Tag Archives: share market questions in marathi

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : July – September 2017

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: balu gadhave
तुमचा प्रश्न : konta shers kadhi kharede karava kala nusaar
माझे ब्लोग नंबर ४० आणी ४१ वाचा.
नाव: MUKESH R CHAUDHARI
तुमचा प्रश्न : mala share bazarabadal mahaiti havi he kase kam karte jar mi 1000 rs investment kele tar mala benifit kasa milnar
माझे ब्लॉग लक्षपूर्वक वाचा. माझे मार्केट आणी मी हे पुस्तक घ्या. आपणाला शेअर मार्केटमधील व्यवहारांबद्दल पूर्ण माहिती मिळेल.
नाव: sagar gurav
तुमचा प्रश्न : shares mnje kay ani share marketcha kay fayda hoil
शेअर म्हणजे कंपनीच्या भागभांडवलाचा एक छोटा भाग. शेअर मार्केटमध्ये  केलेल्या गुंतवणुकीवर इतर गुंतवणुकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त फायदा मिळतो.
नाव: गणेश नवने
तुमचा प्रश्न : नमस्कार, मी आपले ब्लॉग नेहमी वाचतो मला पडलेल्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला इथे मिळतात. पण मला एक गोष्ट समजली नाही कि SENSEX किंवा NIFTY च्या निर्देशांकाचा एक शेअर वर काय आणि कसा फरक पडतो? कृपया ते समजून सांगाल का?
सेन्सेक्स आणी निफ्टी हे BSE आणी NSE वर लिस्टेड असणाऱ्या निवडक शेअर्सच्या किमतीमधील हालचालींचे प्रतिनिधी आहेत. यात जे शेअर समाविष्ट केले असतील ते शेअर वाढत असल्यास निर्देशांकही वाढतात. त्यामुळे या निर्देशांकांवरून मार्केटमध्ये तेजी आहे का मंदी आहे याचा अंदाज येऊ शकतो.
नाव: mandar kumare
तुमचा प्रश्न : mala balance fund madhye account ugdayche aahe. kashi procedure aahe.
आपला प्रश्न शेअर मार्केटशी संबंधीत नाही.
नाव: Kasim
तुमचा प्रश्न : Senex mhanje kay
सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स. यात BSE वर ट्रेड होणाऱ्या निवडक शेअर्सचा समावेश असतो..
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Red mam. Sadhya nuktiach me trading kartoy via angel broking.tar mala appbaddal tar majhe kahin technical prashna aahet. Jar aaplyala swing trading kinva positional trading karayachi aasel tar shayer aaplyala delivery karave lagtat ka.trailing stoploss means Kay. Tasech mobile app baddal mala sarva technical mahiti kuthe shikayala miltil?
तुम्ही माझा ब्लोग सविस्तर वाचा STOP लॉस या विषयावरील ब्लोग नंबर ४६ वाचा. स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग करायचे असल्यास शेअर्सची डिलिव्हरी घ्यावी/द्यावी लागते.
नाव: RAVINDRA NAKHE
तुमचा प्रश्न : Namaskar How to read script graph ? How it is helpful in finding the trend of stock ?
माझ्या पुस्तकात ही सर्व माहिती आहे ती वाचा.
नाव: Prafulla Patil
तुमचा प्रश्न : Aata 2 yr investment karayachi asel tar kashamadhey investment karavi
सध्या मार्केटमध्ये करेक्शन चालू आहे. आपण प्रत्येक क्षेत्रातील निवडक  (A ग्रूप मधील) कंपनींच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी उदा. ऑईल अंड GAS. ऑटो , FMCG, बँका आणी इतर फायनांसियल, फार्मा
नाव: ganesh gaikwad
तुमचा प्रश्न : share marketmadhe account kas open karayach
DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट ओपन करण्याच्या प्रक्रियेसाठी माझा ब्लॉग नंबर ३१ वाचा.
नाव: Aniket
तुमचा प्रश्न : आपण 2 प्रकारे demat account ओपन करू शकतो, 1.ब्रोकर कडून 2.बँके कडून
ब्रोकर कडे ब्रोकरेज charges ठरलेले असतात. तसेच बैंकसाठी ब्रोकरेज or service charges किती असतात
प्रत्येक बँकेला DEMAT  अकौंट मधील व्यवहारासाठी वेगळे चार्ज आकारायची परवानगी आहे. आपण आपल्याला पाहिजे असलेल्या बँकेत चौकशी करावी.
नाव: somnath
तुमचा प्रश्न : Doller ani rupaya badal sanagana Doller kami rupaya vad kashi olkhavi
US $ आणी इंडियन रुपी यांच्यातील दराला विनिमय दर असे म्हणतात हा विनिमय दर त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर  अवलंबून असतो. हा रेट बदलला तर त्याचा देशाच्या आयात निर्यात व्यापारावर परिणाम होतो.
नाव: Prakash Avaghade
तुमचा प्रश्न : mala shehar market madhe kahi paise guntvand ahe tar mala ya market baddal jast mahit nahi. v konte khate ugdun paise takave v khate kuthe ugdave tyachi mala puran mahiti dyavi.
आपण माझ्या ब्लॉगमधील सर्व लेख काळजीपूर्वक वाचावेत. माझ्या ‘शेअरमार्केट आणी मी’ या पुस्तकातही ही माहिती दिली आहे.
नाव: Satish patil
तुमचा प्रश्न : Cdsl ipo =100@149₹ ahet, kiti divas hold karu
आपल्याला खालच्या भावाला CDSL चे शेअर्स आलेले आहेत. आपल्याला पैशाची गरज नसेल तर होल्ड करा. मार्केट तेजीत आहे तोवर शेअर वाढेल. छोट्या छोट्या लॉटमध्ये ६० ते ७० शेअर्स विकून आपले भांडवल आणी नफा काढून घ्या. म्हणजे उरलेले शेअर्स फुकट होतील आणी भविष्यात तुम्हाला राईट्स, बोनस स्प्लिट या सारख्या कॉर्पोरेट एक्शनचे फायदे मिळू शकतील.
नाव: GANESH DNYANDEV GAIKWAD
तुमचा प्रश्न : DMATT ACCOUNT OPEN KELYANANTAR GUNTAVNUKICHI PUDHCHI PROSES KAY ASTE BROKAR SHIVAY GUNTAVNUK KASHI KARAYACHI
माझा ब्लोग नंबर ३१ वाचा.
नाव: sandeep p raut
तुमचा प्रश्न : which indicator are useful in swing trading. can you guide me please
इंडिकेटरचा उपयोग करण्यापेक्षा आपण शेअरच्या किमतीमधील बदलाचे निरीक्षण करा.
नाव: GANESH DNYANDEV GAIKWAD
तुमचा प्रश्न : SHEREMARKET MADHE GUNTAVNUK KASHI KARAVI
माझा ब्लोग वाचा. ब्लॉगवर तसेच माझ्या शेअरमार्केट आणी मी या पुस्तकात ही सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे.
नाव: vikas sule, baroda
तुमचा प्रश्न : me rs.10,000/ te rs. 20,000/ guntavun changlya compani che share vikat gheu icchito. trading sathi nahi pan for long duration. kontya compani che shares me ghyave?
आपण प्रत्येक क्षेत्रातील निवडक कंपन्यांमध्ये (A ग्रूप) मधील कंपनींच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी उदा. ऑईल अंड GAS. ऑटो , FMCG, बँका आणी इतर फायनांसियल, फार्मा अधिक माहितीसाठी आपण माझा ब्लॉग आणी पुस्तक वाचल्यास आपल्याला गुंतवणुकीस योग्य शेअर निवडणे सोपे जाईल.
नाव: vikas sule, baroda
तुमचा प्रश्न : aapli share bajar ya vishaya varchi pustaka Dadar yethe kuthlya vikretya kade miltil? Me vikat gheu icchito. [book shop/seller in Dadar, Mumbai]
पुस्तक ठाण्याला आमच्या घरी मिळेल किंवा ब्लॉगवर दिलेल्या ADDRESS वरून तुम्ही ऑन लाईन मागवू शकता.
नाव: vikas sule, baroda
तुमचा प्रश्न : aapli share bajar ya vishaya varchi pustaka Dadar yethe kuthlya vikretya kade miltil? Me vikat gheu icchito. [book shop/seller in Dadar, Mumbai] ya vishaya varche aaple nehmi updates milavnya sathi me kay karava? kuthe nondh karavi? [to receive regular updates from you on the subject]
दर शनिवारी मार्केटमधील महत्वाच्या घडामोडींवर मी एक ब्लोग टाकते तो वाचा
नाव: kamlesh
तुमचा प्रश्न : Long Term Saathi 3 Share kuthale changle aahet krupaya suchval ka ?
तुम्हाला ३ काय पण वाटेल तेवढे चांगले शेअर्स ब्लोग वाचून शोधता येतील.
