Tag Archives: ASBA information marathi

आजचं मार्केट – ८ November २०२३

आज क्रूड US $ ८१.८० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ८३.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक १०५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १०५ आणि VIX ११.०४ होते.
चीनची  निर्यात ६.५% ने कमी झाली. USA मध्ये क्रूडची इन्व्हेन्टरी वाढली. क्रूडसाठी मागणी कमी झाली. .
ITDC चे प्रॉफिट,उत्पन्न, मार्जिन वाढले.
यथार्थ हॉस्पिटल प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
कॅप्टन पाईप्स, डॉलर इंडस्ट्रीजचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
SJVNला UPCL ( उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन) कडून २००MW पॉवर पर्चेस खरेदी करण्यासाठी  Rs २.५७ प्रती युनिट दराने LOE (लेटर ऑफ इन्टेन्ट) मिळाले. ही पॉवर बिकानेर सोलर प्रोजेक्टमधून घेतली जाईल.
अपोलो टायर्स चे प्रॉफिट YOY १६४.४% ने वाढून Rs ४७४.३० कोटी तर रेव्हेन्यू ५.४% ने वाढून Rs ६२८० कोटी झाला.
कमिन्स इंडिया चे प्रॉफिट YOY ३०% ने वाढून Rs ३२८.५० कोटी तर रेव्हेन्यू YOY  .६% ने वाढून Rs १९०० कोटी  झाला.
पॉवर ग्रीड चे प्रॉफिट YOY ३.६% ने वाढून Rs ३७८१.१४ कोटी तर रेव्हेन्यू YOY १% ने वाढून Rs ११२६७ कोटी झाला. कंपनीने Rs ४ प्रती शेअर इंटरींम  लाभांश जाहीर केला.
इंडिगो ची ३५ विमाने पॉवडर मेटल इशू ह्या इंजिनमधील प्रॉब्लेममुळे FY २४ च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२४) ग्राऊंडेड होतील.
नॉव्हेलिसचे मार्जिन वाढले. हिंडाल्कोचा नफा १७.५% ने वाढला तर उत्पन्न ९% ने कमी झाले.
इझी ट्रिपचा प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
प्रिन्स पाईप तोट्यातून फायद्यात आली. उत्पन्न वाढले.
झोमॅटोच्या ०.०२% इक्विटीमध्ये ( १२.६० लाख शेअर्स) Rs १२४ प्रती शेअर या दराने सौदा झाला.
KIOCL ने मंगलोरमध्ये उत्पादन युनिट पुन्हा सुरु केले.
वोल्टासला टर्म लोन दवारा Rs  ५०० कोटी उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मंजुरी मिळाली.
ल्युपिनने ‘ROCURONIUM BROMIDE हे इंजेक्शन  USA मध्ये लाँच केले.
हिंद नॅशनल ग्लास तोट्यातून फायद्यात आली.
GENSOL चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
ग्लॅन्ड फार्माच्या विशाखापट्टणम युनिटचे इन्स्पेक्शन करून USFDA ने EIR दिला. CAMS चे QOQ  प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले. कंपनीने Rs १० इंटरींम  लाभांशाची घोषणा केली.
एस्कॉर्टस कुबोटा राजस्थानात गिलोड मध्ये ग्रीनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी Rs ४०० कोटींची गुंतवणूक करून जमीन खरेदी करणार आहे.
गुजरात पिपावाव चे प्रॉफिट, उत्पन्न मार्जिन वाढले.
प्रेस्टिज इस्टेटीचे प्रॉफिट ६ पट  वाढले. उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
DCW चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले. निकाल कमजोर आले.
ताज GVK चे प्रॉफिट कमी झाले, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले निकाल कमजोर आले.
पनामा पेट्रोकेम चे प्रॉफिट,उत्पन्न, वाढले
फर्स्ट सोर्स चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
ऑटोमोटिव्ह अक्सल्स चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
कावेरी सीड्सचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
गोदरेज इंडस्ट्रीजचे प्रॉफिट, उत्पन्न कमी झाले मार्जिन वाढले.
मान इंडस्त्री तोट्यातून फायद्यात आली, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
मेगा स्टार फुड्सचे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
ग्राईंडवेल नॉर्टनचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
बोरोसिलचे प्रॉफिट. उत्पन्न, मार्जिन वाढले.
MOIL चे प्रॉफिट वाढले उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
एरिस लाईफसायन्सेस चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
रेस्टोरंट ब्रॅण्ड्स  एशिया चा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले, मार्जिन वाढले.
वोन्डरेला हॉलिडे चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
साई सिल्क चे प्रॉफिट वाढले, उत्पन्न वाढले मार्जिन वाढले.
सेंच्युरी  प्लायवूड चे प्रॉफिट वाढले उत्पन्न, मार्जिन वाढले.
EV ( इलेक्ट्रिक व्हेइकल) क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी सरकार गुंतवणूकीची मर्यादा, आयात ड्युटीमध्ये सूट देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. US $ ४०००० पेक्षा जास्त किमतीच्या कार्सवर १००% ड्युटी  तर US $ ४०००० च्या आत किंमत असलेल्या कार्सवर ७०% ड्युटी लावली जाते. जर EV उत्पादक भारतात उत्पादन करण्याची खात्री देत असेल तर अशा कंपन्यांना सवलत दिली जाईल. PLI, फेम, आणि ACC योजनांचा फायदा देण्याचा प्रस्ताव आहे.
महिंद्रा एअरोस्पेस ही M & M ग्रुपची कंपनी एअरोप्लेन्स उतपादन करण्याच्या बिझिनेस बंद करणार आहे.
रेमंड चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
CESC चे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले.
रुचिरा पेपर्सचे प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन कमी झाले.
 टीमलीजचे QOQ प्रॉफिट उत्पन्न वाढले मार्जिन कमी झाले.
SMS फार्माचे प्रॉफिट उत्पन्न वाढले.
अडाणी ग्रीन Rs १४००० कोटी गुंतवणूक करून त्याची क्षमता १४GW करणार आहे.
आयडिया फोर्ज चे प्रॉफिट कमी झाले उत्पन्न कमी झाले मार्जिन कमी झाले.
सालासार  टेक चे प्रॉफिट, उत्पन्न वाढले.
सार्थक मेटल्सचे प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झाले.
GENUS पॉवरला  Rs २२६० कोटींची ऑर्डर मिळाली.
आज OMC, पेंट्स, फार्मा, ऑटो, FMCG, मिडकॅप स्माल कॅप मध्ये खरेदी तर IT आणि बँकिंग मध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.
माझगाव डॉक्स चे प्रॉफिट ५६% ने वाढूनRs ३३३ कोटी रेव्हेन्यू ७%ने वाढून Rs १८२८ कोटी तर मार्जिन वाढून ९.७% झाले. Rs १५.३४प्रती शेअर लाभांश नोव्हेंबर २० रेकॉर्ड डेट  निश्चित केली आहे.
टाटा पॉवर चे YOY ७% वाढून Rs ८७६ कोटी झाले. रेव्हेन्यू YOY १२% ने वाढून Rs १५७३८ कोटी झाले. मार्जिन १९.६% होते. कंपनी ग्रीन सोलर सेल, आणि मोड्यूल मॅन्युफॅक्चरिंग ह्या नवीन क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित करत आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ६४९७५ NSE निर्देशांक निफ्टी १९४४३ बँक निफ्टी ४३६५८ वर बंद झाले

Bhagyashree Phatak

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !

भाग 60 – ASBA म्हणजे नक्की काय?

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Share Market terms in marathiगेल्या एका समालोचनात मी ‘ASBA’ या शब्दाचा उल्लेख केला आणि तुम्हाला हे हि सांगितलं कि त्याची माहिती नसल्यामुळे माझी कशी फजिती झाली. तशी तुमची होवू नये म्हणून हा भाग प्रकाशित करतीये.ASBA म्हणजेच APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT. ASBA म्हणजेच ज्याद्वारे बँकेला IPO, FPO, राईट्सच्या अर्जावर लिहिलेली रक्कम तुमच्या बचत/चालू खात्यामध्ये ब्लॉक करण्याचा अधिकार देण्यांत येतो. ही प्रक्रिया SEBI ने विकसित केली आहे. याचा उपयोग सध्या तरी IPO, FPO, आणी राईट्स इशूसाठी करण्यांत येतो.
उद्देश
शेअरमार्केटमध्ये जास्तीतजास्त लोक यावेत, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यांत, किरकोळ ग्राहकांपर्यंत शेअरमार्केटची संकल्पना पोहोचावी हा या मागचा उद्देश आहे. पूर्वी किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स मिळत नसत. दोन लाखाचा अर्ज केल्याशिवाय शेअर्स मिळणे कठीण आणी जर इशू भरला नाही तर भरपूर शेअर्स देत. चेक पास झालेल्या दिवसापासून रक्कम पुन्हा खात्याला जमा होईपर्यंतच्या काळांत त्या रकमेवरचे व्याज मिळत नसे. चेक भरताना काही चूक झाली, किंवा सही चुकीची झाली, चेक फाटला तर बँक दंड आकारत असे आणी शेअर्सही मिळत नसत. या अडचणी लक्षांत घेवून SEBI ने ASBA ही प्रक्रिया विकसित केली.
कोण अर्ज करू शकतो
(१) सर्व गुंतवणूकदार ASBA योजेतून अर्ज करू शकतात. किरकोळ गुंतवणूकदार, QIB (QULIFIED INSTITUTIONAL BUYERS) NII( NON INSTITUTIONAL INVESTORS) अर्ज करू शकतात.
(२) राईट्स इशुच्या बाबतीत ज्यांची नावे DEMAT अकौंटमध्ये असतील ते अर्ज करू शकतात. DEMAT खात्यामध्ये शेअर आहेत पण कंपनीने ऑफर केलेल्या शेअर्सपेक्षा जास्त शेअर्ससाठी अर्ज करत असाल. स्वतःला राईट्स मध्ये ऑफर झालेले शेअर्स (ENTITLEMENT) पूर्णपणे किंवा अंशतः RENOUNCE केले नसतील तर अर्ज करू शकता. RENOUNCEE(ज्या माणसाच्या नावाने RENOUNCE केले असतील) अर्ज करू शकत नाही.
प्रक्रिया
SCSB (SELF CERTIFIED SYNDICATE BANKS) मधूनच अर्ज करता येतात.या बॅंका आणी त्यांच्या कोणत्या शाखा SCSB म्हणून काम करतात त्यांची यादी BSE NSE आणी SEBI यांच्या वेबसाईटवर मिळते.त्या पुढीलप्रमाणे
BSE :- WWW.bseindia.com , NSE :- WWW.nseindia.com, SEBI :- WWW.sebi.gov.in
या बॅंका SEBIचे नियम पाळतात. अर्ज स्वीकारतात, अर्जाची छाननी करतात, आवश्यक ती रक्कम खात्यामध्ये ब्लॉक करतात आणी सर्व माहिती संगणकाच्या बिडिंग PLATFORM वर अपलोड करतात. ALLOTMENT झाल्यानंतर जेवढे शेअर्स ALLOT झाले असतील तेवढी रक्कम अर्जदाराच्या खात्याला डेबिट करून ती रक्कम इशूअरला ट्रान्स्फर करतात. आणी उरलेली रक्कम अनब्लॉक (UNBLOCK) करतात. इशू WITHDRAWN केला किंवा FAIL गेला तरी रक्कम अनब्लॉक केली जाते. अर्जांत लिहिली असेल तेवढीच रक्कम ब्लॉक होते खात्यांत असलेली उरलेली रक्कम तुम्हाला हवी तशी तुम्ही वापरू शकता.
ASBA फॉर्म जेथे देतात तेथे DEMAT अकौंट असण्याची गरज नाही. जर तुमचा DEMAT अकौंट बँकेत असेल तर ASBA अकौंट त्याच बँकेत असण्याची गरज नाही. जर डेटा देण्यामध्ये गुंतवणूकदाराची चूक असेल तर गुंतवणूकदार जबाबदार असतो आणी SCSBची चूक असेल तर SCSB जबाबदार असते. तुम्ही फॉर्म बरोबर भरला आहे तरीही रिजेक्ट झाला तर प्रथम SCSB कडे तक्रार करावी. त्यांनी १५ दिवसांत उत्तर दिले पाहिजे. पंधरा दिवसांत उत्तर दिले नाही किंवा पंधरा दिवसांत दिलेल्या उत्तराने तुमचे समाधान झाले नाही तर SEBI कडे किंवा रजिस्ट्रार टू द इशूकडे तक्रार करा. SEBI कडे तक्रार खालील पत्त्यावर करावी.
INVESTOR GRIEVENCES CELL
OFFICE OF INVESTOR ASSISTANCE AND EDUCATION
SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA
PLOT NO. C -4 A, ‘G’ BLOCK
BANDRA KURLA COMPLEX, BANDRA EAST MUMBAI 400051
तुम्ही दिल्लीला काही कामासाठी गेला असाल पण तुमचा अकौंट मात्र मुंबईच्या शाखेत असेल तर तुम्ही दिल्लीतही अर्ज देऊ शकता. फक्त त्या बँकेत CORE-BANKING FACILITY असली पाहिजे. आणी ती शाखा DESIGNATED branch असली पाहिजे. तुम्ही फॉर्म फिजीकल किंवा ऑनलाईन भरू शकता. एका खात्यातून वेगवेगळ्या नावावर भरलेल्या पांच IPOच्या अर्जासाठी रकम ब्लॉक केली जाऊ शकते.फॉर्मवर मात्र PAN नंबर. DPID CLIENT ID, ASBAA खाते नंबर आणी ASBA खात्यावर केली असेल तशी स्पेसिमेन (नमुना) सही असणे जरुरीचे आहे.
तुम्हाला bid WITHDRAW करायची असेल तर बिडिंग पिरिअड सुरु असताना योग्य प्रकारे विनंती अर्ज करून अर्जावर APPLICATION नंबर TRS नंबर आणी सही करून तो अर्ज तुम्ही त्याच बँकेत द्यावा. म्हणजे SCSB तुमचे Bid DELETE करेल व लगेचच रक्कम अनब्लॉक करेल.परंतु बिडिंग पिरिअड संपल्यानंतर पण ALLOTMENTच्या आधी WITHDRAWALसाठी विनंती रजिस्ट्रारकडे करावी लागते.रजिस्ट्रार बीड रद्द करेल, SCSBला अर्जाची रक्कम अनब्लॉक करायला सांगेल, ALLOTMENT ची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमची रक्कम अनब्लॉक होईल.
फायदे
(१) अर्जावर लिहिलेली रक्कम ब्लॉक होते पण त्यावरील व्याज मिळत राहते.
(२) रिफंड वेळेवर मिळेल कां ? ही काळजी करावी लागत नाही.
(३) चेक रिटर्न गेल्यामुळे होणारे नुकसान टळते
(४) या सर्व प्रक्रीयेमध्ये बँक मध्यस्थ म्हणून काम करत असल्यामुळे विश्वासार्हता आहे.
अशाप्रकारे ASBA ही पद्धत साधी सोपी फायदेशीर वेळेची आणी खर्चाची बचत करणारी आणी आधुनिक आहे. १ जानेवारी २०१६ पासून ASBA ही प्रक्रिया IPOमध्ये अर्ज करण्यासाठी अनिवार्य ( MANDATORY) करण्यांत आली आहे. सेबी नवनवीन सुधारणा करीत आहे परंतु या सुधारणा ज्या बँकेत उपलब्ध असतील अशाच बँकेत तुम्ही अकौंट उघडावा म्हणजे IPO मध्ये अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
 

आठवड्याचे समालोचन – २५ एप्रिल ते २९ एप्रिल – पास/नापास

आधीच्या आठवड्याचं समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
thumbs-up-1172213_640शुक्रवारी मार्केटच्या दृष्टीने एप्रिल महिन्याचा शेवट झाला. वार्षिक निकालांचा मोसम सुरु होऊन एक महिना होत आला. सोमवारपासून मे महिना सुरु होईल. ज्या कंपन्या /जे शेअर्स पास झाले, ज्यांचे रिझल्ट्स चांगले आले त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती लगेच वाढल्या. ज्यांचे निकाल खराब आले ते शेअर्स धोपटले गेले. दरवेळी लाभांश किती जाहीर होईल ही उत्सुकता असते. परंतु या वर्षी १० लाखावरील DDT मुळे बहुतेक कंपन्यांनी लाभांश, अंतरिम लाभांश म्हणून ३१ मार्चपूर्वी जाहीर करून दिले सुद्धा. ज्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले पण त्या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव पडला अशा कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे निरीक्षण केल्यास असे आढळले की ह्या कंपन्यांचे रिझल्ट चांगले येणार हे मार्केटने गृहीतच धरले होते. त्यामुळे शेअरच्या किंमतीत त्याचा समावेश होता हेच खरे.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

  • या आठवड्यांत बँक ऑफ जपान आणी आणी USA मध्ये FOMC ची अशा दोन बैठका झाल्या. FOMC ने आणी बँक ऑफ जपानने आपल्या व्याजदरात तसेच वित्तीय धोरणांत कुठलाही बदल केला नाही.त्यामुळे जपानचे आणी USA चे मार्केट पडले आणी त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झाला. तेजीत असलेल्या मार्केटला ग्रहण लागले असे म्हणावे लागेल.
  • USA मधील क्रूड चा साठा कमी झाल्यामुळे क्रूडचे भाव वाढू लागले आहेत. क्रुडचे भाव आठवड्याच्या शेवटी US $ ४८.८ वर गेले

सरकारी announcements

  • संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात जास्त काही काम होणार नाही हे मार्केटने गृहीत धरले आहे. BANKRUPTCY बिल पास होईल असा अंदाज आहे. केंद्र सरकार टेक्स्टाईल धोरण जाहीर करेल.
  • डायव्हेस्टमेंट डीपार्टमेंटचे नाव बदलून (DIPAM) डीपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट and पब्लिक ASSET MANAGEMENT असे ठेवले. हा विभाग SUUTI च्या सर्व प्रकरणांची काळजी घेईल.
  • तंबाखू आणी तम्बाखुशी संबंधीत उद्योगांत FDI ला बंदी करणार आहेत. याचा परिणाम ITC, GODFREY फिलिप्स, गोल्डन TOBACO, VST इंडस्ट्रीज या कंपन्यांवर होईल.
  • सरकारच्या ‘उजाला योजनेंअतर्गत आणी मेक-इन-इंडियाच्या अंतर्गत २० कोटी LED बल्ब बसवणार आहे. याची ऑर्डर सूर्या रोशनी आणी HAVELLS या कंपन्याना मिळण्याची शक्यता आहे. सूर्या रोशनीने SNAPDEAL बरोबरही करार केला आहे. त्यामुळे या दोन्ही योजना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील..
  • सरंक्षणसंबंधी कंपन्यांतही ४९% FDI ला मंजुरी देण्याचा सरकार विचार करीत आहे.
  • सरकारने NHPCच्या शेअर्सची OFS (ऑफर फॉर सेल) किरकोळ गुंतवणूकदाराशिवाय बाकीच्या गुंतवणूकदरांसाठी Rs २१.७५ प्रती शेअर या भावाने २७ एप्रिल २०१६ आणली. किरकोळ गुंतवणूकदारांना या किंमतीवर ५% सूट दिली जाईल. आणी ते २८ एप्रिल २०१६ रोजी या OFS मध्ये सहभागी होऊ शकतील.
  • HMTची तोट्यांत चालणारी तीन युनिट्स बंद केली जाणार आहेत. त्यामुळे ITI ला सुद्धा पुनरुज्जीवित केले जाईल असा अंदाज आहे. HOCL( हिंदुस्थान ऑर्गनीक केमिकल्स लिमिटेड) या कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे सरकारने जाहीर केले आहे.
  • चीनमधून आयात होणाऱ्या टेलिकॉम इक्विपमेंट SDH वर ८६.५९% ANTIDUMPING ड्युटी लावली इस्त्रायल मधून आयात होणाऱ्या या इक्विपमेंटवर थोडी कमी ANTIDUMPING ड्युटी लावली आहे. ही ड्युटी ५ वर्षांसाठी लावली आहे.
  • सरकारने साखरेच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी STOCK LIMIT लावायचे ठरवले आहे. साखर उत्पादकांनी यासाठी पंतप्रधानांची भेट घेवून एक महिन्याची मुदत देण्याची विनंती केली. त्यामुळे साखरेच्या किंमतीत तेजी आली. सरकारने राज्य सरकारांना साखरेचा पुरवठा, वितरण, साठवणूक, आणी किंमत याबाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार दिले.सरकारने साखर उत्पादकांची विनंती मान्य केली नाही आणी STOCK लिमिट ठरवले.
  • MCA21 ह्या पोर्टलचे काम सरकारने ‘इन्फोसिस’ला दिले होते. या पोर्टलच्या वर्किंगमध्ये काही अडचणी येत असल्याबद्दल सरकारने इन्फोसिसला जबाबदार धरले आहे.
  • एअर इंडियाला फायदा व्हावा या उद्देशाने सरकारने विमानाच्या इंधनाचे दर खूपच कमी केले. तेवढ्या प्रमाणांत पेट्रोल आणी डीझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत त्यामुळे विमानकंपन्यांचा फायदा झाला.
  • सरकारने OIL(ओईल इंडिया लिमिटेड),मध्ये १०% तर NFL (NATIONAL FERTILIZERS लिमिटेड) मध्ये १५% तर RCF (राष्ट्रीय केमिकल्स आणी fertilizers) मध्ये ५% डायव्हेस्टमेंट करणार आहे.
  • मुंबई महापालिकेने व्यापारी आणी राहती घरे बांधण्यासाठी अनुक्रमे ५ आणी २ असा FSI करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईमध्ये ज्या बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांकडे LANDBANK आहे अशा कंपन्यांचे शेअर्स वधारले

अर्थव्यवस्थेच्या गोष्टी

  • आपण जरी शेअरमार्केटमध्ये व्यवहार करीत असलो तरी कमोडीटी मार्केटकडेही लक्ष ठेवावे.या आठवड्यांत सोने,चांदी, तसेच इतर धातू यांचे भाव वाढले. ज्यावेळी सोन्याचा भाव वाढू लागतो त्यावेळी इक्विटी मार्केट पडण्याची चिन्हे दिसू लागतात. सोन्यामध्ये आपली गुंतवणूक जास्त सुरक्षित आणी फायदेशीर आहे असे लोकांना वाटू लागते. सध्या लग्नसराईसुद्धा चालू आहे त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याचे मार्केटमधील अस्थिरता हे एकच कारण नव्हे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

  • रिलायंस इंडस्ट्रीज, रेमंड, व्होल्टास लिमिटेड, महिंद्र आणी महिंद्र फायनांस, भारती इन्फ्राटेल, RALLIES इंडिया, बायोकान रेमिडीज, सिनजेन लिमिटेड, इंडूस इंड बँक, यस बँक, लक्ष्मी बँक, अक्सिस बँक, मारुती यांचे वार्षिक निकाल चांगले आले. परंतु अक्सिस बँकेने भविष्यासाठी गायडंस निराशाजनक दिल्यामुळे शेअर पडला. झेनसार टेक्नोलॉजीज, पर्सिस्टंट टेक्नोलॉजीज,HCL TECH या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.
  • VOLKSWAGEN या कंपनीने भविष्यासाठी चांगला गायडंस दिला नाही. त्यामुळे त्यांना स्पेअर पार्टस पुरवणाऱ्या मदरसन सुमी या कंपनीचा शेअर पडला.
  • सनफार्मा या कंपनीने मध्य प्रदेशच्या राज्यसरकारबरोबर मलेरिया निर्मुलनासाठी औषध शोधणे, त्याचे उत्पादन करणे यासाठी करार केला. या कराराचा नकारात्मक परिणाम इप्का lab या दुसऱ्या फार्मा कंपनीच्या बिझीनेसवर होईल. कारण भारतांत सर्वत्र मलेरियासाठी इप्का lab तयार केलेले औषध वापरले जाते.
  • गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट ह्या कंपनीला २५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे ती विशेष लाभांश जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • RCF या सरकारी क्षेत्रातील खत उत्पादन करणाऱ्या कंपनीला लागणारी बरीच केमिकल्स सरकारच्या ANTIEDUMPING ड्युटीच्या यादीमध्ये आली.
  • भारती एअरटेल, फोर्स मोटर्स, सनोफी, अतुल ऑटो, डाबर, मेरिको, कॅन फिना होम्स, कजारिया सेरामिक्स, ACC या कंपन्यांचे रिझल्ट्स चांगले आले.
  • ICICI बँकेचे रिझल्ट्स चांगले आले परंतु त्यांनी रिझर्व बँकेच्या सुचनेप्रमाणे NPA साठी पूर्णपणे प्रोविजन केलीच पण Rs ३६०० कोटींची भविष्यांत येणार्या CONTINGENCIES साठी प्रोविजन केली. त्यामुळे त्यांचे प्रॉफिट कमी झाले. मार्केटने त्यांनी केलेली अतिरिक्त प्रोविजन हा भविष्यासाठी इशारा असल्याचा विचार केला. यामुळे शेअर पडला.

सेबी, RBI आणी इतर प्रशासनिक संस्था

  • यु को बँक आणी आय ओ बी या दोन बँकांना १ जुलै २०१६ पासून वायदा बाजारातून वगळले आहे.

कॉर्पोरेट एक्शन

  • भारती इन्फ्राटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी शेअर बाय back जास्तीतजास्त Rs ४५० प्रती शेअर या भावाने करेल. यासाठी कंपनीने Rs २००० कोटींची रक्कम निश्चित केली आहे.
  • भारती एअरटेल या कंपनीने शेअर्स buyback जाहीर केले. शेअर buyback साठी Rs ४०० ही जास्तीतजास्त किंमत आणी कंपनी Rs १४३४ कोटी एवढ्या रकमेपर्यंत buyback करेल असे जाहीर केले.या आठवड्यात मार्केटनी आपल्याला काय शिकवलं

या आठवड्यांत उघडणारे IPO

  • या आठवड्यांत THYROCAREचा IPO २७ तारखेला उघडून २९ तारखेला बंद झाला. IPO तिसऱ्या दिवशी ७३ वेळेला ओवरसबस्क्राईब झाला.
  • उज्जीवनचा IPO २८ तारखेला उघडून २ मे २०१६ ला बंद होत आहे. पहिल्या दोन दिवसांत या IPOला चांगला प्रतिसाद मिळाला.
  • व्होडाफोन (इंडिया) ने आपला IPO आणण्याची तयारी सुरु केली आहे.

यावेळी आलेला अनुभव तुम्हाला त्याचप्रमाणे मलाही नवीनच. थायरोकेअर IPO चा फॉर्म भरायचा होता. मला माझ्या ब्रोकरकडून फोन आला.MADAM, यावेळी IPO चा फॉर्म भरायचा असेल तर तुमचा ASBA अकौंट यादीत असलेल्या बँकेतच असला पाहिजे.पण त्या यादींत ६ बँकांचाच समावेश होता प्रथम माझ्या ओळखीत जे लोक IPO चा फॉर्म भरणार होते त्यांना कळवले. आता यावर उपाय काय या विचारांत असतानाच साधारण संध्याकाळी ६ वाजता पुन्हा ब्रोकरच्या ऑफिसमधून फोन आला की आता २४ बॅंकामधील अकौंट ASBA म्हणून स्वीकारले जातील. त्यामुळे बऱ्याच जणांची सोय झाली अमरावतीहून मला एका गुंतवणूकदाराचा फोन आला.त्याचा अकौंट ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मध्ये होता.बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव या २४ बँकांच्या यादीतही नव्हते..पण यावर एकच उपाय मला सुचला आणी मला माझ्या ब्रोकरनेही तोच उपाय सुचवला.
ज्या माणसाचा अकौंट त्या २४ बँकांच्या यादीमध्ये असलेल्या बँकेत असेल अश्या माणसाचा अकौंट नंबर तुम्ही ASBA अकौंट म्हणून लिहू शकता. याच बरोबर त्या व्यक्तीचा अकौंट नंबर. बँकेचे नाव, पत्ता आणी त्याने ज्या प्रमाणे त्याच्या अकौंट मध्ये स्पेसिमन सही केली असेल तशी सही करणे जरुरीचे आहे. तुम्ही त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये IPO चा फॉर्म देण्याआधी पैसे आहेत याची खात्री करून घ्यावी. .अशा तऱ्हेने एका तिसऱ्या माणसाच्या ASBA खात्यामधून एका कंपनीच्या IPOसाठी ५ फॉर्मसाठी पैसे भरू शकता. एक मात्र लक्षांत ठेवा की DEMAT अकौंट नंबर तसेच DEMAT अकौंटमधील सहीच्या जागी सही मात्र तुमचीच असली पाहिजे. अशी व्यवस्था केल्यास IPO मध्ये अर्ज करण्याची संधी हुकणार नाही. समजा ‘अ’ चा अकौंट बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे नाव त्या यादीत नाही. तो ‘ब’ कडे गेला ‘ब’ चा अकौंट स्टेट बँकेत आहे. स्टेट बँकेचे नाव त्या यादीत आहे . अशा वेळी ‘ब’ चा स्टेट बँकेतील अकौंट नंबर,बँकेचा पत्ता, फॉर्मवर लिहायला हवा. ASBA अकौंट होल्डर म्हणून ‘ब’ ने फॉर्मवर सही केली पाहिजे. ‘ब’ च्या अकौंटमध्ये तेवढे पैसे असतील तर ते BLOCK केले जातील. आपोआपच तेवढे पैसे ‘ब’ ला देण्याची जबाबदारी ‘अ’ ची असते. पण शेअर्स मात्र अ च्या DEMAT अकौंटमध्ये जमा होतील.हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आहे तरीसुद्धा अशा व्यवहारांत एकमेकांवर विश्वास असणे महत्वाचे आहे.
कोणतीही समस्या आल्यास त्यावर काही पर्याय आहे कां याची चौकशी करावी किंवा IPO च्या फॉर्मवर पाठीमागच्या बाजूस दिलेल्या रजिस्ट्रारशी संपर्क साधावा. नाहीतर सेबीच्या साईटवर जाऊन पहावे. आपल्या समस्येचे समाधान करून घेतले पाहिजे. हातावर हात ठेवून बसल्यास उत्तर मिळत नाही. वेळेवर शहाणे व्हावे आणी इतरांनाही शहाणे करावे. शेअरमार्केट मधील वातावरण सतत फार वेगांत बदलत असते तेव्हा ही प्रसंगावधानता आपण अंगी बाणवलीच पाहिजे.
BSE सेन्सेक्स २५६०७ आणी निफ्टी ७८५० वर बंद झाले.