Category Archives: Uncategorized

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

मागील भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

भाग ६३ – डीलीस्टिंग चे details – Vedanta

वेदान्ता ही धातू क्षेत्रातील कंपनी आहे .वेदांताचे नाव आधी सेसा गोवा होते.स्टरलाईट इंडस्ट्री सेसा गोवा मध्ये मर्ज झाली नंतर सेसा स्टरलाईट असे नाव झाले. CAIRN चे तिच्यात मर्जर झाल्यावर ११ एप्रिल २०१७ मध्ये वेदांता असे नाव झाले. यात प्रमोटर होल्डिंग ५१.०६% आणि इतरांचे ४८.९४% शेअर होल्डिंग आहे. ही नॅचरल रिसोर्सेस कंपनी झिंक, लेड, सिल्व्हर, कॉपर, ऍल्युमिनियम, आयर्न ओअर, ऑइल &गॅस आणि पॉवर क्षेत्रात काम करते . एकवेळ अशी होती की वेदांताच्या शेअरचा भाव Rs ५००० प्रती शेअर होता तर शेअरची किंमत २०१६ मध्ये Rs ५६ होती. कारण त्यांच्या तुतिकोरिन आणि गोव्यामधील प्लांट्सचे काम ठप्प झाले. त्यामुळे रेव्हेन्यू कमी होत गेले आणि कर्ज वाढत गेले.

यावर्षी कोरोनामुळे मार्केट पडू लागले तेव्हा पुन्हा एकदा मार्चमध्ये वेदांताचा भाव Rs ६० प्रती शेअर झाला. ही डीलीस्टिंगसाठी चांगली संधी आहे. आमच्या शेअरला भाव येत नाही आम्ही डीलीस्ट करतो असे सांगता येईल. आणि डीलीस्टिंगसाठी रक्कमही कमी द्यावी लागेल.असा विचार वेदांताच्या प्रमोटर्सने केला. पण शेअर्स विकत घेण्यासाठी फंड हवेत म्हणून रक्कम गोळा करणे सुरु झाले. US $ ३.१५ बिलियन गोळा केले. US $१.७५ बिलियन बँकांकडून ३ महिन्यासाठी टर्म लोन घेतले. US $ १.४ बिलियन चे ३ वर्ष मुदतीचे अमॉर्टीझेशन बॉण्ड्स इशू करून रक्कम उभी केली.. त्यापैकी US $ १.९ बिलियन एवढ्या सिक्युरिटीज २०२१ मध्ये मॅच्युअर होतील. त्यामुळे कर्ज Rs १२५००० कोटींच्यावर गेले. याचवेळी कॉपर आणि आयर्न ओअर बिझिनेसमध्ये रेग्युलेटरी इशू आले. तुतीकोरिन आणि गोव्यामधील आयर्न ओअर चे प्लांट्स बंद राहिले. त्यामुळे वेळेवर कर्जाची फेड करणे कठीण झाले.

वेदांतामध्ये पब्लिक शेअरहोल्डिंग ४९.४९% आहे म्हणजेच १८३.९८ कोटी शेअर्स आहे कंपनीने मे २०२० मध्ये व्हॉलंटरीली डीलीस्ट करायचा निर्णय घेतला. डीलीस्टिंगसाठी इंडीकेटीव्ह फ्लोअर प्राईस Rs ८७.५० ठरवली.जी इंडीकेटीव्ह प्राईस ऑफर केली आहे त्याच किमतीला शेअर्स घेतलेच पाहिजेत असे कंपनीवर बंधन नाही तसेच शेअरहोल्डर्सनी या किमतीला शेअर्स दिले पाहिजेत असेही शेअरहोल्डर्सवरही बंधन नाही या शेअरची बुकव्हॅल्यू Rs १९२.९० होती. ऑइल ऍसेट राईट ऑफ आणि काही अडजस्टमेन्ट दाखवून बुकव्हल्यू कमी दाखवली. Rs १७१३२ कोटी इम्पेअरमेंट ऑफ ऍसेट्स इन ऑइल गॅस, कॉपर आणि आयर्न ओअर म्हणून राईटऑफ केले. आणि Rs १२०८३ कोटींचा तोटा दाखवला. त्यामुळे बुकव्हॅल्यू Rs ८९ झाली. यामागे शेअरहोल्डर्सची बारगेनिंग पॉवर कमी करण्याचा हेतू होता. नेमकी हीच गोष्ट गुंतवणूकदारांना खटकली. US $ ३.१५ बिलियन एवढी रक्कम वापरली तर वेदांता जास्तीतजास्त Rs १२८ प्रती शेअरचा भाव देऊ शकेल. यामध्ये हिंदुस्थान झिंकचा रोल मह्त्वाचा आहे. हिंदुस्थान झिंकनी Rs ६९७२ कोटी अंतरिम लाभांश दिला. तो वेदांताला मिळाला नाही. जर डीलीस्टिंग झाले तर हा डिव्हिडंड मिळणार नाही. डिव्हिडंड थेट शेअरहोल्डर्सना दिला जातो तो विथहोल्ड का केला ? हिंदुस्थान झिंककडे असलेले फंड्स डायव्हर्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदुस्थान झिंक ने NCD काढून Rs ३५२० कोटी उभारले. ते डीलीस्टिंगसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान झिंक फंड रेझ करून पेरेंट कंपनीसाठी वापरू शकत नाही. वेदांता नेहमीच तिच्या ज्या कॅशरीच सबसिडीअरिज आहे तिच्यावर अवलंबून राहाते. हिंदुस्थान झिंक मध्ये सरकारचा २९% स्टेक असल्यामुळे सरकारचा रोलही महत्वाचा ठरतो.

डीलीस्टिंग साठी E -वोटिंग द्वारे मतदान झाले. २४ जून ते २६ जून २०२० दरम्यान डीलीस्टिंगच्या बाजूने ९३% मतदान झाले. वेदांताची डीलीस्टिंग ऑफर ५ ऑक्टोबर २०२० ला ओपन होऊन ९ ऑक्टोबर २०२० ला बंद होईल. ऑफर बंद झाल्यावर जर फायनल एक्सिट ऑफर चा स्वीकार झाला नाही तर २ दिवसात म्हणजे १३ ऑक्टोबरपर्यंत काउंटर ऑफर वेदांताने दिली पाहिजे. १० दिवसाच्या आंत म्हणजे २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत वेदान्ताने डीलीस्टिंगची रक्कम शेअरहोल्डर्सना दिली पाहिजे..

