Category Archives: Weekly market review

आजचं मार्केट – १३ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८२.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.२७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.७४ आणि VIX १६.२७ होते.

SVB ( सिलिकॉन व्हॅली बँक) ही टेक स्टार्ट अप वर फोकस करत होती. या बॅंकेत झालेल्या घडामोडिंचा भावनिक परीणाम जास्त पण आर्थीक परिणाम फारसा होणार नाही. कारण SVB बँकेच्या प्रकरणात फेड ने हस्तक्षेप केला. बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे आज पासून काढता येतील. SVB नी Paytm आणि नजारा टेकमध्ये पैसे घातले होते. पण आता Paytm मध्ये त्यांची गुंतवणूक नाही.

FII नी Rs २०६१.४७ कोटींची विक्री केली तर DII नी Rs १३५०.१३ कोटींची खरेदी केली.

जानेवारी २०२३ साठी IIP चे आकडे ५.२% आले( ४.३% )

इंडसइंड बँकेचे CEO सुमंत कठपालिया यांची RBI ने पुन्हा २ वर्षांसाठी MDCEO म्हणून नेमणूक केली.

अडाणी ग्रुपने US $ २.१५ बिलियनचे कर्ज प्रीपेड केले आणि US $ ५०० मिलियनच्या ब्रिज लोनचे रिपेमेन्ट केले. अडानी ग्रुपचा अंबुजा सिमेंट या कंपनीत ६३% स्टेक आहे. ४% ते ५% स्टेक अडाणी ग्रुप विकणार आहे. या विक्रीतून US $ ४५० मिलियन मिळतील. आणि कर्ज कमी होईल.

गेटवे डिस्ट्रिपार्क या कंपनीत HDFC म्युच्युअल फंडाने वेगवेगळ्या योजनेतून २.०२% स्टेक ८ मार्चला खरेदी केला. त्यामुळे या फंडाचा कंपनीमधील स्टेक ७.१०% झाला.

लॉईड मेटल आणि एनर्जी या कंपनीला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून ३ मिलियन टन्स प्रती वर्ष एवढे आयर्न मायनिंग वाढवायला परवानगी दिली.

ल्युपिन या कंपनीच्या विशाखापट्टणम API मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या ६ मार्च ते १० मार्च २०२३ दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

टेक महिंद्राचे MDCEO म्हणून मोहित जोशी यांची नेमणूक होईल.

ICICI बँकेचा ICICI लोम्बार्ड मध्ये असलेला ४८.२% स्टेक ३०% पर्यंत कमी करण्यासाठी RBI कडून ९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून मिळाली.

वेलस्पन कॉर्पच्या वेलस्पन मेटालिक्स या सबसिडीअरीला २ महिन्यात ४३ KMT पिग आयर्न साऊथ ईस्ट एशिया आणि यूरोपमध्ये निर्यात करण्यासाठी ऑर्डर मिळाली.

लुमॅक्स ऑटो ने तिच्या सबसिडीअरीमार्फत ७५% स्टेक IAC इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया मध्ये घेतला.

शिल्पा मेडिकेअरच्या हैदराबाद मधील ७ नंबरच्या युनिटच्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

सोना BLW मधील २०% स्टेक ‘ब्लॅकस्टोन’ने ६% डिस्काऊंटवर Rs ३२०० कोटींच्या ब्लॉक डीलमध्ये विकला.

झायड्स लाईफच्या ‘OLENZAPINE’ या औषधाला USFDA ची परवानगी मिळाली.

गोदरेज प्रॉपर्टीज ने बंगलोरमध्ये २८ एकर जमीन खरेदी केली.

महिंद्रा CIE मध्ये आज मोठे ब्लॉक डील झाले.
SAIL ही कंपनी १६ मार्च रोजी लाभांशावर विचार करेल.

GMDC ने ओडिशा मधील कोळशाच्या दोन कमर्शियल खाणींसाठी सर्वात जास्त बोली लावली.

६ ‘डॉर्नियर २२८’ एअरक्राफ्ट विक्रीसाठी भारतीय एअरफोर्स बरोबर HAL ने Rs ६६७ कोटींचा करार केला.

SBI चा येस बँकेत २६.१४ % स्टेक आहे.

मॉलकॉमने गुजरात सरकारबरोबर Rs १०८.२२ कोटींचा करार केला.

LIC ने DR रेड्डीज मध्ये २% स्टेक खरेदी केला. आता LIC चा स्टेक ९.६९% झाला.

M & M ने महिंद्रा CIE मधील ६.१% स्टेक विकला.

आज बँकिंग, ऑटो, रिअल्टी, इन्फ्रा, FMCG, IT, मेटल सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८२३७ NSE निर्देशांक निफ्टी १७१५४ बँक निफ्टी ३९५६४ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १० मार्च २०२३

आज क्रूड US $ ८१.६१ प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.०० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.२६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.८० आणि VIX १३.५७ होते.

USA मध्ये SVB (सिलिकॉन व्हॅली बँक) फायनान्सियल्स चा शेअर ६० % पडला तर सिल्व्हर गेट कॅपिटलचा शेअर ४२% पडला. सगळ्या बँकांचे शेअर्स पडले. JP मॉर्गन ६% पडला. जॉबलेस क्लेम २१००० ने वाढले. सातत्याने रेट वाढत असल्याने लोन डिफॉल्टची शक्यता वाढत आहे. HDFC बँकेच्या, विप्रोच्या ADR मध्ये घट झाली. आज USA चे नॉन फार्म पेरोलचे आकडे येतील.

USA ची मार्केट्स पडल्यामुळे जगभरातील मार्केट्समध्ये पडझड झाली.

FII नी Rs ५६१.७८ कोटींची विक्री तर DII नी ४२.४१ कोटींची खरेदी केली.

अडानी पॉवरमध्ये राजस्थान, महाराष्ट्र, उडुपी, रायगड रायपूर मुंद्रा येथील सबसिडीअरी मर्ज केल्या
रिलायन्सने कॅम्पाकोला लेमन आणि ऑरेंज अशा २ फ्लेव्हरमध्ये लाँच केला.

महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकात ATF वरील VAT चार्ज २५% वरून १८% केला. तसेच महिलांना १ % स्टॅम्पड्युटीमध्ये सवलत दिली.

IRB इन्फ्राचे टोल कलेक्शन २७% ने वाढून Rs ३५२ कोटी झाले.

ग्लेनमार्क फार्माची १६ मार्चला अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

NBCC ला Rs २२९ कोटीची ITFT ( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन ट्रेंड ) साठी काकीनाडा येथे नवीन कॅम्पस बनवण्यासाठी वर्क ऑर्डर मिळाली.
ड्रेजिंग कॉर्प ला सदर्न नेव्हल कमांड कोची कडून Rs ६४ कोटीचे मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

PNC इंफ्राटेक Rs २००४ कोटींच्या हायवे प्रोजेक्टसाठी लोएस्ट बीडर ठरली. हे कॉन्ट्रॅक्ट २४ महिन्यात पूर्ण करायचे आहे. आणि नंतर १५ वर्षे ऑपरेट करायचे आहे.

झायड्स लाईफच्या एरिथ्रोमायसिन टॅब्लेट्स साठी USFDA ची मंजुरी मिळाली या टॅब्लेट्ससाठी USA मध्ये US $ २.५१ कोटींचे मार्केट आहे.

थरमॅक्सने ग्रीन हैड्रोजन प्रोजेक्टसाठी ‘FORTESCUE फ्युचर इंडस्ट्रीज’बरोबर करार केला.

अजंता फार्मा Rs १४२५ प्रती शेअर या दराने टेंडर ऑफर रूटने २२१०५०० शेअर्स बायबॅक करण्यासाठी Rs ३१५ कोटी खर्च करेल.

KNR कंस्ट्रक्शनला Rs ६५० कोटीच्या हायवे प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाली.

