Tag Archives: market this week in marathi

आजचं मार्केट – ७ जुलै २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ७ जुलै २०२०

आज क्रूड $ ४२-६६ प्रती बॅरल ते US $ ४२.९१ प्रती बॅरल हा दरम्यान तर रुपया US $ १= ₹ ७४.६७/ते US $ १= ₹७४.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९७ VIX २५.२० आणि PCR १.६० होते. ही PCR ची अलर्ट लेव्हल आहे. आज USAचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ज्यांचे कलासेस ऑनलाइन सूरु आहेत अशा विद्यार्थ्याचे व्हिसा रद्द केले. जे लोक F-1 किंवा M-1 व्हिसावर USA मध्ये आहेत ते USA मध्ये राहू शकत नाहीत किंवा कायदेशीररित्या USA मध्ये येऊ शकत नाहीत. ज्या विद्यार्थ्याचे काही फिझिकल कलासेस शिल्लक आहेत ते राहू शकतील. फक्त ऑनलाइन कलासेसमध्ये शिकत असतील त्यांना व्हिसा मिळणार नाही. तुम्ही जर व्यक्तिशः मार्गदर्शन उपलब्ध असलेल्या शाळा/कॉलेजात प्रवेश घेतला तर USA चा व्हिसा मिळू शकतो.

श्रीराम ट्रान्सपोर्टचा राईट्स इशू जाहीर झाला. ह्या इशुमध्ये ₹५७० प्रती शेअर या भावाने ₹१५०० कोटी उभारले जातील. तुमच्याजवळ २६ शेअर्स असतील तर तुम्हाला ३ राईट्स शेअर मिळतील.

PVR ही कंपनी ₹ ७८४ प्रती शेअर्स या भावाने राईट्स इशू आणणार आहे. तुमच्याजवळ कंपनीचे ९४ शेअर्स असतील तर तुम्हाला ७ राईट्स शेअर्स मिळतील. ह्या इशुची १० जुलै २०२० ही रेकॉर्ड डेट असेल. हा राईट्स इशू १७ जुलै २०२० ला सुरू होऊन ३१ जुलै २०२० रोजी बंद होईल.

INEOS STYROLUTION ही कंपनी डीलिस्ट होणार आहे. ₹४८० इंडिकेटीव्ह प्राईस आहे. प्रमोटर्सकडे ७५% शेअर्स आहेत. २३ ऑगस्ट २०१९ ला मंजुरी मिळाली होती. ह्या कंपनीचे जर्मनीत हेड क्वार्टर असून कंपनी styrenics सप्लाय करते. ह्या कंपनीचा प्लांट बडोद्यापासून १६ किलोमीटर दूर आहे. थर्मोप्लॅस्टिकचे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, इंजिनीअरिंग,आणि विक्री ही कंपनी करते.

सुप्रीम कोर्टाने लॉकडाउनच्या काळात रद्द केलेल्या बुकिंगचे पूर्ण पैसे परत करण्याविषयी APAI (एअर पॅसेंजर असोसिएशन ऑफ इंडिया) ने केलेल्या अर्जाची सुनावणी करायला परवानगी दिली.

NBCC या कंपनीला मोठ्या जमिनीवर प्रोजेक्ट करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

चीनमधून आयात होणाऱ्या ३७० वस्तूंवर नियंत्रणे आणण्याचा/ ड्युटी लावण्याचा सरकार विचार करत आहे. चिनी वस्तू फक्त भारतातील काही बंदरातूनच आयात करायला परवानगी देण्यावरही विचार करत आहे.

बजाज फायनान्सच्या नवीन कर्जात ७१% घट तर deposits मध्ये ३५% घट झाली. बंधन बँकेच्या deposits मध्ये ३५% वाढ झाली तर ऍडव्हान्सेस मध्ये १७% वाढ झाली. बंधन बँकेच्या लो कॉस्ट deposits मध्ये वाढ झाली. CASA रेशीयो वाढला.

इक्विटास या कंपनीने सांगितले की जुलै -ऑगस्ट २०२० पासून लोक कर्जफेड करायला सुरुवात करतील. आम्हाला लिक्विडिटी आणि कॅपिटलसंबंधीत अडचणी नाहीत. आमची जून महिन्यातील डिसबर्समेंट चांगली आहे.

नजीकच्या भविष्यकाळात ३१ IPO येण्याची शक्यता आहे.यात UTI असेट्स मॅनेजमेंट,IRFC, बजाज एनर्जी यांचा समावेश असेल. येस बँकेचा FPO येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने हॉटेल्स आणि।रेस्टोरंट्स ओपन करायला परवानगी देण्याची या आठवडुआत शक्यता आहे असे सांगितल्यामुळे आज हॉटेलच्या शेअर्स मध्ये तेजी होती. उदा:- कामत हॉटेल्स,रॉयल orchids, इंडियन हॉटेल्स, ओरिएंट हॉटेल्स, स्पेशालिटी रेस्टोरंट्स.

