आज क्रूड US $ ११३.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.१५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.९० VIX २०.८५ होते.
सौदी आरामकोने क्रूडच्या किंमती वाढवल्या.
JLR ची UK मधील विक्री ५३०५ एवढी झाली. म्हणजेच ४७३७ वरून १२% वाढली.
आज FII ने Rs २१५० कोटींची विक्री तर DII ने Rs १६८८ कोटींची विक्री केली.
भारताची ट्रेड डेफिसिट रेकॉर्ड कमाल स्तरावर पोहोचली.
भारतात ऍग्री कमोडिटीजच्या किमती कमी झाल्या. गेल्या १ महिन्यात क्रूड २.४$ कॉपर १९% आयर्न ओअर २२% सिल्वर ९% कोळसा ४.५% गहू २२% पाम ऑइल ३२.५% सनफ्लॉवर ऑइल १९% आणि साखरेची किंमत ७% ने कमी झाल्या. या अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान असलेल्या कमोडिटीजच्या किमती कमी झाल्यामुळे FMGC,मेटल्स ऑटो सेक्टरमधील उत्पादन खर्चात काहीशी बचत झाली. त्यामुळे या क्षेत्रात आणि सामान्यतः मार्केटचा मूड बदलला.
इंडोनेशिया एक्स्पोर्ट कोटा वाढवणार आहे. त्यांनी ड्युटी US $ ५७५ /टन वरून US $ ४८८ /टन पर्यंत कमी केली. मलेशियासुद्धा निर्यात वाढवणार आहे त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती घसरत आहेत.
मॅरिकोने ‘APEAS नॅचरल्स’ मधील ४.१४ % स्टेक खरेदी केला.
टाटा मोटर्सने सांगितले की २०२३ पर्यंत १ लाख EV कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.५ वर्षात ५ पट उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कॉटन इम्पोर्ट ड्युटीमध्ये मिळणारी सवलत ऑक्टोबर २०२२ पर्यंत वाढवली. यामुळे ट्रायडंट, लक्स, रेमंड यांना फायदा होईल.
पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट महाराष्ट्र सरकार कमी करणार आहे.
केन्नामेटल इंडिया मशिनरी टूल्स बनवते.
सिप्लाच्या इंदोर प्लांटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत २ त्रुटी दाखवल्या.
वा टेक ला रिलायन्स कडून Rs ४११ कोटींची ऑर्डर मिळाली.
मार्कसन्स फार्मा त्यांच्या ८ जुलै २०२२ च्या बैठकीत शेअर्स बायबॅकवर विचार करेल. त्यामुळे आज हा शेअर तेजीत होता
येस बँकेच्या डिपॉझिट्समध्ये १८.३% ची वाढ झाली.
१८ जुलै ते १२ ऑगस्ट २०२२ या दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे त्यात बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बदल करून सरकारला त्यांचा राष्ट्रीयीकृत बँकांमधील संपूर्ण स्टेक विकण्यासाठी परवानगी देणारी अमेंडमेंट पास होण्याची शक्यता आहे.
जून महिन्यासाठी सर्व्हिस PMI ५९.२ आला.
TCS आणि एपिक सिस्टिम्स यांच्या दरम्यान केस चालू होती त्यात USA कोर्टाने TCS ला US $ २८० कोटी इतके पिक्यूनरी नुकसानभरपाई द्यावयास सांगितली होती. त्याची रक्कम आता कोर्टाने US $ १४० कोटी एवढी कमी केली.
MMTC ची नीलांचल इस्पातमधील डायव्हेस्टमेन्टची प्रक्रिया पूर्ण झाली.
सर्व्हिस चार्जेस हॉटेल्स किंवा रेस्टारंट्स आता बिलामध्ये लावू शकणार नाहीत. याचा परिणाम सफायर, BARBEQ नेशन, देवयानी इंटरनॅशनल ज्युबिलण्ट फूड्स, रेस्टारंट ब्रॅण्ड्स आणि इतर हॉटेलच्या शेअर्सवर होईल.
टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्टसने नीलांचल इस्पातमधील ९३.५% स्टेक घेतला.
स्टील स्ट्रीप व्हील्स ही कंपनी एका शेअर्सचे ५ शेअर्स मध्ये विभाजन करणार आहे.
RBI आणि स्टॉक एक्सचेंजीसनी HDFC आणि HDFC बँकेच्या मर्जरला मंजुरी दिली.
उज्जीवन स्माल फायनान्स बँकेन सांगितले की त्यांनी त्यांच्या बुडीत खात्याचे प्रमाण ६% पेक्षा कमी केले. ऍडव्हान्सेस ची वाढ ३८% झाली.
मेटल्स च्या किमती कमी झाल्या त्याचा फायदा हॅवेल्स आणि पॉली कॅब यांना होईल.
सरकार एथनोल १२% ते १५% ब्लेंडेड पेट्रोलवर एकसाईझ ड्युटी मध्ये सवलत दिली जाईल.
आज बरेच दिवसाबनंतर मार्केटने ( निफ्टीने ) १६००० चा टप्पा गाठला होता. पण तेथून मार्केट पडू लागले. सगळी तेजी नाहीशी होऊन पुन्हा १५८०० निफ्टी पाहण्याची वेळ आली. आज बँका FMCG आणि मेटल्स क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. आज रुपयाने US $१=Rs ७९.३१ चा किमान स्तर गाठला
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३१३४ NSE निर्देशांक निफ्टी १५८१० बँक निफ्टी ३३७८८ वर बंद झाले.
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!