Author Archives: bpphatak

आजचं मार्केट – ७ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ७ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६६.१३ प्रती बॅरल प्रती बॅरल ते US $ ६६.२१ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.०० ते Rs ७०.०६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८८ होता.

भारतात निवडणुका असल्यामुळे नियमांमध्ये थोडी ढिलाई दिली जात आहे सवलतींची बरसात केली जात आहे .गेले तीन ते चार दिवस मार्केट तेजीत असल्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशियो योग्य नव्हता म्हणून बुल्सची पकडसुद्धा ढिली झाली. आज मार्केट निफ्टी ११०७८ ला तेजीत उघडले आणि ११०५८ ला बंद झाले.

ट्रम्प आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत असे दिसते. २०२० मध्ये USA मध्ये निवडणुका आहेत. ट्रम्प ‘मार्केट कसे चालले आहे’ याची चौकशी करत आहेत. म्हणजे आता मार्केट पडेल असे निर्णय ते घेणार नाहीत असे वाटते. युरोपियन सेंट्रल बँकेची पण आज बैठक आहे. फेडनेसुद्धा रेट वाढवण्यात पॉज घेतला आहे. ग्लोबल ग्रोथ मंदावत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसे टाकले पाहिजेत. आता जगातील सेंट्रल बँक थोडे नरमाईचे धोरण स्वीकारतील. USA ची ट्रेड डेफिसिट १० वर्षांच्या कमाल स्तरावर आहे. ब्रेक्झिटची प्रक्रिया तीन आठवड्यावर येऊन ठेपली आहे.

आज मंत्रिमंडळाची महत्वाची आणि शेवटची बैठक होती. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल. त्यानंतर आचार संहिता लागू होईल. आचार संहिता लागू झाल्यानंतर सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले

(१) इथेनॉल उत्पादन, प्लांट उभारणी या करता सॉफ्ट लोन देण्यासाठी सरकारने Rs १५००० कोटींची तरतूद केली . या सॉफ्ट लोनवर कमाल ५% व्याज आकारले जाईल.
(२) सरकारने तोट्यात चालणाऱ्या थर्मल पॉवर प्रोजेक्टना काही सवलती दिल्या.
(३) हैड्रो पॉवर प्रोजेक्टना रिन्यूएबल एनर्जी सेक्टरचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांना कर्ज उभारणे सोपे जाईल.
(४) इलेट्रीकल व्हेहिकलसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी मंजूर केली. याचा फायदा एक्साईड, अमर राजा बॅटरी, यांना होईल.
(५) चिनार व्हॅली प्रोजेक्ट साठी NHPC ला तर बक्सार येथे १३२० MV थर्मल प्रोजेक्टसाठी NTPC ला मंजुरी दिली.

टेक्सटाईल सबसिडी योजनेची मुदत Rs ६३०० कोटी गुंतवणुकीसकट ३ वर्षे वाढवली. तसेच या सब्सिडीसाठी योग्य अशा वस्तूंची संख्या वाढवली. त्यामुळे आता टेक्सटाईल आणि गारमेंट सेक्टरची बर्याच करातून सुटका होईल.याचा फायदा लक्स, रूपा, डॉलर, अरविंद ,सेंच्युरी आणि रेमंड या कंपन्यांना होईल

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने आज फॉक्सवॅगन या कंपनीला कमी प्रदूषण दाखवणारी सिस्टिम कारमध्ये बसवण्याबाबतीत Rs ५०० कोटी दंड केला. दोन आठवड्यात हा दंड भरण्यास सांगितले.

USFDA ची कमिशनर श्री SCOTT GOTTLIEB यांनी आज दोन वर्षांनंतर अचानक राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भारतीय फार्मा क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली. नव्या येणाऱ्या कमिशनरचा जनरिक ड्रग प्राइसिंग,औषधाना मंजुरी देण्याची गती, आणि रेग्युलेटरी इन्स्पेक्शन या बाबतीत काय पवित्रा असेल याबाबत अंदाज येत नाही म्हणून फार्मा क्षेत्रातील शेअर्स आज मंदीत होते.

बायोकॉनच्या बंगलोर प्लांटची तपासणी USFDA ने केली. त्यात ६ त्रुटी दाखवल्या. या प्लांटमध्ये ओरल इन्शुलिन बनवतात.
मार्कसन फार्माच्या गोवा युनिटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले. त्यांनी ८ त्रुटी दाखवल्या. अरविंदमधून ज्या कंपन्या बाहेर पडल्या त्यापैकी अनूप इंजिनीअरिंगचे लिस्टिंग झाले. उद्या अरविंद फॅशनचे लिस्टिंग होणार आहे.

रिलायन्स कॅपिटल Rs १२००० चे कर्ज दोन ते तीन महिन्यात फेडेल. सध्या कंपनीवर Rs १८००० कोटींचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स NIPONमधील ४३% आणि रिलायन्स जनरल इन्शुअरन्समधील स्टेक विकणार आहे.
टेक सोल्युशन या कंपनीला BSE ने ‘B’ ग्रुपमधून ‘A’ ग्रुप मध्ये टाकले.

पॉवर ग्रिडने Rs ५.८३ प्रती शेअर तर HDFC STANDARD लाईफ ने Rs १.६३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने पुढील दोन वर्षांसाठी चांगले संकेत दिले. एकदा चार्ज झाल्यावर ३०० किलो मीटर जाऊ शकेल अशा इलेक्ट्रिक बसेस मार्केटमध्ये आणणार आहेत. ७ सीटरची SUV बाजारात आणणार आहेत. तसेच आपला JLR मधील स्टेक विकण्याचा विचार नाही असे सांगितले.

महिंद्रा लाईफ स्पेस ने पुण्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लाँच केली.

होंडाने आज आपली ‘CIVIC’ ही नवी कार लाँच केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६७२५ NSE निर्देशांक निफ्टी ११०५८ वर बँक निफ्टी २७७६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ६ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ६ मार्च  २०१९

आज क्रूड US $६५.३२ प्रती बॅरल ते US $ ६५.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.५० ते US $१=Rs ७०.५४ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.९५ होता.

