Monthly Archives: August 2025

आजचं मार्केट – २९ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ ६८.२४ प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs.८७.७५ च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९८.१२ USA १० वर्षे बाँड yield ४.२३ आणि Vix ११.८१ च्या आसपास होते. सोने Rs.१०२६०० तर चांदी Rs.११६९०० च्या आसपास होते.बेस मेटल तेजीत होत आज FII ची विक्री ३८५७ कोटी होती तर DII ची खरेदी ६९२० कोटी होती. झायडस लाईफच्या saroglitazaar मॅग्नेशियम फेस थ्री ट्रायल चे सकारात्मक निर्णय आले.हे औषध पोटाच्या विकारावर आहे

अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचे शेअर वाढले अल्फाबेट वाढला हेल्थकेअर कंजूमर स्टेपल्स पडले, कम्युनिकेशनचे शेअर वाढले जीडीपी देशाचे अनुमान 3.3% आले हे अपेक्षेपेक्षा आणि पूर्वीपेक्षा जास्त आहे जोब्लेस क्लबचे आकडे २.९ आले आयात कमी झाली पण अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी आहे फेड च्या चेअरमनच्या रेस मध्ये क्रिस्टोफर वॉलर हे पुढे आहेत
Groww च्याआयपीओला सेबी कडून परवानगी मिळाली
इन्फोसिस मास्टर कार्ड बरोबर पार्टनरशिप करणार आहे 200 देशांना आणि 150 चलनामध्ये पेमेंट यामुळे करता येईल
मुथुट फायनान्स ही मुथुट मनी मध्ये 500 कोटी रुपये गुंतवणार आहे यामुळे त्यांचा Adequacy रेशो सुधारेल
एनटीपीसी त्यांचा कोल mining business, एनटीपीसी mining लिमिटेडला ट्रान्सफर करणार आहे या व्यवहारात त्यांना १०५०३ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने मिळतील या mining बिजनेस मधून त्यांना 7700 कोटींचा रेवेन्यू मिळत होता
सी जी पॉवर – CG Semi या सबसिडीयरीने OSAT फॅसिलिटी सानंद येथे सुरू केली ही भारतातील पहिली फुल सर्विस सेमी कंडक्टर असेंबली आणि टेस्ट प्रोव्हायडर ठरेल
लेमन ट्री – मोहकंमपूर देहराडून येथे 98 रूमच्या प्रॉपर्टी संबंधात लायसन्स अग्रीमेंट केले
फर्टीलायझर ऍसिड आणि बायो पेस्टिसाइड वर १२ टक्के, १८ टक्के जीएसटी आहे तो पाच टक्के करण्याचा प्रस्ताव आहे याचा फायदा यु पी एल, पी आय इंडस्ट्री, आणि रॅलीज यांना होईल
टेक्स्टाईल आणि ॲपरल वर १२ % वरून पाच टक्के जीएसटी करावा असा प्रस्ताव आहे याचा फायदा V Mart,विशाल mega Mart,वर्धमान टेक्सटाइल, अरविंद, Raymond , पेज इंडस्ट्री ,वेल्सपन यांना होईल
Renewable एनर्जी, सोलर कुकर ,सोलर वॉटर सिस्टीम आणि त्यांचे पार्ट्स याचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५% करण्याचा प्रस्ताव आहे याचा फायदा अडाणी ग्रीन ,के पी आय ग्रीन ,स्टर्लिंग विल्सन ,टाटा पॉवर यांना होईल
फुटवेअर इंडस्ट्री – 2500 रुपयाच्या वर बारा टक्क्यावरून अठरा टक्के आणि 2500 रुपयाच्या पेक्षा कमी भाव असेल तर 12 टक्क्यावरून पाच टक्के जीएसटी करण्याचा प्रस्ताव आहे याचा फायदा बाटा , Relaxo, कॅम्पस , मेट्रो यांना होईल
Kitex गारमेंटच्या आर्मनी वारंगल येथे कामकाज सुरू केले
आर बी एल बँक- सोसायटी जनरली 32.78 लाख शेअर 250.57 या भावाने खरेदी केले
सिमेन्स Gamesa कडून ABB ला १७४ कोटीची supply ऑर्डर मिळाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ७९८०९, NSE निर्देशांक निफ्टी. २४४२६, BANK निफ्टी ५३६५५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ ६७.५३ प्रति बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ८७.६२ च्या आसपास होते.US $

