आजचं मार्केट – ८ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.१५ प्रती बॅरल ते US $६४.५९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.५७ ते US $ १=Rs ६८.७४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१७ तर VIX १३.७१ होता.

USA मध्ये जॉब डेटा चांगला आला. US $ची किंमत इतर करंन्सीजच्या तुलनेत वाढली. त्यामुळे इमर्जिंग मार्केटच्या करंन्सीजचे अवमूल्यन झाले. जगातील सर्व मार्केट्स आज मंदीत होती. इराणवर युरेनियम एनरिचमेण्टसाठी घातलेली मर्यादा ओलांडून इराण युरेनियमचे उत्पादन वाढवेल. यामुळे इराण अणुबाँब बनवण्यासाठी सक्षम होईल.

इलेक्ट्रिकल व्हेइकलचे स्पेअर पार्ट्स आयात करण्यासाठी इम्पोर्ट ड्युटी भरावी लागणार नाही. त्यामुळे पुष्कळ इलेक्ट्रिक वाहने तयार होतील. पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या वाहनांना मागणी येणार नाही. मारुतीने जून २०१९ मध्ये आपले उत्पादन १५.६% ने घटवले. BS VI ची समस्याच आहेच. मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी स्थिती आहे. यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स पडले. वाहनांनाच मागणी नाही म्हणून स्पेअर पार्ट्स आणि ऍक्सेसरीजचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स पडले.

PNB च्या अडचणी काही संपत नाहीत. PNB चा स्टाफ आणि भूषण स्टील या कंपनीचे अधिकारी यानी संगनमताने Rs ३८०५ कोटींचा फ्रॉड केला. यामुळे गेले काही दिवस सावरत असलेला PNB चा शेअर कोसळला. त्याबरोबर बँकिंग क्षेत्रामधील शेअर्स पडले.

किमान पब्लिक शेअरहोल्डिंगची लिमिट २५% वरून ३५% केली जाईल. याचे काही फायदे तर काही तोटे आहेत. MSCI, FTSE इंडेक्समध्ये भारताचे वेटेज वाढेल. MCX IEX आणि इतर सरकारी कंपन्यांना फायदा होईल१२०० कंपन्यांना प्रमोटर शेअर होल्डिंग कमी करावे लागेल. यामुळे मार्केटमध्ये विक्रीसाठी शेअर्सचा ओघ चालू राहील आणि शेअर्सचे भाव पडतील असे वाटल्यामुळे आज ट्रेडर्सनी प्रॉफिट बुकिंग केले. फ्लोटिंग स्टॉक कमी असला की योग्य पद्धतीने प्राईस डिस्कव्हरी होत नाही. ५० P/E( प्राईस अर्निंग रेशियो) वर काही कंपन्यांच्या शेअरचे भाव आहेत. मायनॉरीटी शेअर होल्डर्सची कायम तक्रार असते की त्यांच्यावर बहुमताच्या जोरावर अन्याय होतो. त्यामुळे ह्या तक्रारीची तीव्रता कमी होईल. सेबी प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग १०% ने कमी करण्यासाठी वेळ देईल. पण ही तलवार बर्याच काळपर्यंत लटकत राहील. MNC कंपन्यांच्या बाबतीत स्थिती विचित्र आहे. या कंपन्यांना फ्लोटिंग स्टॉक वाढवण्यात स्वारस्य नसते. या कंपन्या भारतातून डीलीस्ट होण्याचा विचार करतील.

अंदाजपत्रकात वार्षिक Rs २ कोटी ते Rs ५ कोटी उत्पन्न असणाऱ्या करदात्यांवर जादा सेस बसवला. हा वाढीव सेस आपल्याला भरायला लागू नये म्हणून FPI आणि FII नी आज मार्केटमध्ये जोरदार विक्री केली.त्यामुळे मार्केट सुरवातीपासून पडायला सुरुवात झाली आणि नंतरही पडतच राहिले. सरकारने असे जाहीर केले केले की आम्ही या वाढीव सेसची योग्य ती समीक्षा करू. पण याचा मार्केटवर फारसा परिणाम झाला नाही.

या पडझडीत काही शेअरमध्ये मात्र तेजी होती. उदा. ज्युबिलण्ट फूड्स, शीला फोम्स, D मार्ट, टी सी एस, सिम्फनी, सुप्रीम इंडस्ट्रीज. सोन्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली. याचा फायदा मन्नापुरम फायनान्स आणि मुथूट फायनान्स यांना होईल.
येत्या दोन आठवड्यात देशात सर्वत्र चांगला पाऊस पडेल. त्यामुळे जूनमध्ये कमी पडलेल्या पावसाची कमतरता भरून निघेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला. तरीही मार्केट पडतच राहिले.

