Author Archives: bpphatak

आजचं मार्केट – १७ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १७ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.०५ प्रती बॅरल रुपया US $१= Rs ७४.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९१.४५ US बॉण्ड यिल्ड १.५८ VIX १४.८० ते १५.३१ दरम्यान होते. PCR १.०५ होते.

आज USA फेड ने आपले निर्णय जाहीर केले. त्यांनी व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. व्याज दर ०.००% ते ०.२५% च्या दरम्यान राहतील असे सांगितले. त्यांनी सांगितले की आम्ही २०२३ वर्षात व्याज दर २ वेळा वाढवू. आतापर्यंत त्यांनी सांगितले होते की आम्ही २०२४ पर्यंत व्याज दरात बदल करणार नाही.

फेडने सांगितले की आम्ही QUANTATIVE EASING अंतर्गत दर महिन्याला US $ १२० बिलियनचे ऍसेट खरेदी करू.
त्यांनी महागाईचे लक्ष्य २.४% वरून ३.४% केले. GDP ग्रोथ ६.५ %ऐवजी ७% राहील असे अनुमान केले. या फेडच्या घोषणेनंतर US $ निर्देशांक आणि US बॉण्ड यिल्डमध्ये वाढ झाली. फेडने महागाई नियंत्रित करण्याऐवजी GDP ग्रोथला प्राधान्य दिले असे दिसते आहे. फेडच्या या निर्णयाचे पडसाद USA तसेच जगाच्या अन्य मार्केट्समध्ये उमटले. जागतिक मार्केट काही काळ मंदीत गेली.

आज भारतीय मार्केटमध्ये मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजित होते. उदा युनायटेड स्पिरिट्स, ग्लोबस स्पिरिट्स, रॅडिको खेतान, तसेच सिमेंट, IT, ज्युवेलरी, FMCG आणि फर्टिलायझर क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. आज मेटल्स संबंधित शेअर्स मंदीत होते.

CESC या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने आपल्या एका शेअरचे १० शेअरमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घोषित केला.

वेल स्पन इंडियाचे निकाल असमाधानकारक होते.

फेडरल बँक Rs ९१६.२५ कोटी वर्ल्ड बँक किंवा इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला शेअर्स इशू करून उभारणार आहे. Rs ४००० कोटी इक्विटी आणि इतर इन्स्ट्रुमेंट्स दवारा उभारणार आहे. Rs ८००० कोटी भारतीय किंवा परदेशी चलनातील बॉण्ड्सच्या दवारा उभारणार आहे.

नाथ बायो ही कंपनी २४ जून २०२१ रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल, शेअर बायबॅक आणि लाभांशावर विचार करणार आहे
KEC इंटरनॅशनल या कंपनीला रेल्वेकडून Rs ९३७ कोटींची ऑर्डर मिळाली.

L & T इन्फोटेक ही कंपनी ‘CUE LOGIC टेकनॉलॉजि’ या डिजिटल इंजिनीअरिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रातील कंपनीला US $ ८.४ मिलियन ( Rs ६१.६ कोटींना) खरेदी करणार आहे.

TTK प्रेस्टिज या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले आणि कंपनीने Rs ३० प्रती शेअर अंतिम लाभांश जाहीर केला.

फार्म Easy ही कंपनी थायरोकेअर या कंपनीला Rs ७००० कोटींना खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे.

PUBLISHMEमध्ये नजारा टेकनॉलॉजी ही कंपनी मोठा स्टेक खरेदी करणार आहे. हिमाद्री केमिकल्स या कंपनीचा टेस्ला या USA मधील कंपनीबरोबर करार झाल्याच्या बातमीचा हिमाद्री केमिकल्स ने इन्कार केला.

आज टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की ट्रक टायर आणि इतर टायरच्या किमती ४% ते ५% ने वाढू शकतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३२३ NSE निर्देशांक निफ्टी १५६९१ बँक निफ्टी ३४६०५ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १६ जून २०२१

आज क्रूड US $ ७४.०० प्रती बॅरल, रुपया US $ १= Rs ७३.३६, VIX १४.७५ च्या आसपास होते. PCR १.३८ तर US $ निर्देशांक ९०.५१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.४९ होते.

USA मध्ये इन्फ्लेशन ५% पर्यंत वाढल्यामुळे आता फेड आपला ‘QUANTITATIVE EASING’ चा कार्यक्रम कमी करते का अर्थव्यवस्था पूर्व स्थितीला येईपर्यंत चालू ठेवते या कडे मार्केटचे लक्ष आहे.या संबंधित फेडचा निर्णय उद्या समजेल.
चीनने कमोडिटी आयात करण्यावर नियंत्रण ठेवायला सांगितले आहे. तसेच चीन स्वतःच्या मेटल्सचा रिझर्व्ह स्टॉक विक्रीसाठी काढणार आहे. उदा स्टील, कॉपर झिंक, अल्युमिनियम. या चीनच्या घोषणेनंतर सर्वे मेटल्सशी संबंधित शेअर्समध्ये मंदी आली.

ज्युबिलण्ट फार्मोवा ही कंपनी ‘OCUGEN’ च्या सहकार्याने USA आणि कॅनडा या मार्केटसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनचे उत्पादन करणार आहे.

LIC ने ल्युपिनमधील आपला स्टेक ४% वरून ६% पर्यंत वाढवला. तसेच LIC, LIC हौसिंग मध्ये आणखी ४.५४% स्टेक वाढवणार आहे.

आज शिपिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये म्हणजे G.E. शिपिंग, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. कारण बाल्टिक ड्राय निर्देशांक १४% वाढला आहे. तसेच कंटेनरसाठी १६ दिवसांचे वेटिंग आहे आणि त्यासाठी प्रीमियमही द्यावा लागत आहे.

