Tag Archives: marathi stock market

आजचं मार्केट – ३० जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch १४-१५ मार्च आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ३० जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ५८.६९ प्रती बॅरल ते US $ ५९.२८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.४५ ते US $१= Rs ७१.५६ या दरम्यान तर US $ निर्देशांक ९७.९२ तर VIX १६.९० होते.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे. चीनवर कच्चा मालासाठी अवलंबून असणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाची टंचाई होण्याची शक्यता आहे.

USA च्या (सेंट्रल बँकेने) फेडने आपल्या दरात कोणतेही बदल केले नाहीत.

ऑरोबिंदो फार्माच्या युनिट नंबर VII साठी USFDA ने OAI (ऑफिशियल एक्शन इनिशिएटड) चा रिपोर्ट दिला.त्यामुळे शेअर पडला.

इंडिगोच्या EGM (एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग) मध्ये शेअरहोल्डर्सनी गंगवाल ग्रुपने सुचवलेली A /A ( आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) मधील सुधारणा नामंजूर केली.

MEIS ( मर्चन्डाईझ एक्स्पोर्ट्स फ्रॉम इंडिया) स्कीम अंतर्गत डोमेस्टिक मोबाईल उत्पादक कंपन्यांना २% जादा सवलत देण्याचा निर्णय DGFT ( डायरेक्टर जनरल ऑफ फॉरिन ट्रेड) ने घेतला. याचा फायदा रेड्डींग्टन, डिक्सन टेक, BPL, AFFLE या कंपन्यांना होईल.

शारदा माईन्स केसमध्ये सुप्रीम कोर्टाने JSPL ला दिलासा दिला. सुप्रीम कोर्टाने कंपनीला या खाणीमधून Rs.२००० कोटींचे आयर्न ओअर उठवण्यास मंजुरी दिली.

कोटक महिंद्रा बँकेच्या प्रमोटर्सना ३१ मार्च २०२० पर्यंत २०% ऑफ PUVESC (पेडअप वोटिंग इक्विटी शेअर कॅपिटल) वोटिंग पॉवर ठेवण्यासाठी RBI ने मंजुरी दिली. १ एप्रिल २०२० पासून ही मर्यादा १५% होईल. RBI च्या अंतिम मंजुरीनंतर सहा महिन्यात प्रमोटर्सचा स्टेक २६% ऑफ PUVESC पर्यंत कमी करावा लागेल. यानंतर प्रमोटर्सचे शेअरहोल्डिंग PUVESC च्या १५% एवढे किंवा RBI ने ठरवलेल्या मर्यादेऐवढे होईपर्यंत प्रमोटर्स कोणत्याही प्रकारचे पेडअप वोटिंग इक्विटी शेअर्स खरेदी करणार नाहीत. या संबंधात हाय कोर्टात केलेला अर्ज प्रमोटर्स मागे घेतील.

डेल्टा कॉर्पच्या गोव्यामधील कॅसिनोमध्ये गोव्याच्या नागरिकांना प्रवेश करायला गोव्याच्या राज्य सरकारने मनाई केली आहे.

राहुल बजाज यांची १ एप्रिल २०२० पासून बजाज ऑटोमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली.

बोरोसिल ग्रुप आपल्या VYLINE ग्लास वर्क्स, FENNEL इव्हेस्टमेन्ट & फायनान्स आणि गुजरात बोरोसिल यांचे बोरोसिल ग्लास वर्क्स मध्ये मर्जर करेल आणि बोरोसिल ग्लास वर्क्सच्या कन्झ्युमर आनि सायंटिफिक बिझिनेसचे बोरोसिल मध्ये डीमर्जर करेल. बोरोसिल ग्लास वर्क्स हि कंपनी सोलर ग्लास बिझिनेस बघेल आणि तिचे नाव बोरोसिल रिन्यूएबल्स असे असेल. या स्कीमपमाणे गुजरात बोरोसिलच्या दोन शेअरमागे बोरोसिल ग्लास वर्क्स आणि बोरोसिल चा प्रत्येकी एक शेअर मिळेल. यामुळे सोलर ग्लास बिझिनेस आणि कन्झ्युमर आणि सायंटिफिकवेअरच्या बिझिनेसची मालकी वेगळी होईल.
ऑइल इंडिया जैसलमेरमध्ये ३७ तेलाच्या खाणी Rs ४०० कोटीं खर्च करून खोदणार आहे.

बजाज ऑटो (फायदा वाढला मार्जिन वाढले) अरविंद स्मार्ट स्पेसेस, कोलगेट ( व्हॉल्युम ग्रोथ अपेक्षेपेक्षा कमी, बाकीच्या बाबतीत चांगला) डाबर ( प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले, व्हॉल्युम ग्रोथ ५.६% Rs २० कोटींचा ‘वन टाइम लॉस’) कार्बोरँडम, फोर्स मोटर्स, LIC हौसिंग फायनान्स, IOC( प्रॉफिट उत्पन्न वाढले GRM US $३.३४ BBL (कमी झाले)) डाटामाटिक्स, ब्लू स्टार (तोट्यातून नफ्यात आली, टर्नअराउंड झाली.) LAURAUS लॅब्स, अंबर इंटरप्रायझेस, इक्विटास होल्डिंग, ECLERX, पर्सिस्टंट सिस्टिम्स ( Rs ९ अंतरिम लाभांश), मेरिको ( Rs ३.२५ अंतरीम लाभांश) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

MOIL (Rs ३ अंतरिम लाभांश), GSFC,नोसिल यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. पराग मिल्क या कंपनीचे निकाल ठीक होते .

टाटा मोटर्सचे निकाल चांगले आले. कंपनीला गेल्या तिमाहीतील Rs २६९९० कोटी तोट्याऐवजी या तिमाहीत Rs १७३८ कोटी फायदा झाला.उत्पन्न Rs ७१६७६ कोटी झाले. JLR चे उत्पन्न Rs ६४८ कोटी झाली आणि फायदा झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०९१३ NSE निर्देशांक निफ्टी १२०३५ बँक निफ्टी ३०६४७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ५९.९८ प्रती बॅरल ते US $ ६०.३७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१८ ते US $ १=Rs ७१.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.०२ तर VIX १६.५० होते.

कोरोना व्हायरस विषयीची तीव्र प्रतिक्रिया हळू हळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जागतिक बाजार थोडेसे सुधारले. क्रूडच्या दरामध्येही सुधारणा झाली. जगातील सर्व देश या समस्येचा एकजुटीने सामना कसा करायचा याचा विचार करू लागले.

आपल्या मार्केटमध्येही अंदाजपत्रक, तिसर्या तिमाहीचे निकाल या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवहार सुरु झाले.
ऑपरेशनल निकाल चांगले असतील आणि कंपनीचा मार्केटशेअर कमी झालेला नसेल अशा कंपन्यांच्या शेअर्सचा विचार करा.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला २४ फेब्रुवारीच्या जवळपास भेट देतील. या वेळी साहजिकच व्यापार उद्योग अपारंपारिक ऊर्जा, संरक्षण, टॅरीफ या विषयासंबंधात चर्चा होतील काही करारही होतील. ज्या कंपन्या भारतात आणि USA मध्ये कार्यरत आहेत /लिस्टेड आहेत, ज्या दोनही देशांशीसंबंधीत ट्रेड करतात किंवा ज्यांच्या फ्रँचाइजीस भारतात आहेत अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येईल. उदा नेस्ले, जिलेट, फायझर, ओरॅकल फायनान्सियल, टाइमेक्स, कोलगेट, कमिन्स, G E T & D , व्हर्लपूल तर आयशर मोटर्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो (हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल्स वरील आयात कर) . पेट्रोनेट LNG चे डील पुरे होईल.