यावर्षीच्या अंदाजपत्रकात कंपन्या करत असलेल्या शेअर बाय बॅक वर २०% टॅक्स लावला. डिव्हिडंडवर डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स भरायला लागू नये म्हणून कंपन्यांनी शेअरहोल्डर्सना फायदा होण्यासाठी शेअर बाय बॅक सुरु केले होते. शेअर बाय बॅक ‘टेंडर’ किंवा ओपनमार्केट या कोणत्याही मार्गाने केले तरी हा टॅक्स कंपन्यांना भरावा लागेल. या कराचा फटका इन्फोसिसला बसण्याची शक्यता आहि. कारण त्यांचा ओपनमार्केट मार्गाने शेअर बाय बॅक चालू आहे. पण हा शेअर बायबॅक अंदाजपत्रक सादर होण्याच्या आधी सुरु झाला असल्याने जर या बायबॅकला सवलत मिळाली तर बाय बॅक ओव्हरसब्सक्राइब होईल. अंदाजपत्रक दीर्घ काळासाठी चांगले असले तरी अल्प मुदतीसाठी थोडे कष्टप्रद आहे.

२४ जून ते ५जुलै २०१९ या दरम्यान बायोकॉनच्या मलेशिया मधील युनिटची तपासणी झाली होती. त्यात १२ त्रुटी दाखवल्या गेल्या. या युनिटमध्ये ३ प्लान्ट आहेत. ग्लेनमार्क फार्माच्या अंकलेश्वर प्लान्टमधील API फॅसिलिटीजची तपासणी USFDA ने केली. त्यांनी कोणतीही त्रुटी दाखवली नाही.

मंगळवार ९ जुलै २०१९ रोजी टी सी एस चा तर शुक्रवारी १२ जुलै २०१९ रोजी इन्फोसिस आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. IT क्षेत्रातील कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल पगारवाढ, व्हिसावरील खर्च यामुळे थोडे कमी असतात.
आज गोवा कार्बन या कंपनीचा पहिल्या तिमाहीचा निकाल लागला. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीला Rs ५ कोटी तोटा झाला. उत्पन्न वाढले असले तरी EEBITDA खूपच कमी झाला.

बजाज ग्रुपच्या काहि कंपन्यांनी असा इशारा दिला की त्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल काहीसे कमी असतील. त्यामुळे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व हे शेअर्स पडले. या कंपन्यांमधील FPI इन्व्हेस्टमेंट कमी झाली.

कर्नाटक राज्यात ज्या राजकीय हालचाली चालू आहेत त्यामुळे BF इन्व्हेस्टमेंट, आणी BF युटिलिटीज हे शेअर्स वरच्या सर्किटवर होते.

सरकार न्यू इंडिया, GIC यांच्यातील १०% आणि कोल इंडिया यांच्यातील ५% स्टेक कमी करणार आहे. सरकारने असे जाहीर केले की काही PSU मधील स्टेक सरकार ४०% पर्यंत कमी करेल.

येस बँकेच्या व्यवस्थापनाने सांगितले की बँकेची आर्थीक स्थिती चांगली असून कोणीही राजीनामा दिलेला नाही. उलटपक्षी २ नवीन डायरेक्टर्सची नेमणूक करत आहोत. त्यामुळे एवढ्या पडझडीतही येस बँकेचा शेअर स्थिर राहिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८७२० NSE निर्देशांक निफ्टी ११५५८ बँक निफ्टी ३०६०३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६३.१८ प्रती बॅरल ते US $ ६३.३७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs. ६८.४७ ते US $१=Rs ६८.६० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५२ आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी FY २०१९-२०२० साठी अंदाजपत्रक सादर केले.

अफोर्डेबल हौसिंग (किंमत Rs ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी) साठी घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी जादाची Rs १.५ लाख आयकरामध्ये सवलत दिली जाईल. एकूण व्याजात Rs ३.५ लाख व्याजावर आयकरामध्ये सूट दिली जाईल. नियमित हौसिंग लोन साठी Rs २.०० लाखाची सूट दिली जाते.

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये सरकार Rs ७०००० कोटी भांडवल घालेल. या भांडवलाचा उपयोग या बँका क्रेडिट एक्स्पान्शनसाठी करतील अशी आशा आहे. RBI ने अशी घोषणा केली की ऑगस्ट आणि डिसेंबर २०१९ मध्ये Rs १.३४ लाख कोटी लिक्विडीटी प्रोव्हाईड करेल. PSU बँका ही लिक्विडीटी हौसिंग फायनान्स कंपनीकडून त्यांचे ऍसेट खरेदी करतील.

MSME ला Rs १ कोटी लोन आणि २% व्याजामध्ये सबव्हेन्शन दिले जाईल. या इंटरेस्ट सबव्हेन्शन साठी Rs ३५००० कोटींची तरतूद केली आहे.

कंपन्यांमधील किमान पब्लिक होल्डिंगची मर्यादा २५% वरून ३५% पर्यंत वाढवली जाईल.

इन्शुअरन्स इंटरमिडीअरीजमध्ये १००% FDI ला परवानगी दिली जाईल. तसेच ऍनिमेशन आणि मेडिया सेक्टरमध्ये FDI चे प्रमाण वाढवले जाईल. NRI ना FPI कॅटेगरीमध्ये टाकले जाईल आणि FPI साठी KYC चे नियम सोपे केले जातील.

सर्व घरांना वीज दिली जाईल. सर्व लोकांना २०२२ पर्यंत घरे दिली जातील. १.९५ कोटी घरे बनवली जातील. PSU च्या मालकीच्या जमिनीवर अफोर्डेबल हौसिंग प्रोजेक्ट बनवली जातील. अर्थमंत्र्यानी ‘नारी ते नारायणी” हा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमांतर्गत कुटुंबातील एका महिलेला मुद्रा योजनेखाली Rs १ लाख लोन दिले जाईल.

आता PSU मध्ये सरकारी स्टेक ५१% वर आणला जाईल. विनिवेश लक्ष्य १.०५लाख कोटी निर्धारित केले आहे.
ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजात Rs २.५ लाख सबसिडी मिळेल.

जलशक्ती मंत्रालय हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात येईल आणि पाण्याशी संबंधित सर्व समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी या मंत्रालयाची असेल. २०२४ पर्यंत सर्व घरात पाइपमधून पिण्याचे पाणी पोहोचवले जाईल.

हौसिंग फायनान्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आता RBI कडे सोपवण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनांचे आधुनिकरण केले जाईल. रस्ते बांधणीवर तसेच जलमार्ग विकसित करण्यावर भर दिला जाईल.
सोने आणि चांदी यांच्यावरील कस्टम्स ड्युटी १२.५% केली.

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर Rs १ प्रती लिटर एकसाईझ ड्युटी आणि Rs १प्रती लिटर इन्फ्रा सेस लावला. क्रूड ऑइलवर Rs १प्रती टन इम्पोर्ट ड्युटी लावली.

१७ पर्यटन स्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार डेव्हलप केली जातील.

सरकारने फिस्कल डेफिसिटचे लक्ष ३.३% ठेवले आहे. सरकारने कर्मयोगी स्कीमखाली ३ कोटी किरकोळ व्यापारी आणि दुकानदार यांना पेन्शन दिली जाईल असे जाहीर केले.

जास्त उत्पन्न ( Rs १ कोटींच्यावर ) असणाऱ्यांसाठी सरकारने आयकराच्या एकूण दरात वाढ केली.

या अंदाजपत्रकात प्रत्यक्ष करांमध्ये जास्त सवलती दिल्या गेल्या नाहीत. सरकार आता रेड़ीमेड पार्टली भरलेला आयकर रिटर्न तुम्हाला पाठवेल. जर तुम्हाला तो बरोबर आहे असे वाटले तर तेवढा आयकर तुम्ही भरायचा. तसेच आता तुम्हाला आयकर ऑफिसमध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत. हे काम संगणकाद्वारे केले जाईल.

जालन कमिटीचा फायनल रिपोर्ट १७ जुलैला अपेक्षित आहे. या रेपोर्टवरून सरकारला RBI कडून किती डिव्हिडंड मिळेल हे कळेल.

शेतीमध्ये आता खाजगी गुंतवणुकीसाठी परवानगी दिली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५१३ NSE निर्देशांक निफ्टी ११८११ बँक निफ्टी ३१४७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ जुलै २०१९

आज क्रूड US $६३.३५ प्रती बॅरल ते US $ ६३.४६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.८४ ते US $१=६८.८८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२८ होता. VIX १३.५३ वर असेल.

सरकारने ज्वारी, रागी, तूर पॅडी आदी धान्यांची MSP ( मिनिमम सपोर्ट प्राईस) जाहीर केली. यामुळे ग्रामीण भागात उत्पन्न वाढेल. याचा फायदा FMGC कंपन्यांना होईल.

सरकारने मंगलोर, अहमदाबाद,लखनौ हे विमानतळ अडानी एंटरप्रायझेसला लीजवर दिले.

आज ‘इंडिया मार्ट’ या कंपनीच्या शेअरचे Rs ११८० वर लिस्टिंग झाले. नंतर त्याची किंमत Rs १३०० पर्यंत वाढली. हा शेअर IPO मध्ये Rs ९७३ ला दिला होता.

वेदांताचा झाम्बिया सरकारबरोबर कोनकोला कॉपर माईन्स बिझिनेसच्या बाबतीत वाद आहे. झाम्बियन फर्म ZCCM KCM च्या शेअरहोल्डर बरोबरचा करार पाळला नाही अशी ऑर्डर कोर्टाकडून मिळेल अशी वेदांताला अशा आहे.

इमिग्रेशनची प्रोसिजर पाळली नाही म्हणून APPLE ने काम L $ T Infotech कडून काढून घेऊन दुसर्याकडून करून घ्यायचे ठरवले.

आज स्टेट बँकेच्या शेअरने ३.३ लाख मार्केटकॅप अचिव्ह केली. मार्केटकॅप लक्षात घेता आज तो सातव्या नम्बरवरचा शेअर झाला.