IFTRT ( इंडियन फौंडेशन ऑफ ट्रान्सपोर्ट रिसर्च अँड ट्रेनिंग) ने ट्रकचे भाडे १४% ने वाढवले. पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. याचा फायदा लॉजिस्टिक कंपन्या उदा महिंद्रा लॉजिस्टिक्स, गती, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच या कंपन्यांना फायनान्स करणाऱ्या श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी सारख्या कंपन्यांना होईल.
धूनसेरी टी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २३ जून २०२१ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

सोने विकताना हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची मुदत १६ जून २०२१ पासून ३१ ऑगस्ट पर्यंत २०२१पर्यंत वाढवली. ज्यांचा वार्षिक टर्नओव्हर Rs ४० लाखापर्यंत आहे अशा ट्रेडर्सना अनिवार्य हालमार्किंग मधून सूट दिली. ज्या २५६ जिल्ह्यांमध्ये
हॉलमार्किंग सेंटर्स आहेत तेथे हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. अशी सेंटर्स उभारण्यासाठी सरकार सबसिडी देणार आहे. कुंदन ,जडाववाल्या दागिन्यांना हॉलमार्किंगची जरूर नाही. जुन्या दागिन्यांना हॉलमार्किंगची जरूर नाही. हॉलमार्किंग झालेल्या सोन्यावर BIS असा स्टॅम्प असेल. सध्या फक्त ३०% सोन्याची विक्री हॉलमार्किंग झाल्यावर होते.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने P &K फर्टिलायझर्सवरील सबसिडी Rs १४७७५ कोटींनी वाढवली. यापैकी NPK फर्टिलायझर्ससाठी Rs ५६५० कोटी तर DAP साठी Rs ९१२५ कोटी सबसिडी वाढवली यामुळे आता खतउत्पादनाची कॉस्ट वाढली असली तरी खताच्या किमती वाढणार नाहीत / कमी वाढतील. याचा फायदा RCF, मद्रास फर्टिलायझर्स, चंबळ फर्टिलायझर्स, NFL आणि दीपक फर्टिलायझर या कंपन्यांना होईल. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

वेदांताने व्हिडिओकॉनसाठी सादर केलेली रेझोल्यूशन बीड मंजूर झाली. त्यामुळे आता वेदांताला रावा ऑइलफिल्डमध्ये २५% पार्टीसिपेटींग इंटरेस्ट मिळेल. व्हिडिओकॉन ग्रुपमध्ये १३ कंपन्या आहेत. या कंपन्या आता ट्वीन स्टार टेक्नॉलॉजी या कंपनीच्या मालकीच्या होतील. याशिवाय व्हिडिओकॉन ग्रुप इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, मध्ये असल्याने ऍसेट बेस डायव्हर्सिफाइड होईल. रावा ऑइलफिल्डसमध्ये केर्नकडे २२.५% ONGC कडे ४०%, व्हिडिओकॉनकडे २५% तर रावा ऑईलकडे १२.५% ओनरशिप आहे. व्हिडिओकॉनच्या अक्विझिशननंतर वेदांताचा रावा ऑइलफिल्डमधील इंटरेस्ट दुप्पट होईल. यासाठी वेदांताला US $ ४०मिलियन अपफ्रंट द्यायचे आहेत. ही रक्कम टोटल बीडच्या १०% पेक्षा कमी आहे. उरलेली रक्कम २ वर्षांनंतर द्यायची आहे.

पिरामल ग्रुपने केलेल्या DHFL च्या रेझोल्यूशन बीड प्रमाणे पिरामल ग्रुप प्रथम DHFL च्या शेअर्सचे डीलीस्टिंग करून ती पिरामल कॅपिटल हौसिंग फायनान्स मध्ये मर्ज करणार आहे. या रेझोल्यूशन बीड मध्ये DHFL शेअरहोल्डर्ससाठी कोणतीही तरतूद/ऑफर केलेली नाही. NCLT च्या मंजुरीनंतर हे डीलीस्टिंग होत असल्यामुळे DHFL च्या शेअरहोल्डरसाठी कुठलीही ऑफर किंवा तरतूद या प्लानमध्ये नाही. त्यामुळे DHFL च्या शेअरहोल्डर्सना या डीलीस्टिंग मधून काहीही मिळणार नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५०१ NSE निर्देशांक निफ्टी १५७६७ बँक निफ्टी ३५००३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १५ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १५ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.४७ USA बॉण्ड यिल्ड १.४८ क्रूड ७३.३० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७३.४० च्या आसपास होते. VIX १४ ते १५ च्या दरम्यान तर PCR १.५२ होते.

न्यूजेन सॉफ्टवेअर या कंपनीच्या शेअर्समध्ये Rs ४४० ते Rs ४५४ प्रती शेअर या भावाने Rs ३७५ कोटींचे ( १२% स्टेक) ब्लॉक डील झाले. या ब्लॉक डीलनंतर शेअरमध्ये तेजी आली.

क्रूडचा भाव सतत वाढत आहे. त्यामुळे क्रूडची कॉस्ट कमी करण्यासाठी इथनॉलब्लेंडींग हा एक उपाय आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादन करणाऱ्या साखर उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी राहील असा अंदाज वर्तवला जात आहे. उदा विश्वराज शुगर पोन्नी शुगर. द्वारकेश शुगर.

विविध राज्य सरकारे आता हळूहळू शाळा कॉलेज सुरु करण्याचा विचार करू लागली आहेत. त्यामुळे आज पेपर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. उदा शेषशायी पेपर, रुचिरा पेपर, JK पेपर, ऍस्ट्रोन पेपर, मालू पेपर, आंध्र पेपर, वेस्ट कोस्ट पेपर , स्टार पेपर. त्याच प्रमाणे शोभा, DLF, गोदरेज प्रॉपर्टीज, इंडिया बुल्स रिअल, आणि प्रेस्टिज इस्टेट या रिअल्टी क्षेत्रामधील शेअर्स मध्ये तेजी होती.

