Category Archives: Weekly market review

आजचं मार्केट – ८ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ ९५.२० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.६० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८२ VIX १९.३२ होते.

SBI ची क्रेडिट ग्रोथ १५.८% झाली आहे. व्यवस्थापनाने सांगितले की ही क्रेडिट ग्रोथ FY २३ मध्ये चालू राहील.नॉन इंटरेस्ट उत्पन्न ८०% कमी झाले. सरकारी सेक्युरिटीजमध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर बॉण्ड यिल्ड वाढल्यामुळे मार्क टू मार्केट लॉसेस बुक करावे लागले. जर नजीकच्या भविष्यात बॉण्ड यील्ड वाढले तर आणखी प्रोव्हिजन करावी लागेल आणि बॉण्ड यिल्ड कमी झाले तर मार्क टू मार्केट लॉसेस कमी होतील. रिटेल लोनमध्ये १८% ग्रोथ झाली.स्लीपेजिस कमी झाले आहेत आणि नजीकच्या भविष्यात कमी होतील असे व्यवस्थापनाने सांगितले.स्लीपे जिस Rs १०११६ कोटी झाली. स्लीपेजिसमध्ये Rs २५०० कोटी ऍग्री आणि Rs २५०० कोटी रिटेलमधील आहेत. २२ तिमाहीचा विचार करता सगळ्यात कमी ग्रोथ डिपॉझिट्समध्ये झाली. बँकेकडे Rs १२०००० कोटींची लोन प्रस्ताव आहेत आणि अनयुटिलाइझ्ड क्रेडिट गॅप आणि इतर फॅसीलीटीज चा समावेश करता Rs ६००००० कोटींची ग्रोथ अपेक्षित आहे.

कॉर्पोरेट क्रेडिटमध्ये ग्रोथ होईल ‘योनो’ लोनमध्ये FY २३ मध्ये Rs ८०००० कोटी लोन दिली जातील असे अनुमान व्यवस्थापनाने सांगितले. SBI च्या कोणत्याही सबसिडीअरीजचा IPO आणण्याचा कोणताही विचार नाही.

NYKAA चे उत्पन्न Rs ११४८ कोटी प्रॉफिट Rs ५ कोटी आणि मार्जिन ४% झाले. GMV ४७% ने वाढून Rs २१५६ कोटी झाले. यात ब्युटी आणि पर्सनल याचा यात ६९% शेअर आहे. ब्युटी आणि पर्सनलच्या ८१ लाख ऑर्डर्स मिळाल्या.. फॅशन साठी १५ लाख ऑर्डर्स मिळाल्या. कंपनीची ११२ स्टोर्स झाली आहेत.

आज बँका, एनर्जी, कॅपिटल गुड्स आणि संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदी झाली
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८८५३ NSE निर्देशांक निफ्टी १७५२५ बँक निफ्टी ३८२३७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ ९४.२० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.२० च्या आसपास होते US $ निर्देशांक १०६.६७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८१ तर VIX १९ होते.

बँक ऑफ इंग्लंडने त्यांच्या दरात ०.५०% वाढ केली आता रेट १.७५ % आहे.

USA मध्ये मंकीपॉक्स संबंधित आणीबाणी जाहीर झाली.

१२ लाख टन साखरेच्या अतिरिक्त निर्यातीला सरकारने परवानगी दिली.

आज RBI ने त्यांच्या द्विमासिक वित्तीय धोरणाची घोषणा केली. रेपोरेटमध्ये, SDF रेटमध्ये (स्टँडिंग डिपॉझिट रेट) आणि MSF (मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी) रेट मध्ये ०.५०% वाढ केली. बँकेने वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त केली. बँकांमध्ये चांगली क्रेडिट ग्रोथ आहे आणि समाधानकारक पावसामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहे असे RBI ने सांगितले.

HSIL ही कंपनी (आता नाव AGI ग्रीनपॅक असे नाव बदलले आहे ). ही कंपनी ग्लास पॅकेजींग व्यवसायात असून मार्केट शेअर २०% आहे. ही कंपनी ग्लास कंटेनर साठी मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्यांबरोबर काम करते. मल्टी फ्युएल वापरते. क्रूडचा दर वाढला, रशिया युक्रेन युद्धामुळे एनर्जीच्या किमती वाढल्या.पण कंपनीने ही दरवाढ ग्राहकांकडे पास ऑन केली . पण त्यावेळेला जर लॉन्ग टर्म कॉन्ट्रॅक्ट असते तर कंपनीला फायदा मिळाला असता. कंपनी आधी शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट करत होती पण आता ५ वर्षांचा करार करणार आहे .परदेशात कंझम्पशन पॅटर्न वेगळा आहे तर भारतातील वेगळा आहे. अल्कोहोलिक बिव्हरेजीसमध्ये सरकारचा टॅक्स ६०% असतो.भारतातील कन्झम्पशन पॅटर्न बदलेला नाही. फूड, बिव्हरेजीस, सॉफ्ट ड्रिंक मध्ये ग्रोथची संभावना आहे.नवीन युनिटमध्ये परफ्युम कॉस्मेटिक्स कोल्ड ड्रिंक्स औषधे यासाठी लागणाऱ्या ग्लास पॅकेजिसचे उत्पादन करणार आहे कारण आता कोरोना पासून ग्राहकांची परफ्यूम्स कॉस्मेटिक्स औषधे ह्यांच्या हायजिनच्या बाबतीत जागरूकता वाढली. ग्राहक या मध्ये डेकोरेटेड बॉटल्स पसंद करतात.

डाबर ही कंपनी इजिप्त, नेपाळ, टर्की येथे कार्यरत आहे या मार्केट्समध्ये चांगले वातावरण आहे. वातावरण जरी आव्हानात्मक असले तरी मार्जिन मेंटेन करू शकेल. आमची स्थिती वेगळी आहे.