USA मध्ये FED ची बैठक आज संपेल. या बैठकीतील त्यांच्या रेटकट विषयी निर्णयाचा तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरील दृष्टीकोनाचा परिणाम उद्या मार्केटवर राहील.

वाणिज्य मंत्रालयाने एक्स्पोर्ट प्रमोशन स्कीमच्या अटी पुऱ्या न केल्याबद्दल भारती एअरटेलला ब्लॅकलिस्ट केले.

इंडिगोच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये फर्स्ट राईट ऑफ रिफ्युजलविषयी बदल करण्यासाठी आज इंडिगोची एक्स्ट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग झाली.

IRCON ह्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी स्टॉकस्प्लिट वर विचार करण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२० रोजी बैठक बोलावली आहे.

मेरिकोने आपल्या सानंद या गुजरातमधील प्लांट मध्ये पर्सनल हेल्थकेअर प्रॉडक्ट्सचे उत्पादन सुरु केले. .

बजाज ऑटो, टाटा मोटर्स, IOC, भारती इंफ्राटेल, कोलगेट, डाबर, मेरिको, MCX या कंपन्या आपले तिसर्या तिमाहीचे निकाल ३० जानेवारी २०२० रोजी जाहीर करतील.

HUL, स्टेट बँक ऑफ इंडिया, ITC, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, वेदांता, ज्युबिलण्ट लाईफ, टेक महिंद्रा या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल ३१ जानेवारी २०२० रोजी जाहीर करतील.

३० जानेवारी २०२० ला F & O च्या जानेवारी महीन्याची एक्स्पायरी असेल.

टाटा मोटर्स DVR, डिश टी व्ही, NBCC, कॅस्ट्रॉल या कंपन्यांचा F & O मार्केटमधील ३० जानेवारी २०२० हा शेवटचा दिवस असेल.

सरकार CPSE ETF चा सातवा टप्पा ( Rs १०,००० कोटी) गुरुवार ३० जानेवारी २०२० रोजी ओपन करेल. हा इशू रिटेल इन्व्हेस्टरसाठी शुक्रवार ३१जानेवारी २०२० रोजी ओपन होईल

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, बिर्ला कॉर्प, एस्कॉर्टस,ज्युबिलण्ट फूड्स, गोदरेज कंझ्युमर्स, डिक्सन टेक्नॉलॉजीज यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

नवभारत व्हेंचर्स, CG पॉवर आणि मेघमणी ऑर्गनिक्स यांचे निकाल असमाधानकारक होते.

डाबरचा निफ्टीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

१ फेब्रुवारी २०२० रोजी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत २०-२१ या वित्तीय वर्षांसाठी अंदाजपत्रक सादर करतील. या निमित्ताने BSE आणि NSE ही दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस शनिवारी नेहेमीच्या वेळेत काम करतील.

सरकार HAL मधील आपला १५% स्टेक OFS च्या माध्यमातून विकेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४११९८ NSE निर्देशांक निफ्टी १२१२९ बँक निफ्टी ३०८७७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २८ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ५८.७९ प्रती बॅरल ते US $ ५९.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ७१.३२ ते US $ १= Rs ७१.४० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९५ तर VIX १७.६६ होते.

कोरोना व्हायरसची भीती जगात सर्वत्र सतावत आहे. टाटा मोटर्सची एक फॅक्टरी चीनमध्ये आहे.चीनमधील विक्री २५% आहे.त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये मंदी आली. हॉस्पिटल्स, R & D मुख्य बिझिनेस असणाऱ्या SPARC सारख्या कंपन्या, फार्मा कंपन्या, पॅथॉलॉजिकल लॅब्स, यांचे शेअर्स तेजीत होते. चीनमध्ये ज्या भारतीयांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठी भारतात आणले जाणार आहे. क्रूडसाठी मागणी कमी झाल्यामुळे क्रूडचे दर कमी झाले. त्यामुळे टायर, एव्हिएशन, पेंट, कार्बन या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा झाला. आपल्या मार्केटमध्ये ज्या सेक्टर्सना अंदाजपत्रकात सोयी सवलती जाहीर होतील अशा क्षेत्रातील, उदा. रिअल इस्टेट, केमिकल्स, टायर, फर्टिलायझर्स, डोमेस्टिक फूड इंडस्ट्रीज, गॅसवितरण आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्या, ऑटो आणि ऑटो अँसिलियरीज कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.त्याबरोबरच तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर होत आहेत. ज्या कंपन्यांचे निकाल चांगले आले त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

१७ मायनिंग प्रोजेक्टसाठी कोल इंडियाला पर्यावरणविषयी मंजुरी मिळाली..

ITI च्या FPO ला मार्केटने थंडा प्रतिसाद दिला. त्यामुळे या FPOची मुदत ३१ जानेवारी २०२० पर्यंत वाढवली आणि प्राईस बॅण्ड Rs ७१ ते Rs ७७ असा बदलला.

उत्तर प्रदेशात रेस्टारंट आणि दुकानांचा वेळ वाढवला.याचा फायदा मद्यार्क उत्पादन करणाऱ्या कंपन्याना उदा USL, रेडीको खेतान, यांना होईल. एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचे दरही कमी झाले त्यामुळे रेडीको खेतान मध्ये तेजी आली
ट्यूब इन्व्हेस्टमेंट, JK लक्ष्मी सिमेंट, दिग्विजय सिमेंट(तोट्यातून फायद्यात) , टीमलीज, KRBL,ओरिएंट इलेक्ट्रिक, भारती एअरटेल आफ्रिका PLC,मन्नापूरम फायनान्स, मारुती सुझुकी, टाटा कॉफी यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सुब्रोस, मास्टेक, सिक्वेन्ट सायंटिफिक, TTK हेल्थकेअर, वाबको यांचे निकाल सर्वसाधारण होते.

सेंच्युरी टेक्सटाईल्स, सेंट्रल बँक ( तोट्यातून फायद्यात) आली पण GNPA आणि NNPA वाढले) यांचे निकाल असमाधानकारक होते.

DR रेडिजच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालात कंपनीने त्यांच्या ‘NUVARING ‘ या औषधाच्या जनरिक व्हल्यूमध्ये इरोजन (घट) झाल्यामुळे या घटीसाठी Rs १३२० कोटींची प्रोव्हिजन केली. त्यामुळे त्यांना Rs ५७० कोटी लॉस झाला असे वरकरणी दिसते. पण कंपनीला IMPAIRMENT प्रोव्हिजन करण्याआधी Rs ७९० कोटी प्रॉफिट झाले. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली. ‘IMPAIRMENT’ म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर ‘IMPAIRMENT’ म्हणजे INTANGIBLE ASSET ( ब्रँड, गुडविल,ट्रेडमार्क, FRANCHISES, कॉपीराईट, पेटंट) यांच्या व्हॅल्यूमध्ये झालेली घट आनि त्यासाठी करावी लागलेली प्रोव्हिजन होय. हे समजताक्षणीच कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली.