या डीलीस्टिंग बरोबरच अमेरिकन डिपॉझिटरी (म्हणजे फॉरिनबेस्ड कंपनीचे इक्विटीशेअर्स जे अमेरिकन स्टॉक एक्स्चेंजवर खरेदीविक्री साठी उपलब्ध असतात) शेअर्सचे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवरून डीलीस्टिंग होईल.डिपॉझिटरी शेअर्स हे डिपॉझिटरी बँक फॉरीन कंपनीबरोबर केलेल्या करारानुसार इशू करतात.

या डीलीस्टिंगमध्ये आम्ही काय करावे असा विचार ट्रेडर्स किंवा गुंतवणूकदार करत असतील.

(१) वरील चर्चेतून एक गोष्ट तुम्हाला कळली असेल की Rs १२८ ते Rs १३० पर्यंतचा भाव तर नक्कीच मिळेल. ज्या कोणी Rs ९० ते Rs १०० च्या किमतीच्या आसपास शेअर्स खरेदी केले असतील त्यांना २५% प्रॉफिट होतो आहे. त्यामुळे त्यांनी प्रॉफीटबुकींग करावे किंवा Rs १३० चा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस लावावा. जसा भाव वाढत जाईल तसा ट्रेलिन्ग स्टॉपलॉस वाढवत न्यावा.

(२) गेल्या वर्षीचा हायेस्ट भाव Rs १७५ होता. त्यामुळे Rs १७० ते Rs १७५ दरम्यान डीलीस्टिंग होईल असा अंदाज वर्तवला जातो. एवढा भाव झाल्यास होल्डिंग पैकी ९०% शेअर्स विकावेत.

(३) पण ज्यांची खरेदी Rs २०० किंवा जास्त भावावर झाली आहे त्यांनी शेअर्स तोट्यात दिले पाहिजेत असे नाही. कंपनी बंद होत नाही आहे फक्त डीलीस्ट होत आहे. यामध्ये BSE, NSE वर ट्रेडिंग होणार नाही पण डिलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्यवहार करणारे काही ब्रोकर्स असतात त्यांच्यामार्फत शेअर्स विकता येतील.अशा डीलीस्ट झालेल्या कंपनीच्या शेअर्सवर डिव्हिडंड बोनस अशासारख्या गोष्टी मिळतात . ही चांगली कंपनी आहे कदाचित काही काळानंतर परिस्थिती बदलल्यावर कंपनीचे शेअर्स रिलिस्ट होण्याची शक्यता असते.

आता जे जे होईल ते ते पहा आणि आपल्यास योग्य आणि फायदेशीर असा निर्णय घ्या.

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

Reliance rights issue

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड राईट्स इशू / एंटायटलमेंट – May 2020

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड राईट्स इशू / एंटायटलमेंट

राईट्स ही एक कॉर्पोरेट एक्शन आहे. कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना करंट मार्केट प्राईसपेक्षा कमी किमतीत कंपनीचे शेअर्स ऑफर करत असते. या द्वारे भांडवलाची गरज पूर्ण करत असते. आता एंटायटलमेंट म्हणजे अधिकार. म्हणजे ज्यांच्याजवळ कंपनीचे शेअर्स असतात त्यांना हा अधिकार मिळतो. त्यालाच एंटायटलमेंट म्हटले जाते. पण हा राईट्स घेतलाच पाहिजे असे शेअरहोल्डरवर बंधन नसते. यालाच ‘राईट बट नॉट ऑब्लिगेशन’ असे म्हणतात.हे राईट्स एका विशिष्ट प्रमाणात दिले जातात. उदा:- १:१, ५:१,

या वर्षी RIL ( रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) ने ३० वर्षांनंतर ३० एप्रिल २०२० रोजी Rs १० दर्शनी किमतीचे Rs १२५७ प्रती शेअर या भावाने शेअर होल्डर्सना त्यांच्या जवळ असलेल्या १५ शेअर्स मागे १ राईट्स शेअर देण्याचे ठरवले. १४ मे २०२० ही रेकॉर्ड डेट निश्चित केली. म्हणजेच १४ मेला ज्यांच्या डिमॅट अकौन्टला RIL चे शेअर्स असतील त्यांना राईट्स मिळतील. हा राईट्स इशू २० मे २०२० रोजी ओपन होऊन ३ जून २०२० रोजी बंद होईल. करंट मार्केट प्राईसपेक्षा Rs २०० कमी भावाने राईट्स दिले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राईट्ससाठी हप्त्याहप्त्याने पैसे देण्याची मुभा ठेवली. याचे तीन हप्त्यात पेमेंट करायचे आहे. अप्लिकेशनबरोबर म्हणजे ३ जून २०२० पर्यंत. Rs ३१४.२५ ( Rs २.५० दर्शनी किंमत +Rs ३११.७५ प्रीमियम), दुसऱ्या हप्त्यात म्हणजे मे २०२१ मध्ये Rs ३१४.२५ ( Rs २.५० दर्शनी किंमत +Rs ३११.७५ प्रीमियम), आणि तिसर्या हप्त्यात म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये Rs ६२८.५० (Rs ५ दर्शनी किंमत +Rs ६२३.५० प्रीमियम) असे एकूण Rs १२५७ पेमेंट करायचे आहे. या पार्टली पेड राइट्सची अलॉटमेंट १० जून २०२० रोजी होईल. डिमॅट अकौन्टला ११ जून २०२० ला येतील आणी १२ जून २०२० रोजी लिस्ट होतील.

आता प्रश्न निर्माण होतो एंटायटलमेंट म्हणजे काय ? एंटायटलमेंट म्हणजे अधिकार.