आज पेंट्स उत्पादन करणाऱ्या एशियन पेंट्स, कन्साई नेरोलॅक, बर्जर पेंट्स, इंडिगो पेंट्स या शेअर्समध्ये तेजी होती.
जुन १८ २०२१ रोजी HDFC बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

अशोक लेलँड या कंपनीने स्विच मोबिलिटी ऑटोमोबाइल्स ही कंपनी घेतली. अनुपम रसायन या कंपनीने IPO च्या रकमेतून Rs ५३० कोटींचे कर्ज फेडले. कोल इंडियाने Rs ३.५० प्रती शेअर तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने Rs २ अंतिम लाभांश जाहीर केला

ज्युबिलण्ट फूड्स, व्हर्लपूल, सॅटिन क्रेडिट केअर,या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले नेलकॅस्ट (प्रॉफिट कमी झाले पण उत्पन्न वाढले), स्पेन्सर रिटेल ( लॉस कमी उत्पन्न कमी) .यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण आले. श्याम मेटॅलिक्स या कंपनीचा IPO १.९७ पट भरला पण सोना कॉमस्टारचा (सोना BLW प्रिसिजन फोर्जिंग्स) IPO १८% भरला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२७७३ NSE निर्देशांक निफ्टी १५८६९ बँक निफ्टी ३५२४७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १४ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १४ जून २०२१

आज क्रूड US $ ७२.७० प्रती बॅरल तर रुपया US $ १= Rs ७३.२७ च्या आसपास USA बॉण्ड यिल्ड १.४६ US $ निर्देशांक ९०.५० इंडिया विक्स १४.७१ होते.

USA फेडची मीटिंग चालू आहे त्यात काय निर्णय झाला हे गुरुवारी समजेल. इराण बरोबर चालू असलेल्या न्यूक्लिअर अग्रीमेंट संबंधित वाटाघाटीमध्ये फारशी प्रगती नाही. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात क्रुडमध्ये तेजी असेल आणि ते US $ ८० प्रती बॅरल एवढे महाग होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

आज भारतीय मार्केट ओपन झाले ते एक प्रकारचा धक्का घेऊनच. NSDL या डिपॉझिटरीने बेनेफिसिअल ओनरशिपविषयी समाधानकारक आणि पुरेशी माहिती दिली नाही म्हणून सेबीकडे फॉरीन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणून रजिस्टर केलेल्या ALBULA इन्व्हेस्टमेंट फंड, CRESTA फंड आणि APMS इंव्हेजेस्टमेंट फंड या तीन परदेशी फंडांना अडाणी एंटरप्रायझेस, अडानी ग्रीन एनर्जी, अडानी ट्रान्समीशन, अडानी टोटल गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी किंवा विक्री करण्यास मनाई केली. म्हणजेच या तीन फंडांचे DEMAT अकाउंट फ्रीझ केले. सेबीने नवीन KYC नियमांअंतर्गत शेअर्सची ‘कॉमन ओनरशिप’ तसेच महत्वाच्या कर्मचाऱयांची माहिती सादर करायला सांगितली होती. ही माहिती २०२० पर्यंत द्यायची होती. या तीन फंडांकडे मिळून वरील चार अडाणी ग्रुपच्या Rs ४३५०० कोटी किमतीच्या शेअर्सची मालकी आहे. हे फंड पोर्ट लुईस मधील एकाच पत्त्यावरून बिझिनेस करतात. आणि त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट्स नाहीत.

त्याचप्रमाणे अडाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये ‘प्राईस मॅनिप्युलेशन’ झाले का याचीही सेबी वेगळी चौकशी करत आहे.अशी बातमी आली. कारण अडाणी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीमध्ये खूपच वाढ झाली आहे. या बातमीमुळे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये लक्षणीय मंदी आली तर काही शेअर्सना लोअर सर्किट लागले पण दुपारी अडाणी ग्रुपकडून स्पष्टीकरण आले की रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट्सनी असे स्पष्टीकरण दिले आहे की या तीन फंडांचे डिमॅट अकाउंट (ज्याच्यामध्ये या कंपन्यांचे शेअर्स होल्ड केले आहेत) फ्रीझ केलेले नाहीत. या स्पष्टीकरणानंतर अडाणी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स बरेच स्थिरावले. त्याशिवाय अडाणी ग्रुप आता सिमेंट क्षेत्रात पदार्पण करीत आहे अशी काहीशी सकारात्मक बातमी आली.
GST कॉऊन्सिलच्या बैठकीत कोविड संबंधी काही औषधे, काही वैद्यकीय उपकरणे तसेच म्युकरमायकोसिस वरील औषधांवरील GST चे दर कमी केले/किंवा GST च्या कक्षेतून बाहेर काढले. त्यामुळे ही औषधे किंवा उपकरणे उत्पादन करणाय्रा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली. BPL, मोरेपन लॅब, लिंडे इंडिया NURECCA USFDA ने ल्युपिन या कंपनीच्या सॉमरसेट, न्यू जर्सी प्लांट्सना वार्निंग लेटर इशू केले.

मरिना होल्डिंग्सने झेन्सार टेक्नॉलॉजी या कंपनीचे २.३ कोटी शेअर्स ब्लॉक डील च्या रुटने विकले. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मंदी आली.

सन टीव्हीचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले सब्स्क्रिप्शन, ऍडव्हर्टायझिंग रेव्हेन्यूत लक्षणीय वाढ झाली. पण कंपनीने Rs ५ प्रती शेअर लाभांश जाहीर केल्यामुळे शेअरहोल्डर्सची निराशा झाली.

IOB, कजरिया सिरॅमिक्स, ग्लोबस स्पिरिट्स, IDFC चे निकालही चांगले आले. BHEL आणि JK सिमेंट यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. कोल इंडियाचे प्रॉफिट थोडे कमी झाले. कंपनीने Rs ३.५० अंतिम लाभांश जाहीर केला.

जून महिन्यात VIX बर्याच प्रमाणात कमी झाले म्हणून मार्केटमधील वोलतालीटी काही प्रमाणात कमी झाली. पण आज मात्र VIX मध्ये वाढ झाली.

मे २०२१ महिन्यासाठी CPI ६.३०% ( एप्रिलमध्ये ४.२३% )एवढा आला. ही वाढ अन्नधान्य खाद्य तेले इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे झाली. मे २०२१ महिन्यासाठी WPI १२.९४% आले.

श्याम मेटॅलिक्स आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या IPO ना ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रीमियम मिळत आहे. पण सोना कॉमस्टार हा इशू FULLY प्राइस्ड असल्याने त्याला ग्रे मार्केटमध्ये थंडा प्रतिसाद मिळतो आहे.