आज सरकारने आपला इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला. सरकारने आज अर्थव्यवस्थेचा ग्रोथ रेट FY २०१९ ते २०२० मध्ये ७% असेल. निर्यात वाढवण्यावर भर असेल. सरकार मोठ्या कंपन्यांच्या वाढीवर भर देईल. ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाईल. स्वच्छ भारत ऐवजी ‘स्वस्थ आणि सुंदर भारत’ अशी घोषणा जाहीर केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९९०८ NSE निर्देशांक निफ्टी ११९४६ बँक निफ्टी ३१४७१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ३ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६२.५३ प्रती बॅरल ते US $ ६२.७८ प्रती बॅरल ते रुपया US $ १=Rs ६८.८६ ते US $१= Rs ६८.८७ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.७४ होता.

चीन, कोरिया, तैवान, आणि थायलंड या देशातुन फिलामेंट यार्नचे डम्पिंग होत आहे अशी तक्रार होती. या तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे आता DGTR या प्रोडक्टसवर अँटी डम्पिंग ड्युटी लावेल.

सरकार ४४ लेबर लॉज एकत्र करून कोड ऑफ wage बिल तयार करणार आहे. सरकारला किमान वेतन ठरवण्याचा हक्क आहे. दर पांच वर्षांनी याचा आढावा घेतला जाईल.

अहमदाबाद, मँगलोर, लखनौ मधील विमानतळ लीजवर दिले जातील.

नीती आयोगाने ‘FACT’ चा रिव्हायव्हल प्लान तयार केला.

सरकारने भारती एअरटेल या कंपनीला Rs ७००० कोटी स्पेक्ट्रम फीची मागणी केली होती. यावर सुप्रीम कोटाने स्टे दिला होता सरकारने या स्टेविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले.

इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स कंपनीने ३२४३० NCD बाय बॅक करू असे कंपनीने सांगितले. ही कंपनी आता तीनचार आठवड्यात १००% फायनान्सियल कंपनी बनेल. कंपनीला आशा आहे की तिच्या लक्ष्मी विलास बँकेबरोबरच्या मर्जरला मंजुरी मिळेल. या मर्जरनंतर प्रमोटर्स आपला स्टेक १५%ने कमी करतील.

JB केमिकल्सच्या पनोली प्लाण्टला USFDA ने क्लीन चिट दिली.

स्टार सिमेंटच्या प्रमोटर्सनी ४.२ लाख शेअर्स तारण म्हणून ठेवले.

वेल स्पन इंडियाच्या USA मधील कायदेशीर बाबींमध्ये सेटलमेंट करण्यासाठी प्राथमिक मंजुरी मिळाली.

इंडिया रेटिंगने KNR कॉन्स्ट्रक्शनचे रेटिंग वाढवून AA – केले.

IOC पानीपत येथे गॅसबेस्ड ३३.५ टन/इयर इथेनॉल उत्पादन कपॅसिटी असलेले युनिट बनवत आहे.

एरिस लाईफ सायन्सेस ही कंपनी Rs ५७५ प्रती शेअर या किमतीने १७.३९ लाख शेअर्स बाय बॅक करेल.

औरोबिंदो फार्मा ही कंपनी USFDA मुळे अडचणीत आली आहे. काही औषधे मार्केटमध्ये लाँच व्हायला उशीर होत आहे. व्यवस्थापनाच्या उत्तराने USFDA चे समाधान होत नाही.

NPS च्या टायर II मध्ये जे कोणी गुंतवणूक करतील त्यांना नॅशनल पेन्शन स्कीम वरील करात सवलत मिळेल.

स्टील आयातीवर ड्युटी लावली जाईल याचा फायदा SAIL, टाटा स्टील, JSW यांना होईल.

GAIL ने १६५ किलोमीटर लांबीच्या गोरखपूर नॅशनल गॅसलाईन प्रोजेक्ट सुरु केला.

इंडिया मार्टच्या IPO चे लिस्टिंग उद्या होणार आहे. IPO ३६ वेळा ओव्हरसब्सक्राइब झाला होता. लिस्टिंग गेन होत असतील तर अंशतः प्रॉफिट बुकिंग करा.

कल्पतरू पॉवर ही कंपनी ३ पॉवर सबसिडीतला स्टेक विकणार आहे.

BSE निर्देशांक सेंसेक्स३९८३९ NSE निर्देशांक निफ्टी ११९१६ बँक निफ्टी ३१३८२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ जुलै २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २ जुलै २०१९

आज क्रूड US $ ६४.८७ प्रती बॅरल ते US $ ६५.११ प्रती बॅरल आणि रुपया US $ १= Rs ६८.३३ ते US $१=Rs ६९.०४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७१ होता. VIX १४.८३ होता.

