Monthly Archives: December 2024

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.५६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८५.६० च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०८ तर USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५३ तर VIX १४.६० होते. सोने Rs ७६३०० तर चांदी Rs ८७२०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी नैसर्गिक GAS तेजीत होते.

चीनचा मन्युफाक्चरिंग PMI ५०.१ आला तर कॉम्पोझिट PMI ५२.२ आला.
USA मध्ये टेक्नोलॉजी आणी S & P शेअर्स खूप पडले.
FII ने Rs १८९३ कोटींची विक्री तर DII ने Rs २१७४ कोटींची खरेदी केली .
युनिस्पेस एक्स्प्रेस चे BSE वर Rs १४९१ वर तर NSE वर Rs १४६० वर लिस्टिंग झाले.
ITC ला NCLT ची ऑर्डर मिळाल्यापासून ६० दिवसाच्या आत ITC हॉटेल्सचे लिस्टिंग होईल. ITC आणी ITC हॉटेल ट्रेडमार्क एग्रीमेंट करतील. ITC हॉटेल्स ला पेरेंट कंपनीकडून Rs १५०० कोटी मिळतील.
इझी ट्रीप प्लानर्स चे प्रमोटर्स १४.२१% स्टेक Rs १५.६० प्रती शेंअर किमतीला विकणार आहेत. यातून त्यांना Rs ७८० कोटी मिळतील.
ल्युपिनने ‘एली लिली’ कडून ‘HUMINSULIN’ हे DIABTIC औषध अक्वायर केले.
माझगाव डॉक्स ला Rs १९९० कोटींचे AIP ( एअर इंडिपेंडट प्रॉपल्शन ) प्लग साठी ऑर्डर मिळाली. हिंदाल्को ला 12 MTPA क्षमता असलेली ओडीशातील मीनाक्षी कोल माईन मिळाली. या खाणीत २८५.२३ MT एवढा कोळशाचा साठा आहे.
प्रताप SNACKS च्या जम्मू प्लान्टमध्ये आग लागली.
RVNL ला Rs १३७.२ कोटींच्या सेन्ट्रल रेल्वे प्रोजेक्ट साठी लोएस्ट बिडर ठरली.
FLAIR राईटींग च्या सबसिडीअरीने आता स्टेशनरीचे उत्पादन आणी वाटप सुरु केले.
क्लीन सायन्सच्या आर्मने ‘२.५ DIHYDROY.१.४ DITHIANE’ चे कमर्शियल उत्पादन सुरु केले. प्रेस्टीजने WSI FALCON इन्फ्रा प्रोजेक्ट मधील ४९% स्टेक घेतला. आता ते चेन्नई मध्ये ६.५३ एकर जमिनीत IT पार्कचा प्रोजेक्ट उभारणार आहेत.
पॉवरग्रीडने Rs १८.४ कोटींना राजस्थान IVA पॉवर ट्रान्समिशन युनिट घेतले.
SBI लाईफ ‘बिना सुगम’ मधील १०% स्टेक Rs 6.6 कोटींना घेणार आहे.
श्रीराम प्रॉपर्टीजने ३.९ एकरचा प्लॉट Rs ९३ कोटींना विकला.
वक्रांगी फ्युचर जनरल इन्शुअरन्समध्ये भागीदारी घेणार आहे.
TVS मोटर्स आणी हुंदाई हे थ्री व्हीलर उत्पादनासाठी करार करणार आहे.
गोकुळ एग्रो रिसोर्ट ने मंगलोर एडीबल OIL रिफायनरी च्या Rs १०५.५ कोटींच्या असेट अक्वायर करणार आहे. यामुळे कंपनीची क्षमता १०० TPD वाढेल.
ज्युबिलंट इंग्रेव्हिया च्या ज्युबिलंट इन्फ्रा या आर्मने फोरम I एविएशन मधील ६.६७% स्टेक घेणार आहे. यानंतर त्यांचा एकूण स्टेक १५.७९% स्टेक होईल.
मेडप्लस चे ड्रग लायसेन्स सस्पेंड करण्यात आले.
CESC ला 300 MW साठी ऑर्डर मिळाली.
HUL ने आता थेट किराणा दुकानांना माल पुरवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कंपनीचा विश्वास आहे की डीलीव्हरीचा वेळ ३६ तासांवरून २४ तासांचा होईल. कंपनीचे डीस्ट्रीब्युटर्स आता जवळच्या किराणा दुकानांकडून ऑर्डर्स घेतील आणी पेमेंट घेतील. बाकीच्या सर्व लॉजिस्टिक्स कंपनी चे व्यवस्थापन सांभाळेल. यामुळे किराणा दुकानदारांचा फायदा हुईल.
KP ग्रीन एनर्जी ला Rs १६६ कोटींची ऑर्डर मिळाली.
वारी रिन्युएबल्स ला २ GW सोलर एनार्जीसाठी जिंदाल रिन्युएबल्स कडून ऑर्डर मिळाली.
इंडोटेक ट्रान्सफॉर्मर्स ला Rs ३२.३२ कोटीच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
अदानी एन्टरप्रायझेस अदानी विल्मर मधील त्यांचा पूर्ण स्टेक विकणार आहेत हे US $ २ बिलीयन्चे डील असेल. त्याच्या प्रोसीड्सचा उपयोग इन्फ्रास्त्रक्चर प्लाटफॉर्म मध्ये गुंतवणुकीसाठी करण्यात येईल.
सूर्य रोशनीच्या १:१ बोनस इशुसाठी १ जानेवारी २०२५ ही रिकॉर्ड डेट निश्चित केली आहे. सुझलॉन एनर्जी ला आयकर विभागाने केलेला Rs ८७.६ कोटींचा दंड रद्द केला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८१३९ NSE निर्देशांक निफ्टी २३६४४ बॅंक निफ्टी ५०८६० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.२२ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ ८५.५२ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०८.०४ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.६० तर VIX १४.३० च्या आसपास होते. सोने Rs ७६७०० तर चांदी Rs ८९१०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी कॉपर आणि अल्युमिनियम तेजीत होते आणि नैसर्गिक GAS तेजीत होते.

FII ने Rs १३२३ कोटींची विक्री तर DII ने Rs २५४५ कोटींची खरेदी केली.
IOL केमिकल्स ने त्यांच्या १ शेअरचे ५ शेअर्स मध्ये विभाजन केले.
