Tag Archives: last week in share market in marathi

आजचं मार्केट – ०५ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०५ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७० प्रती बॅरल च्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२० च्या आसपास होता. US $ निर्देशांक ९२.३० USA १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड १.१९ VIX १३.०३ PCR १.७७ होते.

आज USA फेडच्या व्हाईस चेअरमन रिचर्ड यांनी सांगितले की डिसेंबर २०२१ पासून कदाचित बॉण्ड खरेदीमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. USA मधील क्रूडची इन्व्हेंटरी वाढली आहे आणि डेल्टा व्हरायन्टचा संसर्ग वाढत असल्यामुळे मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रूडचे दर मंदीतच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.सौदी आरामको सप्टेंबर २०२१ पासून क्रूडचे दर वाढवणार आहे.

GE चे निकाल सुंदर आले पण शेअर मात्र ९% पडला. कारण टेक्नॉलॉजीमध्ये अडचणी येतील.USA चा जॉब डेटा असमाधानकारक म्हणजे ३ लाख आला.

चीन आपल्या स्टेट रिझर्व्ह मधून बेस मेटल्स विकत आहे. त्यामुळे मेटल्स मध्ये मंदी होती.होंडानी चीनमधील हुआन प्रांतातील ३ प्लांट बंद केले.

सुझुकी मोटर्सने २०२१चा ऑपरेशनल प्रॉफिट गायडन्स सेमी कंडक्टर्सच्या टंचाईमुळे कमी केला.यामुळे मारुतीचा शेअर पडला.

HDFC बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड इशू करण्यावर डिसेंबर २०२०मध्ये घातलेली बंदी RBI येत्या ५-६ आठवड्यात उठवण्याची शक्यता आहे. या संबंधातील चौकशी अंतिम टप्प्यात आहे.

स्वीगीने रिलायन्स BP मोबिलिटीबरोबर बॅटरी swaping स्टेशनसाठी करार केला.

ग्रीव्हज कॉटन ही कंपनी त्यांची चिंचवड जवळ असलेली जमीन Rs ३२० कोटींना विकणार आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नॉन कोअर ऍसेट विकण्यासाठी सरकारची परवानगी मिळाली.

बेअरिंगने कोफोर्ज मधील ५.५% स्टेक नोमुराला विकला.

कार्लाइलने SBI लाईफ मधील १.९% स्टेक विकला.

भारती एअरटेलने सांगितले की 5G लाँच करण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज आंध्र प्रदेशमध्ये पेट रिसायकलिंग प्लांट उभारणार आहे.

ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज गुजरातमध्ये Rs ५५० कोटी गुंतवून प्लांट उभारणार आहे.

सरकारने रस्तेबांधणीमधील काँट्रॅक्टर्सना त्यांचे पेमेंट त्वरित दिले जाईल असे सांगितले. त्यामुळे त्यांना येणारा लिक्विडिटीचा प्रश्न दूर होईल. याचा फायदा NCC, IRB इन्फ्रा, MEP, J.कुमार, दिलीप बिल्डकॉन,अशोका बिल्डकॉन इत्यादी कंपन्यांना होईल.

‘वन वेब’ ला २० वर्षांसाठी GMPCS/VSAT लायसेन्स मिळाले. यात भारती ग्लोबल,ब्रिटन सरकारची हिस्सेदारी आहे.
केम्प्लास्ट सनमार या कंपनीचा Rs ३८५० कोटींचा (फ्रेश इशू Rs१३०० कोटींचा आणि OFS Rs २५५० कोटींचा असेल). IPO १० ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन १२ ऑगस्ट २०२१ला बंद होईल. संनमार ग्रुप शिपिंग, केमिकल्स, इंजिनीअरिंग या क्षेत्रात कार्यरत आहे. फ्रेश इशूचे प्रोसिड्स Rs १२७० कोटींच्या EARLY डिबेंचर रिडम्प्शनसाठी वापरले जातील. याचा प्राईस बँड Rs ५३० ते Rs ५४१ असा असेल.

APTUS व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया या रिटेल फोकस्ड, ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील मुख्यतः सेल्फ एम्प्लॉईड लोकांना अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाला हाऊसिंग लोन देणाऱ्या कंपनीचा Rs २ दर्शनी किमतीच्या शेअर्सचा (प्राईस बँड Rs ३४६ ते Rs ३५३ आणि मिनिमम लॉट ४२ शेअर्सचा) येत आहे.हा IPO १० ऑगस्ट रोजी ओपन होऊन १२ ऑगस्टला बन्द होईल.

आज अडानी टोटल, टाटा कम्युनिकेशन, कॉस्मो फिल्म्स, टायटन, अपोलो टायर्स, सुमिटोमो केमिकल्स, गेल , पनामा पेट्रो, हिकल, कॅपलिन पाईंट( Rs १.५० प्रती शेअर लाभांश), CERA सॅनिटरीवेअर, अरविंद ( तोटा लक्षणीय कमी झाला),REC, बिर्ला कॉर्प, HPCL या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आज पेपर उत्पादक कंपन्यांचे, IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

नुवोको व्हिस्ता या निरमा ग्रुपच्या सिमेंट उत्पादन करणाया कंपनीचा Rs ५००० कोटींचा IPO ९ ऑगस्ट २०२१ रोजी ओपन होऊन ११ ऑगस्टला बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ५६० ते Rs ५७० असून यात फ्रेश इशू Rs १५०० कोटींचा आहे आणि OFS Rs ३५०० कोटींचा आहे. नुवोको ही भारतातीळ ५वी मोठी सिमेंट उत्पादक कंपनी असून तिचे ११ प्लांट आहेत. IPO प्रोसिड्स कंपनीचे कर्ज फेडण्याकरता वापरले जातील.

VI च्या एक्झ्युटिव्ह चेअरमन आणि डायरेक्टरच्या पदाचा कुमारमंगलम बिर्ला यांनी राजीनामा दिला. कंपनीत भांडवल घातले जात नसल्यामुळे कंपनीचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीला कर्ज देणाऱ्या इंडसइंड बँक,PNB, SBI आणि येस बँकेच्या शेअरवरही या घडामोडिंचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४४९२ NSE निर्देशांक निफ्टी १६२९४ बँक निफ्टी ३५८३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०४ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०४ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७२.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.२० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.०० USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.१७ VIX १३.३८ PCR १.७५ होते.

