Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.
आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२१
आज क्रूड US $ ५५.६४ प्रती बॅरल ते US $ ५६.२४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७३.०१ ते US $१= Rs ७३.१२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९०.३३ VIX २४.६७ PCR १.५३ होते.
सिनेटची बैठक लवकरात लवकर १९ जानेवारीला बोलावता येणार असल्यामुळे ट्रम्प यांच्या इम्पीचमेंटवर निर्णय १९ तारखेनंतरच होऊ शकतो. आज बिडेन यांनी US $ १.९० ट्रिलियनचे पॅकेज देऊ असे जाहीर केले. या पॅकेज अंतर्गत प्रत्येक USA नागरिकाच्या बचत खात्यात US $ १००० जमा होतील. US $ १ ट्रिलियन फॉर इंडिविज्युअल्स आणि फॅमिली साठी असतील US $ ४१५ बिलियन कोरोनाच्या संकटासाठी, US $ ४४० बिलियन उद्योगांसाठी खर्च केले जातील. US $ ३०० ते US $ ४०० साप्ताहिक बेकार भत्ता दिला जाईल. USA मध्ये सत्तेवर येणाऱ्या नवीन सरकारची ध्येय धोरणे स्पष्ट झाल्यावर मार्केटला एक निश्चित दिशा मिळेल.
आज यूरोपमधील देशातील लॉकडाऊनमुळे आणि USA ,यूरोपमध्ये झालेल्या कोरोनाच्या नव्या प्रादुर्भावामुळे क्रूडसाठी मागणी कमी झाली. सोन्यात माफक तेजी तर चांदीत मंदी होती.
टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स ,डेन नेटवर्क्स या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
युनिकेम लॅब या कंपनीच्या आर्थ्रायटिस वरील औषधाला, (जे आतापर्यंत फायझरच बनवत होते) USFDA ने मंजुरी दिली. ह्या औषधाचे उत्पादन कंपनीच्या गोवा प्लॅन्टमध्ये केले जाईल. फायझर या कंपनीने आर्थ्रायटिस संबंधित औषधा साठी औरोबिंदो फार्मावर केस टाकली.
डाबर ही कंपनी आता ‘घी’ च्या उत्पादनात उतरली आहे. हे ‘घी’ Rs ५९० प्रति लिटर या दराने विकले जाईल.
निफ्टीच्या अर्धवार्षिक रिव्ह्यूमध्ये यावेळी ‘GAIL’ च्या जागी टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स चा समावेश केला जाईल.टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने वेलनेस प्रॉडक्ट्सबरोबरच इम्युनिटी बूस्टर्स वर फोकस ठेवला आहे.टाटा कंझ्युमर्सने आता D टू C म्हणजेच डायरेक्ट टू कन्झ्युमर क्षेत्रात पुष्कळ उत्पादने आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्या प्रमाणे टेटली टी, संपन्न ब्रँडचे मसाले, डाळी, इन्स्टंट टी आणि कॉफी इत्यादी प्रॉडक्ट्स ते मार्केट मध्ये आणत आहेत /आणणार आहेत. फ्री फ्लोट मार्केट कॅपचा विचार करून असे बदल करतात. गेलची मार्केटकॅप Rs ३०००० कोटी तर टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सची मार्केट कॅप Rs ३६००० आहे. यामुळे FMCG क्षेत्रातील HUL, नेस्ले, ITC आणि टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स असे चार शेअर्स निफ्टी मध्ये असतील.
MSCI इंडेक्सच्या फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या रीबॅलन्सिंग मध्ये भारती एअरटेलच्या वाढलेल्या FI (१००%) लिमीटचा विचार केला जाईल.
IRCTC आता ‘रेडी टू ईट’ पॅक्ड फूड गाड्यांमध्ये सर्व्ह करणार आहे. उदा. हल्दीराम, ITC, MTR, वाघ बकरी चहा.
PFC ही सरकारी क्षेत्रातील कंपनी बॉण्ड इशू करणार आहे. हे बॉण्ड ३,५.१०, १५ वर्षे मुदतीचे असतील. ह्यापासून मिळणारे उत्पन्न करपात्र असेल. १५ वर्षे मुदतीच्या बॉण्डसाठी व्याजाचा दर ७.१५% असेल. हा बॉण्ड्स इशू १५ जानेवारी २०२१ ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान ओपन राहील. Rs ५००० कोटींच्या दोन टप्प्यात हा इशू येईल. या इशुत ८०% कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
ट्रायडंट या टाटा ग्रुपच्या कंपनीला मेथड ऑफ मॅन्युफफॅक्चरिंग फॅब्रिकचे पेटंट मिळाले.
मारुती सुझुकीचा ऑन लाईन फायनान्स प्लॅटफॉर्म ‘मारुती सुझुकी एरेनासा’ठी लाँच झाला.मारुती सुझुकीने स्मार्ट फायनान्स प्लॅटफॉर्म लाँच केला.
साखरेच्या किमती आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एप्रिल २०१७ नंतरच्या कमाल स्तरावर आहेत. ब्राझीलमध्ये साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. तर भारतात मात्र साखरेचे उत्पादन ४२% ने वाढून ११० लाख टन झाले आहे. भारतातून यावेळी साखरेची चांगली निर्यात होईल.
CEAT ही कंपनी रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर ६५० CC बाईक साठी टायर्सचा सप्लाय करेल.
ABB इंडियाला सुरत वॉटर सप्लाय कडून १० लाख घरांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक उपकरणांसाठी ऑर्डर मिळाली.
वेदांताची पब्लिक ऑफर ४ मार्च २०२१ रोजी ओपन होऊन १८ मार्च २०२१ ला बंद होईल.
CESC ने जाहीर केलेल्या Rs ४५ लाभांशाची रेकॉर्ड डेट २५ जानेवारी २०२१ असून ५ फेब्रुवारी किंवा त्यानंतर हा लाभांश तुमच्या बचत खात्यात जमा केला जाईल.
‘GAIL’ ने आज झालेल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स च्या बैठकीमध्ये Rs १५० प्रती शेअर टेंडर ऑफर रूटने ६.९८ कोटी शेअर्सच्या बायबॅकसाठी आणि Rs २.५० प्रती शेअर लाभांशाची घोषणा केली. शेअर बायबॅक आणि लाभांशासाठी २८ जानेवारी २०२१ ही रेकॉर्ड डेट असेल. GAIL यासाठी Rs १०४६.३० कोटी खर्च करेल.
आज HCL टेक या IT क्षेत्रातील मोठ्या कंपनीचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले.
EBIT मार्जिन २२.९% होते. कंपनीला Rs ३९६९ कोटी प्रॉफीट झाले. कंपनीने EBIT मार्जिन गायडन्स २१% ते २१.५% तर ग्रोथ गायडन्स २% ते ३% दिला आहे. US $ रेव्हेन्यू ग्रोथ ४.४% होती. कंपनीने Rs ४ प्रती शेअर लाभांश जाहीर केला. ऑपरेटिंग इन्कम Rs ४४१६ कोटी झाले .
आज PVR या मल्टिप्लेक्सेसच्या मालक असलेल्या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. हे अपेक्षित होते कारण कोरोनाकाळातील सगळ्यात जास्त प्रतिकूल परिणाम झालेला एंटरटेनमेंट हा उद्योग आहे. कंपनीला Rs ४९ कोटी तोटा झाला. कंपनीचे उत्पन्न Rs ४५ कोटी तर इतर उत्पन्न Rs २७४ कोटी होते. आता बहुतांश राज्यातून मल्टिप्लेक्सेस ओपन होत आहेत म्हणून या कंपनीला त्याचा फायदा होईल.
मी आज तुम्हाला HCL टेक चा विकली चार्ट देत आहे. या चार्टमध्ये हेवी व्हॉल्यूमने शूटिंग स्टार पॅटर्न दिसत आहे. हा पॅटर्न ट्रेड रिव्हर्सल दाखवतो. हा पॅटर्न टॉपला तयार होतो. बर्याच दिवसांच्या तेजीनंतर बनतो. आज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यावर शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. या पॅटर्ननंतर जी कँडल तयार होते ती पाहावी लागते. हा पॅटर्न इन्व्हर्टेड हॅमरसारखा असतो. या पॅटर्ननंतर मंदी सुरु होते.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ४९०३४ NSE निर्देशांक निफ्टी १४४३३ बँक निफ्टी ३२२४६ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!