या आठवड्यात चार IPO ओपन होऊन क्लोज होत आहेत. या IPO ला सबस्क्राईब करण्यासाठी सेकंडरी मार्केटमधून पैसा काढला जाणार असल्यामुळे या आठवड्यात प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५५१ NSE निर्देशांक निफ्टी १५८११ बँक निफ्टी ३४९५० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ११ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ११ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.०३ क्रूड US $ ७२.५० प्रती बॅरल तर रुपया US $१= Rs ७३.०५ च्या आसपास होते. USA बॉण्ड यिल्ड १.४४ होते. USA चे जॉबलेस क्लेम्स ३.७६ लाख एवढे आले. USA मध्ये इन्फ्लेशन ५% एवढे (म्हणजे १३ वर्षातील कमाल स्तरावर) झाले. पण ही इन्फ्लेशनमधील वाढ मुख्यतः लेबर शॉर्टेज, जुन्या गाड्यांच्या किमती, रिपेअरिंग आणि सर्व्हिस चार्जेस यामुळे झाली. थोडक्यात ही तात्कालिक कारणे असून जशी जशी परिस्थिती सुधारेल तशी तशी ही महागाई कमी होईल. असा विश्वास वाटल्यामुळे मार्केटने हे आकडे रेकॉर्डवर घेतले आणि आपली तेजी कायम ठेवली.
युरोपियन युनियनने आपल्या ग्रोथचे एस्टीमेट वाढवले आणि आम्ही लिक्विडीटी पुरवत राहू असे सांगितले.

मॉडर्नाने १२ ते १७ वर्षांच्या लोकांसाठी व्हॅक्सिनची परवानगी मागितली. फायझरने तर ६ महिन्यांच्या मुलांसाठी व्हॅक्सिन डेव्हलप केले आहे असा दावा केला.

रुपया आज US $१= Rs ७३ च्यापेक्षा जास्त घसरला. त्यामुळे IT आणि फार्मा या निर्यातीशी संबंधित क्षेत्रात तेजी होती.
‘ORBIMED’ हा USA मधील फार्मा फंड मार्कसन फार्मा या कंपनीत मोठी गुंतवणूक करणार आहे. या बातमीनंतर मार्कसन फार्माच्या शेअरला अपर सर्किट लागले.या कंपनीने प्रमोटर्सना १२% जास्त भावाने वॉरंट इशू केले. मार्क सालढाणा यांना Rs ३७२.४ कोटींची १० लाख वॉरंटस जारी करणार आहे.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १७ जूनरोजी बोनस शेअर इशू आणि अंतिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

टाईड वॉटर ऑइल या कंपनीने Rs ५ दर्शनी किमतीचे Rs २ दर्शनी किमतीच्या शेअरमध्ये स्प्लिट आणि त्यानंतर १:१ बोनस आणि Rs २०० लाभांश जाहीर केला.

१९ जून २०२१ रोजी वक्रानगी हे कंपनी आपल्या डिजिटल केंद्र म्हणजेच भारत इझी सुपर ऍप चे डीमर्जर करणार आहे.
टाटा मोटर्सला ११५ अँब्युलन्सची गुजरात राज्य सरकारकडून ऑर्डर मिळाली. यापैकी २५ अँब्युलन्स ( हिचे नाव WINGER असे ठेवले आहे) कंपनीने डिलिव्हर केल्या. त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी होती.

पुढील आठवड्यात दोन IPO येत आहेत. डोडला डेअरी या कंपनीचा Rs ५२० कोटींचा IPO १६ जूनला ओपन होऊन १८ जूनला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ४२१ ते Rs ४२८ असून मिनिमम लॉट ३५ शेअर्सचा आहे. ही हैदराबाद स्थित कंपनी असून ती महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगाणा या राज्यात आणि युगांडा आणि केनया या देशात कार्यरत आहे.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा Rs २१४४ कोटींचा IPO १६ जून २०२१ रोजी ओपन होऊन १८जूनला बंद होईल. या IPOचा प्राईस बँड Rs ८१५ ते Rs ८२५ असून मिनिमम लॉट १८ शेअर्सचा असेल. ही हैदराबाद बेस्ड ९ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स चेन असून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यात कार्यरत आहे. IPOच्या प्रोसिड्समधून बंगलोर चेन्नई भुवनेश्वर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स उघडण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४७४ NSE निर्देशांक निफ्टी १५७९९ आणि बँक निफ्टी ३५०४७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १० जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १० जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.१६ USA मधील बॉण्ड यिल्ड १.४८ % रुपया US $१= Rs ७३.०७आणि क्रूड US $ ७२.४८ प्रती बॅरल , PCR १.१२ आणि VIX १४.७५ च्या आसपास होते. USA मध्ये डाऊ जोन्स मंदीत होते. USA चे अध्यक्ष जो बिडेन यांनी टिकटॉक आणि व्ही चॅट वरील बंदी उठवली.

अडाणी गुपने त्यांचा एअरपोर्ट बिझिनेस अडाणी एंटरप्रायझेसमधून वेगळा काढण्यासाठी प्राथमिक बोलणी चालू केली आहेत या कंपनीचे नाव अडाणी एअरपोर्ट्स होल्डिंग्स असेल. आता अडाणी ग्रुप सहा एअरपोर्ट्सचे ( अहमदाबाद, लखनऊ,मंगलोर, जयपूर, गौहत्ती, थिरुवानंतपूरम) आधुनिकरण आणि ऑपरेशन आणि मुंबई एअरपोर्टचे व्यवस्थापन करतात. त्यांनी MIAL (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) मध्ये ७४% स्टेक खरेदी केला आहे. यामुळे नवी मुंबई एअरपोर्टची मालकी अडाणी ग्रुपकडे असेल. ही कंपनी एअरपोर्ट बिझिनेससाठी Rs १२००० कोटी भांडवल उभारणार आहे. या एअरपोर्ट युनिटला Rs ४१०० कोटींचे कर्ज आहे. आता कोरोनाच्या प्रभावामुळे एअरपोर्ट बिझिनेस अडचणीत आहे. त्यामुळे विमान प्रवास व्यवस्थित चालू झाल्यावर या कंपनीचा IPO आणण्यात येईल.

