आजचं मार्केट – १६ ऑक्टोबर २०२५

नमस्कार

अमेरिकेतील स्टॉक मार्केट आणि भारतीय स्टॉक मार्केट याच्या मध्ये फारसा फरक नाही तेथील मार्केट सुद्धा तेवढेच अस्थिर आहे. अमेरिकेमध्ये बँकांचे रिझल्ट चांगले लागले. मॉर्गन Stanley , bank of America यांचे रिझल्ट चांगले लागले. अमेरिकेचे असे म्हणणं आहे की भारतीय सरकार रशियाकडून क्रूड खरेदी करणे कमी करणार आहे. पण ताबडतोब शक्य नाही ही एक प्रक्रिया आहे. हळूहळू क्रूडची खरेदी कमी केली जाईल. पण भारतीय सरकारकडून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा झाली नाही. चीनने सुद्धा रशियाकडून क्रूड खरेदी करणे बंद करावे असे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियाकडून क्रूड खरेदी केल्यामुळे रशिया युक्रेन युद्धाला कळत नकळत मदत होते असे अमेरिकेचे म्हणणे आहे. आज क्रुड चा भाव US $ 62.38 प्रती बॅरल आहे.फॉरेन इन्वेस्टरनी रु 69 कोटीची खरेदी तर डोमेस्टिक इन्वेस्टरनी रु 4650 कोटीची खरेदी केली आहे.
ओबेरॉय रियालिटी आणि रोझारी बायो यांचे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले तर मार्जिन कमी झाले.
डेल्टा कॉर्प आणि केवल किरण यांचे प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले पण उत्पन्न वाढले.
MRPL तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले
L&T फायनल यांचे प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.
Huhtamaki चे प्रॉफिट आणि मार्जिन वाढले, उत्पन्न कमी झाले.
अडाणी ग्रीन चे अपडेट आले. ऑपरेशन कपॅसिटी 49 टक्क्याने वाढून 16.7 झाली sale of एनर्जी 39 टक्क्याने वाढून रु 1957 कोटी झाली.
केईआय चा रिझल्ट लागला. प्रॉफिट वाढला, उत्पन्न वाढले पण प्रगतीचा वेग कमी झाल्यामुळे शेअर पडला.
HDB फायनान्शियल सेक्युरिटीचे प्रॉफिट, नेट इंटरेस्ट इन्कम, एकूण उत्पन्न ,प्रॉफिट सर्व गोष्टी वाढल्या.
डाबर दिल्ली इन्कम टॅक्स विभागाने केलेली टॅक्सची मागणी रु 219 कोटी वरून रु 202 कोटी केली.
BEL ला रु 592 कोटीची ऑर्डर मिळाली.
डी मार्ट कर्नाटक मध्ये नवे स्टोर उघडले आता स्टोर ची संख्या 434 झाली
जिंदाल स्टेटलेस slag प्रोसेसिंग कॅपॅसिटी दुप्पट करणे, सर्क्युलर प्रोडक्शन efforts वाढवणे यासाठी Harsco एन्व्हायरमेंटल बरोबर 150 बिलियन डॉलर्सचा करार केला
केईसी इंटरनॅशनल ला 1038 कोटीची ऑर्डर मिळाली
एनटीपीसी ग्रीन कंपनीच्या सबसिडीयरीने भूज येथे 12.5 MW कॅपॅसिटीचा सोलर पॉवर प्लांट सुरू केला
टीव्हीएस मोटर ने टीव्हीएस आपाचे आरटीएक्स लॉच केली त्याची किंमत रु 1.99 लाख आहे
Rain इंडस्ट्री ग्रीन ग्राफाईट टेक्नॉलॉजी बरोबर भागीदारी केली. बॅटरी मटेरियल सोल्युशनचा विस्तार करण्यासाठी ही भागीदारी केली.
MTR ला रु 67 कोटीची ऑर्डर मिळाली.
IOL केमीकलला युरोप कडून pantaprazol sodium sesquihydrate process lll साठी सर्टिफिकेट ऑफ सुटेबिलिटी मिळाले.
जी एम आर पॅसेंजर ट्राफिक 91.5 लाख एवढा झाला हा तीन पॉईंट तीन टक्के कमी झाला.
नेटवर्क 18 लोकमत मीडीया कडून रु 25 कोटीला IBN लोकमत न्यूज घेणार आहे.
Nestle कंपनीचा रिझल्ट लागला. कंपनीचे प्रॉफिट
रु 986 कोटी वरून रु 753 कोटी झाले उत्पन्न रु 5,104 कोटी वरून रु 5644 कोटी झाले. मार्जिन 22.9% वरून 21.9 % टक्के झाले. डोमेस्टिक व्हॉल्यूम मध्ये डबल डिजिट ग्रोथ झाली. हे व्हॉल्यूम ग्रोथ एक ते दोन टक्के होईल असे अनुमान होते.