RIL-RE म्हणजे RIL चे राईट्स मिळण्याचा अधिकार. ही RE रिलायन्सने सर्व शेअरहोल्डर्सच्या डिमॅट अकौन्टला जमा केले. यालाच टेम्पररी डिमॅट सिक्युरिटीज असे म्हणतात. याला वेगळा ISIN नंबर दिला. तो INE 002A20018 आहे.परंतु RIL-RE हे T टू T या ग्रुपमध्ये टाकल्यामुळे यामध्ये डे ट्रेडिंग होऊ शकणार नाही. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर याचे ट्रेडिंग २० मे २०२० पासून सुरु झाले. हे ट्रेडिंग २९ मे २०२० पर्यंत चालू राहील. आपल्याला RIL-RE असे टाकल्यास NSE वर याचा भाव दिसू शकतो.

हे नेहेमीच्या राईट्स इशूप्रमाणे नाहीत म्हणून शेअरहोल्डर्स बुचकळ्यात पडले आहेत.

(१) काही जणांना वाटते आहे की आम्ही RIL-RE खरेदी केले की आपल्याला राईट्स मिळतील. पण असे घडणार नाही. राईट्स मिळण्याचा फक्त अधिकार मिळेल. त्यासाठी लागणारे Rs १२५७ वेळापत्रकाप्रमाणे भरावे लागतील.

(२) Rs १२५७ ची सोय होत नसेल तर आम्ही काय करू :- तुम्ही RIL-RE मार्केटमध्ये २९ मे २०२० पर्यंत शेअरप्रमाणेच विकू शकाल. जर तुम्ही समजा Rs २०० ला खरेदी केली, विकताना भाव Rs २४० मिळाला तर Rs ४० प्रती RIL -RE फायदाही होऊ शकेल. आणि विक्रीचा भाव Rs १९० मिळाला तर Rs १० प्रती RIL-RE नुकसान होईल. आणि नुकसान सोसायचे नसेल तर तुम्हाला राईट्स इशूमध्ये अर्ज करता येईल.

(३) माझ्या जवळ RIL चे १५० शेअर्स आहेत. पण मार्केट मंदीत असल्यामुळे मला राईट्स नको आहेत :- तुम्हाला RIL च्या १५० शेअर्ससाठी १० RIL-RE तुमच्या डिमॅट अकौंटमध्ये जमा झाले असतील आणि तशी तुम्हाला मेल आली असेल. तुम्ही हे RIL-RE शेअर्स प्रमाणे विकून टाकलेत तरी Rs २०० प्रती RIL-RE म्हणजेच Rs २००० फायदा होईल. आणि भविष्यात मार्केट करेक्शनमध्ये Rs १२५७ प्रती शेअर पेक्षा कमी भावाला RIL चे शेअर्स खरेदी करता येतील.

(४) माझ्याकडे RIL चे शेअर्स नाहीत, रेकॉर्ड डेटच्या आधी खरेदी करू शकलो नाही पण राईट्स हवे आहेत. तुम्ही जेव्हा २९ मे २०२० पर्यंत जेव्हा RIL- RE चा भाव कमी असेल तेव्हा खरेदी करा आणि ३ जून २०२० पर्यंत राईट्सचा फार्म भरून राइट्ससाठी अर्ज करा.

(५) RIL-RE च्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो २९ मे २०२० पर्यंत घ्यावा लागेल. २९ मे २०२० नंतर जर तुम्ही राईट्स इशू मध्ये अर्ज केला नाही तर RIL-RE लॅप्स होतील.

(६) जवळपास Rs २२० ते Rs २३० प्रती RIL-REया भावाने RIL-RE विकत घ्यायचे आणि राईट्सचे Rs १२५७ भरायचे असतील त्याचे शेवटचा हप्ता भरल्यानंतर शेअर्समध्ये रूपांतर होणार यात आमचा फायदा काय.? :- RIL चा भाव १ वर्षांनंतर Rs १६०० ते Rs १६५० पर्यंत जाईल असा अंदाज सर्वजण व्यक्त करत आहेत. यामध्ये Rs ३६५ ऑइल आणि गॅस,Rs ५०७ रिटेल बिझिनेस आणि Rs ७७५ जिओ म्हणजेच किंमत Rs १६४५ होईल असा अंदाज आहे. खरेदीची कॉस्ट अंदाजे Rs १४७७ ( Rs१२५७+Rs २२० ) बसेल म्हणजे १ वर्षांनंतर सुमारे Rs २०० फायदा मिळू शकतो.हा फायदा मिळवण्यासाठी संपूर्ण पैसे एकत्र द्यावे लागणार नाहीत. जर राईट्स खरेदी न करता मार्केटमधून RIL चे शेअर्स खरेदी केले तर CMP प्रमाणे पूर्ण रक्कम भरावी लागेल. अलीकडेच रिलायन्समध्ये FII ने Rs ७८५३२ कोटींची गुंतवणूक केली आहे. तसेच RIL ची एक टेक्नॉलॉजी कम्पनी बनण्याकडे वाटचाल चालू आहे. दुर्दैवाने जर या वर्षभरात RIL चा भाव कमी झाला/ अपेक्षेप्रमाणे वाढला नाही तर इलाज नाही म्हणून वाट पाहावी लागेल.

(७) RIL च्या १५ शेअर्सला १ राईट्स शेअर असे प्रमाण असल्यामुळे ज्यांच्याकडे १६ शेअर असतील त्यांनाही १ राईट्स शेअर मिळेल आणि ज्यांच्याकडे २९ शेअर्स असतील त्यांनाही १ राईट्स शेअर मिळेल मग काय उपयोग ? याचा विचार करून कंपनीने प्रेफरंशियल ट्रीटमेंट द्यायचे ठरवले आहे. जे राईट्स अनसब्स्क्राइबड राहतील ते अशा शेअरहोल्डर्सना दिले जातील अशी सवलत देण्याच्या विचारात आहे. यासाठी तुम्ही जास्तीच्या राईट्ससाठी अर्ज करून त्यासाठी अप्लिकेशन मनी भरला पाहिजे. जर त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीचे राईट्स शेअर्स अलॉट झाले नाहीत तर तुम्हाला जास्तीच्या शेअर्ससाठी भरलेल्या पैशाचा रिफंड मिळेल.