JSW एनर्जीच्या आर्मने O2 पॉवर पुलिंग PTE, O2 पॉवर SG PTE आणी इतर व्यक्तिगत गुंतवणूक दारांबरोबर O2 पॉवर मल्टी होल्डिंग्स PTE आणी O2 एनर्जी SG PTE खरेदी करण्यासाठी US $ १.४७ बिलियन ( Rs १२४६८ कोटींचे) एग्रीमेंट केले.
ओला इलेक्ट्रिकच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर आणी चीफ टेक्नोलॉजी ऑफीसरने राजीनामा दिली.
CAMS च्या चीफ टेक्निकल ऑफिसरने राजीनामा दिला.
उत्कर्ष SFB ने NPA आणी रिटन ऑफ कर्ज विकण्यासाठी ARC बरोबर करार केला. ह्यात Rs ३५५ कोटींची मायक्रोफायनान्स लोन्स असून याची रिझर्व्ड प्राईस Rs ५२ कोटी ठेवली आहे.
इंडो फार्मा इक्विपमेंट या ट्रॅक्टर आणि पिक एंड कॅरी क्रेन्स बनवणार्या कंपनीचा एकूण Rs २६० कोटींचा ( यांत Rs १८५ कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ७५ कोटींचा OFS असेल.) IPO 31
डीसेम्बरला ओपन होऊन २ जानेवारी २०२५ ला बंद होईल. याचा प्राईस बॅंड Rs २०४ ते Rs २१५ असून मिनिमम लॉट ६९ शेअर्सचा आहे.
झायडस वेलनेसला सुरत GST ऑथोरिटी कडून Rs ५३.३३ कोटींची डिमांड नोटीस मिळाली.
रिलायंस पॉवर ला Rs ३७६० कोटीचे कर्ज PFc कडून मिळाले.
कोफोर्ज ने कॉग्निटी टेकबरोबर करार केला.
रिलायंस इंडस्ट्री च्या आर्मने KARINOS मध्ये १० कोटी शेअर्स आणी Rs ३६५ कोटींचे डिबेंचर्स घेतले.
प्रेस्टीज त्यांचा हॉस्पिटालीटी अंडरटेकिंग हा विभाग ट्रान्स्फर करणार आहे. या विभागाचे व्हल्यूएशन Rs ३१३ कोटी आहे.
MAX फायनंशियल MAX लाईफ बरोबरची सर्व कामे बंद करणार.
ग्रीन प्लायच्या बरोडाच्या प्लांटमध्ये उत्पादन सुरूर झाले.
गुजरात फ्लुओरो च्या भरूच च्या प्लांट मध्ये GAS लिकेजमुळे दुर्घटना घडली
VI ने Rs ११६४९ कोटींचे बाकी असलेल पेमेंट केले. सरकारने २०१२ ते २०२१ पर्यंत बॅंक GURANTEE ची अट रद्द केली.
सुप्रीम पॉवर इक्विपमेंट ला Rs ३.६३ कोटींची ऑर्डर मिळाली.
IL & F&S ENGG ला भुवनेश्वर मेट्रो प्रोजेक्ट साठी Rs ३०२.८२ कोटींची ऑर्डर मिळाली.
आज सेनोरेस फार्माचे BSE वर Rs ५९३.७० तर NSE वर Rs ६०० वर लिस्टिंग झाले.
CARRAO इंडियाचे BSE वर Rs ६६० तर NSE वर Rs ६५१ वे लिस्टिंग झाले.
VENTIVE हॉस्पिटलीटीचे BSE वर Rs ७१८.७५ वर लिस्टिंग झाले. तर NSE वर Rs ७१६ वर लिस्टिंग झाले.
AURION PRO ला दिल्ली मेट्रो रेल्वे कडून AFC तंत्रज्ञानासाठी ( ऑटोमेटेड FARE कलेक्शन ) साठी ऑर्डर मिळाली.
KEC इंटरनशनल ला KEC आशियन केबल मध्ये Rs ११९ कोटीची गुंतवणूक करायला मंजुरी.
KEC इंटरनेशनल ला Rs १०७३ कोटींची ऑर्डर T &D, सिविल ट्रान्सपोर्ट आणी केबल बिझिनेस साठी मिळाली.
आज FMCG, IT, फार्मा मध्ये खरेदी तर रिअल्टी, ऑटो, बँकिंग, मेटल्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८२४८ NSE निर्देशांक निफ्टी २३६४४ आणी बॅंक निफ्टी ५०९५२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७३.२६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८५.५० च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०८.१६ तर USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५८ आणी VIX १३.९३ च्या आसपास होते. सोने Rs ७६९०० तर चांदी Rs ८९५०० च्या आसपास होती. बेस मेटल्स मंदीत होती.

आज USA मार्केटमधील तिन्ही निर्देशांक मंदीत उघडले.
FII ने Rs २३७६.६७ कोटींची विक्री तर DII ने Rs ३३३६.१६ कोटींची खरेदी केली.
अल्ट्राटेक सिमेंटने स्टार सिमेंटमध्ये ८.७% इक्विटी स्टेक Rs २३५ प्रती शेअर या भावाने Rs ८७१ कोटींमध्ये खरेदी केला. यामुळे अल्ट्राटेक सिमेंटचा नॉर्थ इस्ट भारतात प्रवेश होईल.
RBL बँक दाम कॅपिटल मधील त्यांचा पूर्ण ८.१६% स्टेक विकणार आहे.
ज्युबिलंट फुड्स ने कोकाकोला बरोबर स्पार्कलिंग बिव्हरेजीस प्रोडक्ट्स खरेदी करण्यासाठी आणी मार्केटिंग करण्यासाठी करार केला.
आज दाम कॅपिटलचे ( IPO प्राईस Rs २८३ ) चे BSE वर ३९२.९० ला आणी NSE वर Rs ३९३ वर लिस्टिंग झाले.
ममता मशिनरीचे BSE आणी NSE वर Rs ६०० वर लिस्टिंग झाले. IPO प्राईस Rs २४३.
सनातन टेक्स्टाईल्स चे BSE वर Rs ४१९ तर NSE वर Rs ४२२.३० वर लिस्टिंग झाले.
ट्रान्सरेल लायटिंग चे BSE वर Rs ५८५.१५ आणी NSE वर Rs ५९० वर लिस्टिंग झाले. ( IPO प्राईस Rs ४३२.00)
कॉन्कॉर्ड एनवायर्नोचे BSE वर Rs ८०७ आणी NSE वर Rs ८२६ वर लिस्टिंग झाले.