उत्तर प्रदेशमधील साखर उत्पादक कंपन्यांना निर्यात करण्यासाठी कोटा दिला होता त्याची मर्यादा संपली. महाराष्ट्रातील साखर उत्पादक कंपन्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये साखरेची किंमत वाढेल असा अंदाज असल्यामुळे निर्यात करण्याचा निर्णय पुढे ढकलत आहेत. सरकार पुन्हा निर्यातीला उत्तेजन देण्यासाठी निर्यात कोटा आणि सब्सिडी जाहीर करेल अशी आशा साखर उत्पादक कंपन्यांना आहे. म्हणून साखरेशी संबंधित शेअर्स पडले.

गॉडफ्रे फिलिपच्या व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले की प्रमोटर्सचा स्टेक विकण्याचा आणि मालमत्ता विकण्याचा निर्णय झालेला नाही. या त्यांच्या स्पष्टीकरणानंतर शेअरमध्ये मंदी आली.

मित्सुबिशी UFJ फायनान्सियल्सने टाटा पॉवरमधील आपला स्टेक २.१% ने कमी केला. आता त्यांचा टाटा पॉवरमध्ये ४.४% स्टेक असेल. टाटा पॉवर एका वर्षात २० शहरात ६५० EV चार्जिंग स्टेशन्स उभारेल.

टाटा मोटर्सने ‘TATA NEXON’ ची इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच केले.

सरकार Rs ५० कोटी आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या बँक फ्रॉडच्या संदर्भात एक अडवायझरी समिती नेमणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०९६६ NSE निर्देशांक निफ्टी १२०५५ वर आणि बँक निफ्टी ३०७६१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २७ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ५८.९६ प्रती बॅरल ते US $ ५९.४९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.४० ते US $ ७१.४५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८९ तर VIX १७ होते.

आजचा दिवस कोरोना व्हायरसच्या नावाने लिहिला जाईल. अंदाजपत्रकातील तरतुदींचा तर्कवितर्क करत तेजीत असणाऱ्या मार्केटला या व्हायरसच्या प्रभावामुळे जबरदस्त धक्का बसला. VIX १७ वर पोहोचले. मार्केट वोलटाइल झाले.पण हा कोरोना व्हायरस आहे तरी काय ? तो कुठून आला ? आणि त्याचा शेअरमार्केटशी संबंध काय? हे समजावून घेणे आणि त्याची माहिती करून घेणे जरुरीचे आहे. त्यानुसार ट्रेडिंगसंबंधी निर्णय घेता येतील.

कोरोना व्हायरस ही जगाच्या रंगमंचावर नवीन रोगजंतूंची एंट्री आहे. हा व्हायरस प्रथम साप, वटवाघूळ, मांजर, उंट आणि इतर सरपटणारे प्राणी यांच्या माध्यमातून जलचर प्राणी जगतात आणि नंतर मांसाहारी पदार्थातून,मासांच्या बाजारातून, वायरल प्रोटीन्समधून माणसांपर्यंत पोहोचला. हा संसर्गजन्य असल्यामुळे एका माणसापासून दुसऱ्या माणसात संक्रमित होतो. ताप, सर्दीने घसा खवखवणे, इत्यादी याची लक्षणे आहेत. ह्याची लक्षणे समजून निदान व्हावयास वेळ लागतो. ज्यावेळेस हा रोग्याच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हापासून निदान व्हावयास दोन आठवडे लागतात. या दोन आठवड्यात हा दुसऱ्या माणसाच्या शरीरात संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे हा झपाट्याने पसरतो.

डिसेंबर २०१९ मध्ये चीन मधील हुवेइ प्रांतातील वुहान या औद्योगिक शहरात प्रथम याचा प्रवेश झाला. वुहान हे एक स्टील, स्मार्ट फोन, ऑटोमोबाईल पार्ट्सचे उत्पादन केंद्र आहे. चीन मधून डिसेम्बर २०१९ पासून हा व्हायरस USA, ऑस्ट्रेलिया, भारत,थायलंड, जपान कोरिया येथे पोहोचला. आतापर्यंत ८०० लोकांना लागण झाली. या हाहाकाराचा संवेदनाशील शेअरमार्केट्सवर परिणाम होणे साहजिकच होते. चीनने या वेळी तातडीच्या उपाययोजना केल्या. ज्या शहरात कोरोनाचा प्रवेश झाला ती शहरे सील केली. वन्य प्राण्यांच्या विक्रीवर, वाहतुकीवर बंदी घातली. यामुळे चीनमधील मागणी कमी झाली. त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विक्री आणि पर्यायाने प्रॉफिट कमी झाले. बाकीच्या देशांनी चीनमध्ये जाण्यासाठी ट्रॅव्हल अलर्ट जाहीर केला. त्यातून हा चीनमधील नववर्ष साजरे करण्याचा काळ असल्यामुळे लाखो चिनी लोक हा सण साजरा करण्यासाठी जगभरातून चीनमध्ये येत आहेत.

त्यामुळे यात पहिला बळी गेला पर्यटन उद्योगाचा. असा काही न समजणारा रोग पसरू लागला की लोकांमध्ये घबराट पसरते, प्रवास करणे, हॉटेलमध्ये खाणेपिणे, शॉपिंग करणे सर्व वर्ज्य करतात. चिनी माणूस हौशी असल्यामुळे जगभर फिरतो आणी जगभर उद्योग स्थापन करतो. याचा परिणाम पर्यटन, हॉटेल, कॅसिनोचा व्यवसाय करणारे, एअरलाईन्स, मांस, अंडी, कोंबड्या, पशुखाद्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्या यावर प्रतिकूल झाला. त्यामुळे पर्यायाने सगळीकडेच मागणी कमी होते. त्यामुळे क्रूडचा दर कमी झाला. चीन ही जगातील मोठी अर्थव्यवस्था असल्याने तेथील घटनांचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर होतो.

या व्हायरसच्या भितीने जगभरातील शेअरमार्केट्स पडली. आपलेही मार्केट त्याला अपवाद कसे असणार? फार्मा, हॉस्पिटल्स ( अपोलो हॉस्पिटल्स, नारायण हृदयालय, GSK फार्मा, फायझर), पॅथॉलॉजिकल लॅब्स (DR लालपाथ लॅब्स, मेट्रोपोलीस हेल्थकेअर, थायरो केअर ), , स्पेशालिटी केमिकल्स आणि अग्रोकेमीकल्स (विनंती ऑर्गनिक्स, IOL केमिकल, स्ट्राइड्स फार्मा,) हे शेअर्स तेजीत होते. धातू (टाटा स्टील, SAIL, JSW स्टील, वेदांता ), ऑटो ( टाटा मोटर्स),एव्हिएशन ( इंडिगो, स्पाईस जेट) या क्षेत्रातील शेअर्स पडले. जगभरातही विषाणूंचे संशोधन करणाऱ्या, त्याची प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. या व्हायरससाठी WHO ( वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) नेही लक्ष घातले आहे.

