Monthly Archives: September 2025

आजचं मार्केट – ३० सप्टेंबर २०२५

नमस्कार

आज फॉरेन इन्वेस्टरची Rs 2831 कोटीची विक्री तर डोमेस्टिक इन्वेस्टरची Rs 3845 कोटीची खरेदी होती. ओपेक+ कंट्रीज नोव्हेंबर मध्ये क्रूडचे उत्पादन वाढवणार आहेत.त्यामुळे कृडचा भाव चार टक्के घसरून 67. 61 डॉलर प्रत्येक बॅरलला एवढा झाला.
अमेरिकन मार्केटमध्ये तेजी होती. पण त्यांना shut down होण्याची भीती सतावत आहे. रिपब्लिकन पार्टीला 60 मते हवी आहेत पण सध्या त्यांच्याकडे त्रेपन्न मते आहेत. आज संध्याकाळी पूर्ण चित्र स्पष्ट होईल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिल्म आणि फर्निचर वर शंभर टक्के tarriff 14 ऑक्टोबर पासून लावला जाईल असे सांगितले.
IRFC ने सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी हरियाणाला Rs 5929 कोटी तर महाराष्ट्राला Rs.10560 कोटी फायनान्सिंग केले
BEL ला 16 सप्टेंबर 2025 नंतर Rs1092 कोटीच्या नव्या ऑर्डर मिळाल्या.
MAN Industry या कंपनीला आणि तिच्यातील टॉप एक्झिक्युटिव्हना दोन वर्षे सेक्युरिटी मार्केटमध्ये व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली.
JSW infra कंपनीला Rs.96 कोटीची जीएसटी नोटीस मिळाली
गोदरेज ॲग्रोवेटने ASTECH लाइफ सायन्सच्या संबंधात डिस्क्लोजर दिले नाही म्हणून सेबीने warning लेटर दिले.
महिंद्रा अँड महिंद्रा त्यांचा Sampo मधील सर्व स्टेक कंपनी विकणार आहे याचे 5 मिलियन युरो मिळतील म्हणजेच साधारण 52 कोटी रुपये मिळतील हा व्यवहार सहा ऑक्टोबरला पूर्ण होईल.
रिलायन्स पॉवर इंडोनेशियन कोल सबसिडीयरी 12 मिलियन डॉलर ला विकणार आहे.
टाटा स्टील आणि डच सरकार या दोघांनी मिळून CO2 स्टील आणि हेल्थ मेजर्स संबंधी करार केला.
P N गाडगीळने लाईट वेट ज्वेलरी एक्सप्लोरेशन साठी नागपूरला शोरूम उघडले.
BEML कंपनी स्टॉक स्प्लिट करणार आहे त्याची तीन नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट आहे.
थॉमस कुकने टुरिझम मंत्रालयाबरोबर भागीदारी केली.
ग्लोबस स्पिरिटने फर्स्ट प्रीमियम व्होडका लॉन्च केली.
डी मार्टने दिल्लीला नवे स्टोर उघडले आता एकंदर स्टोअर ची संख्या 431 झाली.
मंगलोर केमिकलने झुवारी ऍग्रो चे महाड प्लांटचे असेट्स Rs 72.75 कोटीला घेतले.
फिनिक्सचे रेंटल इन्कम १८ टक्के वाढून १९५१ कोटी रुपये झाले तर कन्जम्पशन 21 टक्क्यांनी वाढले.
शेषशाही टेक याचे लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ४३६ रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 432 रुपयाला झाले. हा शेअर IPO मध्ये IPO 423 रुपयाला दिला होता
आनंद राठी या शेअरचे लिस्टिंग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 432 रुपये दहा पैशाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 432 रुपयाला झाले हा शेअर IPO मध्ये Rs 414 ला दिला होता.
जारो इन्स्टिट्यूट या कंपनीच्या शेअरचे लिस्टिंग फ्लॅट झाले. बीएससी आणि एनएससी वर 890 रुपयाला लिस्ट झाले हा शेअर IPO मध्ये 890 रुपयालाच दिला होता.
सोलार वर्ल्ड या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग 389 रुपयाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ३८८ रुपयाला झाले हा शेअर IPO मध्ये 351 रुपयाला दिला होता.
ऑगस्ट आयआयपी डेटा 3.5% वरून चार टक्के झाला. पण IIP वाढण्याचा वेग कमी झाला
नुवामा आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे गिफ्ट सिटी पुरतेच झिरो डे एक्सपायरी करणार आहेत. 13 तारखेपासून डेली एक्सपायरी होईल.
सरकारने Acoustic vehicle alerting सिस्टीम सक्तीची केली ही सिस्टीम इलेक्ट्रिक पॅसेंजर आणि गुड व्हेईकलला सक्तीची केली. एक ऑक्टोबरपासून हा नियम लागू होईल याचा फायदा Uno minda ला होईल.
ब्लू डार्ट एक जानेवारी 2026 पासून शुभेच्छा वाढवणार आहेत म्हणून शेअर तेजीत होता.
आज एक्सपायरी होती त्यामुळे मार्केट खूपच दोलयमान होतं तेजी मंदीचा खेळ चालू होता उद्या काय होतंय ते बघावं लागेल