NTPC च्या सबसिडीअरीने गुजरातमध्ये ३७.५ MW प्रोजेक्टमध्ये काम सुरु झाले.
NBCC ला Rs ३६९ कोटींची ऑर्डर मिळाली.
पॉवर मेक ला JP पॉवर कडून Rs १८६ कोटींची ऑर्डर मिळाली.
मनकाइंड फार्माने इनोव्हेंट बायालॉजिक्स बरोबर करार केला.
पारादीप फॉस्फेटच्या अमोनिया आणी युरिया प्लांटमध्ये पुन्हा उत्पादन सुरु झाले. ह्या प्लांटमधील उत्पादन १ डिसेंबर २०२४ पासून बंद होते.
ALLCARGO चे LCL व्हॉल्यूम YOY १% वाढले पण MOM ४% कमी झाले. FCL व्हॉल्यूम YOY ९% वाढले पण MOM 6% कमी झाले.
चोइस इंटरनशनलला म्युच्युअल फंड सुरु करायला SEBI कडूनपरवानगी मिळाली. कंपनी AMC आणी ट्रस्ट कंपनी सुरु करणार आहे.
चीनचे GDP ग्रोथ अनुमान वर्ल्ड बँकेने ४.८% वरून ४.९% केले.
NHPC २५० MW चे ५ प्लांट लावणार आहे. (मे २०२५ ते २०२६ दरम्यान )
लेमन ट्री हॉटेल्सने वसई मध्ये ७६ खोल्यांच्या हॉटेल्स साठी एग्रीमेंट केले.
डिक्सन च्या सबसिडीअरीने ‘CELLECOR GADGET’ बरोर रेफ्रिजरेटर आणी त्यांच्या कॉम्पोनन्टच्या उत्पादनासाठी करार केला.
इंडसइंड बॅंक Rs १५७३ कोटींची MFI लोन्स विकणार आहे.
गुजरात फ्लोरो त्यांचा ५७ MW कॅप्टिव पॉवर प्लांट Rs 200 कोटींना स्लंप सेल बेसिस वर IGREL महिदाद ला विकणार आहे.
NTPC रिन्युएबल एनर्जी कडून GENSOL ला Rs ८९७.४७ कोटींचे EPC कॉनट्रकट मिळाले.
आरती फार्माच्या प्रमोटर्सनी १० लाख शेअर्स Rs ५७५ प्रती शेअर भावाने ABAKKUS ला विकले. त्यातून प्रमोटर्सना Rs ६१.५ कोटी मिळाले.
NTPC च्या सबसिडीअरीने गुजरातमध्ये ३७.५ MW प्रोजेक्ट चे काम सुरु केले.
कोची शिपयार्ड ला ८ ‘७० बोलार्ड पूल & ASD TUGS’ साठी Rs २५० कोटी ते Rs ५०० कोटींच्या दरम्यान ऑर्डर मिळाली.
हिरो मोटो कॉर्पने हारले डेविडसन बरोबर प्रोडक्ट पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी केलेल्या कराराची मुदत वाढवली. कंपनी हार्ले डेविडसन च्या X ४४० या मॉडेल्स ची नवीन व्हरायटी बनवणार.
हिंदाल्कोला जबलपूर GST कमिशनर कडून Rs ३० कोटींची नोटीस मिळाली.
हिंदाल्कोला मीनाक्षी कोल माईन मंजूर झाली.
अदानी पोर्ट कडून कोची शिप्यार्द्ला Rs ४५० कोटींची ऑर्डर मिळाली.
EFC या कंपनीने १:१ बोनस जाहीर केला.
फार्मा आणी ऑटो मध्ये खरेदी तर PSE, मेटल्स, OIL & GAS रिअल्टी, एनर्जी, इन्फ्रा या क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८६९९ NSE निर्देशांक निफ्टी २३८१३ आणी बॅंक निफ्टी ५१३११ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २६ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७३.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १ = Rs ८५.२७ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०८.१६ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.६१ VIX १४.०० च्या आसपास होते. सोने Rs ७६६०० आणी चांदी Rs ८९५०० च्या आणी VIX १४ .०० च्या आसपास होते. बेस मेटल्स मध्ये तेजी होती.

US मार्केट्स मध्ये टेसला अमेझॉन, मेटा, हे तेजीत होते. NVIDIA चा शेअर यावर्षी चांगला चालला. या शेअरमध्ये जास्त इन्फ्लो आला.
FII ने Rs २४५४ कोटींची विक्री तर DII ने Rs २८१९ कोटींची खरेदी केली.
आज डिसेंबर २०२४ च्या सिरीजचा शेवटचा दिवस आहे.
सिईगल इंडिया च्या आर्मने NHAI बरोबर Rs ९८१ कोटीसाठी कन्सेशन एग्रीमेंट केले.
रामकी इन्फ्रा ला हैदराबाद मेत्रोपोलीटन वाटर सप्लाय आणी स्युवरेज बोर्डाकडून Rs २१५.०८ कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
अपोलो हॉस्पिटल च्या आर्म अपोलो हेल्थको सर्चलाईट हेल्थ कडून Rs ६७.५ कोटींना सोफ्टवेअर बिझिनेस घेणार आहे.
PANACEA बायोटेकला Rs १२७ कोटींचे ‘ BIVALENT ओरल पोलिओ व्हक्सीन २०२५ मध्ये सप्लाय करण्यासाठी LOA मिळाले. २०२५ मध्ये ११५ मिलियन डोसेस सप्लाय करायचे आहेत.
भारत फोर्ज युरो ३६ मिलियनची भारत फोर्ज global होल्डिंग GMBH मध्ये गुंतवणूक करणार आहे.
BPCL ही १५० MW ISTS कनेक्टेड सोलर PV या Rs ७५६.८५ कोटींच्या सोलर पॉवर PV प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर झाली. यातून वर्षाला १०० कोटींचा रेचेन्यू अपेक्षित आहे.
नाल्को ने उत्कल D आणी उत्कल E साठी चे उत्पादन ४ MTPA करण्यासाठी माइनिन्ग लीजवर सह्या केला. ही लीज डीड २१ एप्रिल २०५१ पर्यंत VALID आहे.
वेलस्पन कॉर्प ला Rs 130 कोटींच्या ऑर्डर्स सौदी अरेबियाकडून मिळाल्या.
ओला इलेक्ट्रिकने ४००० चार्जिंग टच पाईंट चालू केले. कंपनीने ३२०० स्टोर्स उघडली.
ग्लांड फार्मा च्या कोनेक्सी प्लांट च्या ९ ते १९ डिसेंबर २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत १० त्रुटी दाखवल्या.
QUESS कॉर्पला पाठवलेली Rs १८० कोटींची TAX डिमांड आणी पेनल्टी कर्नाटक हायकोर्टाने रद्दबातल ठरवली.
ACME सोलर होलडिंगला 300 MW सोलर प्रोजेक्टसाठी Rs १९८५ कोटींची ऑर्डर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कडून मिळाली.
रेडटेप ने १ शेअरला ३ शेअर बोनस आणी Rs २ अंतिम लाभांश जाहीर केला.
Vantage नॉलेज ७ जानेवारी २०२५ रोजी बोनस शेअर्स आणी लाभांशावर विचार करेल.
जानेवारी सिरीज साठी F & O सेग्मेंट मध्ये खालीलप्रमाणे रोल ओव्हर झाले.
युनायटेड स्पिरीट,CROMPTON, वोल्तास, IDFC १st ९२%, DELHIVERY ९१% JSW एनर्जी ९३%, इंडियन हॉटेल्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, AU SFB ९०% HDFC बॅंक ८९%, कॉफोर्ज ८८%, BSE ८५%, L & T, ABB ८३%. ONGC, M & M ८१%, इन्फोसिस ७९%, बजाज ऑटो ७८% ,ITC ७४%, सिमेन्स ६८% TCS ६३%
ऑटो, PSE, फार्मा मध्ये खरेदी झाली तर FMCG, मेटल्स, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८४७२ NSE निर्देशांक निफ्टी २३७५० बॅंक निफ्टी ५११७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०२४

.आज क्रूड US $ ७२.९० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८५.१८ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०७.८९ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५९ आणी VIX १३.१७ च्या आसपास होते.

सोने Rs ७६३०० आणी चांदी Rs ८९४०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक, कॉपर आणी नैसर्गिक वायू मध्ये तेजी होती. USA मध्ये होंडा मध्ये १२% ‍ झेरोक्स मध्ये १२% मध्ये तेजी होती कन्झ्युमर कॉन्फिडन्स निर्देशांक ११३ वरून १०४.७ झाला. होंडा आणी निसान यांचे मर्जर महत्वाचे आहे.
FII ने Rs १६९ कोटींची विक्री आणी DII ने Rs २२२८ कोटींची खरेदी केली.
भारत फोर्ज त्यांच्या भारत फोर्ज अमेरिका या आर्म मध्ये US $ ६४.५ मिलियन्स ची गुंतवणूक करणार आहे.
सिम्फनी AV बरोबर सिम्फनी ने लोन एग्रीमेंट संबंधात ADDENDUM केले.
IIFL कॅपिटल सर्विसेस या कंपनीच्या ‘LIVE LONG’ ला IRDAI कडून कॉर्पोरेट एजंट लायसेन्स मिळाले.
व्रज आयर्न एंड स्टील ने बिलासपुर जिल्ह्यात स्पॉंज आयर्न प्लांट मध्ये कमर्शियल ओपारेशांस सुरु केली.
बन्सल वायरने ‘HOSE वायर’ हे नवीन प्रोडक्ट launch केले.
HG इन्फ्राने विद्युत व्यापार निगम बरोबर १८५ MW साठी बॅटरी एनर्जी स्टोअरेज परचेस एग्रीमेंट केले.
ग्रीव्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी ने Rs १००० कोटींच्या IPO साठी DRHP फाईल केले.
सिम्फनीने १७ नवीन एअरकुलर मोडेल्स launch केली. एडवांस कलेक्शन AC साठी कमाल स्तरावर होते.
ओबेरॉय रिअल्टी ने अलिबागमध्ये ८१.५ एकर जमीन घेतली.
टाटा कॅपिटल IPO द्वारा Rs १५००० कोटी उभारणार आहे.
बायोकॉनला VICTOZAसंबंधीत डीसेंट्रलाइज प्रोसीजऱ साठी मंजुरी मिळाली.
BPCL ला आंध्र प्रदेशांत ग्रीन फिल्ड रिफायनरी आणी पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्स सुरु करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी. या प्रोजेक्टमध्ये कंपनी Rs ६१०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
गल्फ ऑईल ने प्रीमियम ऑटोमोटिव्ह ल्युब्रीकंट साठी ‘न्यास एनर्जी’ बरोबर करार केला.
होंडाने १.१ ट्रीलीयन येनचा बायबॅक जाहीर केला.
TEAM LEASE ने TSR DARASAW HR सर्विसेस आणी क्रिस्टल HR या दोन कंपन्या खरेदी केल्या. त्यामुळे टीम लीज ला ४०० नवीन ग्राहक मिळतील. टीम लीज कर्मचाऱ्यांच्या भरती पासून ते त्यांच्या निवृत्ती आणी पैशाच्या फायनल सेटलमेंट पर्यंत काम बघते. यामध्ये पेरोल, रीईम्बर्समेंटचे तसेच पूर्ण आणी अंतिम सेटलमेंट चे काम करते.
MTNL त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी VRS आणत आहे.
आज IT आणी FMCG मध्ये मामुली खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८४७२ NSE निर्देशांक निफ्टी २३७२७ बॅंक निफ्टी ५१२३३ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७३.१६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८५.०८ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक १०७.९३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५३ आणी VIX १४.५६ होते. सोने Rs ७६५०० तर चांदी Rs ८९१०० च्या आसपास होते.

शुक्रवारी USA मध्ये रिलीफ RALLY होती. PCE (पर्सनल कन्झम्प्शन एक्स्पेंडिचर) २.४% होता DEBT सेलिंग कॅन्सल झाले.
L & T टेकने सिमेन्स बरोबर टेक्निकल कोलाबोरेशन साठी केलेल्या कराराची मुदत वाढवली.
GMM फौड्लर पोलंड मध्ये मन्युफक्चरिंग युनिट सुरु करणार आहे.
L & T ला Rs ५००० कोटी ते Rs १०००० कोटींच्या दरम्यान संरक्षण मंत्रालयाकडून ऑर्डर मिळाली. जिओने Rs ३७ लाख ग्राहक गमावले, VI ने ७ लाख ग्राहक गमावले. तर भारती एअरटेल ने २७ लाख ग्राहक जोडले आणी BSNL ने ५ लाख ग्राहक जोडले .
DGTR ( डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड रेमिडीज ) ने अलोय आणी नॉनअलोय मेटल्स वर ४ वर्षांसाठी सेफ गार्ड ड्युटी लावण्याची शिफारस केली आहे. कारण सतत स्टील आणी आयर्न ओअरची आयात वाढत आहे.
FII सेलिंग, रुपयाची घसरण, मजबूत US $, वाढणारे बॉंड यील्ड, आणी जानेवारीत सुरु होणारे तिसऱ्या तिमाहीचे निकाल या सर्व कारणांमुळे मार्केट मध्ये घसरण सुरु आहे.
या आठवड्यात सुट्टी असल्याने आणी एक्सपायरी असल्याने मार्केटमध्ये voltality राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
FII ने Rs ३५९८ कोटींची विक्री तर DII ने Rs १३७४ कोटींची खरेदी केली.
अल्ट्राटेक सिमेंट ‘इंडिया सिमेंट’ चे १०.१३ कोटी शेअर्स घेणार आणी ८.०५ कोटी शेअर्स साठी (२६% इक्विटी ) साठी Rs ३९० प्रती शेअर या दराने ओपन ऑफर आणणार आहे. CCI ने या व्यवहारासाठी मंजुरी दिली.
पिरामल Rs २००० कोटींचा QIP आणत आहे.
फोर्टिस हेल्थकेअरने AGILUS डायग्नोस्टिक्स मधील ७.६१% स्टेक Rs ४२९.३७ कोटींना खरेदी केला.
इंडस इंड बँकेला RBI ने Rs २७.३० लाख दंड केला.
NTPC ग्रीनने बिहार राज्य सरकार बरोबर रिन्युएबल एनर्जी साठी करार केला.
ऑरोबिंदो च्या सबसिडी अरीला BEVQOLVA साठी UK कडून मार्केटिंग साठी अधिकार मिळाले. हे कॅन्सर साठी उपयोगी औषध आहे.
मन्नापुरम फायनान्स ला RBI ने Rs २० लाख दंड केला.
वेदांताने सांगितले की त्याच्या डीमर्जर योजनेत काही बदल केला जाण्याची शक्यता आहे.
रिलायंस इंडस्ट्रीचा रिलायंस डिजिटल हेल्थ हा आर्म USA बेस्ड हेल्थ अलायन्स ग्रुपमध्ये ४५% स्टेक US १०मिलियन्स ला घेणार आहे.
५५ वी GST कौन्सिल ची मीटिंग पार पडली त्यामध्ये सेकंड HAND EV च्या विक्रीवर येणाऱ्या मार्जिन व्हल्यू वर 18% GST लागेल. विम्यावरील GST विषयी निर्णय झाला नाही. शुगर कोटेड पॉप कॉर्नवर 18% GST लावणार.
डोमेस्टिक एअर पॅसेंजर ट्राफिक ११.९% ने वाढून १.४२ कोटी झाली. इंडिगोचा मार्केट शेअर ६३.३०% वरून ६३.६० % झाला तर स्पाईस जेट चा मार्केट शेअर २.४% वरून ३.१% झाला.
आज बँकिंग, रिअल्टी, FMCG, मेटल्स मध्ये खरेदी झाली तर ऑटो आणी फार्मा सेक्टरमध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८५४० NSE निर्देशांक निफ्टी २३७५३ आणी बॅंक निफ्टी ५१३१७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २० डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७२.४६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८५.०३ च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०८.१७ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५६ आणी VIX १५.५० च्या आसपास होते. सोने Rs ७५८०० तर चांदी Rs ८७२०० च्या आसपास होते. बेस मेटल्सपैकी झिंक अल्युमिनियम आणी नैसर्गिक GAS तेजीत होते.
US $ ची मजबुती, बॉंड यील्ड मधील वाढ त्यामुळे कमजोर रुपया , जानेवारीमध्ये तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमजोर येतील अशी शक्यता वाटत असल्यामुळे मार्केट पडत आहेत. यामध्ये फार्मा आणी IT क्षेत्र थोडाफार आधार देतील.
एक्स्चेन्चरचे निकाल चांगले आले त्यांनी फ्युचर गायडंस वाढवला. सेन्सेक्स मध्ये झोमाटो आणी JSW स्टील चा समावेश करण्यात येईल
GAIL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने गुजरात INTERNATIONAL फायनान्स सेंटरमध्ये आर्म ओपन करायला मंजुरी दिली.
स्पाईस जेट चे पार्टनर्स ‘STANDARD AERO’ ने ७३७-८ MAX एअरक्राफ्ट सर्विस साठी करार केला.
इंडिगो ने इंडिगो IFSC या सबसिडीअरीला एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी इंडिगो ने US $ ४३ मिलियन्स चे कॉर्पोरेट कर्ज मंजूर केले.
रिलायंस इंडस्ट्रीज ने वेनेझ्युएला च्या PDVSA यांच्या बरोबरचा स्वाप करार रिन्यू केला. हे एग्रीमेंट USA ने वेनिझ्यूएला वर USA ने घातलेल्या निर्बंधांमुळे स्थगीत केले होते.
सिमेन्सने सांगितले की डिजिटल इंडस्ट्री मध्ये सप्लायचेन मध्ये येणाऱ्या अडचणींची समीक्षा करणार आहे. कंपनी LCC टेक्नोलॉजी साठी बोली लावणार नाही. खाजगी गुंतवणूकीमध्ये वाढ होत नाही. कंपनी VSC टेंडर्स मध्ये भाग घेऊ शकेल. प्रोडक्ट प्रेशर आणी वाढती कॉस्ट यामुळे मार्जिन वर परिणाम होत आहे.
JSW इन्फ्रा २०३० पर्यंत ४०० MT करणार आहे. येत्या ५-६ वर्षांत कंपनी Rs ३०००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट मध्ये 130 MT उत्पादन करणार आहे. बहुतेक बंदरांचे कनसॉलीडेशन झाले आहे.
इंटरनशनल GEMMO चे BSE वर ५०४.८५ आणी NSE वर Rs 510 वर लिस्टिंग झाले.
BASFला एग्रिकल्चर सोल्युशन्स बिझिनेस ला डीमर्ज करायला मंजुरी दिली.
भारती मोबिलिटी ग्लोबल सोल्युशन्स EXPO मध्ये मारुती ‘मारुती e-वितारा’ ही नवीन PV launch करेल.
टाटा पॉवर ने PM सूर्यघर योजने अंतर्गत कॅनरा बँकेबरोबर करार केला.
ATF, वाउचर्स, क्रेडीट कार्डला GST कक्षेमध्ये लागू करण्यात येण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यात येत आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये अतिरिक्त पावसामुळे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. भारतात साखरेचे उत्पादन ३२० लाख टन होण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च Rs ४१.६६ येत आहे. सरकार निर्यातीला परवानगी देण्यावर विचार करत आहे.
सरकार आता परदेशातून येणारे फ्राड आणी स्पूफ कॉल्स, अन्वान्टेड कॉल्स आणी सर्व टेलिकॉम सेवा संबंधीत सर्व तक्रारी रजिस्टर करण्यासाठी एक प्लाटफॉर्म launch करणार आहे.
EXIDE आणी अमरराजा यांनी हुंडाईबरोबर EV बॅटरी सेल साठी करार केला.
ऑटो, एनर्जी, इन्फ्रा, मेटल, ऑईल & gas, बँकिंग FMCG, फार्मा क्षेत्रामध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७८०४१ NSE निर्देशांक निफ्टी २३५८७ बॅंक निफ्टी ५०७५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७२.७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८५.०६ च्या आसपास होता. US $ निर्देशांक १०८.०८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.५२ आणी VIX १४.५१ च्या आसपास होते. सोने Rs ७५९०० आणी चांदी Rs ८८७०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक,कॉपर मंदीत होते.
USA फेडने त्यांच्या व्याजाच्या दरांत 0.२५% कपात केली. आता व्याजाचे दर ४.२५% -४.५०% असतील. डॉव जोन्स ११०० पाईंट मंदीत तर S & P आणी NASDAQ अनुक्रमे २% आणी ३% मंदीत होती.
फेडने सांगितले की आता मॉनेटरी इझिंगची सायकल स्लो होईल असे सुचवले. २०२५ मध्ये चार ऐवजी फक्त दोन रेट कट होईल असे सांगितले. जेरोम पॉवेल यांनी सांगितले की या पुढील रेट कटचे टायमिंग आणी प्रमाण त्या त्या वेळच्या येणाऱ्या डेटावर अवलंबून राहील.
बॅंक ऑफ जपानने त्यांचे व्याजाचे दर कायम ठेवले.
स्पाईसजेट ने GENESIS बरोबर १.६० कोटींच्या संबंधात सेटलमेंट केली. आता GENESIS Rs १०० प्रती दराने स्पाईस जेटचे ४० लाख शेअर्स घेईल
७ एग्री वायद्यांवरील बंदी ३१ /०१ /२०२५पर्यंत वाढवली.
झायडस लाईफच्या LIDOCAINE आणी PRILOCAINE या औषधांना USFDA ची मंजुरी मिळाली. टाटा मोटर्सला बंगलोर मेट्रोपोलीटन कौन्सिल कडून १४८ EV बसेस ची ऑर्डर मिळाली.
JK सिमेंटने MP मधील मोहन कोल माईन्ससाठी बोली जिंकली.
भारती एअरटेलने स्पेक्ट्रम संबंधात असलेल्या Rs ३६२६ कोटींचे पेमेंट केले.
ACME सोलर ने राजस्थान मध्ये १०२३ MW क्षमतेचा सोलर पॉवर प्रोजेक्ट कमिशन केला.
NTPC ग्रीनने गुजरात मध्ये 150 MW सोलर प्रोजेक्ट पैकी 30MW क्षमता सुरु केली.
ग्लेनमार्क फार्माने ‘O2 रिन्युएबल एनर्जी XXIV’ मध्ये ३४% स्टेक खरेदी केला.
आज फार्मा मध्ये खरेदी तर IT, बँकिंग, मेटल्स, रिअल्टी, PSE फायनान्स क्षेत्रातील शेअर्स मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९२१८ NSE निर्देशांक निफ्टी २३९५२ आणी बॅंक निफ्टी ५१५७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७३.२५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८४.९२ च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०६.८८ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.३८ आणी VIX १४.८८ च्या आसपास होते. सोने Rs ७६८०० आणी चांदी Rs ९०६०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक आणी कॉपर मंदीत होते.

आज रात्री उशिरा फेड त्यांचे रेट कट विषयी धोरण जाहीर करेल. मार्केटचा असा अंदाज आहे की फेड 0.२५% रेट कट करेल.
FII ने Rs ६४१० कोटींची विक्री तर DII ने Rs २७०७ कोटींची खरेदी केली.
ऑरोबिंदो फार्माच्या सबसिडीअरीच्या API युनिटच्या डिसेंबर २०२४ ते डिसेंबर १७ २०२४ दरम्यान केलेल्या तपासणीत US FDA ने २ त्रुटी दाखवल्या.
JSW एनर्जी आणी कोरियाच्या LG एनर्जी सोल्युशन्स यांच्या मध्ये Rs १५० कोटींची गुंतवणूक करून EV आणी एनर्जी स्टोअरेज साठी १० GWH क्षमतेचा बॅटरी उत्पादन करणारा प्लांट उभारण्याबाबत बोलणी चालू आहेत.
अंबुजा सिमेंटच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने संघी इंडस्ट्रीज, पेन्ना इंडस्ट्रीज यांच्या कंपनीत मर्जरला मंजुरी दिली. सर्व कायदेशीर आणी रेग्युलेटरी प्रक्रिया केल्यावर हे मर्जर पूर्ण होईल.
EXIDE इंडस्ट्रीज ने त्यांच्या EXIDE एनर्जी सोल्युशन्स मध्ये आणखी Rs १०० कोटींची गुंतवणूक केली. आता एकूण गुंतवणूक Rs ३१५२.२४ कोटी झाली.
आदित्य बिर्ला रिअल इस्टेट ने मुंबई मध्ये बोईसर येथे ७०.९२ एकर जमीन Rs १०४.३० कोटींना खरेदी केली.
RBI ने एडलवाईझ ARC आणी ECL फायनान्स वरील फायनंशियल असेट विकत घेण्यावर ची बंदी उठवली..
वा टेक वा बाग ला सौदी अरेबियाकडून मिळालेली डीसलीनेशनची Rs २७०० कोटींची ऑर्डर रद्द झाली.