NEOJEN ने बुलि केमिकल्स ही कंपनी खरेदी केली.NEOJEN च्या व्यवस्थापनाने सांगितले की ऑरगॅनो लिथियम चे उत्पादन करणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.NBUTILE लिथियमचा वापर फार्मा आणि ऍग्रो केमिकल्स मध्ये होतो. हे केमिकल बनवणार्या फार थोड्या कंपन्या आहेत. या खरेदीमुळे NEOJEN ला स्ट्रॅटेजीक बेनिफिट होईल.

‘VI’ ने Rs १५१ कोटी म्हणजे ३०% फी सरकारला दिली. अजून सरकारला Rs १३५० कोटी द्यायचे आहेत. हे देण्यासाठी कंपनीने २५ मार्चपर्यंत मुदत मागितली. VI ने स्पेक्ट्रम युसेज चार्जेस साठी Rs २७ कोटी सरकारला दिले.

टाटा पॉवरने ५१० MW हायब्रीड प्रोजेक्टसाठी टाटा पॉवर BGL बरोबर पॉवर पर्चेस अग्रीमेंट केले.
मार्कसन फार्माच्या ‘FAMOTIDINE’ ला USFDA ची मंजुरी मिळाली.

भारतात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे. अर्जेन्टिनामध्ये दुष्काळ पडल्यामुळे सोयाबीन मका आणि गहू यांच्या पिकांवर प्रतिकूल परीणाम झाला आहे.

भारत आणि USA मध्ये सेमीकंडक्टर सप्लाय साठी करार झाला. आज सरकारने भारताला कार्गो हब बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सरकारच्या सूचनेनुसार १३ मार्च २०२० रोजी बँकांनी येस बँकेत ३ वर्षांसाठी गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीचा लॉकइन पिरियड १३ मार्च २०२३ रोजी पूर्ण होत असल्यामुळे YES बँकेच्या शेअर्समध्ये विक्री येण्याची शक्यता आहे.

पॉलिकॅब मध्ये मोठे ब्लॉक डील होण्याची शक्यता असल्याने शेअर पडला.

HAL ने Rs २० अंतरिम लाभांशाची घोषणा केली. या अंतरिम लाभांशासाठी २० मार्च रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

स्वान एनर्जी हा स्मॉल कॅप शेअर आज ९% वाढला. त्यांनी त्यांचे FRSU (फ्लोटिंग स्टोअरेज रिगॅसिफिकेशन युनिट) व्हेसल तुर्कीये सरकारच्या बोटास या कंपनीला Rs८०० कोटी वार्षिक भाड्याने दिले.

उज्जीवन financial services नी ५ रुपये लाभांश दिला

आज एनर्जी तेल आणि गॅस सेक्टरमध्ये खरेदी झाली. बाकी सर्व सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९१३५ NSE निर्देशांक निफ्टी १७४१२ आणि बँक निफ्टी ४०४८५ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ९ मार्च २०२३

आज आज क्रूड US $ ८२.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८१.८० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.५४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९९ तर VIX १२.५३ होते.

आज USA मधील मार्केट फेडचे अध्यक्ष पॉवेल यांच्या आक्रमक पवित्रा सुचवणाऱ्या विधानांमुळे मंदीत होती.टर्मिनल रेट ५.४८ वरून ५.६९ झाला .
बँक ऑफ कॅनडाने त्यांचे दर ४.५% वर कायम ठेवले.
चीनमधील महागाई निर्देशांक २.१% वरून १% झाला.

US फेडच्या २०-२१ मार्चच्या बैठकीत होणारी संभाव्य दरवाढ, US $ निर्दशांक आणि बॉण्ड यिल्डस मधील वाढ यामुळे सोने , चांदी, आणि बेस मेटल्स मंदीत होते. भारताच्या कापूस उत्पादनात १३ लाख बेल्स ची घट होईल असा अंदाज आहे.

येस बँकेने आधार हाऊसिंग फायनान्स बरोबर CO-LENDING करार केला.

युनायटेड फार्मर्स इन्व्हेस्टमेन्टने दावत फूड्स मध्ये ५६ लाख शेअर्स खरेदीचा व्यवहार पूर्ण केला.
HFCL ने मायक्रोसॉफ्ट बरोबर प्रायव्हेट 5G पार्टनर नेटवर्क सोल्युशन्सच्या कॉन्व्हर्जन साठी अग्रीमेंट केले

गोदरेंज अग्रोव्हेटने Rs १०० कोटींची गुंतवणूक करून आंध्र प्रदेशात खाद्य तेल रिफायनरी सुरु करण्यासंबंधीत आंध्र प्रदेश राज्य सरकारबरोबर करार केला.

GR इन्फ्राला Rs १२४८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
सोनाटा सॉफ्टवेअरने ‘SINEQUA ‘ बरोबर एंटरप्राइज सर्च सोल्युशनसाठी करार केला.

रेलिगेअर एंटरप्रायझेस ने Rs ४०० कोटी फुल आणि फायनल सेटलमेंट म्हणून १६ कर्जदारांना द्यायचे कबुल केले.

FII नी Rs ३६७१ कोटींची खरेदी केली तर DII नी Rs ९३७.८० कोटींची विक्री केली.

रामकृष्ण फोर्जिंगने RKEL इंजिनीअरिंग इंडस्ट्री या नावाने सबसिडीअरी स्थापन केली

SEQUENT सायंटिफिक ने तिनेटा फार्ममध्ये १०० % शेअर होल्डिंग घेणार होते. पण आता ही योजना रद्द केली.

भारत फोर्ज हे चाकण येथे ६०००० युनिट उत्पादन क्षमतेची E -बाईक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरु करणार आहे

शॉपर स्टॉप या कंपनीने जपानमधील कंपनी SHISEIDE बरोबर डिस्ट्रिब्युशनसाठी करार केला.
डेटा पॅटर्सनी Rs ४५० कोटींचा QIP लाँच केला.
गोकुळदास एक्स्पोर्टमध्ये ४% डिस्काऊंटवर म्हणजे Rs ३९० प्रती शेअर फ्लोरं प्राईसवर Rs २६४ कोटींचे ब्लॉक डील झाले.

हिंद रेक्टिफायर्स च्या नाशिक प्लांटमध्ये उत्पादन सुरु केले.

L & T टेक ने म्हैसूर मध्ये ऑटोमोटिव्ह सोल्युशन सेंटर उघडले.

आज हनीवेल ऑटोमेशन कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की त्यांची कंपनी इंटिग्रेटेड ऑटोमेशन सेवा पुरवते आणि सॉफ्टवेअर सेवा पुरवते. भारतात डिजिटल स्पेस आणि इंफ्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारी आणि खाजगी गुंतवणूक होत आहे.

सरकारने भारताला जगाचे फार्मा कॅपिटल बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फार्मा उद्योगात उत्पादन स्टोअरेज मध्ये ऑटोमेशनला चांगला वाव आहे. लॉजिस्टिक्स यामध्ये रेल्वेज, विमानतळ, हवाई प्रवास, रिअल्टी मध्येही ऑटोमेशनला वाव आहे. सरकारच्या वेगवेगळ्या PLI स्कीमखाली नवीन फॅक्टरीज बनत आहेत. काही जुन्या फॅक्टरीजचे ऑटोमेशन होत आहे. त्यामुळे भारतात US $ १००० कोटींचे सध्या मार्केट आहे आणि येत्या तीन वर्षात ते दुप्पट होईल. कंपनी ऍक्सेस कंट्रोल, बिल्डिंग मॅनेजमेंट, कंट्रोल पॅनल, इलेक्ट्रिकल वायरिंग आणि फायर लाईफ सेफ्टी आणि सेन्सर या क्षेत्रात ऑटोमेशन सेवा पुरवते.

हेल्थकेअर, फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्येही ऑटोमेशनला वाव आहे. ऑटोमेशन उद्योगाला महागाई आणि मंदी येण्याची शक्यता आणि सेमीकंडक्टर चिप्सची टंचाई हे प्रश्न पुढे आहेत.

कंपनी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंग सेक्टरमध्येही ऑटोमेशन सेवा पुरवते. कंपनीने सांगितले की ऑटोमेशन सेवांसाठी भारतात मागणी वाढत आहे.

