नमस्कार
अमेरिका आणि चीनचे संबंध पुन्हा बिघडले. रेअर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत चिनने बंधने वाढवली. 5 मिनरल्स लिस्टमध्ये घालण्यात आली. एकंदर 17 मिनरल्स पैकी बारा मिनरल्स आता या लिस्ट मध्ये आहेत. त्यासाठी एक्स्पोर्ट लायसन्स घ्यावे लागेल mining ,smelting, प्रोडक्शन यासाठी सुद्धा लायसन्स घ्यावे लागेल. अमेरिकेने 100% tariff लावले. पूर्वीचे तीस टक्के होतेच आता एकंदरीत 130 टक्के झाले. हे TARIFF एक नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. या सगळ्या वातावरणामुळे क्रिप्टो मध्ये मंदी आली. Qualcomm अँटी ट्रस्ट इन्वेस्टीगेशन सुरू झाले. म्हणून शेअर पडला. अलीबाबा चा शेअर सुद्धा मंदीत गेला याचा सगळ्या जगातील मार्केट वर परिणाम झाला.
टाटा मोटर्सच्या डीमर्जरची 14 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट आहे पण आज शेअर घेतले तरी demerger चा लार्सन अँड टुब्रो लार्सन नेट टुब्रो फायदा मिळेल.
टाटा मोटर्सच्या डीमर्जरची 14 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट आहे पण आज शेअर घेतले तरी demerger चा लार्सन अँड टुब्रो लार्सन नेट टुब्रो फायदा मिळेल.
CAMS च्या शेअरचे स्प्लिट जाहीर झाले. दहा रुपये फेस व्हॅल्यू असलेले शेअर आता दोन रुपये फेस व्हॅल्यू चे होतील. एका शेअरचे पाच शेअर मध्ये विभाजन होईल.
HCC ला हिंदालकोकडून अलुमिनियम स्मेल्टर एक्सपान्शन ओरिसामध्ये करण्यासाठी रु 204 कोटीची ऑर्डर मिळाली.
Waaree renewable प्रॉफिट 117% वाढले ते रु 116.3 कोटी झाली. तर रेवेन्यू 47.7% वाढून रु 774 .8 कोटी झाला.
महिंद्रा लाईफने मालाड वेस्ट ला चार हाऊसिंग सोसायटीची रीडेव्हलपमेंट करण्यासाठी पार्टनरशिप केली ह्याची किंमत आठशे कोटी आहे. 165 एकर मध्ये हे लोकेटेड आहे.
Phoenix दुसऱ्या क्वार्टरचा आणि पहिल्या सहामाहीचा परफॉर्मन्स चांगला आहे. रिटेल consumption १३ टक्के तर क्वार्टर 2 मध्ये बारा टक्के वाढले. मुंबई, इंदोर, अहमदाबाद ,पुणे ,बंगलोर येथील मॉल मध्ये चांगला परफॉर्मन्स आहे. बंगलोर आणि पुणे येथे कलेक्शन 92 टक्के वाढले. ग्रॉस रेसिडेन्शियल सेल्स रु १३९ कोटी झाले
इन्फोसिसने कस्टमर एक्सपिरीयन्स सूट सेल्स फोर्स साठी लॉन्च केले.
वेलस्पन इटरप्राईजेस महाराष्ट्रात रु 7300 कोटींचे हायवे प्रोजेक्ट आणि बीएमसी कडून नवीन वॉटर ट्रीटमेंट प्रोजेक्टसाठी L1 bidder ठरले
टाटा कॅपिटल चे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 330 रुपयाला लिस्टिंग झाले आयपीओमध्ये हा शेअर 326 रुपयाला दिला होता.
बी एस एल इंटरनॅशनल ला विदेश मंत्रालयाने दोन वर्षांसाठी इंडियन मिशन टेंडर्स मध्ये भाग घेण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. पण आत्ता सुरू असलेले प्रोजेक्ट मात्र पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.
Avenue सुपर मार्ट यांचे प्रॉफिट रु 685 कोटी तर रेवेन्यू रु 16 हजार 676 कोटी झाले पण मार्जिन मात्र 0.30% कमी झाले.
Euro Pratik यांचे प्रॉफिट कमी झाले, रेव्हेन्यू आणि मार्जिन वाढले.
Endurance च्या औरंगाबाद युनिट मध्ये 11 ऑक्टोबर पासून कमर्शियल प्रॉडक्शन सुरू झाले. टू व्हीलर साठी एक लाख 50 हजार सेट्स प्रत्येक महिन्याला एवढी कपॅसिटी आहे. पण फ्युचर मध्ये एक लाख 80 हजार एवढी कपॅसिटी होईल.
Quess corp ला रु 42.23 कोटी रिफंड मिळाला
Senco वेस्ट बंगाल येथे नवीन फ्रेंचाईज उघडले आणि उत्तर प्रदेशात सुद्धा एक स्टोअर उघडले आता स्टोर ची संख्या 184 झाली.
वेशुव्हियसने विशाखापट्टनम येथील प्लांट बंद केला.
झेन टेक्नॉलॉजीला ऍडव्हान्स अँटी ड्रोन सिस्टिम साठी रु 37 कोटीची ऑर्डर मिळाली
एशियन पेंटच्या UAE मध्ये कमर्शियल प्रोडक्शन ऑपरेशन सुरू केले.
NHPC राजस्थान मधील बिकानेर येथील कर्निझर प्रोजेक्टची पाचवी आणि सहावी फेज पूर्ण करून ट्रायल घेतली आता कमर्शिअल ऑपरेशन साठी हा प्लांट तयार झाला.
Paytm पेटीएम फायनान्शियल कडून फोस्टर पेमेंट नेटवर्क मधला 90% स्टेट 55 कोटी रुपयाला घेतला.
KPIT युकेच्या सबसिडीरीने OXI SRL इटली मध्ये शंभर टक्के स्टेक साठी सहा मीलियन डॉलर दिले .
गॉडफ्रें फिलिप्स कंपनीच्या आंध्रप्रदेशातील प्लांटला आग लागली यामध्ये जीवित हानी झाली नाही. किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू आहे.
HDFC AMC 15 ऑक्टोबरच्या मीटिंग मध्ये बोनस वर विचार केला जाईल
वोडाफोन आयडियाची पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर 2025 रोजी होईल.
L&T कंपनीला ग्रिड इन्फ्रा साठी 2500 ते 5000 कोटी पर्यंत ऑर्डर मिळाली
रेलीगेअर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स बिझनेस अलग काढून लिस्ट करणार आहेत आणि कंपनी त्यांचा फोकस ब्रोकिंग आणि lending व्यवसाय यावर केंद्रित करेल.
आज ज्याप्रमाणे जागतिक पातळीवर गोंधळ चालू होता त्यानुसार मार्केट खूप आपटेल असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण तेवढा परिणाम भारतीय बाजारावर झालेला दिसला नाही. उद्या काय होते ते
भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507