विशाल मेगा मार्टचे BSE वर ११० वर तर NSE वर Rs १०४ वर लिस्टिंग झाले. IPO प्राईस Rs ७८
साई लाईफ सायन्सेसचे Rs ६६० वर BSE वर तर NSE वर Rs ६५० ला लिस्टिंग झाले. IPO प्राईस Rs ५४९.
मोबिक्विकचे BSE वर Rs ४४२.२५ वर तर NSE वर Rs ४४०.वर लिस्टिंग झाले.IPO प्राईस Rs २७९
सरकार NATIONAL क्रिटीकल मिनरल्स मिशन ६ वर्षांसाठी जाहीर करणार आहे. लिथीयम,निकेल आदी धातूंचा त्यांत समावेश असेल.. या मिनरल्स साठी सरकार इंसेन्टीव्ह देण्याची शक्यता आहे.
सरकार बॅटरी रिसायकलिंग साठी इंसेन्टीव्ह देण्याची शक्यता आहे.
नारळाच्या तेलाला आता खाद्य तेलाचा दर्जा दिल्यामुळे आता नारळाच्या छोट्या PACK वरही ५% GST आकारला जाईल. याआधी नारळाच्या तेलाचे वर्गीकरण कॉस्मेटिक्स म्हणून करत असल्यामुळे १८% GST आकारला जात होता.
सिप्लाच्या GATTEX या औषधाला २ पेटंट मिळण्याची शक्यता आहे.
ममता मशिनरी लिमिटेड या कंपनीचा Rs १७९.३९ कोटींचा ( हा पुर्णपणे OFS आहे) १९ डिसेंबर २०२४ रोजी ओपन होऊन २३ डिसेंबर २०२४ रोजी बंद होईल. याचा प्राईस बॅंड Rs २३० ते Rs २४३ असून मिनिमा लॉट ६१ शेअर्सचा आहे. ममता मशिनरी ही कंपनी १९७९ मध्ये स्थापन झालेली असून प्लास्टिकच्या पिशव्या, पाउच, PACKAGING इत्यादी बनवणार्या मशीन्स चे उत्पादन करून त्यांची निर्यात करते. कंपनीचे FMCG, फूड आणी बेव्हरेजेस, उद्योगामध्ये ग्राहक आहेत. कंपनी एक्स्त्रुजन उपकरणे ही बनवते. कंपनीची एक भारतात आणी एक USA मध्ये उत्पादन युनिट्स आहेत. कंपनी ७५ देशातील ग्राहकांना ही मशीन्स पुरवते कंपनीचा FY २४ साठी रेव्हेन्यू २४१.31 कोटी आणी PAT Rs ३६.१३ कोटी होते/. कंपनीचे PAT मार्जिन १५.२७% होते.
VENTIVE हॉस्पिटॅलिटी या कंपनीचा Rs १६०० कोटींचा IPO ( हा पूर्णपणे फ्रेश इशू ऑफ शेअर्स आहे) २० डिसेंबर २०२४ रोजी ओपन होऊन २४ डिसेंबर २०२४ रोजी बंद होईल. याचा प्राईस बॅंड Rs ६१० ते Rs ६४३ असून मिनिमम लॉट २३ शेअर्सचा आहे. ही २००२ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून मुख्यतः उद्योग आणी LEISURE सेगमेंट साठी लक्झुरी हॉटेल्स आणी रिसॉर्ट उभारते. कंपनीची भारतात आणी मालदीवमध्ये ११ हॉटेल्स असून २०३६ रूम्स आहेत. कंपनीला FY २४ साठी रेव्हेन्यू Rs १९०७.३८ कोटी आणी तोटा Rs ६६.७५ कोटी झाला आहे. सप्टेंबर २०२४ अखेर कंपनीला Rs ८७५.९० कोटी रेव्हेन्यू आणी Rs १३७.८३ कोटी तोटा झाला आहे. कंपनी IPO ची प्रोसिडस कर्ज आणी त्यावरचे व्याज फेडण्यासाठी करणार आहे.
ITC ने जानेवारी 6 २०२५ ही रेकॉर्ड डेट ITC हॉटेल्सच्या डीमर्जर साठी ITC ने ठरवली.
BCL इंडस्ट्रीज पश्चिम बंगाल मध्ये १५० कोटी गुंतवून BIO ENENERGI प्लांट्स लावणार आहे.
कर्नाटक राज्य सरकार आयर्न ओअरवर कर आकारणार असल्यामुळे NMDC आणी इतर आयर्न ओअर उत्पादक ज्यांच्या खाणी कर्नाटकात आहेत अशा कंपन्यांचे शेअर पडले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०१८२ NSE निर्देशांक निफ्टी २४१९८ बॅंक निफ्टी ५२१३९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १७ डिसेंबर २०२४

आज क्रूड US $ ७४.०३ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१= Rs ८४.९२ च्या आसपास होता. USA $ निर्देशांक १०६.९० तर USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.४१ आणी VIX १४.७० च्या आसपास होते. सोने Rs ७७१०० तर चांदी Rs ९०९०० च्या आसपास होती. बेस मेटल्स पैकी झिंक, कॉपर मंदीत होते.

FII ने Rs २७९ कोटी आणी DII ने Rs २३४ कोटीची विक्री केली.
वेदांताने Rs ८.५ प्रती शेअर चौथा अंतरिम लाभांश जाहीर केला. त्यासाठी डिसेंबर २४ २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली.
विप्रो ‘APPLIED VALUE TECHNOLOGIES’ आणी त्यांच्याशी सलग्न कंपन्यानमध्ये १००% स्टेक US $ 40 मिलियन्स ला घेणार आहे.
ITAT ने मर्जड असेट वर डेप्रीसीएशन चार्ज करता येणार नाही अशा संबंधीत ऑर्डरवर इंडस टोवर च्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे कंपनीची कॉन्न्टीजंट लायबिलिटीजमध्ये Rs ३५०० कोटींची घट होईल.
ग्राविता INTERNATIONAL ने Rs २२०६.४९ प्रती शेअर या फ्लोर प्राईसने Rs ७५० कोटींची QIP launch केला.
GMR एअरपोर्ट ची डोमेस्टिक पसेंजर ट्राफिक YOY १४.३% ने तर MOM ५ % ने वाढून १.१२ कोटी झाली. आंतरराष्ट्रीय पसेंजर ट्राफिक YOY ११.३% तर एअरक्राफ्ट मुव्हमेंट ८% ने वाढली.