निर्देशांक ९८.१२ USA १० वर्षे बाँड yield ४.२७ होते. सोने Rs.१०१४००.०० तर चांदी Rs ११६४०० आणि vix १३.०५ च्या आसपास होते. बेस मेटल तेजीत होती आज Fii ची विक्री Rs 6516 कोटी रुपये होती तर Dii ची खरेदी Rs 7060 कोटी रुपये होती
आपल्याप्रमाणेच USA मध्ये मार्केट संपल्यानंतर NVIDIA चे रिझल्ट येणार होते रिझल्ट चांगले आले गाईडसही वाढवला डेटा सेंटरचा रेव्हेन्यू वाढला पण शेअर पडला ते चीनला जो काही माल पाठवतील त्या रकमेच्या पंधरा टक्के रक्कम त्यांनी अमेरिकन सरकारला दिली पाहिजे असे सांगण्यात आले आहे.यामुळे रिझल्ट चांगला येऊनही शेअर पडला. H1B विजासाठी कर्मचाऱ्याने लाच दिली तर आता H1B VISA देणे बंद होईल का असे वाटू लागले
Cracker Barrel – हा शेअर पाच टक्के वाढला पण याचे कारण मजेशीर आहे त्यांनी लोगो बदलण्याचा plan कॅन्सल केला
Kohi’s चा शेअर 19% वाढला कारण या डिपार्टमेंट स्टोअरचा रिझल्ट बेटर दॅन एक्स्पेक्टेड आला
JM Smucker चा रिझल्ट कमजोर आला त्यामुळे शेअर मंदीत गेला ही जेली आणि जाम बनवणारी कंपनी आहे आता भारतात काय घडत आहे ते पाहू
टाटा स्टील – या कंपनीने सिंगापूरची सबसिडीयरी T स्टील होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तीन हजार एकशे कोटी रुपयाचे शेअर घेतले
बायोकॉन – 25 mg,50 mg,100 mg,च्या Sitagliptin टॅबलेट्सला USFDA कडून tentative approval मिळाले या टॅबलेट टाईप टू डायबिटीस साठी वापरल्या जातात
युनायटेड ब्रीवरीज -Telangana येथील निजाम brewery मध्ये 90 कोटी रुपये गुंतवणार यामुळे कपॅसिटी वाढेल
ऑइल इंडिया आणि बीपीसीएल यांनी जॉईंट वेचर केले अरुणाचल प्रदेशात गॅस डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कचा विस्तार करणे आणि पीएनजी चा पुरवठा हाऊसहोल्ड ,बिजनेस, आणि इंडस्ट्रीला करणे हे उद्देश आहेत
Dr. Reddy’s – DRHL बर्जरच्या संबंधात तेलंगणा हायकोर्ट ने interim स्टे दिला
एसबीआय कार्ड आणि फ्लिपकार्ट हया दोघांनी मिळून को ब्रँडेड क्रेडिट कार्ड काढले. Myntra वर साडेसात टक्के तर फ्लिपकार्ड वर पाच टक्के, Shopsy आणि क्लियर ट्रिप वर पाच टक्के कॅशबॅक देणार आहेत.
टीसीएस – आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर भर देत आहे अमित कपूर यांची नेमणूक केली आहे.
इंडिगोचे प्रमोटर म्हणजेच गंगवाल फॅमिली 3.1% टेक ब्लॉकडीलच्या माध्यमातून 4% discount वर विकणार आहेत यातून त्याना सात हजार अठावीस कोटी रुपये मिळतील. 150 दिवसाचा लॉक अप पीरियड आहे.
जे एस डब्ल्यू स्टील आणि आंध्रप्रदेश मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या JV ला सर्टिफिकेट मिळाले.
AB capital ला ऑनलाइन पेमेंट ॲग्रीगेटर म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून संमती मिळाली.
अडाणी हे जेपी असोसिएट घेणार या गोष्टीला कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ने परवानगी दिली.
त्यामुळे आयसीआयसीआय आणि एसबीआय यांचे कर्ज थोडे कमी होईल
ग्राफाईट इंडिया – गोडी इंद्रा मधील स्टेक त्यांनी वाढवला आता त्यांचा स्टेक 45.76% झाला
एस एम एस फार्माच्या हैदराबाद युनिटला यु एस एफ डी ए कडून EIR मिळाला एकही त्रुटी दाखवली नाही
Escorts – नी MU 4201 ट्रॅक्टर लाँच केला
Newgen सॉफ्टवेअरला Rs 73 कोटीची ऑर्डर मिळाली ही ऑर्डर दोन वर्षात पूर्ण करायची आहे
MGL- या कंपनीला Rs 54 कोटी रुपये जीएसटी भरण्यासाठी नोटीस मिळाली
SCI – या कंपनीने Rs. 6 .59 इतका लाभांश दिला याची रेकॉर्ड डेट 5 सप्टेंबर ही आहे
अबुजा सिमेंट मधला पाच टक्के स्टेक अडाणी विकणार आहे यातून पंधरा हजार कोटी रुपये कर्ज फेडणार आहेत
TVS मोटर्स ने ORBITER ही नवीन EV स्कूटर लाँच केली.
सरकारने रॉ कॉटन वरील इम्पोर्ट ड्युटी आता ३१डिसेंबर २०२५ पर्यंत रद्द केली.
आज भारतीय शेअर मार्केट मधील सर्व सेक्टरचे शेअर्स मंदीत होते
BSE निर्देशांक सेन्सेक्स 80080,NSE निर्देशांक निफ्टी 24500,BANK NIFTY 53820, वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०२५

आज एफ आय आय ची Rs. 2466 कोटींची विक्री तर डी आय आय ची Rs.3176 कोटीची खरेदी होती बाँड yield 4.29 , dollar index 98 , तर क्रूड US $ 66.50 होते. सोने Rs. १०११००, आणि चांदी Rs.११६७०० च्या आसपास होती.बेस मेटल तेजीत होते.

ट्रम्प यांनी गव्हर्नर लीसा लुक यांना कामावरून काढून टाकले खरे पाहता लिसा लुक यांचा कार्यकाल 2038 पर्यंत होता जानेवारी 2026 पर्यंत चार वेळेला पॉईंट 25 चे रेट कट केले जातील असे सगळ्यांना वाटत आहे भारतीय वेळेनुसार 27 तारखेला सकाळी नऊ वाजून 31 मिनिटांनी 25% ज्यादा TARIFF लावला जाईल Intel मध्ये अमेरिकन सरकारने दहा टक्के हिस्सा घेतला अमेरिकन सरकार Sovereign फंड बनवणार आहे याचीच ही सुरुवात आहे असाच आणखीन काही कंपन्यात ते स्टेक खरेदी करतील. चीनने रेअर अर्थ मॅग्नेट निर्यात केले नाही तर त्यांच्यावर दोनशे टक्के Tarrif लावण्यात येईल पण अमेरिकन IT कंपन्यांना संरक्षण दिले जाईल असे सांगण्यात आले