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २९ सप्टेंबर २०२५

नमस्कार

आपण प्रथम अमेरिकन मार्केटचा आढावा घेऊ अमेरिकन मार्केट तेजीतच होते. महागाईचे आकडे अपेक्षेनुसार आले. पीसीई 2.90 आला. कंजूमर सेंटीमेंट 55.1 आला पण फॉरेन इन्वेस्टर्सनी भारतीय मार्केटमध्ये Rs5,688 कोटीची विक्री केली तर डोमेस्टिक इन्वेस्टर्स Rs 5843 कोटीची खरेदी केली. 5 ऑक्टोबरला ओपेक ची बैठक आहे.
पी एम ई ड्राईव्हच्या अंतर्गत सरकारी ऑफिस, हॉस्पिटल, कॉलेज या सर्व ठिकाणी पब्लिक इ व्ही चार्जिंग स्टेशन जर लावलं तर त्याच्या मध्ये शंभर टक्के सबसिडी सरकार देणार आहे आणि Bhel ची या प्रोजेक्टसाठी एजन्सी म्हणून नेमणूक केली आहे. Hikal या कंपनीला USFDA कडून वार्निंग नोटीस मिळाली जीगाणी या बंगलोर युनिटची तपासणी फेब्रुवारी 2025 मध्ये केली होती येथे मिळालेल्या एपीआय मध्ये धातूची भेसळ झालेली आढळली. कंपनीची CAPA सिस्टीम (करेक्टिव्ह.अँड प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन) सिस्टिम परिणामकारक आढळली नाही. तसेच उपकरण स्वच्छते विषयी उपाय अपूर्ण असल्यामुळे एपीआय मध्ये अनावश्यक मटेरियल त्यांच्या प्रॉडक्ट मध्ये मिळाले.
आज ऑइल मार्केटिंग कंपनीमध्ये तेजी होती. कारण विंड फॉल टॅक्स लावण्याचे धोरण बंद झालेले दिसते. त्याचबरोबर ऑइल मार्केटिंग कंपनीच्या प्रॉडक्टच्या किंमती स्थिर होण्याकडे भर दिला जात आहे म्हणून बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसी यांच्या शेअर मध्ये तेजी आढळली. 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत टाटा कॅपिटल चा आयपीओ येत आहे 21 कोटीचा फ्रेश इशू तर 26.6 कोटीचा OFS आहे एकूण इशू 15511.87कोटी रुपयाचा हा IPO आहे ३१० ते ३२६ हा प्राइस बँड आहे 46 शेअरचा प्लॉट आहे आणि दर्शनी किंमत दहा रुपये आहे फ्री आयपीओ मार्केट पेक्षा बऱ्याच कमी भावाला हा आयपीओ आला आहे फ्री आयपीएल मार्केट मध्ये अकराशे रुपयाला सुद्धा लोकांनी शेअर खरेदी केले आहेत आत्तासुद्धा साडेसातशे ते आठशे भावांनी शेअर दिले जात होते. HDFC Bank या बँकेची एक शाखा दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर येथे आहे. दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस ऑथॉरिटी त्यांना नोटीस दिली आहे. 25 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या नव्या क्लायंटची ऑन बोर्डिंग प्रोसेस पूर्ण झाली नाही त्यांना सेवा पुरवता येणार नाहीत असे सांगण्यात आले. . दालमीया भारत शुगर टांझानिया मध्ये शुगर प्लांटेशन आणि शुगर फॅक्टरी सुरू करणार आहेत. निफ्टी मध्ये इंडिगो आणि मॅक्स हेल्थ यांचा समावेश होईल तर हिरो मोटो आणि इंडसइंड बँक यांना वगळले जाईल. भारतीय एअरटेल आणि इन्फोसिसचे वेटेज कमी केले तर आयटीसी, बजाज फिनसर्व आणि स्टेट बँक यांचे वेटेज वाढवले
ब्रिगेड AMG info park मध्ये शंभर टक्के स्टेका
13.4 कोटी ना घेणार आहेत. ब्रिगेड हॉटेल वेंचरला तेलंगणा येथील १.३१ एकर जमीन 100 कोटी ला विकणार आहेत .
NFL ला Rs.116 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली
BDL 31 ऑगस्ट 2025 अखेर कंपनीचे ऑर्डर बुक २३०२९ कोटी झाले.
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल आणि कमर्शियल व्हेईकल विभागाच्या डीमर्जरला एनसीएलटी कडून मंजुरी मिळाली. प्रभावी तारीख एक ऑक्टोबर ही ठेवली आहे.
IDFC पतरातू विद्युत उत्पादन निगम ही एनटीपीसी ची सबसिडीयरी आहे हिला Rs.3388 कोटीची मदत IRFC ने केली
Chambal कंपनीला Rs 527 कोटीची पेजरची ऑर्डर पाटणाच्या सीजीएसटी आणि सेंट्रल एक्साईज खात्याकडून मिळाली.
पी जी इलेक्ट्रोप्लास्ट कंपनीच्या सबसिडीअरी ने ५० एकर जमीन 1000 कोटी रुपयाला आंध्रप्रदेशात घेतली. येथे १.२ मीलियन रेफ्रिजरेटरर्स प्रत्येक वर्षी बनवले जातील. डिसेंबर 2026 पासून उत्पादन सुरू होईल.
जिंदाल स्टीलचा ओरिसामध्ये अंगुल येथे प्लांट सुरू झाला ५ MTPA ब्लास्ट furnace तयार होईल. हॉट मेटल कपॅसिटी ४ MTPA वरून ९ MTPA होईल.
HDB फायनान्शियल या कंपनीच्या शेअर होल्डरचा तीन महिन्याचा लॉकइन पिरियड संपला. त्यामुळे दोन पॉईंट 28 कोटी शेअर्स म्हणजेच तीन टक्के इक्विटी ट्रेडिंगला येईल. हे शेअर्स लगेचच विक्रीला येतील असा याचा अर्थ नाही पण त्यांना विकण्याची परवानगी मिळाली.
आज EMS कंपन्यांचे शेअर पडले सेमी कंडक्टर चीप वर सुद्धा टेरिफ लावला जाण्याची शक्यता आहे यामुळे Dixon, syrma, Kaynes टेक्नॉलॉजी आणि पीजी इलेक्ट्रोप्लास्ट या कंपनीचे शेअर मंदीत गेले.
अल्केम लॅबने अल्केम वेलनेस ला ट्रेड जनरिक बिजनेस एक ऑक्टोबर पासून ट्रान्सफर करण्यासाठी करार केला
आझाद इंजीनियरिंग Mitsubishi हेवी इंडस्ट्रीज बरोबर टरबाइन एअर foil साठी 73 पॉईंट 47 मीलियन डॉलर्स म्हणजेच Rs 651 कोटीचा करार केला. टोटल कॉन्ट्रॅक्ट पाच वर्षांसाठी Rs 1387 कोटींचे झाले
BEML नी भारत फोर्ज व डेटा पॅटर्न यांच्याबरोबर करार केला
BEL– DRDO नी अनंता शस्त्र सरफेस To एअर मिसाईल सिस्टिमची पाच-सहा रेजिमेंट साठी टेंडर काढून ते BELला दिले हे Rs 30000 कोटीचे टेंडर आहे
गोदरेज ॲग्रोवेट वर्ल्ड फुड इंडिया 2025 मध्ये केलेल्या घोषणेनुसार Rs.960 कोटींची गुंतवणूक फूड प्रोसेसिंग आणि रिसर्च साठी केली. त्यांनी MOFPI बरोबर MOU केले
ऑइल इंडिया कंपनीला अंदमान शॅलो ऑफ shore ब्लॉक मधील विजयपूरम येथे दोन एक्सप्लोरेटरी मध्ये नॅचरल गॅस मिळाला.
अटलांटा इलेक्ट्रिकचे आज लिस्ट झाले नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 857 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 858 रुपयावर झाले हा शेअर IPO मध्ये Rs.754 रुपयाला दिला होता
गणेश consumer चे लिस्टिंग झाले 322 रुपयाला IPO मध्ये शेअर दिला होता नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 296 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 295 रुपयाला लिस्टिंग झाले.
Moody नी भारताचे जीडीपीचे अनुमान 6.5 % केले
आज मार्केट खूप दोलायमान स्थितीत होते पण मार्केट मंदीत गेल्यानंतर पुन्हा पुन्हा सावरत होते त्यामुळे गुंतवणूकदारांची आशा पल्लवीत झाली. बघूया उद्या काय होते

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २६ सप्टेंबर २०२५

नमस्कार
काल मार्केटमध्ये फॉरेन इन्वेस्टरनी 4995 कोटी रुपयाची विक्री केली. तर डोमेस्टिक इन्वेस्टर्स 5103 कोटी रुपयाची खरेदी केली.
प्रथम अमेरिकन मार्केटचा आढावा घेऊ. काल अमेरिकन मार्केट मंदीत होते खरे पाहता इकॉनॉमिक डेटा चांगला आला. GDP चे अनुमान 3.8% केले. jobless claims 14000 ने कमी झाले. कारण नवीन हायरिंग नसले तरी छटणी सुद्धा झाली नाही. ड्युरेबल गुड्सचे अनुमान 2.9% केले ही आकडेवारी पाहून फेड पुढील रेट कट करण्यास विलंब करेल असे मार्केटला वाटले.. Accenture चा रिझल्ट चांगला आला. फक्त मार्जिन मात्र कमी झाले . अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांना tariff लावण्याची घाई झालेली दिसते. एक ऑक्टोबर पासून फार्मा कंपन्यांवर 100% tariff लावले जाणार. ब्रॅण्डेड आणि पेटंटेड फार्मा प्रोडक्टवर tariff लावले जातील. अमेरिकेत उत्पादन करत असतील किंवा अमेरिकेत प्लांट बनवणे सुरू असेल तर त्यांना tariff द्यावे लागणार नाही. हेवी ट्रकच्या आयातीवर पंचवीस टक्के tariff लागेल. किचन कॅबिनेटवर 50 टक्के Tariff असेल तर बाथरूम appliances वर सुद्धा पन्नास टक्के Tarrif लागेल. सोफा खुर्च्या बेड यावर तीस टक्के tariff लागेल या सगळ्यामुळे आज भारतीय मार्केट मंदीत गेले.
L&T tech नी सिमेन्स बरोबर करार केला.
भारताने GE बरोबर LCA तेजस Mark1A फायटर जेटच्या 113 GE 404 इंजिनासाठी करार केला. एक बिलियन डॉलर्स चा हा करार आहे. 68 सिंगल सीट फायटर 29 ट्वीन सीट ट्रेनर सहा वर्षात म्हणजेच 2032 पर्यंत द्यायची आहे.
L&T ने मेट्रो रेल हैदराबाद मधील लार्सन अँड टुब्रो ची हिस्से दारी तेलंगणा सरकार खरेदी करणार आहे. त्याबद्दल दोन हजार कोटी कंपनीला मिळतील 13000 कोटींचे कर्ज सुद्धा ट्रान्स्फर होईल
रेल टेल या कंपनीला 970 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मिळाले
जी के एनर्जी याचे आज लिस्टिंग झाले नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 171 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 165 रुपये 20 पैशाला लिस्टिंग झाले
सात्विक ग्रीन या शेअरचेही आज लिस्टिंग झाले नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर 465 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 460 रुपयाला लिस्टिंग झाले
Rites ला थालीस लॉजिस्टिक्स या साऊथ आफ्रिकेच्या Talis लॉजिस्टिक्स कंपनीकडून 18 मिलियन डॉलर्सचे डिझेल इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह सप्लाय करण्यासाठी LOA मिळाले
Ceigall आणि Japppl यांचे 80:20 असे जॉइंट वेचर आहे यांना ग्रेटर मोहाली एरिया डेव्हलपमेंट ॲथॉरिटी कडून इंटरनल रोड साठी 509 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली
Excide 80 कोटी रुपये एक्साइड एनर्जी सोल्युशन मध्ये गुंतवले आता एकंदर गुंतवणूक 3388 कोटी रुपये झाली
Novoco 2019 ते 2024 पर्यंतच्या काळासाठी 112.48 कोटीची पेनल्टी नोटीस मिळाली
Bhel भेल आणि आर इ सी यांच्या जॉईंट व्हेंचरला Dipam ने संमती दिली नाही
Amber या कंपनीच्या सबसिडीयरी मध्ये बऱ्याच गुंतवणूकदारांनी 550 कोटी रुपये गुंतवले आहेत ही सबसिडीयरी प्रिंटेड सर्किट बोर्ड बनवते
Ventive हॉस्पिटॅलिटीने गोव्यातील हॉस्पिटॅलिटी मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी सोहम leisure व्हेंचर मध्ये 76% स्टेक घेतला
NTPC 167 MW च्या राजस्थान प्रोजेक्ट मध्ये कमर्शियल ऑपरेशन सुरू झाले
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट आंध्र प्रदेशातील नवीन मल्टी ब्रँड स्टोअर मध्ये कामकाज सुरू झाले
NTPC ग्रीन 67.5 mw सोलर प्रोजेक्ट पैकी 25 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट गुजरात मध्ये सुरू झाले
D Mart आंध्र प्रदेशात नवीन स्टोअर उघडले आता एकंदर स्टोर ची संख्या 430 झाली.
JSW Steel आणि भूषण स्टील आणि पॉवर लिमिटेड यांच्यामधील केसची सुनावणी झाली सुनावणीचा निर्णय JSW Steel च्या बाजूने लागला जे एस डब्ल्यू स्टीलने पुष्कळ गुंतवणूक केली आहे आता त्यांना पेनल्टी लावता येणार नाही असा कोर्टाने निर्णय दिला कोर्टाने स्वतःचाच पूर्वीचा निर्णय बदलला
Waaree एनर्जी हा शेअर आज मंदित गेला. पण त्याची कथा वेगळीच आहे. चायना मधून जो माल अमेरिकेत आयात होतो त्यावर अँटी डम्पिंग ड्युटी आणि काउंटर वेलिंग ड्युटी अमेरिका लावते. जे सोलर पॅनल चायना मध्ये तयार होतात त्या सोलर पॅनलचे लेबल बदलून मेड इन इंडिया असं करून तो माल अमेरिकेला निर्यात केला गेला यामध्ये टॅक्स चुकवणे हा उद्देश आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे .म्हणून अमेरिकेने चौकशी सुरू केली म्हणून हा शेअर मंदीत गेला
आज मार्केट शेवटपर्यंत पडतच राहिले बिलकुल सावरले नाही आता सोमवारी काय नवीन संकट समोर येते ते बघावं लागेल
मार्केटच्या बाबतीत बोलायचं झालं तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशी स्थिती सध्या तरी चालू आहे येणाऱ्या स्थितीला तोंड द्यावे लागेल

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २५ सप्टेंबर २०२५

नमस्कार

प्रथम अमेरिकन मार्केट बघू या. अमेरिकन मार्केट गेले दोन-तीन दिवस झाले काहीसे मंदीत आहे.