(८) माझ्याकडे फिझिकल फॉर्ममध्ये RIL चे शेअर्स आहेत.तर मला राईट्स मिळतील का ? तुम्हाला राईट्स नक्की मिळतील पण फिझिकल शेअर्सचे डिमॅट शेअर्समध्ये रूपांतर करावे लागेल. तुम्ही तुमचा डिमॅट अकौंट नंबर रजिस्ट्रारला कळवला की RIL-RE तुमच्या डिमॅट अकौंटमध्ये क्रेडिट होतील.

जेथपर्यंत पूर्ण पेमेंट होणार नाही तो पर्यंत तुमच्या डिमॅट अकौंटवर पार्टली पेड शेअर्स असा उल्लेख असेल. पूर्ण पेमेंट केल्यानंतर या पार्टली पेड शेअर्सचे फुल्ली पेड शेअर्समध्ये रूपांतर होईल . त्यानंतर मात्र हे RIL च्या शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्सचेंजीसवर ट्रेड होतील.

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – 24 Jan 2020

आज क्रूड US $ ६१.८४ प्रती बॅरल ते US $ ६२.४३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२५ ते US $१=Rs ७१.३२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.७३ तर VIX १५.५० होते.
बजाज ऑटोने भारतात ‘TRIUMPH’ मोटारसायकल विकण्यासाठी करार केला.या मोटारसायकलची किंमत Rs २ लाख आहे.
BHEL रेल्वे ईंजिन, कोचची निर्यात करणार आहे. या वर्षी मोझाम्बीकला ९० डिझेल लोकोमोटिव्हची निर्यात करणार आहे. सुरुवातीला ५% ते १०% ‘स्टॅंडर्ड गॉज’ मार्केटशेअर काबीज करण्याचे लक्ष्य आहे.
मारुतीने ‘SUV S-PRESSO’ ची निर्यात सुरु केली.
अडानी गॅसचे रिस्ट्रक्चरिंग CGD नियमांच्याविरुद्ध असल्यामुळे PNGRB ने कंपनीला लायसेन्स रद्द करण्याविषयी नोटीस पाठवली. PNGRB कंपनीला Rs ४०० कोटींचा दंड करू शकते.
स्ट्राईड फार्मा या कंपनीच्या अलातूर युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.
मोबाईल हँडसेट, कॉम्प्युटर, सर्वर, आणी त्यांचे सुटे पार्ट यांच्या उत्पादनाला अंदाजपत्रकात सरकार सवलत देण्याची शक्यता आहे. याच उत्पादनाच्या निर्यातीलाही (इलेक्ट्रॉनिक एक्स्पोर्ट) सरकार सवलत देण्याची शक्यता आहे. ही सवलत उत्पादनाशी निगडीत सबसिडी किंवा आयकरात सवलत या स्वरूपात देण्याची शक्यता आहे.
GIC आपल्या मालमता विम्याच्या आणि ऑटो विम्याच्या प्रीमियमच्या दरात वाढ करणार आहे.
इंडियन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. NII Rs १९५५ कोटी, प्रॉफिट Rs २४७.५ कोटी, इतर इन्कम Rs १०३६ कोटी होते. GNPA ७.२% वर स्थिर होते. NNPA ३.५ % होते.निकालानंतर इंडियन बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली.
अल्ट्राटेक सिमेंटचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. उत्पन्न Rs १०३५४ कोटी, प्रॉफिट Rs ७११ कोटी, मार्जिन १९.१% इतर उत्पन्न Rs १६४ कोटी होते. या निकालानंतर शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.
सोनाटा सॉफ्टवेअर, सुप्रीम इंडस्ट्रीज, AWAS फायनान्सियर्स, अतुल लिमिटेडचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
किर्लोस्कर फेरस, JSW स्टील, ओरिएण्ट हॉटेल्स यांचे निकाल असमाधानकारक होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१६१३ NSE निर्देशांक निफ्टी १२२४८ बँक निफ्टी ३१२४१ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

आजचं मार्केट – 23 Jan 2020

आज क्रूड US $ ६२.१६ प्रती बॅरल ते US $ ६२.५४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२२ ते US #१=Rs ७१.२८ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९७.५५ तर VIX १६.१० होते.
चीनमध्ये सुरु झालेल्या कॉर्नो व्हायरसने आता जगभर पाय पसरायला सुरुवात केली. त्यामुळे क्रूडसाठी असलेल्या मागणीत घट झाली. तसेच USA मधेही क्रूडच्या साठ्यात वाढ झाल्यामुळे क्रूडच्या दरात घसरण झाली. यामुळे OMC. पेंट्स तसेच टायर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.
येस बँकेने सिकल लॉजिस्टीकमधील २.०८% स्टेक विकला.
फेब्रुवारी २०२० मध्ये सरकार CPSE ETF पुढील टप्पा लाँच करण्याची शक्यता आहे. सरकार या टप्प्यात Rs १५००० कोटी उभारेल.
DB कॉर्प ( उत्पन्न कमी झाले, प्रॉफिट वाढले, Rs ३.५० प्रती शेअर अंतरिम लाभांश), इंडोको रेमिडीज ( प्रॉफिट, उत्पन्न वाढले), कॅनरा बँक ( NII Rs ३४३५ कोटी, GNPA, NNPA मध्ये मामूली घट, लोन ग्रोथ १.३%, प्रोव्हिजनिंग कमी केली, PCR ७०.९७% , लोन ग्रोथ कमी), OBC ( प्रॉफिट वाढले. GNPA, NNPA मध्ये मामुली वाढ, प्रोव्हिजन कमी झाली ), वेस्टलाइफ डेव्हलपमेंट ( प्रॉफिट, उत्पन्न वाढले) , रॅडिको खेतान, JM फायनान्सियल, NIPON AMC, PVR ( मार्जिन वाढले, ३३.६%, अन्य आय कमी) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. HT मेडिया चे निकाल ठीक होते. PNB हौसिंगचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
गोदरेज कन्झ्युमर आपल्या कुलिंग सेगमेंटचा विस्तार करणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने असे सांगितले की PSU ( पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ) ना AGR भरण्यासाठी चुकीने नोटीस पाठवली गेली. PSU ने AGR देण्याची गरज असत नाही. या स्पष्टीकरणानंतर गेल, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ऑइल इंडिया या शेअर्समध्ये तेजी आली.
CPSE ETF मधून जे शेअर्स बाहेर पडतात त्यामध्ये विक्री होते. म्हणून या शेअर्सचा भाव कमी होतो. जे शेअर्स ऍड होतात त्यात खरेदी होते. त्यामुळे त्यांचे भाव वाढतात.असे साधारणतः घडते. पण त्याचवेळी चहूबाजूंनी विचार करावा लागतो. या वेळी सरकारने सरकारचा ५१% स्टेक असलेल्या कंपन्यांचे शेअर्स ऍड केले. म्हणजेच आता या कंपन्यांच्या शेअर्समध्ये डायव्हेस्टमेन्ट, OFS, FPO होईल अशी कोणतीही भीती राहिली नाही. त्याचबरोबर क्रूडचा भाव कमी झाला त्यामुळे IOC आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये तेजी आली.
GHCL ( गुजरात हेवी केमिकल्स इंडस्ट्रीज) Rs २५० प्रति शेअर या भावाने शेअर बायबॅक करेल. यासाठी कंपनी Rs ६० कोटी खर्च करेल.
सरकार ITI चा फॉलो ऑन पब्लिक इशू Rs ७२ ते Rs ७७ या प्राईस बँड मध्ये आणत आहे.सध्या ITI चा शेअर Rs १००च्या आसपास ट्रेड होत होता. त्यामुळे या बातमीनंतर ITI च्या शेअरमध्ये विक्री झाली.हा FPO २४ जानेवारी २०२०ला ओपन होऊन २८ जानेवारी २०२० ला बंद होईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१३८६ NSE निर्देशांक निफ्टी १२१८० बँक निफ्टी ३१००४ वर बंद झाले
भाग्यश्री फाटक