कोरोनाच्या काळात च्यवनप्राश मध यांची विक्री जास्त झाली. ज्यूसमध्ये मार्जिन कमी असते तर हेल्थकेअरमध्ये मार्जिन जास्त असते. उन्हाळ्यात ज्युसची तर हिवाळ्यात हेल्थकेअरप्रॉडक्टस ची विक्री जास्त होते. नॉर्थ अमेरिकेत जास्त ग्रोथ होऊ शकली नाही. खोबरेल तेल, टूथ पेस्ट, यांची विक्री चांगली. च्यवनप्राश मध यात मार्केट शेअर वाढला. १ लाख खेड्यात आम्ही व्यवसायाचा विस्तार करत आहोत. असे कंपनीने सांगितले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८३८७ NSE निर्देशांक निफ्टी १७३९७ बँक निफ्टी ३७९२० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ ९७.१० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१ = ७९.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.३८ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७२ VIX १९.०० होते.

KEC इंटरनॅशनल ह्या कंपनीला FY २०२२-२३ या वर्षात Rs ३२०० कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या. या वर्षी प्रोजेक्ट एक्झिक्युशन मध्ये वेग आला आहे. कंपनीकडे Rs ७००० कोटींच्या L १ ऑर्डर आहेत. आता एकूण टोटल ऑर्डर बुक Rs ३०,००० कोटी आहे. कंपनीला बहुसंख्य ऑर्डर्स सौदी अरेबिया आणि इतर मध्य पूर्वेतील देश, आफ्रिका आणि उत्तर अमेरिका (मेक्सिको) मधून येतात. रेल्वे आणि सिविल, रेसिडेन्शियल, औद्योगिक त्यात सिमेंट मेटल्स आणि मायनिंग उद्योगातील आणि पब्लिक सेक्टरमधून वॉटर पाईपलाईन प्रोजेक्टच्या ऑर्डर्स मिळतात. हल्ली आफ्रिकेत स्लोडाऊन असल्यामुळे तेथून ऑर्डर्स येणे कमी झाले आहे.

कंपनीने डाटा सेंटरच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. संरक्षण मंत्रालयासाठी बनवलेले डाटा सेंटर संरक्षण मंत्रालयाला सुपूर्द केली आहे. डेटा सेंटर्सच्या व्यवसायात Rs ७०० ते Rs ८०० कोटींच्या ऑर्डर्स अपेक्षित आहेत.

कंपनीला कोरोना निर्बंधांच्या काळात फिक्स्ड प्राईस प्रोजेक्ट घ्याव्या लागल्या यात मार्जिन कमी असायचे. आता परिस्थिती बदलली आहे. मेटल्स आणि इतर कच्च्या मालाच्या किमती कमी होत आहेत त्यामुळे तिसया तिमाहीत फायदा आणि मार्जिन वाढण्याची शक्यता आहे.

धानुका एग्रीटेक ह्या कंपनीचे एप्रिल मे महिन्यात विक्रीत चांगली ग्रोथ झाली पण जून मधील विक्री जुलैमध्ये बदली झाली. दुसऱ्या तिमाहीत विक्री वाढेल असा कंपनीला विश्वास आहे. इन्सेक्टीसाईड्स मध्ये विक्री थोडी कमी झाली असली तरी हमिसाईड्समध्ये चांगली ग्रोथ दिसली. कंपनीने दोन नवीन प्रोडक्टस लाँच केली आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनी Rs १५० कोटी क्षमता विस्तारावर खर्च करेल. कंपनीच्या प्रॉडक्टसची विक्री पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात होते. उत्तर भारतात आता विक्रीत चांगली वाढ होत आहे. आता उत्पादनखर्चात घट होत आहे पण त्याचा परिणाम खरीप हंगाम संपल्यावरच दिसू शकेल.

इनॉक्स लिजरने सांगितले की आम्ही तिकिटांच्या दरात वाढ केली आहे. पहिल्या तिमाहीत चांगले मुव्हीज प्रसिद्ध झाले तसेच कोविड संबंधीत निर्बंध उठल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. आम्ही येत्या वर्षात ५० ते ६० मल्टी स्क्रीन चालू करू. PVR बरोबरचे मर्जर येत्या वर्षाअखेरीस पुरे होण्याची शक्यता आहे.आम्ही सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना पसंद पडेल अशी मल्टी स्क्रीनची रचना करत आहोत. विशेषतः तरुण वर्गाला चांगला अँबियन्स पाहिजे असतो तर सिनियर सिटिझन्सला स्वस्त दर पाहिजे असतात. तर काही प्रेक्षकांना चांगले मुव्हीज बघायचे असतात. असतात.या कारणामुळे वेगवेगळ्या वेळेच्या शोजसाठी वेगवेगळे दर ठेवले आहेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ( BEL) या कंपनीने तुमच्याजवळ असलेल्या १ शेअरमागे २ बोनस शेअरची घोषणा केली.

उद्या सकाळी १० वाजता RBI चे गव्हर्नर RBIचे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करतील.

आज बँका, रिअल्टी, पॉवर आणि साखर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. अस्वस्थ जिओपॉलिटिकल वातावरण, RBI ची पॉलिसी यामुळे मार्केट सावधानता बाळगून होते. मेटल्स , फार्मा आणि IT क्षेत्रातीळ शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२९८ NSE निर्देशांक निफ्टी १७३८२ बँक निफ्टी ३७७५५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ १००.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.३४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७२ VIX १९ होते.

युक्रेन आणि USA यांच्यातील तणावांवरून लोकांचे लक्ष आता तैवान कडे गेले आहे. नॅन्सी पेलोसीने चीनची तमा न बाळगता तैवानला भेट दिली. याचा चीनला राग आला. तैवान चिप उत्पादनात आघाडीवर असल्यामुळे तैवान वर आपला ताबा असावा असे चीन आणि USA दोघांनाही वाटते. चीनने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पण नॅन्सी पेलोसीने त्याला दाद दिली नाही.