साई लाइफ – टी पी जी शेअर विकून बाहेर पडणार आहे

त्यांचा 14.72% स्टेट ८६० रुपये भावाने विकणार आहेत यातून त्यांना 2640 कोटी रुपये मिळतील
प्रोटीन E- GOV – डायरेक्ट लेव्हल आधार केंद्र निर्माण करणे आणि चालवणे यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन एथॉरिटी ऑफ इंडियाकडून ११६० कोटीची ऑर्डर मिळाली
सोना बी एल डब्ल्यू – इलेक्ट्रिक थ्री व्हीलर आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर साठी पी एल आय सर्टिफिकेट मिळाले
माझगाव डॉक्स – जानेवारी 2025 पासून 70000 कोटीच्या प्रोजेक्टसाठी कोणतीही नीगोसिएशन झाली नाहीत असे कंपनीने सांगितले
पेटीएम – 300 कोटी पेटीएम मनी मध्ये , तर 155 कोटी पेटीएम सर्विसेस मध्ये गुंतवणार आहे
SIGNPOST – बंगलोर मेट्रो एडवर्टाइझिंग साठी नऊ वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले यातून 700 कोटी रुपयाचे उत्पन्न होईल
श्री रेफ्रिजरेटर्स – हिंदुस्थान शिपयार्ड कडून 106 कोटीची डिफेन्स ऑर्डर मिळाली
टाटा मोटर्स – नॅशनल कंपनी लॉ tribunal नी पॅसेंजर व्हेईकल आणि कमर्शियल व्हेईकल योजनेला मंजुरी दिली
एन एच पी सी – कर्णिसर हे 312 Mw सोलर प्रोजेक्ट आहे त्यापैकी 214. 28 MW चे प्रोजेक्ट सुरू झाले उरलेले 30 सप्टेंबर पर्यंत सुरू होईल
Tasty Bite eatables – CHEFFIN या रिटेल ब्रँड अंतर्गत नवीन प्रॉडक्ट रेंज लॉच करणार आहेत
ओ एन जी सी – राजस्थान मधील लहान फील्ड ब्लॉकमधून नॅचरल गॅस विकण्यासाठी सुरुवात केली आहे
आय आर बी इन्फ्रा – आठ लेन एक्सप्रेस वे साठी त्यांना सर्टिफिकेट मिळाले आहे
भारतीय सरकारने बँकांच्या डायव्हेट साठी गोल्डमन साख यांची नियुक्ती केली आहे
टायटन – सरकारने ज्वेलरी वरील ड्युटी ड्रॉ बॅक रेट कमी केला
ओला इलेक्ट्रिकला जनरेशन 3 EV स्कूटर साठी ३PLI सर्टिफिकेट मिळाली. त्यामुळे १३% ते १८% सवलत मिळेल. त्यामुळे याचा फायदा Q2 FY 26 मध्ये होईल.
आज 4कंपन्यांच्या शेअर्स चे लिस्टिंग झाले.ते खालीलप्रमाणे
विक्रम सोलरचे BSE वर Rs ३४० वर आणि NSE वर Rs.३३८ वर लिस्टिंग झाले.हा शेअर IPO मध्ये Rs.३३२ ला दिला होता.
श्रीजी शिपिंग चे BSE वर Rs २७१.८५ आणि NSE वर Rs २७० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २५२ ला दिला होता.
GEM AROMATICS चे BSE वर Rs ३२५ आणि NSE वर Rs ३३३.१० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ३२५ ला दिला होता.
पटेल रिटेल चे BSE वर Rs ३०५ आणि NSE वर Rs ३०० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs २५५ ला दिला होता.
ओरिएंट टेक्नॉलॉजी ला न्यू इंडिया अशुअरन्स कडून त्यांच्या NIA डेटा सेंटर्स मधील नेटवर्क, बॅकअप, आणि स्टोअरेज डीवायसेसच्या मेंटेनन्स साठी ३ वर्षे मुदतीचे ₹३० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
एरिस लाईफसायन्सेस च्या अहमदाबाद येथील स्टराइल इंजेक्टिबल युनिटसाठी ब्राझीलच्या रेग्युलेटरी ऑथोरीटी कडून मंजुरी मिळाली.
ग्लँड फार्माच्या vasopressin ५% dextrose injection RTU साठी USFDA ची मंजुरी मिळाली.
HCL TECH ने THOUGHT MACHINE बरोबर करार केला .
आशियाना हाउसिंग ने चेन्नई प्रॉजेक्ट साठी 22 .71 एकर जमीन घेतली त्यातून बाराशे कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे
आज एफ एम सी जी वगळता सगळ्या सेक्टर मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले
BSE निर्देशांक सेन्सेक्स 80786,NSE निर्देशांक निफ्टी 24712, आणि बँक निफ्टी 54450 वर बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २५ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ ६८.०२ प्रति बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ८७.६१ च्या आसपास होते.US$ निर्देशांक ९७.७६ USA १० वर्षे बाँड yield ४.२७ आणि vix ११.५७ च्या आसपास होते. सोने Rs.१००५०० तर चांदी Rs ११६२०० च्या आसपास होती.

अमेरिकन मार्केटमध्ये तेजी होती fed चे चेअरमन पॉवेल यानी रेट कट करण्याचे संकेत दिले
Signpost – 67 बेडरूम स्टेशन साठी एक्सक्लुझिव्ह एडवर्टाइझिंग राइट्स कंपनीला मिळाले यातून 600 ते 700 कोटी उत्पन्न मिळेल
पारस डिफेन्सला BEL कडून Rs. ४५.३० कोटींची ऑर्डर मिळाली.
क्रॉम्प्टन – मास प्रीमियम इंडक्शन प्रॉडक्ट TARO 24 डोंमेस्टिक मार्केटमध्ये लॉच केले
TCS ने ICICI Lombard ला पूर्णपणे automated मल्टीरिजन डिझास्टर रिकव्हरी ON AWS क्लाऊड डिलिव्हर करण्यासाठी सक्षम केले.
केंद्र सरकारने माझगाव डॉक बरोबर Rs.७०००० कोटींच्या सबमरीन प्रोजेक्ट साठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. आय डी बी आय च्या डायव्हेस्टमेट बद्दल सर्वांना कुतूहल आहे एलआयसी ला पब्लिक शेअर होल्डिंग मध्ये टाकले वोटिंग rights मर्यादितच दिले जातील एलआयसी ची हिस्सेदारी ३९ टक्के आहे एकंदर वोटिंग राईटच्या दहा टक्के rights एलआयसी ला मिळतील आयडीबीआय बँकेच्या कामकाजात एलआयसी ढवळाढवळ करू शकणार नाही विशेष अधिकार मिळणार नाहीत किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये प्रतिनिधित्व नाही दोन वर्षाच्या मुदतीत 15 टक्के पर्यंत हिस्सेदारी कमी करावी लागेल म्हणजेच 39% असलेला स्टेक पंधरा टक्के होईल
FTSE ALL WORLD – यामध्ये इंडियन ओव्हरसीज बँक, जे के सिमेंट , हेक्झा वेअर टेक्नॉलॉजी, MCX, गॉड प्रे फिलिप्स, नारायणा हेल्थ, यांचा 22 सप्टेंबर पासून समावेश होईल
22 सप्टेंबर पासून जीएसटी चे कमी झालेले दर लागू होतील तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी ची मीटिंग आहे
वर्जिन पेपर लेयर पेपर बोर्ड ला एम आय पी लावल्यामुळे आयात महाग होईल म्हणून पेपर सेक्टर मधील शेअर तेजीत होते जसे जेके पेपर, इंटरनॅशनल पेपर ,शेषशाही पेपर, ओरिएंट पेपर
दिग्विजय सिमेंटचा प्लांट अडाणी घेण्याच्या विचारात आहे
एच डी एफ सी बँकेच्या बोनस ची रेकॉर्ड डेट 27 ऑगस्ट आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स 81635 ,NSE निर्देशांक निफ्टी 24967 , BANK NIFTY 55139 होते

