आज क्रूड US $ ७३.६६ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ८७.३९ च्या आसपास होते.
USA $ निर्देशांक १०७.३३ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२२ आणी VIX १३.६५ च्या आसपास होते. सोने Rs ८४७०० च्या तर चांदी Rs ९३३०० च्या आसपास होते. बेस मेटल्स पैकी झिंक तेजीत तर कॉपर मंदीत होते.
USA चीनवर अतिरिक्त १०% TARIFF लावणार. USA च्या GDP ग्रोथ निर्देशांक २.३ आला. जॉबलेस क्लेम २.४२ लाख आले. या सर्व डेटा बघता रेटकट होण्याच्या शक्यता कमी दिसत आहे.
तुहीन कांता पांडे यांची SEBI चे चेअरमन म्हणून नेमणूक केली. ३ वर्षांसाठी ही नेमणूक असेल. हे दिपम सेक्रेटरी होते आणी LIC चा IPO आणण्यात महत्वाची भूमिका होती.
मेक्सिको आणी कॅनडा वर ४ मार्च पासून TARIFF लागू होईल. USA मार्केटमधील तिन्ही निर्देशांक मंदीत होते.
FII ने Rs ५५६.६० कोटींची विक्री तर DII ने Rs १७२७.१० कोटींची खरेदी केली
एंजल 1 च्या काही डाटावर सायबर सेक्युरिटी ATTACK झाला अशा तक्रारी आल्यामुळे कंपनीने त्यांचे क्रेडेन्शियल बदलले.
सरकारने EPFO साठी २०२४-२०२५ या वर्षासाठी व्याजाचा दर ८.२५% निश्चित केला.
शापूरजी पालनजी च्या काही कंपन्यांवर IT DEPT. ने सर्व्हे केला. ऍफकॉन्स इंफ्राच्या ऑफिसेसमध्ये सर्व्हे केला.
सानोफी चे प्रॉफीट ३३.७% कमी झाले, रेव्हेन्यू ९.७% कमी झाला, मार्जिन वाढून २३% राहिले. कंपनीने Rs ११७ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
CHEMPLAST JSW ग्रीन एनर्जी NINE मध्ये १८.४६% आणी केम्प्लास्टचा आर्म ७.४१% स्टेक Rs ३०.४ कोटींना घेणार आहे.
RVNL ला सेन्ट्रल रेल्वे कडून 135.६६ कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
LIC ला २०२१ वर्षासाठी Rs ४७९.८८ कोटीची GST, दंड आणी व्याज यांच्या साठी डिमांड ऑर्डर मिळाली.
टाटा पॉवर ला Rs ६३२ कोटींची ऑर्डर २९२.५ MWP DCR सोलर मोड्यूल साठी ऑर्डर मिळाली.
GE पॉवर ला Rs २७३.५० कोटींची ऑर्डर ग्रीन्को कडून ऑर्डर मिळाली.
PNC इन्फ्रा ने उत्तर प्रदेशांत Rs ८६४ कोटींचे रोड प्रोजेक्ट मुदतीच्या आधी पूर्ण केले. कंपनीला NHAI कडून Rs १४.२ कोटी EARLY COMPLETION बोनस मिळाला.
कर्नेक्स मायक्रोला Rs ३२५.३० कोटींच्या प्रोजेक्ट साठी LOA मिळाले.
जिंदाल स्टेनलेस स्टील ने AGH DREAM आणी ३८ क्रिस्त DREAM मध्ये १००% स्टेक घेतला.
TVS मोटर्स ने TVS KING DURAMAX प्लस आणी TVS KING DELUXE PLUS ही थ्री व्हीलर्सची मोडेल्स मेक्सिको मध्ये LAUNCH केली.
IT सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज प्रॉफीट बुकिंग झाले. USA मधील व्हिसा वरील निर्बंध आणी नियमांमधील बदलांचा प्रतिकूल परिणाम कंपनीवर होण्याची शक्यता आहे असे कॅप जेमिनी या कंपनीने सांगितले. तर काही IT कंपन्यांनी कर्मचार्यांच्या बढत्या, पगारवाढ या संबंधीत निर्णय पुढे ढकलले.
RBI ला US $ १६.२३ बिलीयंसची बोली बाय/सेल SWAP साठी मिळाली.
हुंडाई च्या ४५.८० लाख शेअर्समध्ये Rs ४४१ कोटींचे लार्ज डील झाले.
भारताची तिसर्या तिमाहीतील GDP ग्रोथ QOQ ५.४ वरून 6.२% एवढी वाढली.
एनर्जी, फार्मा, मेटल्स, IT, ऑटो, PSE क्षेत्रांमधील शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७३१९८ NSE निर्देशांक निफ्टी २२१२४ आणी बॅंक निफ्टी ४८३४४ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७