रेकॉर्ड वर रेकॉर्ड मार्केट बनवत होते. सगळ्या ब्रोकर्स नी मार्केट खूप तेजीत चालले आहे. सावध रहा अशी मॉर्निंग दिली होती. त्यामुळे त्यांचे मार्केट काहीसे थांबले आहे. या बाबतीत दुःख करण्याचे कारण नाही. चायनीज टेक्नॉलॉजीचे शेअर मात्र वाढले कारण अलिबाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये गुंतवणूक करणार आहे. लिथियम अमेरिका हा शेअर काल एका दिवसात दुप्पट झाला. या शेअरमध्ये अमेरिकन सरकार गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांनी paracetamol या औषधाच्या बाबतीत काही वक्तव्य केलं या औषधामुळे ऑटिझम सारखा लहान मुलांचा आजार होतो असे सांगितले. गरोदर स्त्रियांनी सुद्धा हे औषध घेऊ नये आणि या औषधावर तशी वार्निंग लिहिण्यात यावी असे सांगितले पण मेडिकल कौन्सिल आणि बाकीच्या डॉक्टर्सनी याला कोणताही पुरावा नाही असेही स्पष्ट केले.
इंडोनेशियाच्या मोठ्या कॉपर माईन मध्ये अपघात झाला. काही माणसेही दगावली. त्यामुळे या खाणीत कामकाज बंद झाले. याचा कॉपर पुरवठ्यावर परिणाम होईल. त्यामुळे कॉपरचे दर वाढले. कॉपर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना याचा फायदा होईल.
टाटा मोटर्स शेअर पडत आहे कारण त्यांच्या कंपनीत सायबर अटॅक झाला होता. त्यामुळे जे एल आर चे उत्पादन नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे पण या सायबर अटॅकमुळे होणाऱ्या नुकसानीचा विमा उतरवला नव्हता. त्यामुळे होणारे नुकसान कंपनीलाच सोसावे लागणार आहे. त्याचा मार्जिन वर परिणाम होईल.
फिनोटेक्स ह्या कंपनीची मॅनेजमेंट बोनस आणि डिव्हिडन्स साठी 27 तारखेला विचार करणार आहे.
Veedol या कंपनीने व्हीडॉल या ब्रँड खाली स्विफ्ट पॉवर या नावाने आणि सिंथ ग्लाइड या नावाने फुल्ली सिंथेटिक इंजिन ऑइल ची नवीन रेंज लॉन्च केली.
महाराष्ट्र सिमलेस पाईप या कंपनीला Rs 256 कोटीची ऑर्डर मिळाली
पॉली कॅब या कंपनीतला 0.81% टेक विकणार आहेत. 7300 फ्लोर प्राईस आहे. 3.09% डिस्काउंट दिला.
टाटा स्टील टाटा स्टील होल्डिंग मध्ये 4054.66 कोटी रुपये गुंतवणार आहे आणि त्यामध्ये 457.7 कोटी शेअर्स घेणार आहे.
लुपिन एच आय व्ही ड्रगचे जनरीक व्हर्जन नागपूरच्या फॅसिलिटी मध्ये उत्पादन करणार आहेत. त्याला USFDA नी संमती दिली आहे.
दालमिया भारत Rs2273.36 कोटीची जमीन प्रोव्हिजनल अटॅचमेंट म्हणून ED नी ठेवली आहे
ग्लेनमार्क फार्माच्या सबसिडीयरीने Hengrui फार्मा बरोबर Trastuzumab Rezetecan साठी लायसेन्सिंग डील केले. ग्लेनमार्क 18 मिलियन डॉलर upfront पेमेंट करेल तर 1.093 बिलियन डॉलर माइल स्टोन पेमेंट करेल रॉयल्टी देईल
IPCA लॅब नी कॅन्सर , autoimmune डिसऑर्डर drug साठी BSS बरोबर करार केला. टेक्निकल knowhow ट्रान्सफर आणि जॉईंट डेव्हलपमेंट साठी करार केला.
HCL TECH मायक्रोसॉफ्ट च्या 2025 26 साठी च्या AI बिजनेस सर्कल मध्ये समावेश झाला.
आज फक्त मेटल सेक्टर मध्ये तेजी होती बाकी सर्व सेक्टर मंदीत बंद झाले

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २४ सप्टेंबर २०२५

नमस्कार

आज अमेरिकन मार्केट काहीसे मंदीत होते.
टेक्नॉलॉजी शेअर मंदित होते. पण बोईंग चा शेअर वाढला. उझबेकिस्तान एअरवेज 14 dreamliner एअरप्लेन खरेदी करणार असं सांगितलं आणखी आठ एअरप्लेनची ऑर्डर वाढवण्याची शक्यता बोलली गेली. Nvidia, oracle हे शेअर मंदित होते. अल्कोवाच्या व्यवस्थापनाने वार्निंग दिली की TARIFF चा मागणीवर परिणाम होईल आणि आमचा खर्च 750 कोटी रुपयांनी वाढू शकतो . आता भारतीय मार्केट पाहूया.सुरुवातीला बँक निफ्टी मध्ये तेजी होती विशेष करून सरकारी बँकांमध्ये तेजी होती. सध्या फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर्स 20% लिमिट पर्यंत बँकेमध्ये गुंतवणूक करू शकतात पण ही लिमिट 49 टक्के पर्यंत वाढवावी का असा विचार चालू आहे. स्टेट बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक,बँक ऑफ बरोडा या सर्व बँका MSCI आणि FTSE मध्ये आहेत त्यामुळे पॅसिव्ह investment होऊ शकते
जशी जशी मार्केट मधील मंदी वाढू लागली तसे बँकांचे शेअर सुद्धा मंदित गेले
आय आर डी ए आय नी विमा कंपन्यांचे कमिशन आणि प्रीमियम कमी करावा असे सुचवले त्यामुळे विमा कंपन्यांचे शेअर मंदीत गेले
कॅपिटल मार्केटच्या संबंधातील शेअर मंदीत गेले कारण विकली एक्सपायरी रद्द करण्याच्या संबंधात सेबीने लोकांची मते मागवली
सरकारने shipping सेक्टर साठी Rs 69725 कोटीचे पॅकेज जाहीर केले यामध्ये मेरीटाईम डेव्हलपमेंट फंडासाठी 25 हजार कोटी रुपये, शिपबिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीम साठी 19989 कोटी रुपये आणि 24736 कोटी रुपये फायनान्शिअल असिस्टन्स म्हणून ठेवले गेले यामुळे शिपिंग सेक्टर मधले शेअर तेजीत होते
टोरेंट पॉवरने न्यू झोन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यूझॉन पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यामधील शेअर 211 कोटीला घेतले न्यूझॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 11 लाख 95 हजार 110 शेअर्स म्हणजेच 49% स्टेक घेतला तर न्यूझॉन पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तीस लाख शेअर्स म्हणजेच शंभर टक्के स्टेक घेतला
इन्फोसिसने सनराइज् बरोबर चे कोलाबोरेशन वाढवले
दिलीप बिल्डकॉन केरळ मधील इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्ट 115 कोटी साठी लोएस्ट बिल्डर ठरली.
मिंडा कॉर्पने 2030 पर्यंतचा आढावा गुंतवणूकदारांना दिला इलेक्ट्रिक व्हेईकलचे उत्पादन 2026 च्या सुरुवातीला सुरू होईल असे सांगितले.
हॅवेल्स लॉईड कलर्स रेफ्रिजरेटर फ्लिपकार्टवर 18990 रुपयाला आहेत.
सोनाटा सॉफ्टवेअरला 2025 26 साठी मायक्रोसॉफ्ट एआय बिजनेस सोल्युशन इनर सर्कल अवॉर्ड कंपनीला मिळाले.
लेमन ट्री हॉटेल्सने आंध्र प्रदेशात 44 रूमच्या प्रॉपर्टीचा करार केला त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही करार केले
स्विगी बाईक टॅक्सी ऑपरेटर रॅपिडो मधील होल्डिंग दोन वेगवेगळ्या व्यवहारातून डायव्हेस्ट करणार या होल्डिंगची व्हॅल्यू 2399 कोटी रुपये आहे डच बेस MIH इन्वेस्टमेंट कंपनीला 1968 कोटी रुपयाचे होल्डिंग divest करणार तर 431 कोटी रुपयाचे होल्डिंग SETU AIF ट्रस्ट ला देणार. इन्स्टामार्टच्या व्यवसायासाठी नवीन सबसिडीयरी बनवणार आहेत.
बजाज इलेक्ट्रिकल Morphy Richards brand आणि त्या संबंधित असलेली intellectual property rights घेणार आहेत हा ब्रँड आणि राइट्स दोन्हीही आयर्लंड जनरल इलेक्ट्रिक कडून Rs 146 कोटीला घेणार आहेत
Akzo Nobal इम्पिरियल केमिकल इंडस्ट्रीने 5% स्टेक ब्लॉक डील च्या माध्यमातून विकले
डाबर चंदीगड जीएसटी विभागाने Rs 320 कोटी ची टॅक्स डिमांड नोटीस पाठवली होती ती बदलून रु 271 कोटीची टॅक्स डिमांड नोटीस पाठवली आहे कंपनी कायदेशीर सल्ला घेत आहे
ONGC कंपनी 3 GW एनर्जी प्रोजेक्ट घेणार आहे .
गेल जामनगर लोणी पेट्रोलियम पाईपलाईन क्षमता विस्तार करणार आहे त्यासाठी 5364 कोटी रुपये खर्च करणार आहे.
गेले चार दिवस शुक्रवारपासून मार्केट लोअर हाय लोअर लो असे चालू आहे उद्या काय होते ते बघायला हवे

