आजचं मार्केट – १५ ऑक्टोबर २०२५

नमस्कार

अमेरिकेमध्ये मार्केट खूप व्होलटईल होते. DOW JONES चा हाय आणि लो यामध्ये हजार पॉईंटचा फरक होता.चीन अमेरिकेकडून सोयाबीन घेण्यास तयार नाही. त्यामुळे अमेरिका सुद्धा चीनकडून खाद्यतेल घेणार नाही. जे पी मॉर्गन , गोल्डमन साक्स वेल्स फॉरगो आणि सिटी यांचे रिझल्ट चांगले आले. फेडने सांगितलं की आर्थिक स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही.
टेक महिंद्राचा रिझल्ट लागला. QOQ प्रॉफिट वाढले तर YOY बेसिसवर प्रॉफिट कमी झाले. रु 1194 कोटी प्रॉफिट झाला. रु 13995 कोटी झाला. एबिट Rs १६९९ कोटी झाले. मार्जिन 8.5% झाले. कंपनीने 15 रुपये लाभांश दिला. 21 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट आहे.
वेदांताला CCI ने जयप्रकाश असोसिएट खरेदी करायला मंजुरी दिली.
लीला पॅलेस हॉटेल चा प्रॉफिट रु ७५ कोटी तर उत्पन्न रु 333 कोटी झाले
आयसीआयसीआय Lombard याचे प्रॉफिट 18% वाढून रु 819 कोटी झाले उत्पन्न 12.5% ने वाढून रु 6582 कोटी झाले. ग्रॉस प्रीमियम income रु ७०५८ कोटी झाले. सॉल्व्हनसी रेशो 2.4 होता. साडेसहा रुपये लाभांश दिला. त्याची रेकॉर्ड डेट ३१ ऑक्टोबर आहे.
Cyient DLM कंपनीचे प्रॉफिट रु 15 कोटी वरून रु 32 कोटी झाले तर कंपनीचे उत्पन्न रु 310 कोटी झाले मार्जिन 8.1% टक्क्यावरून दहा टक्के झाले.
मिश्र धातू निगमला रु 306 कोटीची नवी ऑर्डर मिळाली. एकंदर ऑर्डर बुक Rs २२१२ कोटी झाले.
सुला वाईन यार्डचे उत्पन्न कमी झाले ते रु 139 कोटी झाले त्यांच्या ब्रँडचे उत्पन्न 2.5% कमी होऊन रु 124 कोटी झाले. वाईन टुरिझमचे मात्र वाढला त्याचे उत्पन्न 7.7 टक्के वाढ होऊन रु 13.2 कोटी झाले.
कोलते पाटील डेव्हलपर्स विक्री 13 टक्क्याने कमी होऊन रु 670 कोटी झाली सेल्स व्हॉल्युम १७ टक्के कमी रियलाजेशन पाच टक्क्याने वाढले. ते प्रत्येक स्क्वेअर फुटाला ७८२३ रुपये झाले कलेक्शन 8% वाढून रु 596 कोटी झाले
ओला इलेक्ट्रिक 17 ऑक्टोबर रोजी नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे.
थायरोकेअरचे प्रॉफिट 81 टक्के वाढ होऊन रु 47.81 कोटी झाले. उत्पन्न बावीस टक्के वाढ होऊन रु. 216 कोटी झाले. मार्जिन तेहतीस टक्के वाढले . कंपनीने एका शेअरला दोन शेअर बोनस जाहीर केला. सात रुपये डिव्हिडंड देणार आहेत.
पर्सिस्टंट प्रॉफिट ११ टक्क्याने वाढवून रु 471 कोटी झाले उत्पन्न 7.4% ने वाढून 3580 कोटी रुपयांची झाले एबिट १३ टक्के वाढ होऊन रु 583 कोटी झाले. मार्जिन वाढले ते 16.3% झाले.
Keystone रियालिटी 3.63% स्टेकच्या माध्यमातून विकणार आहेत म्हणजेच 45.8 लाख शेअर्स 15 आणि 16 तारखेला होईल. Rs 550 रुपये आहे ही किंमत कालच्या भावाच्या दहा टक्के डिस्काउंट वर आहे.
नवनीत गुजरात मध्ये प्लास्टिक मोल्डिंगचे उत्पादन करण्यासाठी त्यांनी युनिट लावले