आजचं मार्केट – 22 jan 2020

आज क्रूड US $ ६४.११प्रती बॅरल ते US $ ६४.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१९ ते US $१=Rs ७१.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६३ तर VIX  १५.९० होते. ग्लेनमार्क फार्मा त्यांचा भारत आणि नेपाळमधील गायनॅक बिझिनेस विकणार आहे. या व्यवहारातून ग्लेनमार्कला Rs १६० कोटी मिळतील. 
नव्या नोकऱ्यांची  संख्या वाढते आहे. GST च्या कलेक्शनचे आकडे सुधारत आहेत. IIP चे आकडे सुधारत आहेत. अर्थव्यवस्था बॉटमिंग होत आहे. 
सरकारने  येत्या ३-५ वर्षात क्रूडची आयात १५% ने कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारने  मिथेनॉलचे उत्पादन दुप्पट करण्याचे ठरवले आहे.
सरकार भारत डायनामिक्स मधील आपल्या ८७.७५% स्टेकमधील १५% स्टेक ओपन ऑफरच्या माध्यमातून विकणार आहे. डायव्हेस्टमेन्ट डिपार्टमेंटने या स्टेकसाठी बोली मागवल्या आहेत.    
UPL च्या १५ ठिकाणांवर आयकर खात्याने छापे घातले. 
मारुतीने गेल्या १० महिन्यात ५ लाखापेक्षा जास्त BSVI कार्स विकल्या. 
उत्तर प्रदेश राज्यात देशी मद्यार्कासाठी असलेल्या लायसेन्स फीमध्ये   १०% तर विदेशी मद्यार्कासाठी असलेल्या लायसेन्स फीमध्ये  २०% ने वाढ केली.
टाटा मोटर्सने अल्ट्रोज या नावाने Rs ५.२९ लाख किमतीची छोटी कार लाँच केली. 
अडानी कॅपिटलने एस्सेल फायनान्सचा MSME बिझिनेस खरेदी केला. 
हिरो मोटो कॉर्पने आपल्या मोटारसायकल्स आणि स्कुटर्सवर  Rs २०२० ते Rs ३००० पर्यंत सूट दिली. 
मुंबईतल्या काही भागात मॉल्स . मल्टिप्लेक्स, रेस्टारंट,प्रायोगिक तत्वावर  २४X ७ रात्रंदिवस ओपन ठेवायला परवानगी दिली. याचा फायदा ज्युबिलण्ट फूड्स, स्पेशालिटी रेस्टारंट, GRAUER & WEIL, स्पेन्सर रेस्टारंट यांना होईल. 
शिपिंग कॉर्पोरेशनमधील सरकारचा स्टेक विकण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये रोड शो करेल.
हिंद मेडिया व्हेंचर्स, झी एंटरटेनमेंट यांचे निकाल सर्व साधारण होते. शारदा क्रॉपकेमचे निकाल असमाधानकारक होते. ऍक्सिस बँकेचे नेट NPA वाढले. प्रॉफिट Rs १७५७ कोटी झाले तर NII Rs ६४५३ कोटी होते. त्यामुळे मार्केटला  हे निकाल पसंत पडतील असे वाटत नाही. HDFC AMC चे  AUM ( ऍसेट अंडर मॅनेजमेंट)  कमी झाले. HNI बिझिनेस वाढला. बाकी रेव्हेन्यू प्रॉफिट चांगले होते.  
इंडिया मार्ट, हाटसन ऍग्रो, एशियन पेंट्स, SBI लाईफ, मोतीलाल ओसवाल, अलेम्बिक फार्मा, लार्सन आणि टुब्रो  यांचे तिसऱ्या  तिमाहीचे निकाल चांगले आले.
तेजस एंटरप्रायझेस फायद्यातून तोट्यात गेली. 
GHCL या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक शेअर्स बायबॅकवर  विचार करण्यासाठी उद्या बोलावली आहे. 
हिंदुस्थान  फ्लोरोकार्बन्स बंद करायला मंत्रिमंडळांनी परवानगी दिली.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१११५ NSE निर्देशांक निफ्टी १२१०६ निफ्टी बँक ३०७०१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

पुढचा कोर्स – 26-27 Jan 2019!