भाग्यश्री फाटक

bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २२ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ 67.40 प्रती बॅरल,डॉलर इंडेक्स 98.51, तर US १० वर्षे बाँड yield 4.32 होते. 1 डॉलर – 87.56 तर Vix 11 37,सोने 101820 रुपये तर चांदी Rs.116100 होती FII ची खरेदी Rs 1247 कोटी तर डी आय आय चे खरेदी Rs 2546 कोटी होती.

आज जॅक्सन होल मीटिंग आहे. पॉवेल यांची ही शेवटची मीटिंग असू शकेल, त्यांची मुदत संपत आहे. पुन्हा नेमणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे. तेथील वेळेनुसार सकाळी आठ वाजता तर भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचे भाषण आपल्याला ऐकता येईल. जॅक्सन होल चे यजमानपद यूएस फेडरल रिझर्व्ह कडे असते. सगळ्या जगातून बँकर्स ,अर्थशास्त्रज्ञ, धोरण ठरवणारे आणि पत्रकार येथे येतात या बैठकी मध्ये काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष असल्याने काल अमेरिकन मार्केट मंदीत होते. अमेरिकेमध्ये PMI डेटा 53.3 आला, वॉलमार्ट चा रिझल्ट कमजोर आला, EPS कमी झाले खर्च वाढत आहे त्यामुळे शेअर मंदीत गेला जॉबलेस क्लेम डेटा वाढला inventory वाढली याचा अर्थ मालाला मागणी नाही
मर्क, ट्रॅव्हलर्स ,जॉन्सन, मायक्रोसॉफ्ट, बोईंग, व्हेरी झोन हे शेअर तेजीत होते तर विजा, जेपी मॉर्गन, एप्पल, सेल्स फोर्स हे शेअर मंदीत होते
एन आय आय टी लर्निंगने तिच्या आयर्लंड येथील सबसिडीयरीसाठी 15.75 मिलियन युरोची कॉर्पोरेट गॅरंटी आयसीआयसीआय युके बँकेला 15 बिलियन युतीच्या टर्म लोन साठी दिली
Waaree एनर्जी – Enel ग्रीन पॉवर इंडियाच्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत
सिटी युनियन बँकेने दिल्लीला नवीन शाखा उघडली आता त्यांच्या 887 शाखा झाल्या
विप्रो – Harman कनेक्टेड सर्विसेसचे एक्वेजीशन 375 बिलियन डॉलरला करणार आहे
Texmaco रेल ला 130 कोटीची ऑर्डर मिळाली
इनोव्हा captab – ही वीस बिघा जमीन घेणार आहे त्यातील 16 बिघा जमीन हिमाचल प्रदेशात आहे
D Mart – गंगा शहर रोड बिकानेर येथे नवीन स्टोअर उघडले आता स्टोअरची संख्या 429 झाली
Titaghar wagan ला गार्डन रिच शिप बिल्डर कडून 467 कोटीची ऑर्डर मिळाली
उषा मार्टिन 10.11 एकर जमीन आणि मशीनरी 29.52 कोटी ला विकणार आहे ही जमीन Sriperumbudur तामिळनाडू येथील आहे
SJVN – बक्सर थर्मल पॉवर प्रोजेक्टचा 1320 MW चा टप्पा पूर्ण झाला
श्री जी शिपिंग, जेम aromatics, विक्रम सोलर, पटेल रिटेल या कंपन्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला पण मंगल इलेक्ट्रिकल्सला माफक रिस्पॉन्स मिळाला
अपोलो हॉस्पिटलच्या शेअर मध्ये ब्लॉक डील झाले 7850 रुपये प्रति शेअर भावाने 1.32% स्टेक म्हणजेच
18.97 लाख शेअर्स विकले त्यातून प्रमोटरला 1489 कोटी रुपये मिळाले
अपोलो मायक्रो सिस्टीमला डी आर डी ओ कडून 25 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली
हेल्थ इन्शुरन्सच्या.प्रीमियम वर IRDAI मर्यादा निश्चित करू शकते.तसेच हेल्थ इन्शुरन्स चा पोर्टफोलिओ आणि प्रॉडक्ट्स वर मर्यादा निश्चित करू शकते.
बजाज ऑटो ने सांगितले की फेस्टिव्ह सिझनमध्ये चेतक EV स्कूटर डिलिव्हरी साठी तयार असेल. रेअर अर्थ मॅग्नेटची उपलब्धता निश्चित केली आहे. रेअर अर्थ मॅग्नेटचा पुरेसा साठा कंपनीजवळ आहे. ग्लोबल सप्लाय चेन संबंधित चिंता कंपनीसाठी समाप्त झाली आहे
कमिन्स ने ICICI prudential चे 2.18 लाख शेअर्स विकले.
मून शाईन टेक्नॉलॉजीने ऑनलाइन ऑपरेशन बंद केले या कंपनीत 46 .07% स्टेट नजारा या कंपनीचा आहे
रिलायन्स इन्फ्रा पुणे सातारा टोल रोड 2000 कोटीला विकणार आहे
वोडाफोन आयडियाला सरकारकडून AGR संबंधात रिलीफ पॅकेजची शक्यता आहे म्हणून शेअर वाढला
ओरिएंटल रेल इन्फ्रा ला BG BOGIE wagons ला लागणाऱ्या कॉन्स्टंट साईड बेरर्स साठी भारतीय रेल्वेकडून 60 कोटींची ऑर्डर मिळाली
मिनी डायमंड इंडिया लिमिटेड ने 3750 नवीन डिझाईन Introduce केली
Edelweiss ह्या कंपनीने 15% स्टेक वेस्ट ब्रिज कॅपिटलला विकण्यासाठी करार केला
BSE निर्देशांक सेन्सेक्स 81306,NSE निर्देशांक निफ्टी 24870 आणि बँक निफ्टी 55149 वर बंद झाले

भाग्यश्री फाटक्
bpphatak@gmail.com. 9699615507

आजचं मार्केट – २१ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ ६७.१८ प्रती बॅरलच्या तर रुपया US $ १=Rs. ८७.२७ च्या आसपास तर US $ निर्देशांक ९८.१९ USA १० वर्षे बाँड yield. ४.३० Vix.11.55 च्या आसपास होते. सोने Rs.९९०५० तर चांदी Rs.११२७०० च्या आसपास होते. बेस मेटल पैकी झिंक आणि अल्युमिनियम तेजीत तर कॉपर मंदीत होते.

फॉरेन इन्व्हेस्टरची आज Rs 1100 कोटीची विक्री होती तर डोमेस्टिक इन्वेस्टरची ते Rs 1806 कोटीची खरेदी होती

अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजीचे शेअर मंदीत गेले. एप्पल, अल्फाबेट, अमेझॉन हे शेअर पडले. ट्रम्पनी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नर लिसा कूक हिला राजीनामा देण्यास सांगितले.

आज क्लीन सायन्स मध्ये प्रमोटर २४% स्टेक Rs १०३० प्रती शेअर या भावाने Rs २६२६ कोटींना विकणार होते.
पण आज क्लीन सायन्सच्या बाबतीत गोंधळ उडाला 25% शेअर्स ऐवजी 56% शेअरची ऑर्डर पंचिंग झाली पण ही ऑर्डर पंचिंग एरर होती ब्रोकरने सुद्धा ६ कोटी शेअर्सचे ट्रेडिंग झाले असा रिपोर्ट दिला. गोंधळ झाला प्रथम शेअर पडला नंतर शेअर सावरला कंपनीने सांगितले की फक्त दोन पॉईंट पाच कोटी शेअर्स मध्ये व्यवहार झाला ट्रेड डेटाच्या रिपोर्ट मध्ये चूक होती तर हे रिपोर्टिंग किती महत्त्वाचे असते हे यामुळे कळले
श्री सिमेंट ला 2019 ते बावीस साठी टॅक्स डिमांड Rs. 588.65 कोटीची केली होती ती नंतर Rs 221.72 कोटीची करण्यात आली
अल्ट्राटेक सिमेंट ही इंडिया सिमेंट मधील 6.49%स्टेक 368 रुपये भावाने OFS च्या माध्यमातून विकण्यासाठी मंजुरी मिळाली
जुपिटर वेगन Tatravagonka रेल व्हील फॅक्टरी यांना 5376 वंदे भारत ट्रेन साठी 5376 व्हील सेट सप्लाय करायला LOI मिळाले Rs 215 कोटीची ही ऑर्डर आहे
रेलटेललाओरिसा एज्युकेशन खात्याकडून Rs15.42 कोटीची तर केरळ मधून ते 34.99 कोटीची ऑर्डर मिळाली
गोदरेज प्रॉपर्टी यांनी कुकटपल्ली येथे 7.8 एकर जमीन रोज. 527 कोटी ला घेण्यासाठी बीड दिले
फोर्टीज हेल्थ केअर आणि एकता ग्रुप मिळवून 550 बेडचे हॉस्पिटल उभे करणार आहेत
जी एस टी च्या मिटीग मध्ये विम्या वरील जीएसटी काढून टाकण्याच्या मताचे सर्वजण होते त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्सच्या शेअर मध्ये तेजी होती
Ujaas एनर्जी 26 ऑगस्टला बोनस वर विचार करणार आहे
PTC इंडस्ट्रीजला ब्रह्मोस एरोस्पेस कडून क्रिटिकल टायटॅनियम कास्टिंग साठी Rs १०० कोटींची ऑर्डर मिळाली. ही कास्टिंग्स सुपरसोनीक क्रुझ मिसाईल प्रोग्रॅम मध्ये वापरण्यात येतात.
फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टर संबंधित वेळेची मर्यादा बदलण्यासाठी सेबी कन्सल्टेशन पेपर देणार आहे
साप्ताहिक कॉन्ट्रॅक्ट ऐवजी मासिक कॉन्ट्रॅक्टचा प्रस्ताव सेबीनी स्टॉक एक्सचेंज दिला आहे यामुळे volume वर परिणाम होईल म्हणून BSE ,MCX, CDSL, NSDL, angel हे शेअर मंदित गेले
TVS मोटर्सने लॉजिस्टिक्स TVS King कार्गो HD EV लाँच केली.
आज फार्मा, ऑइल & गॅस, रिॲलिटी मधे खरेदी तर FMCG, एनर्जी,PSE मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ८२००० NSE निर्देशांक निफ्टी २५०८४ बँक निफ्टी ५५७५५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

bpphatak@gmail.com .

९६९९६१५५०७

आजचं मार्केट – २० ऑगस्ट २०२५

आज एफ आय आय ची रु. 634 कोटीची विक्री होती तर डी आय आय ची रु 2261 कोटीची खरेदी होती अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजीचे शेअर मंदीत गेले. फक्त इंटेलचा शेअर वाढत होता. अमेरिकन सरकार intel मध्ये दहा टक्के हिस्सा घेणार आहे. सॉफ्ट बँक दोन बिलियन डॉलर ची गुंतवणूक या कंपनीत करणार आहे स्टील आणि aluminium चा tarriff स्पॅन वाढवला आता 400 प्रॉडक्टचा समावेश होईल