काल USA चे अध्यक्ष ट्रम्प भारत आणि तुर्कस्थानवर मोर्चा वळवला होता. आता ट्रम्पचे लक्ष जपानकडे गेले आहे. जपानने आपल्या येन या करन्सीमध्ये हवा तसा बदल करणे ट्रम्पना मान्य नाही. ट्रम्प यांनी असेही सांगितले की जर उत्तर कोरियाने डिन्यूक्लिअरायझेशनचा कार्यक्रम पार पाडला नाही तर उत्तर कोरियावर निर्बंध घालावे लागतील.कोणाच्याही धमक्यांना न घाबरता आज बुल्सनी उत्तम चढाई केली.बुल्सना क्रूड, रुपया आणि VIX या तिघांनीही साथ दिली. ७ फेब्रुवारी २०१९ नंतर निफ्टीने प्रथमच ११००० चा टप्पा पार केला एवढेच नाहीतर ११००० च्या वर निफ्टी आज क्लोज झाला.

आज मार्केटमध्ये चहा,साखर, आणि पेपर उद्योगातील शेअर्स तेजीत होते. तर IT क्षेत्रातील शेअर्समध्ये किंचित मंदी होती. काल प्रथम मार्केट पडले होते त्यामुळे’ रिस्क रिवॉर्ड रेशियो’ चांगला होता. क्रिकेटच्या भाषेत फुलटॉस होता त्यामुळे मार्केटने सिक्सर मारली. आज नव्याने एन्ट्री करणे योग्य नव्हते. सर्वांनी थोडे थोडे प्रॉफिट बुकिंग करावे, ‘TRAILING स्टॉप लॉसेस’ चा उपयोग करावा. सध्या Rs ५० पेक्षा कमी CMP असलेल्या शेअर्समध्ये तेजी सुरु झाली आहे.. त्यामुळे ट्रेडर्सनी ‘हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी’ असे करू नये कारण सध्या चालू असलेल्या तेजीच्या संगीत खुर्चीचे संगीत कधी थांबेल हे सांगता येत नाही.

११ मार्चला सुरु होणाऱ्या आठवड्यात निवडणूक आयोग सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्या होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असेल. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉल ब्लेंडींग, साखर कारखान्यांना इथेनॉल साठी दिल्या जाणार्या सॉफ्ट लोन मध्ये वाढ आणि कर्जावरील व्याजाच्या दरात सबसिडी देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.

सरकारचा ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील ७३.४७% स्टेक Rs ५१० प्रती शेअर या भावाने विशाखापट्टणम, दिन दयाळ उपाध्याय, जवाहरलाल नेहरू, पारादीप पोर्ट ट्रस्ट हे चार पोर्ट ट्रस्ट खरेदी करतील. आता या शेअरमध्ये ओपन ऑफर आणण्याची गरज नाही.

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीची ऑफर फॉर सेल QIB साठी आजपासून सुरु झाली.उद्या ही ऑफर रिटेल इन्व्हेस्टर्स साठी ओपन होईल. फ्लोअर प्राईस Rs ११०० आहे. प्रमोटर्सचा स्टेक ८२.४% आहे. ते आपल्या या स्टेकपैकी ७.५% स्टेक विकणार आहेत. सेबीच्या नियमानुसार प्रमोटर्सचा स्टेक जास्तीतजास्त ७५% राहू शकतो त्यामुळे कंपनीला OFS आणणे भाग पडले. ( OFS या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.

क्विक हिल ही कंपनी Rs २७५ प्रती शेअर या भावाने ६३.६० लाख शेअर्सचा BUY बॅक करण्यासाठी Rs १७५ कोटी खर्च करेल.

ग्रासिम ही कंपनी एक होल्डिंग कंपनी असली तरी तिचे स्वतःचे व्यवसाय आहेत. ह्या कंपनीने ‘सोकटास इंडिया’ ही कंपनी Rs १६५ कोटींना खरेदी केली.

HDFC म्युच्युअल फंडाने अशोका बिल्डकॉन या कंपनीत २.०५ % स्टेक खरेदी केला.

मारुती लिमिटेड चे फेब्रुवारी २०१९ या महिन्यात उत्पादन ८.३% कमी होऊन १.४८लाख युनिट एवढे झाले. मारुती लिमिटेडने आपली नवी ‘S -CNG WAGON R’ ही कार बाजारात आणली.

DHFL या NBFC च्या बाबतीत कोब्रा पोस्टने जे आरोप केले होते ते रद्द झाले.

किरण अग्रवाल यांची हिंदुस्थान झिंक या कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.

टाटा कम्युनिकेशन ही कंपनी 5G सपोर्टसाठी IPX नेटवर्क लाँच करत आहे.

आपला माल निर्यात करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ऍग्री एक्स्पोर्टसाठी होणारा वाहतुकीचा खर्च सरकार करेल याचा फायदा गुजराथ अंबुजा एक्स्पोर्ट या कंपनीला होईल.

एडेलवाईस या NBFC मध्ये पेन्शन फंड Rs १८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. पेन्शन फंड दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतात. एडेलवाईजच्या दृष्टीने हे चांगले आहे.त्यामुळे एडेलवाईसचा शेअर वधारला.

सेबीने सन फार्माकडे आदित्य मेडिसेल्सच्या माध्यमातून Rs ४२००० कोटी ट्रान्स्फर करण्याविषयी स्पष्टीकरण मागवले.

इंडियम ह्यूम पाईप या कंपनीला रायपूर नगर निगम कडून Rs २५५ कोटींच्या दोन ऑर्डर मिळाल्या.

उत्तर अमेरिकेत क्लास 8 ट्रकची विक्री ५८% ने कमी झाली. ट्रकसाठी ऑर्डर ४०२०० ट्रक्स वरून १६७०० ट्रक्स इतकी झाली. याचा परिणाम भारत फोर्जच्या शेअरवर झाला. .

कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची लाभांशावर विचार करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी बैठक आहे. कोल इंडियाच्या लाभांशाची रेकॉर्ड डेट २५ मार्च २०१९ असेल. NMDC या कंपनीची लाभांशावर विचार करण्यासाठी १२ मार्च २०१९ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६३६ NSE निर्देशांक निफ्टी ११०५३ बँक निफ्टी २७६२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ५ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ५ मार्च  २०१९

आज क्रूड US $६५.०५ प्रती बॅरल ते US $६५.३९ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१= ७०.४७ ते US $१=७०.९४ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.७१ होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती थोडीशी निवळू लागली आहे. ही वादळापूर्वीची शांतता की वादळानंतरची शांतता हे मात्र माहीत नाही. सर्व राजकीय पक्ष्याची मोट बांधली जाणे दृष्टीपथात नाही. त्यामुळे तिहेरी लढती होतील थोड्या अधिक जागा मोदींना मिळतील आणि पंतप्रधानपदाच्या दुसर्या मुदतीसाटी पुन्हा नरेंद्र मोदी यशस्वी होतील असा मार्केटने अंदाज केला. त्यातच रुपया वधारला क्रूडचे दर कमी झाले. सोन्याचा दर हे Rs ३००ने कमी झाला आणि बुल्सना जोर आला.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरचे भिजत घोंगडे तसेच आहे. पण ट्रम्पनी मात्र आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारत आमच्या मालावर ड्युटी जास्त लावत आहे. येत्या ६० दिवसांत भारताने ही ड्युटी कमी केली नाही तर त्यांना GSP मधून बाहेर काढले जाईल.असा इशारा दिला. ट्रम्पच्या या विधानाकडे मार्केटने फारसे लक्ष दिले नाही. आज लार्जकॅप शेअरमधून बाहेर पडून स्वस्त्यात मिळणाऱ्या निवडक मिडकॅप आणि स्माल कॅप शेअर्सकडे मार्केटने मोर्चा वळवला असे जाणवले.