BOSCH ह्या कंपनीने EV सेक्टरमध्ये Rs २००० कोटी ते Rs ३००० कोटी गुंतवणूक करून डबल डिजिट मार्केट शेअर घेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी हायड्रोजन पॉवर ट्रेन्स, २ व्हीलर, ४ व्हीलर, बसेस या क्षेत्रातही प्रवेश करण्याची शक्यता आहे.

तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये ३१ मार्च २०२३ पर्यंत नॉमिनेशन केले नाही तर तो फ्रीझ केला जाईल.

GE शिपिंगने ANCHOR हँडलिंग TUG कम सप्लाय व्हेसलची डिलिव्हरी घेतली.

आज ऑटो, FMCG, रिअल्टी मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८०६ NSE निर्देशांक निफ्टी १७५८९ बँक निफ्टी ४१२५६ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ८ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८३.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.१० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.६६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९८ आणि VIX १२.७२ होते.

फेडचे चेअरमन पॉवेल यांनी सांगितले की फेडची रेट हाईकची पॉलिसी हायर, फास्टर आणि दीर्घ मुदतीची असेल. या त्यांच्या विधानानंतर ओल्ड इकॉनॉमी शेअर्स पडले. डाऊ जोन्स ५७५ बेसिस पाईंट्स पडले सोने ५% पडले. फार्माच्या किमती निश्चित करतील करांच्या दरांमध्ये वाढ करतील.

भारतात आज काही ठिकाणी धुळवडीची/ रंगपंचमीची सुट्टी आहे.त्यामुळे आज volume कमी असेल

FII नी Rs ७२१.३७ कोटींची तर DII नी Rs ७५७.२३ कोटींची खरेदी केली.

अलकार्गो लॉजिस्टिक्स कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स बीझिनेस मधील ३८.८७ स्टेक Rs ३७३ कोटींचा आहे.खरेदी करणार आहे. यामुळे त्यांचा स्टेक १००% होईल. कॉन्ट्रॅक्ट लॉजिस्टिक्स आणि एक्स्प्रेस डिस्ट्रिब्युशन मध्ये सिनर्जी निर्माण होईल. नॉन कोअर कस्टम्स क्लीअरन्स बिझिनेस Rs ४२ कोटींना विकणार आहे. यात कंपनीचा ६१.१३% स्टेक आहे . कंपनीने Rs ३.२५ इंटरीम लाभांश जाहीर केला.

IGL ने जिनसीस गॅस सोल्युशन्स बरोबर JV केले. १ मिलियन स्मार्ट मीटर उत्पादन क्षमता असलेला प्लांट Rs ११० कोटी गुंतवणूक करून सुरु करणार आहे. या प्लांटमध्ये एप्रिल २०२४ पासून उत्पादन सुरु होईल.

अजंता फार्मा १० मार्च २०२३ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

KPI ग्रीन ने २० वर्षांसाठी हायब्रीड पॉवर पर्चेस अग्रीमेंट १.८४५ MWAC क्षमतेचा इंडिपेन्डन्ट पॉवर प्रोड्युसर सेगमेंटच्या अंतर्गत जामनगरमधील गॅरीसन इंजिनीअर बेस बरोबर केले.

NBCC कंपनीला ३ कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट Rs ५४१ कोटींचे मिळाले. जम्मू काश्मीर मध्ये Rs २१७.२७ कोटी आणि ओडिशा मधील भुवनेश्वर मध्ये Rs ३०० कोटींची काँट्रॅक्टस मिळाली.
लुमॅक्स ऑटो च्या बोर्डने लुमॅक्स इंटिग्रेटेड व्हेंचरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट कडून Rs २५० कोटी कर्ज किंवा क्रेडिट फॅसिलिटी मिळवण्यासाठी मंजुरी दिली.

सन फार्माने कॉन्सर्ट फार्मा या बायोफार्मास्युटिकल कंपनीचे अक्विझिशन पूर्ण केले.

अडानी ग्रुपने सांगितले की तारण म्हणून ठेवलेले सर्व शेअर्स ते सोडवणार आहेत. आता त्यांनी Rs ७३७४ कोटींचे तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

श्री राम फायनान्सची सबसिडीअरी श्री राम हाऊसिंग फायनान्स मध्ये BEARING स्टेक घेण्याची शक्यता आहे. या कंपनीत सध्या मॉरिशस च्या फंडाचा स्टेक आहे.

श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील द्वारा १.१८ कोटी इक्विटी शेअर्समध्ये Rs १४४८ कोटींचे ( ३.१६% स्टेक) ब्लॉक डील झाले.

वर्धमान स्पेशल स्टिल्स आणि टोयोटा ग्लोबल सप्लाय ह्या दोन कंपन्या स्टीलचे mass scale उत्पादन करण्यासाठी एकत्र येत आहेत.

नाटको फार्माच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने Rs ७०० प्रती शेअर या दराने ३० लाख शेअर्स ओपन मार्केटमधून बायबॅक करण्यासाठी Rs २१० कोटींचा शेअर बायबॅक मंजूर केला.

इंडस इंड बँकेच्या CEO सुमंत कंठपालिया यांचा कार्यकाल २४ मार्च २०२३ रोजी संपत आहे. त्यांना RBI कडून ३ वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

आज जिंदाल स्टेनलेस स्टील आणि JSL ( हिस्सार ) यांच्या मर्जरची रेकॉर्ड डेट आहे.

PVR ने ११ स्क्रीनवाला नवीन मल्टिप्लेक्स चेन्नईमध्ये सुरु केला.

SBI लाईफची आज लाभांशावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक झाली २ रुपये ५० पैसे . लाभांश दिला १६ march record date आहे

TCS मार्क्स आणि स्पेन्सर बरोबर US $ १ बिलियनची डील पूर्ण करणार. BSNL ला ४G साठी इक्विपमेंट पुरवणार.TCS साऊथ आफ्रिका, सौदी अरेबिया, आणि UAE मध्ये सर्वात जास्त कर्मचारी नेमणारी कंपनी ठरली.

पॉवर ग्रीडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने Rs ४०७१ कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी दिली.

कुर्नुलमध्ये Rs ४०७१ कोटी आणि इस्टर्न रिजन एक्स्पान्शन स्कीम मध्ये Rs ५२४ कोटींची गुंतवणूक करणार.

हिरोमोटो कॉर्प ने ‘XTEC’ ची नवीन रेन्ज लाँच केली.

साखरेच्या किमती जागतिक पातळीवर ६ वर्षांच्या कमाल स्तरावर आहेत. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. एप्रिलमध्ये सरकार साखरेचा निर्यातीसाठी कोटा वाढविण्याची शक्यता आहे.

ज्युबिलांत फूड वर्क्सनी POPEYES स्टोर्स चेन्नईमध्ये सुरु केले, आणि बंगलोरमध्ये फ्राईड चिकन मार्केटमध्ये विस्तार केला. त्यामुळे ज्युबिलण्ट फुड्सचे टार्गेट वाढवले.

ब्ल्यू स्टारने AC ची नवीन रेंज लाँच केली.

एप्रिलच्या द्वैमासिक वित्तीय धोरणात RBI व्याजाचे दर वाढविण्याची शक्यता आहे.

कृष्णा डायग्नॉस्टिक्स १०० कलेक्शन सेंटर उघडणार आहे.

आज मार्केट एका छोट्या रेंजमध्ये फिरत होते. साखर उत्पादक कंपन्या, एनर्जी सेक्टरमधील कंपन्यात खरेदी झाली आणि हॉटेल्समध्ये खरेदी झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०३४८ NSE निर्देशांक निफ्टी १७७५४ बँक निफ्टी ४१५७७ वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ६ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८५.३० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८१.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.५६ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९५ आणि VIX १२.१८ होते.

आज मार्केटमध्ये वातावरण चांगले आहे. फेडच्या ऑफिसर्सची वक्तव्ये आणि अडाणी ग्रुपची सुधारलेली परिस्थिती यामुळे मार्केट मध्ये सकारात्मक दृष्टिकोन दिसून येत आहे.

२२ मार्च रोजी फेड आपले वित्तीय धोरण जाहीर करेल.