टीम लीज, बजाज हेल्थकेअर, मुंजाल ऑटो, गेल, इंडिया मेटल्स, स्टार सिमेंट,सेरा सॅनिटरी वेअर ( Rs १३ लाभांश), अंबिका कॉटन ( Rs ३५ लाभांश), माझगाव डॉक या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

गेलने आपला गॅस उत्पादन आणि मार्केटींग यांचा बिझिनेस वेगळा करण्याची योजना रहीत केली. आता गेल त्यांच्या पाइपलाईन्सचे मोनेटायझेशन करू शकेल.

झेन टेक्नॉलॉजीला एक मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेल्या दोन नेगेटिव्ह लिस्ट मध्ये असलेली बहुतेक संरक्षण साधन सामुग्री ही कंपनी बनवते. त्यामुळे या गोष्टीची आयात थांबवण्याचा निर्णय झाल्यावर त्याचे उत्पादन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट झेन टेक्नॉलॉजीला मिळेल अशी अपेक्षा आहे.हे Rs १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट सिम्युलेटर्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. ही काँट्रॅक्टस आत्मनिर्भर भारत आणि मेड इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत दिली जातील. यामुळे आज झेन टेक्नॉलॉजीचा शेअर तेजीत होता.

SBI कार्ड्सचा मार्केटशेअर लॉकडाऊनच्या काळातही कमी झाला नाही. डिजिटल कार्यक्रमाला सरकार प्रोत्साहन देत असल्यामुळे अनलॉक झाल्यावर या बिझिनेसमध्ये वाढ होईल. या अपेक्षेने हा शेअर वाढत होता.

आज मेडिया सेक्टरमध्ये तेजी होती. जागरण प्रकाशन, नेटवर्क १८, टीव्ही १८ ब्रॉडकास्ट, हाथवे, डेन नेटवर्क, इरॉस मल्टिमीडिया, टीव्ही टुडे, HT मेडिया या शेअर्समध्ये तेजी होती. अनलॉक होत असल्यामुळे बिझिनेस वाढेल ते जाहिरातींवर अधिक खर्च करतील आणि त्यामुळे मेडिया कंपन्यांचे जाहिरातींचे उत्पन्न वाढेल.

पुढील आठवड्यात एप्रिलमहिन्यासाठी IIP, मे २०२१ साठी CPI आणि WPI च्या येणाऱ्या आकड्यांवर मार्केटचे लक्ष असेल.

आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पार्टली पेड शेअर्सचे ( फर्स्ट कॉल नंतर) Rs १५७० वर लिस्टिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३०० NSE निर्देशांक निफ्टी १५७३७ आणि बँक निफ्टी ३५१३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ९ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ९ जून २०२१

आज US $ निर्देशांक ९०.१०, USA बॉण्ड यिल्ड १.५३, क्रूड US $ ७२.४० च्या आसपास तर PCR १.३० होते. US $ १= Rs ७२.९७ होता .

USA मध्ये होणार असलेली फेडची बैठक, यूरोपमधील ECB चा धोरणात्मक निर्णय आणि उद्या जाहीर होणारा महागाईचा डेटा याची मार्केट उत्सुकतेने वाट बघत आहे. चीन आणि USA मध्ये क्रूडसाठी असलेली मागणी वाढत आहे. तसे सामान्यपणे आता काही अपवाद वगळता सर्व जगात अनलॉक होत असल्यामुळे क्रूडसाठी असलेली मागणी वाढत आहे. भारतातही लॉक डाऊन असूनही डिझेल आणि पेट्रोलच्या किमती पुष्कळ वेळा वाढवाव्या लागल्या.

तसेच अनलॉक झाल्यामुळे उद्योग धंदे, दुकाने, हॉटेल्स आणि इतर बिझिनेस एस्टॅब्लिशमेंट्स ओपन झाल्यामुळे विजेसाठी असलेली मागणी जूनच्या पहिल्या आठवड्यात वाढली. विजेचा खप १२% ने वाढला. म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वीज उत्पादन करणाऱ्या तसेच वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना कर्ज देणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या. उदा REC, PFC,NHPC, SJVN, PTC,NTPC, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील तर खाजगी क्षेत्रातील अडानी पॉवर, टॉरंट पॉवर आणि टाटा पॉवर या कंपन्या तेजीत होत्या.

अडाणी पॉवरचा शेअर आज तेजीत होता. विजेचा खप सामान्यतः अनलॉक आणि वाढलेला औद्योगिक कारभार यामुळे वाढला. राजस्थान आणि महाराष्ट्र राज्य सरकार कडून जे येणे बाकी होते ती पेमेंट मिळू लागली. त्यामुळे अडाणी पॉवरला कर्ज फेडता आले. अंदाजपत्रकात पॉवर डिस्ट्रिब्युशन क्षेत्रासाठी Rs ३ लाख कोटी अलॉट केले आहेत.

सरकारने सर्व पॉवर क्षेत्राशी संबंधीत असलेल्या संस्थांना पॉवरसप्लायच्या अभावी कुठलीही औद्योगिक प्लांट्स , रेल्वे इत्यादी सर्व क्षेत्रांना पुरेसा आणि अखंडित पॉवर सप्लाय होईल या साठी पुरेशी पॉवर जनरेशन क्षमता तयार करायला सांगितले आहे. त्यामुळे आज पॉवर क्षेत्रातील कंपन्या आणि विशेषतः अडानी पॉवरमध्ये लक्षणीय तेजी होती.अडानी पॉवरचे डीलीस्टिंग होणार होते ते आता रद्द झाले, ही ईष्ट आपत्तीच ठरली. आता जरी फ्रेश डीलीस्टिंग झाले तरी ते चढ्या भावाला होईल. अडानी पॉवरचा IPO २८ जुलै २००९ ते ३१ जुलै २००९ या वेळात Rs ९० ते Rs १०० या प्राईसबँडमध्ये आला होता. हे शेअर्स IPO मध्ये Rs १०० ला अलॉट झाले.

पुष्कळ काळापासून रेल्वे आपल्याला स्पेक्ट्रमची अलॉटमेंट व्हावी अशी सरकारला विनंती करत होती. आजच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये रेल्वेला स्पेक्ट्रम अलॉट करण्यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे आज रेल्वेशी संबंधीत कंपन्यांमध्ये विशेषतः रेलटेल राईट्स मध्ये तेजी होती.