सेबीने कॉर्पोरेट DEBT रिस्ट्रक्चरिंगचे नियम कडक केले. जेट एअरवेजबाबतीत असे वाटले होते की ओपन ऑफर आणण्यापासून सुटका झाली. पण तसे नाही. फक्त लेंडर्सची सुटका ओपन ऑफरच्या नियमातून झाली. बाकीच्याना ओपन ऑफर आणावी लागेल.

११ मार्च २०१९ पासून निफ्टी IT ऑप्शनची साप्ताहिक एक्सपायरी सुरु होईल. निफ्टी IT मध्ये व्हॉल्युम कमी असतात. या साप्ताहिक ऑप्शनमुळे निफ्टी IT मध्ये लिक्विडीटी वाढेल.

शेल इंडिया सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन मधून बाहेर पडणार आहे. शेल इंडियाची हिस्सेदारी कोण खरेदी करणार आणि कोणत्या भावाला खरेदी करायची ह्यावर MGL ची पुढील हालचाल अवलंबून आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी काल असे सांगितले की भारत USA मधून आयात होणाऱ्या मालावर खूप ड्युटी लावतो. त्यामुळे भारताला (जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस) मधून बाहेर केले जाईल याची दखल भारताने घ्यावी. या योजनेखाली काही भारतीय प्रॉडक्ट्स फ्री ऑफ ड्युटी USA मध्ये निर्यात होतात. भारत मुख्यतः ऍग्री प्रॉडक्ट्स, मसाले, पादत्राणे, झिंगे, ज्युवेलरी, गारमेंट्स आणि क्लोदिंग USA ला निर्यात करतो. भारताच्या अर्थसचिवांनी सांगितले की जरी असे झाले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. मार्केट थोडा वेळ मंदीत होते पण अर्थसचिवांच्या या खुलाश्यानंतर मार्केटवरील मळप दूर झाले आणि तेजी परत आली.

केंद्र सरकारनी वेदांताच्या बारमेर क्षेत्रात जो गॅस मिळतो तो GAIL या कंपनीने खरेदी करावा असे सांगितले.

आज टाटा मोटारीची विक्री USA मध्ये लँड रोव्हर ची विक्री १९%नी तर USA मध्ये जाग्वारची विक्री २९% आणि युरोप मध्येही विक्री वाढल्यामुळे टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स DVR हे शेअर्स तेजीत होते.

रिलायन्स इन्फ्राला AAI ( एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) कडून राजकोट विमानतळासाठी Rs ६४८ कोटींची ऑर्डर दिली.

ITC ने आपल्या विविध ब्रॅण्ड्स च्या सिगारेटचे भाव वाढवले.

RBI ने नियमांचा भंग केला म्हणून अलाहाबाद बँकेला Rs २ कोटी दंड केला.

IDBI बँकेच्या ‘टर्न अराउंड’ साठी LIC ने योजना सादर केली. यासाठी LIC ला IDBI फेडरलमधील आपला स्टेक १०% ने कमी करावा लागेल.

आंध्रच्या राज्य सरकारने २० सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेतली. या कंपन्यांनी सिमेंटच्या किमतीत Rs २० वाढ केली आहे.

गती या कंपनीचे प्रमोटर्स गतीमधील २४% स्टेक TVS लॉजिस्टीक्सला विकणार आहे.

MSTC (मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन) या नवरत्न कंपनीचा IPO येण्याची शक्यता आहे.

नॅशनल हौसिंग बँकेने हौसिंग फायनान्स कंपन्यांसाठी CAD ( कॅपिटल ADEQUACY) रेशिओ वाढवावा अशी सूचना केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४४२ NSE निर्देशांक निफ्टी १०९८७ बँक निफ्टी २७५५४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ मार्च  २०१९

आज क्रूड US $६६.५१प्रती बॅरल ते US $६६.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७६ ते US $१=Rs ७०.९७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२४ होता. आज मार्केटमधील मार्च सिरीजचा पहिला दिवस होता. मिडकॅपमध्ये तसेच सिमेंट,खते,मेडिया, IT या क्षेत्रात चांगले रोलओव्हर झाले. फेब्रुवारीचा रोलओव्हर ६१% झाला. मार्च सिरीजविषयी ट्रेडर्स आशादायी आहेत. या सिरीजमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशियो चांगला असेल.

काल सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयामुळे साखर, EV उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मायनिंग कंपन्या, इलेक्ट्रिक बॅटरी बनवणार्या कंपन्या तसेच अंतरिम लाभांश चांगला मिळेल म्हणून काही PSU कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.

ल्युपिनला त्यांची बोनमॅरोसाठी उपयोगात येणाऱ्या औषधाला USFDA ने परवानगी दिली. पण या औषधासाठीचे मार्केट खूप मोठे नाही US $ १० कोटी एवढेच आहे.

ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद युनिट IV च्या USFDA ने ३ डिसेंबर २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या काळात केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये २ त्रुटी दाखवल्या.

CA EMARLD ने SBI लाईफ इन्शुअरन्सचे ९ कोटी शेअर्स खरेदी केले.

कॅस्ट्रोल इंडियाने फोर्ड बरोबर ऑईल इंजिन पुरवण्याचा करार केला.

REC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने Rs ११ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट १२ मार्च २०१९ आहे.

अजंता फार्मा या कंपनीची शेअर BUY BACK २८ फेब्रुवारी २०१९ पासून १४ मार्च २०१९ पर्यंत ओपन राहील.

