नमस्कार
अमेरिकेचे अध्यक्ष आणि tariff हे एक समीकरण झालं आहे. पुन्हा त्यांनी विदेशी ट्रकवर 25 टक्के tariff लावणार आणि हे tariff एक नोव्हेंबर पासून लावले जातील असे सांगितले आहे. H1 B visa चार्जेस एक लाख डॉलर करून ते थांबले नाहीत तर आता युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक देशासाठी पाच टक्के विद्यार्थ्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच एका देशातील विद्यार्थी पाच टक्के पेक्षा अधिक असू शकणार नाहीत. अमेरिकेमध्ये शट डाऊन च्या संदर्भात दुसऱ्यांदा
मतदान झाले पण यावेळी सुद्धा 60 मते मिळाली नाहीत 52 /42 असा मताचा कौल राहिला. आठ मते कमी पडली त्यामुळे शट डाउन सुरू राहिले. अमेरिकेमध्ये सेमीकंडक्टर स्टॉक तेजीत होते. AMD 24% तेजीत होता चीन, कोरिया हाँगकाँग हे बाजार बंद होते.
मतदान झाले पण यावेळी सुद्धा 60 मते मिळाली नाहीत 52 /42 असा मताचा कौल राहिला. आठ मते कमी पडली त्यामुळे शट डाउन सुरू राहिले. अमेरिकेमध्ये सेमीकंडक्टर स्टॉक तेजीत होते. AMD 24% तेजीत होता चीन, कोरिया हाँगकाँग हे बाजार बंद होते.
LTI माईंडट्रीने लीडिंग ग्लोबल मेडिया आणि एंटरटेनमेंट कंपनी बरोबर मल्टी इयर एग्रीमेंट केले.
ब्रिगेडने ६.६ एकर लँड पार्सल डेव्हलप करण्यासाठी जॉईन डेव्हलपमेंट एग्रीमेंट केले. याचा GDV(ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू) Rs 1000 कोटी आहे.
दिलीप बिल्डकोन आणि ए पी एम पी एल यांचे जॉईंट वेंचर आहे या जॉईंटव्हेंचरला १०० MW ग्रीड कनेक्टेड ग्राउंड माउंटेड सोलर फोटोव्होल्टॉईक पावर प्रोजेक्टसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले. 25 वर्षे मध्य प्रदेश जल निगमला वीज पुरवण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्टआहे.
HCL TECH ने रिसर्च आणि इनोव्हेशनसाठी प्रसिद्ध एमआयटी बरोबर कोलाबोरेशन केले.
झायडस लाईफला जनरिक LIOTHYRONINE टॅब्लेट साठी कॅनडा हेल्थ ऑथॉरिटी कडून NOC मिळाले. अहमदाबादला या टॅबलेट चे उत्पादन केले जाईल. कॅनडियन डॉलर 10.9 मिलियन एवढी विक्री होईल अशी अपेक्षा आहे .
मेट्रो पोलीस हेल्थकेअर चा एकूण रेवेन्यू मध्ये 23 टक्के वाढ झाली. ट्रू हेल्थ वेलनेस मध्ये 25% , बी टू सी सेगमेंट मध्ये 16% तर बी2बी सेगमेंट मध्ये 34 टक्के वाढ झाली ही कंपनी डेट फ्री असून नेट कॅश रुपये 55 कोटी आहे.स्पेशलिटी सेगमेंट मध्ये 36 टक्के वाढ झाली.
बँक ऑफ इंडिया च्या ग्लोबल बिझनेस 11.8% ने वाढला. डिपॉझिट 10.8% वाढली. ऍडव्हान्सेस 13.94%ने वाढले.
टाटा मोटर्स मोटरची विक्री आणि उत्पादन दोन्ही कमी झाले.
KRN HEAT एक्सचेंजरची सबसिडीअरी रेफ्रिजेशन सिस्टीम काढून त्यांच्या बस एअरकंडिशन बिजनेस घ्यायचे ठरवले आहे.
मेडिको रेमेडीज ला यु एस डॉलर्स 17,81,000 ऑर्डर टॅबलेट आणि ड्राय सिरप साठी तुर्कमेनिस्तान कडून मिळाली.
कोल इंडिया ने क्रिटिकल मिनरल्स साठी छत्तीसगड मिनरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन बरोबर करार केला.
ऑइल इंडिया ने महानगर गॅस बरोबर लिक्विफाईड नॅचरल गॅस व्हॅल्यू चेनमध्ये संधी शोधण्यासाठी करार केला.
कॅनडा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्सच्या IPO चा प्राईस बँड रुपये 100 ते रुपये 106 दरम्यान निश्चित केला आहे. मिनिमम लॉट 140 शेअरचा असेल.
Astral च्या कानपूर युनिट मध्ये उत्पादन सुरू झाले.
एस्टर DM च्या क्वालिटी केअर इंडिया बरोबरच्या मर्जरला BSE आणि NSE कडून एनओसी मिळाले.
फॅबटेक या कंपनीचे एन एस इ वर रुपीज 192 आणि BSE वर 192 रुपयाला लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये 191 रुपयाला दिला आहे.
GLOTTIS या कंपनीचे एनएसीवर रुपये 84 आणि बीएससी वर रुपये 88 वर लिस्टिंग झाले हा शेअर IPO मध्ये रुपये 129 ला दिला होता.
Paytm ने डिजिटल पेमेंट साठी डिजिटल साऊंड बॉक्स लॉन्च केला
गुजरात कडून येणारा आणि गेल कडून मिळणाऱ्या गॅसवर पंधरा टक्के वॅट ऐवजी दोन ते तीन टक्के सेंट्रल सेल्स टॅक्स लागेल. हा बदल 15 ते 16 ऑक्टोबर पासून होईल याचा फायदा आयजीएल या कंपनीला होईल
24 हजार 634 कोटीच्या चार रेल्वे प्रोजेक्ट ला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे उद्या रेल्वेच्या शेअर कडे लक्ष द्यावे लागेल. महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांना याचा फायदा होईल. बडोदा – रतलाम, भुसावळ – वर्धा, गोंदिया- डोंगरगड, इटारसी – भोपाळ – बिना रेल्वे लाईन याचा समावेश आहे.
आज नीफ्टीची विकली एक्सपायरी होती या एक्सपायरीचा परिणाम मार्केटमध्ये शेवटी दिसला बरीच तेजी मार्केटने गमावली आजचे लिस्टिंग सुद्धा चांगले झाले नाही बघूया उद्या कसं चालतंय मार्केट ते !
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507