अनलॉकमुळे आणि व्हॅक्सिनेशनमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्राला चांगली मागणी आली. गती, स्नोमॅन लॉजिस्टिक्स, ब्ल्यू डार्ट, एजिस लॉजिस्टिक्स, महिंद्रा लॉजिस्टिकस, पटेल इंटिग्रेटेड , या कंपन्यांमध्ये तेजी होती.

NFL, EIL, आणि FACT याचे जॉईंट व्हेंचर असलेली रामगुंडं या फर्टिलायझर कंपनीतील गुंतवणूक सरकार वाढवणार आहे.

सोना कोयो ( JTEKT) चे प्रमोटर आता सोना कॉमस्टार या कंपनीचा Rs ५५५० कोटींचा IPO १४जून २०२१ ते १६ जून २०२१ या कालावधीत आणत आहेत. या IPO चा प्राईस बँड Rs २८५ ते Rs २९१ असून मिनिमम लॉट ५१ शेअर्सचा असेल. या इशू मध्ये फ्रेश इशू RS ३०० कोटीचा असून Rs ५२५० कोटींची ऑफर फॉर सेल असेल. ही कंपनी ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि त्यांचे पार्टस यांचे डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय करणारी मोठी कंपनी आहे.

सरकार चीनमधून आयात होणाऱ्या पर्ल इंडस्ट्रियल पिगमेंट्सवर US $ २२४ प्रति टन ते US $ ५५०० प्रती टन एवढी ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावणार आहे. याचा फायदा सुदर्शन केमिकलला होईल.

रिलायन्सच्या पार्टली पेड शेअर्सचे ( पहिल्या कॉलच्या पेमेंट नंतर) उद्या रीलिस्टिंग होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५१९४१ NSE निर्देशांक निफ्टी १५६३५ आणि बँक निफ्टी ३४८०० वर बन्द झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ८ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ८ जून २०२१

आज जागतिक मार्केट्स मध्ये नरमी होती. क्रूड US $ ७१.४० प्रती बॅरल तर रुपया ७२.८३ च्या आसपास होते.
US $ निर्देशांक ९० तर USA मध्ये बॉण्ड यिल्ड १.५६ होते.

आज जागतिक मार्केट्स मध्ये नरमी होती. DOW मंदीत होते पण NASHDAQ ०.५% वर होते. NASHDAQ तेजीत असेल तेव्हा IT आणि TECH सेक्टरमधील शेअर्समध्ये तेजी असते. UN आणि इराण यांच्या होणाऱ्या आण्विक कराराकडे सगळ्यांचे लक्ष आहे. कालच्या डेटाप्रमाणे DII ने चांगल्या प्रमाणावर खरेदी केली पण FII ने मात्र विक्री केली.

भारतात COVIDच्या केसेस वेगाने कमी होत आहेत. तसेच व्हॅक्सिनेशनचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मार्केटमध्ये एक आशादायक वातावरण होते. कोविडच्या केसेस कमी होत असल्याने काही अपवाद वगळता बहुतेक सर्व ठिकाणी अनलॉक होत आहे/ निर्बंध कमी केले जात आहे. त्यामुळे दुकाने हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक खुली झाल्यामुळे बिझिनेसमध्ये येणाऱ्या अडचणी कमी होत आहेत.

रेझीन बॉन्डेड THIN व्हील्स वर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याची शक्यता आहे याचा फायदा कॉर्बोरॅन्डम युनिवर्सल आणि ग्राईंडवेल नॉर्टन या कंपन्यांना होईल.

टेक्शर्ड आणि टेम्पर्ड कोटेड आणि नॉन कोटेड ग्लासवर ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा बोरोसिल रिन्यूएबल्स या कंपनीला होईल.

आज IRCTC हा रेल्वेशी संबंधित शेअर तेजीत होता. कोविडच्या केसेस कमी झाल्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मे २०२१ मध्ये वाढली आहे. यांच्या पाठोपाठ रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे ऑनलाईन आरक्षण करणार्याची संख्या वाढेल. या ऑनलाईन बुकिंग मध्ये IRCTC चे मार्जिन चांगले आहे. रेल्वेचा आपल्या गाड्यांची संख्या वाढवण्याचा तसेच गाड्या ३०% प्रवासी क्षमतेऐवजी ५० %प्रवासी क्षमतेवर चालवण्याचा विचार चालू आहे. तसेच कॅटरिंग सेवा/रेलनीर सेवा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या सर्व गोष्टींचा फायदा IRCTC ला होईल.

श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी चा Rs ९०९ कोटींचा IPO १४ जूनला ओपन होऊन १६ जूनला बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs ३०३ ते Rs ३०६ आहे.मिनिमम लॉट ४५ शेअर्सचा आहे.ही कंपनी फेरोअलॉयज आणि लॉन्ग स्टील क्षेत्रातील मोठी उत्पादक आहे. या कंपनीचे ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये प्लांट आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस या कंपन्यांना IPO आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली. वाडिया ग्रुप त्यांच्या ‘गो एअर’ या कंपनीचा IPO ऑगस्ट २०२१ मध्ये आणणार आहेत.

टू व्हीलर E -व्हेइकलला असलेली सबसिडी Rs १५००० पर्यंत वाढवली आणि सर्व E -व्हेइकल्सवर मिळणाऱ्या सबसिडीची मुदत २०२४ पर्यंत वाढवली. या आधी ही मुदत २०२२ मध्ये संपणार होती.याचा फायदा ग्रीव्हज कॉटन, JBM ऑटो, टाटा मोटर्स यांना होईल.

हेस्टर बायोचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ही कंपनी Rs ४० कोटी खर्च करून कोव्हॅक्सीनसाठी लागणाऱ्या ‘SUBSTANCE DRUGS’ बनवण्यासाठी युनिट चालू करणार आहे.

CEAT भारतात टायरच्या किमती ८% वाढवणार आहे.