आजपर्यंत २ batch मध्ये ९ लोक येऊन शिकून गेले आनंद झाला. उत्साह वाढला आणि पुढच्या क्लासची  तारीख ठरवून टाकली.  या वेळी १० लोकांची batch आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

तारीख – २६ – २७ January २०१९ 
वेळ – ९ ते ४
ठिकाण – पांडुरंग निवास, स्टेशन रोड, ठाणे (वेस्ट), ४००६०१
फी – Rs ५०००
विषय –
(१) मार्केटची ओळख

(२) मार्केटमध्ये प्रवेश – DEMAT अकौंट, ट्रेडिंग अकौंट

(३) निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक

(४) प्रायमरी मार्केट IPO

(५) सेकंडरी मार्केट, FPO, OFS, QIP इशू

(६) ट्रेडिंग – इंट्राडे, अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी,

(७) स्टॉप लॉस

(८) गुंतवणूक

(९)कॉर्पोरेट एक्शन आणि त्याचा शेअर्स खरेदी विक्री संबंधात विचार

(१०) फंडामेंटल विश्लेषण, क्रूड ,करन्सी, व्याजाचे दर विनिमय दर, फायनान्सियल रेशीओज

(११) टेक्निकल विश्लेषण

(१२) पेनी स्टॉक, सर्किट फिल्टर आणि इतर संबंधित विषय

धन्यवाद
भाग्यश्री फाटक (९६९९६१५५०७)

आपले नेहेमीचे नियम या कोर्सलाहि लागू होतील. या कोर्स मध्ये मार्केटच शिक्षण दिलं जाईल पण कुठल्याही टिप्स किंवा वैयक्तिक शेअर बद्दल सल्ले दिले जाणार नाहीत !!

पुढचा कोर्स – १५-१६ डिसेंबर !!

आपल्या विनंतीला मान देऊन मी अजून एक कोर्स arrange केलाय पण या वेळी फक्त ५ जणांसाठी !! तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

तारीख – १५ – १६ December 
वेळ – ९ ते ४
ठिकाण – पांडुरंग निवास, स्टेशन रोड, ठाणे (वेस्ट), ४००६०१
फी – Rs ५०००
विषय –
(१) मार्केटची ओळख
(२) मार्केटमध्ये प्रवेश – DEMAT अकौंट, ट्रेडिंग अकौंट
(३) निफ्टी आणि सेंसेक्स हे निर्देशांक
(४) प्रायमरी मार्केट IPO
(५) सेकंडरी मार्केट, FPO, OFS, QIP इशू
(६) , ट्रेडिंग – इंट्राडे, अल्पमुदत मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी,
(७) स्टॉप लॉस
(८) गुंतवणूक
(९)कॉर्पोरेट एक्शन आणि त्याचा शेअर्स खरेदी विक्री संबंधात विचार (१०) फंडामेंटल विश्लेषण, क्रूड ,करन्सी, व्याजाचे दर विनिमय दर, फायनान्सियल रेशीओज
(११) टेक्निकल विश्लेषण
( १२) पेनी स्टॉक सर्किट फिल्टर आणि इतर संबंधित विषय

धन्यवाद
भाग्यश्री फाटक (९६९९६१५५०७)

आपले नेहेमीचे नियम या कोर्सलाहि लागू होतील. या कोर्स मध्ये मार्केटच शिक्षण दिलं जाईल पण कुठल्याही टिप्स किंवा वैयक्तिक शेअर बद्दल सल्ले दिले जाणार नाहीत !!

भाग ६३ – सोनेरी चौकार :सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स स्कीम २०१८-२०१९

सोनेरी चौकार :सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्स स्कीम २०१८-२०१

By Szaaman [Public domain], via Wikimedia Commons

भारतात सोन्याविषयी असणारे आकर्षण खूप आहे. त्यामुळे सोन्याची आयात मोठ्या प्रमाणावर होते. सरकारच्या दृष्टीने ही एक मोठी डोकेदुखी आहे. ज्यावेळी रुपया ढासळत असतो तेव्हा ही समस्याच उग्र रूप धारण करते. सरकार वेगवेगळे उपाय वेळोवेळी करत असते. वेगवेगळ्या योजना आखत असते.

सभोवतालची परिस्थिती जशी बदलते तसा समाजाला, सरकारला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. अशाच प्रकारे ध्यानीमनी नसताना जगातील सर्व देशांत उलथापालथ झाली.ब्रेक्झिट, डिमॉनेटायझेशन,GST, ट्रेंड वॉर आणि टॅरिफ वॉर सुरु झाले आणी त्याचा परिणाम चलनावर व पर्यायाने सोन्याच्या दरावर झाला.

गेल्या काही महिन्यांत रुपया घसरला म्हणजेच एका US डॉलरला Rs.७३ ते Rs ७५ असा भाव झाला. क्रूडचा भावही वाढत गेला आणि त्याने US $ ८६ प्रती बॅरलची पातळी गाठली. महागाई, करंट अकौंट डेफिसिट वाढण्याचा धोका निर्माण झाला.आणि त्याच वेळेला लोकसभा तसेच राज्य विधानसभांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या अशा बदललेल्या परिस्थितीमुळे सरकारवरील ताण वाढत गेला आणि आता काय करावे असा विचार सरकार आणि RBI मिळून करू लागले.

सरकारच्या दृष्टीकोनांतून विचार करायचा झाला तर आयातीमध्ये प्रथम क्रमांकावर क्रूड तर दुसऱ्या क्रमांकावर सोने आहे. भारतीयांना सोन्याचे आकर्षण फार असल्याने लग्नकार्य, सणासुदीच्या काळांत सोन्याची मागणी वाढत असल्याने आणी आपल्या देशांत या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास पुरेसे सोन्याचे उत्पादन होत नसल्याने सोने मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. त्यामुळे आयात आणी निर्यात यातील दरी रुदावते. CAD ( CURRENT ACCOUNT DEFICIT) वाढते.
बदलत्या काळाप्रमाणे सोन्याच्या बाबतीत चोरीमारीच्या धोक्यापासून संरक्षण व्हावे म्हणून लोक बँकेत लॉकर्समध्ये दागिने, जडजवाहीर ठेवणे सुरक्षित समजू लागले. लॉकरची उपलब्धता, लॉकर्सचे वाढणारे भाडे, दागिने बदलले जाण्याची भीती या समस्या आहेतच. ‘हौसेला मोल नसते’ असे जरी बोलले जात असले तरी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेच. खरे पाहता सोन्यात केलेली गुंतवणूक ही ‘DEAD INVESTMENT’ ठरते पण सोने हा हौशीचा भाग असल्याने याकडे दुर्लक्ष होते.