ROSSARI बायोटेक हा IPO 13 जुुलैला ओपन होत आहे ही स्पेेेशालिटी केमिकल क्षेत्रातील कंपनी आहे. ही कंपनी होम आणि पर्सनल केअर,परफॉर्मन्स केमिकल्स, सोप्स,डिटर्जंट पेंट्स,इंक्स, पेपर,क्रीम, animal हेल्थ आणि न्यूट्रिशन या क्षेत्राशी संबंधित केमिकल्सचे उत्पादन करते.लाईफबॉय, vim, आणि comfort, यात हे केमिकल वापरतात ही कंपनी ₹५०० कोटींचा IPO आणत असून त्यात ₹१०० कोटींचा फ्रेश इशू आणि ₹१५० कोटींची OFS असेल. IPO तील शेअरची किंमत ₹४२५ च्या जवळपास असेल. ही कंपनी व्हिएतनाम, बांगला देश, मारीशस आणि भारत येथे कार्यरत आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६७४,NSE निर्देशांक निफ्टी १०७९९,Bank निफ्टी २२६२८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ जुलै २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ६ जुलै २०२०

आज क्रूड US $ ४२.८४ प्रती बॅरल ते US $ ४३.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १=₹ ७४.५२ ते US $१= ₹७४.७३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९० VIX २५.९९ PCR १.५४ होता. आज USA, एशियन मार्केटमध्ये तेजी होती. जरी कोविड 19 चे प्रमाण वाढत असले तरी ज्या अर्थव्यवस्था ओपन होत आहेत त्यांत होत असलेली सुधारणा उत्साहवर्धक आहे. मार्केटमध्ये लिक्विडीटीही भरपूर आहे.

HDFC बँकेची deposits FY२१ च्या पहिल्या तिमाहीत 24.५% वाढली तर advances मध्ये २१.५% वाढ दिसून आली. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी होती. फेडरल बँकेची deposits १६% वाढली. इंडसइंड बँकेची deposits ५.७% वाढली.

AMFI ने आज सहा महिन्यांसाठी एसकॉर्ट्स, ITI, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स या कंपन्यांना स्मॉल कॅप मधून midcap शेअर्समध्ये ट्रान्स्फर केले.

सरकार SEZ मधील कंपनीने भारतात विकलेल्या मालावर इम्पोर्ट ड्युटीमध्ये सवलत देण्याची शक्यता आहे. याचा फायदा पेस्टसाईड्स,फुटवेअर, फर्टिलायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होईल .

टेक महिंद्रा आणि ITI BSNL च्या ₹९००० कोटींच्या टेंडरसाठी संयुक्तरित्या बोली लावणार आहेत.यामुळे ITI च्या शेअरमध्ये खरेदी झाली.

ITC चा शेअर आजपासून एक्स डिव्हिडंड झाला.

प्रिसम जॉन्सन जनरल इन्शुअरन्समधील ५१% stake ₹ २९० कोटींना विकणार आहे.

ICICI बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची फंड रेजिंगवर विचार करण्यासाठी ८जुलै रोजी बैठक आहे तर श्रीराम ट्रान्स्पोर्टच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची फंड रेजिंगवर विचार करण्यासाठी ३१ जुलै २०२० रोजी बैठक आहे.

स्टील स्ट्रिप्स व्हील ला US Caravan traiver या कंपनीकडून ११९००० ची ऑर्डर मिळाली.ही ऑर्डर चेन्नई प्लांट ऑगस्टमध्ये पूर्ण केली जाईल.

पेट्रोन्स,मुबादला,ब्रूकफिल्ड,CDPQ,KKR, APG, ओमर्स या इन्व्हेस्टर्सनी टाटा पॉवरच्या In VIT मध्ये स्वारस्य दाखवले.

गेटवे डिस्ट्रिपार्कचा स्नोमॅन लॉजीस्टिक्समधील stake अडानी लॉजीस्टिक्सला विकण्यासंबंधीत आरबीट्रेशन गेटवे डीसट्रीपार्कने मागे घेतले.

कल्पतरु पॉवर त्यांचे alipurduar असेट्स अडानी ट्रान्समिशन ला ₹ १२८६ कोटींना विकणार आहे.

सरकारने DISCOM च्या outstanding संबंधित लिक्विडीटी पॅकेज ₹ ९०००० कोटींवरून ₹१.२५ लाख कोटीपर्यंत वाढवले. हे पॅकेज आता DISCOM च्या मे २०२० पर्यंत असलेल्या outstanding रकमेच्या पेमेंटसाठी वापरले जाईल.याचा फायदा PFCआणि REC या कंपन्याना होईल

सरकारने चीनमधून पॉवर इक्विपमेंट आयात करण्यावर बंदी घातली. याचा फायदा HPL इलेक्ट्रिक,HBL पॉवर सिस्टीम, इंडोटेक ट्रान्सफॉर्मेर्स,ITI, यांना होईल.