अशा वातावरणातच आजचे मार्केट सुरु झाले.पण भारताच्या दृष्टीने कमी झालेला क्रूडचा दर हे वरदान आहे. आणि थोडीशी भौगोलिक परिस्थितीची धाकधूकही आहे. म्हणून मार्केट आज तेजी मंदीचे झोके घेत होते.आता बाय ऑन डिप्स हि व्यूह रचना मार्केटच्या दृष्टीनी योग्य ठरेल.

FII ने Rs ८२५ कोटींची खरेदी तर DII ने Rs ११८ कोटींची खरेदी केली.

ब्रिगेड ही दक्षिण भारतात प्रामुख्याने बिझिनेस असणारी रिअल्टी क्षेत्रातील कंपनी आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या कमजोर निकालाच्या पार्श्वभूमीवर आज ब्रिगेडचे निकाल उठून दिसले. कंपनीने पाहिल्य तिमाहीत विक्री कमी झाली कारण नवीन लाँच कमी केले. गृहकर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजदरात केल्या जाणाऱ्या वाढीमुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होईल पण त्याचे प्रमाण कमी असेल. दक्षिण भारतात IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक घरे खरेदी करत आहेत. गेल्या ४-५ वर्षात घरांच्या किमतीत म्हणण्यासारखी वाढ झाली नाही. पण आता डेव्हलपरकडे प्राइसिंग पॉवर येत आहे. घर खरेदीदार डेव्हलपरचा घरांच्या डिलिव्हरीजचा इतिहास पाहतो. ब्रिगेडने आता VACANT प्लॉट लाँच केले आहेत. आमच्याकडे १८ मिलियनची इन्व्हेन्टरी आहे त्यापैकी ४.५ मिलियनची घरे विकली गेलेली नाहीत. त्यामुळे आता कंपनी ९.५ मिलियन चे नवीन लाँच करत आहेत. हे नवीन लाँच बंगलोर, चेन्नई, हैदराबादमध्ये करत आहेत.कोरोनाच्या काळात लोकांनी मोठी घरे पसंत केली आणि त्यामुळे कंपनीचे प्रीमियम प्रोजेक्ट विकले गेली. बंगलोर आणि चेन्नईमध्ये घरांचा मागणी आणि पुरवठा मॅचिंग आहेत.

जमिनीच्या किमती वाढत आहेत. पण डेव्हलपर जमीन मालकाबरोबर वाटाघाटी करून जमिनीची किंमत थोडीफार कमी करू शकतो.

६५% ते ६८% विक्री मिडइन्कम सेगमेंट मध्ये होते.
वोल्टसचे पहिल्या तिमाहीचे निकाल कमजोर आले. वोल्टासच्या व्यवस्थापनाने गेल्या वेळेला सांगितले होते की आमचा मार्केट शेअर वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष निकालाकडे होते. पण आज आलेल्या निकालांवरून असे जाणवते की वोल्टासकडे प्राइसिंग पॉवर नाही. मार्केट शेअर वाढवण्याच्या मोहिमेमध्ये त्यांना त्यांचे मार्जिन गमवावे लागले आहे.

इंडस टॉवरचा शेअर सुधारत नाही कारण त्यांचे दोन क्लायंट आहेत त्यांच्या कडून पेमेंट वेळेत मिळत नाही. आणि त्यांच्यातले एक क्लायंट ‘VI’ असण्याची शक्यता आहि. या आधी Rs ५४७ कोटींची प्रोव्हिजन करावी लागली होती. आता नेट प्रॉफिटच्या २०% एवढी प्रोव्हिजन करावी लागेल. कर्जाचा बोजा वाढतो आहे .5Gसाठी भांडवली गुंतवणूक करावी लागली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे सोडवणूक कधी होईल हे सांगता येत नाही.

E -CLERKS ९ ऑगस्टला बोनस इशूवर विचार करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८३५० NSE निर्देशांक निफ्टी १७३८८ बँक निफ्टी ३७९८९ वर बंद झाली.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ ९९.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७८.७० च्या आसपास होते US $ निर्देशांक १०५.५९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.५५ VIX १८ होते. आज FII ने Rs २३२० कोटींची खरेदी तर DII नी Rs ८२२ कोटींची विक्री केली.

कन्साई नेरॉलकचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. १६% ते १७% शेअर वर होता. कंपनीच्या मालाला मागणी चांगली आली. चिप शॉर्टेज कमी झाले. डेकोरेटिव्ह इंडस्ट्रिअल सेगमेंट आणी इंडस्ट्रियल ऑटोमोटिव्ह सेगमेंटमध्ये मागणी वाढली. गेल्या वर्षी निगेटिव्हिटी होती या वर्षी त्याचे रूपांतर पॉझिटिव्हिटीमध्ये झाले आहे. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्यामुळे उत्साह जाणवतो आहे. सप्टेंबर २०२२ नंतर ग्रामीण भागातून किंवा TIER II आणि TIER III शहरातून मागणी येईल. आणि पूर्वीच्या मानाने जास्त मागणी येईल. डबल डिजिट व्हॉल्युम ग्रोथ होईल. सध्या तरी लँड मॉनेटायझेशनचा कोणताही विचार नाही. वॉटर बेस्ड पेन्ट्समध्ये मार्जिन चांगले असते मागणीही जास्त असते त्यामुळे याची विक्री वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सध्या आमच्या उद्योगात ५०% भाग वॉटर बेस्डपेंट्स चा तो प्रयत्नांनी २% ते ३% वाढू शकतो. यावेळेला दिवाळी ऑक्टोबरमध्ये असल्यामुळे फेस्टिव्ह सीझनचा कालखंड कमी उपलब्ध असेल.