UK चा Core CPI 3.8 आला
क्रूडचा भाव प्रत्येक बॅरलला 66 डॉलर तर डॉलर इंडेक्स 98.36 वर होता vix- 11 87 तर बाँड yield 4.31 होते
सोन्याचा भाव 101780 रुपये तर चांदी 115000 होती
जी एन जी इलेक्ट्रॉनिक्स याचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट , रेव्हेन्यू, मार्जिन या सर्व गोष्टी वाढल्या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स बाजार या तिच्या subsidiary ला वर्किंग कॅपिटल फॅसिलिटी साठी सेक्युरिटी म्हणून दुबईच्या कमर्शियल बँकेला ए इ डी पाच बिलियन एवढी कॉर्पोरेट गॅरंटी इशू केली एकंदर 15 बिलियन कॉर्पोरेट गॅरंटी दिली
बॉम्बे dying नी महाराष्ट्र स्टेट टॅक्स tribunal विरुद्धची केस जिंकली
LLOYDS मेटल अँड एनर्जी – Tandsi III आणि Tandsi III extension कुकिंग कोल माईनसाठी
सक्सेस फुल bidder ठरली 338 हेक्टर एरिया आणि 23 मिलियन मेट्रिक टन reserves तेथे आहेत
वेदांताचा आर्म भारत ऍल्युमिनियम यांना 80.96 लाख एवढी पेनल्टी 2012 2013 साठी लावली
Servotech या कंपनीला 28. 84 कोटीची ऑर्डर मिळाली
डायनॅमिक केबल – हाय कण्डक्टिव्हिटी ॲल्युमिनियम alloy स्टँडर्ड कंडक्टरचे उत्पादन करण्यासाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड ची संमती मिळाली
हिरो मोटो -Glamour X 125 लॉन्च केली
आय आर एफ सी या कंपनीने सुरत मधील multi modal ट्रान्सपोर्ट हबला Rs 200 कोटी लोन मंजूर केले
सरकार Rs 62 हजार कोटी खर्च करून फायटर जेट
97 LEA mark 1A खरेदी करणार आहे पण यामध्ये 65 टक्के भारतीय सामान असले पाहिजे
ओरिसा मध्ये सहा लेन रिंग रोड साठी सरकार ने Rs 8307 कोटी रुपये मंजूर केले
FMCG, Metal ,IT ,reality हे सेक्टर तेजीत होते फार्मा ऑटो,बँक मंदीत होते
BSE निर्देशांक सेन्सेक्स 81857, NSE निर्देशांक निफ्टी 25050, बँक निफ्टी 55698 होते

भाग्यश्री फाटक

bpphatak@gmail.com .

९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १९ ऑगस्ट २०२५

आज फॉरेन इन्वेस्टरची रु.551 कोटीची खरेदी होती तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी Rs.4104 कोटी होती

डॉलर इंडेक्स 98 होता बाँड yield 4.33 होते क्रूड ६६.४२ होते विक्स 11.91रुपया US$१=Rs.८७.११च्या आसपास होते. सोने एक लाख एक हजार 775 या भावाला होते तर चांदी एक लाख 13 हजार दोनशे पंचेचाळीस या भावाला होती
अमेरिकन मार्केट फ्लॅट बंद झाले आता सगळ्यांचे लक्ष जॅक्सन होल च्या मिटिंगकडे आहे 21 ऑगस्ट 23 ऑगस्ट या काळात ही मिटीग आहे शुक्रवारी रिटेल सेल्स चा डेटा चांगला आला पण महागाई वाढण्याची भीती आहे. होम बिल्डर्स चा डेटा कमजोर आला. युक्रेन नाटोचा मेंबर नाही तरी अमेरिका युक्रेनला सुरक्षा देईल युक्रेनमध्ये नाटोचे सैन्य ठेवण्यास रशिया तयार नाही. पुढील दोन आठवड्यात पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यात वार्ता होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ट्रम्प आणि पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातही बातचीत होईल
रिलायन्स कंजूमर प्रॉडक्टनी natuerage Beverages बरोबरच्या JV मध्ये majority stake घेतला
हिंदुस्थान झिंक — 3823 कोटीची गुंतवणूक करून दहा एम टी पी ए कपॅसिटीच्या Lailings रिप्रोसेसिंग प्लांट लावणार आहे हा प्लांट 28 महिन्यात पूर्ण होईल
Trent – BURNT TOAST या ब्रँडचे पहिले स्टोर सुरतला सुरू केले
एस बी आय कार्ड – बँक ऑफ महाराष्ट्र एसबीआय कार्ड लॉंच केले
वेदांता – 21 ऑगस्ट रोजी दुसऱ्या इंटरिम dividand वर विचार करण्यासाठी बैठक घेणार आहे
एम टी पी सी – 2032 पर्यंत सात लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे
BEL – डिफेन्स साठी डिफेन्स मिसाईल सीस्टीम आणि त्याचे ४ व्हेरियंट बनवणार आहे
कार्लेक्स मायक्रो ला मध्यप्रदेश मधील रेल्वे रूट वर कवच सेफ्टी सिस्टीमसाठी 151 कोटीची ऑर्डर मिळाली ही ऑर्डर 600 दिवसात पूर्ण करायची आहे
सरकारने रॉ कॉटन वरील अकरा टक्के इम्पोर्ट ड्युटी 30 सप्टेंबर पर्यंत रद्द केली याचा फायदा वर्धमान टेक्सटाईल, गोकुळदास, वेलस्पन , सियाराम , नाहर स्पिनिंग ,इंडो काउंट यांना होईल
सारडा एनर्जी — ही सेंदुरी कोल माईनसाठी यशस्वी बिल्डर ठरली
रेअर अर्थ मॅग्नेट वरील निर्यात बंदी उठवण्याचे आश्वासन चीन सरकारने दिले याचा फायदा ऑटो सेक्टर मधील कंपन्या त्याचप्रमाणे ऑटो ancillary कंपन्याना होईल
Alembic फार्मा MACINTENTAN च्या १० मिली ग्राम टॅबलेटला USFDA ची मंजुरी मिळाली याचे यु एस डॉलर अकराशे मीलियन चे मार्केट आहे
TCS ने New AI enhanced सेंटर Latin अमेरिकेत लाँच केले.
ब्ल्यू स्टोन ज्वेलरी चे BSE वर Rs Rs.५०८.८० आणि NSE वर Rs ५१० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs ५१७ ला दिला होता.
एअर इंडिया आणि ऑइल इंडिया बरोबर एविएशन फ्युएल सप्लाय साठी करार केला.

तेल,गॅस,FMCG,bank,auto, energy आणि मेटल तेजीत बंद झाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ८१६४४ NSE निर्देशांक निफ्टी
२४९८० बँक निफ्टी ५५८६५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

bpphatak@gmail.com .

९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १८ ऑगस्ट २०२५

डॉलर इंडेक्स 98 , क्रूड 65.87, 87 रुपये 36 पैसे प्रती एक डॉलर, विक्स 12 .34 , सोने 102420 रुपये तर चांदी 117000 होती, बाँड yield 4.29होते

केईसी इंटरनॅशनलला 1402 कोटीची ऑर्डर मिळाली

गोदरेज प्रॉपर्टी चे नेट डेट वाढले हे डेट 42 टक्क्याने वाढवून 4,637 कोटी झाले डेट इक्विटी रेशियो 0.26 झाला
वेदांतने स्कीम ऑफ अरेंजमेंट modification prior संमती न घेता केले म्हणून सेबीने warning नोटीस दिली
आयसीआयसीआय ने ऑल टाइम प्लास्टिकचे दहा कोटी रुपयाचे शेअर विकले
इ एम एस ला आग्रा वॉटर सप्लाय प्रोजेक्टसाठी यूपी जलनिगम कडून 104 कोटीची ऑर्डर मिळाली
आर व्ही एन एल ला सिग्नलिंग आणि टेलिकॉम साठी इरकॉनकडून 179 कोटीची ऑर्डर मिळाली
सर्विसेस टॅक्स dispute संबंधातील नियमामुळे shipping कॉर्पोरेशनला 146 कोटीचा रिलीफ मिळाला
ए बी डी एलने – गुड बॅरल डिस्टिलरी मधील 51% स्टेक घेण्याचा प्लान रद्द केला
अलेबिक फार्मा -TRETINOIN CREAM यु एस पी ०.०२५,% याला USFDA कडून अंतिम संमती मिळाली
KPIT टेक्नॉलॉजी – केअरसॉफ्ट ग्लोबल टेक्नॉलॉजी,
केअर सोफ्ट इंजीनियरिंग, केअर glo tech घेण्यासाठी 51 बिलियन डॉलर्स दिले
पू ना गाडगीळ यांनी जळगावला महाराष्ट्रात रिंग रोड येथे नवे स्टोअर उघडले
अतिरिक्त tarrif हटवले जातील जीएसटी चे रिपोर्ट होतील विम्यावर शून्य ते पाच टक्के जीएसटी लागेल
SIN goods च्या पाच ते सात आयटमवर 40% जीएसटी लागेल ऑनलाइन गेमिंग वर 40% जीएसटी लागेल जीएसटीवर सेस लागणार नाही
नॉन अलॉय स्टील प्रॉडक्टवर अँटी डम्पिंग ड्यूटी सुरू राहील ही ड्युटी तीन वर्षासाठी असेल सप्टेंबर 2025 पर्यंत बारा टक्के, दुसऱ्या वर्षी साडेअकरा टक्के, तिसऱ्या वर्षी 11 टक्के असेल PVC suspention resin वर अँटी डम्पिंग ड्यूटी पाच वर्षांसाठी लावली याचा फायदा सुप्रीम इंडस्ट्री ऍस्टरल, फिनोलेक्स, chemplast sanmaar
आता जहाजांना स्ट्रक्चर चा दर्जा दिला जाईल त्यासाठी जहाज कमीत कमी 24 मीटर लांबीचे असले पाहिजे याचा फायदा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,G E shiping ,गार्डन रिच शिप बिल्डर ,या कंपन्यांना होईल
अमेरिकन मार्केट तेजीत होते महागाई कमी झाली सप्टेंबर मध्ये व्याजाचा दर fed कमी करेल अशी आशा वाटू लागली या वातावरणाचा परिणाम भारतावरही दिसला भारतीय मार्केट तेजीतच उघडले तेजी होती
मार्क्सन फार्मा च्या आर्मला METFORMIN HYDROCHLORIDE या औषधाला ब्रिटिश रेग्युलेटरी authority कडून मंजुरी.
प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलेल्या कंपन्या – बोरोसिल,
गल्फ ऑइल, रेड टेप, आयनॉक्स विंड, हिंदुस्तान ऑइल, अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट,
प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले पण रेवेन्यू वाढला अशा कंपन्या – स्वान एनर्जी, जिंदाल वर्ल्ड वाईड, वोडाफोन,
पतंजली फूड, ग्लेनमार्क फार्मा, जमुना ऑटो,
प्रॉफिट मार्जिन वाढले पण रेवेन्यू कमी झाला अशा बी कंपन्या – ला ओपाला
वेल्लोर इस्टेट – तोट्यातून फायद्यात आली 13.6 कोटी तोटा होता आता 12.5 कोटी फायदा झाला रेव्हेन्यू वाढला
नॅशनल फर्टीलायझर – लॉस वाढला रेवेन्यू कमी झाला मार्जिन वाढले फायनल डिव्हीदंड एक रुपया 56 पैसे दिला
टिप्स फिल्म – ही तोट्यातून फायद्यात आली 6.7 कोटी तोटा होता तो 4.74 कोटी फायदा झाला रेवेन्यू वाढला मार्जिन 7.41% झाले
ग्लोब सिविल प्रोजेक्ट – हरियाणा क्रिकेट असोसिएशन कडून इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम साठी 222 कोटीची ऑर्डर मिळाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स 81273 NSE निर्देशांक निफ्टी 24876 बँक निफ्टी 55734 वर बंद झाले

भाग्यश्री फाटक.

bpphatak@gmail.com .

९६९९६१५५०७

आजचं मार्केट – १४ ऑगस्ट २०२५

आज क्रूड US $ ६४.९९ प्रति बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs.८७.५६ च्या आसपास होते.US $ निर्देशांक ९७.७८ USA १० वर्षे बाँड yield ४.२१ VIX १२.३६ च्या आसपास होते. सोने Rs १०२६७५ आणि चांदी Rs ११६००० च्या आसपास होती.बेस मेटल मंदीत होते.
FII नी Rs.३६४४ कोटींची विक्री तर DII नी ५६२४ कोटींची खरेदी केली.
आज JSW सिमेंट चे BSE वर Rs.१५३ आणि NSE वर
Rs.१५३.५० vr लिस्टिंग झाले.हा शेअर IPO मध्ये Rs.१४७ ला दिला होता.
ऑल टाइम प्लास्टिक चे BSE वर Rs ३१४.३० आणि NSE वर Rs.३११.३० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs.२७५ ला दिला होता.
भारताचा WPI – ०.१३% वरून – ०.५८% एवढा
झाला. होलसेल महागाई कमी झाली.