सरकारने २०१५-२०१६च्या अन्दाजपत्रकांत’ ‘GOLD MONETISATION SCHEME’ नावाची योजना आणू असे सुतोवाच केले होते. या GMS (‘GOLD MONETISATION SCHEME’) चे उद्घाटन २०१६ सालच्या धनतेरसच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदिनी केले. या योजनेअंतर्गत सरकारने RBI शी चर्चा करून दसरा आणि दिवाळीची संधी साधून २०१८ -१९ वर्षांसाठी एक सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड स्कीम आणली. या योजनेनुसार ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळामध्ये दर महिन्याला गोल्ड बॉण्ड्स इशू होतील.

(१) या योजनेखाली सिरीज II मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०१८ ही मुदत आहे. या मुदतीत केलेल्या अर्जाना २३ ऑक्टोबर २०१८ रोजी गोल्ड बॉण्ड्स इशू केले जातील. या योजनेतील सिरीज II साठी Rs ३१४६ प्रति ग्राम हा दर जाहीर केला.

(२) या योजनेखाली सिरीज III मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी ५ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर २०१८ ही मुदत आहे. या मुदतीत केलेया अर्जांना १३ नोव्हेंबर२०१८ रोजी गोल्ड बॉण्ड्स इशू केले जातील.

(३) या योजनेखाली सिरीज IV मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०१८ ही मुदत असेल या मुदतीत केलेल्या अर्जाना १ जानेवारी २०१९ रोजी गोल्ड बॉण्ड्स इशू केले जातील.

(४) या योजनेअंतर्गत सिरीज V मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी जानेवारी १४ २०१९ ते जानेवारी १८ २०१९ ही मुदत असेल. या मुदतीत केलेल्या अर्जाना २२ जानेवारी २०१९ रोजी गोल्ड बॉण्ड्स इशू केले जातील.

(५) या योजनेअंतर्गत सिरीज VI मध्ये सबस्क्राईब करण्यासाठी फेब्रुवारी ४ २०१९ ते फेब्रुवारी ८ २०१९ ही मुदत असेल या मुदतीत केलेल्या अर्जांना १२ फेब्रुवारी २०१९ रोजी गोल्ड बॉण्ड्स इशू केले जातील.

हे बॉण्ड्स बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, पोस्ट ऑफिस, NSE आणि BSE यांच्या मार्फत विकले जातील. हे बॉण्ड्स सरकारच्या वतीने RBI इशू करेल. हे बॉण्ड्स फक्त निवासी भारतीय व्यक्ती, HUF ट्रस्ट, युनिव्हर्सिटी आणि धर्मादाय संस्था खरेदी करू शकतील. हे बॉण्ड्स कमीतकमी १ग्राम किंवा त्याच्या पटीत इशू केले जातील. हे बॉण्ड्स ८ वर्ष मुदतीसाठी इशू केले जातील. ५ व्या,६व्या आणि ७व्या वर्षी व्याज देण्याच्या वेळेला तुम्हाला एक्झिट ऑप्शन मिळू शकेल. एक व्यक्ती किंवा HUF जास्तीतजास्त ४ किलोसाठी आणि ट्रस्ट आणि इतर २० किलोसाठी अर्ज करू शकतात. संयुक्त अर्जदार असाल तर पहिल्या अर्जदाराला ४ किलोसाठी अर्ज करता येईल.

गोल्ड बॉण्ड्सची किंमत ठरवण्यासाठी सब्स्क्रिप्शनच्या मुदतीच्या आधीच्या तीन दिवसाची सररासरी किंमत लक्षात घेतली जाईल. ही सरासरी ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या क्लोजिंग प्राईसची सरासरी असेल. ही क्लोजिंग प्राईस इंडिया बुलियन आणि ज्युवेलर्स असोसिएशनने ठरवलेली असेल. या बॉण्ड्सची किंमत रुपयात ठरवली जाईल.बॉण्ड्सचे रिडम्प्शन करताना रिडम्प्शन रक्कम याच आधारे ठरवली जाईल. जे लोक ऑन लाईन खरेदी करतील आणि डिजिटल मोडच्या द्वारे पैसे देतील त्यांना Rs ५० प्रती ग्राम सूट दिली जाईल. Rs २०००० पर्यंतची रकम कॅश, चेक किंवा डीमांड ड्रॅफ़्टच्या स्वरूपात स्वीकारली जाईल.

हे गोल्ड बॉण्ड्स गुंतवणूकदाराला सर्टिफिकेटच्या स्वरूपात ठेवता येतील किंवा आपल्या DEMAT अकौंट मध्ये जमा करता येतील. या गोल्ड बॉण्ड्स वर फिक्स्ड रेट ने २.५% प्रती वर्ष व्याज दिले जाणार हे व्याज दर सहा महिन्यांनीही मिळण्याची सवलत असेल. हे बॉण्ड्स तारण ठेवून कर्ज मिळू शकेल. सर्वसाधारण गोल्ड लोन जेवढे दिले जाते तेव्हढे लोन हे बॉण्ड्स तारण ठेवून दिले जाईल. KYC च्या सर्व नियमांचे पालन करून KYC करावे लागेल.