झोमॅटो :- आज झोमॅटोचा शेअर चांगलाच तेजीत होता. झोमॅटोच्या निकालात सुधारणा दिसली. तोटा कमी झाला उत्पन्न वाढले पण व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही रिस्ट्रक्चरिंग करणार आहोत. प्रत्येक विभागासाठी वेगळ्या CEO ची नेमणुक केली जाईल त्यामुळे कारभारावर अधिक चांगले लक्ष देता येईल. झोमॅटोचे नाव सुद्धा बदलणार आहोत. आता ‘इटर्नल’ असे नाव दिले जाईल. ब्लिंकिंटच्या अक्विझिशनमध्ये काहीही चूक झालेली नाही. अक्विझिशनच्या बाजूने चांगले मतदान झाले होते.
रूट मोबाईलचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले. या तिमाहीत कंपनीने USA आणि यूरोपमध्ये ३-४ कंपन्या खरेदी केल्या. या कंपन्या वेगवेगळ्या देशात असल्यामुळे आणि त्यांचे एक्स्पेर्टाइझ वेगवेगळ्या क्षेत्रात असल्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येते.कंपनी सध्या बँकिंग आणि फायनान्स, ट्रॅव्हल,एव्हिएशन या क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे आता ग्राहकाच्या संख्येत चांगली वाढ होईल. कंपनीने मेक्सिको EQUADOR , आणि सौदी अरेबियात कामकाज सुरु केले आहे. कंपनी मार्केट आणि प्रोडक्ट यांच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. FY २३ मध्ये ५०% ग्रोथ होईल असे कंपनीचे अनुमान आहे.

रुपया सुधारला आणि क्रूडचा भाव कमी झाला. USA आणि एशियन मार्केट्स मंदीत होती. पण आपल्या मार्केट मध्ये निराशा जाणवली नाही. बँकांमध्ये तेजी होती.रिअल्टी IT मेटल्स मध्ये प्रॉफिट बुकिंग आणि ऑटो आणि FMCG, कॅपिटलगुड्स, पेंट्स कंपन्या एशियन पेंट्स बर्जर पेंट्स , पॉवर युटिलिटी कंपन्या पॉवर ग्रीड टॉरंट पॉवर KEC,NHPC NTPC मध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८१३६ NSE निर्देशांक निफ्टी १७३४५ बँक निफ्टी ३८०२४ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १ ऑगस्ट २०२२

आज क्रूड US $ १०३ प्रती बॅरल्स तर रुपया US $१= Rs ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.६० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.६६ VIX १७.५० होते.भारताचा मॅन्युफॅक्चरिंग PMI जुलै २०२२ साठी ५६.४ ( ५३.९ ) झाला.

५ ऑगस्ट २०२२ रोजी RBI आपले द्वी मासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.

जुलै महिन्यात GST कलेक्शन १.४९ लाख कोटी एवढे झाले.

जुलै महिन्यात ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले. फक्त ट्रॅक्टर्सची विक्री कमी झाली.

बहुतेक कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BEL ही संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी गुरुवार ४ ऑगस्ट २०२२ रोजी बोनस इशूवर विचार करेल.
5G स्पेक्ट्रमच्या लिलावाचा आज आठवा दिवस. टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी या लिलावाला भरभरून प्रतिसाद दिला. सरकारला Rs १,५०,१३० कोटींच्या बीड्स मिळाल्या.

मेट्रो ब्रॅंड्सचे पहिल्या तिमाहिचे निकाल चांगले आले. ही तिमाही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम होते. सगळ्या कॅटेगोरीत ग्रोथ दिसली कंपनीचे ५ ब्रँड आहेत. मेट्रो, मोची, वॉकवे CORCS, फ्लीटफ्लॉफ, DAVINCHI, CHEEMO. त्यांच्या स्वतःच्या ब्रॅंड्समध्ये त्यांची ७५% हिस्सेदारी तर दुसर्याच्या ब्रँडमध्ये २५% स्टेक आहे. त्यांनी नवीन २० स्टोर्स उघडली. फ्लीटफ्लॉप चे एक वेगळे स्टोअर उघडले. त्यांचे SQFEET उप्पन्न Rs ४७०० वरून Rs ५७०० झाले. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमची इन्व्हेन्टरी वाढवली त्याचा आम्हाला फायदा मिळाला. कच्च्या मालाच्या किमती वाढवल्या त्यामुळे आम्ही आमच्या प्रॉडक्टसच्या किमती वाढवल्या.त्यामुळे आम्हाला चांगले मार्जिन मिळाले. आम्ही डेड इन्व्हेन्टरी क्रीएट करत नाही. २५० व्हेंडर आहेत. त्यांना आम्ही कोणत्या क्वालिटीचा कच्चा माल वापरायचा आहे हे सांगतो त्यामुळे क्वालिटी चेक मजबूत होतो या सगळ्यामुळे Rs १० कोटी तोटा होता त्याचे रूपांतर Rs १०३ कोटी फायद्यात झाले. ज्या कंपनीचा शेअर १३% डिस्काऊंटवर लिस्टिंग झाला होता तोच शेअर आज जवळजवळ २०% तेजीत होता.

RITES ही रेल्वे क्षेत्रातील प्रामुख्याने कन्सल्टन्सी बिझिनेस क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी या बरोबरच टर्नकी प्रोजेक्ट आणि निर्यात बिझिनेस मध्ये कार्यरत आहे.कंपनीला या तिमाहीत Rs ७०० कोटींच्या ९० नवीन ऑर्डर्स मिळाल्या. त्यामुळे ऑर्डर बुक Rs ५१०० कोटींचे झाले. नवीन ऑर्डर्स या कन्सल्टन्सी क्षेत्रातील आहेत. सर्वसाधारण या ऑर्डर्स ३ महिने ते १ वर्षात पूर्ण केल्या जातात. त्यांना घाना कडून Rs ९७ कोटी आणि गुआनाकडून Rs २५ कोटींची ऑर्डर मिळाली. टर्नकी प्रोजेक्ट त्यांच्या एकूण बिझिनेसच्या २५% ते ३०% एवढा असतो. राईट्स निर्यातही करते लोकोमोटिव्हज, कोचेसची निर्यात करते. आतापर्यंत Rs ३५० कोटी एवढी निर्यात झाली आहे. कंपनी वंदे भारत ट्रेन्स निर्यात करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे वाटाघाटी करत आहेत. चांगल्या परिस्थितील कंपनी अडचणीत येऊ शकते तर अडचणीत असलेल्या कंपन्यांची आर्थीक परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे प्रत्येक तिमाही निकालांच्या वेळेस कंपनीची परिस्थिती बघून त्याप्रमाणे आपल्या पोर्टफोलिओमध्ये बदल करावा.
आज ऑटो एनर्जी मेटल्स, बँका आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८११५ NSE निर्देशांक निफ्टी १७३४० बँक निफ्टी ३७९०३ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जुलै २०२२

आज क्रूड US $ १०६.९० प्रती बॅरल तर रुपया US $१= ७९.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७० VIX १६.७६ होते.