FII नी Rs २४६.२४ कोटी आणि DII नी Rs २०८९.९२ कोटींची खरेदी केली.

दूध आणि गहू हा ब्रिटानियाच्या कच्चा मालाच्या ४०% कच्चा माल आहे या दोन्हींचीही किंमत वाढल्यामुळे ब्रिटानिया या शेअरचे अनुमान कमी करण्यात आले आहे.

क्रूडवरील विंडफॉल टॅक्स Rs ४४०० प्रती टन ( Rs ५० प्रती टन वाढ ) डिझेलवरील ड्युटी Rs २ प्रती लिटर कमी करून Rs ०.५० प्रती लिटर केली. ATF वरील ड्युटी रद्द करण्यात आली.

बजाज इलेक्ट्रिकने साऊथ बिहार पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीकडून प्लांट प्रॉडक्ट आणि सप्लायसाठी Rs ५६५ कोटींचा करार केला.

NEOGEN ने BULI केमिकल्समध्ये १००% स्टेक खरेदी केला.

धर्मज कॉर्पचे प्रमोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत.

नाटको फार्मा ८ मार्च २०२३ रोजी शेअर बायबॅक वर विचार करेल.

चीनच्या ग्रोथ रेटचे अनुमान कमी केले याचा परिणाम स्टील आणि इतर मेटल्स आणि सामान्यतः मागणी वर होईल.

CAMS ने ‘थिंक ऍनालीटीकस’ मध्ये ५५.३० % स्टेक खरेदी केला.

संवर्धना मदर्सनने त्यांचा ‘SMS जर्सी’ मध्ये त्यांचा स्टेक वाढवल्यामुळे SMS जर्सी त्यांची सबसिडीअरी झाली

इन्फोएज ची सबसिडीअरी ‘रेड स्टार्ट लॅब’ ही सबसिडीअरी ‘SPLOOT’ मध्ये ५.२ कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी पेट पेरेंटिंग कम्युनिटी आणि कॉन्टेन्टलेड प्लॅटफॉर्म चालवते.

पॉवर ग्रीड छत्तीसगढ मधील इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम अंतर्गत दोन प्रोजेक्टसाठी BOOT बेसिसवर लोएस्ट बीडर ठरली.

महानगर गॅस UNISON ENVIRO ही कंपनी Rs ५३१ कोटींना खरेदीने करणार आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी लातूर आणि उस्मानाबाद हे आहाराष्ट्रातील आणि चित्रदुर्ग आणि दवणगेरे जिल्ह्यात PNGRB ऑथोराइज्ड सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपनी आहे. ही कंपनी अशोक बिल्डकॉन सबसिडीअरी आहे. ही खरेदी PNGRB मंजुरीअंतर्गत असेल.

कन्साई नेरोलॅक यांनी पॉलिजेलकडून नेरोफिक्स मधील ४०% स्टेक Rs ३७ कोटींमध्ये घेतला.

HAL ला Rs ५७० कोटींचा टॅक्स रिफंड मिळाला.

यात Rs १६३.६८ कोटी व्याजाचा समावेश आहे.

ओर्चीड फार्माच्या ओर्चीड बायो फार्मा ला PLI योजनेअंतर्गत ७ ACA चे उत्पादन करायला परवानगी मिळाली. म्हणून ओव्हरसीज टेक्नॉलॉजी प्रोव्हायडरशी MOU केले. लिंडे इंडिया ने रिन्यूएबल पॉवर कंपनी FPEL सूर्या मध्ये २६% स्टेक ‘ Rs ७.६९ कोटींची गुंतवणूक करून घेतला.

झायड्स लाईफला ‘VIGABATRIN’ च्या ओरल सोल्युशनसाठी USFDA कडून परवानगी मिळाली. हे औषध अहमदाबादला मोरय्या येथे बनवले जाईल.USA मध्ये या औषधाची विक्री US $ २३३.७ मिलियन आहे.

पंजाबच्या होशियारपूर प्लांटमध्ये सेन्च्युरी प्लायवूडने काम सुरु केले.

सुमिमोटो केमिकल्स ला गुजरात प्रदूषण नियंत्रण बोर्डाने प्लांट बंद करायला सांगितले.

ओलेकट्रा ग्रीन इलेक्ट्रीकला ५५० EV बसेस साठी Rs १००० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

भारती एअरटेलने 265 जिल्ह्यात 5Gसेवा लाँच केली.

बिर्ला सॉफ्टने कोईम्बतूर मध्ये नवीन डिलिव्हरी सेंटर लाँच केले.

किरि इंडस्ट्रीजच्या शेअरला वरचे सर्किट लागले कारण सिंगापुर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्टाने कंपनीच्या DYSTAR मधील स्टेकचे फायनल व्हॅल्युएशन US $ ६०३.८० मिलियन एवढे कन्फर्म केले.

१७ मार्च २०२३ रोजी भारत २२ मध्ये रीबॅलन्सिंग होणार त्यामुळे US $ २० मिलियन चा इंफ्लो येईल. यात पॉवर ग्रीड कोल इंडिया, NTPC या शेअर्सच्या वेटेजमध्ये वाढ होईल.

ITC, नाल्को, ऍक्सिस बँक, L & T, SBI या मध्ये आऊटफ्लो होईल.

अडानी पोर्ट आणि अडानी अडाणी टोटल यांचे रेटिंग स्टेबल वरून निगेटिव्ह केले.

टाटा मोटर्सची JLR UK विक्री ३३% ने वाढून १६७० युनिट झाली ( १२५३ युनिट )

रिअल्टी, PSU बँक, यांच्यात प्रॉफिट बुकिंग झाले.

FMCG, फार्मा मेटल या सेक्टरमध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ६०२२४ NSE निर्देशांक निफ्टी १७७११ बँक निफ्टी ४१३५० वर बंद झाले.

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – ३ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ८२.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०५ आणि VIX १२.१९ होते.

आज USA ची मार्केट्स तेजीत होती.आज सोने, चांदी, कॉपर, झिंक आणि अल्युमिनियम तेजीत होते.
आज FII ने Rs १२७७१ कोटींची खरेदी तर DII नी Rs २१२८.८० ची खरेदी केली.

पीडिलाइटने ‘जोवाट हॉट MEHT’ चे पीडिलाईटच्या प्लांटमध्ये उत्पादन आणि विक्री करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट केले.

HRC (हॉट रोल्ड कॉइल्स) च्या भावांत Rs २००० वाढ होणार आहे. याचा फायदा टाटा स्टीलला होईल.
‘शोभा’ मध्ये प्रमोटर्सची खरेदी सुरु आहे.

अर्जेन्टिनामध्ये मक्याचे (कॉर्नचे) उत्पादन खराब झाले. गुजरात अंबुजा एक्स्पोर्टला फायदा होईल.
एपरल्सची निर्यात खूप वाढली आहे. याचा फायदा गोकुळदास एक्स्पोर्ट ला होईल.

नॉर्थ अमेरिकेत क्लास ट्रक ची विक्री १०.१% ने वाढली. याचा फायदा भारत फोर्ज, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि GNA ऍक्सल्स यांना होईल.
अडाणी ग्रीनचा राजस्थानमधील जैसलमेर येथील चौथा विंड सोलर हायब्रीड पॉवर प्लांट ऑपरेशनल झाला.

M & M फायनान्सियल ची डिसबर्समेंट ५३% ने वाढून Rs ४१८५ कोटी झाली. कलेक्शन कार्यक्षमता ९७% झाली.

हॅपीएस्ट माइंड्स Rs १२५ कोटींचे १२५०० डिबेंचर्स इशू करणार.

HPCL ने डिबेंचर इशू द्वारे Rs १६५० कोटी उभारले.

नाटको फार्मा शेअर बायबॅकवर ८ मार्च रोजी विचार करेल.

‘टिटाघर वॅगन’ आणि BHEL यांचे कन्सॉर्शियम दुसरे लोएस्ट बीडर ठरले. वंदे भारत ट्रेन मेंटेन करणे आणि अपग्रेड करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट आहे.