RITES या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ११ मार्च २०१९ रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे

भारती एअरटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी प्रती शेअर Rs २२० या भावाने राईट्स इशू आणणार आहे. आपल्याजवळ जर कंपनीचे ६७ शेअर्स असतील तर आपल्याला राईट्स इशूमध्ये १९ शेअर्स मिळू शकतील.

EPC इंडस्ट्रीजचे नाव बदलून महिंद्र EPC इंडस्ट्रीज असे ठेवले.

HDFC म्युच्युअल फंडाने सोनाटा सॉफ्टवेअरमध्ये २% स्टेक खरेदी केला.

SBI म्युच्युअल फंडाने टाटा मोटर्सचे ३८ लाख DVR शेअर्स खरेदी केले.

CEAT मध्ये आमंता होल्डिंगने स्टेक वाढवली.

मायनिंग पॉलिसी मध्ये मायनिंग उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिला. याचा फायदा हिंदुस्थान कॉपर, वेदांता, डेक्कन गोल्ड आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांना होईल.

वेदांताला २०१४ या वर्षी गोव्यामध्ये एक झिंकची खान मिळाली होती. ती आता ऑपरेशनला होत आहे.

साखर उत्पादक कंपन्यांना त्यांच्या जवळ जेवढा साखरेचा स्टॉक असेल त्याचे व्हॅल्युएशन करून तेवढे कर्ज या कंपन्यांना मिळेल.

अरुण ३ प्रोजेक्ट मध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. याचा फायदा SJVN ला होईल.

अरविंद लिमिटेडमधून अनूप इंजिनीअरिंग ही कंपनी डीमर्ज झाली. आज या कंपनीचे BSE आणि NSE या स्टॉक एक्स्चेंजवर झाले. लिस्टिंग Rs ४७०च्या जवळपास झाले.

जेट एअरवेजची एकूण १३ विमाने विमानांचे भाडे न दिल्यामुळे ग्राउंड झाली. या कंपनीचे प्रमोटर हे कंपनीची मालकी सोडायला आणि त्यांचा या पुढे व्यवस्थापनात कोणताही सहभाग असणार नाही या दोन अटींना कबुल झाले. आता एतिहाद ही कंपनी जेट एअरवेजमधील स्टेक वाढवेल. ATF या विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीमध्ये ८.२% वाढ झाल्यामुळे विमानकंपन्यांची कॉस्ट वाढेल. आता एतिहाद ला ओपन ऑफर आण्याची गरज राहणार नाही

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुतीची देशांतर्गत विक्री १.३६ लाख युनिट तर एकूण विक्री १.४८ लाख युनिट झाली.
अशोक लेलँड ची विक्री १८२४५ युनिट्स झाली. देशांतर्गत विक्री १७३५२ झाली. M &HC वाहनांची विक्री १३२९१ युनिट्स झाली.

एस्कॉर्टसची विक्री १२% ने वाढली तर एक्स्पोर्ट्स ९२.८% ने वाढले. बजाज ऑटोची विक्री १०% आणि निर्यात १९% ने वाढली. महिंद्रा आणि महिंद्रा ची विक्री १०% ने वाढली. आयचर मोटर्सची विक्री ६.७%ने कमी झाली. SML ISUZU ची विक्री ३२.८% ने वाढून १२८१ युनिट एवढी झाली. अतुल ऑटो या कंपनीची विक्री १३.४% ने वाढून ११०६ युनिट झाली. यांच्या परिणामस्वरूप मारुती आणि अशोक लेलँड आणि आयचर मोटर्सचे शेअर्स पडले. याउलट एस्कॉर्टस, बजाज ऑटो, SML इसुझू, महिंद्रा आणि महिंन्द्रा, आणि अतुल ऑटो या कंपन्यांचे शेअर्स वधारले.

रामको सिमेंट या कंपनीच्या प्रमोटर्सनी २१ लाख शेअर्स गहाण ठेवले.

आज सेबीच्या बैठकीत म्युच्युअल फंडांना कमोडिटी वायडामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी परवानगी दिली गेली.

REITS InvITS मध्ये कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ७०% पर्यंत गुंतवणूक करू शकते.

IBC मध्ये गेलेल्या कंपन्या विकत घेण्याच्या वेळी ओपन ऑफर आणण्याचे नियम बदलले. आता खरेदी करणाऱयांना ओपन ऑफर आणण्याची गरज नाही.

१ कोटीच्या व्यवहारावर Rs १० ब्रोकर फी मध्ये सूट मिळेल. आणि स्टॉक एक्स्चेंजच्या रेग्युलेटरी फी मध्ये ८०% ची सूट मिळेल.

BEL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने ९ मार्च रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

ABB या कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. कंपनीने Rs ४.८० प्रती शेअर लाभांश दिला.

JBM ऑटो ही कंपनी इलेक्ट्रिक बस बनवते सरकार कडून या कंपनीला सबसिडी मिळेल.

ADVANCE (अग्रीम) आयकर भरण्यासाठी शेअर मार्केटमध्ये ११ ते १२ मार्च पर्यंत विक्री करतात. त्यामुळे मार्केट पडण्याची शक्यता असते.

MRSS या मदर्सन सुमीच्या फुल्ली ओन्ड सबसिडीअरीने BOMBARDIER ट्रान्सपोर्टेशन ही मोबाईल सोल्युशन पुरवणारी कंपनी खरेदी केली

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०६३ NSE निर्देशांक निफ्टी १०८६३, बँक निफ्टी २७०४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २८ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६६.१३ प्रती बॅरल ते US$६६.२० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१० ते US $१=Rs ७१.२६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६ तर VIX १८.१८ होते.

USA आणि चीन यांच्या टॅरिफ वॉरमध्ये अजून काही समस्या आहेत. त्या मिटल्याशिवाय USA माघार घेईल असे वाटत नाही US $३०००० बिलियन एवढा ऍग्री इम्पोर्ट आम्ही करू असे चीनने सांगितले. पण USA चा प्रश्न तंत्रज्ञानाच्या बाबतीत आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि पेटंट, चलनाच्या किमतीमध्ये वारंवार केले जाणारे बदल हे मुख्य विषय आहेत. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जॉन्ग यांच्यातील बैठक अनिर्णीतावस्थेत संपली.

USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढत असल्यामुळे क्रूडची किंमत स्थिरावली आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेविषयीचा डाटा खराब आल्यामुळे मेटल्ससंबंधीत शेअर्स पडले.

बँक ऑफ जपान आणि RBI यांनी करन्सी स्वॅपसाठी करार केला आहे. यामुळे भारतीय मार्केट्समध्ये US $ची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबाव कमी होईल.

PEACE डेच्या निमित्ताने तैवानची मार्केट्स बंद होती.

भारताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन USA, फ़्रान्स, आणि UK या राष्ट्रांनी मसूद अझहर याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा प्रस्ताव दिला. जवळजवळ बर्याच राष्ट्रांनी पाकिस्तानवर दबाव वाढवला जिनेवा कराराचे पालन करण्यास सांगितले. त्यामुळे पाकिस्तान पकडलेल्या भारतीय वैमानिकाला बिनशर्त भारताकडे सुपूर्द करण्यास तयार झाले.

आज GDP चे आकडे आले. तिसऱ्या तिमाहीत GDP ग्रोथरेट ६.६% राहिला.पहिल्या तिमाहीचा सुधारित GDP ग्रोथरेट ८% तर दुसऱ्या तिमाहीचा सुधारित GDP ग्रोथरेट ७% राहिला. वित्तीय वर्ष २०१९ साठी GDP ग्रोथरेट ७% ची लक्ष्य निश्चित केले आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील योजना/ धोरण मंजूर होण्याची शक्यता आहे

(१) नॅशनल मिनरल पॉलिसी
(२) FAME २ कार्यक्रमाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकल साठी सबसिडी दिलि जाईल. ६०,००० EV वर Rs २,५०,००० प्रती EV कार, आणि हायब्रीड कार साठी Rs २०,००० सबसिडी दिली जाईल. सरकार या सबसिडीसाठी Rs १०,००० कोटींची तरतूद करणार आहे.
(3) सॉफ्टवेअर प्रॉडक्टसाठी नॅशनल पॉलिसी मंजूर केली जाईल.
(4) वोडाफोन आयडियामध्ये FDI (US $ ४८९०) ला मंजुरी मिळेल.

थंडी कमी होऊन उन्हाळा सुरु झाला आहे याची नोंद मार्केटने घेतली. हॅवेल्स,ब्लु स्टार, सिम्फनी आणि वोल्टास या कंपन्या आज तेजीत होत्या.

SREI इन्फ्रा आणि R COM हे वायदा मार्केटमधून बाहेर पडतील.

उद्यापासून रावनीत गिल येस बँकेत रिझ्युम होतील आणि कारभाराची सूत्रे सांभाळतीत.

फ्युचर रिटेल आणि ‘7ELEVEN’ मध्ये फ्रॅंचाइज स्टोर्स उघडण्यासाठी करार झाला.

१ मार्च २०१९ रोजी होणाऱ्या सेबी च्या बैठकीत रेटिंग एजन्सीजच्या कामात पारदर्शकता यावी म्हणून काही नियम बदलले जातील तर काही नवीन नियम केले जातील. एका कंपनीचे रेटिंग आळीपाळीने वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीजना द्यावे. IPO जर Rs १०० कोटींचा असेल तर २ आणि ५०० कोटी किंवा जास्त रकमेचा असेल तर ३ रेटिंग एजन्सीजचे रेटिंग लागेल. रेटिंग एजन्सीजनी योग्य वेळेला धोक्याचा इशारा न दिल्यामुळे त्यांची उपयोगिताच संपुष्टात येती.आणि ज्या हेतूने रेटिंग केलेले असते तो हेतू साध्य न झाल्यामूळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते.

एस्सार स्टील या कंपनीच्या रेझोल्यूशन बद्दल ३ मार्चपर्यंत निर्णय घ्या असे NCLAT ने NCLT ला सांगितले. NCLAT मध्ये या केसची सुनावणी १४ मार्चला होईल.

इराण भारताकडून रॉ शुगर खरेदी करणार आहे.

क्विक हील या कंपनीची ५ मार्च २०१९ रोजी शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

PANACEA बायोटेक ही कंपनी आपला रिअल इस्टेट व्यवसाय वेगळा करणार आहे. कंपनीची व्हॅल्यू Rs १२०० कोटी आहे पण त्यापैकी रिअल इस्टेटीचे व्हॅल्यूएशन Rs ७००कोटींचे आहे. ही कंपनी ‘ NO DEBT’ कंपनी होईल.

मार्च महिन्यातील महत्वाच्या घटना

(१) १ मार्च रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.
(२) १२ मार्चला IIP आणि CPI चे आकडे येतील.
(३) फेडची FOMC ची मीटिंग १९ आणि २० मार्चला होईल.
(४) २९ मार्च २०१९ या दिवशी ब्रेक्झिट होईल. म्हणजे UK युरोपियन युनियन मधून बाहेर पडेल.
(५) ५ मार्च रोजी राममंदिरासंबंधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८६७ NSE निर्देशांक निफ्टी १०७९२ वर बँक निफ्टी २६७८९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६५.२१ प्रती बॅरल ते US$ ६५.६५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९४ ते US $१=Rs ७१.३२ होता. US $ निर्देशांक ९६.३४ होता. VIX १५.८१वरून १९.४५ होते.

आज मार्केटने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढेल ही भीती मागे टाकली.मात्र जेव्हा जेव्हा या संबंधातील माहिती आली तेव्हा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. आज VIX वोलॅटिलिटी निर्देशांक १५.८१ वरून १९.४५ झाला. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मोठे स्वरूप धारण करणार नाही असे तज्ञानी सांगितल्यावर मार्केट पुन्हा सावरत होते. ज्यांना एंट्री आणि एक्झिट पटापट करता येत असेल त्यांनी अशा मार्केटमध्ये ट्रेडिंग करावे.नाहीतर साईडलाईनला राहून फक्त अनुभव घ्यावा.

USA आता क्रूड निर्यात करत असल्याने क्रूडची किंमत कमी होण्यात त्यांना स्वारस्य नाही. ट्रम्प यांनी असे सांगितले चीनवरील निर्बंध लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जॉन्ग यांची बैठक आहे.

अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, धनलक्षमी बँक या तीन बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) मधून बाहेर आल्या. आता या बँका त्यांच्या विस्तार योजना अमलात आणू शकतील, तसेच PCA खालील इतर निर्बंधही त्यांना लागू होणार नाहीत. त्यामुळे या बँकांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

मॅक्स (इंडिया) ही कंपनी मॅक्स बुपा मधील ५१% स्टेक विकणार आहे. याचा फायदा मॅक्स इंडिया आणि मॅक्स फायनान्सियल यांना होईल. या कंपनीचे Rs १००० कोटी व्हॅल्युएशन झाले त्यामुळे मॅक्स इंडियाला Rs ५०० कोटी मिळतील.

सरकार ४००० नवीन बसेसची ऑर्डर टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांना देणार आहे.

केंद्र सरकारने सोलर पॅनलच्या ग्लासवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी US $११४.५८ प्रती टन लावली. याचा फायदा टेक्श्चरड आणि टेम्पर्ड ग्लास बनवणाऱ्या गुजरात बोरोसिल आणि ला ओपाला, बोरोसिल ग्लास यांना होईल.

P S .रेड्डी यांची MCX चे CEO म्हणून नेमणूक झाली आहे. P S रेड्डी यांना CDSL चा अनुभव आहे.

कॉन्फिडन्स पेट्रो आणि टाइम टेकनो यांनी LPG सिलेंडर संबंधात सरकारबरोबर करार केला.

ONGC ने CNG साठी जपान बरोबर करार केला. जपानमध्ये CNG चा खप खूप आहे.

HDFC AMC (Rs १२ प्रती शेअर लाभांश) आणि सनोफी (Rs ६६ प्रती शेअर लाभांश), मर्क ( Rs ४४० प्रती शेअर लाभांश ) यांचे निकाल चांगले आले.

रेन इंडस्ट्रीज चा निकाल असमाधानकारक होता. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

BEML या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मेट्रो ट्रेन साठी Rs ४०० कोटींची ऑर्डर मिळाली.

आंध्र प्रदेशातील भोगापूरम ग्रीनफिल्ड एअरपोर्ट पप्रोजेक्टसाठी GMR इंफ्रानी सर्वात जास्त बोली लावली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९०५ NSE निर्देशांक निफ्टी १०८०६ बँक निफ्टी २६७९९ वर बंद झाले

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २६ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६४.६२ प्रती बॅरल ते US $६४.८३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०२ ते US $१=Rs ७१.११ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३४ होता.

आज भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करून आपल्या हुतात्मा झालेल्या ४० मिलिटरीच्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. जेव्हा ही बातमी आली तेव्हा मार्केटमध्ये घबराट पसरली आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते की काय? ताणतणाव वाढतो की काय? अशी भीती वाटू लागली आणि मार्केट पडू लागले.जवळजवळ ४५० पाईंट सेन्सेक्स पडले परंतु जेव्हा संरक्षण तज्ञानी सांगितले की हा हल्ला ‘हल्ला’ नव्हता पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा उद्देशही नव्हता. आम्हाला पाकिस्तानी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नव्हता. पण त्याच बरोबर आम्ही भ्याड नाही, काहीही गैर सहन करणार नाही, तोडीस तोड उत्तर देऊ आणि अतिरेकी कारवाया करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवू हे पटवून द्यायचे होते आणि ग्वाही दिली की भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष वाढणार नाही. तेव्हा मार्केट हळू हळू सावरले आणि पूर्वस्थितीवर आले.

सध्या मार्केटचे फिबोनासी रिट्रेसमेंट लेव्हल १०९१५ (निफ्टी) आहे.काल मार्केटने ५०, १००, २०० DMA चा स्तर आरामात पार केला. १०९१५ च्यावर जेव्हा मार्केट(निफ्टी) आरामात ट्रेड करू लागेल तेव्हाच ते टिकाऊ होईल आणि निफ्टी ११००० ला पोहोचेल. नाहि तर पुन्हा एकदा बेअर्सना संधी मिळेल.

स्कायमेट या संस्थेने यावर्षी सामान्य पाऊस पडेल असे सांगितले. अलनिनो चा प्रभाव फारसा पडणार नाही. त्यामुळे दुष्काळाचा धोका कमी होईल.

सेबीने आनंद राठी आणि जिओजित सिक्युरिटीज यांच्यावरही ‘फिट एन्ड प्रॉपर’ नसल्याबद्दल कारवाई केली.

ब्लिस जी व्ही एस फार्मा या कंपनीने FPI आणि FII याची लिमिट ७५% पर्यंत वाढवली.

कोटक महिंद्रा बँकेने आपली FPI ची मर्यादा ४३% वरून ४५% केली.

फ्युचर रिटेल ही कंपनी ‘7 ELEVEN’ बरोबर टाय अप करण्याचा विचार करत आहे. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या फ्युचर रिटेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत यावर विचार होईल.

ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा निफ्टी ५० मध्ये समावेश होईल आणि HPCL ला वगळले जाईल.

शेवटी मात्र ओव्हरनाईट पोझीशन ठेवायला ट्रेडर्स धजावले नाहीत. त्यामुळे सावरलेले मार्केट पुन्हा पडू लागले. अशा मार्केटमध्ये चांगले शेअर्स स्वस्तात खरेदी करावेत आणि थोडे धैर्य धरावे चांगले उत्पन्न मिळेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९७३ NSE निर्देशांक निफ्टी १०८३५ बँक निफ्टी २६९५२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २५ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २५ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६६.९१ प्रती बॅरल ते US $६७.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US$१=Rs ७०.९७ ते US $१=Rs ७१.१४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.४८ होता.

आज चीनमधील मार्केट्स तेजीत होते. त्यामुळे आपल्या मार्केटमधील मेटल क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. एकूणच रिअल्टी, रिअल्टीची संबंधित कंपन्या, NBFC आणि होम फायनान्स कंपन्या, धातुक्षेत्राशी संबंधित आणि IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

सध्या मार्केटमध्ये तेजी किंवा मंदीचा क्लिअर ट्रेंड दिसत नाही. श्रावणात पडणाऱ्या पावसासारखे त्यांचे उनपावसाच्या खेळासारखे दर्शन होते. पण हे मार्केट एका विशिष्ट रेंजमध्ये चढउतार दाखवत आहे. आपणही हा मार्केटचा ट्रेंड योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी पकडला तर आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो. या रेंजच्या लोअर लिमिटला खरेदी करायची आणि अपर रेंजला विक्री करायची असे करून प्रॉफिट मिळवावे लागेल.

NSEL खटल्यात मोतीलाल ओसवाल आणि IIFL या दोन मोठ्या ब्रोकिंग कंपन्यांचा व्यवहार ‘फिट आणि प्रॉपर’ असा नव्हता असे सांगून सेबीने या कंपन्यांच्या कमोडिटी आर्मला कमोडिटीज आणि कमोडिटी डेरिव्हेटीव्ह मध्ये ट्रेडिंग करण्यावर बंदी घातली. या कंपन्यांनी असे सांगितले की आम्ही सेबीच्या या ऑर्डरचा अभ्यास करून त्याविरुद्ध कोर्टात अपील करू. तसेच इक्विटी आणि कमोडिटीचे एकत्र ट्रेडिंग दुसऱ्या आर्म तर्फे चालू असल्यामुळे ग्राहकांना तोशीश पडणार नाही.

