आजचं मार्केट – १४ ऑक्टोबर २०२५

नमस्कार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या बाबतीत त्यांचे धोरण सौम्य केले. त्यामुळे पुन्हा शेअर बाजारात तेजी आली. Broadcom हा शेअर दहा टक्क्याने वाढला कारण ओपन AI बरोबर त्यांनी collaboration केले. जेपी मार्गन हा शेअर वाढला कारण त्यांनी 1.5 ट्रिलियन यु एस डॉलरची गुंतवणूक करणार असे सांगितले. कॉस्मेटिक giant Estee Lauder हा शेअर साडेसात टक्के वाढला कारण त्यांचे रेटिंग upgrade झाले.

आनंद राठी वेल्थ कंपनीने सहा रुपये डिव्हिदंड दिला. 17 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट आहे. कंपनीचे प्रॉफिट रु 76 कोटी वरून रु 99 कोटी झाले रेव्हेन्यू Rs 242 कोटी वरून Rs 297 कोटी झाला तर मार्जिन त्रेचाळीस टक्क्यावरून 46.2% झाले.
HCL technologies कंपनीने 12 रुपये डिव्हीडंट दिला 17 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट आहे. कंपनीला प्रॉफिट रु 3843 कोटी वरून रु 4236 कोटी झाला. कंपनीचे उत्पन्न रु.30349 कोटी वरून रु 31 हजार 942 कोटी झाले. कंपनीचे मार्जिन 16.3 टक्क्यावरून 17.25 टक्के झाले तर एबीट Rs. 4942 वरून Rs. 5502 कोठे झाला.
Just dial कंपनीचा रिझल्ट लागला. प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले. पण उत्पन्न वाढले.
लँडमार्क कार हैदराबाद येथील नवीन आउटलेट उघडणार आहेत. त्यांचे व्हेईकल सेल्स 35 टक्क्यांनी वाढले ते रु 1403 कोटी झाले स्पेअर पार्ट सेल्स दहा टक्क्याने वाढून रु 252 कोटी झाले तर उत्पन्न 30% ने वाढून रु 1655 koti झाले
RBL बँके मध्ये Emirates NBD कंट्रोलिंग स्टेक घेणार आहे. हे डील तीन बिलियन डॉलर्सचे असेल. 60% स्टेक घेतला जाईल.
सप्टेंबरचा कन्स्युमर price इंडेक्स 1. 54 आला तर होलसेल प्राइस इंडेक्स 0.13 झाला ऑगस्ट मध्ये हा 0. 52 होता. कोअर इन्फ्लेशन वाढले 1.7 वरून 1.8 झाले.
केईसी इंटरनॅशनल इंडिया आणि मीडल इस्ट मध्ये ट्रान्सलेशन आणि डिस्ट्रीब्यूशन साठी रु 1174 कोटीची ऑर्डर मिळाली सौदी अरब कडून रु 1064 कोटीची ऑर्डर मिळाली
ऑइल इंडियाने NEEPCO बरोबर पंधरा वर्षाचा करार केला. आसाम मधील बोकुलोनी पावर प्लांटला नियमित गॅस सप्लाय करण्यासाठी हा करार केला.
Kfin सिंगापूर ॲसेट फंड सर्विसेस मध्ये 51 टक्के स्टेक घेणार आहेत.
RSWM बिर्ला ऍडव्हान्सड knits कडून त्यांची dying, प्रोसेसिंग, knitting मशीनरी Rs ५४.११ कोटीला घेणार आहेत.
LT foods ग्लोबल ग्रीन इंटरनॅशनलच् तीन entity घेणार आहेत.
लोढाने बंगलोर मध्ये 8.37 एकर जमीन घेतली. चैतन्य बिलवा मध्ये शंभर टक्के स्टेक घेतला.
लाईडस इंजीनियरिंगने पोलंडच्या फ्लाय फोकस बरोबर डिफेन्स साठी ऍडव्हान्स FPV ड्रोन डेव्हलप करण्यासाठी MOU केले.
हिरो मोटो Pelpi इंटरनॅशनल बरोबर डिस्ट्रीब्यूशन पार्टनर शिप करून इटालियन मार्केटमध्ये प्रवेश केला.
भारती एअरटेल विशाखापट्टण येथे मेगा AI हब आणि डाटा सेंटर साठी गुगल बरोबर पार्टनरशिप करार केला.
कोचीन शिपयार्डला दोन हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची ऑर्डर LNG fuelled fodder vessel साठी युरोपच्या कंपनीकडून मिळाली.
IREDA चे प्रॉफिट 41 टक्के वाढले तर उत्पन्न 26 टक्के ने वाढले. ग्रॉस NPA कमी झाले. नेट एनपीए कमी झाले.
टीसीएस ने google क्लाऊड बरोबर जेमिनी इंटरपाईजेस चे ग्राहकांसाठी आणि वर्कफोर्स साठी इंटिग्रेशन करण्यासाठी करार केला.
गुगलने नवीन gigawat AI हब विशाखापट्टणम मध्ये उभारण्यासाठी US$ 15बिलियनची गुंतवणूक करणार असे जाहीर केले. हे आयटी प्रोफेशनल च्या skilling मध्ये मदत करेल.
आयसीआयसीआय pru चा रिझल्ट लागला त्यांचे ए पी ई रु 2500 वरून कमी होऊन रु 2422 कोटी झाले. VNB Rs 586 वरून रु 592 झाले फायदा रु 251 कोटीचा रु 296 कोटी झाला वी एन बी मार्जिन 23.40 टक्क्यावरून 24.40% झाले.
टाटा मोटर्सचे दोन भाग झाले. एक भाग पॅसेंजर व्हेईकलचा आणि एक भाग कमर्शियल व्हेईकलचा झाला. कमर्शियल व्हेईकलच्या विभागाचे सेपरेट लिस्टिंग होईल पण पॅसेंजर विभाग चारशे रुपयाला लिस्ट झाला.
इन्फोसिसला युकेच्या नॅशनल हेल्थ सर्विस साठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले वर्क फोर्स बॅलन्स सोल्युशन साठी करार केला हे कॉन्ट्रॅक्ट 120 कोटी पौंडचे आहे
बँक ऑफ महाराष्ट्र चा रिझल्ट लागला फायदा रु 1317 कोटी वरून रु 1633 कोटी झाला नेट इंटरेस्ट इन्कम रु 2807 कोटी वरून रु 3248 कोटी झाले प्रोविजन रु 867 कोटी वरून रु 756 कोटी झाले. नेट NPA ०.१८ , ग्रॉस वर फ्लॅट राहिले.ग्रॉस एनपीए 1.74 वरून 1.72 एवढे झाले.
परसिस्टंट सिस्टीमचा रिझल्ट लागला. फायदा रु 425 कोटी वरून रु 471 कोटी झाला. उत्पन्न रु 3334 कोटी वरून रु 3581 कोटी झाले. EBIT रु 517 कोटी वरून रु 583 कोठे झाले. मार्जिन 16.6% झाले.
आज एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे लिस्टिंग भरपूर सुंदर झाले. ज्यांना शेअर मिळाले त्यांना भरपूर लिस्टिंग गेन झाले व दिवाळीच्या आधी दिवाळी झाली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. पण मार्केटचा करेक्शनचा जो मूड होता तो काही बदलला नाही असे दिसते आता उद्याचा प्रश्न आपण उद्या सोडवू

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.