Tag Archives: last week in share market in marathi

आजचं मार्केट – ०६ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०६ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६९.४६ प्रती बॅरल ते US $ ७०.१८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.९८ ते US $१=Rs ७२.१० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८७ आणि VIX १४.८१ होते.

USA ने इराणी जनरल सुलेमानी यांच्यावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बगदाद येथील USA वकिलातीवर रॉकेट्सच्या सहाय्याने हल्ला केला. इराकच्या संसदेने USA ने आपले सैन्य परत घ्यावे असा ठराव पास केला. USA अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण आणि इराकला गंभीर परिणामांची जाणीव करून दिली. या तीन देशातील ताणतणावाचा परिणाम युद्धात होईल या भीतीने आज जगातील सर्व मार्केट पडली. तसेच क्रूडच्या दराने US $७० प्रती बॅरलची सीमा पार केली.

सरकार आपल्या सरकारी खर्चात Rs २ लाख कोटींची कपात जाहीर करण्याची शक्यता आहे.

सरकारचे टॅक्सपासून मिळणारे उत्पन्न आणि विनिवेश आणि सरकारनी ठरवलेले लक्ष्य यात तफावत पडण्याची शक्यता आहे.

सरकारने सर्व बँकांना ज्या ग्राहकांकडे शिलकी सोने असेल अशा ग्राहकांना SMS करून, प्रत्यक्ष संपर्क करून गोल्ड मॉनेटायझेशन योजनेचे महत्व समजावून सांगायला सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आतापर्यंत आम्ही असे ५ लाख ग्राहक निवडले असून आतापर्यंत या योजनेमध्ये ३.५ टन सोने गोळा झाले असे सांगितले. बँकांनी या योजनेसाठी तीन महिन्यांचे लक्ष्य ठरवावे आणि ते पुरे करण्याचा रोडमॅप सरकारला सादर करावा असे सांगितले.

येत्या अंदाजपत्रकात MSME क्षेत्राला सरकार मोठ्या सवलती जाहीर करण्याची शक्यता आहे. सरकार कॉर्पोरेट

आयकरामध्ये दिलेल्या सवलतींचा फायदा MSME ना मिळत नाही कारण बहुतांशी MSME नॉनकॉर्पोरेट क्षेत्रात आहेत. उदा प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, HUF इत्यादी.

MSME ना व्याजाच्या दरात २.५% ते ५% सूट दिली जाईल. Rs १ कोटीच्या लोनवर २% व्याजाची सूट मिळेल. MSME साठी असलेल्या इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीमला मुदतवाढ दिली जाईल. तसेच काही केसेस मध्ये टॅक्स हॉलिडेचाहि विचार केला जाईल.

हिदुस्थान कॉपर, अल्ट्राटेक सिमेंट, JK लक्ष्मी सिमेंट यांनी आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवल्या.

महागाईचे आकडे चांगले येणार नाहीत त्यामुळे RBI रेट कट करणार नाही तसेच बॉण्ड्सवरील यिल्ड रेट कमी होणार नाहीत अर्थमंत्र्यानीं असे जाहीर केले की यापुढे सरकार बँकांमध्ये भांडवल घालणार नाही. त्यामुळे बँकांच्या शेअर्समध्ये जबरदस्त मंदी आली

IRB इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला त्यांची ९ BOT ( BUILD-OPERATE-TRANSFER) असेट्स IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टच्या नावाने ट्रान्स्फर करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र NHAI कडून मिळाली. GIC आनि अफिलिएट या ट्रस्टमध्ये ४९% गुंतवणूक करतील.

टायटन या कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले की विविध ठिकाणी चालू असलेल्या दंगलींमुळे आमच्या विक्रीवर परिणाम झाला.

दिल्लीच्या विधानसभेच्या ७० मतदारसंघात ८ फेब्रुवारी रोजी मतदान होइल आणि निकाल ११ फेब्रुवारी २०२० रोजी जाहीर होतील.

सोन्याच्या दराने Rs ४१००० ची मर्यादा ओलांडली.

इक्विटास स्माल फायनान्स स्मालबँकेने मिनिमम बॅलन्सची अट रद्द केली. तसेच अकौंट मेंटेनन्स चार्जेसही रद्द केले.
या वर्षी सप्टेंबरमध्ये NSE चा IPO येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६७६ NSE निर्देशांक निफ्टी ११९९३ वर बँक निफ्टी ३१२३७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०३ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०३ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६८.१६ प्रती बॅरल ते US $ ६८.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.५६ ते US $१= Rs ७१.७९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७९ होते. VIX १३.५० होते.

आज USA ने बगदादमधे हवाई हल्ला केला त्यात इराणचा एक मोठा लष्करी अधिकारी मारला गेला. USA ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे इराण आणि USA यांच्यात नव्याने ताणतणाव निर्माण झाले. त्याचा परिणाम मार्केटवर आणि मुख्यतः क्रूडच्या किमतीवर झाला. मार्केटमधील तेजी क्षणार्धात नाहिशी झाली. क्रूडचा दर US $ ६९ प्रती बॅरलच्या वर गेला. रुपया घसरला. परिणामी मार्केटने आपली तेजी गमावली.

सोन्याचे भाव आज Rs ४०००० च्या वर गेले. याचा फायदा मुथूट फायनान्स, मन्नापूरम फायनान्स यांना होत आहे. MCX वरील व्हॉल्युम वाढत आहेत. त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी होती.

