आजचं मार्केट – १० ऑक्टोबर २०२५

नमस्कार

प्रथम अर्थातच अमेरिकन मार्केट पाहू. फेडचे गव्हर्नर
पॉवेल यांनी नवीन रेट कट च्या संदर्भात कोणताही गायडन्स दिला नाही म्हणून अमेरिकन मार्केटमध्ये मंदी होती. टेस्ला,अमेझॉन हे शेअर पडले. सरकार 2.88 मिलियन व्हेईकल्सचे इन्स्पेक्शन करणार आहे. ऑफिशियल डेटा मिळत नाही. गाझा पीस डीलच्या पहिल्या फेजवर सह्या झाल्या. एअरलाइन कंपन्यांचे रिझल्ट चांगले येतील असा अंदाज व्यक्त केला. डेल्टा एअरलाइन, युनायटेड एरलाईन्स, अमेरिकन एअरलाइन्स, Jet Blue तेजीत होते. लिथियम प्रोड्युसर अलबे मारले हा शेअर 8% तेजीत होता. चीनच्या सरकारने रेअर अर्थ मिनरल्स संदर्भातील बंधने कडक केली. आता निर्यातीसाठी लायसन्स घ्यावे लागेल चीन मधील टेक्नॉलॉजी जे कोणी वापरत असतील त्यांना वेगळे लायसन्स लागेल.
5paisa या कंपनीचा रिझल्ट लागला. फायदा कमी झाला, ब्रोकरेज इनकम कमी झाले पण क्लाएंटची संख्या वाढली.
सुबेक्स डच टेलिकॉम ऑपरेटरनी converged आणि होलसेल पार्टनर सेटलमेंट प्लॅटफॉर्म डिलिव्हर करण्यासाठी सुबेक्स ची निवड केली हा सहा वर्षाचा करार 6.62 बिलियन डॉलर्स चा आहे.
डीपी आभूषण यांचा टर्नओव्हर 85 टक्के वाढ होऊन रु 267 कोटी झाला
महिंद्रा अँड महिंद्रा यांचे उत्पादन 24.4 टक्के वाढले. ते 99 हजार 758 युनिट झाले सेल्स वॉल्यूम 14 टक्के वाढले ते 97 हजार 744 युनिट झाले निर्यात 44 टक्के वाढली ती 4458 युनिट झाली
गुजरात pipavhav कंटेनर्स कार्गो व्हॉल्युम 8% कमी झाले ते 1.64 लाख TEU, कार्गो व्हॉल्यूम १.०५ एम एम टी झाले लिक्विड कार्गो व्हॉल्युम 15 टक्क्याने वाढवून 0. 38 MMT झाले
जन स्मॉल फायनान्स बँकेला NCD मधून 250 कोटी रुपये गोळा करायला परवानगी मिळाली
लॉईड्स इंजीनियरिंगने फ्लाय फोकस बरोबर MOU केले defender sigint UAV डेव्हलप आणि मेन्यूफॅक्चर करण्यासाठी MOU केले.ॲडव्हान्स surveillance आणि इंटेलिजन्स ऑपरेशन साठी वापरले जाईल.
रेल टेल कर्नाटक सेंटर ऑफ इ गव्हर्नन्स कडून LOI मिळाले. बॅक टू बॅक ओ ई एम सपोर्ट KSWAN 2.0 राउटर आणि स्विचेस ना देण्यासाठी ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर रु 18.22 कोटींची आहे. आठ नोव्हेबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे.
एनटीपीसी ग्रीन या कंपनीची सबसिडीरी एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जीनी गुजरात सरकार बरोबर पंधरा गीगावॅट (10 GW सोलर आणि पाच GW Wind ) प्रोजेक्टसाठी एम ओ यु केले.
ब्लू डार्टने इन्स्टंट डिजिटल अकाउंट ओपनिंग प्लॅटफॉर्म लॉच केला.
लेमन ट्री हॉटेल्स ने पन्नास रूमची प्रॉपर्टी राजस्थान मध्ये घेतली.
नाटको फार्माने Risdiplam याचे जनरिक व्हर्जन लॉज करण्याच्या संबंधातील कायदेशीर लढाई जिंकली. हे औषध spinal muscular Atrophy, severe muscle disorder in infant साठी वापरतात.
आयसीआयसीआय Pru रु 1761 कोटी नवीन बिजनेस premium झाला. पूर्वी हा रु 1776 कोटी होता 6.1% वाय ओ वाय बेसिस वर वाढला. API रु 871 कोटी झाले पूर्वी रु 722 कोटी MoM बेसिस वर तर 1.1% कमी YoY बेसिसवर होते.
अफकॉन इन्फ्रा ला रु 576 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
राजेश पॉवरने गुजरात सरकार बरोबर Rs 4754 कोटीच्या प्रोजेक्टसाठी करार केला. यामुळे 33000 लोकांना रोजगार मिळेल
एल जी इलेक्ट्रॉनिक्स 54 वेळा भरला आहे.
JSW स्टील चे consolidated उत्पादन 17% ने वाढून 7.9MT झाले.तर डोमेस्टिक उत्पादन 16%ने वाढुन 7.66MT झाले.
कोलते पाटील ने पुण्यामध्ये 7.5 एकर जमीन घेतली. या जमिनीवरील प्रोजेक्ट ची GDV Rs 1400 कोटी आहे.
WE WORK या कंपनीच्या शेअरचे आज लिस्टिंग झाले नॅशनल स्टॉक एक्सचेंज वर रु 650 आला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 646 रुपये 50 पैसे झाले हा शेअर 648 रुपयाला दिला होता
Capacite इन्फ्रा आयआयटी बॉम्बे कडून रु 542 कोटीची ऑर्डर मिळाली
PI Industry Kumai केमिकलने त्यांचा गायडन्स वाढवला. ॲग्री केमिकल्स च्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. म्हणून गायडन्स वाढवला ही पी आय इंडस्ट्री साठी चांगली बातमी आहे.
इंडस टॉवर या कंपनीने मध्ये UAE मध्ये नवीन सबसिडीरी स्थापन केली.
आज पूर्ण दिवस मार्केट तेजीत होतं अशा प्रकारे मार्केटने या आठवड्यात 25200 चा टप्पा ही पार केला पाचही दिवस मार्केट तेजीत राहिले त्यामुळे सगळ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आता सोमवारपासून रिझल्टला जोरदार सुरुवात होईल तर रिझल्ट कसे लागतात यावरच सर्व काही अवलंबून आहे

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.