आज श्रावणातील पहिला दिवस. मार्केटनेही कात टाकली का ? मंदीचे सावट कमी झाले का
कधी कधी निकाल चांगले येऊनही शेअर पडतो. कधी निकाल कमजोर असतात पण शेअर वाढतो. काही गोष्टी कळतात, कधी अभ्यास कमी पडतो, कधी सामान्यांना काही गोष्टी समजत नाहीत, कधी अंदरकी बात असेल!असे म्हणतो. अशा काही गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न करायचा माझा मानस आहे. जेणेकरून कंपन्यांची माहिती मिळवणे हे कठीण न वाटता आनंददायी वाटेल आणि काही दिवसांनी तुम्ही स्वतः होऊन कंपन्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न कराल

मूलभूत गोष्टींची माहिती कंपन्यांच्या कॉन्फरन्स कॉल मधून समजत असते. अशी माहिती मी तुमहाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण लाल पाथ लॅब DB कॉर्प, सोना कॉमस्टार यांची माहिती घेणार आहोत.

लाल पाथ लॅबच्या व्यवस्थापनाने सांगितले की आमचा मार्केटिंगवर खर्च जास्त झाला.आम्ही किमती कमी केल्या नाहीत. आम्ही स्पर्धा किंवा प्राईस वॉरच्या भानगडीत पडणार नाही. स्पर्धा टिकाऊ नसते. प्रमोशनल असते तेव्हा ठीक असते. नॉन कोविड रेव्हेन्यू वाढला आहे. स्पर्धेचा परिणाम रुटीन चेक अपच्या किमतीवर थोडा जाणवत आहे.
DB कॉर्पने सांगितले की आम्ही सब्स्क्रिप्शन रेट वाढवू शकत नाही.Rs ४ किमतीच्या वर्तमानपत्राचा दर Rs ५ करू शकतो तेथे आम्हाला किंमत वाढवायला जागा नाही. आम्ही रोज ६०० विडिओ चालवतो. यावेळी एक्स्टेंडेड दिवाळी साजरी होईल. सरकार प्रिंट मेडियावरचा टॅक्स कमी करण्याची शक्यता आहे. वर्तमानपत्राची क्रेडिबिलिटी खूप आहे. त्यामुळे आम्हाला भविष्यातील ग्रोथबद्दल विश्वास आहे.

सोना कोयो चे उत्पन्न वाढले. गेल्या २ वर्षांपासून इंडस्ट्री ( ऑटो सेक्टर) अडचणीत आहे. फ्रेट रेट कमी होतील. स्टील तांबे यांच्या किमती कमी होतील.
त्यामुळे मार्जिन सुधारेल. २ व्हीलरमध्ये रेव्हेन्यू सुधारला आही . २०२१ ते २०२२ मध्ये CAGR ३६% ग्रोथ झाली.

दीपक फर्टिलायझर्स चे प्रॉफिट उत्पन्न मार्जिन वाढले.
स्ट्राइड्स फार्माचा तोटा कमी झाला उत्पन्न वाढले.
मोरेपन लॅब प्रॉफिट उत्पन्न कमी झाले.

LT फूड्स उत्पन्न वाढले प्रॉफिट वाढले.

टिप्सचे उत्पन्न प्रॉफिट वाढले, मार्जिन कमी झाले.
अशोक लेलँड तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न Rs २९५१ कोटींवरून Rs ७२२३ कोटी झाले. Rs २८२ कोटी लॉसचा Rs ६८ कोटी फायदा झाला.

सन फार्मा चे प्रॉफिट वाढून Rs २०६० कोटी उत्पन्न वाढून Rs १०७६२ कोटी, मार्जिन कमी होऊन २६.८% होते.

मोतीलाल ओसवाल, IIFL सिक्युरिटीज यांचे निकाल कमजोर आले. वेस्टलाईफ डेव्हलपमेंट, डाटामाटिक्स, एकसाईड चे निकाल चांगले आले.
महिंद्रा लॉजिस्टकचे, रूट मोबाईलचे, GE शिपिंगचे, असाही इंडियाचे, SBI लाईफचे, सुंदरम क्लेटनचे निकाल सुंदर आले.

HDFC प्रॉफिट Rs ३६६८ कोटी, NII Rs ४४६५ कोटी झाले. NPA कमी झाले. फायनान्स कॉस्ट वाढली.

TTK प्रेस्टिज ने त्यांच्या प्रॉडक्टसच्या किमती १% ने वाढवल्या.

आज इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजचे गांधीनगर गिफ्ट सिटीमध्ये उद्घाटन केले जाईल. या एक्स्चेंजमुळे व्हॉल्युम वाढतील आणि प्राईस डिस्कव्हरी चांगली होईल. सोन्याच्या गुणवत्तेचा आणि सोर्सचा भरोसा असेल. गोल्डमधे ९९९ प्युरिटीच्या गोल्डमध्ये ट्रेडिंग होईल. फिझिकल गोल्ड, डिजिटल गोल्ड किंवा कोणत्याही चलनात पैसे मिळतील. सोने रिएक्सपोर्ट करता येईल. काही दिवसांनी प्राईस सेट होईल . या एक्स्चेंमध्ये सिक्युरिटी ट्रान्सक्शन टॅक्स आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत असेल. बँकांचा मध्यस्थ म्हणून रोल संपेल.