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २३ सप्टेंबर २०२५

नमस्कार

अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी सेक्टर मध्ये तेजी होती. Nvidia open AI मध्ये 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक डेटा सेंटर साठी आहे. डेटा सेंटर चिप्स ते OPEN AI ला देतील. एप्पल चा शेअर तेजीत होता कारण एप्पल आयफोन 17 ची मागणी चांगली वाढली आहे. रशिया आणि अमेरिका त्यांच्यातील अणूचाचणी संबंधातील करार एक वर्षासाठी वाढवत आहे. भारत आता रेअर अर्थ साठा करण्याच्या विचारात आहे. लॅटिन अमेरिकेतले देश पेरू, चिली, अर्जेंटिना यांच्याबरोबर रेअर अर्थ मिनरल्स साठी भारत सरकारच्या वाटाघाटी चालू आहेत यामुळे सप्लाय चेन मधली बाधा दूर होईल आणि उत्पादन नियमित होऊ शकेल. सध्या रेयर अर्थ मिनरल्स साठी चीनवर अवलंबून राहावे लागते. तीही अडचण दूर होऊ शकेल. आज रुपया सर्वात खालच्या स्तरावर म्हणजेच एक डॉलरला 88.72 या स्तरावर पोहोचला

काल घटस्थापना होती जीएसटी रिफॉर्म यापासून सुरुवात झाली. जीएसटी चे कमी झालेले दर कालपासून लागू झाले आणि त्याचा परिणाम विक्रीवर दिसून आला. हुंडई आणि मारुती दोन्ही गाड्यांची विक्री काल खूप झाली hyundai ने एका दिवसात 11000 गाड्या विकल्या तर मारुतीने एका दिवसात 25000 गाड्यांची विक्री केली. ८० हजार गाड्यांसाठी इंक्वायरी आली. त्यामुळे आज दोन्हीही शेअर तेजीत होते पण अडाणी ग्रुपचे शेअर शुक्रवारी आणि काल तेजीत होते त्यामध्ये आज सुरुवातीला काहीशी मंदी आली. नंतर हे शेअर सावरले आज बँकिंग शेअर मेटल आणि ऑटो शेअरमध्ये तेजी होती
ग्लेनमार्क फार्माची लाभांशावर विचार करण्यासाठी 26 तारखेला बैठक आहे. 30 सप्टेंबर रेकॉर्ड डेट ठरवण्यात आली आहे
ब्रिगेड साउथ बंगलोर मध्ये बनशंकरी येथे 75 एकर जागेत रु.बाराशे कोटीच्या रेसिडेन्सी प्रोजेक्ट साठी करार केलाआहे
KEC इंटरनॅशनल ला रु तीन हजार दोनशे त्रेचाळीस कोटीची ऑर्डर मिळाली. 400 KW ट्रान्सलेशन लाईन UAE मध्ये घालणे टॉवर ,हार्डवेअर ,पोल सप्लाय करणे यासाठी ही ऑर्डर आहे
Emkey ग्लोबल कीर्ती जोशी यांनी 227 कोटी मध्ये 21 टक्के स्टेक घेतला.
Birla corp Guda रामपूर लाईमस्टोन आणि तेलंगणातील ब्लॉकसाठी प्रिफॉर्ड बीडर ठरली आहे.
RVNL– रु 145.35 कोटीच्या दक्षिण रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीड ठरली आहे.
अल्केम लॅबने ब्रेस्ट कॅन्सर चे औषध Pertuza भारतात लॉन्च केले.
सुरज इस्टेट सुरज पार्क View 1 हे 250 कोटीचे प्रोजेक्ट लॉन्च केले.
AU स्मॉल फायनान्स बँक आणि zaggle हे दोघे मिळून को ब्रँडेड रिटेल क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड काढणार आहेत.
जेके लक्ष्मी सिमेंट कंपनीने सुरत येथे 13.5 लाख टन कॅपॅसिटीचे ग्राइंडिंग युनिट लावले.
टीसीएस 9 ऑक्टोबर रोजी रिझल्ट जाहीर करणार आहे
Timken सन स्ट्रीम ग्रीन एनर्जी मध्ये 70 लाख रुपयाला 26.1% स्टेक घेणार आहेत
Paytm पेटीएम मनी मध्ये 300 कोटी रुपये तर पेटीएम सर्विसेस मध्ये 155 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहेत
पु ना गाडगीळ महाराष्ट्रामध्ये पुणे येथे नवीन स्टोअर उघडले
टीव्हीएस होल्डिंग नॉन कन्वर्टेबल रेडीबेबल प्रेफरन्स शेअर्स बोनस म्हणून देणार आहेत याचे मुदत 12 ते 15 महिने आहे सहा टक्के dividend मिळेल.
Dhani 90 रुपये दराने 2.25 कोटी शेअर प्रमोटरला issue केले.
Dr Reddy XGEVA आणि PROLIA या दोन्ही बायो सिमिलर साठी युरोपियन ड्रग एजन्सी कडून पॉझिटिव्ह view मिळाला.
इलेक्ट्रॉनिक्स मार्टने तेलंगणा व आंध्र प्रदेश येथे तीन मल्टी ब्रँड स्टोअर उघडली
EURO PRATIK या शेअरचे आज लिस्टिंग झाले 247 रुपयाला शेअर दिले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर.272 रुपये 10 पैसे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 273 रुपये 45 पैशाला लिस्टिंग झाले.
HCC पाटणा मेट्रो रेल कॉर्पोरेशन कडून Rs 2563 कोटीची ऑर्डर मिळाली या कंपनीची मार्केट कॅप Rs 5358 कोठे आहे. त्यामुळे मार्केट कॅपच्या अर्ध्या रकमेएवढी मोठी ऑर्डर त्यांना मिळाली आहे म्हणून याचे महत्त्व जास्त आहे
KNR – या कंपनीला Rs. 459 कोटीचे प्रोजेक्ट मिळाले
Tata motors कंपनीचे जे एल आर चे उत्पादन 1 ऑक्टोबर पर्यंत थांबवले.
आज मार्केट खालच्या स्तरावरून खूपच सुधारले शेवटी अगदी थोडे मंदीमध्ये बंद झाले पण आज मार्केटमध्ये अस्थिरता मोठ्या प्रमाणावर होती