या बॉण्ड्सवर मिळणारे व्याज आयकर कायद्याप्रमाणे करपात्र आहे. TDS च्या प्रोव्हिजन या बॉण्ड्सला लागू होणार नाहीत . हे गोल्ड बॉण्ड्स रीडीम केल्यावर मिळणाऱ्या उत्पनावर कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार नाही. हे गोल्ड बॉण्ड्स इशू केल्यापासून १५ दिवसानंतर स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेंडेबल असतील. हे गोल्ड बॉण्ड्स गिफ्ट म्हणून देता येतील किंवा कोणाच्याही नावे ट्रान्स्फर करता येतील.हे बॉण्ड्स ट्रान्स्फर केल्यावर होणाऱ्या कॅपिटल गेन्स साठी इंडेक्ससेशनचा फायदा दिला जाईल.

या बॉण्ड्सवर मॅनेजमेंट चार्जेस लागणार नाहीत, या बॉण्ड्सच्या बाबतीत स्टोअरेज किंवा लॉकर फीची चिंता नाही.सोन्याचा भाव चालु असेल त्या भावाला हे बॉण्ड्स रीडीम केले जातील.लोकांना कॅपिटल मध्ये एप्रिसिएशन आणि व्याज असे दोन्हीचे फायदे मिळतील. हे गोल्ड बॉण्ड्स म्हणजे भांडवली गुंतवणूक आणि बॅंकेतील ठेवी यांचा सुरेख संगम आहे .

सरकारने गोल्ड बॉण्ड्स इशू करून सोनेरी चौकार मारला आहे. जर लोकांना ही योजना आवडली तर लोक षटकार मारतील. आणि सध्याच्या अडचणींवर सरकारला एक उपाय उपलब्ध होईल. सरकार सामना जिंकेल.

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा 

आजचं मार्केट – विशेष लक्षवेधी – रिलायन्स इंडस्ट्रीज results

आज रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.

एकूण उत्पन्न Rs १५६२९१ कोटी झाले. ही YOY (YEAR ON YEAR) ५४.५% ग्रोथ आहे.

नेट प्रॉफिट Rs ९५१६ कोटी झाले. ही YOY १७.३०% ग्रोथ आहे. GRM ( ग्रॉस रिफाईनिंग मार्जिन) US $ ९.५ /BBL होते. हे GRM गेल्या तिमाहीपेक्षा कमी (US $१०.५०/BBL ) आणि YOY( US $१२/BBL) ही कमी होते. EBITDA Rs २११०८कोटी होते. ही YOY ३५.६% ग्रोथ आहे. इतर उत्पन्न ३०% ने कमी होऊन Rs १२५० कोटी होते.
पेट्रोकेमिकल्स विभागाचे उत्पन्न YOY ५६.२% वाढून Rs ४३७४५ कोटी झाले. EBIT Rs ८१२० कोटी होती.
रिलायन्स जियोचे सब्सक्राइबर्स २५ कोटींपेक्षा जास्त झाले. या तिमाहीत ३.७ कोटी सब्सक्राइबर्स वाढले. ARPU प्रती सब्सक्राइबर प्रती महिना Rs १३१.७० होता. रिलायन्स जियोचे नेट प्रॉफिट Rs ६८१ कोटी होते.
रिलायन्स रिटेलने चांगली प्रगती केली. उत्पन्न Rs ३२४३६ कोटी होते. EBIT Rs १२४४ कोटी होते. रिलायन्स रिटेल ची ९१४६ स्टोर्स आहेत.
हा लक्षणीय बिझिनेस परफॉर्मन्स पेट्रोकेमिकल्स बिझिनेस मधील व्हॉल्युम आणि मार्जिन मधील वाढीमुळे आणि रिटेल आणि डिजिटल बिझिनेस मधील चांगल्या हातभारामुळे शक्य झाला .
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हाथवे मधील ५१.३४% स्टेक Rs २९४० कोटींना खरेदी करेल. हाथवे रिलायन्स इंडस्ट्रीजला ९०.८० कोटी शेअर्स Rs ३२.३५ प्रती शेअर या भावाने ( CMP वर १०% प्रीमियमवर) प्रेफरन्स शेअर्स जारी करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड Rs २२९० कोटी खर्च करून डेन नेटवर्क्सया कंपनीमध्ये ६६.०१% स्टेक घेणार आहे. यामध्ये Rs २०४५ कोटी प्रेफरन्स इशूद्वारे तर Rs २४५ कोटींचे शेअर्स वर्तमान प्रमोटर्स कडून खरेदी केले जातील.
या दोन्ही कंपनीत ओपन ऑफर आणली जाईल.
हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाहीतला परफॉर्मन्स उत्कृष्ट म्हणावा लागेल.

HAPPY 6th BIRTHDAY TO YOU – ‘मार्केट आणी मी ‘

Guru Purnima 2014

HAPPY BIRTHDAY TO YOU

मार्केट आणि मी हे माझे बाळ आता मोठे झाले. चांगले ६ वर्षाचे झाले. मला खूप उचंबळून येत आहे. २०१२ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपण एवढा मोठा प्रवास करू असे वाटले नव्हते.

‘मार्केट आणि मी’ चा शिल्पकार माझा मुलगा सुरेंद्र आणि मदतनीस प्रकाश फाटक, माझी मुलगी स्वरश्री आणि माझी सून किरण, माझे जावई अमेय जोगळेकर यांच्या मदतीशिवाय हा पल्ला गाठणे अशक्य होते.

त्याचबरोबर माझ्या ब्लॉगच्या वाचकांनी, हितचिंतकांनी नव्या नव्या गोष्टी करण्यास उत्तेजन दिले त्यांची मी शतशः आभारी आहे. वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच माझ्या पुस्तकाचा म्हणजेच ‘मार्केट आणि मी’ चा जन्म झाला, ‘गोवन वार्ता’, ‘मनी प्लस’, ‘चारचौघी’, ‘माझी वहिनी’, या मासिकात, वर्तमानपत्रात लिखाण करू शकले. ‘नवशक्ती’ मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने आलेल्या लेखाने याची पोचपावती मिळाली.

असेच आपण उत्तेजन देत रहा. पण नुसते उत्तेजन देऊन भागणार नाही. चुकांमधून शिकता शिकता भरपूर पैसे मिळवा. एक साखळी तयार करा. तुम्हीही मोठे व्हा इतरांनाही मार्केट करायला मदत करा. मार्केटविषयीचे गैरसमज दूर करा. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ‘

भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट