Tag Archives: daily stock market analysis in marathi

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६४.१२ प्रती बॅरल ते US $ ६४.७० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२० ते US $ १= Rs ७१.४८ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९८.२८ होता. VIX १५.८० होते.

सौदी अरेबियाने सांगितले की त्यांचे क्रूडचे उत्पादन ७०% नॉर्मल झाले आहे . सप्टेंबर २०१९ अखेरीपर्यंत पूर्णपणे नॉर्मल होई. त्याप्रमाणे आज क्रूडचे दर US $ १ =Rs ६८ प्रती बॅरल वरून US $१=Rs ६४ पर्यंत खाली आला. रुपयाही सुधारला.
USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की USA इराणबरोबरच्या युद्धासाठी सुसज्ज आहे.

आज रात्री उशिरा फेडने रेटकट विषयी काय निर्णय घेतला आणि इतर धोरण विषयक त्यांच्या काय कॉमेंट्स आहेत ते फेड जाहीर करेल. सर्वांची अपेक्षा आहे की फेड ०.२५% रेट कट करेल.

GST कौन्सिल ऑटो आणि ऑटो पार्ट्स बिस्किटे, विमा यावरील GST कमी करण्याची शक्यता मावळली. त्यामुळे आज ब्रिटानिया आणि ITC मध्ये मंदी आली लक्झरी हॉटेल्सच्या रूम भाड्यावरील GST कमी होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आज सर्व हॉटेल्सच्या शेअर्स मध्ये तेजी आली.उदा :- इंडियन हॉटेल्स, EIH, ताज GVK, सयाजी हॉटेल्स, रॉयल आर्चिड्स, स्पेशॅलिटी रेस्टारंट

IIFL वेल्थचे १९ सप्टेंबर २०१९ रोजी तर IIFL सिक्युरिटीजचे २० सप्टेंबर २०१९ला लिस्टिंग होईल.

सरकारने ओपन सेल टी व्ही पॅनलवरील ड्युटी ५%ने कमी केली.

चीन आणि व्हिएतनाम यामधून वेल्डेड स्टील पाईप आणि ट्यूब भारतात डम्प केले जात होते. सरकारने या प्रकारच्या पाईप्स आणि ट्यूब्सवर ५ वर्षांकरता ANTIDUMPING ड्युटी लावली. याचा फायदा जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस, ASTRAL पॉली फिनोलेक्स या कंपन्यांना होईल.

सरकार कोल ब्लॉक्सच्या लिलावात विदेशी कंपन्यांकडूनही बोली मागवण्याची शक्यता आहे..

LED आणि LCD टी व्ही वरची ड्युटी कमी होईल याचा फायदा मर्क, BPL, सूर्या रोशनी यांना होईल.

SRF ने थायलंडमधील त्यांची टेक्निकल टेक्सटाईल ऑपरेशन्स बंद केली.

सरकारने E -सिगारेट्स च्या उत्पादन, आयात निर्यात, जाहिरात, साठा करण्यावर बंदी घातली. हा दखलपात्र गुन्हा ठरवून १ वर्षाच्या शिक्षेची आणि Rs १ लाख दंडाची तरतूद केली. या सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा फायदा गोल्डन टोबॅको, गॉडफ्रे फिलिप्स, ITC, VST यांना झाला. याबरोबरच ITC ची लक्जरी हॉटेल्स असल्यामुळे ITC मध्ये चांगलीच तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५६३ NSE निर्देशांक निफ्टी १०८४० बँक निफ्टी २७१७२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.१० प्रती बॅरल ते US $ ६८.७८ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५९ ते US $१=Rs ७१.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.६३ होता. VIX १५.७५ होते.

आज भारताचे माननीय आणि अतिशय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढ दिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ‘आजच्या मार्केट’ ची सूरूवात करू.

सौदी अरेबियामध्ये क्रूडचे ४०% उत्पादन पुन्हा सुरु झाले. क्रूड US $ ७० प्रती बॅरल पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उद्या फेडची मीटिंग संपल्यावर फेड रेट करणार का ? आणि केल्यास किती करते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प हे फेडने रेट कट करावा यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत.

आज क्रूडचे वाढते दर, रुपयांची US $१=Rs ७२ पेक्षा घसरण आणि २२ तारखेच्या GST कौन्सिलच्या मीटिंगमध्ये GST दरांमध्ये कपात होण्याची शक्यता मावळल्यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आली.

सरकार आता लॉजिस्टिक सेक्टर साठी वेगळे धोरण आखणार आहे.

वाणिज्य मंत्री गोयल यांनी निर्यातदारांसाठी NIRVIK (निर्यात रिन विकास) योजना जाहीर केली. आता छोट्या निर्यातदारालाही विम्याचे जास्त संरक्षण मिळेल. यासाठी Rs ८५०० कोटींचा फंड उभारला जाईल.

सरकार STC MMTC या कंपन्या बंद करायचा विचार करत आहे. या कंपन्या इतर उद्योजकांसाठी परदेशातून माल मागवत होत्या. पण आता हे काम प्रत्येक कंपनी आपापले करते. STC वर कर्ज आहे यासाठी STC चे ऍसेट बँकांना दिले जातील. MMTC जरी फायद्यात असली तरी या फायद्यातून कोठलेही मोठे कार्य साध्य होत नाही. त्यामुळे या कंपन्या बंद करणे किंवा त्यांचे मर्जर करणे हे दोन्ही विचार डोळ्यासमोर आहेत. पण या कंपन्या बंद करण्याचा अंतिम निर्णय झालेला नाही.

SAIL आपल्या आयर्न ओअर उत्पादनापैकी २५% उत्पादनाची विक्री करू शकेल.

टाटा पॉवरने राजस्थानामध्ये १५० MV पॉवरची सोलर प्रोजेक्ट सुरु केली.

TCS ने बंगलोर येथील GM टेक्निकलबरोबर ENGG डिझाईन सर्व्हिसेस साठी ५ वर्ष मुदतीचा करार केला. TCS GM टेक्निकलमध्ये स्टेक खरेदी करेल.

DLF ही कंपनी आपली ३२ एकर जमीन अमेरिकन एक्स्प्रेसला विकणार आहे.

कॅफे कॉफी डे यांचा व्हिलेज टेक्निकल पार्क ब्लॅकस्टोन Rs २७०० कोटींना खरेदी करणार आहे. कावेरी सीड्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची शेअर बाय बॅकवर विचार करण्यासाठी २४ सप्टेंबर २०१९ रोजी बैठक बोलावली आहे.
टाटा कम्युनिकेशन मधून १७ सप्टेंबर २०१९ ही रेकॉर्ड डेट असल्यामुळे VSNL च्या मालकीचे ७७३.७० एकर जमीन (या जमिनीची किंमत Rs १०००० ते Rs १४००० कोटी आहे) हेमिस्फिअर प्रॉपर्टीज म्हणून वेगळी केली गेली. या जमिनीची किंमत प्रती शेअर Rs १७५ ते Rs १९० असल्यामुळे टाटा कम्युनिकेशनची किमत त्याप्रमाणात कमी झाली.म्हणजे Rs २६० झाली तुमच्या जवळ जर टाटा कम्युनिकेशनचा १ शेअर असेल तर तुम्हाला हेमिस्पिअर प्रॉपर्टीजचा एक शेअर मिळेल.
IL & FS ची वसुली प्रक्रिया योग्य मार्गावर आहे. Rs ५०००० कोटी एवढी वसुली होईल असा अंदाज आहे.

आज BALMER LAWRIE या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बोनसवर विचार करण्यासाठी बैठक असल्यामुळे ह्या शेअर मध्ये तेजी होती.

आजपासून ४८ कंपन्यांचे शेअर ज्यात युनिप्लाय, स्मार्ट लिंक, प्रोझोन, मुकंद, आशापुरा माईनकेम या कंपन्यांचा समावेश आहे T टू T सेगमेंट मधून बाहेर येतील

तांत्रिक विश्लेषण

Technical Chart

 

गोल्डन क्रॉस आणि डेथ क्रॉस या दोन पॅटर्नकडे विश्लेषकांचे लक्ष असते. ज्यावेळी शॉर्ट टर्म मूव्हिंग ऍव्हरेजची लाईन ( ५० दिवसांची मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) लॉन्ग टर्म मुविंग ऍव्हरेजीसच्या लाईनला (२०० दिवसांच्या मूव्हिंग ऍव्हरेजीसची लाईन) वरच्या दिशेने छेदते आणि क्रॉस करून वर जाते त्याला गोल्डन क्रॉस म्हणतात. अशावेळी शॉर्ट टर्म मध्ये तेजी येते. . या उलट शॉर्ट टर्म ऍव्हरेजीसची लाईन लॉन्ग टर्म ऍव्हरेजीसच्या

लाईनला खालच्या दिशेने क्रॉस करते आणि खाली जाते त्या वेळी शॉर्ट टर्म मध्ये मंदी येते याला डेथ क्रॉस असे म्हणतात. अशा प्रकारचा डेथ क्रॉस पॅटर्न सध्या तयार झाला आहे. त्यामुळे शॉर्ट टर्ममध्ये मंदी राहील

 

 

 

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४८१ NSE निर्देशांक निफ्टी १०८१७ बँक निफ्टी २७१३१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ सप्टेंबर २०१९

१४.०९.२०१९ रोजी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्यात क्षेत्र आणि रिअल्टी क्षेत्रासाठी खालील योजना जाहीर केल्या.

(१) RODTEP (स्कीम फॉर रेमिशन ऑफ ड्युटी अँड टॅक्सेस ऑन एक्स्पोर्ट प्रॉडक्ट्स) :- सध्या टेक्सटाईल्स आणि काही इतर क्षेत्रांना निर्यातीसाठी MEIS आणि ROSL या योजनांखाली सवलती मिळत होत्या. या योजना ज्या क्षेत्रांना लागू असतील त्या वर्तमान स्वरूपात ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लागू राहतील. १ जानेवारी २०२० पासून RODTEP ही नवीन योजना लागू होईल. ही योजना इतर सर्व योजनांपेक्षा निर्यात क्षेत्राला फायदेशीर असेल. या योजनेसाठी केंद्रावर Rs ५००००कोटींचा बोजा वाढेल.

(२) GST रिफंड मिळण्यासाठी संपूर्ण ऑटोमेटेड इलेक्ट्रॉनिक रिफंड सिस्टिम तयार केली जाईल.
यामुळे इनपुट टॅक्स क्रेडिट ताबडतोब मिळेल.

(३) ECGC ( एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी स्कीम) MSME ला बँकांनी दिलेल्या निर्यातीसाठी दिलेल्या कर्जान्वर वर जास्त इन्शुअरन्स देऊ करेल. यासाठी US $ मधील कर्जासाठी ४% तर रुपयातील कर्जासाठी ८% प्रीमियम आकारला जाईल. या योजनेसाठी सरकारला Rs १७०० कोटी खर्च येईल.

(४) RBI प्रायारीटी क्षेत्राच्या व्याख्येत सुधारणा करेल. आणि लवकरच योजना जाहीर करेल. यामुळे बँका Rs ३६००० कोटी ते Rs ६८००० कोटी जादाचे कर्ज निर्यात क्षेत्राला प्रायारिटी क्षेत्र म्हणून देऊ शकतील.

(५) वाणिज्य मंत्रालय निर्यात क्षेत्रासाठी दिलेल्या कर्जाचे मॉनिटरिंग करेल.

(६) निर्यात करण्यासाठी बंदरे आणि विमानतळ यावरील प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करून ह्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

(७) जेम्स आणि ज्युवेलरी आणि हॅंडिक्राफ्ट्स, योग, पर्यटन, आणि टेक्सटाईल्स आणि लेदर उदयोगांसाठी ४ ठिकाणी मार्च २०२० मध्ये मेगा फेस्टिवल आयोजित केले जातील

(८) भारताने विविध देशाशी केलेल्या फ्री ट्रेड ऍग्रीमेंटस मधील विविध कलमांचा फायदा कसा घ्यायचा यासाठी निर्यातदारांना मार्गदर्शन केले जाईल.

(९) ऑन लाईन ओरिजिन मॅनेजमेंट सिस्टिम दवारा सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन मिळण्याची व्यवस्था केली जाईल. DGFT याबाबतीतले नियम लवकरच जाहीर करेल.

(१०) एका विशिष्ट मुदतीत सर्व जरुरी अनिवार्य तांत्रिक आणि पर्यावरणाशी संबंधित स्टँडर्ड्स अवलंबणे जरुरीचे आहे. त्यामुळे आपल्या निर्यातीची गुणवत्ता उच्च राहण्यास मदत होईल.
तसेच योग्य दरात उत्पादनांची तपासणी आणि सर्टिफिकेशन सिस्टिम जारी केली जाईल

(११) हॅंडिक्राफ्ट्स उद्योगात काम करणाऱ्या कारीगरांना आणि त्यांच्या सहकारी सोसायट्याना E- मार्केट पोर्टल्स घेण्याची आणि सीमलेस एक्स्पोर्ट करण्याची परवानगी दिली जाईल. .

त्यांनी रिअल्टी क्षेत्रासाठीही खालीलप्रमाणे घोषणा केल्या.

(१) ECB ( एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग) च्या गाईडलाईन्स होम फायनान्स देणार्या कंपन्यांसाठी सोप्या केल्या जातील.

(२) एक खास विंडो उघडून ज्या अफोर्डेबल आणि मिडल साईझ इन्कम हौसिंग प्रोजेक्ट्स ६०% किंवा त्यापेक्षा जास्त पूर्ण झाल्या आहेत आणि ज्या NPA नाहीत किंवा NCLT मध्ये गेलेल्या नाहीत अशा प्रोजेक्ट्स ना लास्ट मिनिट फंडिंग केले जाईल. यासाठी सरकार एक Rs १०००० कोटींचा फंड उभा करेल आणि सरकार व्यतिरिक्त इतर एजन्सीज यात आणखीं Rs १०००० कोटी गुंतवतील. या फंडाचे व्यवस्थापन प्रोफेशनल्सकडे सोपवले जाईल. या योजनेचा ३.५ लाख घर खरेदी करणाऱ्यांना फायदा होईल.

या घोषणांबरोबरच त्यांनी गेल्या दोन प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेल्या आयकरविषयक घोषणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

अर्थव्यवस्थेत महागाईचे प्रमाण कमी आहे. जूलै २०१९ मध्ये IIP चे प्रमाण वाढले. अर्थव्यवस्थेमधील फिक्स्ड इन्व्हेस्टमेन्टचे प्रमाण वाढले असे सांगितले. पार्शल क्रेडिट गॅरंटी योजनेचा NBFC ना फायदा होत आहे. बँकांना त्यांचे कर्जावरील व्याज दर रेपो रेट किंवा

FBIL ने ठरवलेल्या बेंचमार्क रेटशी संलग्न करण्यास सांगून RBI ने केलेल्या रेटकट चा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सांगितले आहे. १९ सप्टेंबर २०१९ ला सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या प्रमुखांबरोबर होणाऱ्या बैठकीत क्रेडिट एक्स्पान्शनच्या संबंधित चर्चा होईल असे सांगितले.

प्रभात डेअरीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी Rs ६३.७७ प्रती शेअर या दराने शेअर डीलीस्टिंगला मंजुरी दिली.
आज क्रूड US $ ६६.०० प्रती बॅरल ते US $ ६६.६५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.४२ ते US $१=Rs ७१.६२ या दरम्यान होते.US $ निर्देशांक ९८.१४ होता VIX होते.

आज जपानची मार्केट बंद होती.

भारत आणि पाकिस्तानमध्ये ही ताणतणाव वाढत आहेत. इम्रानखान यांनी घोषणा केली की आम्ही जर पारंपरिक पद्धतीच्या युद्धात हरू लागलो तर अणवस्त्राचा उपयोग करण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्याचप्रमाणे इराणने सौदी अरेबियाला सांगितले की आमचा देश युद्धाला सज्ज आहे.

आज मध्यपूर्वेतील क्रूड उत्पादक देश सौदी अरेबियाच्या ABQAIQआणि KHURAIS या दोन प्लांट वर ड्रोनच्या साहाय्याने हल्ला केला गेला. हा हल्ला येमेनने केला कारण याची जबाबदारी येमेनने घेतलीये. USA च्या मते हा हल्ला इराणने केला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील देशांमधील संबंध ढवळून निघाले. या हल्ल्यामुळे सौदी अरेबियाला त्यांचे ५०% उत्पादन बंद करावे लागले. ५७ लाख बॅरल एवढी उत्पादनात कपात झाली. पण क्रूडचा साठा खूप असल्यामुळे सध्या तरी ताबडतोब क्रूडच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार नाही. तरी क्रूड US $ ६६ प्रती बॅरल एवढ्या दरावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या आरामको या क्रूड उत्पादन करणाऱ्या दिग्गज कंपनीचा IPO येत आहे. या IPO ला क्रूडच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे फायदा होईल. त्यामुळे हा ड्रोनचा झालेला हल्ला ही सौदीच्या दृष्टीने इष्टआपत्ती आली असे त्यांना वाटले. त् OMC ( ऑइल मार्केटिंग कंपन्या), पेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विमानवाहतूक करणाऱ्या कंपन्या यांच्या शेअरमध्ये मंदी आली. केमिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्या, वाडिया ग्रुपच्या कंपन्या, IT आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्या तेजीत होत्या.
आज सेन्सेक्स आणि निफ्टी जरी पडत असले तरी ऍडव्हान्स डिक्लाईन रेशिओ फेव्हरेबल होता. कारण आज मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये तेजी होती. म्हणजेच आज मार्केटमध्ये काही वेगळेच चित्र दिसत होते. आज निर्देशांकाबाहेरच्या शेअर्समध्ये तेजी होती.

ऑगस्ट २०१९ साठी WPI १.०८% होता.

BEL ला आकाश मिसाईल तयार करण्यासाठी Rs ५३५७ कोटीची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर ३ वर्षात पुरी करायची आहे.
STC ला कर्ज फेडण्यासाठी ५ वर्षे मुदत दिली जाईल. NCLT मध्ये गेलेल्या केसेस परत घेतल्या जातील. Rs ३०० कोटींची मालमत्ता बँकांना ट्रान्स्फर केली जाईल.

ITDC या सरकारी कंपनीची हॉटेल अशोका खूप मोठ्या मुदतीसाठी म्हणजे ५० ते ६० वर्षांसाठी लीजवर दिले जाईल किंवा त्याची विक्री केली जाईल.

बँकेचा IPO न आणता शेअरचे लिस्टिंग करता येणार नाही असे इक्विटासला कळवल्यामुळे आता कंपनी त्यांच्या स्मॉल फायनान्स बंकेचा IPO मार्च २०२० पर्यंत लिस्टिंग करेल.

ग्रनुअल्स इंडिया ही कंपनी त्यांचे ४.३ कोटी शेअर्स Rs ११० कोटींना AJINIMOTO OMNICHEM ला विकेल.
सिप्लाच्या पिथमपूर युनिट १ आणि युनीट २ ला UK रेग्युलेटरी ऑथॉरिटीकडून CGMP मिळाले.

आज कोलगेटच्या नवीन MD रामराघवन यांनी जाहीर केले की आता कोलगेटची पॉलिसी REACTIVE ऐवजी PROACTIV असेल. सध्या कंपनीचा ५२% मार्केटशेअर आहे. मार्केट शेअर वाढवणे हे कंपनीचे मुख्य लक्ष्य असेल. लवकरच छोट्या मुलांसाठी नवी टूथपेस्ट रेंज लाँच करणार आहोत. कोलगेटने पतंजलीचे आव्हान यशस्वीरित्या पेलवल्यामुळे कोलगेट च्या शेअरमध्ये आज जबरदस्त तेजी आली. याउलट पातंजलीला प्रॉडक्शन आणि फायनान्सिंगमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. याचा फायदा स्पर्धा कमी झाल्यामुळे कोलगेटला होईल.

SBI ने SBI लाईफमधला ४.५% स्टेक म्हणजे ४.५ कोटी शेअर्स विकले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१२३ NSE निर्देशांक निफ्टी ११००३ बँक निफ्टी २७८५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १३ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ५९.६७ बॅरल ते US $ ६०.४८ बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८६ ते US $ १= Rs ७१.११ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.०६ होता. VIX १४.;१२ होते.

आज ECB ने क्वांटिटेटिव्ह इजिंग चा कार्यक्रम जाहीर केला. ECB ने १० बेस पाईंट एवढा रेट कट केला आहे. ECB दर महिन्याला २० बिलियन यूरोज किमतीचे बॉण्ड्सही खरेदी करेल.

FII च्या विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या डिलिव्हरी बेस्ड खरेदी चालू आहे. तेजी जेवढी ब्रॉडबेस्ड होईल तेव्हढे लोकांचे पोर्टफोलिओ सुधारतील.

अल्टीको कॅपिटल या कंपनीने Rs १९.९७ कोटींचा इंटरेस्ट पेमेन्टमध्ये डिफॉल्ट केला. या कंपनीला एकूण Rs ४५०० कोटींचे बँकांचे एक्स्पोजर आहे. यात येस बँक Rs ४५० कोटी, स्टेट बँक ऑफ इंडिया Rs ४०० कोटी, HDFC Rs ५७५ कोटी आणि बँक ऑफ बरोडा Rs ४०० कोटी असे एक्सपोजर आहे.

DR रेड्डीजना त्यांच्या विशाखापट्टणम येथील दुआडा प्लांटसाठी USFDA ने क्लीन चिट दिली. पण या प्लांटसाठी २-३ वेळेला मेंटेनन्स त्रुटी आढळल्या आहेत. या कंपनीने USFDA पासून दूर राहिले पाहिजे. कॅश फ्लो सुधारला पाहिजे.
युनिकेम लॅबच्या रोहा API युनिटला ९ सप्टेंबर २०१९ ते १२ सप्टेंबर २०१९ दरम्यान केलेल्या तपासणीत USFDA ने क्लीन चीट दिली.

HDFC बँकेमध्ये फॉरीन होल्डिंग ७४% आहे त्यामुळे HDFC बँक फूटसी (FTSE फायनान्सियल टाइम्स स्टॉक एक्स्चेंज ) मध्ये सामील होणार नाही. फॉरीन होल्डिंग ७१% किंवा त्यापेक्षा कमी असल्यासच फूटसीमध्ये समावेश होतो.
२० सप्टेंबर २०१९ तारखेला GST कौन्सिलची मीटिंग गोव्यामध्ये होणार आहे. याच दिवशी अडानी पोर्टच्या शेअर बाय बॅकची शेवटची तारीख आहे.

१७- १८ सप्टेंबर २०१९ हे दोन दिवस फेड ची मीटिंग आहे. १९ सप्टेंबर २०१९ ही HDFC बँकेच्या शेअर स्प्लिटची शेवटची डेट आहे. १६ सप्टेंबर २०१९ ला DHFL आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल.

ISARGO (आशिया) ही कंपनी PI इंडस्ट्रीजने खरेदी केली. ती PI इंडस्ट्रीजला खूप स्वस्तात मिळाली.

J कुमार इन्फ्रा या कंपनीला मुंबई मेट्रोसाठी Rs १९९ कोटी ऑर्डरसाठी लेटर ऑफ एक्सेप्टन्स मिळाले.

ICRA ने कॉफी डे चे लॉन्ग टर्म रेटिंग BB +वरून D एवढे कमी केले.

RBI ने नियमात बदल केला. कन्झ्युमर लोनच्या बाबतीत रिस्क वेटेज १२५% वरून १००% केले. याचा फायदा HDFC आणि HDFC बँक यांना होईल.

केंद्रीय आवास मंत्र्यानी घोषणा केली की लवकरच हाऊसिंग सेक्टरसाठी एक स्टिम्युलस पॅकेज जाहीर करू.

सरकार केवळ BSVI हायब्रीड वाहनांवरील GST कमी करण्याची शक्यता आहे.

SML इसुझू या कंपनीने आपली NOVANSHAHR क्लासिक डिव्हिजन ६ दिवस बंद ठेवणार असे सांगितले आहे.
सरकार BPCL मधील स्टेक विदेशी कंपन्यांना विकणार आहे अशी बातमी आल्यामुळे HPCL, IOC, MRPL, चेन्नई पेट्रो, GP पेट्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

आता मार्केट स्थिरावेल असे वाटल्यामुळे सरकार आता ETF इशू आणण्याचा विचार करत आहे. यामुळे सर्व सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७३८४ NSE निर्देशांक निफ्टी ११०७५ बँक निफ्टी २८०९८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६०.५५ प्रती बॅरल ते US $ ६१.३४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२६ ते US $१ = Rs ७१.४२ होते. US $ निर्देशांक ९८.५२ तर VIX १४.९० होता.

गणेशचतुर्थीच्या पूर्वी मार्केटमध्ये निराशा होती. पण आज अनंत चतुर्थीच्या दिवशी वातावरण बदलले आहे. बर्याच प्रमाणात निराशा कमी झाली आहे. प्रत्येक देशाने आर्थीक मंदीवर हल्लाबोल केला आहे. भारताच्या अर्थमंत्र्यानी स्टिम्युलसचा सपाटा सुरु केला आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या US $ २५० अब्ज मालावरची ड्युटी लावणे १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पुढे ढकलले आहे. ट्रम्प यांनी असे सांगितले की चीनच्या स्थापनेला ७० वर्ष पुरी झाल्याबद्दल सदिच्छा व्यक्त करण्यासाठी असे केले. ट्रम्प यांचे हृदयपरिवर्तन होत आहे. इराण बरोबरही बोलणी सुरु होत आहेत. इराणवरील निर्बंधात ढील दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जगातील सर्व मार्केटमध्ये तेजीचे वातावरण निर्माण झाले. ट्रम्प यांनी फेडला झिरो इंटरेस्ट रेट किंवा निगेटिव्ह इंटरेस्ट रेट करावा असे आग्रही प्रतिपादन केले.

रिलायन्स NIPPON ची ऑफर फॉर सेल ओपन आहे. आज OFS किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन झाली आहे. या OFS ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फ्लोअर प्राईस Rs २६२ आहे.

SBI त्यांचा SBI लाईफ मधला स्टेक OFS च्या माध्यमातून विकत आहे. याची फ्लोअर प्राईस Rs ७७० आहे.
अपोलो हॉस्पिटलचे प्रमोटर आपला ३.६% स्टेक Rs १४५० प्रती शेअर या भावाने विकणार आहेत. या विक्रीनंतर अपोलो हॉस्पिटलमधील प्रमोटर्सचा स्टेक ३०.८% राहील.

नेल्कोला इनफ्लाईट आणि मेरीटाईम कम्युनिकेशनसाठी लायसेन्स मिळाले.

बँक ऑफ बरोडाने BKC मध्ये असलेल्या देना कॉर्पोरेट सेंटरच्या बिल्डिंगसाठी बोली मागवल्या आहेत. यासाठी रिझर्व्ह किंमत Rs ५३० कोटी ठेवली आहे.

‘घर घर जल’ या योजनेचा फायदा इंडियन ह्यूम पाईप, जिंदाल SAW, फिनोलेक्स, ASTRAL पॉली या कंपन्यांना होईल.
L & T ला वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्यासाठी महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यात Rs १००० कोटी ते Rs २५०० कोटींच्या दरम्यान ऑर्डर मिळाली.

सरकार SJVNL, THDC, NEEPCO या पॉवर क्षेत्रातील कंपन्यांचे मर्जर NHPC किंवा NTPC या कंपन्यात करण्याची शक्यता आहे.

एअर इंडियामधील आपला स्टेक विकण्यासाठी सरकार ऑक्टोबर २०१९ च्या अखेरपर्यंत बोली मागवणार आहे.

GRANUELS इंडियाच्या तेलंगाणा युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीत USFDA ने EIR दिला आणि क्लीन चिट दिली.

इमामीचा Rs ६००० कोटींचा सिमेंट बिझिनेस घेण्यासाठी दालमिया भारतने बोली लावली आहे. त्यांनी यासाठी EOI ( एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट) दिला आहे.

जुलै महिन्यासाठी IIP ४.३% तर ऑगस्ट महिन्यासाठी CPI ३.२१% होते.

येत्या पांच वर्षात US $ १ लाख कोटी निर्यातीचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. भारताच्या औद्योगिक धोरणालाही अंतिम स्वरूप दिले जाईल असे सरकारने जाहीर केले.

सरकार J & K च्या ९५ गावांत आणि लडाखमध्ये ५३ गावात ३६२ मोबाईल टॉवर उभारणार आहे. या दोन राज्यात कनेक्टिव्हिटी वाढवणार आहे. एका आठवड्याच्या आत Rs ४५० कोटींचे टेंडर काढणार आहे.

सरकार NHB (नॅशनल हौसिंग बँक) ला हौसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये स्टेक घेण्यासाठी मंजुरी देण्याची शक्यता आहे.
उद्या संध्याकाळी ४-१५ वाजता माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची CBDT आणि CBIC च्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाल्यावर त्या प्रेस कॉन्फरन्स घेतील.या कॉन्फरन्समध्ये रिअल्टी सेक्टर आणि लेदरवेअर सेक्टर साठी काही महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. लेदर सेक्टरसाठी ड्युटी फ्री इंपोर्टची मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. ३% वरून ५% करण्यात येईल. लेदर निर्यातीसाठी उत्तेजन दिले जाईल. फूटवेअरसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील GST १८% वरून १२% करण्याची शक्यता आहे. याचा फायदा मिर्झा इंटरनॅशनल, खादीम फूटवेअर, सुपर हाऊस, रीलॅक्झो, लिबर्टी यांना होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१०४ NSE निर्देशांक निफ्टी १०९८२ बँक निफ्टी २७८१८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.७१ प्रती बॅरल ते US $ ६३.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६३ ते US $१=Rs ७१.७७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२५ तर VIX १४.८८ होता.

आज हाँगकाँगच्या प्रकरणात थोडी नरमाई आली. युरोपियन युनियन आणि फेड आपल्या वित्तीय धोरणात विविध सवलती देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात तेजी होती.

चीनची अर्थव्यवस्था क्लोज्ड अर्थव्यवस्था आहे. चीन आता आपली अर्थव्यवस्था हळू हळू ओपन करत आहे. चीन आपल्या युआन या करन्सीच्या व्हॅल्यूमध्ये वारंवार बदल करत असते. आज चींनने त्यांच्या कॅपिटल मार्केटमध्ये FII साठी घातलेले निर्बंध उठवले.FII च्या गुंतवणुकीवर असलेली US $३०० बिलियनची मर्यादा उठवली. आता चीनच्या शेअर आणि बॉण्ड मार्केटमध्ये परदेशी गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मेटल संबंधीत शेअर्समध्ये तेजी होती.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळोवेळी केलेल्या ट्विटचे विश्लेषण करून JP मॉर्गन यांनी VOLFEFE निर्देशांक तयार केला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट नंतर बॉण्ड करन्सी कमोडिटी आणि इक्विटी मार्केट मध्ये होणाऱ्या बदलांचा हा निर्देशांक अभ्यास करतो.

इंडोनेशियाने त्यांच्या मार्केटमध्ये भारताला ऍक्सेस देण्याचा प्रस्ताव ठेवला भारताने यावेळी ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. इंडोनेशियाने ICUMSA ( इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड ऑफ शुगर ऍनॅलिसिस) च्या नियमात सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारताने या प्रस्तावाला सहमती दिली आहे. याचा फायदा साखर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होईल. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

सरकारने बँकांना असे सुचवले आहे की छोट्या उद्योगधंद्यांना( ज्यांनी Rs २ कोटी ते Rs ५ कोटी कर्ज घेतले आहे) त्यांच्या थकलेल्या कर्जाच्या बाबतीत कारवाई करताना थोडे नरम धोरण ठेवावे. जर थकबाकी राहण्याची कारणे खरी असतील तर ही खाती ताबडतोब रिस्ट्रक्चर करावी. मालमत्ता जप्त करून वसुली करणे हा शेवटचा पर्याय ठेवावा.

सरकारने असे जाहीर केले की थोड्याच दिवसात रिअल्टी क्षेत्रासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जातील.

माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की ५ ते ६ वर्षांत भारत हा एक ऑटो मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल. दुचाकी वाहनांसाठी लवकरच स्क्रॅपेज पॉलिसी बनवण्यावर विचार मंथन चालू आहे. या मंत्र्यांच्या घोषणेनंतर दुचाकी वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. हिरो मोटो, बजाज ऑटो, TVS मोटर्स.

आज पंतप्रधानांनी मथुरेमध्ये सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बहिष्कार टाकून भारत सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करण्याचे आवाहन केले. घरात आणि कार्यालयात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये. प्लास्टिक रिसायकल केले जाईल. जे प्लास्टिक रिसायकल होऊ शकत नाही त्याचा उपयोग सरकार रस्ते बनवण्यासाठी करेल. या पंतप्रधांनांच्या घोषणेनंतर पेपर, ज्यूट उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

सरकार सरकारी NBFC मधील स्टेक कमी करण्याचा विचार करत आहे. DIPAM या बाबतीत लवकरच एक नोट प्रसारित करेल.

भेलने ओडिशात १३२० MV प्लांटचे काम सुरु केले

ONGC गुजरातमध्ये १३४ विहिरींची खोदाई करेल.

राणा कपूर या येस बँकेच्या प्रमोटर्सनी आपला ९.६४% स्टेक Rs २००० कोटींना विकण्याचे ठरवले आहे. या शेअर्सची व्हॅल्यू Rs १५५४ कोटी आहे. त्यांची याबाबतीत पे टी एम च्या विजय शेखर शर्मा यांच्याशी बोलणी चालू आहेत. या बातमीमुळे येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी आली.

फायनान्सियल सेक्रेटरीने सांगितले की भांडवल घातल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता PCA च्या बाहेर येऊ शकतील. रिफॉर्म्समुळे NPA कमी झाले. बँकांनी फ्रॉडविषयी रिपोर्टींग ताबडतोब करावे. सर्व NPA खाती IBC च्या दारापर्यंत नेऊ नयेत. विक्री वाढण्यासाठी बँकांनी व्याजाचे दर कमी करावेत.

होंडाने आपली BSVI ऍक्टिव्हा १२५ लाँच केली.

भारती एअरटेलने Rs ३९९९ प्रती महिना ब्रॉडबँड पॅकेज लाँच केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७२७० NSE निर्देशांक निफ्टी ११०३५ बँक निफ्टी २७५७६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ९ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ९ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.०४ प्रती बॅरल ते US $ ६२.२१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.५५ ते US $ १= Rs ७१.७१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४३ होते. VIX होता. आज निफ्टीने ११००० चा टप्पा ओलांडून त्यावर क्लोज दिला .

L & T टेक या कंपनीला युरोपिअन ऑटो कंपनीकडून इलेक्ट्रिफिकेशनसाठी ऑर्डर मिळाली.

सन फार्माच्या प्रमोटर्सनी ९९.७ लाख तारण म्हणून ठेवलेले शेअर्स ६ सप्टेंबर २०१९ रोजी सोडवले. सन फार्माचा शेअर वाढला.

सोमाणी सिरॅमिक्सला त्यांच्या स्टॉक ब्रोकर मेंटॉर फायनान्सियल सर्विसेसने दिलेला Rs २६.२ कोटींचा चेक परत आला. सोमाणी सिरॅमिक्सच्या शेअरला लोअर सर्किट लागले. 

मनपसंद बिव्हरेजीसची FY २०१६-१७ FY २०१७-१८ FY २०१८-१९ साठी स्वतंत्र फोरेन्सिक ऑडिटर्स नेमण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने मंजुरी दिली. मनपसंद बिव्हरेजीसला लोअर सर्किट लागले.

SIAM या संस्थेने आज ऑगस्ट २०१९ महिन्यासाठी ऑटो विक्रीचे आकडे जाहीर केले. डोमेस्टिक पॅसेंजर वाहनांची विक्री ३१.५७% ने कमी होऊन १.९६ लाख युनिट झाली. डोमेस्टिक कार्स ची विक्री ४१.०४% नी कमी होऊन १.१५ लाख युनिट झाली. कमर्शियल वाहनांची विक्री ३८.७१ % कमी होऊन ५१८९७ युनिट झाली. दुचाकी वाहनांची विक्री २२.२४% ने कमी होऊन १५.१४ लाख युनिट झाली. M &H वाहनांची विक्री ५४% ने कमी होऊन १५५७३ युनिट्स झाली. LCV ची विक्री २८.२% ने कमी होऊन ३६३२४ युनिट्स झाली.  या प्रकारे ऑटोसेक्टरमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये विक्री कमी झाली.
अशोक लेलँडने त्यांच्या बऱ्याच प्लांट्समध्ये उत्पादन बंद ठेवले.

बँक ऑफ बरोडाने Rs ८९०७ कोटींच्या NPA विक्रीसाठी बोली मागवल्या.

DHFL ने त्यांचे Rs १५० कोटींचे CP एक्स्पोजर पूर्णपणे परत केले.

ईक्विटास स्माल फायनान्स बँकेच्या लिस्टिंगची तारीख टळून गेली. स्माल फायनान्स बँकेचे लिस्टिंग वेळेवर झाले नाही. ३ वर्षांनंतर म्हणजे ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत लिस्टिंग करायचे होते. होल्डिंग कंपनीचे स्मॉल फायनान्स बँकेत मर्जर करायला परवानगी मिळाली नाही.इक्विटासचा शेअर पडला. आता ज्यांच्याकडं इक्विटासचे शेअर्स आहेत त्यांना इक्विटास स्माल फायनान्स बँकेचे शेअर्स देण्यासाठी इक्विटासने परवानगी मागितली आहे. इक्विटासच्या व्यवस्थापनाने IPO आणण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील आपला सर्व स्टेक सरकार विकनार आहे. त्यामुळे हा शेअर वाढला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७१४५ NSE निर्देशांक निफ्टी ११००३ बँक निफ्टी २७५०४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६०.८५ प्रती बॅरल ते US $ ६१.०८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६४ ते US $१=Rs ७१.८४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३१ होता. VIX १६ .५० होते.

USA च्या अर्थव्यवस्थेचे आकडे चांगले आले, USA आणि चीन दोघांनीही ट्रेड संबंधातील वाटाघाटींबद्दल समंजस भूमिका घेतली. त्यामुळे सोन्याचा भाव कमी झाला. शेअरमार्केटमधील मरगळ जाऊन थोडीशी तेजी आली. .

आज चींनने १६ सप्टेंबर २०१९ पासून CRR मध्ये ०.५% कपात केली.यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला स्टिम्युलस मिळेल. याचा परिणाम कमोडिटी मार्केट, मेटल्सशी संबंधित शेअर्समध्ये जाणवेल.

FY २०१६-१७ आणि FY २०१७-२०१८ या दोन वर्षांसाठी सन फार्माचे फोरेन्सिक ऑडिट केले जाईल.

इंडिया बुल्स हौसिंग या कंपनीच्या प्रमोटर्स बद्दल पुन्हा PIL दाखल केली. या कंपनीच्या लक्ष्मी विलास बँकेबरोबर होणाऱ्या मर्जरवर याचा परिणाम होईल.

आज सरकारने १५ सप्टेबर २०१९ पासून सिंगल यूज प्लास्टिक वापरण्यावर बंदी घातली. याचा फायदा ज्यूट आणि पेपर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल. उदा LUDLOW ज्यूट, CHEVIOT. JK पेपर, ओरिएंट पेपर, हुतामाकी PPL, JK पेपर, वेस्टकोस्ट पेपर, शेषशायी पेपर आणि इंटरनॅशनल पेपर यांना होईल.

मुथूट फायनान्स ही कंपनी आपल्या ५०० शाखा बंद करणार आहे.

अशोक लेलँड चेन्नईजवळचा एन्नोर येथील प्लांट ५ दिवसांसाठी बंद ठेवणार आहे. गेल्या महिन्यातही हा प्लांट १० दिवस बंद ठेवला होता.

युनिकेमच्या पीठमपुर प्लाण्टला USFDA ने क्लीन चिट दिली.

BHEL ला NSPCL कडून Rs ४५० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले.

निर्यात वाढवण्यासाठी विविध उद्योगांना GST मध्ये सवलत देण्यावर सरकार विचार करत आहे. पॉलिश्ड डायमंड्स, जेम्स स्टोन यांच्यावरील ड्युटी ७.५% वरून २.५% करणार. चांदी आणि प्लॅटिनम ला IGST मधून सूट देणार. देशी वॅगन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना GST मधून सूट (याचा फायदा टिटाघर वॅगन, काँकॉर यांना होईल.), टेक्सटाईल सेक्टरचा कच्चा माल, ऑटो कॉम्पोनंट्स, EV च्या बॅटरी पॅकवर GST मध्ये सूट देण्यावर GST कौन्सिल विचार करील.

प्रभात डेअरी ह्या कंपनीने आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक कंपनीचे शेअर्स व्हालंटरीली डीलीस्टिंग करण्यावर विचार करण्यासाठी बोलावली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९८१ NSE निर्देशांक निफ्टी १०९४६ बँक निफ्टी २७२४७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ६०.४१ प्रती बॅरल ते US $ ६०.७७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७९ ते US $१=Rs ७१.९५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.४८ होता. VIX १६.८० होते.

ऑक्टोबर २०१९ च्या सुरुवातीला चीन आणि USA यांच्या वॉशिंग्टनमध्ये समोरासमोर बसून व्यापारासंबंधी द्विपक्षीय वाटाघाटी होतील. चीनने USA च्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून ही घोषणा केली. यामुळे USA आणि चीन यांच्यातल्या चिघळलेल्या ट्रेड वॉरमध्ये सामोपचाराची भूमिका घेतली जाईल अशा विचाराने आशियातील सर्व मार्केट सुधारली.
FY १९-२० च्या पहिल्या तिमाहीत FDI २८% ने वाढून US $ १६ बिलियन झाली.

आज RBI ने बँकांना गृह कर्ज, पर्सनल कर्ज आणि MSME ना दिलेल्या कर्जावरील दर रेपो रेट किंवा FBIL (फायनान्सियल बेंचमार्क इंडिया लिमिटेड) यांनी ठरवून दिलेल्या बेंचमार्क रेटशी लिंक करावे लागतील अशी सूचना दिली. ह्या दरांचा दर तीन महिन्यांनी रिव्ह्यू घेतला जाईल. आणि बँकेने ठरवलेला स्प्रेड तीन वर्षे तरी बदलता येणार नाही. ह्यामुळे आता RBI ने केलेले रेट कट कर्जदारांपर्यंत जलद आणि निश्चितपणे पास ऑन होतील.यामुळे बँकांचे या तीन प्रकारच्या कर्जावरील NII (नेट इंटरेस्ट इन्कम) कमी होईल. याचा परिणाम NIM (नेट इंटरेस्ट मार्जिन) वर होईल. आता तरी ही प्रोव्हिजन नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना लागू होईल. ज्या बँकांचे ह्या तीन प्रकारच्या लोनचे एक्स्पोजर जास्त होते त्या बँकांच्या शेअर्समध्ये मंदी आली. यात ICICI बँक ( गृह कर्ज आणि SME यांच्यावर भर) आणी LIC हौसिंगवर परिणाम झाला आणि दोन्ही शेअर पडले. बँकांनी असे सांगितले की सिस्टीममध्ये लिक्विडीटी पुरेशी असल्यामुळे बँका कोणत्याही प्रकारचे कर्ज द्यावयास तयार आहेत.

आज PNB च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी बँकेच्या OBC आणि युनायटेड बँकेबरोबरच्या मर्जरला मंजुरी दिली.
LAURAS लॅबच्या विशाखापट्टणम येथील युनिट १ आणि युनिट ३ ला USFDA ने EIR दिला त्यामुळे हा शेअर वाढला.
आज माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. येत्या ३ महिन्यात Rs ५ लाख कोटींच्या ६८ रोड प्रोजेक्टसाठी कंपन्यांना ऑर्डर दिल्या जातील. सरकार पेट्रोल आणि डिझेल वाहने बंद करणार नाही. हायब्रीड वाहनांवरील GST कमी करण्याविषयी विचारविमर्श चालू आहे. ऑटो निर्यातीसाठी सबसिडी देण्यावर तसेच पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरील कर कमी करण्याविषयी विचार चालू आहे. ऑटो कंपन्यांनी विक्री वाढवण्यासाठी ऑटो कर्जासाठी आपली स्वतंत्र व्यवस्था चालू करावी

मारुतीने सांगितले की ते FY १९-२० च्या उत्तरार्धातील प्रगतीविषयी आशावादी आहेत. BSVI च्या अटी पूर्ण करण्यासाठी कार्सच्या किमती Rs १५००० नी वाढवाव्या लागतील. कंपनी FY २०-२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करेल.
JAYPEE होम बायर केसमध्ये सुप्रीम कोर्टाने NBCC ला तीन आठवड्याच्या आत त्यांची योजना सादर करायला सांगितले.
आज सरकारने मलेशियातून आयात होणाऱ्या RBD पामोलिन आणि पाम ऑइलवर ५ % सेफगार्ड ड्युटी लावली. मलेशियातून रिफाईंड तेलाची खूपच आयात होत असल्याने स्वदेशी उद्योगाचे नुकसान होत होते.

आज रिलायन्स जिओ फायबर मार्केटमध्ये लाँच करेल.

बजाज फायनान्स Rs १०० कोटी किमतीचे शेअर्स नोमुरा आणि कोटक बँक यांना विकण्याची शक्यता आहे.
PSU ना आता काँट्रॅक्टर्सना त्यांनी केलेल्या कामाचे पैसे ठरावीक मुदतीत द्यावे लागतील. अन्यथा त्यांना पेनल्टी लावली जाऊ शकते. आर्बिट्रेशनमध्ये अडकलेली रक्कम आता लवकर मिळेल. यासाठी जरूर वाटले तर PSU ना लागू होणाऱ्या नियमात बदल केले जातील.

सरकार लवकरच Rs २० लाख कोटीच्या इन्फ्रा योजनांची घोषणा करेल. यात फ्रेट कॉरिडॉर, पोर्ट ट्रस्ट, गॅस पाईप लाईन, वेअरहाऊस यांच्यावर भर असेल. या इन्फ्रा प्रोजेक्टसाठी निवडक PSU बरोबर माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बैठक घेतील. रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी एक टास्क फोर्स नेमला जाईल.

DR रेड्डीज ने USA मध्ये ZYBAN ह्या औषधाची जनरिक व्हर्शन लाँच केली.

कोचिन शिपयार्ड या कंपनीला कोच्ची मेट्रोकडून LOA ( लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स) मिळाले.

भूषण पॉवर या कंपनीचा JSW स्टीलने सादर केलेला रेझोल्यूशन प्लॅन NCLT ने मंजूर केला. सरकार लवकरच BEL, BEML, शिपिंग कॉर्पोरेशन, हिंदुस्थान कोपर यासारख्या PSU मध्ये स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६४४ NSE निर्देशांक निफ्टी १०८४७ बँक निफ्टी २६९१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ सप्टेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ सप्टेंबर २०१९

आज क्रूड US $ ५८.३१ प्रती बॅरल ते US $ ५८. ५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७२.०१ ते US $१=Rs. ७२.२७ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९८.८२ तर युआन US $१= YUAN ७.१६९५ होते. VIX १८.२० होता.

आज ICICI लोम्बार्डमधील आपला ८.८७% FAIRFAXने विकला. या स्टेकचा लॉकइन पिरियड काल ३ सप्टेंबर रोजी संपला होता.

ऑगस्ट २०१९ मध्ये सोन्याची आयात ७३% (YOY) कमी झाली. गेल्या तीन वर्षातील ही किमान आयात आहे.

कॉफी डे चे ४.४ लाख तारण म्हणून ठेवलेले शेअर्स आज कर्जदारांनी विकले.

चींनने एक्सट्रॅडीशन बिल मागे घेतले त्यामुळे हाँगकाँगचे मार्केट ९०० पाईंट वधारले. त्यामुळे मार्केटने चीनने थोडी माघार घेतली असल्यामुळे ट्रेड वॉर चाही तिढा सुटेल. मार्केटची निराशा कमी होईल. आज क्रूडनेसुद्धा माघार घेतली. त्यामुळे थोडेफार शॉर्ट कव्हरिंग थोडी खरेदी दिवसभर सुरु होती.

सेबीने सन फार्मा आणी स्पार्क या कंपन्यांचे फ़ोरेन्सिक ऑडिट करायला सांगितल्यामुळे हे शेअर पडले.

मारुतीचे गुरगाव आणि मानेसर ही युनिट्स ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर असे तीन दिवस बंद राहतील.

सरकारने BEML या कंपनीच्या VIGNYAN इंडस्ट्रीज या सबसिडीअरीमधील सरकारचा स्टेक विकत घेण्यासाठी बोली मागवल्या.

वास्कॉन इंजिनीअरिंग या कंपनीला सरकारकडून Rs ४६५ कोटींचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६७२४ NSE निर्देशांक निफ्टी १०८४४ बँक निफ्टी २७१२३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!