नमस्कार
अमेरिकन मार्केट काल मंदीमध्ये बंद झाले.अजूनही तेथे शर्ट डाऊन सुरू आहे. ओरॅकल आणि टेस्ला हे शेअर मंदीत होते.
एबीबी त्यांचा रोबोटिक्सचा व्यवसाय सॉफ्ट बॅक ग्रूपला 537 कोटी US डॉलर्स मध्ये विकणार आहे.
एबीबी त्यांचा रोबोटिक्सचा व्यवसाय सॉफ्ट बॅक ग्रूपला 537 कोटी US डॉलर्स मध्ये विकणार आहे.
SKM एग्ज 29 ऑक्टोबरला रिझल्ट जाहीर करेल त्याचवेळी split वर सुद्धा निर्णय जाहीर करेल.
टाटा मोटर्स JLR ची होलसेल विक्री 24.2% ने कमी झाली. ती 66 हजार 165 एवढी झाली तर रिटेल विक्री 17.1% ने कमी झाली. ती 85 हजार 495 युनिट झाली. सायबर अटॅक, अमेरिकेचे tariff आणि फेज आऊट ऑफ ओल्ड मॉडेल्स ही कारणे देण्यात आली.
गोदरेज कंजूमर मिड सिंगल डिजिट रेवेन्यू ग्रोथ मिळेल. व्हॉल्युम वाढले आहेत. होम केअर मध्ये मजबूत स्थिती आहे, पर्सनल केअर मध्ये काहीशी मंदी आहे असे व्यवस्थापनाने सांगितले.
टायटन डोमेस्टिक बिझनेस 18%, ज्युवेलरी १९ टक्के तर विदेशी व्यापार 86% वाढला. 55 नवीन स्टोअर उघडली. एकंदर स्टोअर ची संख्या 3377 झाली.
Concor अल्ट्राटेक साठी बल्क सिमेंटची वाहतूक स्पेशललाईज टॅंक कंटेनर मधून रेल्वेतून करण्यात येईल.
Shaily इंजीनियरिंग प्लास्टिक या कंपनीमध्ये 2.9% स्टेट म्हणजेच 13.3 लाख शेअर्स लाईट हाऊस फंडाकडून 284 कोटी रुपयाला अबुधाबी इन्व्हेस्टमेंट, मोतीलाल ओसवाल, सोसायटी जनरल यांनी घेतला.
लोढा या कंपनीचे प्रीसेल्स सात टक्क्याने वाढले ते रु 4570 कोटी झाले कलेक्शन १३ टक्के ने वाढून रु 3880 कोटी झाले
अनंतराज 695 रुपये 83 पैसे या भावाने QIP करणार आहेत.
Key स्टोन रियालिटी यांचे प्रीसेल्स नऊ टक्क्याने वाढले ते रु.763 कोटी झाले कलेक्शन नऊ टक्के वाढून रु.601 कोटी झाले. नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले 0. 21 MSF सेलेबल एरिया आहे आणि ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू Rs 949 कोटी आहे
सात्विक ग्रीन नवीन सोलर पी व्ही module ची ऑर्डर मिळाली रु २१९.६ कोटीचे ऑर्डर आहे. सोलार पी व्ही मॉडेल साठी 488 कोटीची ऑर्डर मिळालेली आहे.
एस एच केळकर त्यांचा रेव्हेन्यू 13%टक्क्यांनी वाढला तो Rs 1140 कोटी झाला तर त्यांचे कर्ज Rs 698 कोटी आहे
शृंगार हाऊस यांचा रिझल्ट लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सर्व गोष्टी वाढल्या.
Salzer कॉम्पॅक्ट हाय व्होल्टेज सेफ्टी डिव्हाईस साठी पेटंट मिळाले.
असोसिएटेड अल्कोहोलने बारवाहा फॅसिलिटी मध्ये Malt स्पिरिट चे उत्पादन सुरू केले.
आय आर बी इन्फ्रा यांचे टोल कलेक्शन ११ टक्क्याने वाढून रु 556.7 कोटी झाले
Kesar या कंपनीला एसएमई प्लॅटफॉर्म मधून मेन बोर्डवर यायला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांनी परवानगी दिली. ते नागपूरचे लँड पार्सल विकणार आहेत
वारी एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 64% स्टेक Rs 192 कोटीला घेतला
ऍडव्हान्स ऍग्रो लाईफ याचे आज लिस्ट झाले बीएससी वर 113 रुपयाला तर एन एस सी वर सुद्धा 113 रुपयाला लिस्ट झाले. हा शेअर शंभर रुपयाला दिला होता.
O M freight forwarders याचे लिस्ट बीएससी आणि एन एस सी वर ८२ रुपयाला झाले हा 135 रुपयाला दिला होता
अडाणी इंटरप्राईजेस राईट इशूच्या माध्यमातून Rs
अठरा हजार ते रु 25 हजार कोटी एवढी रक्कम गोळा करणार आहेत. ही रक्कम एअरपोर्ट कारभाराच्या विस्तारासाठी खर्च करण्यात येईल
सोलार इंडस्ट्रीला साउथ ईस्टर्न कोल फील्ड कडून 483 कोटीची ऑर्डर मिळाली
बीएमडब्ल्यूने warning दिली आहे चिन मध्ये OEM कंपन्यांच्या मार्जिन वर दबाव आहे असाच दबाव युरोपमध्ये सुरू राहील असे वाटते संवर्धना मदरसनच्या रेव्हेन्यू मध्ये BMW चा पंधरा टक्के हिस्सा आहे मार्जिन वर दबाव असेल तर त्याचा परिणाम संवर्धनाच्या रेव्हेन्यूवर सुद्धा होऊ शकतो
सध्या जपानचे चलन YEN हे घसरत आहे म्हणजेच जपानच्या चलनाचे अवमुल्यन होत आहे त्यामुळे carry ट्रेड कडे कल राहील याचा सुद्धा फायदा मिळू शकतो
उद्या मार्केट संपल्यानंतर टीसीएस चा निकाल जाहीर होईल बहुतेक त्यामुळेच की काय आज आयटी सेक्टरचे शेअर तेजीत होते पण आज मार्केटमध्ये volatality खूप होती त्याचा ट्रेडर्सना त्रास झाला असेल
उद्याच्या चित्राचे रंग उद्या भरू या
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507