यापूर्वी २००२ मध्ये SARS ( SEVERE ACUTE RESPIRATORY SYNDROME), EBOLA, २०१८ मध्ये NIPAH, १९१९ मध्ये स्वाईन फ्ल्यू अशा नवीन व्हायरसनी शेअरमार्केट हादरली होती. पण ह्या नवीन विषाणूंवर संशोधन करून माणसाने त्यासाठी प्रतिबंधक लस तयार करून वेळोवेळी त्यांना आळा घातला आहे.या वेळी चीनने कडक प्रतिबंधक उपाययोजना केली आहे त्यामुळे या व्हायरसचा परिणाम लवकरच निवळेल. याचा शॉर्ट टर्ममध्ये मात्र परिणाम होईलच. अजूनही ब्रेक्झिट हा ग्लोबल इव्हेंट ३१ जानेवारी २०२० रोजी आपला प्रभाव मार्केटवर दाखवेल.

सरकारने पुन्हा एअरइंडिया ही तोट्यात चालणारी कंपनी विक्रीस काढली आहे. यासाठी बोली १७ मार्चपर्यंत मागवल्या आहेत. यासाठी काही अटी सोप्या केल्या आहेत. एअरलाईन खरेदी करणाऱ्या कंपनीकडेच व्यवस्थापन सोपवले जाईल. या बरोबरच सरकार आपला AIRSAT मधील ५०% स्टेक विकणार आहे.

सरकार पॉवर डिस्ट्रिब्युशन करणाऱ्या कंपन्यांसाठी ( DISCOM) एक नवीन योजना बनवत आहे.

सरकार फर्टिलायझरमध्ये वापरण्यात येणाऱ्या कच्या मालात सूट देण्याची शक्यता आहे.

सरकार गृहकर्जाचे मुद्दल आणि त्यावरील व्याज यासाठी आयकरामध्ये असलेली सूट वाढवण्याची शक्यता आहे.
सिमेन्स ही C & S इलेक्ट्रीक हि कंपनी Rs २१०० कोटींना घेणार आहे.

ICICI बँक, DCB बँक, HDFC, इंडिगो, नवीन फ्ल्युओरीन, APL अपोलो ट्यूब्स, प्रेस्टिज इस्टेटस, EIH,DR रेड्डीज, WOCKHARDT, आयन एक्स्चेंज, TCI एक्स्प्रेस, टॉरेन्ट फार्मा या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
महिंद्रा लाईफ, बँक ऑफ बरोडा,DCM श्रीराम, या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.

एक्सेल कॉर्प आणि सुमिमोटो केमिकल्स यांच्या मर्जरमधून निर्माण झालेल्या कंपनीचे Rs १९५ वर लिस्टिंग झाले.
अल्टो BSVI ची CNG व्हेरिएन्ट Rs ४.३२ लाख किमतीला लाँच केले.

ITI कंपनीच्या FPO चे लिस्टिंग ५ फेब्रुवारी २०२० ला होईल.

गॉडफ्रे फिलिप्समधील हिस्सेदारी विकली जाईल. व्यवस्थापनही बदलले जाईल. अशी बातमी असल्यामुळे शेअरमध्ये तेजी होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४११५५, NSE निर्देशांक निफ्टी १२११९ बँक निफ्टी ३०८३७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २१ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २१ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६४.५१ प्रती बॅरल ते US $ ६४.६६ प्रती ब्रेलया दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१५ ते US $१=Rs ७१.२२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२५ होता तर VIX १५.६० होते.

USA आणि फ्रांस यांच्यातील करार शांतपणे झाला. चीनने बरेच मार्केट ओपन केले. पण बगदादमध्ये अमेरिकेच्या वकिलातीजवळ चार बॉम्ब पडले. त्यामुळे मध्यपूर्वेतील वातावरण पूर्णतः निवळले नाही असे वाटते
ओबेराय रिअल्टीज आणि USA मधील एक फंड मिळून संयुक्तरित्या लवासासाठी बीड करणार आहेत. याचा फायदा HCC ला होईल.

कॅन फिन होम्स, जस्ट डायल, ICICI प्रु, ग्रॅनुअल्स, न्यू जेन सॉफ्टवेअर, कामत हॉटेल INDAG रबर सास्केन कम्युनिकेशन या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

NBCC ला Rs ७२० कोटींची ऑर्डर झारखंड राज्यात मिळाली.

IRFC ने Rs १४१ कोटींच्या IPO साठी अर्ज केला. या IPO तुन सरकार त्यांच्या मालकीची ४६.९० कोटी शेअर्स विकेल.
फेरो क्रोम आणि फेरो ऍलॉईज यांच्या किमती ३०% नी कमी झाल्या आहेत. याचा फायदा AIA इंजिनिअर्सना होईल.

ग्रॅनुअल्स हि कंपनी १.२५ कोटी शेअर्सचा Rs २०० प्रति शेअर या भावाने टेंडर ऑफर पद्धतीने बायबॅक करेल. यासाठी Rs २५० कोटी खर्च करेल.

डिश टी व्ही चे एअरटेल डिजिटल बरोबर मर्जर होणार होते ते स्थगित झाले.

AGR ड्यूजच्या बाबतीत एअरटेल आणि वोडाआयडिया यांनी केलेल्या अर्जाचा विचार पुढच्या आठवडयात होईल असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.

सुवेंन लाईफ सायसेन्सने त्यांचा CRAM बिझिनेस डीमर्ज केला. आज एक्सडेट होती.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१३२३ NSE निर्देशांक निफ्टी १२१६९ बँक निफ्टी ३०९४७ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २० जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २० जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६५.३१ प्रती बॅरल ते US $ ६५.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०८ ते US $१=Rs ७१.१३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.६४ तर VIX १४ होते.

लिबियामध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. २ ऑइल फिल्ड्स मधील उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे क्रुडमध्ये तेजी आली.

HUL ने आपल्या काही उत्पादनाच्या किमतीत बदल केले. छोट्या शाम्पूच्या युनिटची किंमत १३.३% ने कमी केली. शाम्पूच्या मोठ्या युनिटची किंमत ४.७% ने वाढवल्या.किसान जामची किंमत ३.३% नं वाढवली.

डिसेंबर २०१९ मध्ये हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या २.६% ने वाढून १.३० कोटी झाली. इंडिगोचा मार्केटशेअर कायम राहिला तर स्पाईस जेट च्या मार्केट शेअर मध्ये १०% वाढ झाली.

सरकारने २३ जानेवारी २०२० पासून CPSE ETF मधून IOC आणि PFC या कंपन्यांचे शेअर्स वगळून कोची शिपयार्ड, NHPC, NMDC, पॉवर ग्रीड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश करण्याचे ठरवले आहे . यामुळे पॉवर ग्रीडमध्ये Rs २१०० कोटी कोची शिपयार्डमध्ये Rs ७५ कोटी NMDC मध्ये Rs ५९० कोटी ,आणी NHPC Rs ३०० कोटी एवढी खरेदी होईल. आणि IOC मध्ये Rs १९७० कोटी आणि PFC मध्ये Rs ८४० कोटींची विक्री होईल. पूर्वी ज्या कंपन्यांमध्ये सरकारचा स्टेक ५१.५% असेल त्यांचा समावेश CPSEITF मध्ये होत होता. पण आता ५१% सरकारचा स्टेक असलेल्या कंपन्यांचा समावेश CPSEITF मध्ये होईल. त्यामुळे हा बदल करण्यात येईल.

कोटक महिंद्रा बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल आला. प्रॉफिट Rs १५९६ कोटी, NPA मध्ये मामुली वाढ झाली. GNPA २.४६% तर NNPA ०.८९% होते. NIM ४.६९% होते. स्लीपेजिस Rs १०६२ कोटी होते. लोन ग्रोथ १०% होती. NII रस ३४३० कोटी होती. लोन ग्रोथमधील कमी वाढ आणि स्लीपेजिसमुळे मार्केटला हे निकाल तितकेसे पसंद पडले नाहीत. त्यामुळे शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले.

बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक टर्नराउंड झाली. बँकेला तिसऱ्या तिमाहीत Rs १४० कोटींचा नफा झाला. GNPA आणि NNPA मध्ये मामूली सुधारणा झाली. NII Rs ११८६ कोटी होते. प्रोव्हिजन Rs ९२० कोटी केली.
फेडरल बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. प्रॉफिट Rs ४४१ कोटी, NII Rs ११५५ कोटी तर स्लीपेजिस Rs १९३ कोटींवरून Rs ३२१ कोटी झाली.( YOY). GNPA अणे NNPA मध्ये मामूली सुधारणा झाली.

KEI इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ICICI सिक्युरिटीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट ३६% ने वाढून Rs १३७ कोटी झाले.
मार्केट आता भविष्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लोन ग्रोथ, फ्रेश स्लिपेजिस, आणि टेलिकॉम सेक्टरला असलेले बँकेचे एक्स्पोजर आणि कमर्शियल व्हेईकल पोर्टफोलिओमधील WEAKNESS याकडे मार्केटने जास्त लक्ष दिले. त्याचमुळे श्रीराम ट्रान्सपोर्टचा शेअर पडला.

ITI या सरकारी कंपनीचा Rs १६०० कोटींचा फॉलोऑन पब्लिक इशू शुक्रवार २४ जानेवारी २०२० पासून ओपन होऊन २८ जानेवारी २०२०पर्यंत ओपन राहील. ह्या इशूत QIB ना ७५% नॉन इन्स्टिट्यूशनल बिडर्ससाठी १५% आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी १०% आरक्षण असेल.

JSPL, हिंदुस्थान झिंक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल साधारण आले.

महाराष्ट्र राज्य सरकारनी हॉटेल्स, मॉल्स, दुकाने २४X ७ उघडी ठेवायला परवानगी दिली. यामुळे पर्यटनाला उत्तेजन मिळेल असा राज्य सरकारचा होरा आहे. या निर्णयाचा फायदा वेस्टलाइफ, ज्युबिलण्ट फूड्स, ट्रेन्ट, GRAUER & WEIL , हॉटेल्स, D -मार्ट, फ्युचर ग्रुप यांना होईल.

आज भारती एअरटेलच्या QIP इशूचा लॉक-इन पिरियड संपला. पण शेअरमध्ये विक्री झाली नाही. त्याउलट भारती एअरटेलच्या शेअरमध्ये खरेदी झाली.

MOIL मधील ६.४% आपला स्टेक विकणार आहे.

आता थोडे तांत्रिक विश्लेषणाविषयी

आज मार्केट उघडल्याबरोबर निफ्टी १२४३० हा ऑल टा

इम हायचा पाईंट मार्केटने गाठला. त्यानंतर मात्र दिवसभर मार्केट्मध्ये मंदी होती. ही मंदीची कँडल गेल्या आठवड्यातील सर्व तेजीच्या कँडल्सना एनगल्फ ( झाकून टाकणारी) होती. म्हणूनच बेअरिश एनगलफिंग पॅटर्न डेली आणि साप्ताहिक चार्टवर तयार झाला. त्याचप्रमाणे बेअरिश मारूबोझू पॅटर्न तयार झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१५२८ NSE निर्देशांक निफ्टी १२२२४ बँक निफ्टी ३१०८० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६४.५८ प्रती बॅरल ते US $ ६५.०२ प्रती बॅरल या दरम्यान तर US $१= Rs ७०.९६ ते US $ १=Rs ७१.०७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३२ तर VIX १२.२० होता.

सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांनी AGR ड्यूज विषयी दाखल केलेली याचिका रद्द केली. त्यामुळे आता भारती एअरटेलला Rs ३५५०० कोटी तर वोडाफोन आयडियाला Rs ५३००० कोटी तर टाटा टेलीला Rs १३००० कोटी AGR ड्यूज भरावे लागतील. हे पैसे भरण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२० आहे. याचा परिणाम या कंपन्यांवर झालाच पण टेलिकॉम क्षेत्राला ज्या बँकांनी कर्ज दिली आहेत त्यांच्या शेअर्समध्येही मंदी आली. टेलिकॉम क्षेत्राला बँकिंग सिस्टीमचे Rs १.३० लाख कोटी एक्स्पोजर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया Rs ३७३३० कोटी, HDFC बँक Rs २४५१४ कोटी, ऍक्सिस बँक Rs.१४०१५ कोटी, BOB Rs १३९५५ कोटी, PNB Rs ७३१८ कोटी. या बरोबरच इंडसइंड बँक, IDFC १ST बँक, येस बँकेचे ही एक्स्पोजर आहे. भारती एअरटेलने ही रक्कम देण्यासाठी QIP इशू द्वारे पैसे उभे केले. वोडाफोन आयडियापुढे मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय इंफ्राटेलच्य उत्पन्नावर या समस्येमुळे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण या कंपनीचे उत्पन्न मुख्यतः टॉवर रेंटमधून येते.

जयश्री टी या कंपनीने पूर्व आफ्रिकेमधील २ चहाचे मळे Rs ७० कोटींना बेल्जीयन कंपनीला विकले. हे डील १४ फेब्रुवारी पर्यंत पुरे होईल.

श्री कलाहस्ती पाईपच्या ९ MVA फेरो ऍलॉईज युनिट मध्ये काम सुरु झाले .

आता विनती ऑर्गनिक्स या कंपनीविषयी. ही केमिकल क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी आहे. ही DEBT फ्री कंपनी आहे. प्रमोटर्सचा स्टेक ७५% आहे. EPS Rs ७५ ते Rs ८० आहे. ATBS आणि IBB मध्ये काम करते. ATBS उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. ब्यूटाईल फेनॉल चा प्लांट सुरु करत आहे. ही कंपनी आपल्या शेअर्सचे २:१ या प्रमाणात स्प्लिट करणार आहे . ६ फेब्रुवारी २०२० ही या स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट आहे ( शेअर स्प्लिट या आणि इतर कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे.)

अंदाजपत्रकात सरकार जवळजवळ २५० आयात उत्पादनांवर इम्पोर्ट ड्युटी लावून भारतीय उद्योगांना संरक्षण देण्याची शक्यता आहे. यात पेपर, टायर्स, केमिकल्स, सोलर सेल्स मोड्यूल्स यांचा समावेश असण्याची शक्यता आहे त्यामुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती.

DFM फूड्स या कंपनीच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेला २४.७५% स्टेक (शेअर्स) सोडवले. JSW स्टील या कंपनीच्या प्रमोटर्सनी तारण म्हणून ठेवलेले ६० लाख शेअर्स सोडवले.

सोलर ऍक्टिव्ह फार्मा बरोबरच्या स्ट्राइड्स केमिकल्सच्या मर्जरला NCLT ने मंजुरी दिली.

सेबीने आज कमोडिटीजमध्ये ऑप्शन ट्रेड करायला परवानगी दिली.

पिरामल इंटरप्रायझेसने आपला हेल्थकेअर ( इन्साईट्स आणि अनॅलिटीक्स) बिझिनेस CLAIVATE या कंपनीला Rs ७००० कोटींना विकला.

कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येत आहेत –

हैथवे, डेन नेट्वर्कस, TV १८ ब्रॉडकास्टींग, रॅलीज इंडिया, L &T टेक्नॉलॉजी यांचे निकाल चांगले आले.
HCL टेकचे उत्पन्न १५.५५ ने वाढून Rs १८१४० कोटी, प्रॉफिट १६.३१% नी वाढून Rs ३०३७ कोटी, मार्जिन २०.२% राहिले. या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट २७ जानेवारी २०२० आहे.

TCS चे तिसऱ्या तिमाहीचे उत्पन्न Rs ३९८५४ कोटी, प्रॉफिट Rs ८११८ कोटी,मार्जिन २५% होते. ऍट्रिशन रेट १२.२% होता. कंपनीचा कॅश फ्लो रेकॉर्ड स्तरावर होता.मार्जिन २५% होते. कंपनीने Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. निकाल चांगला होता.

ICICI लोम्बार्ड या कंपनीच्या प्रीमियम उत्पन्नात, प्रॉफीटमध्ये चांगली वाढ झाली. निकाल चांगले आले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिसर्या तिमाहीचे निकाल आले. फायदा १३.५% ने वाढून Rs ११६४० कोटी झाला. उत्पन्न २.४% वाढून Rs १.५३ लाख कोटी होते.

रिलायन्स JIO च्या ग्राहकांची संख्या ३६ कोटींवर गेली. ARPU Rs १२८.४ होता. जिओचे EBITDA मार्जिन ४०.१% राहिले रिलायन्स रिटेलचा निकाल चांगला आला. १७.६कोटी ग्राहकांनी रिलायन्स रिटेलला प्रतिसाद दिला. रिलायंसचा पेटकेमचे निकाल सर्वसाधारण राहिले. GRM US $ ९.२/BBL राहिले.

BSE निर्देशांक सेंसेक्स ४१९४५ NSE निर्देशांक निफ्टी १२३५२ बँक निफ्टी ३१५९० वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १६ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १६ जानेवारी २०२०

आज क्रूड US $ ६४.१८ प्रति बॅरल ते US $ ६४.५२ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.७७ ते US $१= ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२० होता आणि VIX १३.२० होते.

चीन आणि USA यांच्यात ऐतिहासिक ट्रेड अग्रीमेंट झाले. चीन आयात वस्तूंबरोबर त्यांच्या तंत्रज्ञानासाठी अमेरिकन कंपन्यांवर दबाव आणणार नाही. USA चीनकडून जास्त शेतमाल आयात करेल. पूर्वी USA ज्या पद्धतीने टॅरीफ लावत असे ,त्या पद्धतीने चीन आपल्या युआन या त्यांच्या चलनात बदल करत असे त्यामुळे टॅरीफ लावण्याचा उद्देश साध्य होत नव्हता पण आता या करारानुसार चीन चलनाच्या विनिमय दरात कृत्रिमरित्या बदल करणार नाही.

सरकार BEML मधील प्रथम २८% स्टेक विकणार होते पण आता पूर्ण स्टेक विकण्याचा विचार करत आहे.परिणामी ओपन ऑफर आणावी लागेल. सरकारची ५४% हिस्सेदारी आहे.

सरकार ITDC मध्ये सुद्धा डायव्हेस्टमेन्ट करणार आहे. NBCC प्रगती मैदानात मोठे हॉटेल बांधणार आहे. हे हॉटेल ITDC ला चालवायला दिले जाईल.

सरकारी कंपन्यांकडे लक्ष द्या. BEML ही संरक्षण क्षेत्रातील कंपनी असल्याने या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांकडे लक्ष द्या. उदा BEL, अँड्रयू यूल, ITI, भारत डायनामिक्स, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, STC, SCI, काँकॉर, तसेच सरकारी कंपन्यांकडे सरकारने Rs १९००० कोटी लाभांशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे वरील कंपन्यांबरोबर SJVN, NHPC, EIL, NMDC या कंपन्यांकडेही लक्ष ठेवावे.

येत्या अंदाजपत्रकात ‘स्वच्छ भारत’ योजनेवर भर असेल.सॉलिड WASTE आणि लिक्विड WASTE यासंबंधात सरकार योजना बनवत आहे. नद्यांमधील गाळ काढणे इत्यादी, त्यामुळे वॉटर ट्रीटमेंट करणाऱ्या, कचरा रिसायकल व्यवस्थापन करणाऱ्या, सिविल इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. यात ION एक्स्चेंज, सिमेन्स, ABB, VHA टेक वा बाग , ड्रेजिंग कॉर्पोरेशन, व्होल्टास यांचा समावेश असेल.

अंदाजपत्रकात LTCG, DDT या करांमध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे.

येस बँकेने सिकल लॉजिस्टिक या कंपनीमधील तारण म्हणून ठेवलेले ६० लाख शेअर्स (१०.५%) ACQUIRE केले.
NINL ( नीलांचल इस्पात निगम) मधील आपला १००% स्टेक विकण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या सल्लागारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया वेगात सुरु केली. २४ जानेवारी २०२० रोजी १ वाजेपर्यंत बीड स्वीकारण्यात येतील. आणि या बीड दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यात येतील.

GMR इन्फ्रा आपला एअरपोर्ट बिझिनेसमधील ४९% स्टेक विकणार आहे. टाटा कॉन्सॉरशियम आणि सिंगापूर कॉन्सोर्शियम हा स्टेक विकत घेणार आहेत.

गोव्यामधील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामावरील स्टे सुप्रीम कोटाने उठवला. काही जादा अटींवर बांधकाम सुरु ठेवण्यास परवानगी दिली. याचा फायदा GMR इन्फ्रा आनि डेल्टा कॉर्प यांना होईल.

ग्रॅन्युअल्स कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बाय बॅक ऑफ शेअर्सवर विचार करण्यासाठी २१ जानेवारी २०२० रोजी बैठक बोलावली आहे.

अंदाजपत्रकाच्या आधी सरकार स्क्रॅपेज पॉलिसी अमलात आणण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस ट्रेडिंग हब बनवण्यासाठी एक प्रस्ताव मंत्रिमंडळाला पाठवला आहे. मागणीनुसार गॅस विकण्याची दिली सवलत जाईल. त्यामुळे बर्याच सेक्टरना स्वस्त गॅस उपलब्ध होईल.

गेल आपला पाईपलाईन बिझिनेस वेगळा काढणार आहे. यासाठी एक वेगळी सबसिडीअरी बनवली जाईल.
IOC ने सांगितले की काही ऍसेट्स विकण्याचा कंपनी विचार करत आहे.

WOCKHARDT च्या त्वचा रोगांवरील दोन अँटिबायोटिक्सना भारतात परवानगी मिळाली. गोव्यामध्ये आयर्न ओअर मायनिंग विरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने खारीज केली. याचा फायदा वेदांताला होईल.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात गोणीमागे Rs २५ दर वाढवण्याचा निर्णय, सिमेंटला मागणी नसल्यामुळे , सिमेन्ट उत्पादक कंपन्यांनी पुढे ढकलला.

अंदाजपत्रकाच्या आधी सरकारचा कर्ज वाढवण्याचा विचार नाही. जरूर पडली तर अंदाजपत्रक सादर केल्यानंतर सरकार नवीन कर्ज घेण्याचा विचार करू शकेल.

अंदाजपत्रकात बँक रिकॅपिटलायझेशनसाठी Rs १०००० कोटींची तरतूद करणार आहे. वित्तीय वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या बँक मर्जरसाठी हे जरुरी आहे.

आज निफ्टीमध्ये स्पिनिंग टॉप/डोजी कँडल स्टिक पॅटर्न तयार झाला हा पॅटर्न पुढील ट्रेंडविषयी अनिश्चितता दर्शवतो. नेमके हेच आज दिवसभर घडले. प्राईस एक्शन इंडेक्समध्ये अगदीच थोडी होती. निफ्टी १२३८९ चा हाय आणि १२३१५ चा लो पाईंट होता. १२३५५ ला मार्केट क्लोज झाले इंट्राडेमध्ये मार्केट निगेटिव्हसुद्धा झाले होते. पुढील ट्रेंड समजेपर्यंत लॉन्ग पोझिशन घेणे हिताचे ठरणार नाही. त्याचप्रमाणे शॉर्ट पोझिशन घेणेही योग्य नव्हे. ट्रेंलिंग स्टॉपलॉसचा वापर करून पोझिशन होल्ड करता येईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१९३२ NSE निर्देशांक निफ्टी १२३५५ बँक निफ्टी ३१८५३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

आज US $ ६४.३० प्रती बॅरल ते US $ ६४.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८६ ते US $१=Rs ७०.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३४ होता तर VIX १३.९१ होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड डील फेज १ वर आज सह्या होतील. ह्या अग्रीमेंटचा सध्या लावलेल्या टॅरिफवर परिणाम होणार नाही असे USA ने जाहीर केले.

लेमन ट्री हॉटेल्सने ऋषिकेश येथे ६५ रूमचे हॉटेल सुरु केले.

भारती एअरटेलच्या QIP इशूची किंमत Rs ४४५ प्रती शेअर निश्चित केली आहे. या इशूद्वारे कंपनीने Rs १४४०० कोटी उभारले.

येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ७ फेब्रुवारी २०२० रोजी ऑथोराइझ्ड कॅपिटलमध्ये वाढ करण्यासाठी बोलावली आहे. येस बँकेने रोसा पॉवरचे तारण म्हणून ठेवलेले २७.९७ % शेअर्स विकले. येस बँक F & O बॅनमधून बाहेर आली.

ऑइल PSU कडून सरकारने Rs १९००० कोटी लाभांशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. यात IOC ने मात्र आमचे प्रॉफिट कमी झाले आहे तर गेलने आपल्याला विस्तार करण्यासाठी पैश्याची जरुरी असल्यामुळे अधिक कर्ज काढावे लागेल असे सांगितले.

‘क्रेडिट सुईस’ चा रिपोर्ट आला. त्यांनी गॅस शेअर्सवर भर दिला. त्यामुळे गॅस वितरक आणि गॅस उत्पादक (गेल आणि पेट्रोनेट LNG) करणाऱ्याकंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. याचा फायदा गुजरात गॅस, महानगर गॅस, इंद्रप्रस्थ गॅस, अडानी गॅस या कंपन्यांना होईल.

PNGRB ने सांगितले की तुम्ही सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बीड करत असाल तर LNG साठीही बीड करावे लागेल गॅस सगळ्यांना पुरवायचा असेल तर पाइप्सची मागणी वाढेल. याचा फायदा जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस पाईप्स, मान इंडस्ट्रीज, वेलस्पन कॉर्प या पाईप पुरवणाऱ्या कंपन्यांना होईल. निती आयोगाने सांगितले की नैसर्गिक गॅस साठवता येत नाही. नैसर्गिक वायूचा पुरवठा भरपूर आहे त्यामुळे किंमत वाढत नाही पण मागणी भरपूर आहे. गॅसबेस्ड खतांच्या प्लान्टकडून नैसर्गिक गॅसला भरपूर मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गॅसच्या किमती कमी होत आहेत.
इंडसइंड बँकेने कर्ज दिलेली एक हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि एक ट्रॅव्हल कंपनी यांच्यात फ्रॉड झाला असे जाहीर केले.

सुंदरम फायनान्स इक्विफॅक्स मधील पूर्ण स्टेक Rs ६७.४३ प्रती शेअर या दराने विकेल.

L & T इन्फोटेक या कंपनीचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ऍव्हेन्यू सुपरमार्केट पुढल्या महिन्यात Rs ६२०० कोटींचा QIP आणणार आहे. हा QIP प्रमोटर्सचा स्टेक ७५% पेक्षा कमी करण्यासाठी आणण्यात येत आहे

इंडिया बुल्स व्हेंचरचा टेंडर ऑफर पद्धतीने शेअर बाय बॅक सुरु झाला.

NBFC चा लिक्विडीटीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत्या अंदाजपत्रकात SPV ( स्पेशल पर्पज व्हेईकल) च्या धर्तीवर एंटीटी स्थापन करेल. यामध्ये आपल्याकडील SUUTI मधील Rs ३३००० कोटी व्हॅल्यूच्या शेअर्सची गुंतवणूक करेल. ही SPV आपल्या गुंतवणुकीच्या तिप्पट कर्ज उभारेल. म्हणजे Rs १००००० कोटी सिस्टिममध्ये आणले जातील. यातून NBFC ना लोन दिले जाईल. कोणत्या NBFC ना कर्ज द्यायचे हे RBI ठरवेल.

आजपासून सोन्याचे १४ कॅरेट, १८ कॅरेट, २२ कॅरेट या तीन प्रकारात हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आपल्याकडील सोन्याच्या स्टॉकचे हॉलमार्किंग करण्यासाठी ज्युवेलर्सना एक वर्षांची मुदत दिली आहे.सरकार ८९२ ASSAYING आणि हॉल मार्किंग केंद्र सुरु करतील.

CSB बँकेला नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी मिळाली.

कॅनरा बँकेने जाहीर केले की आता कॅनरा बँक त्यांच्या ‘कॅन फिन होम्स’ या सब्सिडीयरीतील स्टेक विकणार नाही.
BSE आता ब्रेन्ट क्रूड ऑइल मध्ये F & O कॉन्ट्रॅक्ट लाँच करणार आहे.

दोन तीन दिवस CDSL चा शेअर वाढत आहे. येणाऱ्या २० IPO मुळे डिमॅट अकौन्ट वाढतील आणि CDSL चे उत्पन्न वाढेल.

आज निफ्टी १२३४३ वर ड्रॅगनफ्लाय डोजी हा कँडलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला. हा POTENTIAL REVERSAL दर्शवतो म्हणजेच आधी तेजी असेल तर मंदी आणि आधी मंदी असेल तर तेजी होते. हाय, ओपन आणि क्लोज प्राईस साधारणतः सारखी असते. लॉन्ग लोअर शॅडो असते.आज असेच घडले. हाय पाईंटला मार्केट उघडले नंतर जवळ जवळ ३०० पाईंट्स मार्केट पडले. पण बुल रन असल्यामुळे साईडलाईनला असलेल्या बायर्सनी खरेदी केली आणि दिवस अखेर पुन्हा मार्केट पूर्ववत झाले. उद्याच्या (गुरुवारच्या) कॅण्डलवरून ट्रेण्ड रिव्हर्सल होणार कां याचे कन्फर्मेशन मिळेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१८७२ NSE निर्देशांक निफ्टी १२३४३ बँक निफ्टी ३१८२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०२०

आज US $ ६४.३० प्रती बॅरल ते US $ ६४.४२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८६ ते US $१=Rs ७०.९९ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३४ होता तर VIX १३.९१ होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड डील फेज १ वर आज सह्या होतील. ह्या अग्रीमेंटचा सध्या लावलेल्या टॅरिफवर परिणाम होणार नाही असे USA ने जाहीर केले.

लेमन ट्री हॉटेल्सने ऋषिकेश येथे ६५ रूमचे हॉटेल सुरु केले.

भारती एअरटेलच्या QIP इशूची किंमत Rs ४४५ प्रती शेअर निश्चित केली आहे. या इशूद्वारे कंपनीने Rs १४४०० कोटी उभारले.

येस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ७ फेब्रुवारी २०२० रोजी ऑथोराइझ्ड कॅपिटलमध्ये वाढ करण्यासाठी बोलावली आहे. येस बँकेने रोसा पॉवरचे तारण म्हणून ठेवलेले २७.९७ % शेअर्स विकले. येस बँक F & O बॅनमधून बाहेर आली.

ऑइल PSU कडून सरकारने Rs १९००० कोटी लाभांशाची अपेक्षा व्यक्त केली आहे. यात IOC ने मात्र आमचे प्रॉफिट कमी झाले आहे तर गेलने आपल्याला विस्तार करण्यासाठी पैश्याची जरुरी असल्यामुळे अधिक कर्ज काढावे लागेल असे सांगितले.

‘क्रेडिट सुईस’ चा रिपोर्ट आला. त्यांनी गॅस शेअर्सवर भर दिला. त्यामुळे गॅस वितरक आणि गॅस उत्पादक (गेल आणि पेट्रोनेट LNG) करणाऱ्याकंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. याचा फायदा गुजरात गॅस, महानगर गॅस, इंद्रप्रस्थ गॅस, अडानी गॅस या कंपन्यांना होईल.

PNGRB ने सांगितले की तुम्ही सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनसाठी बीड करत असाल तर LNG साठीही बीड करावे लागेल गॅस सगळ्यांना पुरवायचा असेल तर पाइप्सची मागणी वाढेल. याचा फायदा जिंदाल SAW, महाराष्ट्र सीमलेस पाईप्स, मान इंडस्ट्रीज, वेलस्पन कॉर्प या पाईप पुरवणाऱ्या कंपन्यांना होईल. निती आयोगाने सांगितले की नैसर्गिक गॅस साठवता येत नाही. नैसर्गिक वायूचा पुरवठा भरपूर आहे त्यामुळे किंमत वाढत नाही पण मागणी भरपूर आहे. गॅसबेस्ड खतांच्या प्लान्टकडून नैसर्गिक गॅसला भरपूर मागणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही गॅसच्या किमती कमी होत आहेत.
इंडसइंड बँकेने कर्ज दिलेली एक हाऊसिंग फायनान्स कंपनी आणि एक ट्रॅव्हल कंपनी यांच्यात फ्रॉड झाला असे जाहीर केले.

सुंदरम फायनान्स इक्विफॅक्स मधील पूर्ण स्टेक Rs ६७.४३ प्रती शेअर या दराने विकेल.

L & T इन्फोटेक या कंपनीचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

ऍव्हेन्यू सुपरमार्केट पुढल्या महिन्यात Rs ६२०० कोटींचा QIP आणणार आहे. हा QIP प्रमोटर्सचा स्टेक ७५% पेक्षा कमी करण्यासाठी आणण्यात येत आहे

इंडिया बुल्स व्हेंचरचा टेंडर ऑफर पद्धतीने शेअर बाय बॅक सुरु झाला.

NBFC चा लिक्विडीटीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत्या अंदाजपत्रकात SPV ( स्पेशल पर्पज व्हेईकल) च्या धर्तीवर एंटीटी स्थापन करेल. यामध्ये आपल्याकडील SUUTI मधील Rs ३३००० कोटी व्हॅल्यूच्या शेअर्सची गुंतवणूक करेल. ही SPV आपल्या गुंतवणुकीच्या तिप्पट कर्ज उभारेल. म्हणजे Rs १००००० कोटी सिस्टिममध्ये आणले जातील. यातून NBFC ना लोन दिले जाईल. कोणत्या NBFC ना कर्ज द्यायचे हे RBI ठरवेल.

आजपासून सोन्याचे १४ कॅरेट, १८ कॅरेट, २२ कॅरेट या तीन प्रकारात हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. आपल्याकडील सोन्याच्या स्टॉकचे हॉलमार्किंग करण्यासाठी ज्युवेलर्सना एक वर्षांची मुदत दिली आहे.सरकार ८९२ ASSAYING आणि हॉल मार्किंग केंद्र सुरु करतील.

CSB बँकेला नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी मिळाली.

कॅनरा बँकेने जाहीर केले की आता कॅनरा बँक त्यांच्या ‘कॅन फिन होम्स’ या सब्सिडीयरीतील स्टेक विकणार नाही.
BSE आता ब्रेन्ट क्रूड ऑइल मध्ये F & O कॉन्ट्रॅक्ट लाँच करणार आहे.

दोन तीन दिवस CDSL चा शेअर वाढत आहे. येणाऱ्या २० IPO मुळे डिमॅट अकौन्ट वाढतील आणि CDSL चे उत्पन्न वाढेल.

आज निफ्टी १२३४३ वर ड्रॅगनफ्लाय डोजी हा कँडलस्टिक पॅटर्न फॉर्म झाला. हा POTENTIAL REVERSAL दर्शवतो म्हणजेच आधी तेजी असेल तर मंदी आणि आधी मंदी असेल तर तेजी होते. हाय, ओपन आणि क्लोज प्राईस साधारणतः सारखी असते. लॉन्ग लोअर शॅडो असते.आज असेच घडले. हाय पाईंटला मार्केट उघडले नंतर जवळ जवळ ३०० पाईंट्स मार्केट पडले. पण बुल रन असल्यामुळे साईडलाईनला असलेल्या बायर्सनी खरेदी केली आणि दिवस अखेर पुन्हा मार्केट पूर्ववत झाले. उद्याच्या (गुरुवारच्या) कॅण्डलवरून ट्रेण्ड रिव्हर्सल होणार कां याचे कन्फर्मेशन मिळेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४१८७२ NSE निर्देशांक निफ्टी १२३४३ बँक निफ्टी ३१८२४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!