ओपेक आणि त्यांचे मित्र रशिया यांनी क्रूडच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयाची मुदत मार्च २०२० पर्यंत वाढवली.
USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी युरोपियन युनियनमध्ये उत्पादन होणाऱ्या गुड्सवर USA $ ४ बिलियनची टॅरिफ लावेल अशी धमकी दिली. USA चा EU बरोबर एअरक्राफ्टसबसिडीच्या बाबतीत वादविवाद चालू आहेत.

पावासाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऊस लागवडीखालील एरिआ UP मध्ये २% ने तर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनुक्रमे १६% आणि २४% कमी होईल असा अंदाज आहे. २०१९-२० या वर्षात साखरेचे उत्पादन २८ मिलियन टन असेल असा अंदाज आहे.त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचा फायदा होईल. कारण उत्पादन कमी झाल्यामुळे साखरेचे भाव वाढतील.

इंद्रप्रस्थ गॅस आणि महानगर गॅसचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट प्लेयर्सना वापरू द्यावे असे PNGRB चे सर्क्युलर सांगते. जर हि व्यवस्था अमलात आली तर IGL आणि MGL च्या शेअर्सवर विपरीत परिणाम होईल. आज ह्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या  व्हॉल्युमसह पडायला सुरुवात झाली.

ICRA या रेटिंग एजन्सीचे नरेश टक्कर यांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामावर येऊ नका असे सांगितले. IL & FS ला दिलेल्या रेटिंगबाबत चौकशी चालू आहे.

ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सनी आपले बहुसंख्य शेअर्स तारण म्हणून ठेवले आहेत, किंवा ज्या कंपन्यांवर खूप प्रमाणात कर्जाचा बोजा आहे, त्याचप्रमाणे ज्या कंपन्यांच्या बाबतीत कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इशू आहेत अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सावधगिरी बाळगूनच ट्रेड किंवा गुंतवणूक करावी.

गुजरात ऊर्जा विकास निगम बरोबर झालेले पॉवर पर्चेसचे अग्रीमेंट रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यामुळे अडाणी पॉवरचा शेअर वाढला.

रॅलीजचा दहेज येथे जो प्लांट आहे त्याबाबतीत प्रदूषण कंट्रोल बोर्डाने एक्शन घेतली आहे. कंपनीला हा प्लांट बंद करायला सांगितला आहे.

येस बँकेने RADIUS डेव्हलपर्सना Rs १२०० कोटींचे कर्ज दिले आहे. या कर्जावरचे Rs ३० कोटींचे व्याज ४५ ते ६० दिवसांदरम्यान दिले नाही. या डेव्हलपर्सनी बँकिंग सिस्टिमकडून Rs ५५०० कोटींचे कर्ज घेतले आहे. यामुळे येस बँकेचा शेअर पडला.

स्वीलेक्ट एनर्जी या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ८ जुलै २०१९ रोजी बोनस शेअर्स इशू करण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९८१६ NSE निर्देशांक निफ्टी ११९१० बँक निफ्टी ३१२८३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ जून २०१९

आज क्रूड US $ ६६.३० प्रती बॅरल ते US $ ६६.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ६८.८२ US$१=Rs ६९.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५२ आहे.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर आता आता हळू हळू शांत होण्याच्या मार्गावर आहे. USA आता चीनमधून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध घालणार नाही. आता प्रत्येक प्रश्नावर चीन आणि USA यांच्यामध्ये द्विपक्षीय वाटाघाटी होतील. USA ने HUWEI ला आता USA मधून लागणारे स्पेअर पार्ट्स खरेदी करायला परवानगी दिली.

या आठवड्यात दोन दिवस ओपेकची मीटिंग १ जुलै २०१९ आणि २ जुलै २०१९ ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे चालू झाली.या मीटिंगमधील होणाऱ्या निर्णयावर मार्केट लक्ष ठेवून असेल. यावेळी रशियाने ओपेक देशांबरोबर राहण्याचे ठरवले आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि इराक यांनी उत्पादनातील कपातीची मुदत ६ महिने वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रूडचे दर वाढले.

आज जून महिन्यातील ऑटो विक्रीचे आकडे आली. यात बजाज ऑटोची विक्री वाढली.
एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री १०.२% ने कमी होऊन ८९६० युनिट्स झाली.
मारुतीची एकूण विक्री १४% ने कमी होऊन १.२४ लाख युनिट झाली. एक्स्पोर्ट्स मात्र ५.७% ने वाढले. अशोक लेलँडची विक्री कमी झाली. आयचर मोटर्सची कमर्शियल विक्री २४.७% ने कमी झाली.

१जुलै २०१९ रोजी GST लागू होऊन दोन वर्षे झाली. यावषीच्या पहिल्या पांच महिन्यात GST चे कलेक्शन प्रती माह Rs १लाख कोटींच्यावर गेले. या दोन वर्षात सरकारने ग्राहक, उद्योगपती यांच्या मागण्यांना GST कौन्सिलच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दिला. GST ची प्रक्रिया सोपी केली. त्यामुळे आता GST ने भारताचा एकमेव अप्रत्यक्ष कर बनण्याच्या मार्गावर चांगली प्रगती झाली. आता GST चे रेट कमी होतील आणि प्रक्रिया साधी सरळ सोपी होईल अशी अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमधील आयर्न ओअर चे उत्पादन कमी झाल्यामुळे आयर्न ओअरची किंमत वाढली . याचा फायदा वेदांता, NMDC, टाटा स्टील यांना होईल.

कोल ब्लॉक केसमध्ये JSPL च्या नवीन जिंदाल आणि इतर चौघांवर चार्जशीट दाखल करण्यास दिल्ली कोर्टाने सांगितले त्यामुळे JSPL चा शेअर पडला.

DR रेडीजच्या श्रीकाकुलम युनिटला ग्रीसच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून क्लीन चिट मिळाली.

इन्फिबीम मधील १.२६% स्टेक प्रमोटर्स विकला

इंडिया बुल्स रिअल इस्टेट मधील २.४% स्टेक प्रमोटर्सनी विकला.

गोदरेज फॅमिलीमध्ये उद्योगाच्या वाटचालीसंबंधात वादविवाद झाले असल्याची बातमी आल्यामुळे गोदरेज प्रॉपर्टिजच्या शेअरवर परिणाम होईल असा अंदाज होता. पण गोदरेज प्रॉपर्टिजने Rs २१०० कोटी QIB च्या माध्यमातून उभे केल्यावर कंपनीचा शेअर ऑल टाइम हाय वर पोहोचला.

टाटा ग्रुपने जेट एअरवेजच्या ऍसेटमध्ये स्वारस्य दाखवल्यामुळे जेट एअरवेजचा शेअर वाढला

EVEREADY कंपनीचे ऑडिटर्स प्राईस वॉटरहॉउस यांनी राजीनामा दिला. इंटरकंपनी डिपॉझिट बद्दल पुरेसे स्पष्टीकरण कंपनीने न दिल्यामुळे हा राजीनामा दिला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९६८६ NSE निर्देशांक निफ्टी ११८६५ बँक निफ्टी ३१३७२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ जून २०१९

आज क्रूड US $ ६६.०८ प्रती बॅरल ते US $ ६६.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६८.९० ते US $१=Rs ६९.०० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२२ होता.

सध्या ११६२५ ते ११९०० अशा रेंजमध्ये मार्केट आहे. ११९११ या स्विंग हाय पर्यंत जाऊन आले आहे. WEAKNESS असाच सुरु राहिला तर मार्केट पुन्हा एकदा ११६९१ या ५० DMA च्या पातळीला जाईल. जर क्लोजिंग बेसिसवर ही पातळी ओलांडली तर मात्र मार्केट पुन्हा ११६२५ पर्यंत जाईल. विकली चार्टवर डोजी पॅटर्न आहे.

बिमल जालन कमिटीची पुढील बैठक १७ जुलै २०१९ रोजी होईल. या बैठकीत RBI कडील सरप्लस संबंधित रिपोर्टला अंतिम स्वरूप दिले जाईल असा अंदाज आहे.

ACCENTURE च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आल्यामुळे IT सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.
कर्नाटक राज्य सरकार बँगलोरमध्ये नवीन बांधकामावर ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा विचार करत आहे. बंगलोर शहरात होणारी गंभीर पाणी टंचाई हे कारण राज्य सरकारने दिले. यामुळे शोभा, ब्रिगेड, प्रेस्टिज इस्टेट या कंपनीच्या शेअरमध्ये मंदी आली.

DHFL आपल्या कंपनीचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार होती. पण आता ते हे निकाल १३ जुलै २०१९ रोजी जाहीर करतील. या त्यांच्या निकाल जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामुळे शेअर खूपच पडला.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ८२ लाख शेअर्स सोडवले.

आज राष्ट्रीय बिमा जागरण दिवस साजरा केला गेला. आज लाईफ इंशुअरंस आणि जनरल इन्शुअरन्स या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. उदा :- HDFC लाईफ, ICICI PRU, SBI लाईफ, ICICI लोंबार्ड.

सरकार आयात केलेल्या पाम ऑइलवर १०% ड्युटी लावणार आहे. इराणला जे सोयाबीन D -ऑइल्ड केक एक्स्पोर्ट करत होतो त्या एक्स्पोर्टमध्ये घट होईल. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सोयाबीन च्या भावात घट होईल.

COX & KINGS ने कमर्शियल पेपरचे वेळेवर पेमेंट केले नाही म्हणून शेअर रेकॉर्ड लो वर बंद झाला.

नोकरी करणाऱ्या महिलांना अंदाजपत्रकात बर्याच सवलती देण्यात येतील. शैक्षणिक कर्जामध्ये ही सवलत दिली जाईल. तसेच क्रेशसाठी कारण्यात येणार्या खर्चावर टॅक्समध्ये सवलत दिली जाईल असा अंदाज आहे. यामुळे लव्हेबल लॉन्जरी, लक्स, रूपा, डॉलर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९३९४ NSE निर्देशांक निफ्टी ११७८८ बँक निफ्टी ३११०५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.९० प्रती बॅरल ते US $६६.४९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.०७ ते US $ १= Rs ६९.१५ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९६.२८ VIX १४.६४ वर होता. जपानमधील ओसाका येथे चालू असलेल्या G -२० च्या बैठकीत USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उद्या बोलणी होतील. ट्रम्प यांनी आजच स्पष्ट केले की भारताने USA मधून आयात होणाऱ्या मालावरील ड्युटी वाढवली आहे हे आपल्याला पसंत नाही.

येत्या शनीवारी होणाऱ्या ट्रम्प आनि जीन पिंग यांच्यातील वाटाघाटींकडे अवघ्या जगाचे लक्ष असेल. चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वरचे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम होत आहेत. अनिश्चितता वाढत आहे. हे जरी खरे असले तरी याच्यामुळे पेपर इंडस्ट्री, आणि केमिकल इंडस्ट्री यांना फायदा होत आहे. ज्यूट व्यवसायाला हि फायदा होत आहे. केमिकल इंडस्त्रीमध्ये ऍग्रो केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवावे. उदा. आरती, PI , विनंती, SRF, GALAXY फाईन केमिकल्स. दीपक नायट्रेट

आज सेबीने वोटिंग राईट्स, म्युच्युअल फंडांची विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक, कॅश आणि लिक्विड असेटमधील गुंतवणुक, मल्टी नॅशनल कंपन्यांना त्यांच्या भारतीय युनिट्सकडून दिली जाणारी रॉयल्टी ५% पेक्षा जास्त द्यायची असेल तर शेअरहोल्डरची मंजुरी आवश्यक असेल. तसेच तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या डिस्क्लोजर बाबतीत नवे नियम जाहीर केले. तारण म्हणून ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत आता शेअर्स तारण ठेवण्याचे कारण डिस्क्लोज करावे लागेल. म्युच्युअल फंडांबरोबर कंपन्यांनी STANDSTILL अरेंजमेंट करणे टाळावे. शेअर बाय बॅकसाठी कंसोलीडेटेड बॅलन्स शीटचा डेट इक्विटी रेशियो लक्षात घेतले जाईल.

सरकारने PSU बँकांना MSME सेक्टरला दिलेल्या लोन्सची काळजी घ्यावी. तसेच MSME ला दिलेल्या किंवा मंजूर केलेल्या लोन विषयी साप्ताहिक रिपोर्ट द्यावा.

क्रूडचा भाव वाढू लागला की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडींगचे प्रमाण वाढवण्यासाठी उत्तेजन दिले जाते. इथेनॉलचा दर वाढवला जातो. इथेनॉल उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न केले जातात. यामुळे साखर सेक्टर मधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका ज्या PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) मध्ये आहेत त्यांना PCA मधून बाहेर पडण्यासाठी Rs ३५००० कोटी भांडवल पुरवेल. यात ज्या इतर बँकांनी भांडवलाची आपली गरज व्यक्त केली होती त्यांनाही भांडवल पुरवले जाईल. सरकारची अपेक्षा आहे की हे भांडवल पुरवल्यानंतर PSU बँक एलिजिबल व्यक्तींना कर्ज देतील. आणि कर्जाचा दुष्काळ संपेल. भांडवल मिळण्याच्या यादीत यूको बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अलाहाबाद बँक यांचा समावेश असेल.

आज निफ्टीने ११९०० ला स्पर्श करताच विक्री सुरु झाली. आज एक्स्पायरी असल्यामुळे विक्री अपेक्षित होती.

उद्या पहिल्या सहामाहीचा शेवटचा दिवस तर जुलै एक्स्पायरीचा पहिला दिवस असेल. १२ जुलै पासून इन्फोसिसच्या पहिल्या तिमाहींच्या निकालानंतर कॉर्पोरेट निकालांच्या सिझनचा शुभारंभ होईल. ओपेकची मीटिंग आहे. त्यात क्रूड उत्पादनात आणखी कपात होण्याची भीती आहे. जुलै ५ २०१९ ला केंद्र सरकार संसदेत अंदाजपत्रक सादर करेल. G -२० मधील वाटाघाटींचे फलितही कळेल. त्यामुळे पुढचा आठवडा मार्केटचा दृष्टीने महत्वाचा आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५८६ NSE निर्देशांक निफ्टी ११८४१ बँक निफ्टी ३१२६९ वर वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २६ जून २०१९

आज क्रूड US $ ६५.९८ प्रती बॅरल ते US $ ६६.२३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.२७ ते US $१=Rs ६९.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३० होता.

सरकारने BSNL आणि आणि MTNL या कंपन्यांचे पुरुज्जीवन करण्याचा निश्चय केला आहे.

L & T च्या ओपन ऑफरमध्ये माईंड त्रीचे काही संस्थापक सदस्य आपला स्टेक विकण्याची शक्यता आहे.

REL इन्फ्राला वर्सोवा बांद्रा सी लिंकसाठी Rs ७००० कोटींची ऑर्डर मिळाली. हा सी लिंक रोड ५ वर्षात पूर्ण करायचा आहे.

DHFL या कंपनीने Rs २२५ कोटींचा डिफाल्ट केला.

देशातच ग्राहक डाटा स्टोअर केला पाहिजे ही अट लौकरच सौम्य होऊ शकते किंवा रद्द केली जाऊ शकते. IT मंत्रालय लवकरच डाटा प्रोटेक्शन बिल आणत आहे.

ब्रिटानिया चे मॅनेजिंग डायरेक्टर वरूण बेरी यांनी कंपनीचा राजीनामा दिला अशी बातमी आल्याने ब्रिटानियाचा शेअर पडला. ही बातमी चुकीची आहे असे कंपनीने कळवल्यावर शेअरची किमानत पूर्व पदावर आली.

इंडिया मार्टचा IPO आज २२ एप्रिल २०१९ च्या सर्क्युलरप्रमाणे जून एक्स्पायरी नंतर दुपारी २ वाजेपर्यंत ३ वेळा भरला होता.

२२ एप्रिल २०१९ च्या सर्क्युलरप्रमाणे जून एक्स्पायरी नंतर ३४ शेअर्स F &O मार्केटमधून बाहेर होतील –
अजंता फार्मा, अलाहाबाद बँक, BEML, कॅन फिन होम्स, CEAT, चेन्नई पेट्रो, DCB, गॉडफ्रे फिलिप्स, गोदरेज इंडस्ट्रीज, GSFC, IDFC, IFCI, इंडिया सिमेंट, इंडियन बँक, इन्फिबीम, IRB इन्फ्रा, जेट एअरवेज, जैन इरिगेशन, कावेरी सीड्स, कर्नाटक बँक, MRPL, NHPC, OBC, PC ज्युवेलर्स, रेपको होम फायनान्स, R पॉवर, साऊथ इंडियन बँक, सुझलॉन, सिंडिकेट बँक, टाटा कम्युनिकेशन, टी व्ही १८ ब्रॉडकास्ट , V -गार्ड , VOKHARDT.

या शेअरमध्ये वायदे बाजारात आवश्यक तेवधी नव्हती. ही शेअर्स वोलटाइल राहतील आणि  या शेअर्स मध्ये आता F &O मार्केटमध्ये नवीन पोझिशन घेता येणार नाही. पण जुनी पोझिशन क्लोज करण्यासाठी दोन महिन्याची मुदत मिळेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९५९२ NSE निर्देशांक निफ्टी ११८४७ बँक निफ्टी ३११६२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ जून २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ जून २०१९

आज क्रूड US $ ६४.२६ प्रति बॅरल ते US $ ६४.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.३२ ते US $१= Rs ६९.५२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०८ तर VIX १५.५८ होते.

हळू हळू मान्सून देशाच्या सर्व भागात प्रवेश करत आहे. G -२० चे मीटिंग २८ आणि २९ जुलैला आहे. आंतरराष्ट्रीय बातम्या मिश्र स्वरूपाच्या आहेत.

रेटिंग एजन्सीजचे डाऊनग्रेडींग सुरु आहे. लोन डिफाल्ट च्या बातम्या सुरूच आहेत. लिक्विडीटी CRUNCH आहे. प्रमोटर स्टेक विकत आहेत. त्याच बरोबर टॅक्स कलेक्शन, GST कलेक्शन चांगले आहे. LTCG करात सवलत मिळेल या आशेवर मार्केट आहे . निदान एक्झम्पशन लिमिट Rs १००००० वरून Rs २००००० होईल अशी आशा आहे.

USA चे फॉरीन सेक्रेटरी पॉम्पीओ हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. USA इंडिया ट्रेड वॉर, E- कॉमर्स डिस्प्युट यावर चर्चा होईल.

BNP पारिबस ही SBI लाईफ ची २.५ कोटी शेअर्स Rs ६५० प्रती शेअर या भावाने OFS च्या माध्यमातून विकणार असल्याने SBI लाईफ चा शेअर पडला.

IFCI त्यांचा NSE मधील २.४४% स्टेक म्हणजे १,२०, ६६८७१ शेअर्स विकणार आहे. म्हणून IFCI चा शेअर वाढला.
आज टायर शेअर्समध्ये तेजी होती कारण सरकार चीन मधून येणाऱ्या PNEUMATIC RADIAL टायर्सवर ५ वर्षांसाठी कॉउंटरव्हेलिंग ड्युटी लावणार आहे. उदा :- JK टायर्स, MRF. अपोलो, सिएट

सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या संदर्भात जी भूमिका घेतली आहि त्यामुळे पॉवर सेक्टरचे शेअर्स वाढले. उदा :- NTPC BHEL पॉवर ग्रीड REC PFC

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९४३४ NSE निर्देशांक निफ्टी ११७९६ बँक निफ्टी ३०८४७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!