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – २२ सप्टेंबर २०२५

शुक्रवारी मार्केट अचानक पडू लागले होते. चाबहार

पोर्टच्या संबंधात अचानक सवलत काढून घेतल्यामुळे मार्केट पडू लागले. आज आपण चाबहार पोर्ट च्या संबंधात काय झाले ते पाहू या. पाकिस्तानमधील GWADAR बॉर्डर पोर्ट चीनच्या मदतीने डेव्हलप केले जात होते तेव्हापासून भारताचा चाबहार पोर्ट मधील इंटरेस्ट वाढला. ही घटना 2003 सालची आहे. हे पोर्ट इराण मध्ये असल्याने आणि इराणवर अनेक निर्बंध घातलेले असल्यामुळे या पोर्टचा विस्तार झाला नाही. 2015 16 मध्ये पंतप्रधान मोदींनी पाचशे मिलियन डॉलर या पोर्ट मध्ये गुंतवले. अफगाणिस्तानला गव्हाची निर्यात करण्यासाठी या पोर्टचा उपयोग केला गेला. 2018 मध्ये इराणने हया पोर्टचे ऑपरेशनल कंट्रोल लिजवर भारताला दिले. 2024 मध्ये दहा वर्षासाठी दीर्घ मुदतीचे कॉन्ट्रॅक्ट केले. अमेरिकेने 2018 मध्ये भारताला सवलत दिली. भारताने या पोर्ट मध्ये गुंतवणूक करावी आणि पोर्ट वापरावे. हे पोर्ट गुजरातच्या कांडला पोर्ट पासून जवळ आहे. भारत येथून बसणारे तांदूळ औषधे याचे निर्यात करतो तर क्रूड आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट आयात करतो. पाकिस्तानचा संबंध न येता भारताला चाबहार बंदरातून अफगाणिस्तान आणि इतर चार-पाच देशांबरोबर व्यवहार करणे सोपे जाते. पण 29 सप्टेंबर पासून अमेरिका त्यांनी दिलेली सवलत बंद करणार आहे. H1B विजा साठी लागणारे दर एक लाख डॉलर एवढे केले आहेत. नवीन विजा साठी अर्ज करणाऱ्यांना एक लाख डॉलर द्यावे लागणार आहेत. म्हणून IT क्षेत्रातले शेअर आज मंदीत होते. PNC इन्फ्राला बिहार स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन कडून 21.3 किलोमीटर ब्रीज आणि अप्रोच रोड साठी Rs 495.5 कोटींची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर तीन वर्षात पूर्ण करायची आहे.

हरी ओम पाईप्सने गडचिरोली येथे स्टील प्लांट लावण्यासाठी 3135 कोटीचे MOU केले. ऑइल इंडिया ने राजस्थानच्या वन पॉईंट टू जी डब्ल्यू रेन्यूएबल प्रोजेक्टसाठी जॉइंट वेंचर केले.
हुडकोने एनबीसीसी बरोबर उत्तर प्रदेश हरियाणा गुजरात येथील कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी एम ओ यु केले.
स्वान डिफेन्सने Rs.4250 कोटीसाठी आणि पिपावाव पोर्ट डेव्हलप करण्यासाठी एम ओ यु केले. नेटवेबला Tyrone AI GPU accelerated system सप्लाय करण्यासाठी Rs. 450 कोटीची ऑर्डर मिळाली.
ब्रिगेड एंटरप्रायजेस नॉर्थ वेस्ट बंगलोर ट्वीन प्रोजेक्टसाठी 126 कोटींची गुंतवणूक करणार.
सरकार युको बँक, सेंट्रल बँक, आयओबी, पंजाब आणि सिंध बँक यांमध्ये सरकारचा अनुक्रमे 90.95 टक्के 89.27% 94.61% आणि 93.85% स्टेक आहे.
अशोका बिल्टकॉनने 18.50 बिलियन युरोचे स्वीडनचे कॉन्ट्रॅक्टर रद्द केले
सरकारने शिपिंग सेक्टर साठी Rs 80 हजार कोटीच्या योजना जाहीर केल्या आहेत. याचा फायदा शिपिंग सेक्टर मधील कंपन्यांना होईल.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने बी पी सी एल , एचपीसीएल,आय ओ सी ,बरोबर व्हेसल्स एक्वायर करणे, ऑपरेट करणे ,आणि own करणे,manage करणे यासाठी MOU केले.
गार्डन रिचने शिप बिल्डर हायब्रीड मल्टीपर्पज व्हेसल साठी 62.4 बिलियन डॉलरचा करार केला
क्रॉम्प्टन सोलार photovoltaic वॉटर पंप सिस्टिम साठी मध्य प्रदेश ऊर्जा विकास निगम कडून LOA मिळाले
लुपिनच्या पुणे येथील बायोटेक फॅसिलिटी चे यु एस एफ डी ए कडून pre एप्रूव्हल इन्स्पेक्शन झाले यासाठी चार त्रुटी दाखवल्या गेल्या
झायडस लाईफच्या अहमदाबाद फॅसिलिटी ला 2024 मध्ये OAI असा रिपोर्ट USFDA नी दिला होता आत्ता इन्स्पेक्शन झालंय त्यामध्ये VAI असा रिपोर्ट दिला आहे.
ज्यूबिलन्ट फार्मोवाने शनिवारी सांगितले की तिच्या अमेरिकन सबसिडीयरीचे इन्स्पेक्शन झाले होते त्यामध्ये एकही निरीक्षण नोंदवले नाही त्यामुळे क्वालिटी आणि compliance या दोन्हीही बाबतीत मजबुती सिद्ध होते.
बजाज ऑटोने 350 cc पेक्षा कमी मोटरसायकल साठी इन्शुरन्स आणि फायनान्सिंग साठी processing चार्जेस लागणार नाहीत असे सांगितले 50% financing केले जाईल.
आज अडाणी ग्रुपचे सगळे शेअर तेजीत होते तर व्हिसाची रक्कम वाढल्यामुळे आयटी सेक्टर मधले शेअर मंदीत होते 480 पॉईंट मंदीत मार्केट बंद झालं.

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – १९ सप्टेंबर २०२५

नमस्कार

आजचे मार्केट म्हणजे अडाणी ग्रुपचे शेअर! या ग्रुप वर झालेले आरोप ,आरोपांची शहानिशा आणि आलेला निकाल त्यामुळे ग्रुपच्या शेअरवर झालेला परिणाम असं एक समीकरण झालं. हिंदेनबर्ग प्रकरणी अडाणी ग्रुप वरील आरोप सिद्ध झाले नाहीत. unfair trade practice झाली नाही ,मार्केट manipulation झाले नाही किंवा इन्सायडर ट्रेडिंग सुद्धा सिद्ध झालं नाही. त्यामुळे अडाणी ग्रुप वरचे सगळे आरोप फेटाळले गेले म्हणून आज या ग्रुप मधले शेअर आज तेजीत होते.
खरे पाहता अडाणी ग्रुपचे शेअर नीफ्टी मध्ये ,सेन्सेक्स मध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे मार्केट तेजीत राहील असा एक अंदाज वाटत होता पण मार्केटला काय जाणवते आहे हे मात्र आज कळले नाही. ट्रेड डील होणार की नाही याबद्दलची शंका किंवा रशिया युक्रेन यांच्यातला ताणतणाव कशाचा परिणाम असावा कळले नाही पण आज मार्केट पाचशे पॉईंट मंदीत गेले.
वेदांता पुनम मँगॅनीज block साठी आंध्र प्रदेशातील डिपार्टमेंट ऑफ माईन आणि जिओलॉजी यांनी वेदांताची निवड केली हा 152 हेक्टरचा ब्लॉक आहे
इंडियन हॉटेलने स्पष्टीकरण दिले की न्यूयॉर्कमधील Pierre हे हॉटेल त्यांच्या मालकीचे नाही फक्त मालमत्तेचे लीज होल्ड राईट्स त्यांच्याजवळ आहेत म्हणून ते विकू शकत नाही चुकीची बातमी प्रसारित करण्यात आली आहे.
जॉन कोकरेल इंडियाला जमशेदपूर येथे पुश अँड पूल आणि ऍसिड जनरेशन प्लांट लावण्यासाठी टाटा स्टीलने कॉन्ट्रॅक्ट दिले
युनीकेम लॅबोरेटरीला युरोपियन कमिशनने युरो19.5 मीलियन म्हणजेच Rs.175 कोटीची डिमांड नोटीस दिली ही नोटीस perindopril या औषधाच्या संदर्भात आहे.
टेक्समॅको रेल BCFC ब्रेक व्हॅन सकट असणाऱ्या वॅगन साठी अल्ट्राटेक सिमेंटने ऑर्डर दिली ही ऑर्डर मार्च 2026 पर्यंत पूर्ण करायची आहे.
KFIN ही कंपनी आय एफ एस सी गिफ्ट सिटी मधली पहिली रजिस्टर ट्रान्सफर एजंट बनली.
हिंद रेक्टिफायरने एक मीलियन युरो मध्ये फ्रान्सचे Belink solution एक्वायर करायला ट्रायब्युनलने परवानगी दिली
अमेरिकन मार्केटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास व्हिडिओ आणि इंटेल यांच्यामध्ये पाच बिलियन डॉलरचे डील झाले. विकली अनएम्प्लॉयमेंट क्लेम कमी झाले 264000 वरून 231000 झाले जे टीव्ही चॅनल ट्रम्प संबंधी टीका करतात त्यांचे लायसन्स काढून घेतले जाईल असे ट्रम्प यांनी सांगितले. आज अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये बोलली होण्याची शक्यता आहे. टिक टॉक चा स्टेक कमी करण्यासाठी ही बैठक असेल. ओरॅकल हा टेक घेण्याची शक्यता आहे.
Ramky infra Rs.2085 कोटीचे प्रोजेक्ट या कंपनीला मिळाले हैदराबादच्या बोर्डाने तसा करार केला
Kaynes टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ राजेश शर्मा यांनी राजीनामा दिला त्यामुळे शेअर मध्ये मंदी होती.
वोडाफोन आयडिया आज AGR Dues च्या संदर्भात कोर्टात सुनावणी होणार होती पण ही सुनावणी पुढील शुक्रवार पर्यंत पुढे ढकलली गेली.
ग्राफाईट इंडिया कंपनीने ग्राफिक इंटरनॅशनल मध्ये 6.82% स्टेक 168 कोटी रुपयाला घेतला ही अमेरिकन कंपनी आहे
बँक ऑफ जपानने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. जपानचा महागाईचा दर ऑगस्टमध्ये कमी झाला तीन पॉईंट एक टक्क्यावरून दोन पॉईंट सात टक्के झाला
JSW एनर्जी जी इ पॉवरचा डी merged झालेला बॉयलर आणि त्याच्या कंपोनंटचा व्यवसाय घेण्याचे ठरवले यासाठी शेअर स्वाप अग्रीमेंट केले. जे एस डब्ल्यू एनर्जीची जेएसडब्ल्यू Neo एनर्जी ही सबसिडीअरी आहे तिने नॉर्वेच्या STATKRAFT या कंपनीकडून टीडाँग पॉवर जनरेशन या कंपनीतील शंभर टक्के स्टेकघेण्याचे ठरवले आहे. या कंपनीचे हिमाचल प्रदेशात ११५ MV चे प्रोजेक्ट अंडर construction आहे.
अशा प्रकारे हा गोंधळाचा आठवडा संपला या आठवड्यात मार्केटने 25200 चा टप्पा घातला हे या आठवड्याचे विशेष आहे

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०२५

नमस्कार

आता काय मजेत चालले असेल ना! मनावरचा ताण दूर झाला असेल. रोज मार्केट थोड्याफार प्रमाणात का होईना सुधारते आहे पण काळजी घेणं जरुरीचे आहे. मोठी गर्जना करणारा फेड चा रेट कट आला. फेडने 0 .25 रेट कट केला. हा रिस्क मॅनेजमेंट रेट कट आहे असे सांगितले. महागाई पेक्षा रोजगाराला अधिक महत्त्व दिले. बेरोजगारीचा दर वाढत होता म्हणून रेट कट केला. महागाई कडे फेडचे लक्ष आहे. tarrif मुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे असे निरीक्षण फेडने नोंदवले. यावर्षी आणखी दोन वेळेला रेट कट होण्याची शक्यता फेडने सांगितली. रेट कट हा ठरवलेला रस्ता नसून डेटा बघून रेट कट करण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्टपणे सांगितले. 2026 मध्ये एकदा आणि 2027 मध्ये एकदा रेट कट केला जाईल. कॅनडाने सुद्धा 0.25 रेट कट केला. पण ब्राझील ने मात्र काहीही बदल केला नाही.

चायनाने टेक्नॉलॉजीकंपन्यांना NVIDIA कडून चिप्स घेण्यास मनाई केली आहे यामध्ये अलीबाबा आणि टिक टॉक या कंपन्यांचा समावेश आहे.