IOB फायदा रु ७७७ कोटी वरून रु 1220 कोटी झाला. ग्रॉस एन पी ए 1.97% वरून 1.83% झाले. नेट NPA 0.३२% वरून पॉईंट 0.28 %झाले. NII Rs 2537 कोटी वरून रु 3159 कोटी झाले.
अशोक लेलँड ला तामिळनाडू स्टेट ट्रान्सपोर्ट काढून 1937 बस साठी ऑर्डर मिळाली.
DB corp प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.
इंडियन बँक प्रॉफिट रु 2706 कोटी वरून रु 3018 कोटी झाला NII रु 6194 कोटी वरून रु 6551 कोटी झाले नेट NPA ०.१८% वरून 0.16 % झाले
Mastek फायदा रु 92 कोटीवरून रु 97 कोटी तर उत्पन्न रु 915 कोटी वरून रु 940 कोटी झाले. मार्जिन 15% वरून 15.5 % झाले.
साउथ इंडियन बँकेचा रिझल्ट लागला. फायदा रु 325 कोटी वरून रु 351 कोटी झाला ग्रास NPA 3.15 %वरून 2.90%झाले प्रोविजन रु 239 कोटी वरून रु 63 कोटी झाली नेट NPA 0.68% वरून 0.56% झाले. NII रु 882 वरून रु 808 कोटी झाले.
कजारिया सिरॅमीक्स फायदा रु 84 कोटी वरून रु 133 कोटी झाला. उत्पन्न रु 1162 कोटीवरून रु 1186 कोटी झाले. मार्जिन 14 टक्क्यावरून 18% टक्के झाले.
आजच्या मार्केटमध्ये केईआई इडस्ट्री हा टॉप लूजर होता. तर ओबेरॉय रियालिटी हा टॉप विनर होता.
भारत फोर्ज नी रोल्स royce बरोबर फॅन चे ब्लेड सप्लाय करण्यासाठी करार केला.
इटर्नल किंवा झोमॅटो चा रिझल्ट लागला. त्यांचे प्रॉफिट रु 176 कोटी वरून रु 65 कोटी झाले. उत्पन्न रु 4799 कोटी वरून रु 13590 कोटी झाले मार्जिन 4.70 % वरून 1.80% झाले.
विप्रो चा रिझल्ट लागला त्यांचे प्रॉफिट कमी झाले. रु 3330 कोटी वरून रु 3246 कोटी झाले. उत्पन्न रु 22080 कोटी वरून रु 22641 कोटी झाले. मार्जिन 16.2% वरून 16.7% झाले. डॉलर रेवेन्यू
US $260.43 कोटी झाला. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 0.3% झाली.
जे एस डब्ल्यू इन्फ्राचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले.
इन्फोसिस चा फायदा 6 921 कोटी वरून रु 7365 कोटी झाला. उत्पन्न रु 44,490 कोटी झाले. EBIT Rs.9353 कोटी तर मार्जिन 20.80% टक्क्यावरून 21% झाले. डॉलर आय 494 कोटी वरून 507.6 कोटी झाले तर कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ 2.2% झाली.इन्फोसिसने रेव्हेन्यू ग्रोथ दोन ते तीन टक्के राहील असे सांगितले. लार्ज डील कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 310 कोटी US डॉलर्स आहे. 23 रुपये लाभांश दिला. त्यासाठी रेकॉर्ड डेट 27 ऑक्टोबर आहे. .

Cyient चा रिझल्ट लागला फायदा 179 कोटी वरून 127 कोटी झाला तर उत्पन्न 1849 कोटी भरून 1781 कोटी झाले मार्जिन 16 % वरून 12.3 % झाले.16 रुपये डिव्हिडंड दिला.

LTI Mindtree या कंपनीचे प्रॉफिट 1254 कोटी वरून 1381 कोटी झाले उत्पन्न 9840 कोटी वरून 10394 कोटी झाले डॉलर मध्ये उत्पन्न 118 कोटी झाले कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 2.4%, मार्जिन 15. 9% झाले तर डिव्हीडंड बावीस रुपये दिला त्याची रेकॉर्ड डेट 24 ऑक्टोबर ही आहे.

आज मार्केट खूप छान होते 25 हजार 600 चा टप्पा मार्केटने ओलांडला आहे आहे मार्केट नऊशे पॉईंट तेजीत होते काल आज दोन्हीही दिवस मार्केटमध्ये तेजी सुरू आहे उद्याही असेच मार्केट चालले तर आठवडा तेजी मध्ये संपेल आणि दिवाळी साजरी करायला उत्साह येईल

भाग्यश्री फाटक. bpphatak@gmail.co. 9699615507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.