E clerks ही कंपनी ₹५५० प्रती शेअर या भावाने ₹ १०९५ मिलियनचे शेअर्स बायबॅक करेल

MCX ने गोल्ड मिनी ऑपशन्स लाँच केले.ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांसाठी काँट्रॅक्टस लाँच केली. या काँट्रॅक्टसची एक्सपायरी मंथली असेल. डिलिव्हरी घेण्यासाठी आणि देण्यासाठी उपयोगी आहे. कॉन्ट्रॅक्ट सोन्याच्या १०० ग्रामचे असेल.  सरकारने साखरेची MSP ₹३१ वरून ₹३३ एवढी वाढवली. साखरेची निर्यात ५५ लाख टन होण्याची शक्यता आहे.

JSW स्टीलने सांगितले की कंपनी आता रिफ्रेकटरीजची चीनमधून होणारी आयात बंद करू.ही आयात आता तुर्कस्थान आणि ब्राझीलमधून करू असे सांगितले.

बोडल केमिकलचा result चांगला आला तर Edelweiss फायनान्स ही फायद्यातून तोट्यात गेली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४८७ NSE निर्देशांक निफ्टी १०७६३ बँक निफ्टी २२१९८ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३ जुलै २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३ जुलै २०२०

आज क्रूड US $ ४२.४४ प्रति बॅरल ते US $ ४३.८० प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७४.६५ ते US $ १= ७४.९४ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.१८,VIX- २७.४० PCR-१.६१ होता. आज अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त तेथील मार्केट बंद होते.जुनचा जॉब डेटा चांगला आला. पण कोरोनाचा कहर वाढत आहे .१५ जुलैला opec ची बैठक आहे.

मदरसन सुमीने ग्रुप restructuring ची घोषणा केली. वायरिंग हारनेस बिझिनेस डीमर्ज केला जाईल आणि त्याचे लिस्टिंग केले जाईल.मदरसन सुमीच्या १ शेअरला डीमरजड कंपनीचा १ शेअर मिळेल. ह्या डीमर्जर नंतर मदरसनसुमीचे आणि संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचे मर्जर होईल.संवर्धन मदरसन इंटरनॅशनलच्या ₹१० दर्शनी किमतीच्या १० शेअर्स मागे मदर्सनसुमीचे ₹ १ दर्शनी किमतीचे ५१ शेअर्स मिळतील.

JB केमिकल्समध्ये KKR ५४% stake ₹ ७४५ प्रती शेअर या भावाने ४१.७ लाख शेअर्स ₹ ३१०० कोटींना खरेदी करेल.२६% stake साठी ओपन ऑफर आणली जाईल.जर ८०% शेअर्स मिळाले तर KKR ₹४६०० कोटींची गुंतवणूक करेल. या बातमीनंतर JB केमिकल्स ह्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली.

इंटेल या सेमीकंडक्टर क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये ₹ १८९४.५० कोटींना ०.३९% stake खरेदी केला.यासाठी इक्विटी व्हॅल्यू ₹४.९१ लाख कोटी तर एंटरप्राइज व्हॅल्यू ₹ ५.१६ लाख कोटी ठरवली आहे. या गुंतवणुकींनंतर जिओ प्लटफॉर्ममधील २५.१% stake ₹ ११७५८८ कोटींना विकला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने विडिओ कॉन्फरनसिंगच्या क्षेत्रात ‘जिओ मीट HD विडिओ अँप मार्केटमध्ये आणून प्रवेश केला ह्या अँपमध्ये १०० जण सहभागी होऊ शकतात. या अँपमध्ये २४ तासांच्या uninterupted फ्री कॉलची तरतूद आहे.

१५ ऑगस्ट २०२० पर्यंत भारत बायोटेक आणि ICMR याना कोरोनाची लस उपलब्ध होण्याची आशा आहे.कॅडीलाला या लसीच्या ह्युमन ट्रायल साठी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

३१ जुलै २०२० पासून HDFC लाईफ हा शेअर निफ्टी 50 मध्ये सामील होईल आणि वेदांता हा शेअर निफ्टी 50 मधून बाहेर पडेल.

मुथुट फायनान्स या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची १८ जुलै २०२० रोजी स्टॉक स्प्लिटवर विचार करण्यासाठी बैठक आहे.

PI इंडस्ट्रीजने ₹ १५३४.२४ या फ्लोअर प्राईसवर QIP इशू लाँच केला.

सरकार नवी पोर्टलॅंड मॅनेजमेंट पॉलिसी बनवणार आहे.रिकाम्या जमिनीसाठी पॉलिसी बनवणार आहे. ड्रेजिंगसंबंधित पॉलिसीसाठी वर्किंग ग्रुप सरकार बनवणार आहे. याचा फायदा कोची शिपयार्ड, गार्डन रिच ship बिल्डर, ड्रेजिंग कॉर्पोरेशन याना होईल.

संरक्षण मंत्रालयाने 12 सुखोई विमाने, 21 मिग-२९ विमाने, मिसाईल खरेदीसाठी ₹३८९०० कोटींची तरतुद केली.यापैकी ₹१०७३० कोटींची खरेदी HAL कडून केली जाईल. या बातमीनंतर BEL, BEML, वालचंदनगर इंडस्ट्रीज,भेल, Astra मायक्रो वेव्ह ,भारत डायनामिक्स,या संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये खरेदी झाली.

इंडस OS मध्ये ८% stake AFFLE ही कंपनी खरेदी करणार आहे.

चीन आणि पाकिस्तानातून पॉवर इक्विपमेंटआयात करण्यास सरकारने बंदी घातली आहे.ही equipment चीन आणि पाकिस्तानातून आयात होतात पॉवर इक्विपमेंट आयात करण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. याचा फायदा भेल आणि L&T ला होईल.

REC आणि PFC या कंपन्या पॉवर उत्पादन करणाऱ्या डोमेस्टिक कंपन्याना स्वस्त व्याज दरात कर्ज देणार आहेत.पॉवर उत्पादनात भारतात बनवल्या गेलेल्या इक्विपमेंट वापरण्यावर भर दिला जाईल.याचा फायदा KEC इंटरनॅशनल, BHEL, BGR एनर्जी,ABB, अडानी ट्रान्समिशन,थरमॅक्स, CG पॉवर,स्टरलाईट टेक्नॉलॉजी यांना होईल.

टी सी एस चे FY21 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल ९ जुलै येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स-३६०२१ NSE निर्देशांक निफ्टी-१०६०७ बँक निफ्टी-२१८५२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २ जुलै २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २ जुलै २०२०

आज क्रूड US $ ४१.९६ प्रति बॅरल ते US $ ४२.६२ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७४.९९ ते US $ १= ७५.५९ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.१५,VIX- २७.५० PCR-१.५३ होता. आज USA मधील मॅन्युफॅक्चरिंग डेटा चांगला आला. कोविड 19 साठी लस निर्माण होण्यात झालेली प्रगती यामुळे आज USA मधील मार्केट तेजीत होती. आपलेही मार्केट तेजीत उघडले.

फायझर या कंपनीच्या कोविड 19 वरील लसीच्या ट्रायलच्या पहिल्या फेजचे निकाल सकारात्मक आले. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास लस उपलब्ध होऊ शकेल अशी आशा उत्पन्न झाली.

ONGC, गेल, पेट्रोनेट LNG यांच्या पाईप गॅस टॅरीफचे सरकार रॅशनलायझेशन करणार आहे.

बजाज ऑटोचे विक्रीचे आकडे मंथ ऑन मंथ दुप्पट झाले,पण YOY ३१% कमी झाले. टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड या कंपन्यांची विक्री ७५% कमी झाली.

हायकोर्टाने सांगितले की IT विभागाने व्होडाफोनला ₹ ८३३ कोटी २ आठवड्यात परत करावेत. ही २०१४ मधील केस होती. याचा फायदा IDFC1st बँकेला होईल.

आज HDFC लाईफ आणि SBI लाईफ या कंपन्यांचे VNB(व्हॅल्यू ऑफ न्यू बिझिनेस) आणि परसिस्टंसी रेशीयो चांगले असल्यामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाली.

टाटा पॉवरने टाटा सन्सला प्रेफरनशीयल allotmemt दवारा ₹५३ प्रती शेअर या दराने ₹२६०० कोटी उभे केले.

एक्सिस बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ₹ १५००० कोटी उभारण्याची मंजुरी दिली.

आज सरकारने रेल्वेतील आपली मक्तेदारी अंशतः संपुष्टात आणण्याचे ठरवले. काही आगगाड्या खाजगी कंपन्यांना PPP तत्वावर चालवायला देण्याचे ठरवले .

सरकारने GST दरांत बदल करायचे ठरवले आहे. इन्व्हरटेड ड्युटी स्ट्रक्चर रद्द करायचे ठरवले आहे. तसेच १२% ते १८% या रेट मर्यादेत एकच रेट नक्की करायचे ठरवले आहे. रेल्वेचे खाजगीकरण आणि GST विषयी अधिक माहिती आजच्या व्हिडीओत दिली आहे।

कॉपर, अल्युमिनियम प्रॉडक्ट्स साठी इम्पोर्ट मॉनिटरिंग सिस्टीम बनवण्याचे ठरवले आहे. BSE निर्देशांक सेन्सेक्स -३५८४३ NSE निर्देशांक निफ्टी – १०५५१ बँक निफ्टी २१९५३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १ जुलै २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – १ जुलै २०२०

आज क्रूड US $ ४१.५४ प्रति बॅरल ते US $ ४२.६१प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.५० ते US $ १= ७५.६० दरम्यान,US $ निर्देशांक ९७.३४,VIX- २९.१३ PCR-१.१९होता। USA ची आर्थिक आकडेवारी म्हणजे डेटा चांगला आहे पण कोरोनाची काळजी संपत नाही

भारती एअरटेलच्या Nexta data सेन्टरमधील 25%stake 235मिलियन डॉलरला कार्लाइल खरेदी करणार आहे ७५% स्टेक भारतीकडे राहील.