रविवारच्या GST कौन्सिलच्या बैठकीत GST कौन्सिलने अंडरकन्सट्रक्शन फ्लॅटवरील GST १२% वरून ५% केला ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) शिवाय. अफोर्डेबल होम्ससाठी GST ८%वरून १% केला. अफोर्डेबल होम्सची व्याख्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये ६० SQUARE मीटरपर्यंत क्षेत्रफळ आणि किंमत Rs ४५ लाखपर्यंत आणि नॉनमेट्रो मध्ये ९० SQUARE मीटरपर्यंत क्षेत्रफळ आणि किंमत Rs ४५ लाखपर्यंत असेल. सरकारच्या या घोषणेमुळे घर खरेदी करणार्याचा उत्साह वाढेल आणि त्यामुळे घरांची विक्री वाढेल.या घरांसाठी बिल्डिंग मटेरियल पुरवणाऱ्या कंपन्यांचा आणि या घरांसाठी गृह कर्ज देणार्या बँका आणि NBFC यांचाही बिझिनेस वाढेल या हिशेबाने आज रिअल्टी, रिअल्टीशी संबंधित, आणि गृह कर्ज देणार्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. उदा :- मंगलम टिम्बर, कजारिया सिरॅमिक्स, निटको टाईल्स, मुरुडेश्वर, ओरिएंट बेल, अरो ग्रॅनाईट, हैदराबाद इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, शंकरा बिल्डिंग, फिनोलेक्स,
पूर्वानकारा बिल्डर्स, शोभा, अजमेरा, ओबेराय, कोलते पाटील, DB रिअल्टी, HDIL, प्रेस्टीज इस्टेट, अन्सल प्रॉपर्टिज, DLF, गोदरेज इत्यादी

BEL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला इझरेल मधील कंपनीकडून US $३.३ कोटींची एक्स्पोर्ट ऑर्डर मिळाली.
अडानी एंटरप्रायझेस या अडाणी ग्रुपच्या कंपनीने अहमदाबाद, जयपूर, लखनौ, मंगलोर, आणि तिरुवअनंतपूरम या ५ विमानतळांसाठी बोली जिंकली. उद्या गुवाहाटी विमानतळासाठी बोली लागेल.

अडानी लॉजिस्टिक्स(अडानी पोर्टची सबसिडीअरी) या कंपनीने अडाणी ऍग्री लॉजिस्टिक्स हि कंपनी अक्वायर केली हे डील Rs १६६२ कोटींमध्ये झाले. हे डील मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. हे डील पूर्णतः कॅश मध्ये होईल. मार्केटच्या मते हे डील महागात पडले म्हणून अडाणी पोर्टचा शेअर पडला.

टाटा एलेक्सी या कंपनीने NOS बरोबर ऑटोमेशन सर्व्हिसेससाठी करार केला.

BDC डिजिफोटो या कंपनीत थॉमस कूक ५१% स्टेक खरेदी करेल.

सरकार इलेक्ट्रिक व्हेइकल साठी सबसिडी देते. या सब्सिडीसाठी सरकारने Rs १०,००० कोटींची तरतूद केली. सरकारचा भर मुख्यत्वे TWO व्हीलर, ३ व्हिलर्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस यावर असेल. EV साठी सरकार रजिस्ट्रेशन फी आणि करात सूट देण्याचा विचार करत आहे.

मॅकलॉइड रसेल ही कंपनी त्यांच्या रवांडा सबसिडीअरीमधील स्टेक विकणार आहे.

उद्या ऊर्जा मंत्रालयाची बैठक आहे. त्यात ऊर्जा क्षेत्राशी संबंधित महत्वाचे निर्णय घेतले जातील.

वेध उद्याचा

या गुरुवारी निफ्टी आणि बँक निफ्टीची मासिक आणि साप्ताहिक एक्स्पायरी आहे. निर्देशांक व्यवस्थापनात तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची किंमत वाढू शकते किंवा काही शेअर्स तुम्हाला खूपच स्वस्तात मिळू शकतात त्याकडे लक्ष ठेवावे. सध्या मिडकॅप शेअर्समध्ये तेजी आहे. तुमच्याकडे असलेल्या मिडकॅप शेअर्समध्ये तुम्हाला अपेक्षित प्रॉफिट मिळत असेल तर प्रॉफीटबुकिंग करायला हरकत नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२१३ NSE निर्देशांक निफ्टी १०८८० बँक निफ्टी २७१५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २२ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २२ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६७.०१ प्रती बॅरल ते US $ ६७.२७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१० ते US $१=Rs ७१.२० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६४ होता.

USA मध्ये क्रूडचे रेकॉर्ड स्तरावर म्हणजे १२० लाख बॅरल प्रती दिवस उत्पादन होत आहे. उद्या चीनच्या शिष्टमंडळाबरोबर USA च्या प्रतिनिधींच्या ट्रेड वॉर संबंधात वाटाघाटी होणार आहेत. या वाटाघाटीतुन चांगले निर्णय अपेक्षित आहेत.

२४ फेब्रुवारी २०१९ पासून पंतप्रधानांच्या हस्ते गोरखपूर येथून १ कोटी २० लाख शेतकऱयांच्या खात्यात किसान सम्मान निधीचा Rs २००० चा पहिला हप्ता जमा केला जाईल.

ल्युपिनच्या मधुमेहावरील औषधावर असलेली बंदी हायकोर्टाने उठवली.

रिलायन्स कॅपिटल या ADAG ग्रुपच्या कंपनीने कर्जावरचे व्याज पूर्णतः भरले.

DR रेड्डीजच्या SOUISIANA प्लँटचे ऑडिट पूर्ण झाले आणि USFDA ने क्लीन चिट दिली.

JSW स्टील या कंपनीने प्रमोटर्सचे ५८ लाख शेअर्स गहाण ठेवले.

अडाणी ग्रुपला सरंक्षण खात्याकडून US $ २ बिलियन रकमेची UVA (UNMANNED AIR VECHICLE) साठी ऑर्डर मिळाली.त्यामुळे अडाणी एंटरप्रायझेस चा शेअर वाढला.