TECMACO रेल ला छत्तीसगड स्टेट पॉवर ट्रान्स्मिशन कंपनीकडून Rs १८७.४१ कोटींची ऑर्डर मिळाली.
RVNL ला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून Rs २७० कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.
HCC चा Rs ४५.२७ फ्लोर प्राईसने QIP इशू ओपन झाला.
रेलटेल ला सेन्ट्रल वेअरहौसिंग कॉर्प कडून ३७.९९ कोटींची ऑर्डर मिळाली.
HPCL च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने मुंबई रिफायनरी मध्ये लुब मॉडर्नायझेशन आणी बॉटम्स अपग्रेडेशन साठी Rs ४६७९ कोटींना मंजुरी दिली. या मुळे कंपनीचे बिटूमेन उत्पादन ४७५ KTPA वरून ४८७ KTPA होईल.
NITCO टाईल्स ला प्रेस्टीज इस्टेट कडून Rs १०५.४ कोटींची ऑर्डर मिळाली.
पतंजली फुड्स चा अरुणाचलमधील ऑईल प्रोसेसिंग प्लांट सुरु झाला.
मनकाइंड फार्माने Rs २६१६.५५ फ्लोर प्राईसने Rs ३००० कोटींचा QIP launch केला.
DAP खताच्या किमती १ जानेवारी २०२५ पासून १२% ते १५% वाढण्याची शक्यता आहे.
ITC च्या हॉटेल बिझिनेसचा डीमर्जर १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल .
सेबीने अन्क्लेम्ड म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ चे ट्रेलिंग प्लॅटफॉर्म लौंच करण्यासाठी ड्राफ्ट प्रस्ताव जाहीर केला.
कॉरोमोन्डेल इंटरनेशनलने ड्रोनच्या सहायाने शेतात फवारणी करण्याच्या सेवा देण्यासाठी महिंद्र क्रिश e’ बरोबर करार केला.
LT फुड्स ने तांदळाची नवीन व्हरायटी launch केली.
मारुतीने २०२४ या कॅलेंडर वर्षांत २०००० युनिट्सचे उत्पादन केले. हे कंपनीच्या इतिहासांत एका कॅलेंडर वर्षातील रेकॉर्ड उत्पादन आहे. यातील बहुतांश उत्पादन हरयाणामध्ये झाले.
एशियन एनर्जी या कंपनीला आसाम GAS कंपनीकडून Rs 200 कोटींची ऑर्डर मिळाली.
इन्फोसिसने AI इनोव्हेटिव्ह एक्सलंस सेंटर साठी गुगल बरोबर करार केला.
मिंडा आणी HCMF या कंपन्यांनी ५०% -५०% बेसिस वर ऑटोमोटिव्ह सनरुफ सोल्युशनसाठी JV स्थापन केले.
इंडोको रेमिडीज च्या गोवा युनिटला USFDA ने वार्निंग लेटर दिले.
ट्रान्सरेल लाईटींगचा Rs ८३८.९१ कोटींचा IPO ( यांत Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू आणी ४३८.९१ कोटींचा OFS असेल) १९ डीसेम्बरला ओपन होऊन २३ डिसेंबरला बंद होईल. याचा प्राईस बॅंड 410 ते Rs ४३२ असून मिनिमम लॉट ३४ शेअर्स चा आहे. ही फेबृआरी २००८ ला स्थापन झालेली कंपनी असून ट्रान्स्मिशन आणी डीस्ट्रीब्युशन लाईन्सच्या सप्लाय , ENGG, प्रॉक्यूअरमेंट, कन्स्ट्रकशन च्या क्षेत्रांत कार्यरत आहे. कंपनीला FY २४ मध्ये Rs ४१३० कोटींचा रेव्हेन्यू आणी Rs २३३.२१ कोटींचे प्रॉफीट झाले होते. PAT मार्जिन ५.६५% होते.
सनातन टेक्स्टाईल्स या २००५ मध्ये स्थापन झालेल्या पॉलीएस्टर यार्न, कॉटन यार्न आणी टेक्नीकल टेक्स्टाईल आणि औद्योगिक यार्न बनवणाऱ्या आणी निर्यात करणाऱ्या कंपनीचा Rs ५५० कोटींचा IPO ( यांत Rs ४०० कोटी फ्रेश इशू आणी Rs १५० कोटींचा OFS असेल.) १९ डीसेंबरला ओपन होऊन २३ डीसेंबरला बंद होईल. याचा प्राईस बॅंड Rs ३०५ ते Rs ३२१ असून मिनिमम लॉट ४६ शेअर्सचा आहे. या कंपनीचा FY २४ साठी रेव्हेन्यू Rs २९७९.८० कोटी असून PAT Rs १३३.८५ कोटी होते.
कॉनकॉर्ड ENVIRNO सिस्टीम या १९९९ मध्ये स्थापन झालेल्या वॉटर ट्रीटमेंट आणि WASTE वॉटर ट्रीटमेंट आणी रीयुज तसेच झीरो लिकेज टेक्निक या क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपनीचा Rs ५००.३३ कोटींचा IPO ( यांत Rs १७५ कोटींचा फ्रेश इशू आणी Rs ३२५.३३ कोटींच्या OFS चा समावेश आहे) १९ डिसेंबरला ओपन होऊन २३ डिसेंबरला बंद होईल.प्राईस बॅंड Rs ६६५ ते ७०१ असून मिनिमम लॉट २१ शेअर्सचा आहे. या कंपनीचे भारतात या सेवा पुरवते , तसेच नॉर्थ अमेरिका. लॅटिन अमेरिका, आफ्रिका, मध्यपूर्वेतील देश आणी दक्षिण पूर्व आशियामध्ये ग्राहक आहेत . ही कंपनी त्यांना वर उल्लेखिलेल्या सेवा निर्यात करते. ही कंपनी ह्या प्लांटचे ऑपरेशन, मेंटेनन्सही पुरवते. या कंपनीचा FY २४ साठी रेव्हेन्यू ५१२.२७ कोटी असून PAT Rs ४१.४४ कोटी होते. PAT मार्जिन ८.३४% होते.
आज मेटल्स, OIL & GAS, एनर्जी, ऑटो, PSE, बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०६८४ NSE निर्देशांक निफ्टी २४३३६ बॅंक निफ्टी ५२८३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com. ९६९९६१५५०७