सोनाटा सॉफ्टवेअरने Adesso बरोबर AI साठी करार केला.
दालमीया भारत पाचशे कोटी रुपयांमध्ये सिमेंट फॅक्टरी घेणार या रिपोर्टचे खंडन केले.
जीना सिखोने Pet Yakrit,Pleeha, शुद्धी किट लॉन्च केली.
किर्लोस्कर फेरसने कर्नाटक प्लांट मधील ऑपरेशन 40 दिवसांसाठी बंद केले.
एल जी इलेक्ट्रॉनिक्स एक नवीन लाईन ऑफ Appliences ची series सुरू करणार आहेत.
डी मार्टने आंध्र प्रदेशात नवीन स्टोअर उघडले आता स्टोर ची संख्या 433 झाली.
HCL TECH GSMA बरोबर टेलिकॉम इनोव्हेशन साठी भागीदारी केल.
GR infra 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या काळात इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तपासणी केली. त्याचा व्यवसायावर काही परिणाम झाला नाही.
डीसीएम श्रीरामने गुजरातच्या भरूच येथील केमिकल कॉम्प्लेक्स मध्ये 35000 TPA चा प्लांट लावला. आणखी 17000 TPA लवकरच सुरू करणार आहेत. लेमन ट्री हॉटेल्स ने गुजरात मध्ये 54 रूमचे हॉटेल सुरू केले. .
हेरिटेज फूड प्रॉफिट, उत्पन्न वाढलं पण मार्जिन कमी झालं.
एचडीएफसी लाइफ चा रिझल्ट लागला. फायदा रु 447 कोटी झाला. APE Rs 3858 कोटींवरून रु 4188 कोटी झाले. VNB Rs 940 कोटी वरून रु 1009 कोटी, VNB मार्जिन 24.3% वरून 24.1% झाले. न्यू बिझनेस प्रीमियम रु 8097 कोटी वरून रु 8950 कोटी झाला.
ॲक्सिस बँकेचा रिझल्ट लागला फायदा कमी झाला तो रु 5090 कोटी झाला. नेट इंटरेस्ट इनकम वाढले ते रु 13744 कोटी झाले. ग्रास NPA 1.57 वरून 1.46 झाले. नेट NPA 0.45 वरून 0.44 झाले.
एचडीएफसी ए एम सी चा रिझल्ट लागला त्यांनी एका शेअरवर एक शेअर बोनस जाहीर केला त्यांचे प्रॉफिट रु 577 कोटी वरून रु 718 कोटी झाले. उत्पन्न रु 887 कोटी वरून रु 1027 कोटी झाले.
ASTRA ZENKA ने सोडियम जिरकोनियम कायडोसिलीकेट पावडर नोव्हेंबर मध्ये लॉन्च करणार आहे. रक्तात पोटॅशियमचे प्रमाण वाढले असल्यास हे औषध दिले आहे.
आय आर एफ सी चा रिझल्ट लागला. त्यांचा फायदा वाढला, उत्पन्न कमी झालं. एक रुपया पाच पैसे डिव्हिडंड दिला. 24 ऑक्टोबर रेकॉर्ड डेट आहे .
टाटा कम्युनिकेशनचा फायदा कमी झाला, उत्पन्न वाढलं, मार्जिनही वाढलं.
मार्कसन्स फार्मा ला UK regulators कडून CLONIDINE या रक्तदाबावरील औषधाला मंजुरी मिळाली
इंडियन हॉटेल गेल्या सहा महिन्यात 26 नवीन हॉटेल उघडली 46 हॉटेल साठी करार केला आहे सध्या त्यांची 250 पेक्षा अधिक हॉटेल आहेत 2030 पर्यंत 700 हॉटेल करण्याचा मानस आहे
आज मार्केट तेजीत होते एकदाच फक्त मार्केटने धक्का दिला पण तिथूनही मार्केट सावरले 600 पॉईंटच्या आसपास सेन्सेक्स मध्ये तेजी होती स्मॉल कॅप, मिड कॅप सगळीकडेच तेजी दिसली अशीच तेजी दिवाळीपर्यंत तरी राहू दे म्हणजे सगळ्यांना आनंदाने दिवाळी साजरी करता येईल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूया

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.