Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – १५ नोव्हेंबर २०१९
आज क्रूड US $ ६१.७८ प्रती बॅरल ते US $ ६२.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७३ ते US $ १= Rs ७१.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१९ तर VIX १५.०३ होते.
आज USA च्या अधिकाऱ्यांनी चीन बरोबरचे ट्रेड डील फेज १ लवकर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारत आणि USA यांच्यामध्ये अधिकांश मुद्य्यांवर सहमती बनली आहे त्यामुळे लवकरच भारत आणी USA यांच्यात ट्रेड डील होण्याची शक्यता आहे.
आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक महत्वाचा निकाल दिला. एस्सार स्टील खटल्यात सुप्रीम कोर्टाने असे सांगितले की NCLAT COC ( कमिटी ऑफ क्रेडिटर्स ) ने घेतलेल्या निर्णयात लक्ष घालू शकत नाही किंवा त्यात बदल करू शकत नाही. सगळ्या स्टेकहोल्डर्सचे हित लक्षात घेऊन COC ने निर्णय घेतला पाहिजे. ऑपरेशनल क्रेडिटर्स (कच्च्या मालाचे सप्लायर, वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे पुरवठादार इत्यादी) आणी फायनान्सियल क्रेडिटर्स ( बँका, वित्तीय संस्था,) यांची तुलना होऊ शकत नाही. या दोन क्रेडिटर्समध्ये पैशाची वाटणी कशी करायची हा अधिकार आणी जबाबदारी COC ची आहे कारण हे फायनान्सियल डिसिजन आहे. जर नियमाप्रमाणे ३३० दिवसात रेझोल्यूशन प्रक्रिया पुरी झाली नाही तर NCLAT या साठी मुदतवाढ देऊ शकते. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आर्सेलर मित्तल यांनी एस्सार स्टील टेक ओव्हर करण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा दुसरा परिणाम म्हणजे एस्सार स्टील या कंपनीला सरकारी आणि खाजगी बँकांनी दिलेल्या कर्जापैकी ९०% कर्ज वसूल होईल. या वसुलीमुळे या खात्यासाठी बँकांनी केलेली प्रोव्हिजन रिव्हर्स करता आल्यामुळे या बँकांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल थोडे सुधारतील. या बातमीनंतर या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकाच्या शेअर्समध्ये तेजी आली आणी बँक निफ्टी ३१००० च्या पार झाली. यात SBI, IDBI बँक, कॅनरा बँक, PNB, ICICI बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक, J &K बँक, सेंट्रल बँक, लक्ष्मीविलास बँक, यांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे यामुळे क्रेडिट कल्चर सुधारेल, बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडविण्याच्या वृत्तीला आळा बसेल.
सुप्रीम कोर्टाने आज फोर्टिस हेल्थकेअरच्या सिंग बंधूंना कोर्टाच्या कंटेम्पट( अवमानना) बद्दल दोषी ठरवून Rs ११७५ कोटींचा दंड केला. तसेच फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टेक विक्रीवरील स्टे कायम ठेवला. यामुळे फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर पडला.
आज TRAI ( टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने सर्व स्टेकहोल्डर्सच्या बैठकीत IUC ( इंटरकनेक्ट युसेज चार्जेस) वर विचारविनिमय केला. हे चार्जेस १ जानेवारी २०२० पासून रद्द होणार होते. रिलायन्स जिओने मत व्यक्त केले की हे चार्जेस रद्द झाले तर टेलिकॉम ग्राहकांना स्वस्तात टेलिकॉम सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे हे चार्जेस रद्द करावेत. नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत TRAI याबाबतीत निर्णय घेईल.
DIVI’ज लॅबच्या LINGOJIGUDUM या तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.
IRCTC ने राजधानी, शताब्दी, आणि दुरांतो या गाड्यांमधील कॅटरिंग चार्जेस वाढवले. चहा Rs ३५, नाश्ता चहा Rs १४०, आणि लंच Rs २४५ अशी ही वाढ करण्यात आली. यामुळे IRCTC चे उत्पन्न वाढेल. त्यामुळे IRCTCच्या शेअरमध्ये तेजी आली.
निर्यात US $ २६.३८ BN ( US $ २६.०३ MOM ) आयात US $ ३७.३९ BN (US $ ३६.८९ BN ) होती. ट्रेड डेफिसिट US $ ११.०१ (US $ १०.८६ BN) BN होती.
UPL ह्या कंपनीने चीनची YOLOO BIOTECH ही कंपनी US $ १.३३ कोटींना खरेदी केली.
येत्या १५ दिवसात स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीजच्या शेअर्समध्ये तेजी आली.
इंडिगोने २३ A ३२० NEO ईंजिन्स बदलण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३५६ NSE निर्देशांक निफ्टी ११८९५ आणि बँक निफ्टी ३१००८ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!