BEML या कंपनीने लॉकहीड मार्टिन एरोनॉटिक्स या USA मधील कंपनीबरोबर एरो इंडिया २०१९ या समारंभात करार केला. एरोस्पेस क्षेत्रात जी साधन सामुग्री लागते ती बनवण्यासाठी करार केला.

ING ग्रुपने कोटक महिंद्रा बँकेमधील ३% स्टेक म्हणजे ५.८७ कोटी शेअर्स सरासरी Rs १२३२ प्रती शेअर्स या भावाने विकले. या विक्रीमुळे कोटक महिंद्रा बँकेचा शेअर Rs ५० ने पडला

अडानी मुंबई एअरपोर्टमधील दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांकडे असलेला स्टेक खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे अडानी ग्रुपचे शेअर्स तेजीत होते.

जेट एअरवेज इमर्जन्सी फंडिंगसाठी Rs ५५० कोटी देण्यास स्टेट बँक ऑफ इंडिया आणि PNB ने तयारी दाखवली. म्हणून जेट एअरवेजचा शेअर वाढला.

वेध उद्याचा

  • या आठ्वड्यात USA आणि चीनमध्ये चालू असलेल्या ट्रेड वॉर संबंधित वाटाघाटींमध्ये सकारात्मक निर्णय येणे अपेक्षित आहे.
  • २४ फेब्रुवारी २०१९ रोजी GST कौन्सिलची मीटिंग होणार आहे.
  • २८ फेब्रुवारी २०१९ रोजी निफ्टी आणि बँक निफ्टी यांची मासिक आणि साप्ताहिक एक्स्पायरी आहे
  • १ मार्च २०१९ रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८७१ NSE निर्देशांक निफ्टी १०७९१ बँक निफ्टी २६८६७ वर बंद झाले. www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – २१ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २१ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६७.०८ प्रती बॅरल ते US $६७.२१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९९ ते US $१=Rs ७१.२४ होते. US $ निर्देशांक ९६.५२ होता.

बँकांना भांडवल पुरवण्याचा निर्णय मार्केट बंद झाल्यानंतर घेतला गेला त्यामुळे त्याचा परिणाम आजच्या मार्केटवर दिसून आला. बँका आणि NBFC चे शेअर्स तेजीत होते. ट्रेंड वॉरची तीव्रता कमी झाल्यामुळे धातूसंबंधीत शेअर्स तेजीत होते. आणि सरकार अनेक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लोकांच्या हातात पैसा उपलब्ध करीत आहे त्यामुळे FMCG क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

USA कडून लावलेल्या निर्बंधांमुळे किंवा फ्री ट्रेड करारामुळे काही उत्पादनांची निर्यात फायदेशीर होत नाही या ऐवजी ज्या उत्पादनांची निर्यात फायदेशीर होईल अशा उत्पादनांचा या लिस्टमध्ये समावेश करून उत्पादनांची संख्या वाढवली जाईल आणि त्यातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

टाटा मोटर्स बंगाल मध्ये ८० इलेक्ट्रिक बसेस पुरवणार आहे.

दार्जिलिंग चहाच्या किमती आज ४३% ने वाढल्या त्यामुळे चहा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये तेजी आली.
कंपनीचे प्रमोटर्स जेव्हा मार्केटमधून आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात तेव्हा त्यांचा आपल्या कंपनीत असलेला विश्वास दिसून येतो. खालीलप्रमाणे काही कंपन्यांचे प्रमोटर्स पडत्या मार्केटमध्ये आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत.

(१) टाटा मोटर्स च्या प्रमोटर्सनी १कोटी १८लाख शेअर्स खरेदी केले तर श्री कलाहस्ती पाईप्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी १५ लाख शेअर्स खरेदी केले.
(२) बजाज होल्डिंग, बजाज ऑटो, बजाज फायनान्स
(३) रेमण्ड (४) थायरो केअर (५) व्होल्टेम्प ट्रान्सफॉर्मर्स

ही फक्त काही ठळक उदाहरणे आहेत.

टेक महिंद्रा ही IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेंडर ऑफर पद्धतीने Rs ९५० प्रती शेअर (CMP वर १७% प्रीमियम) या भावाने २.०५ कोटी शेअर्स BUY BACK करेल. कंपनी या BUY BACK वर Rs १९५६ कोटी खर्च करेल. या बाय बॅक साठी रेकॉर्ड डेट ६ मार्च २०१९ आहे.

१४, १८, २२, कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करणार. ही तरतूद एप्रिल २०१९ पासून अमलात येण्याची शक्यता आहे. ज्युवेलरी उद्योगाबरोबर २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संबंधित मंत्र्यांची बैठक आहे.

रिलायन्स कॅपिटलचा ऍसेट मॅनेजमेंट JV मध्ये ४२.८८ % स्टेक आहे. हा स्टेक रिलायन्स  निपॉन लाईफ ऍसेट मॅनेजमेंटनी घ्यावा असे सांगितले.

MTNL च्या रिव्हायव्हल प्लॅनबाबत DCC ( डिजिटल कम्युनिकेशन कमिशन) चर्चा करणार आहे. MTNL आणि BSNL च्या कर्मचाऱयांसाठी VRS आणण्याचा विचार करत आहे.

२१ ते २५ फेब्रुवारी २०१९ या काळामध्ये बुकिंग केलेल्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक उड्डाणांच्या बुकिंगवर जेट एअरवेज ५०% सूट देणार आहे.

रविवार २४ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या GST च्या बैठकीत मेट्रोसिटीमध्ये Rs ४५ लाख किमतीचे तर नॉनमेट्रो एरियात Rs ३० लाख किमतीच्या घरांचा अफोर्डेबल हौसिंग मध्ये समावेश केला जाईल अशी शक्यता आहे. यामुळे हौसिंग आणि हौसिंग फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. उदा. LIC हौसिंग फायनान्स, कॅनफिना होम्स, कोलते पाटील, अशोक बिल्डकॉन

EPFO ने २०१८ ते २०१९ या वर्षांसाठी PF वरील व्याजाचा दर ८.५५% वरुं ८.६५ % वाढवला. किमान निवृत्ती वेतन वाढवण्यावर चर्चा झाली पण निर्णय होऊ शकला नाही.

उद्यापासून शेतकऱयांच्या खात्यात Rs २००० जमा व्हायला सुरुवात होईल.

DHFL मधील प्रमोटर्स आपला कंट्रोलींग स्टिक विकणाऱ्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८९८ NSE निर्देशांक निफ्टी १०७८९ बँक निफ्टी २७०५२ वर बंद झाले. भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!