युरोझोनचा जुलै २०२२ चा CPI ८.९% होता
९ ऑगस्टला ग्रनुअल्सची शेअर बायबॅकवर विचार करर्ण्यासाठी बैठक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५७५७० NSE निर्देशांक निफ्टी १७१५८ बँक निफ्टी ३७४९१ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जुलै २०२२

आज क्रूड US $ १०७.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.८०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.७९ VIX १८ होते.

फेडने अपेक्षेप्रमाणे ०.७५% एवढी दरवाढ केली. बेंचमार्क रेट २.२५% ते २.५०% एवढा असेल. फेडने असे सांगितले की अर्थव्यवस्था आता रिसेशन मध्ये नाही आणि नजीकच्या भविष्यात रिसेशनमध्ये जाण्याची शक्यता नाही.यापुढील काळात व्याजाचे दर वाढवायचा वेग एवढा राहील असे नाही. हा वेग परिस्थितीप्रमाणे कमी सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत ४ वेळा व्याजाचे दर वाढवले आहेत. पण विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की महागाई २०२४ पर्यंत २% होण्याची शक्यता नाही.आता फ्रंट लोडींग ची गरज नाही. जसा डेटा असेल त्याप्रमाणे दरवाढ करू. या वर्षात यानंतर ३ वेळा ०.५०% दरवाढ केली जाईल.

चीनमधून आयात होणाऱ्या पॉलीएस्टर यार्न वर अँटी डम्पिंग ड्युटी बसवली.

पुढील ८ आठवडे स्पाईस जेट फक्त ५०% विमाने चालवू शकेल. DCGA ने हा निर्णय घेतला.

FII ने Rs ४३७ कोटींची विक्री तर DII ने Rs ७१२ कोटींची खरेदी केली.

EIH तोट्यातून फायद्यात आली, महिंद्रा लाईफ तोट्यातून फायद्यात आली.

नोव्हार्टीस, शेफलर, ELANTAS,ब्ल्यू डार्ट, पुनावाला फिनकॉर्प, बजाज होल्डिंग डिक्सन टेक्नॉलॉजी,धामापूर शुगर, VIP, बायोकॉन, CMS इन्फो, लक्ष्मी ऑरगॅनिक यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

नेस्लेचे उत्पन्न वाढले, फायदा कमी झाला, मार्जिन २०.३% राहिले.

लॅटेन्ट व्ह्यू, युनायटेड बिव्हरेजीस ( प्रॉफिट, मार्जिन कमी झाले), JK सिमेंट, आरती ड्रग्स, वेलस्पन इंडिया, निप्पोन लाईफ यांचे निकाल कमजोर होते.
एक्साइडने बंगलोरमध्ये लिथियम -ION बॅटरीसाठी करार केला.

महाराष्ट्र सरकारने स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा ‘GENUS POWER ‘ या स्मार्ट मीटर बनवणाऱ्या कंपनीला होईल.

साखरेच्या ८ लाख टन अतिरिक्त निर्यातीला सरकारकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारने सांगितले की क्रूडचा भाव कमी झाला तर विंडफॉल टॅक्स लावणार नाही.

सरकार मार्केटमधून बॉरोइंग करणार नाही.

IIBX चे उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ६४ ज्युवेलर फर्म्स नी रजिस्ट्रेशन केले आहे.

बजाज फिनसर्व ने १:१ बोनस आणि १ शेअरचे ५ शेअर्समध्ये स्प्लिट जाहीर केले. फायदा Rs १३०९ कोटी ( Rs ८३३ कोटी) आणि उत्पन्न Rs Rs १५८८८ कोटी ( Rs १३९४९ कोटी ) YOY वाढले.
DB कॉर्प तोट्यातून फायद्यात आली.

ज्युबिलण्ट फूड्स Rs ११२ कोटी नफा ( Rs ६९ कोटी ), उत्पन्न Rs १२५५ कोटी एवढे झाले.

श्री सिमेंट्स चे उत्पन्न वाढले फायदा आणि मार्जिन कमी झाले.

रामको सिमेंटचे उत्पन्न वाढले फायदा कमी झाला.

भारत सीट्सचे उत्पन्न फायदा मार्जिन वाढले.

KPR मिल्स प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.

ओरिएंट सिमेंट उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले.

नोसिल प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.

GHCL, NIIT, अपार इंडस्ट्रीज यांचे निकाल चांगले आले

M & M फायनान्स तोट्यातून फायद्यात आली.

RITES, आवास हाऊसिंग, जमुना ऑटो यांचे निकाल चांगले आले.

DR रेड्डीज चे प्रॉफिट Rs ३८० कोटींवरून Rs ११९० कोटी झाले.उत्पन्न Rs ४९५० कोटींवरून Rs ५२३० कोटी झाले निकाल चांगले आले.

रोलओव्हर खालीलप्रमाणे झाले.
डिव्हीज लॅब ९२%, श्री सिमेंट ९२%, JK सिमेंट ९१%, पॉलिकॅब ९०%, INFOEDGE ९४%, अडाणी पोर्ट ९४%, IRCTC ९३%, IPCA लॅब ९३%, JSW स्टील ९३% SBI कार्ड्स ९०%, पीडिलाइट ९३%, बाटा ९३% . कोलगेट ९५%
ज्युबिलण्ट फूड्सनी एक योजना आखली आहे. पिझ्झा ऑर्डर केला तर पॉईंट मिळतात. ६०० पॉईंट जमा झाल्यावर एक पिझ्झा फुकट मिळतो.
PNB हौसिंग, श्रीराम ट्रान्सपोर्ट यांचे निकाल चांगले आले.

आज मार्केटमध्ये मध्ये चौतर्फ़ा खरेदी झाली. फेडने मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे ०.७५% वाढ केली तसेच केंद्र सरकारने विंडफॉल टॅक्स क्रूडचे भाव कमी झाल्यास कमी/ रद्द करण्याची तयारी दाखवली. तसेच फेडने नजीकच्या भविष्यकाळात त्यांचे धोरण लवचिक ठेवण्याची तयारी दाखवली. त्यामुळे मार्केट आज तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५६८५७ NSE निर्देशांक निफ्टी १६९२९ बँक निफ्टी ३७३७८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जुलै २०२२

आज क्रूड US $ १०३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७९.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८० तर VIX १८.१२ होते.

आज फेडच्या FOMC मीटिंग मध्ये काय निर्णय झाला तो कळेल. फेड ०.७५% दर वाढवणार आहे मार्केटने गृहीत धरले आहे. पण या पेक्षा जास्त दर वाढ करण्याचे फेडनी ठरवले तर सोने चांदी यात मंदी येईल. तसेच USA मधील जॉबलेसच्या आकड्यांकडेही लक्ष ठेवणे जरुरी आहे.

रशियाने नैसर्गिक गॅसच्या पुरवठ्यात कपात केल्यामुळे आणि USA UK आणि यूरोपमध्ये विजेची मागणी वाढत असल्यामुळे नैसर्गिक गॅसच्या किमती वाढल्या.

FII ने Rs १५४८ कोटींची विक्री तर DII ने Rs ९९९ कोटीची खरेदी केली.

आज बर्याच कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल आले. KEI, शॉपर्स स्टॉप, रिलॅक्सो, एथॉस, गुजरात फ्लुओरो, कोरोमंडेल, CG पॉवर लौरास लॅब यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

मारुती चे प्रॉफिट Rs १०१२ कोटी उत्पन्न २६५५० कोटी तर मार्जिन ७.२% राहिले.

अँपकॉटेक्स चा फायदा वाढला उत्पन्न वाढले.

APL अपोलो ट्यूब चे उत्पन्न वाढले प्रॉफिट आणि मार्जिन कमी झाले.

वॉटर बेसचे नफा उत्पन्न कमी झाले.

बजाज फायनान्सचा फायदा Rs २५९६ कोटी, ग्रॉस NPA आनि नेट NPA कमी झाले.

JK लक्ष्मी सिमेंटचे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले.
सरकारने BSNL आणि MTNL च्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग करण्याची जाहीर केले. त्यासाठी १.६४ लाख कोटींचे पॅकेज मंजूर केले. त्या आधी BSNL आणि BBNL ( भारत बँड नेटवर्क लिमिटेड)यांचे मर्जर होईल. सरकार या कर्जासाठी सरकारी गॅरंटी असलेले ३ वर्षे मुदतीचे बॉण्ड्स इशू करेल. यासाठी आकारली जाणारी गॅरंटी फी माफ केले जाईल.

टाटा मोटर्सला Rs ५०१० कोटी तोटा झाला ( Rs ४४५० कोटींवरून) उत्पन्न Rs ६६४०० कोटींवरून Rs ७१९३० कोटी झाले.कंपनीला Rs १५०० कोटी वन टाइम गेन झाला.

EPL, AB सनलाईफ, सनोफी, साऊथ इंडियन बँक यांचे निकाल कमजोर आले.

विप्रोने नोकियाबरोबर करार केला.

सरकारने स्पेक्ट्रमसंबंधीत अटी सोप्या केल्या होत्या. त्यामुळे लिलावात कंपन्या उत्साहाने भाग घेत आहेत. Rs १ लाख ८५००० कोटींचे बिडिंग झाले. ONGC ने रिन्यूएबल एनर्जीसाठी ग्रीनको झेरॉक बरोबर करार केला.

पिरामल एंटरप्रायझेसला नॉन डिपॉझिट टेकिंग NBFC बिझिनेससाठी RBI कडून परवानगी मिळाली.

भारत सरकारने संरक्षण सामुग्रीसाठी Rs २८७३२ कोटींची खरेदी करण्याचे ठरवले आहे यात स्वर्ण ड्रोन, कार्बाइन्स, बुलेटप्रूफ जॅकेट्स यांचा समावेश आहे.
मिश्र धातू निगम बुलेट प्रूफ जॅकेट पुरवते. DCM ड्रोनचे उत्पादन करते. झेंनटेक अँटी ड्रोन सिस्टीम बनवते. बेलही ही सामुग्री बनवते.

चिकन आणि अंड्यांच्या किमती ५०% आणि ३०% ने कमी झाल्या.

Paytm या कंपनीविरुद्ध रेग्युलेटरी ऍक्शन घेतलेली आहे.

लॉस मेकिंग ग्रोथ कंपन्या व्याजाचे दर वाढत असताना अडचणीत येतात.

Paytm कंपनीचे फयद्याचे क्षेत्र कोणते याबाबतीत गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळ आहे.

Paytm ओळीने ४ तिमाही तोट्यात आहे. या तिमाहीत Rs ७६१ कोटी तोटा झाला आहे.

सॅनोफी या कंपनीचे निकाल कमजोर आले. नेहेमी Rs ४०० च्या आसपास लाभांश असतो त्याचे प्रमाण कमी झाले.

टाटा पॉवरचे निकाल दिसतात चांगले पण फ्युएल कॉस्ट मध्ये वाढ झाल्यामुळे प्रत्यक्षात तसे नाहीत.
आज कोलगेटचे निकाल आले. फायदा कमी झाला उत्पन्न वाढले

THANGMAYAL ज्वेलरी ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

क्लीन सायन्सेसचे उत्पन्न वाढले फायदा वाढला.
भारत फोर्जने तैगा इंडस्ट्रीबरोबर हाय स्पीड पॅसेंजर ट्रेन उत्पादनासाठी करार केला. कोकूयू कॅम्लिन तोट्यातून फायद्यात आली.