नाटको फार्माच्या कॅन्सरसाठीच्या औषधाची विक्री USA मध्ये चांगली झाली. पण कंपनीने पेटंटचे उल्लंघन केले अशी तक्रार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांचेकडे असलेले NSE चे ५० लाख शेअर्स विकणार आहे. यासाठी स्टेट बँकेने १५ जानेवारी २०२० या तारखेपर्यंत बोली मागवल्या आहेत.

ONGC ला ७ ऑइल ब्लॉक्स मिळाले.

HCL टेक या कंपनीने Rs ८ प्रती शेअर तर RITES या कंपनीने Rs ६ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
लक्ष्मी विलास बँकेने त्यांच्या मुंबईतील मालमत्ता विकण्यासाठी बोली मागवल्या. .

केअर या रेटींग एजन्सीने झायडस वेलनेस या कंपनीचे रेटिंग AA+ केले.

टाटा ग्रुपने सुप्रीम कोर्टात अर्ज दिला की टाटा ग्रुप आणि शापूरजी आणि पालनजी ग्रुपचा काहीही संबंध नाही ते फक्त आमच्या ग्रुपमध्ये वित्तीय गुंतवणूकदार आहेत.

A ३२० NEOS ईंजिन बदलण्यासाठी इंडिगोला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या बातमीनंतर या शेअरमध्ये चांगली तेजी आली. इंडिगोचे एक प्रमोटर श्री गंगवाल यांना आपला स्टेक विकण्यासाठी ( यासाठी आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये बदल करावा लागेल) EGM २९ जानेवारी २०२० ला बोलावली आहे.

अव्हेन्यू सुपरमार्केट कंपनीतील ५.२०% स्टिक ब्लॉक डील च्या माध्यमातून विकणार आहेत.

इन्सेक्टीसाईड इंडिया या कंपनीला गुजरातमध्ये इन्सेक्टीसाईड प्लांट चालू करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.
काँकॉर या सरकारी कंपनीतील सरकारी स्टेक विकण्यासाठी ८-९ जानेवारी २०२० दरम्यान कॅनडात तर १३-१४ जानेवारी २०२० दरम्यान सिंगापूर मध्ये रोड शो आयोजित करण्यात येतील. भारतातही या दरम्यान विविध ठिकाणी रोड शो आयोजित करण्यात येतील.

या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल. उसाची SAP आणि FRP यामध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी राहील. सरकार साखर उत्पादक कंपन्यांना सॉफ्ट लोन देणार आहे.

सध्या उत्तर आणि मध्य भारतात थंडीचा तडाखा खूप आहे त्यामुळे रूम हिटर्स ना खूपच मागणी आहे. पुरवठा कमी असल्यामुळे लोक जास्त किंमत द्यायला तयार आहेत. त्यामुळे हॅवेल्स, क्रॉम्प्टन यांचे शेअर्स वाढत आहेत. लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी CNG आणि PNG यांचा वापर करत आहेत. त्यामुळे इंद्रप्रस्थ गॅस, महानगर गॅस, गुजरात गॅस, आदि शेअर्स वाढत आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१४६४ NSE निर्देशांक निफ्टी १२२२६ बँक निफ्टी ३२०६९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ०२ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ०२ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६६.२२ प्रती बॅरल ते US $ ६६.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२० ते US $१= ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३५ तर VIX ११.४५ होता.

आज चीनच्या सेंट्रल बँकेने ( द पीपल्स बँक ऑफ चीन) जाहीर केले की ६ जानेवारी २०२० पासून त्यांच्या RRR (रिझर्व्ह रेशियो रिक्वायरमेंट) मध्ये ५० बेसिस पाईंट्सची कपात करेल. यामुळे ८०० बिलियन युआन्स ( US $ ११५ बिलियन) अर्थव्यवस्थेमध्ये वाढतील . त्यामुळे अर्थव्यवस्थेमधील मंदी कमी व्हायला मदत होईल.

कोल इंडियाच्या खाणीत साचलेल्या पाण्याची समस्या दूर झाल्याने कोल इंडियाच्या उत्पादनात आणि विक्रीत वाढ झाली.
TRAI ने १ मार्च २०२० पासून NCF(नेटवर्क कॅपॅसिटी फी) चार्जेस कमी केले. २०० (फ्री टू एअर चॅनेल) वाहिन्यांसाठी कमाल NCF Rs १६० केली. याचा परिणाम सन टी व्ही, झी एंटरटेनमेंट, डिश टीव्ही या कंपन्यांवर होईल.

अरविंदच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

आज टाटा स्टील, JSW स्टिल यांनी हॉट रोल्ड कॉईल्सची तर NMDC ने बम्प्स आणि फाईन्स चे भाव वाढवले. MOIL नी ही आपल्या प्रॉडक्ट्सच्या किमती ५% ते १५% वाढवल्या. SAIL आणि JSPL यांच्या विक्रीत वाढ झाली. या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

सिमेंटच्या किमतीत Rs ५ पर्यंत वाढ झाली. सरकारने इंफ्रास्पेंडिंग मध्ये वाढ होईल असे जाहीर केल्याने सिमेंटच्या शेअर्समध्ये तेजी होती.

अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुअरन्स मधील अपोलो हॉस्पिटलचा ५१.२% स्टेक घेरण्यासाठी HDFCला IRDA ने परवानगी दिली. अपोलो हॉस्पिटल आणि म्युनिच रे ग्रुप यांचे ही जाईंट व्हेंचर आहे. एकूण Rs १३३६ कोटीच्या या व्यवहारातून अपोलो हॉस्पिटलला Rs ३०० कोटी मिळतील ते अपोलो हॉस्पिटल कर्ज फेडीसाठी वापरेल. म्हणून अपोलो हॉस्पिटल आणि HDFC या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली

रिलायन्स कम्युनिकेशनसाठी आलेल्या बोलींवर विचार करण्यासाठी COC ( कमिटी ऑफ क्रेडिटर्स) ची बैठक आहे.
टेलिकॉम मंत्रालयाने बाकी असलेल्या फीसाठी ( २००५ ते २०१९) GNFC ला Rs १५००० कोटी भरण्यासाठी नोटीस पाठवली.

हिरो मोटोची मोटारसायकल्स विक्री ४२४८४५ युनिट्स झाली.

USFDA ने कार्बन ब्लॅक विकायला परवानगी दिल्यामुळे फिलिप कार्बनमध्ये तेजी होती.

आज बजाज ऑटोचे विक्रीचे आकडे आले. एकूण विक्री ३% ने (YOY) कमी झाली.डोमेस्टिक विक्री १५% ने मोटार सायकल्सची विक्री १५% ने कमी झाली. तर निर्यात मात्र १०% ने वाढली. थ्री व्हीलर विक्री ५१३५३ युनिट्स झाली . हे विक्रीचे आकडे मार्केटला फारसे पसंत न पडल्याने शेअरमध्ये मंदी आली.

TVS मोटर्सची विक्री १४.७% ने कमी होऊन २३१५७१ युनिट झाली.

आयशर मोटर्सची विक्रीने १९.६% ने ( YOY) कमी झाली.

टाटा मोटर्सच्या विक्रीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले. व्हॉल्युम आणि मार्जिन यांच्यात सुधारणा दिसली.

साखरेचे उत्पादन ११२ लाख टनावरून ७८ लाख टन एवढे कमी झाली. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

पेनिन्सुला लँडने SBI ने दिलेल्या Rs १७७ कोटी कर्जाच्या रिपेमेंटमध्ये डिफॉल्ट केला.

भारत बॉण्ड ETF चे लिस्टिंग झाले.

IRFC (इंडियन रेल्वे फायनान्स कंपनी) या कंपनिने Rs १५०० कोटींच्या IPO साठी अर्ज केला. आज स्माल कॅप इंडेक्स आणि मिडकॅप इंडेक्स मध्ये तेजी होती. त्यामुळे लोकांच्या पोर्टफोलिओ मध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली असेल. आज मार्केट सेन्सेक्स, निफ्टी कमाल स्तरावर क्लोज झाले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१६२६ NSE निर्देशांक निफ्टी १२२८२ बँक निफ्टी ३२४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६६.०१ प्रती बॅरल ते US $ ६६.०३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.२८ ते US $१=७१.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५० तर VIX ११.४० होते.

आज नववर्षदिना निमित्त जगातील बहुतेक मार्केट्स बंद होती. जपान, चीन, दक्षिण कोरिया, तैवान, हॉन्गकॉन्ग, USA आणि युरोप मधेही मार्केट बंद होती.

१५ जानेवारी २०२० रोजी USA आणि चीन यांच्यातील ट्रेड अग्रीमेंटवर सह्या होतील.

३१ जानेवारी २०२० पर्यंत ब्रेक्झिट ( ग्रेट ब्रिटन युरोपियन युनियन मधून वेगळे होणे) अमलात येईल.

सरकारने LPG च्या १९ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरच्या किमतीत Rs २९.५० वाढ केली.

ATF (एअर टर्बाईन फ्युएल) च्या किमतीत एका किलोलिटरमागे Rs १६५० ने वाढवली.

रेल्वेच्या प्रवासी भाड्यात AC साठी Rs ०.०४ तर इतर क्लाससाठी Rs ०.०१ ते Rs. ०.०४ प्रती किलोमीटर वाढ केली. पण सबर्बन ट्रेन सर्विसच्या भाड्यात कोणताही बदल केला नाहीं.

WAHAT AL AMAN होम हेल्थ केअर मधील १००% स्टेक ASTAR DM ने Rs २०४ कोटींना खरेदी केला.

केअर या रेटिंग एजन्सीने येस बँकेचे रेटिंग कमी करून A केले.

क्रिसिल रेटिंग एजन्सीने टायटन या कंपनीचे रेटिंग AAA असे वाढवले.

रिलायन्स JIO मार्टने ( ग्रोसरी शॉप) आपली ट्रायल प्रोजेक्ट ठाणे कल्याण मुंबई येथे सुरु केली.

शापूरजी पालनजी ग्रुपच्या स्टर्लिंग आणि विल्सन या कंपनीने Rs १००० कोटींचे कर्ज फेडले.

सरकारने PTC (पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन) या कंपनीला स्ट्रेस्ज्ड पॉवर ऍसेट्सचे ऍग्रीग्रेटर नेमले.

आज ऑटो कंपन्यांच्या विक्रीची आकडे जाहीर झाले. मारुतीच्या एकूण विक्रीत ३.९%(YOY) वाढ झाली. डोमेस्टिक विक्री, निर्यात,पॅसेंजर व्हेईकल, पॅसेंजर कार विक्री यात थोडी वाढ (YOY) दिसून आली.

M & M ची एकूण विक्री १% ने घटली, पण ट्रॅक्टर विक्री ३% नी वाढली.

SML ISUZU चि विक्री ३२.८% ने कमी झाली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर्स विक्री १०.५५ ने घटली.

वेलस्पन कॉर्पच्या शेअर्समध्ये खरेदी दिसत आहे.कंपनीच्या बुक्समध्ये भरपूर कॅश आहे. त्यामुळे विशेष लाभांश, बोनस शेअर्स, किंवा शेअर्स बायबॅकची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.

अडानी पोर्ट कृष्णपट्टणम पोर्टमधील ७२% स्टेक Rs १०००० ते Rs १२५०० कोटींच्या दरम्यान CVR ग्रुपकडून खरेदी करेल. त्यामुळे अडाणी पोर्टच्या शेअरमध्ये तेजी होती.

१ फेब्रुवारी २०२० रोजी अंदाजपत्रक सादर केले जाईल.त्यामुळे आता ज्या क्षेत्राना अंदाजपत्रकात काही सवलती, सबसिडी दिल्या जातील अशी शक्यता असेल त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी येई. इन्फ्रास्ट्रक्चर, खते, कीटकनाशके, कृषी अवजारे, ही काही उदाहरणे.

एप्रिल २०२० पासून BSVI गाड्याच रस्त्यावर चालू राहतील.

सेबीने डेक्कन क्रॉनिकल या कंपनीने शेअर्स बाय बॅकला पात्र होण्यासाठी अकौंट्समध्ये फेरफार केले म्हणून कंपनीच्या ४ पदाधिकाऱयांविरुद्ध कारवाई केली.

आज जगातील मार्केट्स बंद असल्याने व्हॉल्युम्स कमी होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१३०६ NSE निर्देशांक निफ्टी १२१८२ बँक निफ्टी ३२१०२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३१ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६६.४२ प्रति बॅरल ते US $ ६६.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७१.२७ आणि US $१= ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६४ तर VIX ११.३० होता

आज २०१९ वर्षांचा शेवटचा दिवस, वर्षभरातील आठवणींचा, अनुभवांचा, यशापयशांचा कल्लोळ मनात उठतो. नवीन वर्षात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी निक्षून टाळाव्यात याचा आपण विचार करतो. आणि शेवटी नवीन वर्षाच्या उगवणाऱ्या सूर्याला नमन करून अधिक चांगल्या, अधिक सुखकारी, यशस्वी, संपन्न वर्षाच्या अपेक्षेने आपल्या मनाला बजावतो ‘HAAPY NEW YEAR’ आणि दुसऱ्यालाही असेच बजावत नव्या वर्षाचे उत्साहाने,आनंदाने स्वागत करतो. माझ्या सर्व वाचकांना, विद्यार्थ्यांना, शुभचिंतकांना २०२० हे वर्ष आनंदाचे सुखाचे, संपन्नतेचे, यशाचे, स्वास्थाचे जावो हीच शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना.

कोळशावरील कार्बन टॅक्स सरकार रद्द करेल या अपेक्षेने आज कोल इंडियाच्या शेअरमध्ये तेजी होती.
थंडीचा कडाका वाढतो आहे, त्यामुळे क्रूडसाठी मागणी वाढते आहे. USA मधील साठे कमी होत आहेत तर ओपेक+ देश आपल्या उत्पादनातील कपात प्रतिदिनी १२००० बॅरल वरून १७००० बॅरल्स वाढवणार आहेत. त्यामुळे क्रूडचे दर वाढतील अशी शक्यता आहे.

त्याचप्रमाणे चहा, कॉफी, मद्यार्क, अंडी यांचे शेअर्स तेजीत असतील. नाताळ आणि नववर्षाचे स्वागत यामुळे देशी आणि परदेशी पर्यटन,हॉटेल उद्योगात असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढतील.

कार्वी ग्रुपने आपल्या कॉर्पोरेट गृपच्या आणि ग्रुपच्या व्यवस्थापनाचे रिस्ट्रक्चरिंग करायला सुरुवात केली.

सरकार जानेवारी २०२० ते मार्च २०२० या दरम्यान OFS द्वारे ८ ते १० PSU कंपन्यांमधील आपला स्टेक विकेल. BPCL मधील आपला स्टेक विकण्यासाठी सरकारला जून २०२० पर्यंत वेळ लागेल असे वाटते.

१ जानेवारी २०२० पासून बँका NEFT सेवेसाठी चार्ज लावणार नाहीत.

डिजिटल व्यवहाराचा आवाका वाढवण्यासाठी सरकार Rs ५० कोटींपेक्षा जास्त टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्यांना MDR मध्ये सवलत देण्याची शक्यता आहे.

रतन इंडियाने आऊट ऑफ NCLT सेटलमेंट करून Rs ६००० कोटी बँकेचे कर्ज भरले. यात बँकांना ३८% हेअरकट घ्यावा लागला.

GST चे CNG आणि PNG साठी असणारे दर कमी करावेत अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे IGL, MGL, पेट्रोनेट LNG आणि गुजरात गॅस या शेअरमध्ये तेजी होती. .

जानेवारी २०२० मध्ये 5G स्पेक्ट्रमसाठी ट्रायल सुरु होईल. या स्पेक्ट्रमची अलॉटमेंट एप्रिल मे २०२० मध्ये होईल. ही अलॉटमेंट १ वर्षांकरता असेल.

१० जानेवारी २०२० रोजी इन्फोसिस आपला तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर करेल.

VA TECH WABAG ने Rs ११९० कोटीच्य प्रोजेक्टसाठी बिहार राज्य सरकारबरोबर करार केला.

SUNTECH रिअलिटी च्या ७ लोकांना फ्रॉडयुलण्ट ट्रेडिंगसाठी सेबीने Rs १४ कोटी दंड ठोठावला.

आज CARE, ICRA, आणि क्रिसिल या रेटिंग एजन्सीच्या शेअर्समध्ये तेजी होती. IL &FS संबंधात CARE ला दोषी ठरवले होते. त्यामुळे शेअर वाढत नव्हता. पण Rs २५ लाखांचा दंड करून सेबीने केस बंद केली. म्हणून आज रेटिंग एजन्सीजच्या शेअर मध्ये ही वाढ दिसली.

एअर इंडिया ही सरकारी विमानवाहतूक कंपनी विकत घेण्यामध्ये बर्याच कंपन्यांनी स्वारस्य दाखवले. पण सिविल एव्हिएशन मंत्रालयानी सांगितले की एखाद्या भारतीय कंपनीने एअर इंडिया विकत घेतली तर चांगले होईल.

जेट एअरवेजसाठी हिंदुजा BROS. बोली लावतील अशी बातमी आल्यामुळे जेट एअरवेजच्या शेअरमध्ये खरेदी दिसली.
CHALET हॉटेलने MARRIOTT बरोबर करार केल्याने CHALET च्या शेअर मध्ये तेजी होती.

आज माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Rs १०५ लाख कोटीची गुंतवणूक सरकार येत्या ५ वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करेल अशी घोषणा केली. ही गुंतवणूक पॉवर, अर्बन डेव्हलपमेंट, रेल्वेज, मोबिलिटी, शिक्षण, स्वास्थ्य, जलनियोजन आदि क्षेत्रात करण्यात येईल. ही गुंतवणूक १८ राज्यात करण्यात येईल. राज्य सरकारांबरोबर विचार विनिमय करून आणि त्यांच्या सहकाराने करण्यात येईल. सरकारचा प्रयत्न राहील की या गुंतवणुकीमुळे ‘EASE OF LIVING’ आणि ‘EASE OF DOING BUSINESS’ मध्ये सुधारणा होईल. या प्रोजेक्टचे नाव सरकारने ‘नॅशनल इन्फ्रास्टक्चर पाईपलाईन’ असे ठेवले आहे. केंद्र सरकार २०२० च्या दुसऱ्या सहामाहीत ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समीट’ चे आयोजन करेल आणि सर्व राज्य सरकारांना निमंत्रित करेल.

आज सगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये, सगळ्या मार्केटमध्ये, प्रॉफीटबुकिंग दिसले. DOW आणि NASDEQ दोन्हीमध्ये गेल्यावर्षी २५% रिटर्न मिळाला. भारतात सुद्धा निफ्टीने १३% आणि सेन्सेक्सने १५% रिटर्न दिले. मार्केटमध्ये वाइल्ड स्विंग दिसले. लोकांना खरेदीची संधी मिळाली त्यानंतर मार्केट सुधारल्यावर प्रॉफिट बुकिंग करता आले. ICICI, HDFC ग्रुपच्या शेअर्सनी चांगले उत्पन्न मिळवून दिले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१२५३ NSE निर्देशांक निफ्टी १२१६८ बँक निफ्टी ३२१६१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३० डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.३६ प्रति बॅरल ते US $ ६८.४० या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.३३ ते US $१=Rs ७१.३५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८१ तर VIX १०.८९ होता

खरे पाहता रुपया घसरतो आहे, क्रूडचा दर वाढतो आहे, महागाई वाढते आहे, सोन्याचाही दर वाढतो आहे पण सध्या मार्केटमध्ये व्हॉल्युम नाही. ट्रेडर्स हॉलिडे मूडमध्ये आहेत त्यातून हा ट्रँकेटेड वीक आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा फारसा परिणाम दिसत नाही.

मीरा इंडस्ट्रीजने बोनस इशू जाहीर केला. तुमच्याजवळ ५ शेअर्स असतील तर ७ शेअर्स बोनस शेअर्स म्हणून मिळतील. म्हणून या शेअरमध्ये तेजी होती.

क्रिसिल या रेटिंग एजन्सीने VIP इंडस्ट्रीजचे रेटिंग वाढवून AA केले.

IOC गुजरात रिफायनरीत Rs २२००० कोटीची गुंतवणूक करेल.

केंद्र सरकार इंडस इंड बँकेचे SUTTI मधील ३५००० शेअर्स विकून NBFC साठी फंड निर्माण करण्याची शक्यता आहे.
गेटवे डिस्ट्रिपार्कचा स्नोमॅन लॉजिस्टिक्स मधील ४०.२५% स्टेक अडानी लॉजिस्टीकने खरेदी केला. त्यामुळे अडाणी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी आली.

प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्सचे Rs १६० वर लिस्टिंग झाले.

केमिकल इंडस्ट्रीजमधील विष्णू केमिकल्स, बोडल केमिकल्स कॅम्लिन फाईन, कोकुयो कॅम्लिन या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते .

ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीज क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गोल्डन क्रॉस फॉर्म झाला. म्हणजेच ५० DMA लाईनने २०० DMA च्या लाईनला वरच्या दिशेने छेदले. मे २०१६ नंतर हा गोल्डन क्रॉस फॉर्म होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५५८ NSE निर्देशांक निफ्टी १२२५५ बँक निफ्टी ३२३५४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २७ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६८.०१ प्रती बॅरल ते US $ ६८.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२७ ते US $१= ७१.३६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४३ तर VIX १०.५२ होते.

चीन USA मधून आयात होणाऱ्या काही उत्पादनांवर ड्युटी कमी करणार आहे. उदा फ्रोझन पोर्क. क्रूडचा दर वाढत आहे. त्याचबरोबर रुपयांची किंमत कमी होत आहे. अशावेळी ऑइल आणि गॅस एक्स्प्लोरेशन करणाऱ्या कंपन्यांना फायदा होतो. HOEC, सेलन एक्स्प्लोरेशन, ऑइल इंडिया.

ONGC ला आसाममध्ये १०० ठिकाणी एक्स्प्लोरेशन करण्यासाठी पर्यावरणाची मंजुरी मिळाली.

कावेरी सीड्स ही कंपनी Rs ७०० प्रति शेअर या भावाने २८ लाख शेअर्स बाय बॅक करणार आहे. टाटा एलेक्सि, युनियन बँक आणि हेक्झावेअर या तीन कंपन्यांचे शेअर्स आता कॅश सेगमेंटचे शेअर्स झाले.

फ्युचर कन्झ्युमर , फ्युचर रिटेल या दोन्ही कंपन्यांनी तारण म्हणून ठेवलेले शेअर्स सोडवले.

फ्युचर कुपन्सला ४९% स्टेकसाठी अमेझॉनकडून Rs १५०० कोटी मिळाले.

सरकार UCO बँकेत Rs २१४२ कोटी IOB मध्ये Rs ४३६० कोटी तर अलाहाबाद बँकेत Rs २१०० कोटी भांडवल घालणार आहे.

रिझर्व्ह बँकेने असे सांगितले की SBI चे विमा कंपन्यात खूपच एक्स्पोजर आहे. ते त्यांनी ३०% पर्यंत कमी करावे. सध्या SBI चे ५७% एक्स्पोजर आहे. NBFC चे एक्स्पोजर ५०% असावे.

LIC ने अडानी पोर्टमधील स्टेक ११.८१% पर्यंत वाढवला. चार कोटी शेअर्स खरेदी केले. LIC ने लार्सन आणि टुब्रो मधील आपला स्टेक २.०१% ने कमी केला. आता LIC चा L & T कंपनीत १४.२५% स्टेक राहिला.

D मार्ट चे प्रमोटर R. K. दमाणी यांनी कॅम्लिन फाईन मधील १.५% स्टेक ( १८.२ लाख शेअर्स) आपल्या मालकीच्या ब्राईट इन्व्हेस्टमेंट या कंपनीमार्फत खरेदी केला.

२६ डिसेंबर २०१९ रोजी F & O एक्स्पायरीच्या दिवशी खत उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये हालचाल जाणवली. उदा RCF GNFC, GSFC, FACT.

आजपासून करीना कपूर आणि अक्षयकुमार यांचा ‘गुडन्यूज’ हा पिक्चर रिजीज होत आहे. यामुळे PVR, इनॉक्स लेजर, मुक्ता आर्ट्स हे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. इनॉक्स लिजरने इंदोरमध्ये कमर्शियल ऑपरेशन सुरु केले.

IL & FS संबंधात सेबीने ‘CARE’ आनि ‘ICRA’ या रेटिंग कंपन्यांना प्रत्येकी Rs २५ लाख दंड केला.

RBI ३० डिसेंबर २०१९ रोजी पुन्हा Rs १०००० कोटीचे ऑपरेशन ट्विस्ट करेल. याचा फायदा बँकांना होण्याची शक्यता असल्यामुळे आज बँकांच्या शेअर्स मध्ये तेजी होती.

सध्या थंडी पडत आहे त्यामुळे V गार्ड, बजाज इलेक्ट्रिकल्स यांच्या मालाला मागणी येण्याची शक्यता आहे.

बोईंग कंपनी आपल्या ७३७ MAX या विमानाचे उत्पादन बंद करणार आहे. त्यामुळे या विमानाशी संबंधित ज्या IT कंपन्यांना काँट्रॅक्टस मिळतात त्या IT कंपन्यांवर परिणाम होईल.

वॉशिंग मशीनच्या सेल्समध्ये तेजी दिसते आहे याचा फायदा डिक्सन टेकला होईल.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने सांगितले की प्रवासी भाडे आणि मालभाडे याची समीक्षा केली जाईल. RITES या कंपनीची अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

बजेट रॅलीसाठी IRKON, IRCTC, RITES, RVNL या रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सचा विचार करायला हरकत नाही .
येस बँकेत गुंतवणूक करण्यासंबंधातील बाइंडिंग टर्म शीटचा शेवटचा दिवस आहे.

कॅन फिन च्या बॉण्ड्सना AAA रेटिंग मिळाले.

ITD सिमेंटेशनला मियाँम्यारमधून Rs ८ कोटींची ऑर्डर मिळाली.

बहुतांश कार्स उत्पादक कंपन्या कार्सच्या किमतीत १ जानेवारी २०२० पासून वाढ करणार आहेत.

२८ डिसेंबर ते ३१डिसेंबर २०१९ दरम्यान व्यवसायात मंदी असल्याने सुंदरम क्लेटन आपले युनिट बंद ठेवणार आहे.

TIER १ आणि TIER २ शहरात २ विमानतळ बांधण्याचा सरकारचा विचार आहे. हे काम लार्सन आणि टुब्रो, GMR इन्फ्रा या कंपन्यांना मिळू शकेल. अशी शक्यता असल्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली. कोलकाता, चेन्नई पुणे येथे दुसरा विमानतळ बांधण्याचा सरकार विचार करत आहे.

HSIL चे ऑगस्ट मध्ये डीमर्जर झाले. मूळ कंपनीमध्ये बिल्डिंग प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर प्रॉडक्ट, पॅकेजिंग हे व्यवसाय राहिले. डीमर्ज झालेल्या कंपनीत फर्निचर, फर्निशिंग, आणि होम डेकोरेशन हे व्यवसाय असतील. डीमर्ज कंपनीचे नाव SHIL(सोमाणी होम इनोव्हेशन लिमिटेड) आहे. HSIL च्या १ शेअरला SHIL चा १ शेअर दिला. त्याचे २६ डिसेंबर २०१९ रोजी BSE आणि NSE वर लिस्टिंग झाले. या शेअरचे २६ डिसेंबर २०१९ रोजी Rs १६१.५० ला लिस्टिंग झाले. आणि HSIL चा शेअर Rs ४४ वर ट्रेंड होत होता. SHIL चा शेअर आज Rs १४८ वर ट्रेड होत होता.

भेलच्या हिमाचल प्रदेशातील BAIRA SIUL या ६० MV प्रोजेक्टचे काम सुरु झाले.

आज जानेवारी सिरीजची सुरुवात शानदार झाली. धातू, ऑटो, ऑटो अँसिलिअरी, फार्मा या शेअर्समध्ये २०२० मध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे.

टाटा पॉवर डायव्हेस्टमेन्ट मधून US $१बिलियन उभारणार आहे. ह्या रकमेचा उपयोग कर्ज कमी करण्यासाठी केला जाईल.

३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रिन्स पाईप्स एन्ड फिटिंग या कंपनीच्या शेअर्सचे लिस्टिंग होईल.

१ फेब्रुवारी २०२० रोजी अंदाजपत्रक सादर होईल. त्यामुळे नजीकच्या भविष्यात बजेट रॅली येण्याची शक्यता आहे, माननीय अर्थमंत्री उद्या बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेणार आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५७५ NSE निर्देशांक निफ्टी १२२४५ बँक निफ्टी ३२४१२ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २६ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६७.२३ प्रती बॅरल ते US $ ६७.५० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १ = ७१.२२ ते US $ १ = Rs ७१.३० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२८ तर VIX १२.६७ होते.

USA आणि चीनमधील ट्रेड वॉर मध्ये डील होण्याची शक्यता वाढल्यामुळे क्रूडसाठी असलेल्या मागणीत वाढ झाली आणि ओपेक+देशांनी उत्पादनात प्रतिदिनी २१ लाख बॅरल कपात करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे क्रूडचा दर US$६७ प्रती बॅरलपेक्षा जास्त होता.

भारती इंफ्राटेल आणि इंडस टॉवर्स यांच्या मर्जरची तारीख सरकारने मंजुरी दिली नाही म्हणून २ महिने पुढे ढकलली. हे मर्जर आतापर्यंत दोनदा पुढे ढकलले गेले आहे.

NBCC ला दिल्लीमध्ये Rs १३९० कोटींची ऑर्डर मिळाली.

ICRA ने SML ISUZU चे लॉन्ग टर्म रेटिंग AA वरून AA – केले.

IT मंत्रालयाने सर्व मंत्रालयांना सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट्स देशी कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी पत्र पाठवले. याचा फायदा QUICK HEAL सिक्युरिटीला होईल. म्हणून या शेअर मध्ये आज तेजी होती.

CCD (कॅफे कॉफी डे) मधील स्टेक खरेदी करण्यासाठी आता KKR आणि APAX यांची बोली शिल्लक आहे त्यामुळे त्यांना हा स्टेक मिळण्याची शक्यता असल्यामुळे CCD मध्ये तेजी होती.

श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि महिंद्रा फायनान्स यांची आंतरराष्ट्रीय मार्केट मधून पैसे उचलण्याची योजना आहे.

NAA ( नॅशनल अँटीप्रॉफीटिअरींग ऑथॉरिटी) ने GST च्या दरामधील कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही म्हणून जॉन्सन & जॉन्सन ला Rs २३० कोटी दंड केला.पूर्वी HUL ला Rs ५३५ कोटी, प्रॉक्टर एन्ड गॅम्बल ला Rs २५० कोटी, नेसलेला Rs ९० कोटी आणि ज्युबिलंट फूड्सला Rs ४१.४ कोटी दंड केला होता.

२६ डिसेंबर २०१९ ला F & O मार्केट मधील एक्स्पायरी होती. जानेवारी २०२० मध्ये खालील कंपन्यांच्या शेअर्समधील काँट्रॅक्टस ८६% ते ९०% रोलओव्हर झाली. बायोकॉन, ब्रिटानिया, इंडिया बुल्स हौसिंग, ग्रासिम, IDFC १ST बँक, येस बँक, HDFC, ICICI बँक, सेंच्युरी टेक्सटाईल, तर खालील कंपन्यांमध्ये ८०% ते ८५% रोल ओव्हर झाले ऍक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, JSW स्टील. SAIL, वेदांता, ITC,बर्जर पेंट्स,बाटा

नाताळची सुट्टी असल्यामुळे युरोप आणि USA मधील मार्केट्स बंद होती. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग कमी होता. त्यामुळे मार्केट खालच्या स्तरावर बंद झाले. मार्केटमध्ये व्हॉल्युम, लिक्विडीटी कमी होती. आज डिसेंबर २०१९ ची एक्स्पायरी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४११६३ NSE निर्देशांक निफ्टी १२१२६ बँक निफ्टी ३१९९७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २४ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६६.४६ प्रती बॅरल ते US $ ६६.५८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=७१.१८ ते US $१= Rs ७१.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६८ तर विक्स ११.५९ होते.

USA मधील क्रूडचा साठा कमी होत आहे पण ओपेक+ देशांनी केलेल्या उत्पादनातील कपातीमुळे क्रूडचे दर आज US $ ६६ प्रती बॅरल च्या वर राहिला.

GST चे दर वाढविण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी नेमलेल्या समितीने आपल्या शिफारशी सादर केल्या.
GST च्या अंतर्गत GST चे दोन दर असतील. हे दर १०% आणि २०% असतील.SIN ( मद्यार्क सिगारेट, तंबाखू आणि तंबाखूपासून बनवलेले पदार्थ) वस्तू आणि लक्जुरीज ( चैनीच्या वस्तू) यावर विशेष दर आकारला जाईल. कॉस्मेटिक्स आनि गॅम्बलिंग( लॉटरी आणि इतर जुगार सदृश खेळ) यावर सेस लावला जावा. या सेसला महागाईच्या दराशी संलग्न करण्यात यावे. सेसचे दर वाढवावेत. उत्पादनासाठी कॉम्पोझिट रेट वाढवावेत. काम्पोझीशन स्कीममधील बिझिनेसची वेळोवेळी समीक्षा करावी. ज्या वस्तूंवर आता GST लावला जात नाही त्या वस्तूंवर GST आकारला जावा. ज्या वस्तूंवर GST ५% आहे तो १२% करावा ज्या वस्तूंवर १२ % आहे त्या वस्तूंवर १८% करावा. आणि ज्या वस्तूंवर १८% आहे त्यावस्तूंवर २८%लावावा. खते, पादत्राणे, इन्व्हर्टर, वैद्यकीय उपकरणे, मोबाईल ( १२% वरून १८ % ) ट्रॅक्टर, फॅब्रिक, फार्मा, ऍग्रिकल्चरल मशिनरी, वॉटर पम्प या वरीलGST चे दर वाढवावे. एकूण २३ वस्तूंवरील GST चा दर वाढविण्याची शिफारस समितीने केली.
GST कलेक्शनचे लक्ष्य आणि वास्तविक GST कलेक्शन यात मोठी तफावत आहे. ही गॅप पुढील दोन वर्षात वाढत जाईल. त्यामुळे GST चे दर ताबडतोब वाढवावेत अशी शिफारस समितीने केली.

IFCI ला आपला NSE मधला २.४% स्टेक विकून Rs ८०६ कोटी मिळाले.

HEINKEN हि कंपनी यनायटेड ब्रुअरीज मधील आपला १०% ते १५% स्टेक खरेदीने करणार आहे. यासाठी ओपन ऑफर आणली जाईल.

BPCL ची डायव्हेस्टमेन्ट क्रॉसहोल्डींग चा गुंता सिडवण्यास वेळ लागणार असल्याने FY २० पूर्ण होईल असे वाटत नाही.

डिशमन कार्बोजेन या कंपनिच्या ऑफिसेसवर आयकर विभागाने धाडी घातल्या. त्यांच्या वर ‘रुटिंग मनी थ्रू अकोमोडेशन एन्ट्रीज’ चा ठपका ठेवला आहे.

२६ डिसेंबर २०१९ रोजी F & O मार्केटमधील डिसेंबर काँट्रॅक्टसची एक्स्पायरी असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१४६१ NSE निर्देशांक निफ्टी१२२१४ बँक निफ्टी ३२२८० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ११-१२ जानेवारीला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २३ डिसेंबर २०१९

आज क्रूड US $ ६५.९० प्रती बॅरल ते US $ ६५.९७ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.१२ ते Rs ७१.१९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५८ होता तर VIX १३ होते.

आज झारखंड राज्याच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. JMM आनि INC यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. ही बातमी आल्यावर लगेचच मार्केट २०० पाईंट पडले पण नंतर सावरले.

इंडिया बुल्स रिअल इस्टेट या कंपनीने त्यांचे मुंबई आणि गुरुग्राम येथील कमर्शियल ऍसेट्स Rs ८१० कोटींना ब्लॅकस्टोनला विकले.

सौदी आरामको या कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज आपली ऍसेट विकण्याला सरकार मनाई करेल अशी बातमी आल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पडला.

टाटा ग्रुप आपले सर्व FMCG बिझिनेस टाटा ग्लोबल बिव्हरेजीसमध्ये मर्ज करणार आहेत त्यामुळे आता टाटा ग्लोबल बिव्हरेजीस ही मोठी FMCG कंपनी होईल.

अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी इमामी ग्रुपचा ८ मिलियन टन क्षमतेचा सिमेंट बिझिनेस Rs ६५०० ते Rs ७००० कोटींना खरेदी करणार आहे.

टाटा मोटर्स, टाटा DVR, येस बँक आणि वेदांता या कंपन्यांचे शेअर्स सेन्सेक्समधून बाहेर पडतील त्याच्या ऐवजी टायटन, अल्ट्रा टेक सिमेंट, नेस्ले हे शेअर समाविष्ट होतील.

BASF चा कन्स्ट्रक्शन बिझिनेस ‘लोन स्टार’ Rs २५००० कोटींना खरेदी करणार आहे.

सरकारने देशात सर्वत्र एकच विजेचा दर लागू करण्याचा विचार करत आहे असे सांगितले..

स्टील उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी सरकार करात कपात करण्याचा विचार करत आहे.

FY २० साठी फिस्कल डेफिसिटचे लक्ष्य ३.३% ऐवजी ३.५% केले.

सरकार येत्या पांच वर्षात Rs १००००० कोटी इन्फ्रास्टक्चर वर खर्च करेल असे सरकारने जाहीर केले. जमना ऑटो या कंपनीचे प्रमोटर्स मार्केटमधून शेअर्स खरेदी करत आहेत.

MOIL या कंपनीचा Rs १५२ प्रती शेअर या किमतीने शेअर बायबॅक डिसेम्बर २६ २०१९ ला ओपन होऊन जानेवारी ८ २०२० ला बंद होईल. कंपनी यासाठी ३०८.२७ कोटी खर्च करेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१६४२ NSE निर्देशांक निफ्टी १२२६२ बँक निफ्टी ३२३३९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!