Monthly Archives: October 2024

आजचं मार्केट – ३१ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७३.०२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८४.०८ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.०३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२९ आणी VIX १६.१० च्या आसपास होते. सोने

Rs ७९६०० आणी चांदी Rs ९६९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी कॉपर आणी झिंक तेजीत होती.
USA मार्केटमध्ये चीप बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले. सुपरमायक्रो ३३% पडला. मेटा चे डेली युजर्स कमी झाले. AI युनिट तोट्यात गेले. मायक्रोसॉफ्ट ने गायडंस खराब दिला. USA चा GDP ग्रोथ रेट २.८ % आला हा ३% येईल अशी अपेक्षा होती. USA मध्ये २.३० लाख जॉब क्रिएशन झाले.
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ५०.१% (४९.९%)आणी नॉन मन्युफाक्चरिंग PMI ५०.२ ( ५०.३) आला.
FII ने Rs ४६१४ कोटींची विक्री आणी DII ने Rs ४५१८ कोटींची खरेदी केली.
आता हौसिंग को-ऑपरेटीव आणी इतर को-ऑपरेटीव्ह सोसायटीसाठी DEMAT अकौंट उघडता येणे शक्य होईल.
अदानी पॉवरने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डीस्ट्रीब्युशन कंपनी बरोबर करार केला.
DCM श्रीराम चे प्रॉफीट ९५ .७% ने वाढले, रेव्हेन्यू ११% ने वाढला, मार्जिन ५.८% ने वाढला.
ऑटोमोटिव्ह एक्सलचे प्रॉफीट २०% कमी झाले, रेव्हेन्यू १५.४% कमी झाला , मार्जिन १०.३% होते
IRB इन्फ्रा चे प्रॉफीट ४.३% ने वाढले, रेव्हेन्यू ९.१% ने कमी झाले, मार्जिन वाढून ४८.३% झाले.
बायोकोन चे प्रॉफीट Rs २७.१ कोटी, रेव्हेन्यू Rs ३५९० कोटी आणी मार्जिन १९.१% होते.
टाटा पॉवर चे प्रॉफीट ५.८% ने वाढले. रेव्हेन्यू Rs १५६९७.७० कोटींवर FLAT राहिले. मार्जिन वाढून २३.९% होते.
L & T चे प्रॉफीट ५% ने वाढले. रेव्हेन्यू २१% ने वाढले ऑर्डर इंफ्लो Rs ८००४५ कोटी होता. मार्जिन कमी होऊन १०.३% होते. कंपनीने त्यांचा FY २५ साठीचा गायडंस कायम ठेवला.
L & T टेक चे प्रॉफीट १.३% ने वाढले रेव्हेन्यू ८% ने वाढला कंपनीने Rs १७ अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी २५ ऑक्टोबर २०२४ रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
यथार्थ हॉस्पिटल्स MGS इन्फो मधील ६०% स्टेक Rs १५२ कोटींना घेणार आहे.
HDB फायनांशियल ने Rs १२५०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला
सिप्ला च्या गोवा प्लांटला USFDA ने VAI रिपोर्ट दिला. सिप्लाला आता ‘ABRAXANE जनरिक’ या
केमोथेरपीमध्ये वापरल्या जाणारे औषध launch करता येईल. हे औषध फक्त ‘SANDOZ’ही कंपनी बनवते.
शिल्पा मेडिकेअर च्या बंगलोर युनिट VI प्लांटच्या २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत ४ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला.
फ्रान्स मधील IT कन्सल्टिंग कंपनी कॅपजेमिनीने त्यांच्या रेव्हेन्यू गायडंस ” डिग्रोथ ‘0.५% -१.५%’ वरून डीग्रोथ ‘२% ते २.२४%’ एवढा कमी केला. तर मार्जिन गायडंस ‘१३.३% ते १३.६%’ वरून ‘१३.३% ते १३.४%’ एवढा कमी केला.
मन्युफाक्चरिंग, टेलिकम्युनिकेशन आणी एअरोस्पेस सेक्टर्सचा विशेष उल्लेख केला.
VINTAGE कॉफी यांनी त्यांच्या हैदराबाद उत्पादन युनिटमध्ये कमर्शियल उत्पादन सुरू केले.
G. E. शिपिंग त्यांचा जग पद्म हा मेडियम रेंज चा TANKAR विकणार आहे.
GENSOL ENGG च्या प्रमोटर्सनी स्टेक वाढवला.
RVNL ला इस्ट कोस्ट रेल्वे कडून Rs २८४ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज मिडकॅप, ऑटो , रिअल्टी, PSE, IT, बँकिंग, FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. तर स्माल कॅप इन्फ्रा, फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९३८९ NSE निर्देशांक निफ्टी २४२०५ बॅंक निफ्टी ५१४७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – ३० ऑक्टोबर २०२४

.आज क्रूड US $ ७१.९२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.07 च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.२८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२७ आणी VIX १५.८० च्या आसपास होते. सोने Rs ७९५०० आणी चांदी Rs ९८६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.

टोरेंट फार्माच्या १.०४ कोटी शेअर्सचे म्हणजे ३.१२% इक्विटी मध्ये Rs ३२४५ कोटींमध्ये लार्ज डील झाले. या डील साठी १२० दिवसांचा लॉक इन पिरीयड असेल.
बजाज स्टील ने १ शेअरमागे ३ बोनस शेअर्सची घोषणा केली यासाठी १० नोव्हेम्बर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली
RITES ने SAIL-BSL बरोबर कन्सल्टिंग साठी करार केला.
वेलस्पन एन्टरप्रायझेस ने ‘SMARTOPS’ बरोबर करार केला.
हिंदुस्तान झिंकच्या डीमर्जर साठी माइनिंग मंत्रालयाकडे कंपनीने अर्ज केला आहे. कंपनी त्यांचा झिंक आणी सिल्व्हर बिझिनेस वेगळा करण्याची शक्यता आहे.
रिलायंस इंडस्ट्रीजच्या सबसिडीअरीने ‘FARADION’ मध्ये १००% स्टेक खरेदी केला.
गोदावरी बायोफ्युएल्सचे IPO किमतीच्या १२.५% डिस्काऊंटवर लिस्टिंग झाले. कंपनीचा शेअर NSE वर Rs ३०८ तर BSE वर Rs ३१०.५० वर लिस्टिंग झाले.
अलाइड डिस्टिलरीज & ब्लेंडर्स तेलंगाना मध्ये Rs ७५ कोटींची गुंतवणूक करून प्लांट उभारणार आहेत.
प्रेस्टीज इस्टेट चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
JBM ऑटोला १३९० बसेस साठी Rs ७५०० कोटींची ऑर्डर मिळाली.
ASK चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
श्रीराम प्रॉपर्टीजने पुण्यामध्ये ६ एकर जमीन खरेदी केली.
शेअर इंडिया सिक्युरिटीजचे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
लेमन ट्रीज हॉटेल्स ने पंजाब मध्ये अमृतसर येथे ४५ रूम्स चे हॉटेल सुरु करण्यासाठी करार केला.
GSK फार्माचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
गोदरेज अग्रोकेमिकल्सचे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
व्होल्टासला Rs १३४ कोटी प्रॉफीट झाले रेहेन्यू Rs २६१९ कोटी झाला. मार्जिन ३.७% वरून वाढून ६.२% झाले.
मेरिको चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
कॉनकॉर चे प्रॉफीट FLAT राहिले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
रेडिंगटनचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
KAYNES चे प्रॉफीट ८६.४% ने वाढले, रेव्हेन्यू ५८.६% ने वाढले. मार्जिन वाढले. कंपनीचे ऑर्डर बुक Rs ५४२३ कोटी होते.
हनीवेल ऑटोमेशन चे प्रॉफीट, उत्पन्न, कमी झाले मार्जिन १२.५% वरून वाढून १२.६% झाले.
MTAR चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
हुडकोचे YOY प्रॉफीट वाढले, उत्पन्न आणी NII वाढले.
TCS ने ब्राझीलच्या ‘INSPER’ या कंपनी बरोबर करार केला.
SWIGGY लिमिटेड या २०१४ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीचा Rs ११३२७.४३ कोटींचा (यांत Rs ४४९९.00 कोटींचा फ्रेश इशू ऑफ शेअर्स तर ६८२८.४३ कोटींचा OFS आहे ) IPO ६ नोव्हेंबर २०२४ ला ओपन होऊन ८ नोव्हेंबरला बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs ३७१ -३९० निश्चित केला असून मिनिमम लॉट ३८ शेअर्सचा असेल. या शेअरचे लिस्टिंग नोव्हेंबर १३, २०२४ रोजी होईल अशी अपेक्षा आहे. शेअरची दर्शनी किमत Rs १ आहे.ही कंपनी सिंगल एप द्वारे उपयोग करता येणार्या PLATFORM द्वारा MEALS, ग्रोसरीज आणि हाउसहोल्ड वस्तूंसाठी डिस्कव्हरी, निवड करून ऑर्डर करून पेमेंट करण्याची सोय उपलब्ध करून देते. आणि जर ग्राहकाने सांगितले तर या वस्तूंची डिलिव्हरी करण्याची व्यवस्था करते. कंपनी ५ बिझिनेस मध्ये काम करते (१) फूड डिलिव्हरी (२) आउटऑफ होम कन्झम्प्शन (३) क्विक कॉमर्स (4) सप्लाय चेन आणी डीस्ट्रीब्युशन (५) PLATFORM इनोव्हेशन कंपनीला FY २४ मध्ये Rs २३५०.२४ कोटींचा तोटा झाला. (Rs ४१७९ .31 कोटी) कंपनी IPO प्रोसीडची गुंतवणूक तिच्या सबसिडीअरीमध्ये (SCOOTSY ) करण्यासाठी, डार्क स्टोर्सची संख्या वाढवण्यासाठी, आणी DEBT MANAGEMENT साठी करेल.
इंडोको रेमिडीज च्या ‘VARENICLINE’ या नवीन औषधाला USFDA कडून ANDA अप्रूवल मिळाले.
वर्धमान टेक्स्टाईल चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
इंडस इंड बँके ने ‘TRUSTMORE’ बरोबर करार केला.
व्होल्टासने सांगितले की गेल्या महिन्यांत त्यांच्या सर्व अप्लायन्सेसचा परफॉर्मन्स चांगला होता. एअरकंडीशनर्स साठी चांगली मागणी होती. रूम एअरकंडिशनर मध्ये २५% ग्रोथ दिसली. कंपनी ‘VOLTBEK’ ब्रांडवर लक्ष केंद्रित करत आहे.
SHALBY चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
स्टरलाईटचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
मारुती जून २०२५ मध्ये EV launch करण्याची शक्यता आहे.
हिंद रेक्टीफायर चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
AIA इंजिनिअर्स चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
TTK प्रेस्टीजचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
आदित्य बिर्ला कॅपिटल चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
कार्बोरान्दाम चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
डाबर चे प्रॉफीट YOY Rs ५१५ कोटींवरून कमी होऊन Rs ४२५ कोटी झाले. उत्पन्न YOY Rs ३२०४ कोटींवरून कमी होऊन Rs ३०२९ कोटी झाले. मार्जिन YOY २०.६% वरून कमी होऊन १८.२६% होते. व्हॉल्यूम ७.५% ने कमी झाले. कंपनीने Rs २.७५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
आज FMCG, कॅपिटल गुड्स, ऑटो, मेटल्स मध्ये खरेदी झाले तर बँक्स, IT फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९९४२ NSE निर्देशांक निफ्टी २४३४० बॅंक निफ्टी ५१८०७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २९ ऑक्टोबर २०२४

.आज क्रूड US $ ७१.४८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.0८ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.१६ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२७ आणी VIX १४.९० च्या आसपास होते. सोने Rs ७८८०० आणी चांदी Rs ९७९०० च्या आसपास होते. बेस मेटल्स कॉपर आणी झिंक तेजीत होती.

USA मध्ये अध्यक्षांच्या निवडणुकीची धामधूम चालू आहे. हळू हळू डोनाल्ड ट्रम्प निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.फोर्ड कंपनीने गायडंस चांगला दिला नाही. US $ चा जापनीज येन बरोबरचा विनिमय दर US $१= १५३ जापनीज येन असा होता.
चीनने मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी ४ लाख कोटी युआनचे बॉंड इशू केले.
JSW एनर्जीने कोरियाच्या POSCO ग्रुप बरोबर भारतात ५० लाख टन क्षमतेचा स्टील प्लांट डेव्हलप करण्यासाठी करार केला
आयर्लंड डीपार्टमेन्ट ऑफ सोशल जस्टीस बरोबर टेक्निकल असिस्टंस देण्यासाठी TCS ने करार केला.
IGL चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन 200 बेस पाईंटने कमी झाले.
अजंता फार्माचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
सुझलॉनचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले ,मार्जिन कमी झाले.
फेडरल बँकेचे प्रॉफीट वाढले, NII वाढले, NPA कमी झाले. स्लीपेजिस Rs ४३४ कोटी होती.
स्पंदना स्फूर्तीची डिसबर्समेंट कमी झाली. AUM YOY वाढले. QOQ कमी झाले. नेट लॉस YOY वाढला.
NTPC ग्रीनच्या IPO ला मंजुरी मिळाली.
ग्रीनलँमचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
जिओ फायनांशियल ची सबसिडीअरी ‘जिओ पेमेंट सोल्युशन’ ला ऑनलाईन पेमेंट अग्रीगेटर म्हणून RBI कडून मंजुरी मिळाली.
HAL च्या तेजस मार्क I A फायटर च्या 99F404 जेट इंजिन्स च्या सप्लायसाठी GE एअरोस्पेस कंपनी बरोबर करार केला. हा सप्लाय मार्चपासून सुरु होईल.
अमी ऑर्गनिक्स चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
SYMPHONY चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
कॅनरा बँकेचे प्रॉफीट Rs ३६०६ कोटींवरून Rs ४०१४ कोटी तर NII Rs ८९०२ कोटींवरून Rs ९३१५ कोटी झाले. ग्रॉस NPA ४.१४% वरून कमी होऊन ३.७३% झाले. नेट NPA १.२४% वरून कमी होऊन 0.९९% झाले. प्रोविजन Rs २१७१ कोटींवरून Rs २५८७ कोटी झाले.
अदानी पोर्ट प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
किर्लोस्कर BROS चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
अपार चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
PCBL चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
APL अपोलो चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आले.
V -GUARD चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
गुजरात फ्लुओरोचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले
सिप्लाचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
दीपक फर्टीलायझर प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
अदानी एन्टरप्रायझेस चे प्रॉफीट YOY Rs २२८ कोटींवरून Rs १७४२ कोटी झाले. उत्पन्न Rs १९५४६ कोटींवरून वाढून Rs २२६०८ कोटी झाले. मार्जिन १२.४% वरून योय १६.४% झाली. निकाल चांगले आले.
EIL चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले.
SBI कार्ड्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
ट्रान्सफॉरमर्स आणी रेक्टीफायर्स ला Rs २७० कोटींची ऑर्डर मिळाली.
सुझुकी मोटार गुजरातच्या मारुती सुझुकी मधील मर्जरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी.मिळाली
मारुती सुझुकी चे प्रॉफीट YOY कमी होऊन Rs ३७१६ कोटींवरून Rs ३०६९ कोटी झाले. उत्पन्न YOY वाढून Rs ३७०६२ कोटींवरून Rs ३७२०२ कोटी झाले. मार्जिन YOY १२.९% वरून ११.९% झाले. कंपनीने सांगितले की Rs १०१४ कोटींच्या DIFFERED TAX चा परिणाम कंपनीच्या पर्फोर्मन्स वर झाला. मारुती सुझुकीने सांगितले की सणासुदीच्या मोसमांत आमची विक्री १४% ने वाढण्याची शक्यता आहे. डीलर कडील इन्व्हेंटरी कमी होईल. मागणी चांगली आहे.
आज बँकिंग, मिडकॅप, स्मॉल कॅप, PSE, रिअल्टी, मेटल्स, एनर्जी या क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०३६९ NSE निर्देशांक निफ्टी २४४४६ आणी बॅंक निफ्टी ५२३२० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २८ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७२.५६ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.0६ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४२ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.२७ आणी VIX १५.०३ च्या आसपास होते. सोने

Rs ७८२०० आणी चांदी Rs ९६३०० च्या आसपास होती. बेस मेटल्स झिंक मंदीत तर लेड, कॉपर अल्युमिनियम तेजीत होते.
FII ने Rs ३०३७ कोटींची विक्री आणी DII ने Rs ४१५९ कोटींची खरेदी केली.
CYIENT ने ‘AZIMUTH AI’ मध्ये २७.३% स्टेक घेणार आहे.
NBCC ला गोव्यामधून Rs १७२६ कोटींची ऑर्डर मिळाली.
हेस्टर बायोसायन्सेसचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ITD सीमेंटेशनचे प्रमोटर्स अदानी ग्रुपच्या रिन्यू एक्झिम DMCC ला ४६.६४% शेअर्स Rs ४०० प्रती शेअर भावाने विकणार आहे. अदानी ग्रुपकडून या कंपनीत Rs ५७१.६८ प्रती शेअर या भावाने २६% इक्विटीसाठी ओपन ऑफर आणली जाईल. ही कंपनी खरेदी केल्यामुळे अदानी ग्रुपची EPC क्षमता वाढेल.
वारी एनर्जी चे आज BSE वर Rs २५५० आणी NSE वर Rs २५०० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १५०३ ला दिला होता.
दीपक बिल्डर्सचे NSE वर Rs 200 आणी BSE वर Rs १९८.५९ वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २०३ ला दिला होता.
कोल इंडियाचे नेट प्रॉफीट २२% ने कमी होऊन Rs ६२७५ कोटी झाले. विक्री Rs ३०६७३ कोटी झाली. मार्जिन ३०.१% वरून YOY कमी होऊन २८.१% झाले. रीअलायझेशन YOY ५.८% कमी होऊन Rs १६२३ प्रती टन झाले. कोल इंडियाने Rs १५.७५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
क्रेडीट एक्सिस ग्रामीण चे प्रॉफीट, उत्पन्न, आणी मार्जिन कमी झाले.
AXI s बँकेला सेबीने शोकॉज नोटीस पाठवली.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंटने Rs ६३ प्रती शेअर लाभांश दिला. ७ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
DR रेड्डीजने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लीट केले
सरकारने साखर उद्योगाला त्यांची २०% प्रोडक्ट्सचे PACKEJING ज्यूट च्या पोत्यांत करायला सांगितले.
ICICI बँकेचे प्रॉफीट Rs १०२६१ कोटींवरून YOY १४.५% ने वाढून Rs ११७४६ कोटी झाले.
NII Rs १८३०८ कोटींवरून YOY ९.५% वाढून Rs २००४८ कोटी झाले.
डीपॉझीट Rs १२९४७४२ कोटींवरून YOY १५.७% वाढून Rs १४९७७६१ कोटी झाली.
एडवान्सेस Rs १११०५४२ कोटींवरून YOY १५% ने वाढून १२७७२४० कोटी झाले.
ग्रॉस NPA YOY कमी होऊन १.९७% झाले.
नेट NPA 0.४३% वरून QOQ 0.४२% झाले. कॅपिटल एडीक्यूअसी रेस्गियो १६.६६% होता.
IDFC Ist बँकेचे प्रॉफीटRs ७५१ कोटींवरून YOY ७३% ने कमी होऊन Rs २०१ कोटी झाले. कारण बँकेला महाराष्ट्र राज्य सरकार च्या टोल माफीमुळे या टोलकलेक्शन करणाऱ्या कंपन्याना दिलेल्या कर्जासाठी Rs २५३ कोटींची प्रोव्हिजन करावी लागली. यांत MEP इन्फ्रा चा समावेश आहे.
NII Rs ३९५० कोटींवरून YOY २१% वाढून Rs ४७८८ कोटी झाले.
डीपॉझीट Rs १६४७२६ कोटींवरून YOY ३२.४% वाढून २१८०२६ कोटी झाली.
एडवान्सेस Rs १,८३,२३६ कोटींवरून YOY २१.५% ने वाढून २,२२,६१३ कोटी झाले.
ग्रॉस NPA १.९२ % आणी नेट NPA 0.४८% वर FLAT होते. स्लीपेजिस Rs २०३० कोटी ( जून तिमाही Rs १६५७) कोटी वाढली. प्रोव्हिजन Rs १७३१.९ कोटी केली.
YES बँकेचे प्रॉफीट Rs २२५ कोटींवरून YOY १४५.६ % वाढून Rs ५५३ कोटी झाले.
NII Rs १९२५ कोटींवरून YOY १४.३% वाढून Rs २२०० कोटी झाले.
डीपॉझीट Rs २३४३६० कोटींवरून YOY 18% वाढून Rs २७७२१४ कोटी झाली. .
एडवान्सेस Rs २०९१०६ कोटींवरून YOY १२.४% ने वाढून Rs २३५११७ कोटी झाले.
CASA रेशियो २९.४% वरून YOY वाढून ३२% झाला. ग्रॉस NPA २% वरून कमी होऊन १.६ % झाले.NNPA 0.४८ % वर FLAT राहिले. स्लीपेजीस वाढून Rs १३१४ कोटी तर प्रोव्हिजन Rs २९७.१० कोटी केली.
अंबुजा सिमेंट चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. सेल्स व्हॉल्यूम ८.७ MT होते.
मोतीलाल ओसवाल प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
अरविंद प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
मंगलोर केमिकल्स & फरटीलायझर्सचे प्रॉफीट, उत्पन्न आणी मार्जिन सर्व कमी झाले. निकाल कमजोर आले.
CAMS चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न, मार्जिन वाढले.
कल्याणी स्टील चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
इंडियन बँकेचे प्रॉफीट Rs १९८८ कोटींवरून Rs २७०६ कोटी झाले. NII Rs ५७४० कोटींवरून Rs ६१९५ कोटी झाले. ग्रॉस NPA ३.४८% ( ३.७७%) तर नेट NPA 0.२७ % होते ( 0.३९%)
फर्स्ट सोर्स चे QOQ प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
SAPPHIRE फायद्यातून तोट्यात गेली. Rs १५.३ फायद्याऐवजी Rs ३.१ कोटी तोटा झाला . उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
PNB चे प्रॉफीट वाढले, NII वाढले, ग्रॉस NPA QOQ कमी होऊन ४.४८% तर नेट NPA QOQ कमी होऊन 0.४६% झाले.
ग्रीनप्लाय इंडस्ट्रीजचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
पॉली मेडीक्युअर चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
द्वारीकेश शुगर फायद्यातून तोट्यात गेली. Rs १०.३ कोटींवरून २५ कोटी लॉस झाला. उत्पन्न कमी झाले.
सुमिमोटो केमिकल्स चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
वेलस्पन लिविंग चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
BHEL तोट्यातून फायद्यात आली. Rs ६३ कोटी तोट्याऐवजी Rs १०६ कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढले. मार्जिन वाढले.
सन फार्मा चे प्रॉफीट Rs २३७५ कोटींवरून Rs ३०४० कोटी झाले. उत्पन्न Rs १३२९१ कोटी झाले. USA विक्री US $ ५१७ मिलियन्स झाली. मार्जिन २५.१% वरून २९.७% झाले.
JBM ऑटो चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले,मार्जिन वाढले. कंपनीने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले.
RITES ला UP मधून Rs ५९ कोटींच्या ऑर्डर मिळाल्या.
सुदर्शन केमिकल्सचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
LIC हौसिंग फायनान्स चे प्रॉफीट वाढले, NII कमी झाले, मार्जिन कमी झाले. ग्रॉस NPA ३.०५% (४.३३ % ) तर नेट NPA १.५७% ( २.५९% ( होते.
IOC चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन २.२% होते.
DLF चे प्रॉफीट १२२% YOY वाढून Rs १३८१ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY ४८% वाढून Rs २१८१ कोटी झाला.
अदानी पॉवर चे प्रॉफीट ५०% ने कमी होऊन Rs ३२९८ कोटी झाले. उत्पन्न ३% वाढून Rs १३३३९ कोटी झाला.
शक्ती पंप्स चे प्रॉफीट Rs १०१.४० कोटी, रेव्हेन्यू ६३४.६० कोटी झाला. निकाल चांगले आले.
RVNL ला Rs १७७ कोटींची ऑर्डर मिळाली.
भारती एअरटेलचे नेट प्रॉफीट १६८% ने वाढून Rs ३५९३ कोटी झाले. रेव्हेन्यू १२% ने वाढून Rs ४१४७३ कोटी झाला. ARPU Rs २३३ होते.
आज बँकिंग, रिअल्टी, मेटल्स , फार्मा मिडकॅप, स्माल कॅप मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०००५ NSE निर्देशांक निफ्टी २४३३९ बॅंक निफ्टी ५१२५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २५ ऑक्टोबर २०२४

.आज क्रूड US $ ७४.५४ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.०७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.०६ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२५ तर VIX १४.५४ च्या आसपास होते. सोने Rs ७८१०० तर चांदी Rs १,00,000 च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.

USA मधील मार्केट टेस्ला च्या निकालामुळे सावरले. टेस्लाचा शेअर २२% ने वाढला. मोलिना हेल्थ, व्हर्लपूल, UPS चे शेअर वाढले. IBM चा शेअर मंदीत होता. बोईंगने नवीन लेबर कॉन्ट्रॅक्ट स्वीकारले नाही म्हणून पडला. न्यू होम सेल्स चे आकडे चांगले आले. हनीवेल चे निकाल कमजोर आले. US $ आणी जापनीज येनमधील विनिमय दर US $१= १५१.९२ येन होता.
FII ने Rs ५०६२ कोटींची विक्री तर DII ने Rs ३६२० कोटींची खरेदी केली.
PNB हाउसिंगचे प्रॉफीट वाढले, NII वाढले .NIM ३.६८ होते GNPA १.२४ वर होते.
स्ट्राईडस फार्मा तोट्यातून फायद्यात आली. रेव्हेन्यू वाढले,मार्जिन वाढले.
इंडोको रेमिडीज ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. रेव्हेन्यू कमी झाला. मार्जिन कमी झाले.
NTPC चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन कमी झाले.
आरती ड्रग्स चे प्रॉफीट, उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
अमिताव चौधरी यांची AXIS बँकेचे MDCEO म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक केली.
माझगाव डॉक्स ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये स्प्लीट केले. कंपनीने Rs २३.१९ अंतरिम लाभांश जाहीर केला ३० ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
MSTC Rs ३२० कोटींमध्ये फेरो SCRAP निगम विकणार आहे.
कॅपसिटी इन्फ्रा ला Rs १२०३ कोटींची ऑर्डर मिळाली.
J & K बँकेचे प्रॉफीट वाढले, GNPA वाढले, NNPA वाढले .
ITC चे PAT Rs ४९२७ कोटींवरून ३.१% ने YOY वाढून Rs ५०७८.३० कोटी झाले. रेव्हेन्यू १६.८ % ने वाढून Rs १६५५० कोटींवरून Rs १९३२७.८ कोटी झाला. मार्जिन ३६.५% वरून कमी होऊन ३२.८% झाले. कच्च्या मालाच्या ( कॉफी, कोका क्रूड) च्या किमती वाढल्या. उत्पादन खर्च २१% ने वाढला. इतर कंपन्यांचे ( डाबर, नेसले) कंपन्यांची प्रॉफीट कमी झाली.
सिगारेट ६ .७९% ने वाढले. हॉटेल्स १२.०१ % वाढले एग्री बिझिनेस ४७.०७ % वाढले, पेपर & PACKAGE २.१७% ने वाढले.
CIE ऑटोमोटिव्ह प्रॉफीट कमी झाले रेव्हेन्यू कमी झाला मार्जिन कमी झाले
ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस चे प्रॉफीट, रेव्हेन्यू, मार्जिन कमी झाले.
JSW एनर्जी प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
बिकाजी फुड्स प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला.
पतंजली फुड्स चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ८ लाभांश जाहीर केला.
पेट्रोनेट LNG चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढले कंपनीने Rs ७ इंटरिम लाभांश जाहीर केला.
डिकसन्सचे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झाले
युनायटेड ब्रुअरीज चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला.
CYIENT चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.कंपनीने Rs १२ इंटरिम लाभांश जाहीर केला. यासाठी 6 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
DCB चे प्रॉफीट वाढले, NII वाढले, GNPA ३.२९% तर NNPA १.१७% होते.
IEX प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन वाढले.
कॉरोमोन्डेल चे प्रॉफीट कमी झाले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
RADIKO खेतान चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढले.
RR KABEL चे प्रॉफीट कमी झाले रेव्हेन्यू वाढला मार्जिन कमी झाले.
ORACLE फायनान्स चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढले.
राणे ब्रेक्स चे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन वाढले.
एअरटेल आफ्रिका चे प्रॉफीट कमी झाले,उत्पन्न कमी झाले.
CHALET हॉटेल्सचा लॉस १३८.७१ कोटी झाला, रेव्हेन्यू वाढले, मार्जिन कमी झाले.
VST इंडस्ट्रीज चे प्रॉफीट कमी झाले, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झाले.
भारती एअरटेलने २४ लाख तर VI ने 18 लाख आणी जिओने ४० लाख ग्राहक गमावले.
ज्युबिलंट फार्मोवाचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
NIIT चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
GO FASHION चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
नोव्हार्टीस चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
एरीस लाईफसायन्सेस चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
TTK हेल्थकेअरचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले .
अरविंद स्मार्ट स्पेसेस चे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
ATUL LTD चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
कामत हॉटेल्सचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
BEL चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
HPCL चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
JM फायनांशियलचे प्रॉफीट वाढले, रेव्हेन्यू कमी झाला.
JSW स्टील चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन १३.७% होते. कंपनीने माइनिन्ग लीज सरेंडर संबंधीत Rs ३४२ कोटींचा वन टाईम लॉस बुक केला.
PSP प्रोजेक्ट चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन कमी झाले.
महिंद्र होलीडेजचे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
IDBI बँकेचे प्रॉफीट वाढले, NII वाढले, GNPA, NNPA कमी झाले.
पूनावाला फिनकॉर्प फायद्यातून तोट्यात गेली. NII वाढले.
ओरीएंट इलेक्ट्रिक चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
चोला इन्व्हेस्टमेंटचे प्रॉफीट वाढले उत्पन्न वाढले, GNPA आणी NNPA वाढले. AUM ( असेट अंडर MANAGEMENT) वाढले. डिसबर्समेंट वाढली.
BPCL चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
MOIL चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले.
बंधन बँकेचे प्रॉफीट वाढले, NII वाढले, GNPA आणी NNPA वाढले.
इंडिगो फायद्यातून तोट्यात गेली. YOY Rs १८६ कोटींच्या फायद्याचे रुपांतर YOY Rs 986 कोटीं लॉसमध्ये झाले.उत्पन्न YOY बेसिस वर वाढले पण QOQ कमी झाले. मार्जिन १६% वरून १४.३% झाले.
श्रीराम फायनान्सचे प्रॉफीट YOY वाढले NII YOY वाढले. कंपनीने Rs २२ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला ७ नोव्हेंबर रेकॉर्ड डेट निश्चित केली. AUM वाढले.
बॅंक ऑफ बरोडा चे NIई YOY वाढले. प्रॉफीट YOY वाढले. GNPA आणी NNPA QOQ कमी झाले. प्रोविजन QOQ वाढली.
आज PSE, मेटल्स, ऑटो, एनर्जी, बँकिंग मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. FMCG, फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९४०२ NSE निर्देशांक निफ्टी २४१८० बॅंक निफ्टी ५०७८७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २४ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७६.३७ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.0७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०४.२९ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२३ तर VIX १४.६५ च्या आसपास होते.
सोने Rs ७८००० तर चांदी Rs ९७५०० च्या आसपास होते. बेस मेटल्स झिंक, अल्युमिनियम तेजीत तर कॉपर,लेड मंदीत होती.
टेस्लाचे निकाल चांगले आले. SK हायनिक्स ही NVIDIA ला सप्लाय करते ह्या कंपनीचे निकाल चांगले आले.
FII ने Rs ५६८५ कोटींची विक्री तर DII ने Rs ६०४० कोटींची खरेदी केली.
HCL टेकबरोबरच्या कराराची मुदत न्यू साउथ वेल्स सरकारने वाढवली.
रेलटेलला गुजरात राज्य सरकारकडून CCTV VIDEO सर्व्हीलंस सिस्टीम साठी Rs १४४ कोटींची ऑर्डर मिळाली.
NLC इंडियाने RVUNL बरोबर दोन मोठे करार केले.
अशोक LEYLAND च्या सबसिडीअरीला चेन्नई MTC कडून ५०० EV बसेससाठी ऑर्डर मिळाली.
TVS मोटर्सने TVS RAIDER IGO launch केली.
भारताचा ऑक्टोबर २०२४ महिन्यासाठी मन्युफाक्चरिंग PMI ५७.४% ( ५६.५% ), सर्विस PMI ५७.९% (५७.७% ) आणी कॉम्पोझिट PMI ५८.६ % ( ५८.३%) होता.
TCS ने NVIDIA बिझिनेस युनिट launch केले.
त्रिवेणी एन्जिनीअरिन्ग ने उत्तरप्रदेश राज्यात मत्स्य ट्रिपल रिझर्व ब्लेंडेड व्हिस्की IMFL launch केली.
तसेच द क्राफ्टर्स STAMP केअर आरटीझन ब्लेंडेड व्हिस्की उत्तर प्रदेश राज्यांत launch केली. या दोन प्रोडक्ट्स द्वारे कंपनीचा इंडियन मेड फोरीन लिकर मार्केटमध्ये प्रवेश झाला.
सोनाटा SOFTWEAR ला FORTUNE 500 कंपनीकडून मल्टी इअर AI MANAGED सर्विसेस कॉनट्रक्ट मिळाले.
पिडीलाईट चे प्रॉफीट १७.८% वाढून Rs ५४० कोटी झाले रेव्हेन्यू ५.२% तर व्हॉल्युम 6% ने वाढले. बिर्ला SOFTचे प्रॉफीट १२.११ % ने कमी झाले. रेव्हेन्यू ४.४५% ने वाढला. कंपनीने Rs २.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
बिर्ला कॉर्प फायद्यातून तोट्यात गेली.कंपनीला Rs २५ कोटी तोटा झाला. रेव्हेन्यू कमी होऊन Rs १९७० कोटी झाला.
पिरामल फार्माचे प्रॉफीट Rs ५.०२ कोटींवरून २२.५९ कोटी झाले. रेव्हेन्यू १७.३% ने वाढून Rs २२४१ कोटी झाला.
USL चे निकाल कमजोर आले. पण आता आलेला सुट्ट्यांचा हंगाम, थंडी यामुळे सुधारणा होण्याची शक्यता आहे. पॉप्युलर सेगमेंटमध्ये व्हॉल्यूम ७.९% कमी झाले.
सोना कॉमस्टार ने एस्कॉर्टस कुबोटाचा रेल्वे संबंधीत व्यवसाय Rs १६०० कोटींमध्ये घेण्यासाठी करार केला. सोना कॉमस्टार कंपनीचे प्रॉफीट १५% ने वाढून Rs १४३ .५७ कोटी तर रेव्हेन्यू १७.१% ने वाढून Rs ९२२ कोटी झाला.
कोलगेट चे प्रॉफीट वाढून Rs ३९५ कोटी झाले ( Rs ३४० कोटी ), उत्पन्न Rs १४७१ कोटींवरून वाढून Rs १६१० कोटी झाले. मार्जिन ३२.८ वरून कमी होऊन ३०.७० होते.
उज्जीवन SFB चे प्रॉफीट Rs ३२७ कोटींवरून कमी होऊन Rs २३२ कोटी झाले. NII Rs ८४३ कोटींवरून वाढून Rs ९२३ कोटी झाले. ग्रॉस NPA २.५२% वर FLAT राहिले. नेट NPA 0.४१% वरून 0.५६ % झाले. प्रोविजन Rs 109 कोटींवरून वाढून Rs १५० कोटी झाली.
ACC चे प्रॉफीट कमी होऊन Rs २३४ कोटी झाले. उत्पन्न वाढून Rs ४६१० कोटी झाले.
रामकृष्ण फोर्जिंग चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
LT फुड्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
अदानी विल्मर तोट्यातून फायद्यात आली. Rs १३० कोटी तोट्याऐवजी Rs ३११ कोटी फायदा झाला. उत्पन्न वाढले. इतर उत्पन्न Rs ६४ कोटींवरून Rs १०५ कोटी झाले.
CSB बँकेचे प्रॉफीट ,उत्पन्न वाढले. ग्रॉस NPA आणी नेट NPA कमी झाले.
MAX चा तोटा वाढला, उत्पन्न कमी झाले.
अदानी टोटल चे प्रॉफीट, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
LAURAS LAB चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न FLAT राहिले, मार्जिन कमी झाले.
वेस्टलाईफचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
इंडस इंड बँकेचे प्रॉफीट Rs १३२५.५० कोटी, NII Rs ५३४७.३० कोटी झाले. ग्रॉस NPA QOQ २.०२ % वरून वाढून २.११% झाले. नेट NPA QOQ वाढून 0.६० % चे 0.६४% झाले. प्रोविजन QOQ वाढून Rs १०५० कोटींवरून Rs १८२० कोटी झाली.
गोदरेज कन्झ्युमर्सचा फायदा Rs ४३३ कोटींवरून वाढून Rs ४९४ कोटी झाला मार्जिन 19.५% वरून २०.७% झाले. उत्पन्न वाढून ३६०२ कोटींवरून Rs ३६६३ कोटी झाले. कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
कॅस्ट्रोलचा फायदा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
अफकॉन्स इन्फ्रा लिमिटेड चा Rs ५४३० कोटींचा ( यामध्ये Rs १२५० कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ४१८० कोटींचा OFS आहे.) IPO २५ ऑक्टोबर २०२४ रोजी ओपन होऊन २९ ऑक्टोबर २०९२४ ला बंद होईल. या IPO चा प्राईस बॅंड Rs ४४० ते Rs ४६३ असून मिनिमम लॉट ३२ शेअर्सचा आहे. शेअरची दर्शनी किमत Rs १० आहे. या शेअर्सचे लिस्टिंग ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अपेक्षित आहे.
ही १९५९ मध्ये स्थापन झालेली इन्फ्रास्ट्रक्चर, ENGG आणी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ही शापूरजी पालनजी ग्रुपची कंपनी आहे. कंपनीने १५ देशातून ७६ प्रोजेक्ट्स पूर्ण केल्या आहेत. ऑर्डर बुक Rs ३४८.८८ बिलीयन्सचे आहे. कंपनीचे ३०% उत्पन्न निर्यातीमधून येते. कंपनी (१) मरीन आणी औद्योगिक (२) सरफेस ट्रान्सपोर्ट (३) अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर (४) हायड्रो आणी अंडरग्राउंड (५) OIL & GAS प्रोजेक्ट्स. अशा ५ विभागांत कार्यरत आहे. कंपनीला FY २४ साठी PAT Rs ४४९.७६ कोटी आणी रेव्हेन्यू Rs १३६४६.८८ कोटी झाला. मार्जिन २.८५% होते. कंपनी IPO च्या प्रोसीडचा विनियोग बांधकाम मशिनरी खरेदीसाठी,कर्जफेड, दीर्घ मुदतीच्या वर्किंग कॅपिटलसाठी करेल.
मिडकॅप, स्मालकॅप, FMCG, रिअल्टी, ऑटो मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले. बँकिंग, PSE, फार्मा मध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८००६५ NSE निर्देशांक निफ्टी २४३९९ बॅंक निफ्टी ५१५३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७५.९० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८४.०७ च्या आसपास होते.
US $ निर्देशांक १०४.१३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२२ आणी VIX १४.९६ च्या आसपास होते. सोने Rs ७८६०० आणी चांदी Rs ९९६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स होती.
USA मार्केटमध्ये S & P ५०० ओळीने २ दिवस मंदीत होता. क्वार्टर पाउंडर बर्गर मध्ये सफेद कांदा वापरल्याने फूड पॉयझनिंग झाले असण्याची शक्यता असल्यामुळे स्टार बक्सचा शेअर पडला.
FII ची विक्री Rs ३९७९ कोटी DII ची खरेदी Rs ५८६९ कोटी होती.
ICICI प्रू चे APE Rs २५०४ कोटी झाले. व्हल्यू ऑफ न्यू बिझिनेस कमी झाला. VNB मार्जिन कमी झाले.
MAX फायनान्स APE 18% कमी झाले. VNB वाढला. VNB मार्जिन वाढले.
इंडस टॉवरचे प्रॉफीट, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले. टॉवर्सची संख्या २३०००० झाली.
कोफोर्ज ने केलेल्या सिग्निटीच्या अक्विझिशनचा चांगला फायदा झाला. मार्जिन १९० बेस पाईंट कमी झाले. US $ रेव्हेन्यू २६.९% ने वाढला. US $ ५१६ मिलियन्सच्या ऑर्डर्स आहेत
चेन्नई पेट्रो फायद्यातून तोट्यात गेली. Rs ११९५ कोटी प्रॉफीटच्या जागी Rs ६३३.७० कोटी तोटा झाला.
रेव्हेन्यू २७% ने कमी होऊन Rs १२०८६ कोटी झाला. मार्जिन १०.९% राहिले.
GMDC चे प्रॉफीट ७१.५% वाढून Rs १२८ कोटी झाले. रेव्हेन्यू ५५ % ने वाढून Rs ५९३ कोटी झाला मार्जिन १३.८% वरून २८.८% % झाले.
ओलेक्ट्रा चे प्रॉफीट Rs ४७.७ कोटी (Rs १८.६ कोटी ), रेव्हेन्यू ७०.५ % ने वाढून Rs ५२३.७० कोटी तर मार्जिन १३.२% वरून १५.५% झाले.
कॅनफिना होम्स चे NII ७.३% ने वाढून Rs ३३९.८० कोटी झाले. प्रॉफीट ३३.८% ने वाढून Rs २११.५० कोटी झाले. ग्रॉस NPA 0.९१% वरून 0.८८% झाले तर नेट NPA 0.४९% वरून 0.४७ % झाले. प्रोविजन ८१% ने कमी झाली.
अडाणी ग्रीन चे प्रॉफीट ३८.८% ने वाढले, रेव्हेन्यू २७.६ % ने वाढला, मार्जिन कमी झाले.
M & M फायनान्स चे NII वाढून Rs १९६३ कोटी तर नेट प्रॉफीट ५७.१% वाढून Rs ३६९.४७ कोटी झाले. ग्रॉस NPA ३.५६ % वरून वाढून ३.८३% झाले तर नेट NPA १.५९% वरून कमी होऊन १.४६% झाले. प्रोविजन ५७% ने वाढून Rs ७०३.५० कोटी झाली.
बजाज फायनान्सचे NII २२.८ %ने वाढून Rs ८८३७ कोटी झाले. कंपनीला वन टाईम गेन Rs २५४४ कोटींचा झाला. ग्रॉस NPA 0.८६% वरून १.०६ % झाले. नेट NPA 0.३८% वरून 0.४६% झाले. प्रोविजन ७७% ने वाढून Rs १९०९ कोटी झाली. NIM ९.९२% वरून ९.४५% झाले.
डोडला डेअरी चे प्रॉफीट, उत्पन्न आणी मार्जिन वाढले.
सरकारने पार बॉईल्ड तांदुळावरील एक्स्पोर्ट ड्युटी काढून टाकली. तसेच १% इन्सेनटीव्ह दिला. चांगल्या पावसामुळे तांदळाचे पिक चांगले येईल. इंडोनेशिया, बांगलादेश, मॉरीशस या देशांकडे निर्यात करण्यामधील अडचणी दूर झाल्या.
गोदरेज प्रॉपर्टीज चे प्रॉफीट Rs ६७ कोटीवरून Rs Rs ३३५ कोटी उत्पन्न Rs ३४३ कोटीवरून Rs १०९३ कोटी झाले. उत्पन्नामध्ये Rs १६९ कोटी च्या TAX राईट बॅक चा समावेश आहे. कंपनीचे बुकिंग ३% ने वाढून Rs ५१९८ कोटी झाले एरिया सेल्स ५१५ मिलियन SQFT झाले.
KPIT टेक ही कंपनी सिक्युरिटीज आणी QIP द्वारा Rs २८८० कोटी उभारणार आहे. कंपनीचे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
NPCI ने Paytm ला UPI युजर्सना ऑनलाईन बोर्ड करण्यासाठी परवानगी दिली.
युनायटेड ब्रुअरीजने सांगितले की इंडिया ऑर्गनिक बीअर व्हॉल्यूम मध्ये मिडसिंगल दिजीत ग्रोथ असेल.
बजाज फिनसर्व चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, NII वाढले. ग्रॉस WRITTEN प्रीमियम २३% ने वाढला.क्लेम रेशियो YOY वाढला.
IPA वर ड्युटी आकारल्याने दीपक फरटीलायझर मध्ये खरेदी झाली.
SBI लाईफ चे प्रॉफीट वाढले. NPI वाढले. APE वाढले. VNB आणी VNB मार्जिन कमी झाले.
हेरीटेज फुड्सचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
LLOYDS मेअल्स चे प्रोफितवाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
TVS मोटर्सचे STANDALONE प्रोफित, उत्पन्न वाढले मार्जिन ११.७% होते.
SYNGENEचे प्रॉफीट, उत्पन्न आणी मार्जिन कमी झाले.
AU स्माल फायनान्स बँकेचे प्रॉफीट वाढले, ग्रॉस NPA QOQ १.७८% वरून १.९८% आणी नेट NPA 0.६३% वरून 0.७८% झाले वाढले. NII वाढले.
कर्नाटक बँकेचे प्रॉफीट Rs ३३० कोटी वरून Rs ३३६ कोटी झाले. NII Rs ८२२ कोटीवरून Rs ८३३ कोटी झाले. नेट NPA १.६६% वरून १.४६% झाले. ग्रॉस NPA ३.५५% वरून ३.२१% झाले. प्रोविजन कव्हरेज रेशियो ८०.१४ झाला.
MAS फायनंशियल्सचे प्रॉफीट, NII वाढले
NMDCने त्यांच्या लंप्स Rs ६०० ने वाढवून Rs ६८५० आणी फाईन्स चे भाव Rs ४०० ने वाढवले.
गोदावरी बायोफ्युएल्स चा Rs ५५४.७५ कोटींचा ( यांत Rs ३२५ कोटींचा फ्रेश इशू आणी २२९.५४ कोटींचा OFS आहे ) IPO २३ ऑक्टोबर २०२४ ला ओपन होऊन २५ ऑक्टोबर २०२४ ला बंद होईल.
IPO चा प्राईस बॅंड Rs ३३४ ते Rs ३५२ असून मिनिमम लॉट ४२ शेअर्स चा आहे.
३० ऑक्टोबर ला या शेअरचे लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. ही कंपनी १८५६ मध्ये स्थापन झाली असून भारतातील सर्वात मोठी इथनोलचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी साखर, बायोबेस्ड केमिकल्स, वेगवेगळ्या प्रकारची इथनोल, आणी पॉवर चे उत्पादन करते. ही कंपनी १,३-BUTANEDIOL चे उत्पादन करते. बायो एथिल एसीटेट बनवणारी भारतातील एकमेव कंपनी आहे. कंपनीची उत्पादनक्षमता ५७०KLPD आहे कंपनीचे बागलकोट आणी अहमदनगर येथे प्लांट आहेत.
कंपनीची उत्पादने खाद्य उद्योग, पेय, औषधे, सुगंध आणी फ्लेवर्स, पॉवर आणी पर्सनल केअर उद्योगांत वापरली जातात.का कंपनीकडे 18 रजिस्टर पेटंट आहेत. कंपनीच्या ग्राहक लिस्ट मध्ये मोठ्या कंपन्या आहेत आणी कंपनी त्यांची उत्पादने निर्यात करते. सरकार धोरणाचा या कंपनीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. कंपनीला FY २४ साठी Rs १२.३० कोटी नफा आणी Rs १७०१.०६ उत्पन्न झाले होते.
आज मिडकॅप, स्माल कॅप, it क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर फार्म, ऑटो, एनर्जी मेटल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८००८१ NSE निर्देशांक निफ्टी २४४३५ बॅंक निफ्टी ५१२४१ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २२ ऑक्टोबर २०२४

.आज क्रूड US $ ७४.०८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८४.०७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.७५ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२० च्या आसपास होते. सोने Rs ७८२०० तर चांदी Rs ९८१०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.
USA मधील मार्केट मंदीत होते. कन्झ्युमर आणी होम बिल्डींग क्षेत्रातील शेअर्स पडले. USA ची अर्थव्यवस्था RESILIENT आहे त्यामुळे रेटकट करण्याचा वेग कमी होईल.
टेसला, कोकाकोला, GE. यांचे निकाल जाहीर होतील. बोईंगच्या शेअरमध्ये खरेदी झाली. स्पिरीट एअर लाईन्स चा शेअर क्रेडीट कार्ड प्रोसेसिंग अग्रीमेंट एक्स्टेंड केल्यामुळे वाढला.
FII ने Rs २२६२ कोटींची विक्री तर DII ने Rs ३२२६ कोटींची खरेदी केली.
बजाज हाउसिंग प्रॉफीट २१% ने वाढून Rs ५४५ कोटी झाले. रेव्हेन्यू २१.१% ने वाढून Rs २४१० कोटी झाला. डिसबर्सल्स YOY ११.५% ने कमी होऊन Rs १२०१४ कोटी झाले. NII १३% ने वाढून Rs ७१३ कोटी झाले. ग्रॉस NPA 0.२८ वरून 0.२९ तर नेट NPA 0.११ वरून 0.१२ झाले. प्रोविजन कमी होऊन ७३% झाली.
जन स्माल फायनान्स बँकेची डिसबर्समेंट ३.३% ने वाढली एडवान्सेस १८ .३% ने वाढले. प्रॉफीट ४० % ने वाढले. GNPA वाढले NET NPA कमी झाले.
महिंद्र लॉजीस्टिक्स चा तोटा कमी झाला. रेव्हेन्यू ११.४% ने वाढला. मार्जिन ३.९% वरून ४.४% झाले.
राजरतन वायर्सचे प्रॉफीट २.३% ने कमी झाले. रेव्हेन्यू १४.४% ने वाढला. मार्जिन वाढून १५.८% झाले
CYIENT चे प्रॉफीट ५.५% ने वाढले रेव्हेन्यू ३३.४% ने वाढला. मार्जिन ८.१% ने वाढले
सुप्रीम पेट्रो चे प्रॉफीट १५.८% ने वाढले रेव्हेन्यू १७.८% ने वाढला.
RVNL ने सौदी अरेबियामध्ये एक १००% ओन्ड सबसिडीअरी ‘रेल विकास निगम’ या नावाने स्थापन केली.
टाटा मोटर्सला UPSRTL कडून १००० टाटा ‘LPO १६१८’ साठी ऑर्डर मिळाली.
हुंडाई मोटर्स इंडिया चे BSE वर Rs १९३१ आणी NSE वर Rs १९३४ वर लिस्टिंग झाले. या शेअरमध्ये २८.७९ लाख शेअर्सचा लार्ज ट्रेड Rs ५५९ कोटींमध्ये झाला.
TRENT मध्ये ११.३४ लाख शेअर्सचा Rs ८४७ कोटींमध्ये लार्ज ट्रेड झाला.
NBCC ची सबसिडीअरी HSCC ला Rs १३२२ कोटींची ऑर्डर मिळाली.
अदानी एनर्जी सोल्युशन चे प्रॉफीट Rs २७४ कोटींवरून Rs ६७५ कोटी झाले.
उत्पन्न Rs ३६७४ कोटींवरून Rs ६१८४ कोटी झाले. मार्जिन ४५% वरून २९% झाले.
उत्पन्नामध्ये Rs १७६ कोटींच्या अन्य उत्पन्नाचा समावेश आहे.
MRF ‘क्लीन MAX ऑमनी ‘ मधील २६% स्टेक घेणार आहे. MRF ने या कंपनीबरोबर कॅप्टिव्ह पॉवर पर्चेस साठी करार केला.
रेनसन्स इंडस्ट्रीज ने BEE लाईटींग मधील १००% स्टेक घेतला.
Paytm तोट्यातून फायद्यात आली. Rs २९० कोटी तोट्याऐवजी या तिमाहीत Rs ९२८ कोटी फायदा झाला. कंपनीला Rs १३४५ कोटींचा वन टाईम गेन त्यांचा मुव्ही टिकेटींग बिझिनेस विकल्यामुळे झाला . कंपनीचे उत्पन्न Rs २५१९ कोटींवरून Rs १६०७ कोटी झाले.
अंबुजा सिमेंट Rs ३९५.४० प्रती शेअर या भावाने ओरीएंट सिमेंट मध्ये ४५.७% स्टेक घेणार आहे.
युनियन बँकेचे प्रॉफीट वाढले, NPA कमी झाले.
बजाज फिनसर्व ALLIANZ मधील JV मधून बाहेर पडणार. यात कंपनीची २६% स्टेक आहे.
वरून बेव्हरेजेस प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले.
ICICI सिक्युरिटीज चे प्रॉफीट Rs ४२३ कोटींवरून Rs ५२९ कोटी झाले.
उत्पन्न Rs १२४९ कोटीचे Rs १७०७ कोटी झाले. NII Rs १७३ कोटींवरून Rs २१४ कोटी झाले.
गुडइअर चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आले.
LTI माइंडट्रीने AI स्मार्ट UNDERWRITER सोल्युशन launch केले.
ज्युबिलंट इंग्रेवियाचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
कजारिया सेरामिक्स चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ५ अंतरिम लाभांश जाहीर केला.
माझगाव डॉक्स ने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले.
SRF चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
SRF इंदौर मध्ये BOPP-BOPE फिल्म युनिट Rs ४४५ कोटी गुंतवून सुरु करणार आहे.
झोमाटोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ८५० कोटींच्या QIP ला मंजुरी दिली.
झोमाटोचे प्रॉफीट Rs ३६ कोटींचे Rs १७६ कोटी झाले.
उत्पन्न Rs २८४८ कोटीवरून Rs ४७९९ कोटी झाले. मार्जिन ४.७% होते.
सुप्रीम इंडस्ट्रीज चे प्रॉफीट Rs २४३ कोटींवरून Rs २०६ कोटी झाले. उत्पन्न Rs २३०९ कोटींवरून Rs २२७३ कोटी झाले. मार्जिन १५.५ वरून १३.१% झाले. कंपनीने Rs १० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
श्रीराम फायनान्स मल्टीपल मुदतीचे बॉंड मार्केटमध्ये launch करणार आहे.
इंफोएज Rs ३२ कोटी ‘युनिट रेडस्टार्ट LAB’ मध्ये गुंतवणार आहे.
हरयाणामध्ये मानेसर येथे सोना BLW ने नवीन युनिट सुरु केले.
पर्सिस्टन्ट सिस्टिम्स चे US $ उत्पन्न ३२.८२ कोटींवरून US $ ३४.१५ कोटी झाले. कॉन्स्टन्ट करन्सी रेव्हेन्यू ५.1 होते . उत्पन्न Rs २७३७ कोटींवरून Rs २८९७ कोटी झाले. मार्जिन १४% व्फ्र FLAT राहिले.
आज PSE, रिअल्टी, मेटल्स, OIL & GAS, एनर्जी, इन्फ्रा, मिडकॅप, स्माल कॅप मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक ८०२२० NSE निर्देशांक निफ्टी २४४७२ बॅंक निफ्टी ५१२५७ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २१ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७३.४९ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.०७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०३.३१ USA १० वर्षे बॉन्ड यील्ड ४.०८ आणि VIX १३.८७ च्या आसपास होते.
सोने Rs ७८२०० आणी चांदी Rs ९८००० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
FII ने Rs ५४८६ कोटींची विक्री तर DII ने Rs ५२१५ कोटींची खरेदी केली.
JBM ऑटो २८ ऑक्टोबर रोजी शेअर्स स्प्लीटवर विचार करेल.
नेटवेबचे प्रॉफीट वाढले रेव्हेन्यू वाढला.
टेक महिंद्रा चे प्रॉफीट १५३% ने वाढून Rs १२५० कोटी झाले. या मध्ये Rs ४५०.२० कोटींचा वन टाईम गेन जो असेट विक्रीचा आहे त्याचा समावेश आहे. रेव्हेन्यू ३.५ % YOY वाढून Rs १३३१३ कोटी झाला.मार्जिन ११० बेस पाईंट वाढून ९.६% झाले. डील्स चे व्हल्यू US $ मिलियन ६०३.०० (US $ मिलियन्स ५३४) कंपनीने Rs १५ इंटरीम लाभांश जाहीर केला.यासाठी १ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीचा अट्रीशन रेट १०.६ % ( १० % होता.)
HDFC बॅंकेचा फायदा ५% ने वाढून Rs १६८२१ कोटी झाले. NII १०% ने वाढून Rs ३०११४ कोटी झाले. NIM ( नेट इंटरेस्ट मार्जिन) ३.४६% राहिले. इतर उत्पन्न Rs ११४८० कोटी ( Rs १०७१० कोटी ) झाले. डीपॉझीट YOY १५.१% तर एडवान्सेस ७% ने वाढले.
GNPA १.३६ ( १.३३ ) तर नेट NPA 0.४१% ( 0.३९% ) होते. प्रोविजन Rs २६०२ कोटींवरून Rs १७०१ कोटी केली.
कोटक महिंद्र बँकेचे प्रॉफीट ५% ने वाढून Rs ३३३४ कोटी झाले. NII ११% ने वाढून Rs ७०२० कोटी झाले. NIM ४.९१ % ( ५.२२% ) होते . ग्रॉस NPA १.३९% वरून १.४९ % झाले. नेट NPA 0.३७ वरून 0.४३ % झाले. CASA रेशियो ४३.६ होता . डीपॉझीट १६% तर एडवान्सेस १७% ने वाढले. कोटक महिंद्र बँकेने STANDARD CHARTERED बँकेचे Rs ४१०० कोटींचे पर्सनल लोन बुक खरेदी केले.
MCX तोट्यातून (१९.१० कोटी ) YOY फायद्यात आली. फायदा Rs १५३.६० कोटी झाला. रेव्हेन्यू YOY ७३% वाढून Rs २८५.६ कोटी ( Rs १६५.१० कोटी) मार्जिन ६२.८% झाले.
UCO बँकेचे नेट प्रॉफिट ५०% वाढून Rs ६०२.७० कोटी झाले ( Rs ४०१.७० कोटी ) झाले NII YOY २०% ने वाढून २३००.४० कोटी झाले. GNPA YOY ३.३२% वरून ३.१८% तर नेट NPA 0.७८ वरून 0.७३% झाले. एडवान्सेस १८.५६ % आणी डीपॉझीट १०.८४% वाढले.
RBL बँकेचे नेट प्रॉफीट २४.३% ने कमी होऊन Rs २२२.५२ कोटी झाले. GNPA ३.१२ % वरून YOY २.८८% झाले. NNPA 0.७८% वरून YOY 0.७९% झाले.
तेजस नेट वर्क्स तोट्यातून ( १२.६४ कोटी) YOY प्रॉफीट मध्ये आली. प्रॉफीट Rs २७५.१८ कोटी झाले. रेव्हेन्यू ७९.८९% वाढून Rs २८११ कोटी झाला.
दालमिया भारत चे प्रॉफीट Rs १२३ कोटींवरून Rs ४९ कोटी झाले. रेव्हेन्यू कमी होऊन Rs ३०८७ कोटी झाला.
इंडिया मार्ट चे प्रॉफीट वाढून Rs १४८ कोटी ( Rs ८० कोटी ) झाले. रेव्हेन्यू १७% ने वाढून Rs २९५ कोटींवरून Rs ३४८ कोटी झाला. सबस्क्रायबर ग्रोथ कमी झाली कलेक्शन कमी झाले. ग्रामीण भागांत मागणी वाढली पण शहरी आणी अर्ध शहरी भागांत कमी झाली. अतिवर्षा, पूर यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या.
CG पॉवर चे प्रॉफीट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ग्रेविटाचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
LLOYDS एन्जिनीअर्स चा रेव्हेन्यू YOY ७३% ने वाढून Rs १२२ कोटींवरून Rs २१२ कोटी झाला. प्रॉफीट ४७% ने वाढून Rs १९ कोटींवरून Rs २८ कोटी झाले.
रोसारी बायोटेक चा रेव्हेन्यू १% ने वाढून Rs ३३६ कोटी झाला प्रॉफीट ३% ने वाढून Rs २६ कोटींवरून Rs २७ कोटी झाले.
शेषशायी पेपरचा रेव्हेन्यू Rs ३६२ कोटींवरून Rs ३९८ कोटी तर प्रॉफीट ६३% ने कमी होऊन Rs ६९ कोटींवरून Rs २५ कोटी झाले.
हिंदुस्थान झिंक चा रेव्हेन्यू २१% ने वाढून Rs ६९७१ कोटींवरून Rs ८२५२ कोटी झाला. प्रॉफीट ३४% ने वाढून Rs १७२९ कोटींवरून Rs २३२७ कोटी झाले.
टाटा कन्झ्युमर प्रोडक्टस् रेव्हेन्यू १२% ने वाढून Rs ३७३४ कोटींवरून Rs ४२१४ कोटी झाले. प्रॉफीट Rs ३५९ कोटींवर FLAT राहिले.
ICICI लोम्बार्ड Rs ५२५१ कोटींवरून १७% ने वाढून Rs ६१४७ कोटी झाला. प्रॉफीट Rs ५७७ कोटींवरून २०% ने वाढून Rs ६९४ कोटी झाले. ICICI लोम्बार्ड ने Rs ५.५० इंटरिम लाभांश जाहीर केला.
PB फिनटेक च्या सबसिडीअरीला NBFC बिझिनेस करण्यासाठी RBI कडून मंजुरी मिळाली. अल्ट्राटेक सिमेंटचे प्रॉफीट Rs १२८१ कोटींवरून Rs ८२५ कोटी झाले. उत्पन्न Rs १६०१२ कोटींवरून Rs १५६३४ कोटी झाले. मार्जिन १५.९% वरून १२.९% झाले.
TVS मोटर्सने APACHE RTR 310 सिंगापूर मध्ये launch केली.
लाईफ आणी जनरल इन्शुरन्स वरील GST कमी करण्याची शिफारस GST कौन्सिलमध्ये केली आहे. सिनियर सिटीझन साठी, किंवा एका विशिष्ट रकमेपर्यंत GST कमी केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वराज इंजिन चे प्रॉफीट Rs ३८ कोटींवरून Rs ४५ कोटी झाले. उत्पन्न Rs ३८९ कोटींवरून Rs ४६४ कोटी झाले. मार्जिन १३.6% वरून कमी होऊन १३.४% झाले.
नेल्कोचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
सिटी युनियन बँकेचे प्रॉफीट Rs २८१ कोटींवरून Rs २८५ कोटी झाले. प्रोविजन कव्हरेज रेशियो ७५% होता. ग्रॉस NPA ३.८८ वरून ३.५४ झाले तर नेट NPA १.८७ वरून १.६२ झाले.
आज मिडकॅप, स्मालकॅप, रिअल्टी, मेटल्स, PSE, IT, FMCG, मध्ये प्रॉफीटबुकिंग झाले तर ऑटो क्षेत्रातील शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८११५१ NSE निर्देशांक निफ्टी २४७८१ बॅंक निफ्टी ५१९६२ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ ऑक्टोबर २०२४

आज क्रूड US $ ७४.६१ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.०७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०२.५० USA १० वर्षे बॉंड यील्ड ३.९७ आणी VIX १३.९२ होते. सोने Rs ७७५०० तर चांदी Rs ९२७०० च्या आसपास होती. बेस मेटल्स अल्युमिनियम, झिंक, लेड मध्ये तेजी होती.
USA मध्ये डॉव जोन्स रेकॉर्ड हायवर होता. सेमी कंडक्टरचीप उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. डीसक्रीशनरी स्पेन्डिंग वाढल्यामुळे रिटेल विक्री मध्ये वाढ झाली. ECB (युरोपीअन सेन्ट्रल बँक) ने त्यांच्या व्याजदरांत 0.२५% ची कपात केली. व्याज दर ३.६५% वरून ३.४० % केला. ECB ने फ्युचर गायडंस मात्र दिला नाही.
TSMC, नेटफ्लिक्स चे निकाल चांगले आले. जॉबलेस क्लेम २४१००० आले.
येन चा विनिमय दर US $१ = जापनीज येन १५० होता.
चीनची GDP ग्रोथ ४.६ % आली ( ४.७%) झाली. चीनमधील बँकांनी ठेवींवरील व्याज 0.२५% ने कमी केले. चीनचा इंडस्ट्रीयल आउटपूट ४.५% वरून ५.४% झाला. रिटेल विक्री ३.२% ( २.१ ) ने वाढली.
इस्रेल ने सांगितले की ते युध्दविराम करायला तयार आहेत.
चीनमधील शहरी बेरोजगारी ५.१(५.३) झाली.
FII ने Rs ७४२१ कोटींची विक्री आणी DII ने Rs ४९८० कोटींची खरेदी केली.
HYUNDAI चा IPO चा QIB पोर्शन ७ वेळा भरला. पण रिटेल कोटा मात्र ५०% भरला.
RBI ने ४ NBFC ना कर्ज देण्यावर बंदी घातली. त्यांत आशीर्वाद मायक्रो फायनान्स या मुथूट फायनान्स ग्रुपच्या कंपनीचा समावेश आहे.
माझगाव डॉक्स २२ ऑक्टोबर २०२४ रोजी शेअर्स स्प्लिट वर आणि लाभांश वर विचार करेल.
झोमाटो Rs ८५०० कोटींचा QIP करणार आहे.
ग्रनुअल्सच्या ‘BUPROPION HYDROCHLORIDE’ या डीप्रेशन डिसऑर्डर वरील औषधाला USFDA कडून ANDA अप्रुवल मिळाले.
अथेर इंडस्ट्रीजचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
अजमेर रिअल्टी Rs ७११ प्रती शेअर या भावाने Rs २२५ कोटींचे प्रेफरन्शियल शेअर्स जारी करणार आहे.
मूडीजने बजाज फायनान्सला BAA ३ रेटिंग दिले.
JSW एनर्जी महाराष्ट्र डिसकॉमला १२०० MW सोलर विंड/ विंड पॉवर सप्लाय करणार आहे.
TCS ने Rs १० प्रती शेअर इंटरिम लाभांश जाहीर केला. यासाठी 18 ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली.
एल्कॉन ENGG चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
श्रीराम फायनान्स शेअर्स स्प्लिट वर २५ ऑक्टोबर २०२४ रोजी विचार करेल.
हिंदुस्थान झिंक चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
GNA AXLE चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले.
सिमेन्स मोबिलिटी ला ५० लोकोमोटिव्ह इंजिनची ऑर्डर मिळाली.
झी एन्टरप्रायझेस चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले. पुनीत गोएंका यांची 31 डिसेंबर २०२९ पर्यंत CEO म्हणून केली.
आज मेटल्स ऑटो बँकिंग चे शेअर्स तेजीत होते. IT FMCG मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१२२४ NSE निर्देशांक निफ्टी २४८५४ बॅंक निफ्टी ५२०९४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७