GENESIS इंटरनॅशनल यांनी गूगल बरोबर ‘स्ट्रीट व्हू’ लाँच करण्यासाठी करार केला.

GAIL या कंपनीने तुमच्या जवळ असलेल्या २ शेअर्समागे १ बोनस शेअर इशूची घोषणा केली.

आज फार्मा IT रिअल्टी, पेपर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५८१६ NSE निर्देशांक निफ्टी १६६४१ आणि बँक निफ्टी ३६७८३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जुलै २०२२

आज क्रूड US $ १०७.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७९.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०६.३९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड २.८० VIX १८.०७ होते.

FII ने Rs ८४५ कोटींची तर DII नी Rs ७२ कोटींची विक्री केली.

USA मध्ये महागाई वाढली लोकांची विशेषतः ऐच्छिक खरेदी कमी झाली.

वॉलमार्टचे निराशाजनक निकाल म्हणजे समाजाच्या सद्य मनःस्थितीचे दर्शन घडवतात. वॉलमार्टने प्रॉफिट वार्निंग दिली . जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेले मंदीचे सावट जगातील सर्व अर्थव्यवस्थाना भेडसावत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने बरीच जुळवून घेण्याची क्षमता दाखवली असली तरी त्यामुळे मार्केटचा कमाल स्तर कमी राहील.

चीनने रिअल इस्टेटसाठी US $४४ बिलियनचा फंड बनवला आहे. याचा फायदा स्टील आयर्नओअर कंपन्यांना होईल.

USA मध्ये रेड बुक जाहीर होईल त्यात USA मधील SSS (सेम स्टोर्स सेल्स ग्रोथ ) समजेल.

रशियन गॅस कंपनी GAZPROM नी आणखी एक गॅस टरबाइन बंद केली त्यामुळे नॉर्द स्ट्रीम १ याची क्षमता २० % पुरवठा करण्याएवढी उरेल. त्यामुळे जर्मनी आणि युरोपला गॅसचा पुरवठा कमी होईल. उद्यापासून ३३मीटर क्युबिक /दिवस गॅसचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे गॅसच्या भावांत तेजी त्याचप्रमाणे USA मध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.

LIC ने सनफार्मा मधील स्टेक ७% वरून ५ % केला.
हिरो मोटो कॉर्प कॅनव्हास ब्लॅक एडीशनच्या अंतर्गत सुपर स्प्लेंडर लाँच करणार आहे.

येत्या ५ ऑगस्ट २०२२ RBI त्यांचे द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.

टाटा स्टील कलिंगनगर PALLET युनिटमध्ये ऑक्टो-NOV दरम्यान कामकाज सुरु करेल.
बजाज फिंनसर्व २८जुलै २०२२ च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये शेअर स्प्लिट आणि बोनस शेअर्सवर विचार करणार आहे.

हट्सन ऍग्रो ३ राज्यात दुधाचे कलेक्शन वाढवेल.

ल्युपिनच्या ‘AZILSARTAN MEDOXOMIL’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. ह्या औषधाचे नागपूर प्लांटमध्ये उत्पादन होते

एडेलवेइस क्रॉसओव्हरफंडाने SAPPHIRE फूड्स मधील सुमारे Rs २८० कोटींचा स्टेक ब्लॉक डील माध्यमातून विकला.

सोनाटा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरने ३ शेअरवर १ बोनस शेअर इशू जाहीर करेल.

क्राफ्ट्समन ऑटोमेशन, सोनाटा सॉफ्टवेअर, चेन्नई पेट्रो, शांती गियर, जिंदाल ड्रिलींग, जिंदाल स्टेनलेस स्टील , IIFL वेलथ ( Rs १५ लाभांश) यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

IEX ,तेजस नेटवर्क, ऍझटेक लाईफसायन्सेस , तानला प्लॅटफॉर्म यांचे निकाल असमाधानकारक होते.

GSK फार्माचे मार्जिन वाढले. अडवाणी हॉटेल्स तोट्यातून फायद्यात आली .

इंडियन मेटल्स चा फायदा वाढला उत्पन्न वाढले
रामको सिस्टिम्सचा तोटा वाढला उत्पन्न कमी झाले.
सिम्फनीचे उत्पन्न आणि फायदा वाढला.

युनियन बँकेचे ग्रॉस NPA आणि नेट NPA कमी झाले. प्रॉफिट वाढले.

KPIT टेक प्रॉफिट आणि उत्पन्न वाढले.

एशियन पेंट्सचे प्रॉफिट Rs १०१७ कोटी तर उत्पन्न Rs ८५७९ कोटी झाले. मार्जिन १७.८% राहिले.

बजाज ऑटो चे प्रॉफिट Rs ११६३ कोटी उत्पन्न Rs ८००५ कोटी आणि मार्जिन १६.८% राहिले.

EIH असोसिएट ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्नात चांगली वाढ झाली.

ग्रीन लॅम चा फायदा उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक तोट्यातून फायद्यात आली.

TCS ने ऑस्ट्रेलियात एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन साठी AMO बरोबर करार केला.

इन्फोसिस सिंगापूरमध्ये व्यवसायाचा विस्तार करेल.
पाम ऑइलचे भाव आणि सनफ्लॉवर ऑईलचे भाव कमी झाले. नजीकच्या भविष्यात ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

इंडिया रेटिंगने IDBI चे लॉन्ग टर्म रेटिंग A वरून A + केल

TTK हेल्थकेअर चे निकाल चांगले आले. कंपनीला Rs ७६४ कोटी वन टाइम उत्पन्न झाले.

डायनामिक केबल्सचे NSE वर बुधवारी लिसिंग होणार आहे

ONEWEB ने त्यांच्य सॅटेलाईट ऑपरेटर EUTELSAT बरोबर MOU केले.

आज ऑटो, IT, मेटल्स प्रॉफिट बुकिंग झाले.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ५५२६८ NSE निर्देशांक निफ्टी १६४८३ बँक निफ्टी ३६४०८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!