आज क्रूड US $ ६२.४८ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ ८४.६३ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक ९९.१० USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.१७ आणी VIX १७.७१ च्या आसपास होते. सोने Rs ९५२०० आणी चांदी Rs ९५९०० च्या आसपास होते. बेस मेटल्समध्ये तेजी होती.
चीन USA मधून आयात होणाऱ्या काही मालावर रिटालिएटरी TARIFF लावणार नाही. कन्झ्युमर कॉन्फिडन्स लोएस्ट लेव्हलवर गेले. मे २०२० मध्ये हे ८६ होते ते आता ७.८ पाईंट ने कमी झाले. जनरल मोटर्स चा शेअर पडला. UPS चा शेअर वाढला. UPS २०००० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. अमेझॉन चा व्यापार कमी होत आहे. हनीवेल चा शेअर ४.२% वाढला. स्पोटीफाय चा शेअर ८.४% ने पडला कारण ऑपरेटिंग प्रॉफीट कमी झाले. USA- चीन मधील TARIFF संबंधीत ताणतणाव कमी झाल्यामुळे सोन्याचा भाव कमी झाला. आदिदास ने महागाई वाढेल या भीतीने प्रॉफीट गायडंस देणे टाळले. शेअर १२% पडला. ३ मे २०२५ पासून ऑटो वर २५% TARIFF लागू होईल. २ वर्षापर्यंत रिइमबर्समेंट मिळेल. कार च्या किमतीच्या ३.७५% पहिल्या वर्षी आणी २.५% दुसर्या वर्षी रिइमबर्समेंट मिळेल. .
FII Rs २३८६ कोटींची खरेदी तर DII ने Rs १३६९ कोटींची खरेदी केली.
झायडस लाईफ ला NIACIN एक्स्टेंडेड रिलीज TABLET ला USFDA कडून मंजुरी मिळाले. हे कोलेस्टेरॉल वरील औषध असून त्याचा US $ ५५ लाखांचा कारभार आहे.
CIE ऑटोमोटिव्हचे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
विशाल मेगा मार्ट चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
बजाज फिनसर्व चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. कंपनीने Rs १ लाभांश जाहीर केला.लाईफ इन्शुरन्स प्रीमियम १३% ने वाढले, जनरल इन्शुअरन्सचा प्रीमियम १३% ने वाढला.
इंडो स्टार प्रॉफीट कमी झाले, NII वाढले.
जन स्माल फायनान्स बँकेचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले. प्रोविजन कमी झाली.
बंधन बँकेचे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
इक्विटास SFB चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
CEAT चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन वाढले, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs ३० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
UTI AMC चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न कमी झाले,कंपनीने Rs २६+Rs २२ असा एकूण Rs ४८ लाभांश जाहीर केला.
प्राज इंडस्ट्रीजचे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. कंपनीने Rs 6 लाभांश जाहीर केला.प्राज इंडस्ट्रीजने THYSM ग्रुप UDHE बरोबर पोलीलाक्टिक असिड च्या उत्पादनाचे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी भागीदारी केली.
एस्कॉर्टस आणी एस्कॉर्टस कुबोटा यांच्यातील RED बिझिनेस ट्रान्स्फर करणे किंवा त्याची विक्री करणे या संबंधीत कराराची मुदत १ मे ऐवजी १ जून केली.
शॉपर STOP चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
फाईव स्टार बिझिनेस फायनान्सचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, GNPA आणी NNPA वाढले. इंडसइंद बँकेचे MD CEO सुमंत काठपालीया यांनी राजीनामा दिला.
प्रेस्टीजने तिच्या आर्मला Rs ७५० कोटींची कॉर्पोरेट गारंटी दिली. त्यामुळे त्यांना RACA (रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी ) कडून इंद्रपुरम NCR येथे रेसिडेन्शियल प्रोजेक्टला परवानगी मिळाली.
बजाज फायनान्सचे प्रॉफीट Rs ३८२५ कोटींवरून Rs ४५४५ कोटी झाले. NII Rs ८०१३ कोटींवरून Rs ९८०७ कोटी झाले. GNPA QOQ १.१२ वरून 0.९६ झाले तर NNPA 0.४८% वरून QOQ 0.४४% झाले. कंपनीने त्यांच्या १ शेअरचे २ शेअर्समध्ये विभाजन केले जाईल तसेच तुमच्या जवळ असलेल्या १ शेअरला ४ शेअर्स बोनस शेअर्स इशू केले जातील असे जाहीर केले. कंपनीने स्पेशल लाभांश Rs १२ (रेकोर्ड डेट ९ मे २०२५ ) आणी फायनल लाभांश Rs ४४ जाहीर केला.
आलेम्बिक फार्माच्या पानेलाव युनिटसाठी USFDA कडून EIR मिळाला.
एन्ड्युअरंस महाराष्ट्रांत लिथियम आयन बॅट्री युनिट सुरु करणार आहे.
GLAND फार्माच्या ‘LATANOPROSTENE BUNOD OPTHALMIC सोल्युशन ‘ या नवीन औषधाला USFDA ची मान्यता मिळाली.
IOC चे प्रॉफीट Rs २८७४ कोटींवरून QOQ Rs ७२६५ कोटी झाले. रेव्हेन्यू QOQ Rs १.९४ लाख कोटींवरून १.९५ लाख कोटी झाला. मार्जिन ३.७% वरून ७% झाले. कंपनीने Rs ३ लाभांशाची घोषणा केली.
अदानी पॉवर चे प्रॉफीट कमी झाले, उत्पन्न वाढले.
अजंता फार्माचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले. मार्जिन कमी झाले.
कोरोमोन्डेलचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs 6 फायनल लाभांश आणी Rs ३ स्पेशल लाभांश जाहीर केला.
वरूण बिव्हारेजीसचे कनसॉलीडेटेड प्रॉफिट Rs ५३७ कोटींवरून Rs ७३६ कोटी झाले.कनसॉलीडेटेड उत्पन्न Rs ४३१७ कोटींवरून वाढून Rs ५५६७ कोटी झाले. मार्जिन २२.९% वरून कमी होऊन २२.८% होते. व्हॉल्यूम ग्रोथ ३०% होती.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसासाठी ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६ या वर्षासाठी FRP (फेअर आणी रेम्यूनरेटीव्ह प्राईस) १०.२५% रिकव्हरी असेल तर Rs ३४० प्रती क्विंटल एवढी निश्चित केली.
ग्रीव्ज कॉटन चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
उज्जीवन SFBचे प्रॉफीट कमी झाले, GNPA आणी NNPA कमी झाले.
GO FASHION चे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
क्रिसिलचे प्रॉफीट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.कंपनीने Rs ८ लाभांशाची घोषणा केली.
एक्झाईडचे स्टन्डअलोन प्रॉफीट Rs २५४ कोटी झाले, उत्पन्न Rs ४१५९ कोटी झाले. मार्जिन ११.२% होते. एक्झाईड ‘एक्झाईड एनर्जी मध्ये Rs १२०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने Rs २ लाभांशाची घोषणा केली
वेदान्ता चे प्रॉफीट, उत्पन्न, मार्जिन वाढले. निकाल चांगले आले.
आज मार्केट कनसॉलीडेशनच्या मूड मध्ये होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०२४२ NSE निर्देशांक निफ्टी २४३३४ आणी बॅंक निफ्टी ५५०८७ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक . bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७