युनियन बँक, (युनियन बँक NARCL ला Rs ७८०० कोटीची कर्ज विकणार आहे). टिटाघर वॅगन या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२२७५ NSE निर्देशांक निफ्टी १५७४० बँक निफ्टी ३५०८५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ७ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ जून २०२१

आज क्रूड US $ ७१.४७ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७२.८० च्या आसपास होते. इंडिया VIX १५.२४ होते.

मार्केटच्या आशादायी मनःस्थितीला सातत्याने कमी होणाऱ्या कोरोना रुगणांच्या संख्येमुळे आणि परिणामी होणाऱ्या अनलॉकिंगचा सपोर्ट मिळाला आणि मार्केटमधील तेजी कायम राहिली. आता सर्व देशांनी त्यांच्या देशात बिझिनेस करत असणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नावर कमीतकमी १५% कॉर्पोरेट कर भरावा असा करार G-७ देशांनी ठरवले. आज २०८ शेअर्सची सर्किट लिमिट बदलली/ वाढवली. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.

कोरोनाच्या रुगणांची संख्या कमी होत असल्यामुळे सर्वत्र अनलॉकिंग/ निर्बंध कमी केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी असलेली मागणी वाढेल. त्यामुळे FMCG आणि कन्झ्युमर प्रोडक्टस उत्पादन करणाऱ्या शेअर्समध्ये तेजी होती.
तसेच इथेनॉल ब्लेंडींगची समय मर्यादा अलीकडे आणल्यामुळे तसेच इथेनॉल उत्पादनासाठी दिलेल्या उत्तेजनामुळे आणि जागतिक साखरेच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी राहील. अनलॉकिंग होत असल्यामुळे हॉटेल्स रेस्टोरंट्स ओपन होतील. त्यामुळे साखरेला असलेल्या मागणीत वाढ होईल.

क्रूडच्या दराने US $७२ प्रती बॅरेलची मर्यादा पार केली. जगात सर्वत्र अनलॉकिंग होत असल्यामुळे क्रूडसाठी असलेली मागणी वाढेल. त्यामुळे क्रूडचे दर US $ ७५ ते US $ ८० प्रती बॅरल च्या दरम्यान असतील असा अंदाज वर्तवला जात आहे. या क्रूडच्या दरातील वाढीमुळे ऑइल एक्सप्लोरेशन आणि क्रूड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी येईल. तसेच क्रूड वाहून नेणाऱ्या पाईप आणि इतर मशीनरी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी येईल. उदा ONGC, OIL इंडिया., HOEC, सेलन एक्स्प्लोरेशन, जिंदाल ड्रिलिंग, अबन ऑफशोअर, वेदांत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. सध्या या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव क्रूडच्या US $ ५० ते US $५५ प्रति बॅरल या भावावर आधारित आहेत.त्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्सचे रीरेटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .

कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया रेल्वेची जमीन ३५ वर्षांसाठी भाड्याने घेणार आहे. त्यासाठी Rs ३५०० कोटी अपफ्रंट पेमेंट रेल्वेला कंटेनर कॉर्पोरेशन करणार आहे. या जमिनीवर कंपनीचे २४ कंटेनर डेपो असतील. यामुळे कंटेनर कॉर्पोरेशन मधील विनिवेशाचा मार्ग सोपा होईल. सरकार या कंपनीमधील १०% स्टेक डायव्हेस्ट करणार आहे. कोविड १९ च्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय वाहतुकीमध्ये उपयुक्त असणाऱ्या शिपिंग कंटेनर्ससाठी मागणी वाढली. सध्या ह्या कंटेनर्सचे उत्पादन मुख्यतः चीनमध्ये होते. भारताची निर्यात प्रामुख्याने कंटेनराईझ्ड असल्यामुळे भारताला या शिपिंग कंटेनर्सची जरूर भासणार हे ओळखून सरकारने BHEL आणि BRAITHWATE या कंपन्यांना ‘आत्मनिर्भर भारत’ या कार्यक्रमाखाली प्त्येकी १००० शिपिंग कंटेनर्स उत्पादन करण्यासाठी ऑर्डर दिल्या. तसेच कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’ चाही फायदा होईल. अशा प्रकारे कंटेनर कॉर्पोरेशनचा कारभार वाढेल.

ज्या लोकांनी दोन्ही वॅक्सीनचे डोस घेतले असतील त्यांना विमान प्रवासाकरता पुन्हा RTPCR टेस्ट करावी लागू नये असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर जुलै २०२१ पासून जगातील हवाई वाहतूक वाढेल. या अपेक्षेने आज प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. उदा इंडिगो आणि स्पाईस जेट.

DHFL या कंपनीसंबंधात पिरामल कॅपिटलने सादर केलेल्या रेझोल्यूशन प्लानला NCLT ने मंजुरी दिली. त्यामुळे या दोन्ही शेअर्समध्ये तेजी होती.

सरकार न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीमध्ये १०% विनिवेश सप्टेंबर २०२१ पूर्वी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांची निवड बँक खाजगीकरणाच्या कार्यक्रमासाठी होण्याची शक्यता आहे. तसेच सरकार बँक ऑफ इंडियामधील आपला स्टेक विकण्याची शक्यता आहे. या बातम्यांमुळे या बँकांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

MRF या कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल लॉकडाउनच्या परिणामामुळे सर्वसाधारण होता. पण कंपनीने Rs ९४ प्रती शेअर अंतिम लाभांश आणि Rs ५० स्पेशल लाभांश म्हणून जाहीर केला.

सुंदरम क्लेटन या कंपनीने TVS मोटर्स मधील आपला ५% स्टेक विकला.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२३२८ NSE निर्देशांक निफ्टी १५७५१ आणि बँक निफ्टी ३५४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ जून २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ जून २०२१

आज क्रूड US $ ७१ प्रती बॅरेलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७३.०४ US $ निर्देशांक ९०.५७ आणि VIX १८.३२ होते.

१३ एप्रिल २०२१ नंतर आज आपली भेट होत आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्लॉक देता येत नव्हता. पण सर्व वाचकांनी घातलेली साद देवाने ऐकली आणि या संकटातून माझी मुक्तता केली. मी सर्व वाचकांची आभारी आहे. आजपासून पुन्हा ब्लॉग सुरु करीत आहे.

