आज क्रूड US $ ६७.६५ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८५.७६ च्या आसपास होते. USA $ निर्देशांक ९७.२२ USA १० वर्षे बॉंड यील्ड ४.२८ आणी VIX १२.८२ च्या आसपास होते. सोने Rs ९५५०० आणी चांदी Rs १,०५,२०० च्या आसपास होती. बेस मेटल्स तेजीत होती.
S & P, NASDAQ, रेकॉर्ड हाय स्तरावर होते. NVIDIA मध्ये तेजी होती. PCE निर्देशांक २.७ आला. कंझ्युमर सेंटीमेंट ६०.७ होते. USA ने सांगितले की सर्व ट्रेड डील्स १ सप्टेंबर ला लेबर डे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ९ जुलै ही TARIFF साठी दिलेली अंतिम तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
चीनचा मॅन्युफॅक्चरिंग PMI ४९.५ वरून ४९.७ झाला.
FII ने Rs १३९७ कोटींची खरेदी तर DII ने Rs ५८८ कोटींची विक्री केली.
भारतात पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली आहे.
मे २०२५ साठी IIP ग्रोथ १.२% आली ( YOY 6.३ आणी MOM २.6 होती)
ग्रेन्युअल्स च्या USA युनिटला एक त्रुटी दाखवली.
एशियन पेंट व्हाईट टिक मधील 40% स्टेक Rs १८८ कोटींना घेणार आहे. हा स्टेक खरेदी केल्यावर एशियन पेंट चा स्टेक १००% होईल.
NTPC ने गुजरात मध्ये खावडा येथे २८८.९ MW ची नवीन सोलर क्षमता सुरु केली.
मेडप्लसचे तामिळनाडू मधील लायसेन्स सस्पेंड केले. यामुळे रेव्हेन्यूवर Rs ३८००० कोटींचा इम्प्यक्ट येईल.
केअर ने APTUS व्हल्यू हौसिंग चे रेटिंग अपग्रेड करून AA: स्टेबल केले.
टाटा कम्युनिकेशनने कॅनडा रेव्हेन्यू एजन्सी बरोबरअसलेला TAX इशू मिटवला.
कोची शिपयार्ड ला पॉलिस्टर मेरिटाईम कडून २ ७० T TUGS साठी Rs १०० ते Rs २५० कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली.
आलेम्बिक फार्माच्या कॅन्सर वरील औषधाला ‘DOXORUBICIN LIPOSOME’ इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.
NTPC ग्रीन ने २२० MW शाजापूर सोलर प्रोजेक्ट पैकी १२० MW प्रोजेक्ट कमिशन केले.
टाटा स्टील ला Rs १००७ कोटींची GST डिमांड नोटीस मिळाली.
झेनला इनोव्हेशन इन लेझर बेस्ड कॉम्बट ट्रेनिंग साठी पेटंट मिळाले.
रेमसन्सला फोर्ड ओटोसान कडून Rs ८० कोटींची ऑर्डर मिळाली.
E -मुद्रा ने CRYPTAS INTERNATIONAL मध्ये ५१% स्टेक युरो ५ मिलियन्सला घेतला.
HAL ने Rs १५ प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
GAIL तालचेर फरटीलायझरमध्ये राईट्स इशुला सबस्क्राईब करून १०६.07 कोटी शेअर्स घेणार.
ITD सिमेंटेशनला अबुधाबी मध्ये जेटी बांधण्यासाठी Rs ५८० कोटींची ऑर्डर मिळाली.
टोरांट फार्मा JB केमिकल्स मध्ये कंट्रोलिंग स्टेक Rs २५६८९ कोटींना घेणार आहे. टोरांट फार्मा KKR कडून ४६.३९ % स्टेक Rs १६०० प्रती शेअर या भावाने खरेदी करेल. तसेच कर्मचार्यांकडून २.८०% खरेदी करेल. शेअर्स JB केमिकल्स आणी टोरांट फार्माचे मर्जर केले जाईल. JB केमिकल्स च्या १०० शेअर्सना टोरांट फार्माचे ५१ शेअर्स मिळतील. टोरांट फार्मा Rs १६३९.१८ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणेल.
AU SFB १२ महिन्यांत Rs १००० कोटी उभारणार.
GIPCL ने त्यांच्या गुजरात मधील खावडा येथील ६०० MW सोलर प्रोजेक्ट पैकी १०५ MW प्रोजेक्ट सुरु केला
हिंद रेक्टीफायर ला Rs १२७ कोटींची २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ऑर्डर मिळाली.
देवयानी च्या SKY GATE ही ब्लॅक वेलवेट आणी SAYCHEF मधील उरलेला स्टेक Rs 18.९१ कोटींना घेणार.
जिंदाल वर्ल्ड वाईड ‘GOODCORE SPINTEX ‘ मधील ५१% स्टेक घेणार.
बालाजी टेलिफिल्म्स ला BSE आणी NSE ने Rs १.३ लाख फाईन लावला.
टीटाघर WAGON ला पुणे मेट्रो ट्रेनसेट साठी Rs ४३० कोटींची ऑर्डर मिळाली.
अंबर एन्टरप्रायझेस पॉवर वन मायक्रोसिस्टीम मध्ये मेजोरिटी स्टेक घेणार आहे.
रेनबो प्रशांती मेडिकेअर मध्ये ७६% स्टेक आणी १००% प्रेफरन्स शेअर्स घेणार आहे. प्रशांती हे १०० बेड चे हॉस्पिटल चालवतात. NEULAND लाब्ला त्यांच्या संगारेड्डी युनिट साठी USFDA ने EIR दिला.
नजारा ची सबसिडीअरी ‘GETSTAN टेक्नोलॉजी’ मध्ये Rs ८.६६ कोटी गुंतवणार.
ओरिएन्टल रेल ने प्रमोटर्स ना Rs १६९ प्रती शेअर या भावाने ५ लाख शेअर्स अलॉट केले.
NLC ला ४५० MW विंड सोलर हायब्रीड प्रोजेक्ट NTPC कडून मिळाला.
सरडा एनर्जी ला कॉल GASIFIER प्लांट ऑपरेट करण्यासाठी परवानगी मिळाली.
हिंदुस्थान कॉपरने IOC बरोबर क्रिटीकल मिनरल्स ब्लॉक ऑक्शन साठी MOU केले.
VRL लॉजिस्टिक्स ४ जुलै २०२५ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करेल.
वेसुवियस इंडिया ने त्यांच्या विशाखापट्टणम प्लांट मध्ये कमर्शियल ओपारेशांस सुरु केली.
सुला वाईन यार्ड्स राईट्स इशू द्वारा ARTISAN स्पिरीट मध्ये 98 लाख शेअर्स खरेदी करून Rs १३ कोटींची गुंतवणूक करणार.
क्रॉम्पटन ग्रीव्ज कन्झ्युमर ने CapMaxx2 SMFD या ब्रांड अंतर्गत B 2C लाईटींग AC कॅपसिटर launch केला.
झायडस लाईफ ‘ टोरांट उर्जा २५’ मधील २२.06% स्टेक Rs ३.९ कोटींना घेईल.
ऑरोबिंदो फार्माच्या सबसिडीअरीने PENICILLIN-G चे उत्पादन रेग्युलेटरी क्लीअरंस नंतर पुन्हा सुरु केले.
जिंदाल स्टील & पॉवर च्या अंगुल प्लांटमध्ये गाल्व्हनायझिंग लाईन मध्ये कामकाज सुरु केली. आता कंपनी ची क्षमता 6 MTPL झाली.
मार्कसन्स फार्माच्या सबसिडीअरिच्या मन्युफाक्चरिंग प्लान्टला १६ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये EIR मिळाला.
L & T टेक ने THYSSENKRUP बरोबर पुणे येथे सोफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर बनवण्यासाठी STRATEGIC पार्टनरशिप केली.
गोदरेज प्रॉपर्टीजने पानिपत मध्ये ४३ एकर जमीन Rs ६०० कोटींना खरेदी केली.
AU SFB ने LIC बरोबर आयुर्विम्याला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला.
NHPC च्या २५० MW च्या युनिटला कमर्शियल ऑपरेशन सुरु करायला NDSA ( नाशनल DAM सेफ्टी ऑथोरिटी ) ने परवानगी दिली.
VI ने सांगितले की २३ जिल्ह्यात ते टप्प्या टप्प्या ने 5G launch करणार आहेत.
ITI ने BSNL बरोबर Rs १९०१ कोटींचा करार केला.
कॅस्ट्रोलने ब्रेक क्लीनर, एअर थ्रोटल क्लीनर,इत्यादी प्रोडक्ट्स LAUNCH केली.
BEL ला Rs 528 कोटींची ऑर्डर मिळाली.
NCC ला जून २०२५ महिन्यांत १६९०.५१ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.
आज मिडकॅप, स्माल कॅप, PSU बँक्स, फार्मा,IT, मेटल्स ऑटो मध्ये खरेदी झाली.
FMCG, OIL & GAS मध्ये प्रॉफीट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८३६०६ NSE निर्देशांक निफ्टी २५५१७ आणी बॅंक निफ्टी ५७३१२ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.com . ९६९९६१५५०७