MOIL चे मँगॅनीज ओअर चे उत्पादन १.३१ लाख टन तर विक्री १.३२ लाख टन झाली.

भारतात फॉक्सकॉन ही आयफोनचे उत्पादन करणारी कंपनी US $ ७० कोटींची गुंतवणूक करून प्लांट लावणार आहे.

आलेम्बिक फार्माने त्यांच्या गुजरातमधील ३ प्लांट संबंधित इम्पेअरमेंट चार्जीस Rs ११५० कोटी बुक केले.

PNGRB ने पाईप लाईन टॅरिफ चार्जेस ४१% वाढवायचा प्रस्ताव दिला. याचा फायदा GAIL ला होईल.

अडाणी ग्रुपच्या शेअर्स मध्ये ‘GQG पार्टनर्स’ ने Rs १५०१५ कोटींची ब्लॉक डील रूट ने खरेदी केली.

अडानी एंटरप्रायझेस, अडानी पोर्ट, अडानी ग्रीन, अडाणी टोटल, अडाणी ट्रान्समिशन अडानी विल्मर या शेअर्समध्ये खरेदी झाली.

भारताचा सर्व्हिस PMI ५९.४(५७.२) आणि कॉम्पोझिट PMI ५९.०० ( ५७.५) झाले.

कॅपलिन पाईण्टच्या ‘ROCURONIUM BROMIDE’ इंजेक्शनला USFDA ची मंजुरी मिळाली.

अडानी इंटरप्रायझेसला ओडिशामधील बरारा बॉक्साइट साईटसाठी LOI ( लेटर ऑफ इन्टेन्ट) मिळाले.

वेदांताची BARCLAYS, स्टॅंडर्ड चार्टर्ड, आणि JP मॉर्गन यांच्याशी कर्जासाठी बोलणी चालू आहेत.
PVR नी नालासोपारा येथे ५ स्क्रीनवाले मल्टिप्लेक्स सुरु केले.

पटेल इंजिनीअरिंगच्या JV ला Rs ६४० कोटींची ऑर्डर मिळाली. यात पटेल इंजिनीअरिंग चा हिस्सा Rs ५१२ कोटींचा आहे.

जॉन्सन पंप्स इंडिया लिमिटेड चे नवीन नाव WORTHINTON पंप्स इंडिया लिमिटेड ला मध्य प्रदेश जल निगम मर्यादित कडून Rs १२२५ कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाले.

महाराष्ट्रात लेमन ट्री हॉटेल्सने दोन प्रॉपर्टीजसाठी करार केला.

आज मेटल, रिअल्टी, इन्फ्रा, बँकिंग, एनर्जी, FMCG क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९८०८ NSE निर्देशांक निफ्टी १७५९४ बँक निफ्टी ४१२५१ वर बंद झाले..

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.४१ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ४.०१ तर विक्स १३.८ होते.

KNR कन्स्ट्रक्शन ला बंगलोर विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर on HAM आणि आंध्र प्रदेशात भारतमाला परियोजनेअंतर्गत ही योजना येते. या मध्ये MARRIPUDI ते SOMAVARAPPADU या सहा लेनसाठी लेटर ऑफ एक्सेप्टन्स मिळाले.
आयशर मोटर्सच्या एन्फिल्ड ३५० CC मध्ये विक्री २१% वाढली

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ला आयकर विभागाने Rs २३३३ कोटींची नोटीस पाठवली होती.आता ही टॅक्सची मागणी Rs १२२.६३ कोटी झाली.

सनटेक रिअल्टी ने प्रिमियम कमर्शियल बिल्डिंग BKC ५१ मधील २ लाख SQFEET एरिया २९ वर्षांसाठी लीजवर दिली. Rs ३०० प्रती स्क्वेअर फूट या दराने Rs २००० कोटी मिळतील.

HAL ही कंपनी १० मार्च २०२३ रोजी दुसऱ्या इंटरींम लाभांशावर विचार करेल. ७० HTT ४० ह्या बेसिक ट्रेनर एअरक्राफ्ट साठी Rs ६८२८ कोटींची ऑर्डर सरकारकडून मिळाली.

भारत फोर्ज ही कंपनी ३०७ ऍडव्हान्स TOWED आर्टिलरी गन सिस्टीम भारतीय लष्कराला सप्लाय करेल. या गन सिस्टिम्स चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात केल्या जातील.

वंदे भारत ट्रेनच्या अपग्रेडेशन साठी RVNL आणि ३ पार्टनर लोएस्ट बीडर ठरले आहेत. या प्रोजेक्टमध्ये २०० ट्रेन्ससेट आहेत आणि प्रत्येक ट्रेनसेट ची किंमत Rs १२० कोटी आहे.

हिरोमोटोची विक्री १०% ने वाढून ३.९४ लाख युनिट झाली. पण निर्यात मात्र ५५% ने कमी झाली.
बजाज फिनसर्व या कंपनीला म्युच्युअल फंड ऑपरेशन्स सुरु करायला सेबीनी मंजुरी दिली. बजाज फिनसर्व ऍसेट मॅनेजमेंट म्युच्युअल फंडासाठी AMC म्हणून काम पाहिल.त्यामुळे बजाज फिनसर्व म्युच्यअल फंड आता इक्विटी, DEBT, हायब्रीड, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेगमेंटमध्ये बरीच प्रोडक्टस लाँच करू शकेल.

ड्रीमफोक्स सर्व्हिसेस ‘विदसूर गोल्फ’ मध्ये ६०% इक्विटी स्टेक घेणार ही त्यांची सबसिडीअरी होईल. ड्रीमफोक्स सिंगापूरमध्येही सबसिडीअरी स्थापन करणार आहे.

कॉटनच्या किमती Rs ५०५३० प्रती BALE वरून Rs २९९१० प्रती BALE म्हणजे ४१% ने कमी झाल्या.तसेच चीनची अर्थव्यवस्था ओपन झाल्यामुले मागणी वाढली. यामुळे रूपा, डॉलर, लक्स, SP एपरल्स, किटेक्स गारमेंट्स, कपूर मिल्स, अरविंद, वर्धमान टेक्सटाईल्स, गोकुळदास, वेलस्पन यांच्यावर परिणाम होईल.

सुप्रीम कोर्टाने सांगितले की सेबीने अडानी ग्रुपच्या शेअर्ससंबंधीत चौकशी करावी. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची समिती नेमली आहे. त्यात नंदन निलेकणी, O.P. भट, KV कामथ, सोमाशेखर सुदर्शन या समितीत असतील सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश देवधर हे सदस्य तर सपरे हे या समितीचे अध्यक्ष असतील. सेबीला २ महिन्यात चौकशी पूर्ण करून या समितीला बंद लिफाफ्यामध्ये रिपोर्ट सादर करायचा आहे. ही समिती अडाणी ग्रुप संबंधी काही नियमांचे उल्लंघन झाले आहे का हे पाहिल.

मारुतीच्या व्यवस्थापनाने सांगितले की शिपमेंटमध्ये उशीर झाल्यामुळे फेब्रुवारीमधील निर्यात कमी झाली मार्चमध्ये निर्यात वाढण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये २.५५ लाख कार्स निर्यात करण्याचे लक्ष्य आहे. छोट्या गाड्यांच्या विक्रीमध्ये २०% ग्रोथ दिसत आहे ‘जिमनी’ ची डिलिव्हरी एप्रिल २०२३ पासून सुरु होईल. जिमनी साठी बुकिंग २१००० तर FRONX साठी १२००० चे बुकिंग आहे. बुकिंगच्या ७०% डिलिव्हरी होते. कार्स साठी मागणी चांगली आहे. मार्च एप्रिलमध्ये ८ लाख कार्स विकण्याचं लक्ष्य आहे. अर्बन एरियात १८% तर ग्रामीण एरियात २२% ग्रोथ आहे.

रामकृष्ण फोर्जिंगची जमशेदपूर येथे ७.८२ MV सोलर प्लांट लावण्याची योजना आहे
कोलते पाटीलने मुंबईत २ रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लाँच केले.

