आज क्रूड US $ ८३.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= R८२.४०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.७९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९४ आणि VIX १२.९७ होते.
USA ची मार्केट्स मंदीत होती. आज दक्षिण कोरियाची मार्केट्स बंद असतील.
आज चीनचे फेब्रुवारी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५२.६ नॉन मॅन्युफॅक्चरिंग PMI ५६.३ आणि कॉम्पोझिट PMI ५६.४ होते.
FII नी Rs ४५५९.२१ कोटींची विक्री तर DII नी Rs ४६०९.८७ कोटींची खरेदी केली.
दिल्लीमध्ये ATF च्या किमती ४.५% ने कमी झाल्या. Rs १.१२ लाख प्रती लिटर वरून १.०७ लाख प्रती लिटर झाल्या.
पेट्रोलियम आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG कमर्शियल सिलेंडरच्या किमती १९.८% ने वाढवून Rs २११९.०० ( १७६९) आणि हाऊसहोल्ड १४.२ KG सिलेंडर्सची किंमत Rs ११०३ झाली ( ४.७% ने किंमत वाढली.)
MOIL ने आपल्या काही उत्पादनाच्या किमतीत ८% ची वाढ केली.
पॉवर ग्रीड इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टिमसाठी यशस्वी बीडर ठरली हे प्रोजेक्ट BOOT ( बिल्ड, OWN, ऑपरेट ट्रान्स्फर ) तत्वावर आहे
झायड्स लाईफ च्या रक्तामध्ये क्लॉट संबंधित ‘APIXAVAN’ टॅब्लेट्स ला USFDA ने मंजुरी दिली. या टॅब्लेट्स साठी USA मध्ये US $ १८८७६ मिलियनचे मार्केट आहे.
त्याचप्रमाणे या कंपनीच्या ‘OLMESARTAN MEDOXOMIL’आणि HYDROCHLORO THIAZIDE’ या टॅब्लेट्सलाही USFDA ची मंजुरी मिळाली. हे औषध हाय BP वर असून याचे उत्पादन अहमदाबाद मध्ये होईल. US $ ४१.७ मिलियनचे मार्केट आहे.
अलेम्बिक फार्माच्या ‘DOCETAXEL’ इंजेक्शनला USFDA कडून मंजुरी मिळाली.
टाटा पॉवरच्या सब्सिडीअरीने Rs १०० दर्शनी किमतीचे २० कोटी कॉन्व्हर्टिबल प्रेफ शेअर्स ग्रीन फॉरेस्ट न्यू एनर्जी बिडकोला अलॉट केले.
‘VI’ ने ४००० Rs १० लाख दर्शनी किमतीचे OCD ( ऑप्शनली कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) अमेरिकन टेलिकॉम इन्फ्रा ला अलॉट केले.
BEL TR मोड्यूल रडार LRU आणि मायक्रोमोड्यूल्स चे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी ‘THALES रिलायन्स डिफेन्स सिस्टीम ‘ बरोबर करार केला.
संवर्धना मदर्सनने ‘DAIMLER इंडिया कमर्शियल व्हेईकल’ च्या ऍसेट्स खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण केला.
‘SEAMEC’ ने HAL बरोबर चार्टर पार्टी करार केला.’SEAMEC PALADIN’ ला ONGC च्या सामुद्रिक ऍक्टिव्हिटीसाठी US $ ३५००० प्रती दिवस या दराने ५ वर्षांसाठी हायर केले. या कॉन्ट्रॅक्टची एकूण व्हॅल्यू US $ ६४ मिलियन आहे.
अडानी एंटरप्रायझेसची मुंद्रा अल्युमिनियम ही KUTRUMAALI बॉक्साइट ब्लॉक साठी प्रीफर्ड बीडर ठरली. ओडिशा राज्य सरकारने कंपनीला LOI इशू केले आहे.
सॉफ्ट बँक ग्रुपने १ मार्च रोजी Rs ६०० कोटींचा त्यांचा ‘DELHIVERY’ मधील स्टेक ३% ते ५% डिस्काऊंटवर विकला .
NCLAT नी कोरबा वेस्ट पॉवर कर्ज निराकरणाचा अडाणी पॉवर चा प्रस्ताव मंजूर केला. HDFC आणि HDFC बँक यांच्या मर्जरच्या संबंधात NCLT ने निर्णय राखून ठेवला. पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही.
इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटच्या २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान केलेल्या स्टराइल आणि OSD प्लांटच्या तपासणीत ४ त्रुटी दाखवल्या.
ऍक्सिस बँकेने सिटी बॅन्केचा इंडिया कन्झ्युमर बिझिनेस आणि NBFC चा कन्झ्युमर बिझिनेस घेतला.
आज ऑटोविक्रीचे आकडे येत आहेत.
एस्कॉर्ट कुबोटा ची ट्रॅक्टर डोमेस्टिक विक्री ७२४५ युनिट एक्स्पोर्ट ५६६ युनिट आणि एकूण ट्रॅक्टर विक्री ७८११ होती. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विक्री ४७० युनिट झाली.
भारताची FY २३ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी GDP ग्रोथ ४.४ % झाली.
बजाज ऑटोची एकूण विक्री २.८० लाख युनिट झाली. २ व्हिलर्स ची विक्री ६% ने कमी झाली. निर्यात ३८%ने कमी झाली तर ३ व्हिलर्सची विक्री २२% ने वाढली.
स्टील स्ट्रिप्स च्या ट्रॅक्टर पार्ट्सच्या भागाची विक्री ५२%ने वाढली.
मारुतीची एकूण विक्री १.६४ लाखांवरून १.७२ लाख झाली. पॅसेंजर वाहन विक्री १.४७ लाख युनिट, LCV ची विक्री ३३५६ युनिट आणि युटिलिटी व्हेईकल विक्री ३३५० झाली.निर्यात कमी होऊन १७२०७ युनिट झाली.
अशोक लेलँडची एकूण विक्री २७% ने वाढून १८५७१ युनिट झाली. LCV चि विक्री ५९०३ तर M&H CV ची विक्री १२६६८ युनिट झाली.निर्यात मात्र १००३ युनिट झाली.
टाटा मोटर्सची एकूण विक्री ७९७८५ युनिट तर डोमेस्टिक विक्री ७८००६ झाली. पॅसेंजर व्हेईकल विक्री ४१३४० EV ची विक्री ५३१८ CV ची विक्री ३६५६५ युनिट झाली.
M & M ची एकूण विक्री ८% ने वाढून ५८८०१ युनिट झाली. ट्रॅक्टर विक्री २६% ने वाढून २५७९१ झाली. डोमेस्टिक विक्री २४६१९ झाली तर निर्यात २३% ने कमी झाली.
अतुल ऑटो ची विक्री १३६५ युनिट वरून ५६% ने वाढून २१२५ युनिट झाली.
SML ISUZU ची विक्री ३३% ने वाढून ९५३ युनिट झाली. पॅसेंजर व्हेईकल विक्री ३२९% ने वाढून ६३१ युनिट तर कार्गो व्हेईकल विक्री ३२२ युनिट झाली.
TVS मोटर्सची विक्री १.९% ने कमी होऊन २.७६ लाख झाली.
आयशर मोटर्सची विक्री २४.५ % वाढली
कोल इंडियाचे उत्पादन ७% ने वाढले.
गुजरात अल्कलीजनी त्यांच्या दहेज येथिल कॉस्टिक सोडा प्लान्टची क्षमता ७८५TPD वरून १३१० TPD केली.
ल्युपिनने हैदराबादमध्ये नवीन लॅब सुरु केली . मार्च २०२४ पर्यंत कंपनी दक्षिण भारतात २०० कलेक्शन सेंटर उभारणार आहे.
रेनबो मेडिकलने हैदराबादमध्ये १०० बेड्चे हॉस्पिटल सुरु केले.
IFTAS कडून भुवनेश्वर येथे डेटा सेंटर बनवण्यासाठी अहलुवालिया काँट्रॅक्टसला Rs १६९ कोटींची ऑर्डर मिळाली.
IRCTC ने HDFC बँकेबरोबर RuPay क्रेडिट कार्ड लाँच केले. पेमेन्टसाठी SBI आणि बँक ऑफ बरोडा बरोबर कॉन्ट्रॅक्ट केले.
वेदांता रिसोर्सेस ने सांगितले की आमच्या मार्च २०२३ पर्यंत ड्यू असलेल्या सर्व ड्यूजचे प्रीपेमेन्ट केले आहे त्यामुळे आमचे कर्ज US $ २ बिलियनने कमी झाली आहे. या त्यांच्या स्टेटमेंटनंतर वेदांताच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
आज पासून दिवगी टॉर्क ट्रान्स्फर या ऑटो अँसिलिअरी क्षेत्रातील कंपनीचा Rs ४१२ कोटींचा ( Rs १८० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs २३२ कोटींचा OFS) IPO ओपन झाला हा IPO ३ मार्चला बंद होईल. या इशूचा प्राईस बँड Rs ५६० ते Rs ५९० आहे. मिनिमम लॉट २५ शेअर्सचा आहे . कंपनीचा रेव्हेन्यू मोठ्या ५ ग्राहकांकडून येतो त्यात M & M कडून ७६% रेव्हेन्यू येतो. कंपनी USA कोरिया, रशिया, चीन इत्यादी देशात निर्यात करते.
टाटा पॉवरने टाटा रिन्यूएबल्स मध्ये Rs ४००० कोटींची गुंतवणूक केली. येत्या ५ वर्षात २० GW क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी ऍसेट्स तयार होतील.
GMR इन्फ्राला इंदोरमधील मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कच्या मेंटेनन्स साठी Rs ७५८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
फेब्रुवारी २०२३ साठी GST कलेक्शन १.४९ लाख कोटी झाले.
ब्लिंकिंट हि कंपनी होम प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस मध्ये JV करणार आहे असे कळल्यावर झोमॅटोच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
वेलस्पन कॉर्पला मध्यपूर्वेतील देशात बेन्डस आणि L SAW पाईप्स निर्यात करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
आज एनर्जी, इन्फ्रा, FMCG, बँका, केमिकल्स, मेटल, IT, रिअल्टी, PSE, ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९४३० NSE निर्देशांक निफ्टी १७४५७ बँक निफ्टी ४०७०३ वर बंद झाले
Bhagyashree Phatak
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !