Tag Archives: Bhagyashree Phatak

आजचं मार्केट – ४ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ४ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४३.६७ प्रती बॅरल ते US $ ४४.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.१३ ते US $१= Rs ७३.३७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.७७ VIX २१.७१ आणि PCR १.३० होते. आज USA च्या मार्केट्स मध्ये दबाव होता. टेक शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले. आशियाई मार्केटमध्येही दबाव होता.

माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँका आणि NBFC ना सांगितले की त्यांनी १५ दिवसाच्या आत रेझोल्यूशन प्लॅन तयार करावा. कोविड १९ आणि लॉक-डाऊन चा प्रभाव झालेल्या उद्योगांना हा प्रभाव नसता तर त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या क्रेडिट नीड्सची काळजी घ्यावी. उद्योगांना शक्यता सर्व मदत करावी. आज रिस्ट्रक्चरिंग वर कामत समितीचा अहवाल RBI ला सादर केला जाईल.

इन्फोसिसने कॅलिडिओस्कोप इनोव्हेशन्स ही IT क्षेत्रातील कंपनी US $ ४२ मिलियन्सला खरेदी केली.

5 पैसा.COM ही कंपनी राईट्स इशूद्वारे Rs ९०० कोटी उभारेल. प्रीकॉल ही कंपनी राईट्स इशू द्वारे Rs १०० कोटी उभारेल.

सरकारी कंपनी EESL कडून २५० EV ची ऑर्डर टाटा मोटर्सला मिळाली. टाटा मोटर्सने HARRIER चे नवे व्हेरियंट Rs १७ लाख किमतीला लाँच केले. टाटा मोटर्सच्या JLR विक्रीत १३.८% तर लँडरोव्हरच्या विक्रीत २१% वाढ झाली. आज टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी होती.

सिप्रोफ्लोक्सासिन या चीन मधून आयात होणाऱ्या औषधांवर ६ महिन्यांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली. ही ड्युटी US $०.९४ प्रती KG ते US $ ३.२९ प्रती KG या रेंज मध्ये लावली ड्युटीचा दर चीनमधून आयात होते की चीनमध्ये उत्पादन होऊन आयात होते त्यावर अवलंबून असेल.

वोडाफोन आयडिया आपले फायबर ऍसेट्स विकण्याची शक्यता आहे. KKR आणि इतर ग्लोबल इन्व्हेस्टरनी यात स्वारस्य दाखवले आहे. याची व्हॅल्यू US $ १.२ बिलियन आहे.

ITC ने सांगितले की त्यांच्या ऍग्री बिझिनेस मध्ये चांगली ग्रोथ आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि शक्य तिथे कॉस्टसेविंग करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या हॉटेल्स,सिगारेट्स आणि पेपरबोर्ड्स बिझिनेसवर कोविड १९ आणि लॉक-आउट्स चा परिणाम झाला. हॉटेल्स बिझिनेसमध्ये आम्ही ऍसेट लाईट धोरण अवलंबत आहोत. ITC ही सरकारला उत्पन्न देणारी भारतातली तिसऱ्या नंबरची मोठी कंपनी आहे.

स्क्रॅप इन्सेन्टिव्ह आणि GST मध्ये कपात या दोन मार्गांनी सरकार मागणी वाढण्यासाठी मदत करू शकेल.असे मारुतीने सांगितले. आज माननीय कॉमर्स मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की कंपन्यांनी त्यांच्या परदेशी पार्टनरला द्याव्या लागणाऱ्या रॉयल्टीमध्ये कपातीसाठी बोलणी करावीत. सरकार लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी आणेल असे सांगितले.

कन्साई नेरोलॅक ही पेंट उद्योगातील १०० वर्षे जुनी कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः इंडस्ट्रियल पेंट्सचे उत्पादन ( ऑटो,व्हाइट गुड्स, इन्फ्रा) करते. कंपनी गुजराथ आणि अमृतसरमध्ये नवीन प्लांट्स लावणार आहे. कंपनीने सांगितले की सौंदर्याबरोबरच आम्ही आता हेल्थ प्रोटेक्टिव्ह,अँटीबॅक्टरीयल पेंटस्चे उत्पादन करत आहोत. तसेच पॉवडर कोटिंग आणि ऍडेसिव्हज च्या उद्योगात डायव्हर्सिफिकेशन करण्याची शक्यता आहे. आम्ही बांगलादेश,नेपाळ, आणि श्रीलंका यांच्यात निर्यात करत आहोत. आम्हाला भविष्य उज्वल दिसत आहे पण कोरोनामुळे अस्थिर वाटत आहे. जशी जशी अर्थव्यवस्था अन-लॉक होईल ,उद्योग वाढतील तसे आमचे उत्पादनाला मागणी येईल.

सरकार आजारी PSU ची मालमत्ता विकून टाकणार आहे. HOCL, स्कुटर्स इंडिया आणि इतर आजारी PSU ची जमीन लँड मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनकडे सुपूर्द केली जाईल. ही ऑर्गनायझेश जमीन डेव्हलप करायची की लीजवर द्यायची किंवा विकून टाकायची या बाबत निर्णय घेईल.

फोर्स मोटर्सची विक्री आणि निर्यात दोन्हीतही वाढ झाली.

L & T च्या डिफेन्स आर्मला पिनाक वेपन सिस्टीम बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

स्टॉक एक्सचेंजेस ने १५ सप्टेंबरपर्यंत मार्जिन शॉर्टफॉल साठी ब्रोकर्सना लागणारी पेनल्टी स्थगित ठेवली.

USA मधील नॉनफार्म पेरोल चे आकडे आणि इन्फ्लेशनचे आकडे येतील. त्यांच्याकडे मार्केटचे लक्ष असेल.

ROUT मोबाईल चा Rs ६०० कोटींचा IPO ९ सप्टेंबर २०२० ला ओपन होईल. याचा प्राईस बँड Rs ३४५ ते Rs ३५० आहे.

७ सप्टेंबर २०२० पासून दिल्ली आणि इतर शहरात सोशल डिस्टंसिंग, मास्क, कोविड तपासणीचे नॉर्म्स पाळून मेट्रो सुरु होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८३५७ NSE निर्देशांक निफ्टी ११३५६ बँक निफ्टी २३०७७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४३.६५ प्रती बॅरल ते US $ ४४.५० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७३.२५ ते US $१=Rs ७३.४८ तर US $ निर्देशांक ९२.८० VIX २१.११ आणि PCR १.३१ होता.

आज सुप्रीम कोर्टात ‘व्याजावर व्याज’ याचिकेची पुढील सुनावणी झाली. कोर्टाने सांगितले की २ महिने कोणतेही कर्ज NPA होणार नाही. सरकारने पैसे भरण्यासाठी किंवा भरले नाहीत म्हणून कोणावरही कारवाई करू नये. कोर्टाने असेही सांगितले की सर्व बाबी बँकांवर सोडू नयेत कर्जदारांना मोरटोरियमच्या काळातील आउटस्टँडिंग रक्कम भरण्यासाठी ३ महिने दिले जातील. त्या अवधीत जर हे पैसे भरले नाहीत तर कर्ज NPA करण्यात येईल. रिस्ट्रक्चरिंग साठी नेमलेल्या कामत कमिटीचा अहवाल पुढील आठवड्यात येईल.या बाबत पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होईल.

आज सरकारने आम्रपालीच्या ८ आणि युनिटेक च्या १३ अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी NBCC ला SWAMIH कार्यक्रमांतर्गत Rs २५०० कोटी दिले जातील असे सांगितले.या प्रोजेक्ट प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, NCR, चेन्नई पुणे येथील आहेत

हॅप्पीएस्ट माईंड या IT क्षेत्रातील २०११ साली बंगलोर येथे स्थापन झालेल्या कंपनीचा Rs ७०२ कोटींचा IPO ७ सप्टेंबर २०२० रोजी ओपन होऊन ९ सप्टेंबर २०२० रोजी बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs १६५-Rs १६६ असेल.मिनिमम लॉट ९० शेअर्सचा असेल. श्री अशोक सुटा या IT क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या कंपनीचे प्रमोटर्स आहेत. कंपनी डिजिटल बिझिनेस, प्रॉडक्ट इंजिनीअरिंग, इन्फ्रास्ट्रकचर आणि मॅनेजमेंट सिक्युरिटी सर्व्हिसेस, एज्युकेशन, हेल्थकेअर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी सोल्युशन या बिझिनेस मध्ये आहे. कंपनीचा ९७% बिझिनेस डिजिटल आहे. या कंपनीचा बिझिनेस USA UK ऑस्ट्रेलिया आणि मिडल इस्टमध्ये आहे.याचा परिणाम IT क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी येण्यात झाला.

CAMS ( कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिस) चा Rs १५०० कोटींचा IPO या वर्षी येणार आहे.या IPO मध्ये NSE त्यांचा १२.५% स्टेक OFS मधून विकणार आहे. NSE चा या कंपनीत ३७.५% स्टेक आहे. सेबी ने NSE ला हा स्टेक डायव्हेस्ट करायला सांगितला आहे. तसेच NSE या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नॉमिनेट केलेला डायरेक्टर परत बोलावणार आहे.

सरकार युरोपियन युनियन, बेलारूस, युक्रेन, पेरू, येथून भारतात आयात होणाऱ्या ऍक्रिलिक फायबरवर ५ वर्षांपर्यंत US $११४.९७/ टन ते US $२१२.९८/टन अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याच्या विचारात आहे. हे फायबर ट्रॅक सूट, ग्लोव्हज, कारपेट बनवण्यासाठी वापरतात.

दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंत अंडी आणि कोंबड्यांचा खप ७०% पर्यंत वाढला तो पुढील महिन्यात ९०% पर्यंत वाढेल.याचा फायदा वेंकीज, गोदरेज अग्रोव्हेट या कंपन्यांना होईल.

सौदी अरेबिया आणि UAE मधून येणाऱ्या फ्लेक्सिबल स्लॅब पोलीओल याच्यावर सरकारने US $१०१.८१/टन ते २३५.०२/टन अँटी डम्पिंग ड्युटी लावावी अशी शिफारस DGTR ने केली.याचा फायदा मनाली पेट्रोला होईल.

हेक्झावेअरच्या डीलीस्टिंग ऑफरसाठी बीड ९ सप्टेंबर २०२० रोजी ओपन होऊन १५ सप्टेंबरला बंद होईल. १७ सप्टेंबरपर्यंत कौंटर बीड येउ शकते. याची इंडीकेटीव्ह प्राईस Rs २८५ आहे.

HUL ने जाहीर केले की त्यांच्या क्लिनिंग आणि लाँड्री ब्रॅण्ड्स जसे सर्फ, सनलाइट, व्हिम, डोमेक्स यासाठी आतापर्यंत फॉसिल फ्युएल वापरले जात होते. आता त्याऐवजी प्लांट्स, मरीन, सोर्सेस लाईक ALGAE वापरले जाईल. हे ग्रीन मूव्ह फॉर क्लीन फ्युचर कार्यक्रमाखाली आहे.

रिलायन्स आणि फ्युचर यांच्या जो करार झाला त्याच्यातील नॉनकॉम्पिटिशन क्लॉज प्रमाणे बियाणी १५ वर्षापर्यंत हा बिझिनेस( रिलायन्सने विकत घेतलेल्या बिझिनेसशी स्पर्धा करणारा) करू शकणार नाहीत सामान्यतः ही अट ३ ते ५ वर्षांसाठी असते.  प्राक्सिस रिटेल होम ही बियाणींची कंपनी होम रिटेलचा व्यवसाय करते. होम टाऊन स्टोअर हे या कंपनीचे उत्पादन आहे या कंपनीचे अस्तित्व कायम ठेवले आहे. ह्या कंपनीची ४८ होम टाऊन स्टोर्स आहेत.

व्होडाफोन मध्ये अमेझॉन, वेरिऑन स्टेक खरेदी करणार आहेत ते US $ ४ बिलियन एवढी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

USA मध्ये क्लास 8.ट्रक ची मागणी ९१% ने वाढली याचा फायदा भारत फोर्ज, रामकृष्ण फोर्जिंग, GNN एक्सल्स, मदर्सन सुमी यांना होईल.

अशोक लेलँड साठी संरक्षण खात्याकडून येणारी मागणी, LCV बसेस ची भूमिका महत्वपूर्ण आहे.

सरकारने एअरलाइन्सना आता ६०% क्षमतेवर काम करण्यासाठी परवानगी दिली. त्यामुळे इंडिगो आणि स्पाईस जेट हे शेअर्स तेजीत होते.

झोमॅटो ही इन्फोएजची सबसिडीअरी आहे. झोमॅटोचे व्हॅल्युएशन वाढत आहे. टायगर ग्लोबल, कोरा कॅपिटल, आणि सिंगापूरच्या सॉव्हरिन वेल्थ फंड तमासेक या सर्वांनी मिळून US $ २५० मिलियन एवढी गुंतवणूक केली आहे. अलिबाबाची सिस्टर कन्सर्न’ ‘ANT’ चा झोमॅटोमध्ये २५% वाटा आहे. हि कंपनी जानेवारीमध्ये US $ १५० मिलियन गुंतवणार आहे. झोमॅटो ऑन लाईन ग्रोसरी बिझिनेसमधून बाहेर पडत आहे कारण त्यांना फूड डिलिव्हरीमध्ये यश येत आहे.
झोमॅटो ही कंपनी सध्या’फिटसो’ ह्या कंपनीचे अक्विझिशन करत आहे. फिटसो ही स्पोर्ट्स क्षेत्रातील कंपनी आहे. हे विचित्र अक्विझिशन आहे. ही कंपनी पर्सनल कोच आणि स्पोर्ट्स फॅसिलिटी धावपटू आणि सायकलिस्टना पुरवते. स्विमिन्ग पुलंसाठी सेवा पुरवते.

झोमॅटोचे व्हॅल्युएशन US $ ५ बिलियन एवढे केले जात आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९९० NSE निर्देशांक निफ्टी ११५२७ बँक निफ्टी २३५३० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४५.६१ प्रती बॅरल ते US $ ४६.०० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.९१ ते US $१=Rs ७३.०३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.५७ VIX २२.३८ तर PCR १.३० होता.

बजाज ऑटोची निर्यात कमी झाली. एकूण विक्री कमी झाली. त्यातच सरकारने MEIS योजनांतर्गत १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० साठी निर्यातीसाठी मिळणाऱ्या इन्सेंटीव्हची कमाल मर्यादा Rs २.०० कोटी केली. WTOने काही ऑब्जेक्शन घेतल्यामुळे हा निर्णय घेतला असे सरकारचे म्हणणे आहे. MEIS ही योजना ३१ डिसेंबर २०२० पासून बंद होणार आहे. सरकारच्या या निर्णयाची झळ बजाज ऑटो, हिरो मोटो, TVS मोटर्स या ऑटो क्षेत्रातल्या कंपन्यांना लागेल.

कोल इंडियाची विक्री आणि उत्पादन वाढले. NMDC चे ऑगस्ट २०२० मध्ये उत्पादन वाढले.

ट्यूब इन्व्हेस्टमेंटने CG पॉवर मध्ये Rs १४.५५ प्रती शेअर या भावाने ६.०९ कोटी शेअर् घेऊन Rs १०० कोटींची गुंतवणूक केली.

JSPL च्या आर्मने JSIS ओमान मधील ४९% स्टेक मॉरिशस मधील व्हल्कन स्टील या कंपनीला विकला.

वोडाफोनने सांगितले की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना दर वाढवावे लागतील. वोडाफोन च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची ४ सप्टेंबर २०२० रोजी QIP आणि इतर रूटने फंड्स उभारण्यावर विचार करण्यासाठी बैठक आहे.

UTI AMC फंडाचा IPO लांबणीवर पडला. त्यांच्या कर्मचारी अधिकारी आणि निवृत्त कार्मचाऱयांच्या असोसिएशनने सांगितले की UTI AMC कडे त्यांचे पेन्शन आणि इतर स्टाफ ड्यूज संबंधित Rs १२५० कोटी येणे आहे .UTI AMC ने सांगितले की DRHP मध्ये ही लायबिलिटी काँटिन्जन्ट लायबिलिटी म्हणून दाखवली जाईल.

ONGC चे निकाल ठीक आले. मार्जिन, क्रूड रिअलायझेशन US $२९.६०/ BBL,यामध्ये वाढ झाली गॅस उत्पादन प्रीकोविड लेव्हलवर आले. गॅससाठी असलेली मागणी वाढत आहे. त्यामुळे ONGC ला फायदा होण्याची शक्यता आहे.

झी एंटरटेनमेंट ने सिनेमा २ होम सर्व्हिस लाँच केले. ‘पे पर व्हू’ या नवीन सर्व्हिसमध्ये नवीन सिनेमे आता आकर्षक किमतीत बघता येतील.

सरकार लवकरच पॉवर ग्रीड आणि गेल यांच्या ऍसेटचे मॉनेटायझेशन करून Rs २०००० कोटी उभारेल.

ज्युबिलण्ट फूड्सचे निकाल असमाधानकारक होते . सेम स्टोर्स सेल ग्रोथ -६१.४% होती. तोट्यात चालणारी १०५ डॉमिनो स्टोर्स कंपनी बंद करणार आहे. ‘टेक ओव्हर’ सेल्स पूर्णपणे पहिल्या लेव्हलवर आले. या वर्षाअखेरीस स्थिती सामान्य होईल असा कंपनीचा अंदाज आहे

केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना असे आवाहन केले की कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी स्टॅम्पड्युटी मध्ये २% ते ५% एवढी कपात सहा महिन्यांसाठी करावी. हे करताना राज्य सरकारांनी आपली आर्थीक परिस्थिती लक्षात घ्यावी.

‘व्याजावर व्याज’ संबंधित PIL ची सुनावणी सुप्रीम कोर्टाने उद्यापर्यंत पुढे ढकलली.

BPCL डिसेंबर २०२० मध्ये बोकारो येथे ४ लाख सिलिंडर क्षमतेचा बॉटलिंग प्लांट सुरु करणार आहे.

अडाणी ग्रीन ही ३२ GW पॉवर असलेली सगळ्यात मोठी सोलर पॉवर जनरेशन कंपनी झाली.

सरकारने PLI योजने अंतर्गत ऑटो कॉम्पोनंट्स, टेक्सटाईल्स, फूडप्रोसेसिंग, ऍडव्हान्स बॅटरी सेल्सचे उत्पादन यांचा समावेश केला.

आज रिअल्टी क्षेत्रात तेजी आली.

आज शालिमार पेंट्स, सदभाव इंजिनीअरिंग, ज्युबिलण्ट फूड यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. सॅटिन क्रेडिट केअर या कंपनीचे निकाल ठीक होते.

सरकार मेट्रो चालू करण्याच्या विचारात आहे. एका मेट्रोमध्ये ५० प्रवासी असू शकतील. मास्क, सोशल दिसतानसिंग अनिवार्य असेल. मेट्रो स्टेशनमध्ये कोरोनासाठी तपासणी केलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल

हॅपीएस्ट माईंड चा IPO ७ सप्टेंबर २०२० पळा ओपन होईल प्राईस बँड Rs १६५ ते Rs १६६ असेल.

सरकारने PUBG शकत ११८ चिनी मोबाईल ऍप्स वर बंदी घातली. WE CHAT WORK आणि Cam Card बिझिनेस, ludo world, TANTAN, Alipay याही ऍप्स वर बंदी घातली.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १ सप्टेंबर  २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ सप्टेंबर  २०२०

आज क्रूड US $ ४५.६८ प्रती बॅरल ते US $ ४५.८४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.८६ ते US $ १= ७३.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९१.७९ तर VIX २३.२४ आणि PCR १.३३ होते.

आज सुप्रीम कोर्टात ‘AGR’ खटल्याचा निकाल जाहीर झाला. सुप्रीम कोर्टाने AGR ड्यूज पेड करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना १० वर्षांची मुदत दिली. हे ड्यूज १० वार्षिक समान हप्त्यात पेड करायचे आहेत. ऑक्टोबर २०२० पर्यंत १०% अपफ्रंट पेमेंट करायचे आहे. १ एप्रिल २०२१ पासून १० वर्षांची मुदत चालू होईल. ७ फेब्रुवारी २०२१ मध्ये १ला हफ्ता द्यायचा. आणि नंतर दरवर्षी ७ फेब्रुवारीला हफ्ता भरायचा. हफ्ता वेळेवर भरला नाही तर व्याज, दंड लागेल आणि ही कोर्टाची अवमानना म्हणून धरली जाईल. एअरसेल, RCOM, व्हिडिओकॉन या इंसॉल्व्हंट कंपन्यांच्या AGR ड्यूजविषयी NCLT निर्णय घेईल असे सांगितले. एअरसेल आणि RCOM या कंपन्यांचे स्पेक्ट्रम भारती एअरटेल आणि रिलायन्स जियो हे शेअर करत आहेत. कोर्टाने सांगितले की भारती आणि रिलायन्स जिओला हे चार्जेस द्यावे लागणार नाहीत.
हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यावर भारती आणि रिलायन्स जिओ म्हणजेच रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी आली. वोडाफोनचा शेअर मात्र पडला.बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, फेडरल बँक RBL बँक या शेअरमध्ये मंदी आली.

आज सरकारने ‘व्याजावर व्याज’ च्या PIL मध्ये आपले ऍफिडेव्हिट दाखल केले. सरकारने सांगितले की मोरॅटोरियम निवडक क्षेत्रांसाठी दोन वर्षापर्यंत वाढवले जाऊ शकते. सरकार लवकरच या निवडक क्षेत्रांची यादी सादर करेल. यावर कोर्टाने RBI आणि सरकारने या बाबतीत काय तो निर्णय लवकर घ्यावा असे सांगितले.

भारती इंफ्राटेल आणि इंडस टॉवर्स यांच्या मर्जरला भारती एअरटेल च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली.

DOT ने ब्रूकफिल्ड टॉवर डीलला मंजुरी दिली.त्यामुळे रिलायन्स मध्ये तेजी आली.

कॉम्पेन्सेटरी टॅरिफला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली. यामुळे अडाणी पॉवर,टाटा पॉवर या शेअर्समध्ये तेजी आली.

V गार्ड इंडस्ट्रीजने रुरकीमध्ये सिलिंग फॅनचे उत्पादन सुरु केले.

चीनच्या PMI मध्ये वाढ झाली आणि US $ वीक झाला. त्यामुळे आज मेटल्स म्हणजे कॉपर, निकेल, अल्युमिनियम झिंक लेड या सर्व धातूंमध्ये तेजी होती.

आज L & T ला संरक्षण खात्याकडून मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच कंपनीने आपला इलेक्ट्रिकल बिझिनेस SCHNEIDAR ला विकण्याचा व्यवहार पुरा केला. त्यामुळे L & T च्या शेअरमध्ये तेजी आली.

आज इंडिया PMI ४६ वरून ५२ झाला. म्हणजे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली.

आज ऑगस्ट महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आले.

एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री ८०% ने वाढून ७२६८ झाली. डोमेस्टिक विक्री ६७५० आणि निर्यात ५१८ युनिट झाली. व्यवस्थापनाने सांगितले की फेस्टिव्ह सीझनमध्ये विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

M & M ची ट्रॅक्टर विक्री ६५% वाढून २४४५८ युनिट्स झाली.

अशोक लेलँडची विक्री ६३२५ युनिट झाली. M &HCV ची विक्री २५८९ युनिट झाली. विक्रीत MOM सुधारणा दिसून आल्यामुळे शेअर वाढला.

आयशर मोटर्सची CV विक्री २४७७ झाली ८२ बसची विक्री झाली. मोटारसायकल विक्री ५०१४४ युनिट झाली. विक्रीचे आकडे उत्साहवर्धक असल्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.

मारुतीची एकूण विक्री १.२४ लाख झाली. PV विक्री ८२८८८ युनिट झाली.. विक्रीत वाढ झाल्यामुले मारुतीच्या शेअरमध्ये तेजी आली.

सरकार रेलटेल मधील २५% स्टेक IPO च्या माध्यमातून डिसेंबर तिमाही मध्ये विकणार आहे

UTI म्युच्यअल फंड, कॉम्प्युटर मॅनेजमेंट सर्व्हिसेस, हॅप्पीएस्ट माईंड, ROUTE मोबाईल, एंजल ब्रोकिंग, ग्लॅन्ड फार्मा,CHEMEON केमिकल्स या कंपन्यांचे IPO नजीकच्या भविष्यात येणार आहेत

बॉण्ड यिल्ड कमी करण्यासाठी RBI ने घेतलेल्या ऑपरेशन ट्विस्ट आणि आणि बँकांची बॉण्ड्सची HTM (हेल्ड टू मॅच्युरिटी) लिमिट कमी केल्यामुळे बॉण्ड यिल्ड कमी झाले. .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८९०० NSE निर्देशांक निफ्टी ११४७० तर बँक निफ्टी २३८१२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – विडिओ विश्लेषण – ३१ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – विडिओ विश्लेषण – ३१ ऑगस्ट २०२०

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३१ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३१ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US $ ४६.०३ प्रती बॅरल ते US $ ४६.४९ प्रती बॅरल या दरम्यान होते तर रुपया US $१= Rs ७३.२५ ते US $१=Rs ७३.६५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.३५ VIX २३.५१ आणि PCR १.६० होता.

आज मार्केटमध्ये ४ महिन्यातील मोठी घसरण झाली. मार्केट १००० पाईंट (सेन्सेक्स) पडले. भारत आणि चीन यांच्यातील ताणतणाव, FY २१ च्या Q १ च्या GDP मधील मोठी घट , मार्जिन आणि POA मधील होऊ घातलेले बदल, ओव्हरबॉट लेव्हलला असलेले मार्केट आणि VIX मधील वाढ ह्या कारणांमुळे ही घसरण झाली.

थायलंडमधील शास्त्रज्ञानीं तंबाखूच्या पानांचा वापर करून कोविड १९ वरील लस विकसित केली आहे. पशूंवर ह्या लसीचे प्रयोग यशस्वी होत आहेत.

भारतात सर्वत्र मुबलक पाऊस पडला. त्यामुळे खरीप हंगामात बम्पर पीक येईल असा अंदाज आहे.

RBI १० सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर २०२० या दोन दिवशी स्पेशल ओपन मार्केट ऑप्शन कंडक्ट करेल.

आज मुरुगप्पा ग्रुपच्या ट्यूब इन्व्हेस्टमेन्टची CG पॉवर घेण्यासाठीची ऑफर CG पॉवरला कर्ज देणार्या बँकांनी मंजूर केली. त्यामुळे आता CG पॉवरला दिलेल्या कर्जाची काही प्रमाणात वसुली होईल.

RBI ने कोविड १९ साठी दिलेल्या मोरॅटोरियमची मुदत ३१ ऑगस्ट २०२० म्हणजे आज संपली. आता कोणत्या कर्जदाराला किती मुदतीचे आणि किती रकमेचे मोरॅटोरियम द्यायचे हे प्रत्येक बँक कर्जाच्या आणि कर्जदाराच्या इतिहासावर ठरवेल.

उद्या पासून अनलॉक ४.० सुरु होईल. सरकारने सांगितले की इंटरडिस्ट्रिक्ट, इंट्राडिस्ट्रिक्ट आणि इंटरस्टेट दळणवळण पूर्णपणे सुरु होईल. E -पासची आवश्यकता असणार नाही. कॉन्टेन्टमेन्ट झोन वगळता मेळावे, लग्न, आणि इतर धार्मिक समारंभ यात १००च्यावर माणसे सामील होऊ शकणार नाहीत आणि सोशल डिस्टंसिंग, मास्क या सारखे नियम पाळावे लागतील. ७ सप्टेंबर पासून मेट्रो चालू होईल. मात्र सिनेमा हॉल्स, स्विमिंग पूल्स, शैक्षणिक संस्था चालू होणार नाहीत. त्यामुळे PVR आणि इनॉक्स लीजर हे शेअर्स पडले.

१ सप्टेंबर २०२० पासून SEBI ने PLEDGE आणि REPLEDGE सिस्टीम आणि कॅश मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी(खरेदी आणि विक्री दोन्हीसाठी) पफ्रंट मार्जिन घेणे अनिवार्य केले. आता जरी डिमॅट अकौंट ब्रोकरकडे असला तरी त्यामधील शेअर्स आपोआप मार्जिनसाठी उपलब्ध होणार नाहीत. आता यासाठी क्लायंटला त्याच्या नावावरील शेअर्स प्लेज करण्यासाठी डिपॉझिटरीकडे अर्ज करावा लागेल. या अर्जामुळे क्लायंटच्या शेअर्सवर डिपॉझिटरी ट्रेडिंग मेम्बर किंवा ब्रोकरच्या नावाने प्लेज रजिस्टर करेल. नंतर हा प्लेज TM किंवा ब्रोकर क्लिअरिंग मेम्बर्सच्या नावाने ट्रान्स्फर करेल.आणि क्लिअरिंग मेम्बर्स हा प्लेज क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नावाने ट्रान्स्फर करेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या डिमॅट अकौंटवर असलेले शेअर्स तुम्हाला खरेदी किंवा विक्रीसाठी मार्जिन म्हणून वापरता येतील. ब्रोकरला प्रत्येक क्लायंटकडून घेतलेल्या अपफ्रंट मार्जिनची माहिती एक्स्चेंला द्यावी लागेल. या मार्जिन रिक्वायरमेंटच्या कंप्लायन्सची जबाबदारी ब्रोकरची असेल. जर ह्या नियमांचे पालन केले गेले नाही तर ब्रोकरला सेबी/एक्स्चेंज पेनल्टी लावू शकते. CDSL आणि NSDL या दोन डिपॉझिटरीजने सांगितले की आम्ही नवीन सिस्टीम अमलात आणण्यासाठी तयार आहोत. ही बातमी आल्यावर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले. त्यातच भरीसभर म्हणून भारत आणि चीनच्या LAC वर झटापट झाल्याची बातमी आली आणि प्रॉफिट बुकिंगमध्ये भर पडली. 

केंद्र आणि राज्य सरकार यांनी NMDC ला दिलेली दोनिमलाई खाणींची लीज २२,५% रॉयल्टीवर ऑपरेट करण्यासाठी मंजुरी दिली.

रिलायन्सने रिटेल फ्युचर एंटरप्रायझेसचा होलसेल, रिटेल, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग बिझिनेस खरेदी केले. यामध्ये बिग बाजार, फूड बाजार, सेंट्रल ब्रँड फॅक्टरी, होम टाऊनचा समावेश होतो. हे सर्व आता रिलायन्सच्या छताखाली येतील. प्रथम फ्युचर एंटरप्रायझेसमध्ये या ग्रुपमधील सर्व लिस्टेड कंपन्यांचे मर्जर होईल. ते खालीलप्रमाणे
फ्युचर कन्झ्युमरच्या १० शेअर्सला (CMP Rs ११.४५) फ्युचर इंटरप्रायझेसचे ९ शेअर्स, फ्युचर लाईफ स्टाइल्सच्या १० शेअर्सला ( CMP Rs १४५.५५) फ्युचर इंटरप्रायझेसचे ११६ शेअर्स, फ्युचर रिटेलच्या १० शेअर्सला(CMP Rs १३५.३०) फ्युचर इंटरप्रायझेसचे १०१ शेअर्स फ्युचर सप्लायचेनच्या १० शेअर्सला ( CMP Rs १५१.३५) फ्युचर इंटरप्रायझेसचे १३१ शेअर्स आणि फ्युचर मार्केट नेटवर्क च्या १० शेअर्सला (Rs २६.३५) फ्युचर इंटरप्रायझेसचे १८ शेअर्स मिळतील.
या मर्जरनंतर रिलायन्स रिटेल फ्युचर एंटरप्रायझेसमध्ये १५.६५ प्रती शेअर्स या दराने शेअर्स खरेदी करेल.
या मध्ये स्वॅप व्हॅल्यू प्रीमियम खालीलप्रमाणे

या मध्ये                         स्वॅप व्हॅल्यू             प्रीमियम खालीलप्रमाणे
फ्युचर कन्झ्युमर                Rs १८                  ५७%
फ्युचर लाईफ स्टाईल्स        Rs २३२               ६०%
फ्युचर रिटेल                      Rs २०२               ४९%
फ्युचर सप्लाय                    Rs २६२                 ७४%
फ्युचर मार्केट नेटवर्क          Rs  ३६                  ३५%

फ्युचर ग्रुपककडे जो रेसिड्युअल बिझिनेस राहील ( इन्शुअरन्स JV, NTC मिल्स JV, FMGC, रिअल इस्टेट,) मध्ये रिलायन्स Rs १५.६५ प्रती शेअर या भावाने ६.०९% स्टेक Rs १२०० कोटींना खरेदी करेल. फ्युचर ग्रुप आणि प्रमोटर्सवर Rs २५००० कोटींचे कर्ज आहे. रिलायन्सनी प्रीमियम दिल्यामुळे बँकांना कमी हेअर कट घ्यावा लागेल. रिलायन्स फ्युचर ग्रुपचे Rs २४७०० कोटींचे कर्ज टेक ओव्हर करेल.
या खरेदीमुळे रिलायन्सचा ग्रोसरी व्यवसाय D- मार्टच्या २.५ पट होईल. याचा प्रतिकूल परिणाम D-मॅटवर होईल.

अडानी ग्रुप MIAL (मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड) मध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करणार आहे.आणि GVK एअरपोर्ट डेव्हलपर्सचे कर्जही टेकओव्हर करेल.

केरळस्थित ESAF स्मॉल फायनान्स बँक सप्टेंबरनंतर Rs ९७६ कोटींचा IPO आणेल. DRHP ला सेबीची मंजुरी मिळाली. यामध्ये Rs ८०० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs १७६.२० कोटींची OFS असेल.

FY २१ च्या Q १ मध्ये भारताचे GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) २३.९% ने कमी झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६२८ NSE चा निर्देशांक निफ्टी ११३८७ बँक निफ्टी २३७५४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US $ ४४.९९ प्रती बॅरल ते US $ ४५.१४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.३३ ते US $१=Rs ७३.८४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.६७ VIX १८.१० PCR १.६४ होते.

आज फेडचे अध्यक्ष पॉवेल यांच्या भाषणाचा सारांश प्रसिद्ध झाला. त्यांनी सांगितले की अर्थव्यवस्था चांगली होत नाही तोपर्यंत महागाईचा दर वाढत आहे हे फारसे मनावर घेणार नाही. बऱ्याच काळापर्यंत व्याजाचा दर ०% वर राहील. महागाईच्या दराचे लक्ष्य सरासरी २% पार केल्याशिवाय दर वाढीचा विचार करणार नाही. जास्तीतजास्त रोजगार वाढ हे ध्येय समोर ठेवून अर्थव्यवस्थेत मजबुती आणणे हे ध्येय असेल.

USA आणि चीनमधील संबंध आता खूपच ताणले जात आहेत. आज USA च्या विमानांनी दक्षिण चिनी समुद्रात चीनच्या लष्करी तयारीची टेहळणी केल्यावर चीनने करियर किलर नावाची २ मिसाईल डागली.

‘लॉरा’ वादळ शांत झाल्यामुळे पुन्हा क्रुडमध्ये मंदी आली.

जपानचे पंतप्रधान शिंटो आब यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

आज माननीय पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री या दोघांनी संरक्षण उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ होण्याची निकड आणि जरुरी यावर भर दिला. भारताने मिलिटरी इक्विपमेंटची निर्यात करावी असे सुचवले. तसेच ज्या इक्विपमेंटची आयात होऊ शकणार नाही अशी निगेटिव्ह लिस्ट पुढील वर्षाच्या सुरुवातीला जाहीर करू असे सांगितले. त्यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील BEL, BHEL, वालचंदनगर, मिश्र धातू निगम, BEML, HAL, झेन टेक्नॉलॉजी, ITI, भारत डायनामिक्स, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

सरकारने इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक फ्लाईट्स मध्ये प्रीपॅक्ड मिल्स आणि बिव्हरेजीस ऑन बोर्ड द्यायला परवानगी दिली आहे. पण प्रत्येक वेळेला फ्रेश सेट ऑफ ग्लोव्ज वापरले पाहिजेत. तसेच फ्लाईट्समध्ये एंटरटेनमेंटही पुरवता येईल.

सिप्लाला ड्रॅग मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीसाठी अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली. मॉर्फीन, कोडीन आणि THEBAIN या औषधांना अर्थमंत्रालयाने काही अटींवर मंजुरी दिली आहे.

डेटा सेंटर बिझिनेसला सरकार उत्तेजन देणार आहे. सबसिडी आणि इन्सेंटिव्हज दिले जातील.सरकार डेटा सेंटर चालू करण्यासाठी पॉलिसी लवकरच जाहीर करेल. या बाबतीत दूरसंचार विभागाने TRAI कडून शिफारशी मागवल्या आहेत. सध्या डेटा सेंटर चालू करण्याकरता ४० प्रकारच्या मंजुरी घ्याव्या लागतात. आता सरकार सिंगल विंडो सिस्टिम बनवणार आहे. अडानी एंटरप्राइझेस ने डेटा सेंटर चालू करण्याकरता अर्ज केला आहे.

NMDC त्यांच्या नागरनार प्लॅन्टचे डीमर्जर करणार आहे.हा प्लांट डीमर्जर केल्यानंतर विकण्यात येईल. दुसऱ्या तिमाहीचा बिझिनेस चांगला असेल असे NMDC ने सांगितले. डीमर्जरविषयी मंजुरी दोन आठवड्यात येईल असा अंदाज आहे.

HAL च्या OFS ला नॉनरिटेल इन्व्हेस्टरकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नॉन रिटेल कोटा १.६० पट भरला. या चांगल्या प्रतिसादामुळे आता सरकार आणखी ५% स्टेक (म्हणजे एकूण १५%) स्टेक OFS च्या माध्यमातून विकेल.

ITI ने असे सांगितले की २५% शेअरहोल्डिंगचा नियम पुरा करण्याचे ३ऑगस्ट २०२१ पूर्वी लक्ष्य ठेवले आहे. कंपनी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे.

ICICI सिक्युरिटीजने ऑनलाईन प्लॅटफॉर्म कमोडिटीज डेरिव्हेटीव्हमध्ये ट्रेडिंग सुरु केले.

इंडिगोने A ३२० neos विमानात ‘प्रॅट आणि व्हिटनी’ इंजिनांची रिप्लेसमेंट पुरी केली.

‘DOT’ ने सांगितले की 4G साठी ऑक्शन डिसेंबर २०२० पर्यंत होईल. या ऑक्शनला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन 5G ऑक्शन केव्हा करायचे ते ठरवले जाईल.

रशिया आणि चीन मध्ये उत्पादन केलेले PTFF ह्या केमिकलचे दक्षिण कोरियातून डम्पिंग होत आहे असी तक्रार गुजरात फ्लुओरो या कंपनीने केली. रशिया आणि चीन मधून आयात होणाऱ्या PTFF वर आधीच ऍन्टीडम्पिंग ड्युटी बसवली आहे. हे केमिकल इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात वापरले जाते. सरकार या प्रस्तावाचा विचार करत आहे.यामुळे गुजरात फ्लुओरो चा शेअर वाढला.

DR रेड्डीजच्या तीन प्लांटसाठी दिलेले वॉर्निंग लेटर USFDA ने परत घेतले.

PAG ने एडेलवाईसच्या वेल्थ आणि ऍसेट मॅनेजमेंट बिझिनेसमध्ये ५१% स्टेक Rs २२४४ कोटींना खरेदी केला. या बिझिनेसचे वेगळे लिस्टिंग केले जाईल. कंपनीने जनरल इन्शुअरन्स बिझिनेसही विकण्याचा विचार केला आहे.

आज मेटल्स आणि बँक निफ्टी मध्ये जबरदस्त तेजी होती.

आज मॅक्स इंडियाचे Rs ८० वर लिस्टिंग झाले.

GMR इन्फ्रा या कंपनीने आपले एअरपोर्ट बिझिनेस, पॉवर बिझिनेस आणि अर्बनइंफ्रा बिझिनेस वेगवेगळे केले. GMR च्या १०शेअर्सला नव्या कंपनीचा १ शेअर मिळेल.

ऍपेक्स फ्रोझन फूड्स, SJVN यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

GP पेट्रो या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

मिल्क बास्केट पुढील वर्षात IPO आणणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९४६७ NSE निर्देशांक निफ्टी ११६४७ बँक निफ्टी २४५२३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US $ ४५.६४ प्रती बॅरल ते US $ ४५.७५ प्रती बॅरल या दम्या तर रुपया US $१=Rs ७३.८१ ते US $१=Rs ७४.३० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९२.९१ VIX १९.१० आणि PCR १.३८ होते.

USA ने ज्या २४ कंपन्यांनी दक्षिण चीनच्या समुद्रात रेक्लमेशन मिलिटरायझेशन करून कृत्रीम बेटे उभारण्यासाठी चीनला मदत केली त्या कंपन्यांना आणि त्यांच्या ऑफिसर्सना ब्लॅक लिस्ट केले. आणि त्यांना व्हिसा देण्यावर बंदी घातली. उद्या जॅक्सन हॉलच्या मीटिंग मध्ये पॉवेल यांनी केलेल्या भाषणाचा सराईश प्रसिद्ध होईल. या भाषणात पॉवेल कोविड पॅकेजिसची रक्कम आणि कालावधी यावर टिपणी असेल. जर रिलीफ पॅकेजवर एकमत झाले नाही तर रिपब्लिकन पक्षाने US $ ५०० बिलियनचे पॅकेज आणण्याचे ठरवले आहे. USA, युरोप मधील मार्केट तेजीत होती. एशियन मार्केट्समध्ये दबाव होता. सोने आणि चांदी किंचित मंदीत होते.

महाराष्ट्र राज्य सरकारने स्टॅम्पड्युटी ५% वरून डिसेम्बर २०२० पर्यंत २% आणि जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ मध्ये ३% अशी केली. या बातमीनंतर गोदरेज प्रॉपर्टीज, सनटेक रिअल्टीज, कोलते पाटील, पिरामल एंटरप्रायझेस, ओबेराय रिअल्टीज या शेअरमध्ये तेजी होती. याबातमीमुळे हौसिंग लोन देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समधेही तेजी होती.

आज राज्यसभेच्या समितीने अशी शिफारस केली की तंबाखू आणि तंबाखू प्रॉडक्ट्स या क्षेत्रात FDI ला परवानगी द्यावी. ह्या कंपन्या तंबाखू आणि तंबाखूच्या प्रॉडक्टसचे उत्पादन करून त्याची थेट निर्यात करतील. याचा फायदा गॉडफ्रे फिलिप्स, ITC, VST इंडस्ट्रीज या कंपन्यांना होईल.

गॉडफ्रे फिलिप्स आणि VST इंडस्ट्रीजच्या प्रमोटर्सना कंपनीतून एक्सिट घेण्यात स्वारस्य आहे.

सरकार अर्थव्यवस्थेत मागणी वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत मजबुती आणण्यासाठी एक रिलीफ पॅकेज तयार करत आहे. यामध्ये काही काळापर्यंत मर्यादित टॅक्स सवलती जाहीर होण्याची शक्यता आहे. जसे टॅक्स फ्री कुपन

सरकारने कॉस्टिक सोडा आणि फास्फोरिक ऍसिड यावर अँटीडम्पिंग ड्युटी बसवली. चीनमधून फॉस्फरिक ऍसिड चा पुरवठा पूर आल्यामुळे बंद आहे याचा फायदा गुजरात ALKYL, कोरोमोंडेल फर्टिलायझर्स यांना होईल.

उद्या मॅक्स इंडियाचे लिस्टिंग होईल. जून २०२० मध्ये हा शेअर डीलीस्ट झाला होता. ही कंपनी रिटायरमेन्ट होम्स आणि सिनियर केअर या क्षेत्रात काम करते. ‘अंतरा’ या नावाने रिटायरमेंट होम्स बांधते उदा डेहराडून. तर मॅक्स स्किलींग नावाने स्किल डेव्हलपमेंटचे काम करते.

GMR इन्फ्रा ऑक्टोबर २०२० मध्ये Rs २००० ते Rs ३००० चा QIP आणणार आहे. या QIP प्रोसिड्सचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल.

SBI ने अनिल अंबानींची Rs १२०० कोटींची पर्सनल गँरंटी INVOKE केली. दिल्ली हायकोर्टाने अनिल अंबानींना त्यांची पर्सनल मालमत्ता विकण्यास मनाई केली.

सरकारने HAL मधील १०% स्टेक Rs १००१/- प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने OFS रूटने वीकायला काढला आहे. आज नॉनरिटेलसाठी तर उद्या रिटेल इन्व्हेस्टर्स साठी हा इशू ओपन असेल. जर या OFS ला चांगला प्रतिसाद मिळाला तर सरकारने आणखी ५% सटीक विकण्यासाठी पर्याय ठेवला आहे. आज नॉन रिटेल कोटा पूर्ण भरला.

पंजाब आणि सिंध बँकेने DHFL या अकौन्टला फ्रॉड अकौंट म्हणून घोषित केले.

ICICI बँक ICICI सिक्युरिटीज मधील २% स्टेक ओपन मार्केटमध्ये विकेल.

GST कौन्सिलच्या बैठकीत GST मधील राज्य सरकारांचा वाटा आणि तो त्यांना देण्यात होणारा विलंब यावर चर्चा अपेक्षित आहे. तसेच नैसर्गिक गॅस, टू व्हिलर्सवरील GST या संबंधात चर्चा होईल. यावेळी Rs २.३५ लाख कोटीची GST कलेक्शनमध्ये घट झाली. राज्य सरकारांना नुकसानभरपाई दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे केंद्र सरकारने कर्ज काढून द्यावी किंवा राज्यसरकारांनी स्वतः RBI कडून कर्ज काढावे. राज्य सरकारांना पर्याय निवडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली.

जिलेट, GMDC अवंती फीड्स यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

IGL, मुक्ता आर्ट्स, IDFC यांचे निकाल असमाधानकारक होते.

ट्यूब इन्व्हेस्टमेंट ही CG पॉवर साठी SOLE BIDER ठरली.

पिलानी इन्व्हेस्टमेंट ही अल्ट्राटेक सिमेंटचे एक प्रमोटर्स आहे. पिलानी इन्व्हेस्टमेंट अल्ट्राटेक मधील आपला स्टेक विकत आहे.

सरकारने आज नॅशनल डिजिटल हेल्थ पॉलिसीचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला.

आज ऑगस्ट एक्स्पायरीचा दिवस होता. दिवसभर मार्केटमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक ३९११३ NSE निर्देशांक ११५५९ बँक निफ्टी २३६०० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US$ ४५.८३ प्रती बॅरल ते US $ ४६.०६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=₹74.२६ ते US $ १= ₹ ७४.३८ होते. US$ निर्देशांक ९३.०१ PCR १.५२ VIX -१९.३० होते.

आज USA मध्ये S&P आणि NASDAQ तेजीत होते तर DOW जोंन्स मध्ये किंचित दबाव होता. एशियन मार्केटमध्ये दबाव होता . US डॉलरमध्ये मजबुती होती . सोने आणि चांदी मध्ये मंदी होती. मेक्सिकोमध्ये ‘लॉरा’ या वादळामुळे गल्फ ऑफ मेक्सिको मधील ऑइल आणि गॅस चे उत्पादन थांबल्यामुळे क्रूडमध्ये तेजी होती.USA आणि चीन मधील ट्रेड वाटाघाटीमधील पहिल्या फेरीतील अटी पाळण्याचा प्रयत्न करू आणि या वाटाघाटी यशस्वी करण्याचा प्रयत्न करू असे USA आणि चीनने सांगितले.

जर्मनीची अर्थव्यवस्था ९.७% कमी झाली. बोलिव्हिया मधील खाणीमधील काम बंद पडले. तसेच USA मधील मॅन्युफॅक्चरिंग डेटा चांगला आला. त्यामुळे झिंकला मागणी वाढली म्हणून झिंक तेजीत होते.

टू व्हीलर्स ही luxury नाही किंवा sin गुड्स नाहीत त्यामुळे टू व्हीलर्स वरील GST मध्ये काही सवलत देता येईल याचा विचार GST कौन्सिलच्या बैठकीत करता येईल असे माननीय अर्थमंत्री म्हटल्यामुळे आज टू व्हीलर्स आणि टू व्हीलर्स अँसिलिअरीजच्या शेअर्स मध्ये तेजी होती. उदा- हिरो मोटो, बजाज ऑटो, TVS मोटर्स, आयशर मोटर्स,मुंजाल ऑटो, रिको ऑटो

cholin क्लोराईड हे केमिकल animal फीडमध्ये वापरले जाते .चीन, मलेशिया, व्हिएतनाम येथून याचे डम्पिंग होत आहे अशी ज्युबिलंट लाईफस्टाईलने तक्रार केली होती . या केमिकलवर US$ ९४ प्रती टन ते US $ ३१५ प्रति टन या रेंजमध्ये अँटी डम्पिंग ड्युटी बसवली. याचा फायदा बालाजी अमाईन्स,ज्यूबीलंट लाईफस्टाईल या कंपन्यांना होईल.

सरकारने एअर इंडिया साठी EOA देण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवली.

मोरीटोरियमच्या काळातील कर्जावरील व्याजात काही सवलत मिळावी म्हणून केलेल्या अर्जाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचे मत काय आहे यासाठी एक अफिडेवीट फाईल करायला सांगितले आणि सरकारने उद्योगांच्या हितरक्षणाबरोबर जनतेच्या स्थितीकडेही लक्ष द्यावे असे सांगितले.पुढील सुनावणी १ सप्टेंबर २०२० रोजी होईल .

वेदांताने आपले तुथुकुडी येथिल प्लांट बंद करण्याच्या मद्रास हायकोर्टाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केलें. (६) ४४ वंदे भारत ट्रेन्सचे सेट्स बनवण्यासाठी टेंडर मागवली आहेत. हे कॉन्ट्रॅक्ट ₹ १५०० कोटींचे आहे.MAKE- in-INDIA योजनेअंतर्गत ही कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपन्यांना दिली जातील. भारतीय कंपन्यांना प्राथमिकता दिली जाईल. याचा फायदा BHEL,L&T यांना होईल.

भारतातील एअर ट्राफिक वाढली त्यामुळे इंडिगो आणि स्पाईस जेट या शेअर्समध्ये तेजी आली.

इंडिया बुल्स व्हेंचर च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २८ ऑगस्ट २०२० रोजी इक्विटी रूटने पैसे उभारण्यावर विचार करण्यासाठी होईल.

FDC या कंपनीने flavirapir या कॉरोनावरील औषधाचे दोन variants लाँच केले. (१०) मूडीजने स्टेट बँक ऑफ इंडियाचे रेटिंग Baaa3 असे केले. S&P ने TCS चे रेटिंग पॉझिटिव्हवरून स्टेबल केले.

३१ ऑगस्टला अनलॉक 3 संपेल. १ सप्टेंबर 2020 पासून सिंगल स्क्रीन थिएटर, मेट्रो रेल्वे ऑडिटोरियम उघडतील त्यामुळे आज या संबंधित शेअर्समध्ये तेजी होतीं.

आज कॅनफिना होम्स, एवरेस्ट कांटो, आयन एक्स्चेंज, gillette यांचे निकाल ठीक होते.

उषा मार्टिन, फेडरल मुघल, नॅशनल पेरोकसाईड, अतुल ऑटो, IRCON चे निकाल कमजोर होते .

व्हा टेक व्हाबाग या कंपनीने ₹१६० प्रती शेअर या भावाने ७५ लाख शेअर्सची प्रेफरांशीयल अलोटमेंट केली आणि ₹१२० कोटी उभारले.

मे २०२० या महिन्यात भारती एअरटेलने ४७.४लाख तर व्होडाफोन आयडियाने ४७.३ लाख ग्राहक गमावले तर रिलायंस जियोने ३६.६ लाख ग्राहक जोडले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३९०७३ NSE निर्देशांक निफ्टी ११५४९ बँक निफ्टी २३४१४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ ऑगस्ट २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ ऑगस्ट २०२०

आज क्रूड US $ ४५.२२ प्रती बॅरल ते US $ ४५.३० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७४.३१ ते US $१= Rs ७४.४२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९३.१४ VIX १९.६२ आणि PCR १.१६ होता.

रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी USA च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी जाहीर झाली.USA मध्ये जेवढी स्टिम्युलस पॅकेज दिली त्याचा परिणाम दिसत आहे. अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल्स सुधारत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि शेअरमार्केट यांच्यात ताळमेळ नाही अशी स्थिती USA मध्ये दिसत नाही. तेथे अर्थव्यवस्था आणि मार्केट दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून प्रगती करत आहेत. H-4 व्हिसा धारकांना सवलत दिली. हा व्हिसा वर्किंग स्पाऊसना दिला जातो.

चीनमध्ये जुलैपासून व्हॅक्सिन देण्यास सुरुवात झाली. डॉक्टर्स, मेडिकल हेल्थ स्टाफला लस दिली गेली. चिनी वस्तूंप्रमाणेच चीनचे व्हॅक्सिन कामचलाऊ असेल तर तात्पुरता इलाज होईल पण कोरोना पुन्हा डोके वर काढेल.

LLP ( लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) रूटने कन्स्ट्रक्शन क्षेत्रासाठी १००% FDI ला मंजुरी देण्याचा सरकार विचार करत आहे. याचा फायदा KNR कन्स्ट्रक्शन, ब्रिगेड, NCL, प्रकाश पाईप, वेलस्पन इंडिया, मान इन्फ्रा, मान इंडस्ट्रीज, पुर्वांकारा, DLF गोदरेज प्रॉपर्टिज, ओबेराय रिअल्टीज, यांना होईल.

AL कार्गो लॉजिस्टिक्सची शेअर्स डीलीस्टिंवर विचार करण्यासाठी ऑगस्ट २७ २०२० रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. आज AL कार्गो लॉजिस्टिक्स च्या शेअरला अपर सर्किट लागले.

१ सप्टेंबर २०२० रोजी ONGC ची Rs ३५००० कोटी उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

२७ ऑगस्ट २०२० रोजी झायडस वेलनेसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची इक्विटी रुटद्वारे फंड उभारण्यासाठी बैठक आहे.
फिनिक्स मिल्सच्या शेअर्समध्ये १.६३ कोटी शेअर्सचे सौदे Rs ६६५ ते Rs ६६९ प्रती शेअर या भावाने झाले.

सिंगल मोड ऑप्टिकल फायबर भारतातून चीनमध्ये निर्यात होत होते. त्याच्यावर चीनने ऍन्टीडम्पिंग ड्युटी लावली. आता भारताने सर्व देशातून आयात होणाऱ्या ( विकसनशील देश चीन सोडून) आयात होणाऱ्या सिंगल मोड ऑप्टिकल फायबरवर सेफगार्ड ड्युटी बसवली आहे

UTI AMC चा IPO सप्टेंबर २०२० च्या तिसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

कल्याण ज्युवेलर्सचा IPO नजीकच्या भविष्यात येण्याची शक्यता आहे.

RBI येत्या दोन आठ्वड्यात दोन हप्त्यात Rs २०००० कोटींचे ओपन मार्केट ऑपरेशन करणार आहे. RBI ४वर्षे, ७ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे मुदतीचे सरकारी बॉण्ड्स खरेदी करेल आणि ऑक्टोबर २०२० आणि नोव्हेंबर २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या सरकारी बाँड्सची विक्री करेल.५.७९% वरून ६.२२% पर्यंत वाढलेले बॉण्ड यिल्ड कमी करणे हा हेतू असेल.

मॉर्गन स्टॅन्लेने भारताचे वेटेज कमी केले.

CARE रेटिंगने JK टायर्सचे रेटिंग A + वरून A – केले.

टाटा मोटर्स ग्रुपला Rs ४८००० कोटींचे कर्ज आहे. कंपनीने सांगितले की येत्या ३ वर्षात आम्ही हे फेडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कंपनीत गुंतवणूक आता ५०% कमी केली जाईल. कंपनी PV आणि लाईट कमर्शियल वाहनांवर लक्ष केंद्रित करेल.

लॉक- डाऊनमुळे कॉफीची मागणी वाढली. व्हिएतनाममध्ये कॉफीचे उत्पादन जास्त होते. पण तेथे पूरग्रस्त परिस्थिती होती पुरवठा नियमीत नव्हता . पुरामुळे उत्पादन ३,००,००० टनांपेक्षाही कमी झाले. देशांनी कॉफीचा साठा करायला सुरुवात केली. ICE रोबस्टा कॉफीच्या किंमती खूप वाढल्या. याचा उपयोग इन्स्टंट कॉफी बनवण्यासाठी होतो. याचा फायदा CCL प्रॉडक्टस, टाटा कॉफी, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टस यांना होईल.

आज LIC हौसिंग, ग्लोबस स्पिरिट्स, P & G या कमान्यांचे तिमाही निकाल चांगले आले.
नोसिल, IRB इन्फ्रा, किर्लोस्कर इलेक्ट्रिक यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

HG इन्फ्राला Rs २०० कोटीं इक्विटीद्वारे उभारण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८८४३ NSE निर्देशांक निफ्टी ११४७२ बँक निफ्टी २३०९२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!