कल्पतरू पॉवर ट्रान्स्मिशनची ऑस्ट्रेलिया मध्ये ‘HUME लिंक ट्रान्समिशन प्रोजेक्ट’ डिलिव्हरी करण्यासाठी प्रिफर्ड प्रपोनंट म्हणून निवड झाली.
आज रिअल्टी आणि PSE मध्ये खरेदी झाली तर ऑटो, FMCG, इंन्फ्रा, बँका, मेटल्स क्षेत्रात प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सिन्सेक्स ५८९०९ NSE निर्देशांक निफ्टी १७३२१ आणि बँक निफ्टी ४०३८९ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – १ मार्च २०२३

आज क्रूड US $ ८३.९० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= R८२.४०च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.७९ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९४ आणि VIX १२.९७ होते.

USA ची मार्केट्स मंदीत होती. आज दक्षिण कोरियाची मार्केट्स बंद असतील.

आज चीनचे फेब्रुवारी मॅन्युफॅक्चरिंग PMI ५२.६ नॉन मॅन्युफॅक्चरिंग PMI ५६.३ आणि कॉम्पोझिट PMI ५६.४ होते.

FII नी Rs ४५५९.२१ कोटींची विक्री तर DII नी Rs ४६०९.८७ कोटींची खरेदी केली.

दिल्लीमध्ये ATF च्या किमती ४.५% ने कमी झाल्या. Rs १.१२ लाख प्रती लिटर वरून १.०७ लाख प्रती लिटर झाल्या.

पेट्रोलियम आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी LPG कमर्शियल सिलेंडरच्या किमती १९.८% ने वाढवून Rs २११९.०० ( १७६९) आणि हाऊसहोल्ड १४.२ KG सिलेंडर्सची किंमत Rs ११०३ झाली ( ४.७% ने किंमत वाढली.)

MOIL ने आपल्या काही उत्पादनाच्या किमतीत ८% ची वाढ केली.

पॉवर ग्रीड इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टिमसाठी यशस्वी बीडर ठरली हे प्रोजेक्ट BOOT ( बिल्ड, OWN, ऑपरेट ट्रान्स्फर ) तत्वावर आहे
झायड्स लाईफ च्या रक्तामध्ये क्लॉट संबंधित ‘APIXAVAN’ टॅब्लेट्स ला USFDA ने मंजुरी दिली. या टॅब्लेट्स साठी USA मध्ये US $ १८८७६ मिलियनचे मार्केट आहे.

त्याचप्रमाणे या कंपनीच्या ‘OLMESARTAN MEDOXOMIL’आणि HYDROCHLORO THIAZIDE’ या टॅब्लेट्सलाही USFDA ची मंजुरी मिळाली. हे औषध हाय BP वर असून याचे उत्पादन अहमदाबाद मध्ये होईल. US $ ४१.७ मिलियनचे मार्केट आहे.

अलेम्बिक फार्माच्या ‘DOCETAXEL’ इंजेक्शनला USFDA कडून मंजुरी मिळाली.

टाटा पॉवरच्या सब्सिडीअरीने Rs १०० दर्शनी किमतीचे २० कोटी कॉन्व्हर्टिबल प्रेफ शेअर्स ग्रीन फॉरेस्ट न्यू एनर्जी बिडकोला अलॉट केले.

‘VI’ ने ४००० Rs १० लाख दर्शनी किमतीचे OCD ( ऑप्शनली कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स) अमेरिकन टेलिकॉम इन्फ्रा ला अलॉट केले.

BEL TR मोड्यूल रडार LRU आणि मायक्रोमोड्यूल्स चे उत्पादन आणि पुरवठा करण्यासाठी ‘THALES रिलायन्स डिफेन्स सिस्टीम ‘ बरोबर करार केला.

संवर्धना मदर्सनने ‘DAIMLER इंडिया कमर्शियल व्हेईकल’ च्या ऍसेट्स खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण केला.

‘SEAMEC’ ने HAL बरोबर चार्टर पार्टी करार केला.’SEAMEC PALADIN’ ला ONGC च्या सामुद्रिक ऍक्टिव्हिटीसाठी US $ ३५००० प्रती दिवस या दराने ५ वर्षांसाठी हायर केले. या कॉन्ट्रॅक्टची एकूण व्हॅल्यू US $ ६४ मिलियन आहे.

अडानी एंटरप्रायझेसची मुंद्रा अल्युमिनियम ही KUTRUMAALI बॉक्साइट ब्लॉक साठी प्रीफर्ड बीडर ठरली. ओडिशा राज्य सरकारने कंपनीला LOI इशू केले आहे.

सॉफ्ट बँक ग्रुपने १ मार्च रोजी Rs ६०० कोटींचा त्यांचा ‘DELHIVERY’ मधील स्टेक ३% ते ५% डिस्काऊंटवर विकला .

NCLAT नी कोरबा वेस्ट पॉवर कर्ज निराकरणाचा अडाणी पॉवर चा प्रस्ताव मंजूर केला. HDFC आणि HDFC बँक यांच्या मर्जरच्या संबंधात NCLT ने निर्णय राखून ठेवला. पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

इंडोको रेमिडीजच्या गोवा प्लांटच्या २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान केलेल्या स्टराइल आणि OSD प्लांटच्या तपासणीत ४ त्रुटी दाखवल्या.
ऍक्सिस बँकेने सिटी बॅन्केचा इंडिया कन्झ्युमर बिझिनेस आणि NBFC चा कन्झ्युमर बिझिनेस घेतला.

आज ऑटोविक्रीचे आकडे येत आहेत.

एस्कॉर्ट कुबोटा ची ट्रॅक्टर डोमेस्टिक विक्री ७२४५ युनिट एक्स्पोर्ट ५६६ युनिट आणि एकूण ट्रॅक्टर विक्री ७८११ होती. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विक्री ४७० युनिट झाली.

भारताची FY २३ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी GDP ग्रोथ ४.४ % झाली.

बजाज ऑटोची एकूण विक्री २.८० लाख युनिट झाली. २ व्हिलर्स ची विक्री ६% ने कमी झाली. निर्यात ३८%ने कमी झाली तर ३ व्हिलर्सची विक्री २२% ने वाढली.

स्टील स्ट्रिप्स च्या ट्रॅक्टर पार्ट्सच्या भागाची विक्री ५२%ने वाढली.

मारुतीची एकूण विक्री १.६४ लाखांवरून १.७२ लाख झाली. पॅसेंजर वाहन विक्री १.४७ लाख युनिट, LCV ची विक्री ३३५६ युनिट आणि युटिलिटी व्हेईकल विक्री ३३५० झाली.निर्यात कमी होऊन १७२०७ युनिट झाली.

अशोक लेलँडची एकूण विक्री २७% ने वाढून १८५७१ युनिट झाली. LCV चि विक्री ५९०३ तर M&H CV ची विक्री १२६६८ युनिट झाली.निर्यात मात्र १००३ युनिट झाली.

टाटा मोटर्सची एकूण विक्री ७९७८५ युनिट तर डोमेस्टिक विक्री ७८००६ झाली. पॅसेंजर व्हेईकल विक्री ४१३४० EV ची विक्री ५३१८ CV ची विक्री ३६५६५ युनिट झाली.

M & M ची एकूण विक्री ८% ने वाढून ५८८०१ युनिट झाली. ट्रॅक्टर विक्री २६% ने वाढून २५७९१ झाली. डोमेस्टिक विक्री २४६१९ झाली तर निर्यात २३% ने कमी झाली.

अतुल ऑटो ची विक्री १३६५ युनिट वरून ५६% ने वाढून २१२५ युनिट झाली.

SML ISUZU ची विक्री ३३% ने वाढून ९५३ युनिट झाली. पॅसेंजर व्हेईकल विक्री ३२९% ने वाढून ६३१ युनिट तर कार्गो व्हेईकल विक्री ३२२ युनिट झाली.
TVS मोटर्सची विक्री १.९% ने कमी होऊन २.७६ लाख झाली.

आयशर मोटर्सची विक्री २४.५ % वाढली

कोल इंडियाचे उत्पादन ७% ने वाढले.

गुजरात अल्कलीजनी त्यांच्या दहेज येथिल कॉस्टिक सोडा प्लान्टची क्षमता ७८५TPD वरून १३१० TPD केली.

ल्युपिनने हैदराबादमध्ये नवीन लॅब सुरु केली . मार्च २०२४ पर्यंत कंपनी दक्षिण भारतात २०० कलेक्शन सेंटर उभारणार आहे.

रेनबो मेडिकलने हैदराबादमध्ये १०० बेड्चे हॉस्पिटल सुरु केले.

IFTAS कडून भुवनेश्वर येथे डेटा सेंटर बनवण्यासाठी अहलुवालिया काँट्रॅक्टसला Rs १६९ कोटींची ऑर्डर मिळाली.

IRCTC ने HDFC बँकेबरोबर RuPay क्रेडिट कार्ड लाँच केले. पेमेन्टसाठी SBI आणि बँक ऑफ बरोडा बरोबर कॉन्ट्रॅक्ट केले.

वेदांता रिसोर्सेस ने सांगितले की आमच्या मार्च २०२३ पर्यंत ड्यू असलेल्या सर्व ड्यूजचे प्रीपेमेन्ट केले आहे त्यामुळे आमचे कर्ज US $ २ बिलियनने कमी झाली आहे. या त्यांच्या स्टेटमेंटनंतर वेदांताच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

आज पासून दिवगी टॉर्क ट्रान्स्फर या ऑटो अँसिलिअरी क्षेत्रातील कंपनीचा Rs ४१२ कोटींचा ( Rs १८० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs २३२ कोटींचा OFS) IPO ओपन झाला हा IPO ३ मार्चला बंद होईल. या इशूचा प्राईस बँड Rs ५६० ते Rs ५९० आहे. मिनिमम लॉट २५ शेअर्सचा आहे . कंपनीचा रेव्हेन्यू मोठ्या ५ ग्राहकांकडून येतो त्यात M & M कडून ७६% रेव्हेन्यू येतो. कंपनी USA कोरिया, रशिया, चीन इत्यादी देशात निर्यात करते.

टाटा पॉवरने टाटा रिन्यूएबल्स मध्ये Rs ४००० कोटींची गुंतवणूक केली. येत्या ५ वर्षात २० GW क्षमतेचे रिन्यूएबल एनर्जी ऍसेट्स तयार होतील.

GMR इन्फ्राला इंदोरमधील मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्कच्या मेंटेनन्स साठी Rs ७५८ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

फेब्रुवारी २०२३ साठी GST कलेक्शन १.४९ लाख कोटी झाले.

ब्लिंकिंट हि कंपनी होम प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस मध्ये JV करणार आहे असे कळल्यावर झोमॅटोच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

वेलस्पन कॉर्पला मध्यपूर्वेतील देशात बेन्डस आणि L SAW पाईप्स निर्यात करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाले.
आज एनर्जी, इन्फ्रा, FMCG, बँका, केमिकल्स, मेटल, IT, रिअल्टी, PSE, ऑटो क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९४३० NSE निर्देशांक निफ्टी १७४५७ बँक निफ्टी ४०७०३ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २८ फेब्रुवारी २०२३

आज क्रूड US $ ८२.६० प्रती बॅरल्सच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ८२.७० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०४.८० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९३ आणि VIX १४.७५ होते.

USA चे फिअर आणि ग्रीड निर्देशांक ६२ वर आहे.
आज USA निर्देशांक तेजीत होते.

बाल्टिक ड्राय निर्देशांक एका दिवसात ६% तर आठवड्यात ३७% वाढले. याचा फायदा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, GE शिपिंग या कंपन्यांना होईल.

VI ने अमेरिकन टॉवर कंपनीला १२००० डिबेंचर अलॉट केले. याचा फायदा इंडस टॉवर ला होईल.
आज FII नी Rs २०२२.५२ कोटीची विक्री तर DII नी Rs २२३२ कोटींची खरेदी केली.

साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखरेचे एकूण उत्पादन ३.३५ कोटी टन होईल. महाराष्ट्रांत १८% कर्नाटकांत १२% उत्पादन कमी होईल तर UP मध्ये ४-५% वाढ होईल.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्येही साखरेची टंचाई जाणवत आहे. साखरेच्या किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे यामुळे साखरेच्या कंपन्यांना फायदा होईल

आज क्रूड, नैसर्गिक गॅस, सोने, चांदी, आणि बेस मेटल्स मंदीत होती.चांदी मंदीत असल्यामुळे त्याचा हिंदुस्थान झिंक वर परिणाम होईल.

GMR इन्फ्रा त्यांचे लँडिंग आणि आणि पार्किंग चार्जेस वाढवणार आहे.

विप्रो त्यांच्या कंपनीच्या बिझिनेसचे चार मुख्य भागात विभाजन करणार आहे. क्लाऊड, इंटरप्राईझ फ्युचरिंग, इंजिनीअरिंग EDGE आणि कन्सल्टिंग असे ते चार विभाग असतील.

CCEA ने NHPC च्या दिवांग येथील Rs १६०० कोटींच्या प्रोजेक्टला मंजुरी दिली.

झी एंटरप्रायझेसला पुन्हा F & G सेगमेंट समाविष्ट करून मे एक्स्पायरीचे कॉन्ट्रॅक्ट लाँच केले झी इंटरप्रायझेस आता IBC च्या कक्षेतून बाहेर आली.
ज्योती फॅब्रिकेशन सर्व्हिसेस च्या ज्योती लॅब मधील मर्जरला मंजुरी मिळाली.

इन्फोसिस एंटरप्राइज क्लायंट साठी प्रायव्हेट 5G लाँच करणार. इन्फोसिसने यूरोपमध्ये डिजिटल क्लाउड सर्व्हिसेस साठी NG VOICES बरोबर करार केला.

SEBI ने लोहिया कॉर्प, मेरिडियन बिझिनेस, आणि IRM एनर्जी या कंपन्यांच्या IPO साठी मंजुरी दिली.
HPL इलेक्ट्रीकला स्मार्ट मीटर्ससाठी Rs ४०९ कोटींची ऑर्डर मिळाली.

देशभरात ३८७ जिल्ह्यात 5G लाँच झाली.

वेदांत PLC या कंपनीने इशू केलेले बॉण्ड्स एप्रिल २३ मध्ये ड्यू होत आहेत. त्यांचे पेमेंट करण्यासाठी वेदान्ताने त्यांचे आंतरराष्ट्रीय झिंक ऍसेट्स हिंदुस्थान झिंक ला विकायचे ठरवले होते. पण सरकारने हिंदुस्थान झिंकला कॅश ऐवजी शेअर्स स्वॅप करण्याची ऑफर दिली. सरकारने हिंदुस्थान झिंकमधील कॅशरिझर्व्हज सुरक्षित ठेवायला हिंदुस्थान जिंकला सांगितले आहे. सरकारचे म्हणणे आहे की हे रिलेटेड पार्टि ट्रॅन्झॅक्शन आहे

NTPC च्या ६६० MV च्या नॉर्थ कर्णपुरा प्रोजेक्टमध्ये काम सुरु झाले.

युरिया च्या किमती US $ ९५० प्रती टनांवरून US $ ३८० प्रती टन तर डाय अमोनियम फॉस्फेट च्या किमती US १००० प्रती टनांवरून US $ ६४० प्रती टन झाल्या. त्यामुळे या खतांची आयात खूप वाढली आहे. याचा फायदा RCF,FACT, NFL यांना होईल.
टाटा मोटर्सने जयपूरमध्ये व्हेहिकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (१५०० व्हेहिकल स्क्रॅपिंग वार्षिक क्षमतेची) सुरु केली.

सिप्ला च्या पीठमपुरच्या २ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या तपासणीत USFDA ने युनिटला ८ त्रुटी दाखवून फॉर्म नंबर ४८३ इशू केला होता. कंपनीमध्ये मायक्रोबायॉलॉजिकल कॉंटॅमिनेशनला प्रतिबंध करण्यासाठी उपाय, संगणक सिस्टिम्सकंट्रोल बरोबर नव्हते. पर्यावरण संबंधित उपायांसाठी असलेल्या प्रोसेस डिफेक्टीव्ह होत्या.कंपनी बेसिक SOP आणि हायजिन प्रोसेस फॉलो करत नाही.असे USFDA चे निरीक्षण आहे. त्यामुळे USFDA ने EIR इशू केला नाही.

शोभामध्ये प्रमोटर्स शेअर्स खरेदी करत आहे.

छत्तीसगढ मधील दातिमा कोल माईन ब्लॉक ( १.३३ कोटी टन क्षमता ) साठी श्री सिमेंटने सर्वात जास्त बोली लावली.

EXIDE ULRIC रिन्यूएबल्स मध्ये Rs १९.८ कोटींची गुंतवणूक करणार आहे.

भारती एअरटेलने सांगितले की आमचा Paytm मध्ये स्टेक खरेदी करायचा विचार नाही.त्यामुळे Paytm चा शेअर पडला.

आज मार्केट एका मर्यादित रेंज मध्ये फिरत राहिले. मेटल्स एनर्जी आणि फार्ममध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५८९६२ NSE निर्देशांक निफ्टी १७३०४ आणि बँक निफ्टी ४०२६८ वर झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०२३

आज क्रूड US $ ८२.७० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८२.९० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५.२४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड ३.९४आणि VIX १४.७४ होते.

PCE( पर्सनल कंझमशन एक्सपेंडिचर ) ०.६% ने वाढून ५.४% झाला. NASDAQ, गोल्डन ड्रॅगन इंडेक्स मंदीत होते.

USA मध्ये क्रूडचे साठे वाढत आहेत आणि रशियाने क्रूडच्या उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे क्रूड US $ ८३ प्रती बॅरलच्या वर राहण्याची शक्यता आहे. US $ निर्देशांक १०५ वर गेल्याने मेटल्समध्ये मंदी आहे. सोने, चांदी, आणि बेस मेटल्स मंदीत आहेत.
आज FII ने Rs १४७०.०० कोटींची विक्री आणि DII ने Rs १४०१ कोटींची खरेदी केली.

Paytm आणि एअरटेल बँक याचे मर्जर होण्याची शक्यता आहे अशी ब्लूमबर्ग ची बातमी होती.

लेमन ट्री हॉटेलने AURIKA ब्रँड अंतर्गत हिमाचल प्रदेशात कसौली येथी ११० रूमसाठी करार केला.

स्पाईस जेट QIB दवारा Rs २५०० कोटी उभारणार आहे. कार्लाइल एव्हिएशनच्या लीज लायबिलिटीजचे US $ २.९५ कोटींच्या ड्यूजचे DEBT इक्विटी मध्ये Rs ४८ प्रति शेअर भावाने कन्व्हर्ट करण्यासाठी मंजुरी मिळाली. स्पाईस जेट त्यांचा कार्गो लॉजिस्टिक बिझिनेस त्यांची सबसिडीअरी स्पाईस एक्सप्रेस आणि लॉजिस्टीक्सला विकणार आहे. ही सबसिडीअरी स्पाईस जेटच्या नावे Rs २५५६ कोटींचे शेअर्स जारी करेल. स्पाईस जेट CASTLELAKE कडून २ विमाने खरेदी करणार आहे.

इंडिगो आणि गो फर्स्ट मध्ये इंजिन्सची समस्या असल्याने ५० विमानांच्या उड्डाणावर बंदी घातली गेली.

फिनिक्स कोलकाता येथे ५.५ एकर जमीन Rs ४१४ कोटींना घेतली. कमानीने अहमदाबाद मध्ये पॅलॅडियम नावाने नवीन मॉल उघडला. सुरतमध्ये १ मिलियन SQFEET शॉपिंग मॉल उघडण्याची योजना आहे.
IRB इन्फ्राला NHAI कडून ६ लेन प्रोजेक्ट अपग्रेड करण्यासाठी मिळाले.

पॉवर ग्रीडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने ४ प्रोजेक्ट मध्ये Rs ८०३.६५ कोटींची गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी दिली.

तेगा इंडस्ट्रीज मॅकनली सयाजी इंजिनीअरिंग कंपनी खरेदी करणार.

PVR ने लखनौ येथील लुलु मध्ये ११ स्क्रीन चा आणि १८४१ सीट्स चा मल्टिप्लेक्स सुरु केला.

ट्यूब इन्व्हेस्टमेन्टची सबसिडीअरी TI क्लीन मोबिलिटी ने मल्टिपल्स प्रायव्हेट इक्विटी ,स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर कोइनव्हेस्टर्स बरोबर Rs १२०० कोटीची गुंतवणूक करण्यासाठी करार केला. ही गुंतवणूक इक्विटी आणि CCP द्वारे केली जाईल.

TICMPL मार्च २०२४ पर्यंत आणखी Rs १०५० कोटी उभारणार आहे . या कंपनीत ट्यूब इन्व्हेस्टमेंट Rs ७५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

PVR तेलंगणामध्ये अशोक मॉल १ मध्ये ५ स्क्रीन वाले मल्टिप्लेक्स सुरु केले.

फायझरने ठाण्याचा व्यवसाय, जमीन, प्लांट आणि मशिनरी आणि एम्प्लॉयी विधी रिसर्च अँड डेव्हलपमेंट LLP ला ट्रान्स्फर करण्याचा व्यवहार पुरा केला.

कल्पतरु पॉवरने कोहिमा मरीन ट्रांसमिशन चा २५% स्टेक विकला.

भारती एअरटेलच्या 5G ग्राहकांची संख्या १ कोटी झाली.

एअर इंडियाने सांगितले की विस्ताराच्या त्यांच्या बरोबरच्या मर्जरची प्रक्रिया रेग्युलेटरी नियमांनुसार १ ल्या स्टेजमध्ये आहे. आम्ही CCI ची मंजुरी मिळाल्यानंतर DGCA ची मंजुरी घेऊ.

ग्रॅनुअल्स च्या LOSARTAN POTASSIUM या औषधाला USFDA कडून मंजुरी मिळाली.

नायजेरियामध्ये अनिश्चितता आणि अस्थिरता असल्याने बजाज ऑटोची निर्यात कमी होण्याची शक्यता असल्याने बजाज ऑटो उत्पादन २५% ने कमी करणार आहे.बहुतांश लोअर एन्ड प्रोडक्टस निर्यात होत असल्यामुळे उत्पन्नावर फार परिणाम होईल असे वाटत नाही. आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशात US $ ची उपलब्धता ही समस्या आहे.

आयशर मोटर्सची निर्यात बहुतांशी युरोप मध्ये होते.

कंपनीचा प्रीमियम पोर्टफोलिओ आहे त्यामुळे आयशर मोटर्सला हा प्रश्न कमी गंभीर आहे जून २०२३ पर्यंत ही समस्या गंभीर राहण्याची शक्यता आहे.

दिलीप बिल्डकॉन ला Rs ९५९४ कोटींच्या ऑर्डर्स मिळाल्या.

अडाणी पोर्टमधे ३०० मिलियन मेट्रिक टन कार्गो व्हॉल्युम झाले.

MPHASIS चा मार्टगेज व्यवसाय कमी झाला. सिटीचा रिपोर्ट सेल आहे. कंपनीने फ्रेशर्सच्या ऑनबोर्डिंगला उशीर केला.

DR रेडिजने MAYNE PHARMA चा USA रिटेल जनरिक बिझिनेस US $ ९ कोटींमध्ये खरेदी केला.

व्हिनस रेडिजच्या बद्दी युनिटला GMP ( गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस)सर्टिफिकेट मिळाले.

फायझर कॅन्सरवरील औषधे उत्पादन करणाऱ्या SEAGEN INC ही कंपनी खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे. या कंपनीचे मार्केटकॅपिटलायझेश US $ ३० बिलियन आहे

आज बँकिंग रिअल्टी निवडक फार्मा शेअर्समध्ये खरेदी झाली तर मेटल,IT ऑटो इन्फ्रा शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५९२८८ NSE निर्देशांक निफ्टी १७३९२ बँक निफ्टी ४०३०७ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !