनेशिया मध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट लावणार आहे.
WOCKHARDT मेनिंजायटीसवरील इन्व्हेस्टीगेटिव्ह ड्रगचे सकारात्मक निकाल आले.
फर्स्ट सोर्स ने ऑस्ट्रेलिया आणी न्यूझीलंड मध्ये पदार्पण केले.
गुडलक इंडियाने UP मध्ये सिकंदराबाद येथे हायड्रोलीक ट्यूबचे उत्पादन सुरु केले.
CESC ने ६८६.८५ MW विंड प्रोजेक्ट करण्यासाठी करार केला.
IRIS बिझिनेस सर्विसेसने तेलंगाना राज्य सरकार बरोबर MOU केले.
आज फार्मा, मेटल्स, IT, PSE, OIL & GAS मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले तर FMCG, बँकिंग ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८३१८४ NSE निर्देशांक निफ्टी २५४१५ बॅंक निफ्टी ५३०३७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०२४

.आज क्रूड US $ ७३.१७ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.७५ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.५२ आणी USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.६४ आणि VIX १३.३० च्या आसपास होते. सोने Rs ७३००० तर चांदी Rs ८८७०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मंदीत होती.
आज रात्री उशिरा फेडच्या दोन दिवसांच्या FOMC बैठकीचा निर्णय जाहीर होईल. मार्केट्ची अपेक्षा आहे की फेड किमान 0.२५% एवढा रेटकट जाहीर करेल.
FII ने Rs ४८३ कोटींची विक्री तर DII ने Rs ८७४ कोटींची खरेदी केली.
इन्फोसिसने मेट्रो बँकेबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला वेग येण्यासाठी भागीदारी केली.
स्टार इंडियाने झी एन्टरप्रायझेस विरुद्ध I.CIA ट्रायब्युनल कडे Rs ८००० कोटींच्या केलेल्या अर्जाला काही आधार नाही असे झी एन्टर प्रायझेसने सांगीतले.
सुवेन लाईफसायन्सेसच्या MDD ( मेजोरिटी डिप्रेशन डिसऑर्डर) वरील औषध ‘ROPANICANT’ च्या दुसऱ्या फेजचे निकाल सकारात्मक आले.
TCS ने फिलीपाईन्स मध्ये Mcdonalds बरोबर ७६० पेक्षा जास्त रेस्टारंट मध्ये IT LANDSCAPE मोडर्नाइझ करण्यासाठी करार केला.
रिलायंस पॉवर ने Rs ३७८२.40 कोटींची बॅंक GURANTEE दिली.
SKF इंडिया त्यांचा ऑटोमोटिव्ह बिझिनेस वेगळा काढून त्यांचे NASDAQ STOCKHOLMS वर लिस्टिंग करणार आहे.
REC ने सांगितले की त्यांचे रिन्युएबल एनर्जी साठी लोनबुक २०३० पर्यंत Rs ३ लाख कोटी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कोल इंडियाच्या इमारतीतून औषधी केंद्रातून जनरिक औषधे पुरवण्यासाठी करार केला.
SATIN क्रेडीट केअर आणी मनकाइंड फार्मा फंड उभारणीवर विचार करत आहे.
टोरांट पॉवर ला १५०० MW एनर्जी स्टोरेज क्षमता मिळवण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनकडून LOI मिळाले.
क्रूड वर लावलेला विंडफॉल TAX Rs १८०० प्रती टनावरून Rs झीरो प्रती टन केला.
रिलायंस इन्फ्राने त्यांच्यावरील कर्ज Rs ३८३१ कोटींचे कर्ज कमी करून Rs ४७५ कोटी केले.
इंटेलेक्ट डिझायनर एरेनाच्या INTELLECT.AI ने ‘WEALTH FORCE.AI‘ LAUNCH केले.
ऑरोबिंदो फार्माच्या आंध्रप्रदेशमधील EUGIA च्या स्टराईल युनिटला USFDA ने EIR दिला.
IDFC Ist बँकेच्या शेअर्समध्ये १.२७ कोटी शेअर्सचे (०.१८ % इक्विटी) चे Rs ७२.५३ ते Rs ७२,६८ प्रती शेअर भावाने Rs ९२.१८ कोटींचे लार्ज डील झाले.
VST इंडस्ट्रीजचे १ लाख शेअर्स राधाकिसन दमाणीनी विकले.
रेस्टॉरंट ब्रान्ड ASIAच्या १.०७ कोटी शेअर्सचे Rs ११३ कोटींमध्ये लार्ज डील झाले.
रतन इंडियाने E – बाईक launch केली.
वक्रांगीने स्टार हेल्थबरोबर करार केला.
टाटा पॉवरला MSEDCLकडून ४०० MW हायब्रीड पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.
ल्युपिनने GAS वरील औषध भारतांत विकण्यासाठी ‘टाकेडा फार्मा’ बरोबर लायसेन्सिंग करार केला. हेरीटेज फुड्स ने आईसक्रिम प्लांट लावण्यासाठी Rs २०४ कोटींची गुंतवणूक करणार आहे असे सांगितले.
CEIGALL ला Rs १२९९ कोटी आणी अयोध्या बायपास साठी Rs ११९९ कोटी अशा दोन ऑर्डर्स मिळाल्या.
इनोक्स विंडला IGREL रिन्युएबल कडून ५५० MW प्रोजेक्ट साठी LOI मिळाले.
सरकारने रबी हंगामासाठी POTASH, सल्फर, फॉस्फरस आणि नायट्रोजन खतांसाठी न्युट्रीयंट बेस्ड सबसिडीचे दर निश्चित केले. हे सबसिडीचे दर १ ऑक्टोबर २०२४ ते 31 मार्च २०२५ पर्यंत लागू होतील
आज फार्मा, मेटल्स, एनर्जी, OIL & GAS, PSE, IT, मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८२९४८ NSE निर्देशांक निफ्टी २५३७७ आणी बॅंक निफ्टी ५२७५० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२४

आज क्रूड US $ ७३.०८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.८५ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.७५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.६२ आणी VIX १२.६१ च्या आसपास होते. सोने Rs ७३४०० आणी चांदी Rs ८९४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.
FII ने Rs १६३५ कोटींची विक्री आणी DII ने Rs ७५४ कोटींची खरेदी केली.
ऑगस्ट २०२४ या महिन्यासाठी भारताचा WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) १.३१ % आला. ( २.०४ %जुलै मध्ये होता.)
आज PN गाडगीळ ज्वेलर्स या कंपनीचे BSE वर Rs ८३४ आणी NSE वर Rs ८३० वर लिस्टिंग झाले. IPO मध्ये शेअर Rs ४८० ला दिला असल्याने ज्यांना शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
बजाज हौसिंग फायनान्स च्या शेअर्समध्ये ३.८४ कोटी शेअर्सचे Rs ६९१ कोटींचे लार्ज डील झाले.
फर्स्ट सोर्स ने मायक्रोसॉफ्ट अझुरे ओपन AI बरोबर डिजिटल ट्रान्सफॉरमेशनसाठी करार केला.
ग्लोबस स्पिरीटने सिंगल माल्ट व्हिस्की ‘DOAAB INDIA CRAFT WHISKY’ launch केली.
संदुर मंगेनीज Rs १००० कोटींचा QIP करणार आहे.
इंडो कौंट ने ‘FLUVITEX USA ‘ मध्ये ८१% स्टेक US $ १९.६३ मिलियन्सला घेतला. आणखी US $ ४.६ मिलियन्स गुंतवून उरलेला १९ % स्टेक घेण्याचे कंपनीला ऑप्शन आहे.
संवर्धना मदर्सन Rs १८८.५५ या फ्लोअर प्राईस ने CCD इशू करणार आहे.
वेदान्ताच्या लांजीगढ रिफायनरी मध्ये जो बांध आहे त्याला तडे गेले आहेत. पण कंपनीने सांगितले की यामुळे काही नुकसान झाले नाही.
JK टायर ‘कॅव्हेन्डिश इंडस्ट्रीज’ बरोबर मर्जर करणार आहे. ‘कॅव्हेन्डिश इंडस्ट्रीज च्या १०० शेअर्सना JK टायर्सचे ९२ शेअर्स मिळतील.
TVS मोटर्सने ‘APACHE RR 310’ ही नवीन बाईक LAUNCH केली.
बजाज ऑटो ने TRIUMPH SPEED T 4 Rs २.१७ लाख + किमतीला launch केली.
JBM ऑटोची सबसिडीअरी ‘इकोलाईफ मोबिलिटी’ ने EV बस आणी कमर्शियल व्हेइकल्स साठी
US $ १० कोटी उभारले.
झायडस लाईफला स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडच्या API बिझनेसचे अधिग्रहण करायला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.
इझी ट्रीप ने मेडिकल टुरिझम च्या व्यवसायांत पदार्पण केले. कंपनीने ROLLINS इंटरनॅशनलमध्ये ३०% स्टेक Rs ६० कोटीना खरेदी केला. कंपनीला PFLEGE HOME HEALTHCARE चे अधिग्रहण करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मंजुरी दिली.
DCX सिस्टिम्स च्या सबसिडीअरीला सरकारकडून रडार सिस्टीम आणी EW सिस्टिम्सचे असेम्ब्ली, उत्पादन, आणी टेस्टिंग साठी सरकारकडून औद्योगिक लायसेन्स मिळाले.
NHPC च्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांची वर्तमान पॉवर जनरेशन क्षमता ७१४४ MW आहे. २०३० पर्यंत ही क्षमता दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.क्षमता १६७६२ MW चे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी हायड्रो प्रोजेक्ट्स वर Rs ९०,००० कोटीची गुंतवणूक करेल.
LICने त्यांचा DCM श्रीराम मधील त्यांचा स्टेक ६.६८% वरून ४.६६% केला.
GPT इंफ्राला दक्षिण पूर्व रेल्वे कडून Rs २०४ कोटींची ऑर्डर मिळाली.
SKF ची ऑटोमोटिव्ह ऑपरेशन अलग करण्याची योजना विचाराधीन आहे.हा शेअर NASDAQ STOCKHOLMs मध्ये लिस्ट करण्याची योजना आहे.
आज फार्मा मेटल्स बँका या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले तर FMCG आणी IT क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८३०७९ NSE निर्देशांक निफ्टी २५४१८ आणी बॅंक निफ्टी ५२१८८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १६ सप्टेंबर २०२४

.आज क्रूड US $ ७१.७५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.९० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १००.५४ USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.६४ VIX १२.७२ होते. सोने Rs ७३६०० आणी चांदी ९०१०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
अदानी पॉवर ने ६६०० MW बंडल्ड रिन्युएबल आणि थर्मल पॉवर सप्लाय ची बोली जिंकली.
झायडस लाईफच्या सबसिडीअरीने USA मधील ‘VIWIT फार्मा’ बरोबर USA मार्केटसाठी ‘ ‘GADOBUTROL इंजेक्शन’ आणि ‘GADOTERATE MEGLUMINE इंजेक्शन’ च्या एकस्ल्युझीव लायसेन्सिंग आणी सप्लाय एग्रीमेंट केले.
झायडस लाईफ ला गुजराथ मधील मॅन्युफॅक्चरिंगप्लांट मधील त्रुटीसाठी वार्निंग लेटर दिले.
डिक्सनने IT प्रोडक्ट्ससाठी ‘ASUS INDIA’ बरोबर करार केला.
EXIDE ने ‘EXIDE एनर्जी सोल्युशन्स’ मध्ये आणखी Rs १०० कोटींची गुंतवणूक केली. आता कंपनीची एकूण गुंतवणूक EXIDE एनर्जीमध्ये Rs २७५२.८४ कोटी झाली.
PTC इंडिया PTC एनर्जी मधील १००% गुंतवणूक ONGC ग्रीनला विकणार.
थर्मक्सला बोटस्वानामधून Rs ५१६ कोटींची ऑर्डर मिळाली.
HUL ला GSK डील संबंधात मिळालेल्या Rs ९६२ कोटींच्या GST डिमांड नोटीसी विरुद्ध हायकोर्टांत केस दाखल केली.
LIC ने ऑरोबिंदो फार्मामधील त्यांचा स्टेक ५.०१ % वरून २.२६ % केला.
आज बजाज हौसिंग फायनान्स चे BSE आणी NSE वर Rs १५० ( IPO प्राईस Rs ७०) ,TOLIN टायर्सचे BSE Rs २२७ ( IPO प्राईस Rs २२६), NSE वे Rs २२८ वर आणी KROSS चे BSE आणी NSE Rs २४० ( IPO प्राईस Rs २४०.००) ला लिस्टिंग झाले.
ज्यांना बजाज हौसिंग फायनान्स चे शेअर्स अलॉट झाले त्यांना चांगले लिस्टिंग गेन्स झाले.
बजाज हौसिंग फायनान्स सोडून बाकीच्या दोन कंपन्यांचे लिस्टिंग FLAT झाले.
सरकारने साखर उत्पादक कंपन्यांना शुगर ज्यूस पासून आणी B -HEAVY मोलासीस पासून
रेक्टीफाईड आणि एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल तयार करायला परवानगी दिली.
लुमॅक्स ऑटो ने ‘GREENFUEL एनर्जी सोल्युशन्स’ मधील मेजोरिटी स्टेक Rs २२१ कोटींना घेतला.
GMR पॅसेंजर ट्राफिक YOY ९% ने तर MOM 0.९% ने वाढली. डोमेस्टिक ट्राफिक ७.४% ने तर आंतरराष्ट्रीय ट्राफिक १२.९% ने वाढले.
ZAGGLE प्रीपेड ओशन ने ‘FOUNDERLINK TECH’ बरोबर ‘ZAGGLE प्रीपेड’ च्या ग्राहकांना बिझिनेस लोन देण्यासाठी करार केला.
झोमाटो ने फूड डिलिव्हरी इन ट्रेन्स या योजनेखाली IRCTC बरोबर केलेल्या करारा अंतर्गत १०० स्टेशन्स वर १० लाख ऑर्डर्स पोहोचवल्या आहेत.
इन्फोसिसने LIC बरोबर डिजिटल ट्रान्सफॉरमेशन वाढवण्यासाठी करार केला.
LAURAS LAB च्या हैदराबाद API उत्पादन युनिटला USFDA कडून क्लीन चीट दिली.
इंडीगोचा मार्केट शेअर ६२.४% झाला.
सरकारने निर्यात करण्यासाठी मिनिमम एक्स्पोर्ट प्राईस कमी करून US ९५०/टन केली. याचा फायदा KRBL ला होईल.
ऑल कार्गो टरमीनलने उरण येथे २५ एकर जमीन लीजवर घेतली.
सरकारने खाद्य तेलांवरील कस्टम्स ड्युटी २०% केली. याचा फायदा अदानी विलमर , गोदरेज अँग्रोव्हेट, आणी मेरिको यांना होईल. ही ड्युटीमधील कपात 31 डिसेंबर २०२४ पर्यंत चालू राहील.
M & M ने लाईट कमर्शियल व्हेईकल ‘VEERO’ Rs ७.९९ लाख+ला launch केली.
इंटेलेक्ट डिझाईन एरेना ने HCL टेक बरोबर ग्लोबल फायनंशियल इनस्टीट्युशनना टेक्निकल सोल्युशन्स पुरवण्यासाठी करार केला.
रिलायंस पॉवर ला ५०० MW / १००० MWH बॅटरी स्टोअरेज साठी कॉन्ट्रकट मिळाले.
टोरेंट पॉवर २०३० पर्यंत Rs ५७००० कोटीची गुंतवणूक करणार आहे. ग्रीन अमोनिया प्रोजेक्टमध्ये Rs ७२०० कोटींची गुंतवणूक करणार.
संवर्धना मदर्सन इस्त्रायलची कंपनी ‘REE ऑटोमोटिव्ह’ मध्ये ११% स्टेक US $ १५ मिलियन्स ला घेतला.
LAURAS LABने तेलंगणामध्ये नवीन R & D युनिट सुरु केले.
फिनिक्स मिल्सने १:१ बोनस इशू जाहीर केला.
स्ट्राईड फार्माच्या डिप्रेशन वरील ‘FLUOXETINE’ या औषधाला USFDA ची मंजुरी
आज FMCG, फार्मा, IT या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. एनर्जी, मेटल्स, रिअल्टी या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८२९८८ NSE निर्देशांक निफ्टी २५३८३ आणी बॅंक निफ्टी ५२१५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७