Shilpa मेडिकल एका शेअरला एक शेअर बोनस दिला

विप्रो आणि गुगल क्लाऊड मिळवून अर्जेंटिक ए आय सोल्युशन लॉन्च करणार आहेत
हिंदुस्थान ग्राफाईट ले सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट बरोबर करार केला ग्राफाईट ॲडव्हान्स पेव्हमेंट वापरणे आणि रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये क्रांती करणे हा हेतू आहे
Refex – 47 कोटी रुपयांची ऑर्डर pond ash ट्रान्सफर करण्यासाठी मिळाली
जैन इरिगेशनला 135 कोटीची ऑर्डर ५४३८ सोलर वॉटर पंप distribute करण्यासाठी MSED कडून मिळाली
डी मार्ट ने नागपूर येथे नवे स्टोर उघडले आता स्टोअरची संख्या 428 झाली
झायडस लाईफ च्या अहमदाबाद युनिट ची 11 ते 13 ऑगस्ट तपासणी झाली त्यामध्ये झिरो ऑब्झर्वेशन मिळाले पण हिमाचल युनिटची ४ ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळात तपासणी झाली त्यात चार त्रुटी दाखवल्या
SAMHI ही कॅश पिया हॉटेल बिझनेस अंडरटेकिंग ६५ कोटी ला ट्रान्सफर करणार
RVNL- 90 कोटींच्या व्हिडिओ सर्वेला सिस्टीम साठी LOA मिळाले
एचडीएफसी बँकेला शेअर प्रीमियम अकाउंट बोनस इशू साठी वापरण्याची परवानगी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने दिली
आय सी आय सी आय बँकेने minimum बॅलन्स च्या अटी कमी केल्या अर्बन विभागासाठी ५० हजारावरून १५००० तर सेमी अर्बन विभागासाठी दहा हजारावरून 7500 लिमिट केली
CDSL- सी डी एस एल वेंचरचे स्वतंत्र बिजनेस युनिट स्थापन करायला SEBI ने NOC दिली
प्रिझम जॉन्सन यांनी जबलपूर सिमेंट इंडस्ट्रीला सिमेंट पुरवण्यासाठी करार केला त्यामुळे ते मध्य प्रदेश प्लांटची कपॅसिटी एक पॉईंट झिरो आठ वरून एक पॉईंट 38 बॅटरी MTPA इतकी वाढवतील
थरमॅक्स ही तिचा आर्म थरमॅक्स बायो एनर्जी सोल्युशन मध्ये 23 टक्के स्टेक 16.7 कोटी ला घेणार आहे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यानी क्रिटिकल ड्रगवर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर पास केली सहा महिन्याचा एपीआय स्टॉक करणे गरजेचे आहे जरुरीच्या औषधांचा पुरवठा आवश्यक तेवढा असला पाहिजे 26 क्रिटिकल लिस्ट करायला सांगितले रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि ट्रम्प यांच्यामध्ये उद्या बैठक होणार आहे रशिया युक्रेन तणाव कमी करणे आणि सिझफायरची स्थिती निर्माण करणे हा हेतू आहे जमिनीच्या बाबतीत कोणतीही बातचीत होणार नाही
प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जीन सर्व वाढलेल्या कंपन्यांची नावे –
(१) फायझर (२) IRCTC (३) शिवालिक बायमेटल्स (४)Endurance (५) VMM (६)BPCL(स्टॅण्डअलोन QOQ) (७) शिल्पा मेडिकेर(८) Astra मायक्रोवेव (९)कावेरी seeds (१०) Insecticide इंडिया (११) अवंती फीड (१२) गोदरेज इंडस्ट्रीज (१३) SAMHI हॉटेल्स (१४) मिश्र धातू निगम (१५) कन्सोलीडेटेड YOY अनुपम रसायन (१६) Kenna मेटल्स (१७) R सिस्टीम (१८) अशोक लेलँड (१९) IRB infraa (२०) विनती ऑरगॅनिक(२१) हिंदुस्थान कॉपर
खालील कंपन्यांचे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन कमी झाले.
(१) ISGEC (२) HG इन्फ्रा (३) सूर्या रोशनी (४) PNC इन्फ्रा (५) भन्साळी ENGG (६) दीपक नायट्रेट(७) सुप्रिया लाइफसायन्सेस्ट (७) TEXMACO (८) मान इन्फ्रा (९) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (१०)TCI एक्सप्रेस
खालील कंपन्यांचे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
(१) व्हेंटिव्ह हॉस्पिटॅलिटी (२)ANTHEM बायो (३) गल्फ ऑईल (४) Somany सिरॅमिक (५) jubilant फूड (६)ब्रिगेड (७) ETHOS
खालील कंपन्यांचे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
(१) Cohans लाइफ (२) SHALBI (३) कॅम्पस अँक्टिव(४) GALAXI सरफेकटनट (५) USL(६) गणेश इको (७) वेसूवियस (८) JTEKT (९)इंडो स्टार चे प्रॉफिट वाढले,NII वाढले,(कंपनीला Rs ११७६ कोटी वन टाइम उत्पन्न झाले)
(१) इंजिनियर्स इंडिया (२) अमर राजा बॅटरी चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले
Fiem इंडस्ट्रीज चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन फ्लॅट राहिले.
मुथुट फायनान्स चे प्रॉफिट वाढले NII वाढले.
Dredging कॉर्पो चा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
ITI चा तोटा कमी झाला, उत्पन्न कमी झाले, EBITDA लॉस होता.
CSB बँकेचे प्रॉफिट वाढले NII वाढले GNPA आणि NNPA वाढले. प्रोविजन वाढली
ABFRL चा तोटा वाढला, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढल
UFLEX तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
NUWAMA चे प्रॉफिट वाढले NII फ्लॅट होते
अल्काईल अमाईन्सचे प्रॉफिट फ्लॅट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
उषा फायनांशियाल्स ने १:१ बोनस शेअर इशू जाहीर केला.
Nava चे प्रॉफिट कमी झाले,उत्पन्न कमी झाले, मार्जिन वाढले
इन्फोसिस TELSTRA VERSENT मधे RS.१३०० कोटींना स्टेक घेणार आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ८०५९७ NSE निर्देशांक निफ्टी
२४६३१. बँक निफ्टी ५५३४१ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक.

bpphatak@gmail.com .

९६९९६१५५०७