नाव: DATTATRAYA
तुमचा प्रश्न : to check fundamentals of company means which parameters should we observe to buy or sell the particular shares i.e. When a person wants to buy shares from market to verify company nature or profile which parameters he should check and what are the values to be judge that that particular company is good or not please answer
या साठी कंपनीच्या फायनल अकौंटचे विश्लेषण करून वेगवेगळे अकौंटिंग रेशियो काढता येतात. त्या रेशियोंची त्या सेक्टर मधील इतर कंपन्यांच्या रेशियो बरोबर तुलना करून कंपनीची गुणवत्ता ठरवता येते. ही सर्व माहीती ब्लॉगवर दिली आहे तसेच ‘शेअरमार्केट आणी मी या माझ्या पुस्तकातही दिली आहे.
नाव: pramod gulabrao dere patil
तुमचा प्रश्न : मला शेअर मार्केट मध्ये काम गुंतवणुक करावयाची आहे त्यासाठी प्रथम त्याचा अभ्यास शिक्षण घ्यावयाचे आहे त्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड मधिल चांगला क्लास कोणता
माझे प्रशिक्षण वर्ग ठाण्याला आहेत.
नाव: Akshay Kolte
तुमचा प्रश्न : Mam, mala derivative market badaal information havi hoti Plz
आपण NSE च्या साईटवर जाऊन NSE पाठशाला वर लॉगीन केले तर आपल्याला ही माहिती मिळू शकेल.
नाव: Lileshwar
तुमचा प्रश्न : SEBI mhanje Kai?
SEBI म्हणजे सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया.
नाव: jd sutar
तुमचा प्रश्न : WHAT IS THE MEANING OF ‘HAIRCUT?’
एखादी मालमत्ता तारण म्हणून ठेवली जाते ती मालमता आताच्या तिच्या किंमतीला विकली जाईल असे नाही. त्यामुळे कर्ज देताना त्या मालमत्तेच्या वर्तमान मुल्यातून काही एक रक्कम वजा करून त्या मालमत्तेच्या समोर कर्ज दिले जाते त्याला ‘हेअरकट’ असे म्हणतात. २०% हेअरकट म्हणजे २०% सुरक्षा.
नाव: SHIVCHARAN UTTAMRAO SHINDE
तुमचा प्रश्न : Madam, mi share market madhe nwin aahe. mala equity,derivative, future&options ya shabdancha savistar arth sanga. mi tredding kashyat karu. equity madhe kru ki f&o madhye…tsech share market madhil sarv sabdache marathit arth saanga.
आपण माझा ब्लॉग आणी माझे ‘शेअरमार्केट आणी मी’ हे पुस्तक वाचा. आपण विचारलेली सर्व माहिती त्यात आहे. माझ्या मते आपल्याला कॅश मार्केटमध्ये व्यवहार करून चांगले यश मिळायला लागल्यावर आपण F & O च्या वाटेला जावे.
नाव: Manish
तुमचा प्रश्न : Hi.. I wnt invest money in share market.. For long term..so can u advice which company share good for me..my budget is 20-35 thousand.. Thanx..
तुम्ही माझा ब्लोग वाचल्यास तुम्हाला स्वतःलाच  फायदेशीर शेअर्समध्ये गुंतवणूक कशी करायची हे ठरवता येईल. आपण प्रत्येक क्षेत्रातील निवडक कंपन्यांमध्ये (A ग्रूप मधील) कंपनींच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी उदा. ऑईल अंड GAS. ऑटो , FMCG, बँका आणी इतर फायनांसियल, फार्मा
नाव: pooja
तुमचा प्रश्न : Madam market up & down kadhi nd kevha hote…
शेअरमार्केट म्हणजेच भांडवली बाजार. हे मार्केट अर्थव्यवस्थेचा आरसा समजला जातो. अर्थव्यवस्था प्रगतीपथावर येण्यासाठी योग्य गोष्टी घडत असतील तर मार्केट वाढते. कोणतीही युद्धजन्य परिस्थिती, किंवा नैसर्गिक आपत्ती, किंवा राजकीय अस्थिरता असली तर मार्केट पडते.
नाव: विनोद चव्हाण
तुमचा प्रश्न : मला कमोडिटी बाजार मध्ये गुंतवणूक करणारी कंपनी स्थापन करायची आहे अर्थात hedge फंड. त्याबद्दल माहिती आणि procedure काय आहे?
आपला प्रश्न शेअरमार्केटशी संबंधीत नाही
नाव: Mitesh
तुमचा प्रश्न : Commodity madhe jr silver cha ek lot gharedi kela tr kiti ammount dyavi lagete (38000 asel tr 38000 ch paid karave lagtat ka ? )
हा प्रश्न माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे.
नाव: मंदार
तुमचा प्रश्न : हसत खेळत शेअर मार्केटच्या अंतरंगात मराठीतून पोहोचविण्याचे ,आम्हा सामान्यांच्या दृष्टीने अवघड असे, कार्य आपण हाती घेतलंत त्याबद्दल मन:पूर्वक आपले अभिनंदन.मी आपले लेख अतिशय प्रतीक्षेने नियमितपणे वाचतो.खूप आवडतात. माझ्या पोर्टफोलिओमध्ये चांगले दिग्गज शेअर्सआहेत.उदा.ICICI BANK, TATA MOTORS, AUROBINDO PAHRMA,SUN PHARMA DHFL, KAJARIA CERAMICS वगैरे.परंतु, त्यातले काही सध्या घेतलेल्या किमतीच्या बरेच खाली आलेले आहेत.याआधीच्या लेखात आपण PROFIT BOOK करणेबाबत याचदा सांगितले.परंतु, मन दोलायमान होते.कारण CONFUSION हे की LONG TERM/SHORT TERM CAPITAL GAIN TAX बाबत असते आणि सोबतच शेअर मार्केट मधील गुरूंचे वक्तव्य आठवते की किमान वर्षांपेक्षा किवा त्यापेक्षा जास्त कालावाधीसाठी शेअर्स ठेवा.तेव्हा नेमके काय करावे हे कळत नाही.अर्थात आपल्या सांगण्याप्रमाणे निर्णय हा मलाच घ्यायचा असला तरी कृपया या दोलायमान मन:स्थितीबाबत आपण सविस्तर मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
आपले मन दोलायमान होण्याची काहीच गरज नाही. शेअरमार्केटमध्ये नफा हेच अंतिम ध्येय आहे. नफा मिळवण्यासाठी आपण गुंतवलेले भांडवल खेळते ठेवावे लागते.३ वर्षे ठेवण्यासाठी आपण तो शेअर अतिशय कमी किंमतीत खरेदी केलेला असला पाहिजे. नेहेमी हे शक्य नसते. समजा Rs १०० ला खरेदी केलेल्या शेअरची किंमत १ ते २ महिन्यात Rs ११५ ते Rs ११६ झाली तर खर्च वजा जाता १०% फायदा होतो. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीवर वार्षिक ६०% फायदा होतो. अशा वेळी शेअर विकताना विचार करण्याचे कारण नाही. DCB ची किंमत  Rs ४० होती आता भाव Rs १८० किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. अशावेळी ५० शेअर विकून भांडवल आणी फायदा होऊ शकतो. उरलेले शेअर्स आपण शेअरची किंमत वाढत जाईल तसे तसे छोट्या छोट्या लोट मध्ये विकू शकता. किंवा बोनस राईट्स स्प्लिट अशा कॉर्पोरेट एक्शनचा फायदा होण्यासाठी आपल्याजवळ दीर्घकाल ठेवू शकता.  दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे असलेल्या शेअर्सपेक्षा जास्त फायदेशीर शेअर्स मार्केटमध्ये असू शकतात. तुमच्याजवळ असलेल्या शेअर्समध्ये गुंतलेले भांडवल आणी नफा मोकळा करून तुम्ही नव्या आणी अधिक फायदेशीर शेअर्स मध्ये गुंतवू शकता.
नाव: Mahesh
तुमचा प्रश्न : Tumhi ji mahiti Anukramanika ani tyanchya link madhe dili aahe tech “market aani mi” ya pustakat aahe ka?
पुस्तकात आणी ब्लॉगमध्ये माहिती वेगवेगळी आहे. दोन्ही माध्यमाच्या काही मर्यादा असतात.
नाव: Ravindra Garje
तुमचा प्रश्न : मॅडम, एखादा व्हाट्सअप्प ग्रुप चालू करावा
आपल्या सूचनेचा योग्य वेळी विचार करता येईल.
नाव: mahadev swaami
तुमचा प्रश्न : maza prashan : book value manje kay anni face value manje kay aanni ya dhoghalta farak .
माझ्या ब्लॉग वरील ‘माझी वहिनी’ या सदरातील ७ वा लेख वाचा.
नाव: samir
तुमचा प्रश्न : CIRCUIT LIMITS FOR INDIVIDUAL STOCKS?.
शेअरला अपर किंवा लोअर सर्किट २%, ५%, १०% किंवा २०% चे असू शकते. ह्याच्यात सेबी बदल करू शकते. यावर माझ्या पुस्तकात एक संपूर्ण लेख आहे.
नाव: SUSHIL GHARAT
तुमचा प्रश्न : मला तुमचे पुस्तक कुठे आणि कसे मिळेल?
पुस्तक ठाण्याला आमच्या घरी मिळेल किंवा ब्लॉगवर दिलेल्या ADDRESS वरून तुम्ही ऑन लाईन मागवू शकता
नाव: kishor Mali
तुमचा प्रश्न : Madam,Kahi companies Dividend pan detat to kenvha detat?
कंपनीचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असते. जेव्हा वार्षिक निकाल कंपनी जाहीर करते तेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स लाभांश जाहीर करतात. हा लाभांश कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारणसभेत शेअरहोल्डर्सनी मंजूर केल्यावर त्याचे पेमेंट केले जाते. हे पेमेंट साधारणपणे  जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केले जाते.
नाव: Vijay
तुमचा प्रश्न : कृपया मला या मधला फरक सांगा CNC (Cash n Carry), MIS (Margin intraday squareoff) & NRML (Normal F&O trades)
हे प्रश्न वायदेबाजाराशी संबंधीत आहेत.
नाव: Charudatta
तुमचा प्रश्न : कोणत्याही कंपनीचा IPO येण्याआधी ज्यांच्याकडे शेअर्स असतात त्यांना शेअर्स चे लिस्टिंग झाल्यापासून वर्ष संपेपर्यंत शेअर्स विकता येत नाहीत , असे आपण लेखात म्हटले आहे पण ipo येण्याअगोदर आपण तसे कंपनी चे शेअर कसे खरेदी करू शकतो ?
IPO याचा अर्थ कंपनी आपले शेअर्स पब्लिकला एका विशिष्ट किमतीला देऊ करते.कंपनी प्राथमिक अवस्थेत असते. काही वर्ष काहीही फायदा होण्याची शक्यता नसते  कंपनीचा बिझिनेस चालूच असतो. प्रमोटर्स आणी इतर लोकांनी त्यात शेअर्स घेवून पैसे गुंतवलेले असतात. IPO मध्ये हे शेअर्स जनरल पब्लिकला विकून हे गुंतवणूकदार आपले भांडवल कमी करतात/ काढून घेतात. असे होऊ नये म्हणून प्रमोटर्स होल्डिंगवर काही बंधने घाय्लेली असतात.
नाव: Shivaji Kachare
तुमचा प्रश्न : Dear Madam, Thanks for the initiative for to give the share market information in our mother tongue. I haven’t seen any writer or Institute have guided like this ever. I want to buy your published book. I would like to more about mutual fund & F&O category. Do we have this type of information in your book? Please confirm.
माझ्या पुस्तकात फक्त शेअर मार्केटमधील कॅशसेगमेंट वर माहिती आहे. हा प्रश्न माझ्या कक्षेबाहेरचा आहे.
नाव: Shelar S A
तुमचा प्रश्न : कोटक निफ्टी etf शेअर्च काय वराव.
हा प्रश्न माझ्या कक्षेबाहेरचा आहे.
नाव: Atul palkhade
तुमचा प्रश्न : Phakt instruction sleep bharanakarita broker po a deu shakato ka
फक्त DIS साठी POA देता येत नाही.
नाव: Kalyani
तुमचा प्रश्न : Namskar mam.. Mi 1housewife ahe. Mla share market mdye kam krnaychi iccha ahe.. Mla tumche Lekh vachun mahiti milat ahe.. Roj kiti vel kam krav lagat.. Ani aaj baher classes asatat te joint krave ka ? mi ghari abhyas krun shiku shakte.. Class krnyachi kharch garj aste ka
आपल्या घरी वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या बिझिनेस वाहिन्या माहितीचा पूर आणत असतात. मी सुद्धा दर शनिवारी मार्केट मध्ये घडलेल्या / मार्केटशी संबंधीत घडामोडींवर एक ब्लोग टाकत असते. आपण शेअर खरेदी विक्रीची प्रक्रिया निट  समजून घेतली आणी आपण आपल्याजवळ असलेल्या शेअर्सशी संबंधीत माहितीचे निट विश्लेषण करू शकत असाल तर कोणत्याही क्लासला जायची आवश्यकता नाही. माझा ब्लोग/ पुस्तक वाचूनही शेअर मार्केटमध्ये फायदेशीररीत्या व्यवहार करू शकता.
 नाव: हर्षल विभुते
तुमचा प्रश्न : मला माझे शेयर्स विकायचे असतील तर त्याला खरीदी दार किती आहेत आणि कोणत्या भावाने आहेत हे इं टरनेट वर कुठे पाहता येते?bse nse च्या साइट वर का cdsl च्या साइट वर?iifl च्या app वर अशी सुविधा आहे का?
BSE आणी NSE च्या साईटवर जाऊन कंपनीचे नाव टाकल्यास त्यावेळचा कंपनीच्या शेअर्सचा भाव तसेच शेअर्सच्या किमतीमधील हालचालीचा ग्राफ तसेच या शेअर्स साठी मार्केटमध्ये किती लोक खरेदी करण्यासाठी आणी किती लोक विक्री करण्यासाठी तयार आहेत हे कळू शकते. तसेच पहिल्या पांच खरेदीदार आणी विक्रेत्याच्या ऑफर प्राईस कळू शकतात.
नाव: RAHUL
तुमचा प्रश्न : Madam I am regular reader of your blog. I want to know which source of information I should refer to know happenings in the companies and corporate sector.?More specifically I want to know site or any app /
वर्तमानपत्रे, दूरदर्शनवरील बिझिनेस वाहिन्या
 नाव: darshan mhashete
तुमचा प्रश्न : information about demat account in fully marathi
माझ्या ब्लॉग नंबर ३१ आणी ३९ वाचा. मझी वहिनी सदरातील दुसरा लेख वाचा.
नाव: Bhavana
तुमचा प्रश्न : Respected mam, government employee share market made investment Karu Shakto ka
आपण जेथे काम करता तेथे काय नियम आहेत त्याची चौकशी करा. सहसा ट्रेडिंग आणी इंट्राडे  ट्रेड करू देत नाहीत. पण एका विशिष्ट मर्यादेत गुंतवणूक करायला निर्बंध नसतात पण तुम्ही तुमच्या ऑफिसला ही माहिती कळवली पाहिजे. असा नियम असू शकतो.
नाव: ameya
तुमचा प्रश्न : tumchya pustakat F&O chi mahiti aahe ka
माझ्या पुस्तकात F & O विषयी माहिती नाही.
 नाव: Ajay Kushwaha
तुमचा प्रश्न : मागणी आणि किमत यातील फरक स्पष्ट
मागणी आणी किंमत एकाच दिशेत वाढतात आणी एकाच दिशेत कमी होतात.

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : मार्च – जुन 2017

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: AMIT PATHADE
तुमचा प्रश्न : Dimat अकाउन्ट उघडण्यासाठी कीती खर्च लागतो.आणि कमीत कमी कीती रक्कम गुतवणूक करावी लागती.
‘DEMAT’ अकौंट उघडण्यासाठी खर्च ठरलेला नाही. काही ब्रोकर फुकट DEMAT अकौंट उघडतात तर काही ठिकाणी लाईफटाईमसाठीचे पैसे अकौंट उघडतानाच घेतात. कमीतकमी कितीही रक्कम गुंतवा अगदी Rs १०० सुद्धा.
नाव: Narayan Suryakant palande
तुमचा प्रश्न : Mala share market baddle kahihi knowledge nahiye.. Pan mala te shiknyachi khup iccha aahe.. Tumi mala ya blog cha marfat shikvu shakta ka??
लोकांना शेअरमार्केट्ची माहिती व्हावी आणी पैसा मिळावा हाच उद्देश माझ्या ब्लॉगचा आहे. तुम्ही लक्षपूर्वक वाचा.
नाव: supriya
तुमचा प्रश्न : buyback mhanaje kay
मी ‘BUY BACK’ या विषयावर माझ्या ब्लॉगवर ब्लोग नंबर ५८ लिहिला आहे. तो वाचा माझ्या पुस्तकात सुद्धा ‘BUY BACK’ वर लेख आहे.
नाव: andy
तुमचा प्रश्न : i am very impress your knowledge about share market .here i am ask you can i invest 500/- rupees. in share market
तुम्ही Rs ५०० काय पण Rs १०० सुद्धा गुंतवू शकता.
नाव: सुहास गोरे
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम Candlestick patterns वर एखादा लेख लिहावा हि विनंती. खूप confusion आहे. काहीच माहिती नाही म्हंटलं तरी चालेल please मॅडम लवकरात लवकर यावर लेख लिहावा.
मला वेळ मिळाला की आपल्या सूचनेचा विचार होईल. माझ्या पुस्तकातील ‘तांत्रिक विश्लेषण’ या विभागात ‘कॅण्डल स्टिक’ या PATTERN वर माहिती आहे. 
नाव: Ajit
तुमचा प्रश्न : नमस्कार मॕडम, माझ्याकडे Supreme Tex या कंपनीचे ५०० शेअर्स आहेत, Buy Value 10rs आहे. तर मला हा stock वाढेल की नाही याबद्दल व याचे भविष्य काय असेल.. current value : 4 rs
मार्केटमधून पैसा कसा मिळवता येतो हे एखाद्या शाळेत जसे शिकवतात तसे मी ‘ब्लॉग’च्या प्रशिक्षण वर्गाच्या किंवा पुस्तकाच्या माध्यमातून शिकवते पंण ठराविक शेअरवर माझे मत व्यक्त करत नाही. मोबाईलवर येणार्या SMS वरून ज्या काही शेअर्सविषयी टिपा येतात त्यात पूर्णपणे समजून उमजून गुंतवणूक करा. अन्यथा फसगत होण्याची शक्यता मोठी असते.
नाव: Ravindra Dhoble
तुमचा प्रश्न : आदरणीय म्याडम demat खाते broker मार्फत काढल्यास broker ला किती कमिशन मिळते ?
‘DEMAT’ खाते उघडण्यासाठी ब्रोकरला काही कमिशन द्यावे लागत नाही.
नाव: SWATI NALE
तुमचा प्रश्न : Dmat account kadhtana bank broker thevane yogya ki private broker thevane yogya
‘DEMAT’ अकौंट एखाद्या मोठ्या बँकेमध्ये आणी ट्रेडिंग अकौंट मात्र प्रायव्हेट ब्रोकरकडे ठेवावा. तुम्ही कुठेही अकौंट उघडा पण अकौंट मध्ये होणाऱ्या ऑपरेशन्सवर बारकाईने लक्ष ठेवा. म्हणजे फसवणूक होत नाही.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Res. Mam Day trading madhe risk che praman kiti aste
तुम्ही किती धोका पत्करायला तयार असाल त्याप्रमाणे STOP LOSS लावावा. त्यामुळे तुम्ही धोक्याचे प्रमाण नियंत्रित करू शकता. पण गुंतवणूक किंवा शॉर्ट किंवा मध्यम मुदतीच्या ट्रेडिंग पेक्षा डेट्रेड मध्ये धोका जास्त आहे.
नाव: अविन बाबासाहेब निर्मळ
तुमचा प्रश्न : सप्रेम नमस्कार मॅडम, जर मी dmat account उघडले आणि काही शेअर्सची खरेदी केली, आता मला ते शेअर्स विक्री करण्याकरिता समोर खरेदीदार असणे आवश्यक आहे किंवा नाही. तसेच मी कोणत्याही ब्रोकरशिवाय माझे खाते कोणालाही त्याचे अधिकार न देता अगदी सहज आणि मोकळेपणाने चालवू शकतो की,हि प्रक्रिया अवघड आणि किचकट असते हे सांगा हि विनंती. कारण मला माझे खाते स्वतः चालवण्याची ईच्छा आहे.
इंटरनेट वरून तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या शेअर्ससाठी किती खरेदीदार, कोणत्या प्राईसला, किती शेअर्ससाठी उपलब्ध आहेत हे कळू शकते. तुम्ही तुमचे खाते स्वतः चालवू शकता. याची प्रोसेस ब्लॉगवर आणी माझ्या पुस्तकात डिटेलमध्ये वर्णन केलेली आहे
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Aadarniya mam, blue chip shayer mhanjhe Kay? Aani,tyamadhe riskche praman kami kase aasu shakte. Thank u
मार्केट कॅप, VOLUME, लिक्विडीटी, TRACK रेकॉर्ड, कंपनीला होणारा नफा, कंपनी देत असलेला लाभांश, शेअरहोल्डिंग PATTERN, आणी कंपनीला उपलब्ध असणाऱ्या प्रगती करण्याच्या संधी, या सर्व गोष्टी ब्लू चीप कंपनीत असतात. त्यामुळे कंपनीच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवले तर धोका कमी असतो.
नाव: Asif
तुमचा प्रश्न : mala sharemarket shuruwat karyachi aahe
आपण माझा ब्लॉग ,पुस्तक, प्रशिक्षण वर्ग यांच्या माध्यमातून शेअरमार्केटशी परिचय करून घ्या. नंतरच आपण शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक, ट्रेडिंग सुरु करा.
नाव: Ashvini Santoshrao bhende
तुमचा प्रश्न : Is it necessary to have a net banking to open dmat account
आपण बँकेत किंवा ब्रोकरच्या ऑफिसात व्यक्तीशः जाऊन DEMAT अकौंट उघडू शकता. जर तुम्ही DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट ऑन-लाईन करणार असाल तर नेट बँकिंगची सुविधा असणे जरुरीचे आहे अन्यथा नाही.
नाव: Eknath Mahajan
तुमचा प्रश्न : dmat sathi It return aavashyak aahe ka share trading var tax basto ka
तुमचे करपात्र उत्पन्न कमीत कमी करमुक्त उत्पनापेक्षा जास्त असेल तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये झालेल्या उत्पन्नाचा एकूण उत्पन्नात समावेश करावा लागतो. परंतु खरेदी केल्यानंतर एक वर्षाने STOCK एक्स्चेंजच्या माध्यमातून शेअर्स विकले तर कोणताही कर लागत नाही.
नाव: महेश नार्वेकर
तुमचा प्रश्न : मॅडम नुकत्याच आलेल्या बातमीनुसार बी.एस.ई ने सात स्टोक वर अप्पर सर्किट,वा हाई वाल्यूम मूळे ट्रेडिंग वर बंदी घातली,म्हणजे नक्की काय? हे शेअर दिवसाला 20%वर होते.प्र(2)-काही शेअरचा मागील दोन अडीच वर्षाचा आढावा घेतल्यास १०००ते१२००%टक्क्यांपर्यंत वाढ दाखवते ही किमया शेअर बाजारात असेल?की उगाच आकडे फुगून दाखवले असावेत का? मॅडम आपले ब्लाॅग वाचून शेअर बाजारात उतरण्यास हिंमत आली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
ज्या अर्थी सेबीने या शेअर्सच्या ट्रेडिंग वर बंदी घातली आहे त्याअर्थी या शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये काही गैरव्यवहार चालू आहेत असे समजायचे. अशा शेअर्समध्ये ट्रेडर्सनी ट्रेडिंग करू नये.
नाव: sagar
तुमचा प्रश्न : Can govt employee invest in share market??
आपण आपल्या ऑफिसमध्ये प्रचलीत असलेल्या नियमांची चौकशी करावी. पण सामान्यतः दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी परवानगी असते.
नाव: balu gadhe
तुमचा प्रश्न : शेअर कोठुन खरेदी करायचा
शेअर शेअर मार्केटमधून खरेदी करावा. त्यासाठी DEMAT अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट असणे जरुरीचे आहे.
नाव: Amar kogde
तुमचा प्रश्न : Face value म्हणजे काय plz tell mi
कंपनी IPO मध्ये शेअर ऑफर करताना त्याची फेस VALUE ठरवते. फेस VALUE आपल्याला शेअरच्या मार्केट किमतीच्यावर लिहिलेली बिझिनेस वाहिन्यांच्या टीकरवर दिसते.
नाव: amol pati
तुमचा प्रश्न : gst for effect in share market ?
GST  हा विचार देशातील अर्थव्यवस्थेच्या सर्व अंगांवर कुठे चांगला तर कुठे विपरीत परिणाम करेल. हा विचार सर्व उद्योगांशी निगडीत असल्याने मार्केटमधील बहुतेक सेक्टरवर आणी त्यातील कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम करेल.
नाव: sudha chavan
तुमचा प्रश्न : Respected Madam, Future Option madhey market cha trand oolkhun call or put madhey kashi entry gheyvi? Pls margadarshan kara
‘ट्रेंड इज फ्रेंड’ हे शेअरमार्केटचे सूत्र आहे. मंदी असेल तर ‘PUT’ BUY करा आणी जर तेजी असेल तर ‘CALL’ BUY करा.
नाव: RAJENDRA MANE
तुमचा प्रश्न : HUDCO IPO will open in this month. Will you please explain about it, shall we buy it or not ??
‘HUDCO’ च्या IPO विषयी सविस्तर माहिती त्या आठवड्याच्या समालोचनात दिली आहे.
नाव: amit gade
तुमचा प्रश्न : mam mla short sell kay asto v to ksa kraycha ya vishyi mahiti pahije
माझ्या ब्लॉग नंबर ३२, ३३, ३४, ३५, ३६ या ब्लोगवर डेट्रेडची माहिती दिली आहे त्यात शॉर्ट सेलची माहिती मिळेल किंवा माझ्या पुस्तकात मिळेल.
नाव: Mahesh Bhide
तुमचा प्रश्न : Can i buy Century enka at 449 & delta corp at 281
मी शेअर मार्केट शिकवते. कोणता शेअर घ्यावा हे सांगत नाही. कारण त्यामुळे माझे वाचक परावलंबी होण्याचा धोका संभवतो.
नाव: poonam ghadge
तुमचा प्रश्न : share market madhe invest karaych asel tar broker chi garaj aahe ka ?
ब्रोकर लागतोच. पण ब्रोकर म्हणजेच मध्यस्थ हा त्याचा अर्थ. ब्रोकर एखादी व्यक्ती, फर्म, कंपनी किंवा बँक असू शकते.
नाव: shivprasad
तुमचा प्रश्न : gst chi vibhagni kashi keli ahe centre and state
आपण रोजचे वर्तमानपत्र वाचले तरी आपण GST FRIENDLY बनाल. मी शेअर मार्केट शिकवते. GST नव्हे. आणी GST चा परीणाम कोणत्या शेअरवर कसा, कोणत्या कंपनीला फायदा होईल हे शिकवते. यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु आहे.
GST हा नवीन आणी सतत बदलणारा विषय आहे. त्याचे विविध परिणाम १ जुलैला लागू झाल्यापासून तिसऱ्या तिमाहीत दिसू लागतील.
नाव: mahendra patil
तुमचा प्रश्न : we have purches HINDUSTAN ZINK AT RS. 320 [23/03/2017] but now price have go down so please guidance me HOLD OR SELL
ठराविक शेअरवर मी मत व्यक्त करत नाही.
नाव: Vishal
तुमचा प्रश्न :
1.Colgate VR 3 e/s anounce zala aahe. On Jr mi to share , devident chi rukam a/c madhe yeniya aadhi vikla TR mala te rupee miltil ki te yeniya sathi portfolio madhe share aasava lagto?
रेकोर्ड डेटला तुमच्या DEMAT अकौंटवर शेअर्स जमा असतील तरच बोनस लाभांश, स्प्लिट अशा कॉर्पोरेट एक्शनचा फायदा मिळतो. माझ्या पुस्तकात मी रेकोर्ड डेट आणी EX डेट याविषयी सविस्तर चर्चा केली आहे ती वाचावी.
२. Jr ekada share la khare di karniya aadhi devident jahir zala aasel Ani devident vatpavelie Jr to maziya portfolio madhe aasel TR devident konala Mikel?
रेकोर्ड डेटला तुमच्या DEMAT अकौंटवर शेअर्स जमा असतील तरच बोनस लाभांश, स्प्लिट अशा कॉर्पोरेट एक्शनचा फायदा मिळतो
नाव: Dhananjay Kale
तुमचा प्रश्न : Madam, me tumche blog regular vachto,trading thoda far mahiti zala ahe pan share select karta yet nahi news paper vachto news pahto intra day karto ahe sadhya chhotya pramanat tumhi sangitlyapramane pan me ekhada share ghetla ki to lagech padayla suruvat hote asha padhatine maze gelya 1 mahinyat 200 rs.profit ani 400 rs.loss zala me kasa drishtikon thevava please sanga?
तुम्ही शेअरची वर्षभरातली किमान आणी कमाल किंमत पहावी. रिस्क-रिवार्ड रेशियो पहावा आणी नंतरच ट्रेडिंग करावे. आपण डेट्रेड करताना तो अल्पजीवी आणी पट्कन पण मर्यादित नफा मिळवून देणारा ट्रेड आहे. हे लक्षात ठेवावे. जर तुम्ही जास्त वाट बघत बसाल तर बातमीचा परिणाम निघून जातो आणी शेअर तुमच्याकडे राहून जातात.नाव डे ट्रेड असले तरी हा ट्रेड कधी कधी ५ ते १० मिनिटात संपतो आणी शेअर त्याच्या पूर्वीच्या किमतीला येऊन बसतो.
नाव: suraj khandagale
तुमचा प्रश्न : what is mean by sharemarket ? give me details
कंपनीच्या भागभांडवलाची खरेदी विक्री ज्या मार्केटमध्ये केली जाते त्याला शेअरमार्केट म्हणतात.
नाव: rushikesh suryawanshi
तुमचा प्रश्न : mam, atta demat account open kelya nantr instruction sleep chi garaj lagte Ka?
instruction sleep mhanje Kay?
ब्रोकर PO ( पॉवर ऑफ ATTORNEY) घेतो त्यामुळे तुम्हाला DIS (डिलिव्हरी INSTRUCTION  स्लीप) भरून द्यावी लागत नाही.
DIS म्हणजे तुम्ही शेअर्स विकले आणी ते तुमच्या ‘DEMAT’अकौंट वरून वजा करण्यासाठी तुम्ही दिलेले अधिकारपत्र असते.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Res mam, shayers delivery mhanaje aapan aaplya dmat Ac made shayers kitihi vel theua shakto ka? Pahijhe tevha sell karu shakto? Delivery made margin kiti aaste? Plz guide? Thank u.
शेअर खरेदी करून तूम्ही त्याची किंमत दिल्यावर तुम्ही कितीही वर्ष ठेवू शकता तुम्ही दिलेल्या शेअर्सची पूर्ण किंमत दिल्यावर मार्जीनची गरज नाही.
नाव: Vaibhav Dhotre
तुमचा प्रश्न : 1) News

 1. i) तुम्ही सर्व बातम्यांसाठी साठी कोणता माध्यम वापरता?
 2. ii) जर websiteअसेल तर कोणती ज्याद्वारे तात्काळ बातम्या मिळतील?

वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या उद्योगाशीसंबंधीत वाहिन्या तसेच इंटरनेटवर या बातम्या उपलब्ध असतात. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर बातम्या ऐकल्या तर तुम्हाला तात्काल बातम्या मिळू शकतात.
2)Buy Back
i)Nucleus software चे shares buy back होणार आहेत. तर ते shares कधीपासून कधीपर्यंत होल्ड कराव्या लागतील?
iii) व ती माहिती कुठल्या ठिकाणावरून मिळवायची?
iii) जो प्रॉफिट होईल तो कसा मिळतो म्हणजे बँक का ट्रेडिंग account?
BUY BACK च्या प्रक्रियेवर मी ब्लॉग नंबर ५८ लिहिला आहे. माझ्या पुस्तकातही ही माहिती आहे. विशिष्ट कंपनीच्या BUY BACK विषयी तुम्हाला BSE च्या वेबसाईटवर जाऊन त्या त्या कंपनीचे पेज उघडले तर माहिती मिळू शकते.
नाव: दिलीप नाईकरे
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम आपल्या अनुभवातून आम्हास दिलेल्या प्रत्येक माहिती खूप छान आहे.
माझा असा प्रश्न आहे कि आपण या सर्व कंपन्यांच्या बातम्या कुठून मिळवता
वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या उद्योगाशीसंबंधीत वाहिन्या तसेच इंटरनेटवर या बातम्या उपलब्ध असतात. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर तुम्ही जर ऐकल्या तर तुम्हाला तात्काल बातम्या मिळू शकतात.
नाव: Swapnil Patil
तुमचा प्रश्न : Mam, tumhala itki sagli iformation milte kuthun ? te dekhil separate ashi. For example corporate action, international news, Govt, etc…please kahi sources sanga jenekarun mi tya news cha or event cha velich upyog karu shaken..
हल्ली मोबाईलवरील इंटरनेटवर दूरदर्शनच्या उद्योगाशी निगडीत सर्व वाहिन्या दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही टी व्ही समोर नसलात तरी तुम्हाला या बातम्या कळू शकतात.
नाव: Aditya
तुमचा प्रश्न : Which is trade platform offer less brokerage charge
तुमच्या ट्रेडिंगच्या उलाढालीच्या प्रमाणात ब्रोकरचे चार्ज बदलू शकतात. या विशिष्ट संकल्पनेची तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे चौकशी करावी.
नाव: Rahul Ghule
तुमचा प्रश्न : Madam, I want sources which I should follow to remain update regarding news of stock market. i.e. site, news paper or tv channel etc.
तुम्ही टीव्हीच्या बिझिनेस वाहिन्यांवर किंवा इंटरनेटवर बातम्या ऐकून, वाचून अपडेट राहू शकता.
नाव: rupali chavan
तुमचा प्रश्न : share market tejit kiva mandit ahe ksa olkaycha
हायर टॉप आणी हायर बॉटम जर होत असेल आणी वाढत्या VOLUMEने होत असतील तर मार्केट तेजीत आहे असे समजावे. लोअर टॉप आणी लोअर बॉटम होत असेल आणी तेही वाढत्या VOLUME ने होत असतील तर मार्केट मध्ये मंदी आहे असे समजावे.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Res mam, majhaa prashna aasa aahe ki ekach bank account varun 2 te 3 dmat account aani trading account operate houa shakata ka? Thank u.
ज्या लोकांच्या नावे DEMAT अकौंट असेल त्या लोकांचे नाव बँकेच्या बचत खात्यात असले पाहिजे. आणी ब्रोकरकडील ट्रेडिंग अकौंटमध्ये या बचत खात्याची नोंद केली पाहिजे.
नाव: karad Ravindra
तुमचा प्रश्न : mi icici bankeche 10 shares 21.04.2017 roji ani wipro che 4 share 13.04.2017 roji vikat ghetale ahet tar ata sambndhit kampanyanchya nikalabarobar jahir bonus nusar mi bonus share sathi patra asel kay ani to bonus share mazya dmat accountla kadhi pahayala miltil. ani hi mahiti kothun kalate tehi sanga mhanaje next time tithunach pahata yeil
माझा बोनसवरचा ब्लॉग नंबर ५६ वाचा ह्या बद्दलची माहिती माझ्या पुस्तकातही आहे.  ICICI बँकेने १:१० असा बोनस जाहीर केल्याने तुम्हास १ बोनस शेअर मिळण्यासाठी १० शेअर्सची खरेदी करावी लागेल.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Res. Mam, mala short selling ya conceptvishayi vistarane mahiti havi hoti. Karan tumachi sangnyachi bhasha simple aaste. Thank u
माझे डेट्रेड विषयी ब्लॉग नंबर ३२ ते ३५ वाचा. त्यात ही माहिती आहे.
नाव: nikhil pawar
तुमचा प्रश्न : madam 10 march te 15 march yaa veli BHARAT ELECTICALS LIMITED che shear down ka zale aahet. kahi sangaal ka?
शेअर्सची किंमत पडणे किंवा वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुम्ही भेलच्या शेअरचा १० मार्च ते १५ मार्च या दरम्यानचा चार्ट बघा. रेझिस्टन्सची पातळी असते किंवा काही मुलभूत कारण असते. याविषयीची अधिक माहिती माझ्या पुस्तकात मिळेल.
नाव: arun anna zadgea
तुमचा प्रश्न : sir new share market madhe me ata enter kart aahe ani me thoda abhyas pan me yacha kela aahe tar me yatu aajun kas share market expert banu shakto ani sir me m.com zale aahe ata sir me ya madhe expert banu ichito sir mala plz coprate kara ani changlya tips dya
सतत मार्केटचा मागोवा घ्या. प्रत्येक घटनेचा आणी त्याच्या शेअर्सच्या किमतीवरील परिणामांचा अभ्यास करा.
नाव: Dnyaneshwar Girase
तुमचा प्रश्न : Namaste madam, Madam mi TV var bagat asto ki expert sangtat ki company cha shear mahag jhala. Kiva swast jhala he kashyavarun kadale. Sangal ka madam please
शेअर स्वस्त झाला किंवा महाग झाला हे पहाण्यासाठी कंपनीची गुणवत्ता, आणी TRACK रेकोर्ड, ROE, EPS, प्राईस टू बुक, ऑपरेटिंग मार्जिन, इत्यादी रेशियो पहावे लागतात. माझ्या पुस्तकात या विषयी विवेचन आहे. …
नाव: Gopal N MIrge
तुमचा प्रश्न : IPO ओव्हरसबस्क्राईब झाला. Mhnje kay zale
IPO मध्ये ऑफर केलेल्या शेअर्सच्या संख्येपेक्षा जेव्हा जास्त शेअर्ससाठी अर्ज (मागणी) येतात तेव्हा तो IPO ओव्हरसबस्क्राईब झाला असे म्हणतात. IPO मध्ये १००० शेअर्स ऑफर केले असतील आणी त्यासाठी १०००० शेअर्स साठी मागणी अर्ज  आले तर तो IPO १० वेळा ओव्हरसबस्क्राईब झाला असे म्हणतात.
नाव: Shweta adake
तुमचा प्रश्न : Jk tyers Mi 175 chya price la vikt ghetle ahet ..but ata tyachi price far kmi zali ahe …wat to do
मी ठराविक शेअर्सबद्दल सांगत नाही. पण रबराचे भाव कमी होत आहेत आणी क्रूडचा भावही कमी आहे. त्यामुळे टायर कंपन्यांच्या शेअर्सला चांगले दिवस आले आहेत. अल्प मुदतीसाठी ट्रेड करायचा असल्यास त्या त्या कंपनीचा चार्ट बघावा.
नाव: RAHUL BELURE
तुमचा प्रश्न : DP charge Kay aasto v kashawar aadharit aasto DP charge sarvana sarkha ch aasto ka
DP चार्ज शेअर विकल्यावर लागतो पण प्रत्येक शेअरमागे नाही. तर प्रत्येक कंपनीच्या शेअर्सवर असतो. म्हणजे एकाच कंपनीचा  १ शेअर  विकला किंवा १००० शेअर विकले तरी तेवढाच चार्ज पडतो. पण ५ कंपन्यांचे प्रत्येकी ५ शेअर्स विकले तर प्रत्येक कंपनीच्या शेअर्ससाठी वेगळा DP  चार्ज पडेल.
नाव: Amit Sutar
तुमचा प्रश्न : What is the circuit?
सर्किट म्हणजे खरेदीची किंमत आणी विक्रीची किंमत किती वाढू शकते आणी किती कमी होऊ शकते या साठी ठरवलेली मर्यादा. २% पासून ते २०% पर्यंत सर्किट लागते. या विषयी खुलासेवार माहिती माझ्या पुस्तकात दिली आहे.
नाव: nitin sawant
तुमचा प्रश्न : GST sathi tax bharnya sathis register karave lagte ? GST monthly bharava lagto ?
मी शेअरमार्केट संबंधीच माहिती देते.
नाव: Ravalnath Appa Patil
तुमचा प्रश्न : Respected Madam, !!!!!!!! Greeting of the day!!!!!!!!!!. I want to start trading in share market. How can i start and how much funds required to start trading in share market. Can you help me.
Thanks & Regards
Ravalnath Patil
आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्या ब्लॉग वर दिलेली आहेत. लक्षपूर्वक वाचा.
नाव: prashant mathye
तुमचा प्रश्न : me tumchi share market sambandhi sarv mahiti vachali..malahi share market market madhye entry karaychi aahe…dmat account aani trading account he fakt broker kadunach open hou shakte ka ???…aani maza dusra prashna… shares chi buying selling aapan swata karu shakto ka?..ki tyasathi pan broker chi help ghyavi lagel.
तुम्ही बँकेत किंवा ब्रोकरकडे DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट उघडून ऑन-लाईन ट्रेडिंग करू शकता.
नाव: prashant mathye
तुमचा प्रश्न : share sell kartana aapan jo bhav lavto tya bhavala na vikla gelyas te shares return aaplyala miltat ki market madhye jo current bhav chalu asto tyach bhavane vikun takayche.
तुमच्या टाकलेल्या भावाला शेअर विकला गेला नाही तर दिवसाअखेरी तुमची ऑर्डर रद्द होते. मार्केटच्या वेळात तुम्ही ऑर्डर बदलू शकता. माझा ब्लॉग २५ आणी २६ वाचा.
 नाव: VIKRANT
तुमचा प्रश्न : g s t upade mahiti kase karavi
आपण वर्तमानपत्रातून किंवा इंटरनेटवरून किंवा टीव्हीच्या बिझिनेस वाहिन्यांवरून ही माहिती गोळा करू शकता.
नाव: Pravin Desai
तुमचा प्रश्न : नमस्कार मी श्री प्रविण् गोविंद देसाई व्यवसाय नोकरी माझी इच्छा आहे की शेअर माकेट विषयी जाणून घेण्याची
आपण माझा ब्लोग, माझे पुस्तक तसेच बिझिनेस संबंधी वर्तमानपत्रे आणी दूरदर्शनवरील बिझिनेस वाहिन्या यावरून शेअर मार्केट आणी त्यात चालणाऱ्या व्यवहारांच्या प्रक्रियेची माहिती मिळवा.
नाव: Pravin Desai
तुमचा प्रश्न : सुरवात कशी करायची व काेठून
आपली प्राथमिक तयारी झाली की आपण DEMAT अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट उघडून सुरुवात करावी.

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Jan – Feb 2017

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: mahendra shamkant bhamare
तुमचा प्रश्न : for long trem which bluechip stocks to buy
तुम्ही माझे ब्लॉग लक्षपूर्वक वाचलेत तर तुम्ही स्वतः लॉंग टर्मसाठी ब्ल्यू चीप कंपन्यांची यादी बनवू शकता.
नाव: सचिन मळेकर
तुमचा प्रश्न : F&O मार्केट बद्दल सविस्तर माहिती द्यावी.
वेळ मिळेल तेव्हा आपल्या सूचनेचा विचार करू.
नाव: amol chavan
तुमचा प्रश्न : share market badhal mala kahich Basic mahiti nahi pn mala share market madhe investment karaychi aahe. tumhi mala kay madat karu shakta..?
मी माझ्या ब्लॉगनधून, माझ्या पुस्तकातून, मनी प्लस सारख्या मासिकातून सरळ सोप्या आणी समजण्यास सुलभ अशा भाषेतून माहिती पुरविली आहे ती वाचा.
नाव: Pravin ramchandra Ganjave
तुमचा प्रश्न : I have invest in 100000 ruppes in stock which 1 is the best for 15 years like long term
माझे ब्लॉग आणी पुस्तकाच्या आधाराने तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. फक्त एकच लक्षात ठेवा तंत्रविज्ञान फार वेगाने प्रगतीशील होत आहे. त्यामुळे दीर्घ मुदत म्हणजे ५ वर्षे ते ७ वर्षे पर्यंतच समजावी.
नाव: swaraj bhad
तुमचा प्रश्न : share market madhe kasa paisa invest karycha ani tycha fayda kasa ky hoto
तुम्ही माझे ब्लॉग वाचा, माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा उपयोग करा.
नाव: shubham khole
तुमचा प्रश्न : share market kase vaprun tyacha fayada kasa milvava ? share market madhe kasa paisa invest karycha ani tycha fayda kasa ky hoto
तुम्ही माझे ब्लॉग वाचा, माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा उपयोग करा.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : domey portfailo cha faida hou shakto ka va kasa
डमी पोर्टफ़ोलिओचा उपयोग करून आपले अंदाज बरोबर येतात का? आपला अभ्यास योग्य रीतीने होत आहे का? हे समजते. थोडक्यात सांगायचे तर परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर घड्याळ लावून पेपर सोडवणे होय. कोणत्याही कार्यक्रमाची रंगीत तालीम म्हणजेच डमी पोर्टफोलीओ मुले फायदा होतो नुकसान टळते .
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : share anlesas sathi jay websites aahet tache maitee
तुम्ही गुगल वापरून ह्या वेबसाईट शोधू शकता.
नाव: Yogesh
तुमचा प्रश्न : Hello mam….F&O baddal kahi mahiti sanga…Pls
वेळ मिळाला की F&O बद्दल नाहीती जरूर देईन. …
नाव: prashant patil
तुमचा प्रश्न : madum me 0.05 pisyane trading keli tar parwadel ka.maji invesment 100000 rs ahe .me small cap madhe trading karanyasathi intrasted ahe.maje demat account angal broking madhe ahe ,brokrage charge delivari sathi 0.128 %
गल्लीत शिरण्याआधी हमरस्त्यावर चालण्याचा सराव करा. म्हणजेच आधी आपल्याला ब्लू चीप आणी लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्स मध्ये ट्रेडिंग करता येते का ? ते पहा. यात धोका कमी आणी फायदा जास्त असतो. हे जमल्यावरच तुम्ही स्माल कॅप किंवा पेनी शेअर्सच्या वाट्याला जावे. यासाठी पेनी शेअर्स वरील ब्लॉग वाचा.तुम्हाला परवडेल की माही हे तुम्हाला होणार्या फायद्यावर अवलंबून राहील. या बाबतीत ब्रोकर कमीतकमी किती ब्रोकरेज आकारेल याचीही चौकशी करा.
नाव: Ramdas
तुमचा प्रश्न : Jar ekhadi company share market madhun delisted jhali ter shareholder la tyani invest keleli Amt kashi parat milavta yete.
कंपनी स्वतःच्या इच्छेने डीलीस्ट झाली तर प्रत्येक शेअरसाठी जो भाव ठरेल त्याप्रमाणे पैसे मिळतात पण सेबीने डीलीस्ट केली तर कोर्टाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच तुमच्या शेअर्सचे पैसे, कोर्टात ठरेल त्या भावाने मिळतात.मी माझ्या पुस्तकात डीलीस्टींग वर एक भाग लिहिला आहे तो वाचा.
नाव: MANOJ bonde
तुमचा प्रश्न : Mam, trading karita acount kontya financial company madhe open karne thik rahil? Best name suggest Kara mam…… Kindly reply asap
DEMAT आणी ट्रेडिंग अकौंट कुठेही उघडा पण घराच्या जवळ किंवा ऑफिसच्या जवळ उघडा. म्हणजे पैसा आणी वेळ वाचेल.
नाव: Rushikesh Kulkarni
तुमचा प्रश्न : maja prashn asa ahe Call Put Mhnje Kay Ani call put madun kiti Profit yeu shakto Call put kadi karyla pahij
CALL आणी PUT म्हणजे अनुक्रमे तेजी आणी मंदीची स्थिती. याच्या रेशियो वरून तेजी येईल की मंदी येईल, मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये आहे की ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे याचा अंदाज येतो.
नाव: Akshay borase
तुमचा प्रश्न : Importance of d mat account
माझे ब्लोग नंबर ३१ आणी ३९ वाचा.
नाव: Milind Shedge
तुमचा प्रश्न : Q.1) Mi sadhya market madhe mandhan industrial company che 2000 share ghetle ahet 5 month hold kele ahet sadhya mi lost madhe ahe tar mi kay karave hold ya Sell karu.???
Q.2) Kontya sector madhe invest karne best ahe…..??
Q.3) Market madhe trading karnyacha uttam kal konta asnar …..?
आपण प्रत्येक शेअर मध्ये योग्य प्रमाणात आणी कोणत्याही टिप्सना बळी न पडता आपल्या अभ्यासानुसार गुंतवणूक/ट्रेडिंग केलीत तर भविष्यात अशी वेळ येणार नाही.आपले पैसे वेगवेगळ्या कंपन्यात थोडे थोडे गुंतवलेत तर रिस्क कमी होतो. माझा ब्लोग वाचा तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील.
नाव: पवन
तुमचा प्रश्न : नमस्कार, मी नुकताच शेअर मार्केट मध्ये उतरलो आहे, मागचे ६ महिने मी तुमचे हे page, तसेच मिळेल तिथून या बद्दल अभ्यास करत होतो पण तरीही मला काही concepts समजल्या नाहीत, आपणाकडून direct प्रश्न विचारून मला त्या समजतील अशी अपेक्षा आहे. value at risk,Return on Capital Employee,How can we find current Ratio, या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे, धन्यवाद..!
तुम्ही किती भांडवल गुंतवले आणी त्यावर तुम्हाला किती वेळात आणी किती फायदा झाला याला RETURN ON कॅपिटल EMPLOYED असे म्हणतात. ‘VALUE AT RISK’ म्हणजे  तुम्ही किती धोका पत्करत आहात. करंट रेशियो म्हणजे कंपनीची करंट देणी करंट ASSET मधून फेडण्याची क्षमता. अकौंटंन्सीच्या कोठल्याही क्रमिक पुस्तकात तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळवता येईल.
नाव: Darshan Shirodkar
तुमचा प्रश्न : Mi Stock market shetrat navin ahe, Mala hya market madhe trading karay che ahe, pan kutlya hi shetrat janya adhi tyache shikshan ghene garjeche ahe, ase maze pranjal mat ahe.Mala Trading shikayche ahe, tar tumhi mala shikval ka?? Thank you in advance.
मी सध्या प्रशिक्षण वर्ग घेते. माझे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तुम्ही माझा ब्लॉग ही वाचू शकता.
नाव: yogesh gangurde
तुमचा प्रश्न : Hello madam. Maja qustion ASA aahe ki brokerage share buy kele teva ghetle jate aani jeva share sale karto teva pan ghetle jate ka?
ब्रोकरेज शेअर्स खरेदी आणी विक्री करताना दोन्ही वेळेस आकारले जाते.
नाव: SACHIN
तुमचा प्रश्न : मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे आहे. रोज खरेदी विक्री व्यवहार कसा करायचा? तसेच मी घरी बसून हे करू शकतो का ? तसेच हे करण्यासाठी कमीत कमी किती रुपयांन पासून ही सुरुवात करावी ? डीम्याट account काढून हे व्यवहार कसे करावे ?
खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी माझे पुस्तक, माझा ब्लॉग, प्रशिक्षण वर्ग याचा उपयोग करा. तुम्ही शेअर मार्केटचे काम टी व्ही आणी इंटरनेटच्या मदतीने घरच्याघरी करू शकता. कितीही रुपयापासून सुरुवात करू शकता.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : cash market paksha option madhe lok trading jast ka kartat
तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जे लोक वायदा बाजारात जास्त ट्रेडिंग करतात तेच देऊ शकतील.
नाव: Mahesh jadhav
तुमचा प्रश्न : e-dinar kasha prakare kam karte ani future mdhe ky position hoil? te pan Bitcoin sarke High price la jail ki band hoil
मी फक्त इक्विटीबद्दल शंकानिरसन करू शकेन.
नाव: karan gholape
तुमचा प्रश्न : BSE cha ipo ala ahe.tyachyababat kay mat ahe.details mahiti sanga
मी BSE IPO बद्दल BLOG मध्ये माहिती दिली आहे.