आजचे क्लूज फारसे चांगले नाहीत. भारतात किंवा USA मध्ये महागाई वाढण्याचा धोका आहे. USA मधील जॉब्स डाटा सुधारला पण जॉब कमी उपलब्ध आहेत. भारतात क्रूडचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत. पण सरकार अर्थव्यवस्थेत टाकत असलेल्या पैसा सर्व झाकून टाकत आहे. त्यामुळे USA मध्ये काय किंवा भारतात काय वाढणाऱ्या महागाईची चिंता भेडसावत आहे. सध्या वाढणारा क्रूडचा दर, आणि रुपयांची घसरण या दोन गोष्टी चिंताजनक आहेत.

ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारतातील साखरेसाठी जागतिक बाजारपेठेत मागणी वाढली तसेच सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे साखर क्षेत्रात तेजी येत आहे. मावाना शुगर, धामपूर शुगर,
आज USA ने भारतातून आयात होणाऱ्या सोन्याच्या दागदागिन्यांवर जे टॅरिफ लावले जात होते ते १८० दिवसांकरता सस्पेंड केले. याचा फायदा जेम्स आणि ज्युवेलरी क्षेत्रातील कंपन्यांना होईल.उदा थंगमाईल ज्युवेलर्स, कल्याण ज्युवेलर्स, TBZ यांना फायदा होईल.

आज रिझर्व्ह बँकेने आपले द्वै मासिक वित्तीय धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल केला नाही. रेपोरेट ४%, रिव्हर्स रेपो रेट ३.३५%, MSF आणि बँक रेट ४.२५% वर कायम ठेवला. RBI ने आपला अकोमोडेटिव्ह स्टान्स कायम ठेवला आणि जोपर्यंत अर्थव्यवस्था कोविड १९ च्या संकटातून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही अकोमोडेटिव्ह स्टान्स कायम ठेवू असे सांगितले.

पावसाविषयी चांगले भाकीत आणि शेतीक्षेत्राची भरीव कामगिरी यामुळे ग्रामीण क्षेत्रात चांगली मागणी असेल. तसेच जागतिक मागणी वाढल्यामुळे भारताच्या निर्यातीत वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. FY २१ साठी रिअल GDP ग्रोथ -७.३% राहील असे अनुमान केले. अन्नधान्याच्या किमती वाढतील. महागाईचे अनुमान FY २१-२२ साठी ५.१% राहील. FY २१-२२ च्या पहिल्या तिमाहीसाठी ५.२%, दुसऱ्या तिमाहीसाठी ५.४%, तिसर्या तिमाहीसाठी ४.७% तर चौथ्या तिमाहीसाठी ५.३% चे अनुमान केले. आम्ही वर्षभरात लिक्विडिटीचा पुरवठा तसेच व्यवस्थित उपलब्धता यासाठी आवश्यक ती पाऊले उचलू असे सांगितले. GSAP -१ अंतर्गत Rs ४०००० कोटींचे ऑपरेशन १७ जून २०२१ रोजी केले जाईल. GSAP-२ अंतर्गत Rs १.२० लाख कोटींचे ऑक्शन करू.

अर्थव्यवस्थेची प्रगती सुरु ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. RBI रस १५००० कोटींची ON टॅप लिक्विडीटी विंडो उघडेल यातून हॉटेल उद्योग, रेस्टारंट, टुरिझम, कार-रिपेअर्स आणि कार रेंटल्स इव्हेंट आणि कॉन्फरंस ऑर्गनायझर्स, ब्युटी पार्लर्स, सलून . या क्षेत्रातील MSME आणि स्मॉल इंटरप्रायझेसना कर्ज देता येतील.

ही पॉलिसी जाहीर झाल्यावर हॉटेल पर्यटन क्षेत्रातील शेअर्स वाढते. थॉमस कुक, EIH, ताज GVK, CHALET हॉटेल्स, रॉयल ऑर्चिड्स, लेमन ट्री हॉटेल्स.

IDBI बँकेच्या बाजूने UK च्या कोर्टात निकाल लागल्यामुळे IDBI बँकेची US $ २३९ मिलियन वसुली होण्याची शक्यता आहे. हा निकाल ईसार शिपिंगच्या CYPRIOT सबसिडीअरी संबंधित आहे.

सोन्याच्या हाँलमार्किंग संबंधित नियम कडक केल्यामुळे असंघटीत क्षेत्रातून व्यापार संघटीत क्षेत्रात येईल. याचा फायदा टायटनला होईल.

APL अपोलो ट्यूब्स आणि अपोलो ट्रायकोट याचे मर्जर होणार आहे.त्यामुळे आज हे दोन्ही शेअर्स तेजीत होते.
अर्थव्यवस्था हळू हळू अनलॉक होईल या अपेक्षेमुळे मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. युनायटेड स्पिरिट्स, GM ब्रुअरीज, सोम डिस्टीलर्स, रॅडिको खेतान

ऍक्सिस बँक आणि स्पंदन स्फूर्ती यांच्यात ऍक्सिस बँकेने स्पंदना स्फूर्ती खरेदी करण्यासाठी प्राथमिक वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे स्पंदन स्फूर्तीच्या शेअरमध्ये तेजी होती .

AB फॅशन, इंडियन हॉटेल्स, कोरोमंडल आणि मेट्रोपोलीस हेल्थकेअर ह्या कंपन्या F & O सेगमेंटमध्ये जुलै सिरीजमध्ये (म्हणजे २५ जून २०२१ पासून) सामील होतील.

बुल मार्केट चालू असल्यामुळे डिमॅट अकाउंट उघडले जात आहेत तसेच ट्रेडिंग व्हॉल्युम्समध्ये वाढ झाल्यामुळे ब्रोकरेज फर्म्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. इन्जेल ब्रोकिंग, रेलिगेअर, JM फायनान्सियलस, ५ पैसा .कॉम

रशियातून आयात होणाऱ्या पॉलीटेट्राफ्लोरोइथिलिनवरील ऍन्टीडम्पिंग ड्युटी ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२१०० NSE निर्देशांक निफ्टी १५६७० आणि बँक निफ्टी ३५२९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!