आज क्रूड US $ ७३.२८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ ८४.४९ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०५.८७ तर USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२३ आणी VIX १४.९४ च्या आसपास होते. सोने Rs ७६३०० तर चांदी Rs ८९२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मध्ये कॉपर तेजीत होते.
रशिया आणी युक्रेन मधील ताणतणाव वाढला, एनर्जी ठिकाणांवर हल्ले केले. इझरेल आणी लेबानन मधील ६० दिवसांच्या सीझफायरचे उल्लंघन झाले.
कॅनडाच्या एन्टी ट्रस्ट रेग्युलेटर ने गुगल वर केस दाखल केली.
काही कंपन्यांचे प्राईस बॅंड बदलले. १० केले. या मध्ये LIC, Paytm, युनियन बॅंक, HCC, HUDKO इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.आता F & O सेक्टरमध्ये एकूण २२३ कंपन्यांच्या शेअर्सचे ट्रेडिंग होईल
FII ने Rs ११७५६ कोटींची विक्री तर DII ने Rs ८७१८ कोटींची खरेदी केली.
भारताच्या अर्थ मंत्रालयाने इन्शुरन्स सेक्टर विषयी एक प्रस्ताव तयार करून संबंधीत व्यक्ती/ संस्था यांच्या कडून त्यावर त्यांचे मत/ प्रस्ताव १० डिसेंबर पर्यंत मागवले आहेत.
(१) IRDAI या रेग्युलेटरी ऑथोरिटीला किमान कॅपिटल निश्चित करण्याचा अधिकार दिला जाईल.
(२) इन्शुरन्स सेक्टरमध्ये १००% FDI ऑटोमटिक रूटने आणण्याची मंजुरी. मात्र या कंपनीचे भारतात एक तरी ऑफिस असले पाहिजे.
(३ ) इन्शुरन्स कंपन्यांना एकापेक्षा अधिक प्रकारच्या इन्शुअरन्सच्या क्षेत्रांत काम करण्याची संधी दिली जाईल.
(४) विदेशी रिइन्शुरन्स कंपन्यांसाठी फंडासाठी किमान मर्यादा Rs ५००० कोटींवरून Rs १००० करणार.
या सुधारणा अमलांत आणण्यासाठी LIC ACT, इन्शुरन्स ACT आणी IRDAI ACT मध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
रिलायंस इंडस्ट्रीजने ‘WAVETECH HELIUM INCLUSIVE’ या USA मधील हेलियम GAS एक्स्प्लोरेशन आणी उत्पादन करणाऱ्या कंपनीबरोबर STOCK परचेस अग्रीमेंट केले.
PCBL च्या मुद्रा प्लांट मध्ये दुसरी आणी अंतिम फेज पूर्ण झाली.
गोल्डमन साक्स ने क्रेडीट एक्सिस ग्रामीणला डाऊन ग्रेड केले.
पुनीत गोएंका यांची डायरेक्टर पदी निवड करण्याचा ठराव शेअरहोल्डर्सच्या बैठकीत नाकारला गेला . आता त्यांच्या कुटुंबातला कोणताही सदस्य बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असणार नाही.
PC ज्वेलर्सच्या एका शेअर्सच्या १० शेअर्समध्ये स्प्लिट साठी १६ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
फाईन ओर्गनिकच्या बदलापूर प्लांटमध्ये पुन्हा कामकाज सुरु झाले. कंपनीला विमा कंपनीकडून अंशिक क्लेम मिळाला
NCC ला केन बेटवा लिंक प्रोजेक्ट साठी Rs ३३८९ कोटींची ऑर्डर मिळाली.
झायडस लाइफसायन्सेसला Rs १.६१ कोटींची GST साठी डिमांड नोटीस मिळाली.
एन्व्हायरो आज BSE वर Rs २१८ आणी NSE वर Rs २२० वर झाले. लिस्टिंग IPO मध्ये हा शेअर Rs १४८ ला दिला होता.
M &M आणी हुंडाई या कंपन्यांनी त्याना एमिशन साठी कोणतीही पेनल्टी लावण्यात आल्याचा इन्कार केला.
ITC ने GREENACRE होल्डिंग चा संपूर्ण स्टेक Rs ४२.१० कोटींना विकत घेतला.
अशोक बिल्डकॉन ला Rs १०८५ कोटींची ऑर्डर बंगलोर एअरपोर्ट कडून मिळाली.
GAIL ने ‘K LINE ‘ बरोबर LNG शिपसाठी दीर्घ मुदतीचा करार केला. २०२७ पासून ‘VESSEL ऑपरेशन’ सुरु होईल.
नजारा टेक ची सबसिडीअरीने ट्रिनीटी गेमिंग हा PLATFORM Rs २४ कोटींना खरेदी केला.
फार्मा, इन्फ्रा, एनर्जी, ऑटो, मेटल्स मध्ये खरेदी तर रिअल्टी, आणी PSU बँकानमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९८०२ NSE निर्देशांक निफ्टी २४१३१ बॅंक निफ्टी ५२०५५ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७