कोचीन शिपयार्ड ला ONGC कडून Jack up रिग रिपेरिंग करण्यासाठी 200 कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. हे कॉन्ट्रॅक्ट 12 महिन्यात पूर्ण करायचे आहे.
स्टेट बँकेने ज्याप्रमाणे येस बँकेतला स्टेक विकला त्याचप्रमाणे बंधन बँकेने सुद्धा 21 रुपये 50 पैसे या भावाने 15.39 कोटी शेअर्स विकले फेडरल बँकेने सुद्धा 16.62 कोटी शेअर्स 21 रुपये 50 पैसे या भावाने sumitomo mitsui बँकिंग कॉर्पोरेशनला विकले.
इंडो सोलर – वारी एनर्जी 14.66% स्टेक 18 आणि 19 सप्टेंबर रोजी OFS च्या माध्यमातून विकणार आहे. हा स्टेक minimum public शेअर होल्डिंग rule अंतर्गत विकला जाणार आहे.
रेलटेलला स्मार्ट क्लासरूम साठी 106 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
Moil कंपनीने 54 हजार 600 टन mangenese स्टेट ट्रेडिंग एंटरप्राइज म्हणून निर्यात करायला सुरुवात केली आहे.
Dixon – Kunshan Q tech मध्ये 51%स्टेक 553कोटी रुपये खर्चून घेणार आहे.
TVS motor ने टीव्हीएस किंग डीलक्स प्लस सी एन जी थ्री व्हीलर स्कूटर टांझानिया मध्ये लाँच केली.
Cohance लाईफ 1.9 कोटी शेअर्स म्हणजेच 5.1% स्टेक विकणार आहेत 900 रुपये फ्लोअर price आहे आय आय एफ एल ची निवड केली आहे
श्री दिग्विजय सिमेंट यांचे प्रमोटर ट्रू नॉर्थ फंड व्ही आय एल एल पी हे त्यांच्या 54.6% स्टेट पैकी 50.1% स्टेक दोन टप्प्यात 85 रुपये प्रति शेअर या भावाने Rs 631 कोटीला विकणार आहेत यामुळे आता 26 टक्के साठी ओपन ऑफर आणावी लागेल. ही ओपन ऑफर 92 रुपये प्रति शेअर भावाने आणली जाईल. त्यासाठी एक्सेस कॅपिटलची नेमणूक करण्यात आली आहे. कंपनी Hibond बरोबर सिमेंट डिस्ट्रीब्यूशन साठी दहा वर्षे मुदतीचा करार करीत आहे.
Escorts कंपनीने combine हार्वेस्टर पंजाब आणि हरियाणा मध्ये लॉन्च केली. यामुळे पोल्युशन कमी होईल.
Biocon बायोकॉन बायोलॉजिक्स यांच्या बायोसिमिलर Bisaya आणि Aukelso ला USFDA कडून संमती मिळाली.
Nelco – कंपनी आता सॅटॅलाइट ब्रोडबंड सेवा देईल कंपनीने वर्चुअल नेटवर्क ऑपरेटर लायसन्ससाठी अर्ज केला आहे
Capacite infra – मुंबईमध्ये अल्ट्रा लक्झरी रेसिडेन्शिअल प्रोजेक्टसाठी Rs.1518 कोटीची ऑर्डर मिळाली
Indian hotel – न्यूयॉर्क मधील Pierre HOTEL मधील स्टेक कंपनी विकणार आहे.यातून त्यांना सतरा हजार ते अठरा हजार कोटी रुपये मिळतील.ब्रूनेईचा सुलतान हे हॉटेल खरेदी करणार आहे
आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी होती. मार्केटमध्ये मजा आली. 300 पॉईंट पेक्षा जास्त मार्केट तेजीत होते. पण मार्केट पडू लागले आता मार्केटमध्ये मंदी येते की काय असे वाटले. पण बुल्स आणि बेअर्स मध्ये बुल्सची सरशी झाली पुन्हा तीनशे पॉईंट तेजी दिसू लागली अशा प्रकारे एक वेगळाच खेळ पाहायला मिळाला. . उद्याचा खेळ बघायला तयार राहूया

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०२५

नमस्कार

आज आपले पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस आहे यु एस ए चे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या त्याचवेळी मोदींनी सुद्धा युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव कमी करण्याचा जो प्रयत्न ट्रम्प करत आहेत त्याचे समर्थन केले काहीसा तणाव कमी झाला सेंटीमेंट सुधारले याचा परिणाम मार्केटवर चांगल्या पद्धतीने होईल काय याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे त्याचप्रमाणे फेड काय करेल इंटरेस्ट रेट 0.25 पॉईंट असे गृहीत धरले आहे त्यांची कॉमेट्री कशी असेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे
आज सकाळपासूनच लिफ्टी पंचवीस हजार दोनशेच्यावर ट्रेड करत आहे मार्केट तेजीतच आहे पण जपून पावले उचलत आहे टेक्सटाइल शेअर ते घेत आहेत आयटी सेक्टर मध्ये थोडीशी तेजी दिसत आहे
सिरमा – कंपनीने आंध्र प्रदेशात 26.70 एकर जागा 1595 कोटी रुपयाला खरेदी केली
जी एस पी एल, जी एस पी सी, आणि गुजरात गॅस यांचे मर्जर होणार आहे दहा गुजरात गॅसच्या शेअरला तेरा जीएसपीएल चे शेअर मिळणार आहेत
Coal india रेअर अर्थ एलिमेंट एक्स्प्लोरेशन साठी Ontillu Chandragiri येथील ब्लॉग साठी प्रेफर्ड bidder म्हणून निवड झाली आहे
नेक्टर लाइफ सायन्स slump सेल ची तारीख 20ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली
प्रीमियर एक्सप्लोजीव तेलंगणा पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी दिली
Dr Reddy दक्षिण कोरियाची कंपनी HK Inno Ncorp बरोबर 2022 मध्ये करार केला होता हा करार भारत आणि इतर इमर्जिंग मार्केटमध्ये Tegoprazan हे औषध कमर्शियलाइझ करण्यासाठी licencing करार केला होता त्यानुसार हे औषध भारतात लॉन्च केले या औषधाचे भारतात एक बिलियन डॉलर्स चे मार्केट आहे
आशापुरा या कंपनीने चायना रेल्वे बरोबर करार केला Guinea मध्ये Boffa बॉक्साईट डिपॉझिट आहे ते डेव्हलप करण्यासाठी करार केला यामध्ये चायना रेल्वे mining ऑपरेशन, लॉजिस्टिक्स, पोर्ट हँडलिंग, infrastructure साठी मदत करेल
आज अर्बन कंपनीचे बीएससी 161 आणि एन एस सी वर 162 रुपये 25 पैसे वर लिस्टिंग झाले
शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र चे बीएससी वर 187 रुपये 70 पैशावर तर एन एस सी वर 188 रुपये 50 पैसे लिस्ट झाले
देव एक्सीलेटर चे बीएससी वर 61.30 रुपयाला तर एन एस सी वर 61 रुपयाला लिस्ट झाले
एल अँड टी ला पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन ग्रीड साठी 2500 ते 5000 कोटी दरम्यान ऑर्डर मिळाली
विमानतळावरील लाउंज सेवा बंद केल्या याचा परिणाम ड्रीमफॉक्स या कंपनीवर होईल.
IEX ने कपलिंग विरुद्ध सीईआरसी विरुद्ध याचीका दाखल केली.
वेदांताने हायड्रोकार्बन मालमत्तेबद्दल पुरेशी आणि योग्य माहिती दिली नाही मालमत्तेच्या तारणावर मोठी कर्ज मंजूर केली. लायब्लिटिजच्या संबंधांत आवश्यक ते डिस्क्लोजर केले नाहीत. त्यामुळे ही डीमर्जर पूर्ण झाल्यावर फायनान्शियाल रिस्क उत्पन्न होऊ शकेल असे सरकारने सांगितले.
NCLT ने चीनची कंपनी SEPCO ला डीमरजरविरुद्ध ची हरकत मागे घ्यावयास परवानगी दिली.
ल्युपिनच्या LENALIDOMIDE या ऍनिमियावरील औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली.
मेरिकोच्या ऑफीस आणि फॅक्टरी वर IT विभागाने सर्व्हे केला.
MCX नॉन कृषी कमोडिटीज मध्ये FPI ना ट्रेडिंग करायला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. कमोडिटी ट्रेडसाठी बँका आणि पेन्शन फंडांना सक्षम बनवण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे.
आपल्याला उद्या फेडं ने काय रेट जाहीर केले ते समजेल त्यानुसार उद्या मार्केट रिजेक्ट करेल कसे काय मार्केट उघडते ते उद्या पाहू या

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507