JSPL त्यांच्या ओमान सबसिडीयरी मधला स्टेक १ बिलियन डॉलरला विकणार आहे त्यामुळे कर्ज २९००० कोटीपर्यंत राहील १००० कोटी व्याज कमी द्यावे लागेल balancesheet सुधारेल

इमामी इम्युनिटी सुधारणारी उत्पादने तयार करत आहेत (सॅनिटायझर आणि वॉशिंग प्रॉडक्ट) तयार करत आहे

एस्कॉर्टची विक्री २१.१% वाढली अपेक्षेपेक्षा चांगली झाली८९६० युनिटची अपेक्षा होती पण विक्री १०८५१ युनिट झाली

महिंद्राची ट्रॅक्टर विक्री १०% वाढली ती ३६५४४ युनिट झाली. Eicher मोटरची विक्री ७०.३०% कमी झाली ती १३५८ युनिट झाली. मारुतीची विक्री ५४% कमी झाली ती ५७४२८ युनिट झाली. हिरो मोटोच्या विक्रीत २६.९%घट झाली ४.५ लाख गाड्या विकल्या ही विक्री बहुतांशी ग्रामीण भागात आणि छोट्या शहरात झाली. जून २०२० मध्ये TVS मोटर्सची two व्हीलर्स ची विक्री १९१०७६ युनिट तर एकूण विक्री १९८३८७ युनिट्स होती

MSCI Rebalancing होणार होते L&T आणि कोटकचे वेटेज वाढवलं जाईल अशी मार्केटला बातमी होती पण हे पुढे ढकलले यामुळे दोन्ही शेअर मंदीत होते.

USA च्या DOJ (डिपार्टमेंट ऑफ जस्टीस) ने ग्लेनमार्क फार्मा USA असा आरोप केला की अपोटेक्स या कंपनीच्या सहाय्याने २०१३ ते २०१५ या कालावधीत काही जनरीक ड्रग्सच्या बाबतीत प्राईस फिक्सिंग केले. ग्लेनमार्क फार्माने स्पष्टीकरण दिले की US $२५ मिलियन देऊन आम्ही ही मॅटर क्लोज केली आहे. या बातमीनंतर ग्लेनमार्कचा शेअर पडला.

DR रेडीज बरोबर फुजिफिल्मने एविजेन या कोविद 19 वरील औषधासाठी करार केला.

जून २०२० मध्ये GST चे कलेक्शन ₹९०९१७ कोटी झाले. एप्रिल २०२० ते जून २०२० या तिमाहीत GST कलेक्शन ₹१.८५ लाख कोटी एवढे झाले.  PI इंडस्ट्री १८०० ते २००० कोटींचा qip आणणार आहे ही रक्कम कर्ज कमी करण्यासाठी किंवा आफ्रिकेत कंपनी खरेदी करण्यासाठी वापरणार आहेत. सरकारी योजनांना स्पेशल liquidity देण्यासाठी सरकार नियम करत आहे हे नियम HFC, NBFC, आणि मायक्रो फायनान्स कंपन्याना लागू होतील.या बातमीचा अंदाज मार्केटला होता त्यामुळेच HDFC, IBHF,LIC हौसिंग,GIC हौसिंग,बँकांचे शेअर तेजीत होते

लिंकन पेन,मयूर uniquoters, दीपक फर्टिलायझर्स, U flex, न्यू इंडीया इन्शुअरन्स या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

BSEनिर्देशांक सेन्सेक्स -३५४१४ NSE निर्देशांक निफ्टी-१०४३० बँक निफ्टी-२१९७७ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ३० जून २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – ३० जून २०२०

आज क्रूड US $ ४१.६प्रति बॅरल ते US $ ४१.५७ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.५० ते US $ १= ७५.५८ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.४४,VIX- २८.९१ PCR-१.३० होता. USA मध्ये होम सेल्सचे आकडे चांगले आले.त्यामुळे USA मधील मार्केट तेजीत होती. युरोपियन आणि एशियन मार्केटही तेजीत होती. त्यामुळे आपलीही मार्केट तेजीत ओपन झाली. पण दिवसभरात ही तेजी टिकली नाही.

सरकारने चीनच्या ५९ apps वर बंदी घातली.

क्सिस बँक , टाटा पॉवर या कपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची फंड रेझिंगवर विचार करण्यासाठी २जुलै २०२० रोजी बैठक आहे.

सरकारने अनलॉक 2 ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.

पेरू आणि चिली या देशातून होणाऱ्या पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे आणि चीनची इंडस्ट्री ओपन झाल्यामुळे मेटलसाठी मागणी वाढली आहे. स्टीलचे भाव वाढले टाटा स्टील च्या युरोप business मध्ये सुधारणा झाली त्यामुळे टाटा स्टीलचा शेअर तेजीत होता

NMDC ने आयर्न ओअरच्या किमती ₹२०० प्रती टन वाढवल्या

भारत डायनामिक्स,BEL, इंगरसोल रँड, वेलस्पन इंडिया टाटा स्टील यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. (७)SJVN, नोसिल, पेट्रोनेट LNG, यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

GIC हौसिंग,रेमंड, फोर्स मोटर्स,NCLइंडिया,ongc,sera सॅनिटरी वेअर्स,BGR एनर्जी, सेंट्रल बँक, J & K बँक, पंजाब आणि सिंध बँक, JBM ऑटो या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी लोकांना जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ५ kg गहू किंवा ५ kg तांदूळ आणि १ kg चणाडाळ देण्यात येईल अशी घोषणा केली. यासाठी ₹९०००० कोटी सरकार खर्च करेल असे सांगितले.

RBI 2 जुलै रोजी ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून १०० बिलियनचे ९ ते १३ वर्ष मुदतीचे बॉण्ड खरेदी करणार आहे आणि तेव्हढ्याच रकमेची ६ ते १२ महिने मुदतीची ट्रेझरी बिले विकणार आहे

BSEनिर्देशांक सेन्सेक्स-३४९१५ NSE निर्देशांक निफ्टी-१०३०२ बँक निफ्टी -२१३७०वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २९ जून २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २९ जून २०२०

आज क्रूड US $ ४०.१५ प्रति बॅरल ते US $ ४०.७८ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.५६ ते US $ १= ७५.६४ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.३१,VIX- २९ .९० PCR-१.४९ होता.

जगभर कोरोनाच्या केसेस खूप वाढत आहेत. १ कोटींपेक्षा जास्त केसेस झाल्या आहेत. पुन्हा नियम कडक करायला सुरुवात झाली आहे.काही काही ठिकाणी व्यवसाय, दुकाने स्वतःहून बंद करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता जुनचा शेवट जवळ आला आहे. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीचे निकाल बघता बघता FY 21 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर होण्याची वेळ येईल. जुलैपासून म्युच्युअल फंड त्यांना मिळालेल्या रकमेची विभागणी कशी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पिरामल इंटरप्रायझेसच्या फार्मा बिझिनेसमध्ये कारलाईल २०% stake US$४९० मिलियन मध्ये खरेदी करण्याची शक्यता आहे.

IDBI बँक IDBI फेडरल इन्शुरन्समधील २७% stake(२३% AEGIS ला आणि ४% फेडरल बँकेला) ₹ ५९५ कोटीला विकणार आहे

देशात आतापर्यंत सामान्या पेक्षा २१% जास्त पाऊस पडला आहे.खरिपाची पीक चांगले येण्याची आशा आहे. यामुळे रूरल अर्थव्यवस्थेला गती मिळेल

सन फार्माच्या ILLUMA या सोराइसिसवरील औषधाला जपानमध्ये मान्यता मिळाली.

Cipla आणि BOCHRINGER INGELHEIM यांनी मधुमेहावरील ३ओरल ड्रग्सच्या मार्केटिंग साठी JV केले.

सरकारने ५०लाख PPE किटची निर्यात करायला परवानगी दिली.

CESC(प्रॉफिट,उत्पन्न, मार्जिन वाढले), सुब्रोस, वेल्सपन इंडिया,वेस्ट कोस्ट पेपर, थांगमाई ज्यूवेलर्स,ITC, ग्लेन्मार्क फार्मा,इंजिनीअर्स इंडिया या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

भारत फोर्ज(फायद्यातून तोट्यात ₹७३.३० कोटी तोटा), MRF (₹६६९ कोटी प्रॉफिटमध्ये ₹३५० कोटी टॅक्स क्रेडिट), वेंकीज (फायद्यातून ₹ ९६.९७ कोटी तोट्यात, उत्पन्न आणि मार्जिन यात घट), शक्ती पंप(प्रॉफिट,उत्पन्न,मार्जिन कमी झाले.), मुक्ता आर्ट्स ( फायद्यातून तोट्यात) रुचिरा पेपर्स, या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

सरकार शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विनिवेशातून ₹१५०० कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. १५ जुलै २०२० पासून रोड शोज सुरू होतील आणि ऑगस्ट २०२० पर्यंत EOI मागवले जातील.

S&P ने अक्सिस बँक, बजाज फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स यांचे रेटिंग कमी केले.

RK दमानी या गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल पेपर या कंपनीत १.२५% stake खरेदी केला

BSE निर्देशांक सेन्सेक्स – ३४९६१ NSE निर्देशांक निफ्टी- १०३१२ बँक निफ्टी२१३५९ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २६ जून २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २६ जून २०२०

आज क्रूड US $ ४१.४१ प्रति बॅरल ते US $ ४१.६६ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.४७ ते US $ १= ७५.६६ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.३३ VIX- २८.९० PCR-१.५२ होता.

Accenture या कंपनीचा निकाल चांगला आला यामुळे भारतीय IT कंपन्यांचे शेअर तेजीत होते. बहुतेक सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ओपन होत आहेत. त्यामुळे ट्राफिक वाढत आहे, विमान उड्डाणाची frequency वाढत आहे. त्यामुळे क्रूडमधील तेजी टिकून राहील.

अपोलो टायर्सने आंध्र प्रदेशातील ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट कमिशन केला. मिश्र धातू निगममधील10% स्टेकच्या OFS साठी फिझिकल टेंडर रद्द केले. आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून टेंडर मागवले जाईल.

DR रेडीजविरुद्ध पेटंट उल्लंघनासाठी २ केसेस दाखल केल्या.

आज पासून निफ्टी आणि बँक निफ्टीचे rebalancing लागू होईल. तसेच F & O सेगमेंटमधील ७३ शेअर्सच्या लॉटसाईझमधील बदल लागू होईल.

वेदांताच्या डीलीस्टिंगसाठी शेअरहोल्डर्सची मंजुरी मिळाली.

सुप्रीम कोर्टाने कमर्शियल फ्लाईटसाठी परवानगी दिली. मधल्या सीटचे बुकिंग करायला परवानगी दिली.

नवंभारत व्हेंचर्स,सन टी व्ही,CESC व्हेंचर्स, टी व्ही एस श्रीचक्र, IOB(ही बँक १९ तिमाही नंतर प्रॉफिटमध्ये आली,NPA मध्ये सुधारणा), UCO बँक (तोट्यातून फायद्यात) या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले होते.

झुआरी ग्लोबल, इमामी, कल्याणी स्टील, कजारीया सिरॅमिक्स, ITI, साऊथ इंडियन बँक,nalco यांचे निकाल असमाधानकारक होते.

सेंच्युरी प्लाय,कोल इंडिया, J Kumar इन्फ्रा या कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

हेक्झावेअरच्या डी लिस्टिंगच्या प्रस्तावाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मंजुरी मिळाली. इंडिकेटीव्ह प्राईस ₹२८५ ठेवण्यात आली आहे.

भारत आणि चीनमधील ताण तणावामुळे भारतात आलेल्या चिनी कंसाईनमेंटची १००% तपासणी कस्टम खात्याद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे सप्लाय चेन मध्ये अडथळा आणि उशीर होत आहे असे पत्र FICCI ने सरकारला लिहिले आहे .

१५ जुलै २०२० पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद राहतील. हा नियम कार्गो सेवा आणि विशेष मंजुरी घेतलेल्या उड्डाणाना लागू नसेल.

BSEनिर्देशांक सेन्सेक्स ३५१७१, NSE निर्देशांक निफ्टी-१०३८३ बँक निफ्टी २१५९२वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २५ जून २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २५ जून २०२०

आज क्रूड US $ ३८.९५ प्रति बॅरल ते US $ ४०.४० प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.६० ते US $ १= ७५.७६ दरम्यान,US $ निर्देशांक ९७.३०,VIX- २९.५८ PCR-१.२९ होता.

कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, बोस्टन या ठिकाणी कोरोनाचा कहर दिसला. भारतात दिल्लीमध्ये कोरोनाची लागण वाढली.

IMF नी 2021,2022 चे growth target कमी केले भारताची growth –4.50 %,तर ग्लोबल growth 2020 मध्ये –4.9% होईल

सायबर security च्या बाबतीत पुष्कळ तक्रारी येत आहेत चीनमधून बरेच सायबर हल्ले होत आहेत.लॉक डाउन मध्ये बरेचसे व्यवहार on line होत आहेत त्यामुळे अँटी व्हायरसची गरज वाढली आहे हे काम quick heal, न्यूक्लीअस सॉफ्टवेअर, या कंपन्या करतात यांचा फायदा होईल

रशिया, चायना, कोरिया येथून PTFE (polytetrafluoroethylene) या केमिकलचे डम्पिंग होत आहे अशी तक्रार गुजराथ फ्लोरो या कंपनीने केली त्यामुळे या केमिकलच्या आयातीवर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याचा सरकार विचार करत आहे.

भारती infratel आणि indus टॉवर marger 31 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले कारण जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात AGR ची सुनावणी आहे

IIFL च्या प्रमोटरनी हिस्सेदारी वाढवली यामुळे ओपन ऑफर येण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून या groupचे share तेजीत होते.पण नंतर management नी exchange ला खुलासा केला की प्रमोटरचे वोटिंग rights 25%पेक्षा जास्त नाहीत त्यासरशी त्या ग्रुपच्या शेअरमधील तेजी कमी झाली

पॉवर मंत्रालयाने सांगितले की नवीन tariff धोरण येणार आहे One Nation One Grid policy लागू केली जाईल वीज subsidy आता DBTमार्फत दिली जाईल

थर्मल पॉवर उपकरणावर इम्पोर्ट ड्युटी लावण्यावर सरकार विचार करत आहे पण सोलर उपकरणावर ऑगस्ट 2020 पासून 20% ते 25% ड्युटी लावणार आहेत सोलर cell वर 15% बेसिक ड्युटी लावली जाईल याचा फायदा ABB, भारत बिजली, सीमेन्स, आणि Bhel या कंपन्यांना होईल.

युनायटेड बृअरीज],अस्त्र मायक्रो,GIC, HT मेडिया, HG INFRA, संगम इंडिया, हिंदुस्थान एरोनाटिक्स,fact यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कॅनरा बँक,प्रेसटीज इस्टेट,बामर लॉरी,बॉम्बे बर्मा,इंडियन ग्लायकॉल,PNC इन्फ्रा,TTK प्रेस्टीज,अपार इंडस्ट्रीज यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. (IDFC, बँक ऑफ इंडिया,IOB, लिंकन फार्मा,JB केमिकल्स यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स 34842 NSE निर्देशांक निफ्टी 10288 बँकनिफ्टी  21506 वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – २४ जून २०२०

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका.

आजचं मार्केट – २४ जून २०२०

आज क्रूड US $ ४२.१३ प्रति बॅरल ते US $ ४२.८८ प्रति बॅरल दरम्यान तर रुपया US $ 1= ७५.६० ते US $ १= ७५.७४ दरम्यान,US $ निर्देशांक ९६.६४,VIX- २९.३४ PCR-१.६३ होता

सरकार काही विशिष्ट स्टील उत्पादनांवर अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याची शक्यता आहे.चीन, व्हिएतनाम, कोरिया येथून आयात होणाऱ्या फ्लॅट रोल्ड प्रॉडक्टसवर ही ड्युटी US $ १३.०७ ते US $ १७३.१ प्रती टन असेल. ही ड्युटी ५ वर्षांकरता लावली जाईल. फ्लॅटरोल्ड प्रॉडक्टस ऑफ स्टील,प्लेटेड किंवा कोटेड विथ alloy ऑफ अल्युमिनियम आणि झिंकवर ही ड्युटी OCT 15, 2019 पासून लावली होती तिची मुदत ५ वर्षापर्यंत वाढवली.

IRDA ने कोविड १९ साठी शॉर्ट टर्म विमा पॉलसी इशू करण्यासाठी विमा कंपन्यांना परवानगी दिली . (३) सरकार SCI (शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मधील सरकारचा ६३.७५% stake विकणार आहे. यासाठी EOI(एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मधील अटींना अंतिम रूप दिले जात आहे. लॉकडाउनच्या काळातही शिपिंग बिझिनेस सुरळीत चालू असल्याने या stake विक्रीतून चांगले पैसे उभे राहतील असा सरकारचा अंदाज आहे.

सरकार आपला IDBI बँकेतील stake (४६.७५%) विकण्याचा विचार करत आहे.

अडानी पॉवरने ओडिशा पॉवरमध्ये ४९% stake ₹ १०१९ कोटीला खरेदी केला.

सरकारने अंतरिक्ष क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवायला मंजुरी दिली.

सरकारने सहकारी क्षेत्रातील बँकांना RBI च्या रेग्युलेटरी ऑथारीटी अंतर्गत आणले सरकारने यासाठी वटहुकूम पास केला.

IOC ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीला चौथ्या तिमाहीत ₹ ५१८५ कोटी तोटा झाला.कंपनीला ₹१.१८ लाख कोटीचे उत्पन्न झाले. सरासरी GRM US $ ०.०८/bbl होते.कंपनीला ₹११३०५ कोटींचा one टाइम लॉस झाला.

बँक ऑफ बरोडा,अस्टर DM, NLC, युनियन बँक,गेल यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. एशियन पेंट्स(कंपनीच्या व्यवस्थापनाने गायडन्स चांगला दिला), बरजर पेंट्स, फ़िनॉलेक्स इंडिया सिमेंट्स(₹१११ कोटी तोटा, ₹ १०० कोटी वन टाइम लॉस) , बलरामपूर चिनी यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

सेबीने कंपन्यांना चौथ्या तिमाहीचे निकाल जाहिर करण्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत दिली. (१२) सरकारने ₹ १५००० कोटींचा infrastructure फंड स्थापन केला. डेअरी,पोल्ट्री,आणि meat सेक्टरमध्ये ३% इंटरेस्ट सबवेनशन दिले जाईल. डेअरी प्रोजेक्टमध्ये १०% stake खाजगी पार्टी आणेल बाकी बँकेचे लोन असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३४८६८ NSE निर्देशांक निफ्टी १०३०५ बँक निफ्टी २१४२६ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!