USA मध्ये अध्यक्ष जो बिडेन यांच्या US १ ट्रिलियनच्या इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगच्या पॅकेजवर हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह विचार करेल. ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टाचे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर आहे. जपान आणि हाँगकाँग ही मार्केट्स मंदीत होती.कमी होणारे USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड, हळू हळू कमजोर होत असलेला US $ आणि सोन्यातील तेजी यामुळे इमर्जिंग मार्केट्समध्ये FII ची गुंतवणूक येत आहे.

चीन गेमिंग कंपन्यांवर कडक निर्बंध घालण्याची शक्यता आहे. याचा परिणाम नजारा च्या शेअरवर होईल.

DR रेड्डीज नॅप्रोक्सीन सोडियम हे औषध पुन्हा लाँच करणार आहे. म्हणून या शेअरमध्ये तेजी होती.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल एडिबल ऑइल मिशनला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता सरकार खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी उत्तेजन देणार आहे. आणि यासाठी सरकारने Rs ११००० कोटींची तरतूद केली आहे. सरकारचा याबाबतीत देशाने स्वावलंबी व्हावे हा उद्देश या मागे असेल.

टाटा मोटर्सने ‘टिआगो NRG’हे मॉडेल लाँच केले याची किंमत Rs ६.५७ लाख आहे.

केसोराम या कंपनीने आपल्या राईट्स इशूची रक्कम Rs २०० कोटींवरून Rs ४०० कोटी केली.

इंडियन हॉटेल्स या कंपनीची भांडवल उभारणीवर विचार करण्यासाठी ९ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आहे.

अल्केमलॅब ही कंपनी USA मध्ये इब्युप्रोफेन आणि FAMATIDINE ही औषधे लाँच करणार आहे.

सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे मारुतीने आपल्या फॅक्टरीमध्ये १ शिफ्टचे वर्किंग कमी केले.तसेच ७ ऑगस्ट, १४ ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट २०२१ रोजी गुजरातमधील प्लांट बंद ठेवणार आहे. या सर्व बातम्यांमुळे मारुतीचा शेअर पडला.

टाटा स्टील BSL, सुब्रोस, भारत बिजली, BOSCH, कलाहस्ती पाईप्स या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या. अडाणी ग्रीन, सोलारा ऍक्टिव्ह फार्मा. करूर वैश्य बँक, चंबळ फर्टिलायझर्स, गोदरेज कन्झ्युमर यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

आज स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेला NII Rs २७६३८ कोटी तर अन्य उत्पन्न Rs ११८०२.०० कोटी झाले. प्रॉफिट Rs ६५०० कोटी झाले. लोन ग्रोथ ५.८% झाली. GNPA ५.३२% तर NNPA १.५०% झाले. बँकेच्या या निकालाला मार्केटने चांगला प्रतिसाद दिला त्यामुळे SBI च्या शेअरमध्ये लक्षणीय तेजी आली.
देवयानी इंटरनॅशनल या कंपनीचा IPO आल्यामुळे त्याच क्षेत्रातील बेक्टर फूड्स आणि BARBEQ नॅशन या शेअर्समध्ये तेजी होती.

VI मध्ये कुमारमंगलम बिर्ला यांचा २७% स्टेक सरकारला ऑफर केला होता. पण सरकारने यावर फारसा अनुकूल प्रतिसाद न दिल्याने आज VI चा शेअर पडला.

आदित्य पुरी यांनी सोलारा ऍक्टिव्ह फार्माचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला.

PNB हौसिंगच्या कार्लाइल डीलला CCI (COMPETITION कमिशन ऑफ इंडिया) ची मंजुरी मिळाली. त्यामुळे PNB हौसिंगच्या शेअरला अपर सर्कीट लागले.

आज देवयानी इंटरनॅशनल, EXXON टाईल्स, KRSSN डायग्नॉस्टिक्स, आणि विंडलास बायोटेक या चारी कंपन्यांचे IPO पहिल्या दिवशीच पूर्ण भरले.

आज रिअल्टी क्षेत्रामध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. FII नी खरेदी चालू केली. PMI निर्देशांक, GST कलेक्शन, कॉरपोरेट निकाल आणि निर्यातीचे आकडे चांगले आले.

आज RBI च्या MPC ची दोन दिवसांची बैठक चालू झाली. ६ ऑगस्ट २०२१ रोजी RBI आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५४३६९ NSE निर्देशांक निफ्टी १६२५८ बॅंक निफटी ३६०२८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०३ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०३ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $७३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $ १= Rs ७४.३० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.०४ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.१८ VIX १३.६८ PCR १.५९ होते.

भारतीय शेअर मार्केट खूप काळपर्यंत कन्सॉलिडेट होत होते. सगळे ट्रेडर्स, गुंतवणूकदार निफ्टी ५० च्या १६००० होण्याची वाट पाहात होते. आजच्या मार्केटमध्ये निफ्टी १६००० च्या वर क्लोज झाला. कोरोनाच्या केसेस कमी होत आहेत. बहुतेक राज्यात अर्थव्यवस्था ओपन होत आहे. त्यामुळे आज FMCG, ऑटो, रिअल्टी, केमिकल, फार्मा आणि हेल्थकेअर, टेक्सटाईल क्षेत्रात तेजी होती.

CAR-TRADE-TECH ह्या कंपनीचा Rs २९९८.५१ कोटींचा ( ही पूर्णपणे OFS आहे ) Rs १० दर्शनी किमतीच्या शेअर्सचा IPO ९ ऑगस्ट रोजी ओपन होऊन ११ ऑगस्ट २०२१ बंद होईल. या IPO चा प्राईस बँड Rs १५८५.०० ते Rs १६१८ असून मिनिमम लॉट ९ शेअर्सचा आहे. हही कंपनी एक ऑटो खरेदी विक्रीसाठी प्लॅटफॉर्म चालवते. या कंपनीचे कारवाले, कारट्रेड, श्रीराम ऑटोमाल, ऑटो BIZ इत्यादी ट्रेडमार्क आहेत. ही कंपनी DEBTFREE कंपनी आहे. ही कंपनी नवीन, जुन्या ऑटो खरेदीदारांना आणि विक्रेत्यांना, ट्रेडर्सना, व्हेईकल OEM यांना त्यांच्या ऑटो खरेदी/विक्री मध्ये मार्केटिंग, फायनान्स आणि इतर सेवा देऊन मदत करते. या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग २३ ऑगस्ट २०२१ रोजी होईल.

इंडिया मार्ट AGILLOS E -कॉमर्स मध्ये २६.२३% स्टेक Rs २६ कोटींना पूर्ण कॅश डील मध्ये खरेदी करेल.

IOB, ALKYL अमाईन्स, नोसिल, गोदरेज प्रॉपर्टि ( अन्य आय वाढली आहे.), डाबर,इंडो काउंट, नितीन स्पिंनर्स, अडाणी पोर्ट, बजाज हेल्थ केअर, मुंजाल शोवा, काकतीया सिमेंट, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले

बँक ऑफ इंडिया, NEULAND लॅबोरेटरीज,शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

भारती एअरटेलचे उत्पन्न वाढले पण नफा लक्षणीय रित्या कमी झाला. BARBEQ नेशनचा तोटा कमी झाला, उत्पन्न वाढले. एकंदरीतच चांगल्या निकालांचा ट्रेंड चालू राहिला. मिंडा इंडस्ट्रीज ने QIP दवारा Rs ७३४,८४ प्रती शेअर( इंडीकेटीव्ह प्राईस Rs ७२०.००) या भावाने Rs ७०० कोटी उभारले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५३८२३ NSE निर्देशांक निफ्टी १६१३० आणि बँक निफ्टी ३५२०७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०२ ऑगस्ट २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ०२ ऑगस्ट २०२१

आज क्रूड US $ ७४.४० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.३४च्या आसपास होता US $ निर्देशांक ९२ च्या आसपास VIX १२.९८, USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२३ आणि PCR १.४९ होते.

आज जुलै महिन्याचे ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुती, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, महिंद्रा & महिंद्रा ( ट्रॅक्टर निर्यात ५५% ने वाढली) ,SML इसुझू, TVS मोटर्स यांची विक्री वाढली. हिरो मोटो, एस्कॉर्टस यांची विक्री सर्व साधारण होती. IRCTC आपल्या शेअर्सचे स्प्लिट करण्यावर १२ ऑगस्ट २०२१ रोजी विचार करेल. खाजगी ट्रेन चालवण्यासाठी टेंडरला थंडा प्रतिसाद मिळाल्याने सरकार आता खाजगी गाड्यांच्या धोरणाबाबत बदल करण्याचा विचार करत आहे. यात रेव्हेन्यू शेअरिंगच्या काही अटी सोप्या करणार असल्यामुळे टिटाघर वॅगन्स आणि IRCTC यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. GST अंतर्गत कलेक्शन Rs १.१६ लाख कोटी झाले. हे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे याचे द्योतक आहे.

NSE ने निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांकांचे लॉट कमी केले.

IRCTC, नजारा टेक्नॉलॉजी, कल्याणी स्टील्स, KEI, NURECA, काँकॉर, HDFC, वरुण बिव्हरेजीस, कॉर्बोरण्डम,इमामी या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

PNB चे प्रॉफिट वाढले पण NPA सुद्धा वाढले.

HDFC चा फायदा अपेक्षेपेक्षा जास्त आला. NIM ३.५% वरून ३.७% वर गेले. जुलै महिन्यातील डिसबर्समेंट्सचे आकडे चांगले आले. HDFC च्या या निकालांमुळे हौसिंग लोनचा पोर्टफोलिओ वाढेल आणि त्याचा फायदा रिअल्टी क्षेत्राला होईल म्हणून रिअल्टी क्षेत्रात तेजी होती. शोभा प्रेस्टिज इस्टेट, कोलते पाटील, गोदरेज प्रॉपर्टि, इंडिया बुल्स रिअल इस्टेट या शेअर्स मध्ये तेजी होती.

IDFC Ist बँक, बंधन बँक, चोला इन्व्हेस्टमेंट्स,BHEL, RBL बँक ( फायद्यातून तोट्यात आली,) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

पंजाबमध्ये रोपड येथिल युनिटचा विस्तार करण्यासाठी अंबुजा सिमेंट Rs ३१० कोटी खर्च करेल.

टाटा मोटर्स उद्यापासून पॅसेंजर व्हेइकल्सच्या किमती ०.८% ने वाढवणार आहे.

ग्लेनमार्क फार्मा या कंपनीने SaNotize या कंपनीबरोबर कोविद ट्रीटमेंट स्प्रे साठी भारत आणि इतर एशियन देशांसाठी करार केला.

जेट एअरवेज ‘बोईंग कंपनी’ बरोबर विमानखरेदीसाठी करार करत आहे.

KRSNAA DIAGNOSTICS ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्नॉस्टिक्स सेवा पुरवते. उदा ;- इमेजिंग , रेडिओलॉजी सर्व्हीसेस, क्लिनिकल लॅब आणि पॅथॉलॉजि आणि टेलीरेडिओलॉजी सर्व्हिसेस. या कंपनीची १३ शहरात १८०१ डायग्नॉस्टिक्स सेंटर्स आहेत. ह्या इशूची प्रोसिड्स पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या राज्यात डायग्नॉस्टिक सेंटर उभारण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी केला जाईल. या कंपनीचा Rs १२१३.३३ कोटींचा ( यात Rs ४०० कोटींचा फ्रेश इशू आणि Rs ८१३.३३ कोटींची OFS असेल.) IPO ४ ऑगस्ट २०२१ला ओपन होउन ६ ऑगस्ट २०२१ ला बंद होईल.
मॅन्युफॅक्चरिंग PMI जुलै महिन्यासाठी ४८.१० वरून ५५.३० एवढा वाढला. हे रोजगार आणि फॅक्टरीमधील उत्पादन वाढल्याचे द्योतक आहे.

सरकार टेलिकॉम क्षेत्राला काही सवलती देण्याचा विचार करत आहे. AGR ड्यूजची व्याख्या आणि त्याचे कॅल्क्युलेशनची पद्धत बदलण्याचा विचार करत आहे. स्पेक्ट्रम फी तीन हप्त्यात देण्याची सवलत देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

सरकारचा दोन बँकांच्या खाजगीकरणाचा निर्णय पुढील वर्षी होईल कारण या वर्षी कायद्यात आवश्यक असणारे बदल या वर्षी शक्य नाहीत, त्यामुळे सेंट्रल बँक आणि IOB मध्ये विक्री झाली.

रिलायन्स रिटेल हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटेल आर्म ‘SUBWAY इनकॉर्पोरेशन’ची इंडियामधील फ्रँचाइज US $२०० ते US $ २५० मिलियनला खरेदी करण्यासाठी बोलणी करत आहे.

WINDLAS बायोटेक या फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बनवणार्या कंपनीचा Rs ४०१.५३ कोटींचा IPO ४ ऑगस्ट २०२१ रोजी ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. प्राईस बँड Rs ४४८ ते Rs ४६० असून IPO ची प्रोसिड्स डेहराडून येथील फॅक्टरीच्या क्षमता विस्तारासाठी उपयोगात आणली जातील. ही कंपनी CDMO क्षेत्रातील आहे (फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स,कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन). मिनिमम लॉट ३० शेअर्सचा आहे. दर्शनीय किंमत Rs ५ आहे.

FINCARE स्माल फायनान्स बँकेला Rs १३३० कोटींचा IPO आणण्यासाठी सेबीची परवानगी मिळाली.

निफ्टीने आज हँगिंग मॅन पॅटर्न फॉर्म केला. सगळे सेक्टोरियल निर्देशांक तेजीत होते. १०० पाईंट निफ्टी वर होते. इंट्राडे हाय १५८९२ आणि इंट्राडे लो १५८३४ होते. त्यामुळे १५८३४ ही महत्वाचा स्तर आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९५० NSE निर्देशांक निफ्टी १५८८५ बँक निफ्टी ३४७१० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० जुलै २०२१

आज क्रूड US $ ७५.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= Rs ७४.५० च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९१.८५ USA १० वर्षाचे बॉण्ड यिल्ड १.२४ VIX १२.८० PCR १.२८ होते.

अमेझॉनचे निकाल असमाधानकारक आले. आरसेलर मित्तलचे निकाल चांगले आले. USA च्या अर्थव्यवस्थेचा GDP ग्रोथ रेट ६.५% आला. म्हणजेच २% कमी आला .

आज चीनने काही प्रमुख फर्टिलायझर कंपन्यांना फर्टिलायझर्सची निर्यात तात्पुरती थांबवायला सांगितली. चीनमधील फर्टीलायझरचा साठा पुरेसा झाल्यावर पुन्हा खतांच्या निर्यातीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे यामुळे भारतीय खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची निर्यात वाढेल आणि त्यांना फायदा होईल. म्हणून RCF FACT चंबळ कोरोमंडल NFL GNFC GSFC या आणि इतर खतउत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

देवयानी इंटरनॅशनल या कंपनीचा IPO ४ ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ ला बंद होईल. ह्या IPO चा प्राईस बँड Rs ८६ ते Rs ९० असून मिनिमम लॉट १६५ शेअर्सचा आहे.ही कंपनी KFC, पिझ्झा हट, कोस्टा कॉफी यांची फ्रँचाइजी आहे.

EXXARO टाईल्स या व्हिट्रीफाईड टाईल्स बनवणाऱ्या कंपनीचा Rs १६१ कोटींचा IPO ४ ऑगस्ट २०२१ ला ओपन होऊन ६ ऑगस्ट २०२१ रोजी बंद होईल. याचा प्राईस बँड Rs ११८ ते Rs १२० आहे. ही कंपनी २७ राज्यातील २००० डिलर्समार्फत बिझिनेस करते तसेच १२ देशात निर्यात करते. इशू प्रोसिड्सपैकी Rs ५० कोटी कर्ज फेडण्यासाठी आणि Rs ४५ कोटी वर्किंग कॅपिटलसाठी उपयोगांत आणले जातील.

ASTRAL पॉली आणि स्ट्राइड्स फार्मा या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश F & O सेगमेंटमध्ये आजपासून केल्यामुळे आता F & O सेगमेंट मध्ये TRADE होत असलेल्या शेअर्सची संख्या १६३ झाली.

R सिस्टीम इंटरनॅशनल ६ ऑगस्ट रोजी शेअर बायबॅकवर विचार करणार आहे.म्हणून हा शेअर तेजीत होता.

ल्युपिन या कंपनीने SOUTHERN CROSS PHARMA ही कंपनी अकवायर केली.

झायडस कॅडीला या कंपनीला ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट ड्रग साठी USFDA कडून परवानगी मिळाली.

SAIL ही कंपनी लॉन्ग, फ्लॅट प्रोडक्टसच्या किंमत Rs १००० प्रती टन एवढी वाढवणार आहे. मेटल्समध्ये कार्टलायझेशन सुरु असल्याने, याबाबतीत चौकशी करण्याची कंपन्यांनी CCI ला सूचना केली आहे

DANA इनकॉर्पोरेटेड ह्या DRIVETRAIN आणि E-प्रोपुलसिओन सिस्टीम साठी जगात अग्रेसर असलेल्या कंपनीने स्विच मोबिलिटी .या अशोक लेलँडच्या इलेक्ट्रिक व्हेईकल सबसिडीअरी मध्ये १% स्टेक US $१८ मिलियनला खरेदी केला. यामुळे अशोक लेलँडच्या शेअरमध्ये तेजी होती.

सतलज टेक्सटाईल्स ( तोट्यातून फायद्यात), NIIT ( PIM वाढले) RPG लाईफ, लालपाथ लॅब ( PIM वाढले), IOC (PIM वाढले, GRM US $ ६.५८/bbl ) , सन फार्मा ( तोट्यातून फायद्यात), कन्साई नेरोलॅक, AB फॅशन रिटेल, बंधन बँक, सुंदरम क्लेटन, मेरिको, TVS मोटर्स, असाही इंडिया यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५८६ NSE निर्देशांक निफ्टी १५७६३ बँक निफ्टी ३४५८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७५ प्रती लिटरच्या आसपास तर रुपया US $१ = Rs ७४ च्या आसपास US $ निर्देशांक ९२.३२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX १३ च्या आसपास आणि PCR ०.९१ होते.

फेडने त्यांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. व्याजदर ०.०० ते ०.२५% या दरम्यान ठेवला. कोरोनाचे जे वेगवेगळे व्हरायंटच येत आहे त्यांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. प्रत्येक व्यवस्थेत सुधारणा होत आहे पण सुधारणा होण्याचा वेग कमी आहे. . बॉण्ड खरेदीविषयी कोणताही विचार किंवा योजनेत फरक व्यक्त केला नाही.

चींन १ ऑगस्ट २०२१ पासून त्यांच्या देशातून निर्यात होणाऱ्या स्टीलच्या काही प्रकारांवर निर्यात ड्युटी वाढवणार आहे. त्यामुळे आता चीनमधून येणारे स्टिल महाग होईल.त्यामुळे स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या तेजीत होत्या.चीनमध्ये आता स्टील निर्यात करणाऱ्या कंपन्यांना इन्सेंटिव्हज देणार नाही उलट या कंपन्या स्टीलचे उत्पादन कमी करतील यासाठी उपाय योजले जातील यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये स्टीलच्या किमती वाढतील आणि भारताकडून निर्यात वाढेल. उदा टाटा स्टील, JSW स्टील पण मारुती, आणि ऑटो क्षेत्रातले कंपन्यांच्या उत्पादनाची कॉस्ट वाढेल. त्यामुळे ऑटो क्षेत्रातील शेअर्स मंदीत होते.

कॉग्निझंट या IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीचे निकाल चांगले आले आणि त्यांनी फ्युचर गायडन्स चांगला दिला. मिडकॅप IT कंपन्यांचे निकाल लार्जकॅप IT कंपन्यांपेक्षा चांगले येत आहेत त्यामुळे मिडकॅप IT कंपन्यांमध्ये तेजी होती . उदा कोफोर्ज, माईंड ट्री, पर्सिस्टंट सिस्टिम्स, सोनाटा सॉफ्टवेअर, टेकमहिन्द्र

अल्केम लॅब या कंपनीच्या तळोजा युनिटची तपासणी USFDA कडून २६ जुलै ते २८ जुलै २०२१ या दरम्यान झाली होती.या युनिटला क्लीन चिट दिली.

MTNL आणि BSNL च्या अनुक्रमे २ आणि ४ मालमत्ता सरकार विकणार आहे त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली.
साखरेच्या निर्यातीवर Rs ३.५० प्रती किलो सबसिडी देण्याचा खाद्य मंत्रालय विचार करत आहे. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

बलरामपूर चिनी या कंपनीची ८ ऑगस्ट २०२१ रोजी शेअर बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक आहे.
महिंद्रा हॉलीडेजनी बोनस जाहीर केला. तुमच्याजवळ २ शेअर्स असले तर १ बोनस शेअर मिळेल.

आज पेपर शेअर्समध्ये तेजी होती कारण पेपरचे भाव वाढत आहेत. अर्थव्यवस्था ओपन होत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. सरकारचा शिक्षणावरचा खर्च वाढला आहे. चीनमध्ये पेपरच्या किमती वाढल्या. ऑफिस आणि शैक्षणिक संस्था ओपन होत असल्यामुळे लिहिण्यासाठी आणि छपाईसाठी लागणाऱ्या पेपरची मागणी वाढेल. USA कॅनडा येथील जंगलात लागलेल्या वणव्यांमुळे लंबरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे JK पेपर, स्टार पेपर NR अगरवाल, पदमजी पेपर. आणि इतर पेपर उत्पादक कंपन्यांमध्ये तेजी होती.

टाटा सन्स तेजस नेटवर्क मध्ये ६३.१% स्टेक घेणार आहे. त्यामुळे टाटा ग्रुपला 4G आणि 5G च्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. ४३.३५ % स्टेक साठी Rs १८५० कोटी तेजस नेटवर्कला दिले जातील. Rs ५.१३ कोटींची वॉरंटस इशू केली जातील. आणि Rs २५८ प्रती शेअर या भावाने २६% स्टेक साठी ओपन ऑफर आणली जाईल. हा सर्व व्यवहार PANATONE इन्व्हेस्टमेंट च्या मार्फत होणार आहे.

तत्व चिंतन फार्माचे BSE आणि NSE वर Rs २१११.८० वर लिस्टिंग झाले. हा शेअर IPO मध्ये Rs १०८३ ला दिला असल्यामुळे ज्यांना हे शेअर्स अलॉट झाले त्यांना खूपच चांगला लिस्टिंग गेन झाला. शेअर नंतर Rs २३५० पर्यंत वाढला.
द्वारिकेश शुगरचे निकाल ठीक होती. LIC हौसिंग कॉर्पोरेशन आणि G. E. शिपिंग चे निकाल असमाधानकारक होते. मारुतीचे पहिल्या तिमाहीत निकाल कमजोर होते. .

नॉवेलीसने स्ट्रॉंग गायडन्स दिल्यामुळे आज हिंदाल्को च्या शेअर मध्ये तेजी होती.

टेकमहिन्द्र, युनियन बँक ( प्रॉफिट NII मध्ये वाढ NPA कमी झाले), पंजाब अँड सिंध बॅन्क, पॉली मेडिक्युअर, एरिस लाईफसायन्सेस ( Rs ६.०१ लाभांश जाहीर केला), GHCL,, PVR लॉरस लॅब्स, प्रीस्झ्म जॉन्सन, कोलगेट (PIM ( प्रॉफिट इन्कम मार्जिन वाढले), वर्धमान टेक्सटाईल्स,( तोट्यातून फायद्यात आली. ), मोल्डटेक पॅकेजिंग या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

JSW एनर्जी ह्या कंपनीने ग्रीन हायड्रोजन साठी ऑस्ट्रेलियन कंपनी FORTESCUE फ्युचर बरोबर केला.
ग्लेनमार्क लाईफसायन्सेसचा IPO ३१ वेळा सबस्क्राईब झाला.

आज जुलै २०२१ महिन्याची एक्स्पायरी होते. ही एक्स्पायरी सकारात्मक भूमिकेतून झाली. मेटल, पेपर, साखर, शैक्षणिक क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२६५३ NSE निर्देशांक निफ्टी १५७७८ बँक निफ्टी ३४६९१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २८ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.७५ च्या आसपास रुपया US $१= Rs ७४.३० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.५२ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२५ VIX १५.१४ PCR ०.७४ होते.

USA मधील ब्ल्यू चिप निर्देशांक घसरला. गोल्डन ड्रॅगन निर्देशांक पडला. USA मधील कंपन्या GE आणि ३M ने प्रॉफिट वॉर्निंग दिली.

चीनच्या सरकारने हौसिंग, मेडिकल आणि शिक्षण या क्षेत्रात मोठे धोरणात्मक बदल सुचवले आहेत. देशाचे, नागरिकांचे हित लक्षात घेऊन उद्योगांनी आपले उद्योग करावेत. सरकारच्या खाजगी उद्योगक्षेत्रात होणाऱ्या हस्तक्षेपाला घाबरून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुकिंग झाले. चीनच्या या धोरणात्मक बदलाचा परिणाम भारतातील मार्केट्सवर झाला आणि मंदी आली

इंडिगोचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. लॉसेस ओळीने गेल्या सहा तिमाहीत वाढत आहेत. प्रती किलोमीटर यिल्ड कमी होत आहे.

इंडसइंड बँकेचे निकाल असमाधानकारक होते. बँकांचे निकाल असे दर्शवतात की डिपॉझिट्स वाढत आहेत. पण ऍडव्हान्सेसमध्ये मात्र ग्रोथ दिसत नाही. स्लीपेजिस दर तिमाही वाढत आहेत. त्यामुळे प्रोव्हिजन वाढवावी लागत आहे.
गोदावरी पॉवर आणि इस्पात, हेरिटेज फूड्स ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले मार्जिन कमी झाले.), सेंच्युरी टेक्सटाईल्स ( तोट्यातून फायद्यात, प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले. ) SRF (PIM वाढले, Rs १२ प्रती शेअर लाभांश जाहीर केला), उषा मार्टिन,टाटा कॉफी ( कंपनीने Rs १.०२ कोटी वन टाइम लॉस बुक केला.), ग्राईंडवेल नॉर्टन ( PIM वाढले), जिओजित फायनान्सियल्स (PIM वाढले ), नेस्ले, IDBI बँक (NII, प्रॉफिट वाढले पण GNPA आणि प्रोव्हिजन वाढली.) या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सरकारने DICGC ( डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन )ऍक्ट आणि जनरल इन्शुअरन्स ऍक्ट यांच्या मध्ये महत्वाचे बदल केले. आता बंद पडलेल्या बँकेच्या डिपॉझिटर्सना ९० दिवसाच्याआत Rs ५ लाखापर्यंचे डिपॉझिट परत मिळेल. GIC कायद्यात खाजगीकरण सोपे होईल असे बदल करण्यात आले.

भारती एअरटेल या कंपनीने आता पोस्टपेड बरोबरच प्रीपेड टॅरीफ वाढवली आता किमान प्लॅन Rs ७९चा असेल. यामुळे भारती एअरटेलच्या शेअरमध्ये तेजी आली.

येस बँकेने इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स बरोबर कोलेन्डिंगसाठी करार केला.

MCGM( मेट्रोपॉलिटन कॉऊन्सिल ऑफ ग्रेटर मुंबई) कडून सेंच्युरी टेक्सटाइल्सच्या वरळी येथील फॅक्टरीच्या जमिनीवर मोठ्या रियल इस्टेट प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळाली. IOD (इन्टिमेशन ऑफ डिस अप्रूव्हल) मंजुरी दिली.

CYIENT ही IT क्षेत्रातील कंपनी ‘वर्कफोर्स डेल्टा’ या कंपनीत १००% स्टेक घेणार आहे.

महिंद्रा लाईफ स्पेसेस या कंपनीने तुमच्या जवळील १ शेअर्ससाठी २ बोनस शेअर्स इशू करण्याची घोषणा केली.

कालचा निफ्टी क्लोज भाव १५७४६ वरून आज निफ्टी १५७६१ला ओपन झाला. तो १५७६७ पर्यंत गेला.आणि नंतर मार्केट जोरदार पडू लागले आणि निफ्टीने १५५१३ हा लो पाईंट गाठला. या स्तरावरून मात्र बुल्सनी जोरदार मुसंडी मारली. मार्केट जवळजवळ ८०% ते ८५ % सुधारले आणि १५७०९ वर बंद झाले. या चढाओढीमध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला. पण अजूनही ऍडव्हान्स डिक्लाईन रेशियो मात्र बेअर्सच्या बाजूनेच झुकलेला आहे. कोणीही शॉर्ट करु नये. निफ्टी १५५५० ते निफ्टी १५९५० ही मार्केटची रेंज आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२४४३ NSE निर्देशांक निफ्टी १५७०९ बँक निफ्टी ३४५३२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २७ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७४.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१= ७४.४० च्या आसपास US $ निर्देशांक ९२.५७ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२८ VIX १३.३३ PCR ०.७२ होता.

USA मध्ये न्यू होम विक्री ६% ने कमी झाली. FOMC ची मीटिंग संपल्यावर बॉण्ड्स खरेदी कमी करणार का ?करणार असाल तर कधीपासून आणि किती हे सगळ्या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष पॉवेल यांच्या तोंडून ऐकावयाचे आहे.
चीनने टेक कंपन्यांवर बरीचशी नियंत्रणे घातली आहेत. त्यामुळे ज्या चिनी कंपन्या परदेशात स्टॉक एक्स्चेंजवर ट्रेड होतात त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंदी आली..

DLF या रिअल्टी क्षेत्रातील कंपनीचे निकाल चांगले आले. ही कंपनी प्रिमियम हौसिंगच्या क्षेत्रात आहे. अफोर्डेबल हौसिंगसाठी सरकारकडून सबसिडी मिळते. पण प्रीमियम हाऊसिंगसाठी हे सबसिडी उपलध नाही. याचा विचार करता DLF चे निकाल चांगले आहेत .

वोल्टासने टाटा पॉवरबरोबर करार केला. जे कोणी टाटा पॉवर वापरतात त्यांना वोल्टस AC वर ४०% डिस्काउंट देणार आहे. ही सवलत फक्त दिल्लीमध्येच उपलब्ध आहे.

ग्लेनमार्कलाईफ सायन्सेसने जे कर्ज घेतले होते ते ग्लेनमार्क फार्माकडूनच घेतले होते हे कर्ज IPO च्या प्रोसिड्स मधून फेडले जाणार आहे. त्यामुळे दोघांसाठीही ही विन विन परिस्थिती आहे. कदाचित शिल्पा मेडिकेअरच्या शेअरमध्ये तेजी येईल कारण PE रेशियोनुसार शिल्पा मेडिकेअरचा शेअर स्वस्त आहे.

असोसिएटेड अल्कोहोल, GM ब्रुअरीज, KPIT कमिन्स (या कंपनीने फ्युचर गायडन्स वाढवला.) आलेम्बिक फार्मा ( फ्युचर गायडन्स कमी केला), TTK प्रेस्टिज ( चांगला प्रॉफिट इनकम मार्जिन वाढले), अपार इंडस्ट्रीज ( तोट्यातून फायद्यात आली). रामको सिमेंट, शारदा क्रॉपकेम, भारत सीट्स ( तोट्यातून फायद्यात उत्पन्न वाढले.), महिंद्रा लॉजिस्टिक (तोट्यातून फायद्यात आली), डिक्सन टेक्नॉलॉजी, जय भारत मारुती( तोट्यातून फायद्यात आली) KPR MILLS ( निकाल चांगले १ शेअर ५ शेअर्समध्ये स्प्लिट करण्यासाठी बोर्डाने मंजुरी दिली), कॅनरा बँक, यूको बँक या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

DR रेडिजचे निकाल मात्र असमाधान कारक होते. ऑपरेटिंग मार्जिन २५.३४% वरून १४.८६% झाले. USA मधील बिझिनेसमध्ये फारशी ग्रोथ झाली नाही. त्यामुळे DR रेडिजचा शेअर तर पडलाच पण त्याचा इफेक्ट इतर फार्मा कंपन्यांवर होऊन फार्मा कंपन्यांमध्ये मंदी आली.

APL अपोलो ट्यूब्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची बोनस इशूवर विचार करण्यासाठी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बैठक आहे.

टेलिकॉम उपकरणांची ती सिस्टिममध्ये बसवण्याआधी लॅब मध्ये स्पायवेअर मालवेअर आणि बाबींसाठी तपासणी करणे अनिवार्य असेल. सरकारप्रमाणित तसेच कंपन्यांचे सेल्फ सर्टिफिकेशन असणे जरुरीचे आहे.

ABB इंडिया आपला मेकॅनिकल पॉवर TRA डिव्हिजन US $ २९० कोटींना RBC बेअरिंग या कंपनीला विकणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे रिकॅपिटलायझेशन दुसरी तिमाही संपल्यानंतर विचारात घेतले जाईल. डिसेंबर २०२१मध्ये जर कुठल्या बँकेत कॅपिटलची जरुरी भासली तर त्या बँकेला कॅपिटल पुरवले जाईल. त्यामुळे PSB च्या शेअरमध्ये मंदी आली.

एप्रिल २०२१ ते जून २०२१ या तिमाहीत प्रत्यक्ष कराची वसुली Rs २.४७ लाच कोटी एवढी झाली.

स्माल फायनान्स बँक सुरु झाल्यापासून ५ वर्षाच्या आत प्रमोटर्सचा सबसिडीअरीतील स्टेक ४०% पर्यंत कमी करावा लागतो. ३० जून २०२१ पर्यंत इक्विटास होल्डिंग लिमिटडचा

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये ८१.७५% स्टेक होता. इक्विटास होल्डिंग लिमिटेडच्या शेअरहोल्डरला त्याच्या जवळ असलेल्या १०० शेअर्ससाठी इक्विटास स्माल फायनान्स बँकेचे २२६ शेअर्स मिळतील. त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी होती.

हुडको या कंपनीमधील आपला ८% स्टेक सरकार Rs ४५ प्रती शेअर या फ्लोअर प्राईसने १६.०१ कोटी शेअर्स विकून Rs ७२० कोटी उभारणार आहे. सरकार प्रथम ११.०१ कोटी शेअर्स विकेल आणि प्रतिसाद चांगला असला तर आणखी ५ कोटी शेअर विकेल.रिटेल गुंतवणूकदारांसाठी ही OFS २८ जुलै रोजी ओपन असेल.

सरकार SJVN मधील १०% स्टेक विकणार आहे

विनंती ऑर्गनिक्स ने पुरामुळे महाड येथील युनिट बंद केले आहे.

चीन आणि कोरियातून आयात होणाऱ्या रबर केमिकल्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाण्याची शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये थंडी आणि दुष्काळामुळे आणि कोलंबिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये बंदरातून शिपमेंट उशीर होत असल्यामुळे आज कॉफीउत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. CCL प्रॉडक्टस, टाटा कॉफी, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग, नेस्ले

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२५७८ NSE निर्देशांक निफ्टी १५७४६ बँक निफ्टी ३४७९७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७३.०० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.४०च्या आसपास होते. US $ निर्देशांक ९२.९५ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX १२च्या आसपास तर PCR ०.९७ होते.

चीन , हाँगकाँग आणि इतर एशियन मार्केट्स मंदीत होती. कार्बन एमिशन वाढल्यामुळे चीनने स्टीलचे उत्पादन कमी करायचे ठरवले आहे. तसेच चीन क्रिप्टो करन्सी पूर्णतः बंद करणार आहे. शैक्षणिक धोरण बदलणार आहे. FOMC ची मीटिंग दोन दिवस चालणार आहे. स्टिम्युलस टेम्परिंग करणे जरुरीचे आहे आणि असेल तर तेव्हा करायचे हा मुख्य विषय चर्चेत असेल.

वाढणारी महागाई आणि डेल्टा प्लेस व्हरायन्टच्या संसर्गामुळे ३ री लाट येण्याची भीती सोडल्यास .आता अर्थव्यवस्थेचे चक्र हळू हळू पूर्व पदावर येत आहे. पहिल्या तिमाहीचे कॉर्पोरेट निकाल एखाददुसरा अपवाद वगळता अतिशय चांगले येत आहे. एवढेच नव्हे तर ज्या कंपन्या भविष्यासाठी गायडन्स देतात त्यांचा सूरही आशावादी आहे.

HDFC बँकेपेक्षा ICICI बँकेचा पहिल्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

ITC चे निकाल चांगले आले. सिगारेट व्हॉल्युम पूर्व कोविड स्तरावर आले. महागाई आणि वाढणारी कॉस्ट हा एकच प्रॉब्लेम ITC ला आहे.

स्पोर्टकिंग, जिंदाल ड्रिलिंग, इंडियन मेटल, कॉरोमॉन्डल, फिलिप्स कार्बन GNA ऍक्सल, नवीन फ्ल्युओरीन, कोटक महिंद्रा बँक ( NII आणि प्रॉफिट थोडे वाढले पण NPA ची स्थिती खराब झाली.) किर्लोस्कर फेरस ( तोट्यातून फायद्यात),

अलेम्बिक फार्मा (फायदा कमी झाला),फिनोटेक्स, मिर्झा, उदयपूर सिमेंट, वेदांता ( उत्पन्न वाढले. Rs १३० कोटींचा वन टाइम लॉस झाला.), SBI लाईफ, या कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

M & M फायनान्स या कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होत. NPA वाढले.

आयकर खात्याची धाड पडली म्हणून DB कॉर्पचा शेअर पडला.

IDBI बँकेच्या खरेदीदारासाठी काही रेग्युलेटरी नियमातून सूट द्यावी का ही चर्चा RBI आणि सरकारमध्ये सुरु आहे. म्हणून IDBI बँकेच्या शेअरमध्ये तेजी होती.

सरकारने ऑक्सिमीटर, ब्लडप्रेशर मॉनिटरिंग मशीन, डिजिटल थर्मोमीटर, नेब्युलायझर, ग्लुकोमीटर यांच्या किमती फिक्स केल्या.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेने Rs ८०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला.

SRF आणि लारस लॅब्स या कंपन्यांचा MSCI निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे. रोलेक्स रिंग्स या कंपनीचा Rs ७३१ कोटींचा IPO २८ जुलै २०२१ रोजी ओपन होऊन ३० जुलै रोजी बंद होईल. याचा प्राईस बंद Rs ८८० ते Rs ९०० असून मिनिमम लॉट १६ शेअर्सचा आहे. ही कंपनी भारतातील टॉप ५ फोर्जिंग कंपन्यांपैकी एक आहे. हॉट रोल्ड फोर्ज्ड आणि MASHINED बेअरिंग रिंग्स बनवते. टू व्हीलर, पॅसेंजर व्हेईकल, कमर्शियल व्हेईकल, EV जना कंपोनंट पुरवते. रिन्यूएबल एनर्जेमध्येही प्रवेश करणार आहे.या IPO ची अलॉटमेंट ४ ऑगस्ट २०२१ रोजी होईल आणि लिस्टिंग ९ ऑगस्टला होईल अशी शक्यता आहे.

मजेस्को K2V2या कंपनीतील ५१% स्टेक Rs ४० कोटींना घेणार आहे. त्यामुळे हा शेअर तेजीत होता
सध्या टेक्सटाईल सेक्टरला निर्यातीसाठी, उत्पादनासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे.तसेच अनलॉकच्या प्रक्रियेमुळे टेक्सटाईल्स साठी मागणी येईल असा अंदाज आहे. रूपा, लक्स, डॉलर, लव्हेबल लिंगरीज, डॉनिअर, DCM श्रीराम, सियाराम, वर्धमान, नहार स्पिनिंग अमरज्योती स्पिनिंग, DCM NOVVELLE, नितीन स्पिनर्स, RSWM, दीपक स्पिनर्स, अंबिका कॉटन, रेमंड , बॉम्बे डाईंग, वेलस्पन, ट्रायडंट, या काही कंपन्या आहेत. यांच्या शेअरचा नीट अभ्यास करून शेअर्स गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यासाठी घ्यायचे याचा निर्णय घ्यावा.

टाटा ग्रुपची कंपनी नेल्को ही कॅनडामधील सॅटॅलाइट कम्युनिकेशन सर्विसेस प्रोवाइड करणाऱ्या ‘TELESAT’या कंपनीच्या सहकार्याने सॅटेलाईट ब्रॉडबँड मार्केटमध्ये प्रवेश करणार आहे. ही सेवा TELESAT च्या LOW EARTH ऑर्बिट सॅटॅलाइटच्या सहायाने पुरवली जाईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२८५२ NSE निर्देशांक निफ्टी १५८२४ बँक निफ्टी ३४९४९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ जुलै २०२१

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २३ जुलै २०२१

आज क्रूड US $ ७३.५० प्रती बॅरलच्या आसपास तर रुपया US $१=Rs ७४.४० च्या आसपास तर US $ निर्देशांक ९२.९३ USA १० वर्षे बॉण्ड यिल्ड १.२७ VIX ११.७६ PCR १.०१ होते. ग्लोबल मार्केटचा अंदाज ५०-५०% तेजी मंदी असा होता.

डॉमिनोस या ज्युबिलण्ट फुड्सच्या पेरेंट कंपनीच्या शेअरमध्ये १४% तेजी होती. त्यामुळे ज्युबिलण्ट फुड्सच्या शेअरमध्ये तेजी होती. यावरून लक्षात येते की प्रमोटर कंपनी किंवा पेरेंट किंवा ग्रुप कंपन्यांचे शेअर्स तेजीत असले तर ती कंपनीसुद्धा तेजीत येते

पर्सिस्टंट सिस्टिम्स, म्युझिक ब्रॉडकास्ट, तानला प्लॅटफॉर्म्स, ABB पॉवर,IEX, ओरिएंटल ऍरोमॅटिक्स, अतुल ऑटो, क्रॉम्प्टन कन्झ्युमर, JSW स्टील, MPHASIS, कॅनफिना होम्स, SKF(तोट्यातून फायद्यात), येस बँक ( तोट्यातून फायद्यात), युनायटेड स्पिरिट्स, अंबुजा सिमेंट यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

SBI कार्डस ( उत्पन्न वाढले,प्रॉफिट कमी झाले.), फेडरल बँक, बायोकॉन यांचे पहिल्या तिमाहीचे निकाल सर्व साधारण होते. नेक्टर लाईफ सायन्सेसचे निकाल असमाधानकारक होते.

महिंद्रा लाईफ स्पेस या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची २८/०७/२०२१ रोजी तर महिंद्रा हॉलिडेज या कंपनीची २९/०७/२०२१ रोजी बोनस इशूवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

तानला प्लॅटफॉर्म्स या कंपनीने Rs १२६० प्रती शेअर या किमतीने ओपन मार्केट रूटने शेअर बायबॅक जाहीर केला.
कर्नाटक राज्य सरकारने Rs ४५ लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरावरील स्टॅम्प ड्युटी ५% वरून ३% केली.
ब्रिटानिया ही कंपनी त्यांच्या ओडिशामधील प्लॅन्टचे उत्पादन वाढवणार आहे आणि त्यासाठी Rs ९४ कोटींची गुंतवणूक करणार आहे.

आज झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्सचे खूपच चांगले लिस्टिंग झाले. NSE वर Rs ११६ वर तर BSE वर Rs ११५ वर लिस्टिंग झाले. शेअर्समधील तेजी वाढत गेली. ज्या लोकांना शेअर्स अलॉट झाले त्यांना उत्तम लिस्टिंग गेन्स झाले.
या मार्केट मध्ये FII विक्री करत आहेत आणि रिटेल गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. पहिल्या तिमाहीचे निकाल एखाददुसरा अपवाद वगळता चांगले येत आहेत.

सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कम्पन्यांनी AGR ड्यूजचे पुन्हा कॅलक्युलेशन करण्यासाठी दिलेली याचिका रद्द केली. त्यामुळे आता टेलीकॉम कंपन्यांना AGR ड्यूज भरणे अनिवार्य झाले.

अल्ट्राटेक सिमेंटने Rs ५००० कोटींचे कर्ज फेडले. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी होती.

मॅग्मा फिनकॉर्प या कंपनीचे नाव बदलून पुनावाला फिनकॉर्प असे ठेवले.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्टसने गंजम जिल्ह्यात गोपाळपूर येथे नवीन प्लांट १८ महिन्यात Rs १०० कोटी गुंतवणूक करून उभारला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ५२९७५ NSE निर्देशांक निफ्टी १५८५६ बँक निफ्टी ३५०३४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!