नाव: GAJANAN TUMDAM
तुमचा प्रश्न : Madam,namaskar. Madam mee ekhade warshapasun share ghene wa wikane karato.mazyakade 2 demat account aahet.1 Anand Rathi broker che,wa 2 re Axis Bank securitys che.mala suruwatil barach tota zala.nanter matra mee tumacha blog wachun kahi goshti shkalo.wa aata mala khup tota hot nahi.mee paise kamawit aaho.pan mala ek prashn ? ajun sodawata aala nahi.”STOP LOSE MANJE KAY WA TO KASA LAWAYACHA.THOD WISTARANE SANGAL KA. THANKS…! Apala snehi GAJANAN TUMDAM,DATTAWADI  NAGPUR M.S.
तोटा होणे कमी झाले हे वाचून खूप आनंद झाला. माझ्या श्रमाचे चीज झाले. तुम्ही मला कळवले याबद्दल आभारी आहे.
मी STOPLOSS या विषयावर ब्लॉग नंबर ४६ मध्ये विस्ताराने लिहिले आहे त्याचा उपयोग करा.
नाव: Girish
तुमचा प्रश्न : What is meant by Optionally convertible preferred stock?
हा एक मध्यम मार्ग आहे. ठराविक उत्पन्न मिळत राहते.काही काळाने त्याचे इक्विटी शेअर्समध्ये रुपांतर आपल्याला पाहिजे तर करू शकता. शेअरच्या वाढत्या किमतीचा फायदा मिळतो. कंपनीचे  दिवाळे वाजल्यास कॅपिटल परत मिळताना प्राथमिकता मिळते. पण बऱ्याच वेळेला या शेअर्सला वोटिंग अधिकार नसतात.
नाव: vijay
तुमचा प्रश्न : madam, mi 1 mahinya purvi trading chalu kele aahe, mala Technical Analysis sathi mahiti janun Karun ghyachi aahe aahe tari kahi tips sathi krupya margdarshan kara.
माझे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात टेक्निकल विश्लेषणाविषयी भरपूर माहिती आहे. किंवा आता मी ब्लॉगमधूनही माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्याचा लाभ घ्या.
नाव: VIjay
तुमचा प्रश्न : madam, tumchi ahmednagar madhe class aahe ka ? asel tar sanga please.
माझे प्रशिक्षण वर्ग ठाण्याला आहेत. तुम्हाला हवं असल्यासंअहमदनगरलं आपण काही lectures ठरवू शकतो. पण त्यासाठी एखादा छोटा group हवा.
नाव: Laxmikant Gakhare
तुमचा प्रश्न : what is IPO ?
IPO  म्हणजे ‘INITIAL PUBLIC OFFER. ज्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये खरेदीविक्रीसाठी उपलब्ध नसतात ते  उपलब्ध होण्याची प्रक्रिया होय. ब्लोग नंबर ४७ ते ५३ IPO च्या संदर्भात लिहिले आहेत. ते वाचा.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Respected mam majhyakade PC nahiye tar toparyant me android phonevar trading karnyachi suvidha aahe ka. Aani me angelbroking madhe trading uaghatoy tar tya sathi broaker ne ek cancelled aani ek angelbroking LA denyasathi few amount sign chaque magitala aahe tar me kay karu plz guide thank you
तुमच्याकडे PC नसेल तरी समस्या नाही तुम्ही मोबाईलच्या इंटरनेटवर तुम्हाला शेअर्स विषयी माहिती मिळू शकेल. ब्रोकर आकारत असलेला प्रत्येक चार्ज कशासाठी आहे ते विचारा. कोरे चेक मागत असले तर ते क्रॉस करून आणी त्यावर PAYEE म्हणून तुमच्या ब्रोकरचे नाव लिहून द्या. ते चेक तुमच्या अकौंटमध्ये बरोबर रकमेचेच पास होत आहेत याकडे लक्ष दया.
नाव: DIPAK HARISHCHANDRA PAWAR
तुमचा प्रश्न : Madam, Future market aani option market badal 1 blog liha…Because tumi explain kelela lagech samjata.
मला वेळ मिळाला की ‘वायदा बाजारावर’ मी ब्लॉग लिहीन.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : open interest vadecha trading madhe kai faida hoto , kiva kurun gava
फ्युचर किंवा आप्शंस contract मध्ये जेवढी contracts fulfill झाली बाहीत त्यांची संख्या किंवा दुसऱ्या शब्दात out standing contracts.
नाव: Mrs. Rama Mahale.
तुमचा प्रश्न : Trigger value mhanaje nakki ky ani ticha upyog kadhi v kasa karayacha?
ट्रिगर value म्हणजे जी value टच झाली तर तुमची ऑर्डर activate होते. आपल्याला होणारा तोटा  मर्यादित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
नाव: Swati
तुमचा प्रश्न : Mam mene b.tech kiya hai…par muze share market me ana hai…muze konsa course aur kahase krna hoga…taki muze uske bare me knowledge mile…aur me share market me a saku…plz mam help me
शायद आप मैने लिखे हुये ब्लॉग पढ सकती है, इतनी मराठी जानती हैI आप मेरे ब्लोग ध्यांनसे पढेI मेरी किताबभी मार्केटमे आई है I और मैने प्रशिक्षण वर्ग चालू किये है आप चाहे तो लाभ उठा सक्ती है I
नाव: Kakasaheb patil
तुमचा प्रश्न : Can you explain future call &put option call &put please.
वायदा बाजार समजावू शकते पण आता वेळ मिळत नाही वेळ मिळाल्यास जरूर विचार करेन.
नाव: Tasmira
तुमचा प्रश्न : mala stock market madhe pravesh karaycha aahe, survat kashi karu, mi tumche sarv blog vachle aahet aata mala hi as vathtay ki mi hi he karav. mala please margdarshan kara.
मला वाटती तुम्हाला धैर्य होत नाही. अशा वेळेला VIRTUAL ट्रेडिंग करून आपले निर्णय बरोबर येतात की नाही ते पाहून मगच पैसे गुंतवावेत. सुरुवातीला ज्यात धोका कमी आहे अशा शेअर्समध्ये गुंतवणूक/ट्रेडिंग करून पाहावे.
नाव: Navnath salunke
तुमचा प्रश्न : मला शेअर बाजाराची पुर्ण माहिती हवी आहे.
माझ्या ब्लॉगवरील सर्व लेख काळजीपूर्वक वाचा. दर शनिवारी ब्लोग टाकला जातो त्यात गेल्या आठवड्यातील शेअर मार्केटशीसंबंधीत घडामोडी असतात. तो ब्लॉग तुम्ही वाचल्यास तुमचे ज्ञान अद्ययावत राहील.
नाव: Dhananjay Kulkarni
तुमचा प्रश्न : Idea cellular nifty la delist honar ase kalale. Me magachya varshi tumacha blog vachun stock market madhe invest suru keli ahe. Tevach me idea cha share long term investment sathi ghetla ahe. Karan me government employee ahe. Pan ata kay karave asa prashna padala ahe. Krupaya apan margdarshan karave.
“आयडिया” डीलीस्ट होणार म्हणून घाबरण्याचे कारण नाही. आयडिया आणी वोडाफोन या कंपन्यांचे मर्जर होणार आहे असे गाजते आहे. हे मर्जर होईल तेव्हा तुम्हाला नव्या कंपनीचे शेअर्स मिळतील. अन्यथा खरेदी करून १ वर्ष होऊन गेले असल्यास तुम्ही ती मार्केटमध्ये विकू शकता. (तुम्हाला भीती वाटत असल्यास.)
नाव: Vishal Jawle
तुमचा प्रश्न : Madam Namskar , Long term investment karun wealth creation sathi ekhada stock kasa shodhayacha ? ani ekhada stock aplyala tasa vaatlyas tyacha follow up nakki kasa thevaycha mhanje tyache quartly yenarya report madhe nakki kashavar (sales ,ebita ,eps ,roe ,roce , financial ratios etc) laksh thevave jenekarun apan yogya stock nivdala ahe v to aplyasathi 10-15 varshat multibagger tharel yaachi khatri hoil . Pls kalva.
तुम्ही ब्लॉग आणी पुस्तक वाचा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: Lahu pandhawale
तुमचा प्रश्न : डी मॅट्रीक खाते उघडल्यावर शेअर खरेदी साठी कसा निवडावा कंपन्यांची यादी मिळते का शेअर ची माहिती जसे की- A ग्रूप चा आहे ब्ल्यू चीप चा
DEMAT अकौंट उघडल्यावर कोणतीही माहिती मिळत नाही. तुम्हाला BSE किंवा NSE च्या साईटवर जाऊन किंवा अर्थविषयक इंटरनेट साईट्सवरून, वर्तमानपत्रातून किंवा दूरदर्शन वाहिन्यांवरून ती मिळवावी लागते.
नाव: MOHAN ALVE
तुमचा प्रश्न : daily margin statement mahnje kay?
जर तुम्ही शेअर खरेदी केला आणी त्याची पूर्ण रक्कम दिली नाही तर ब्रोकर तुमचे शेअर्स त्याने गुंतवलेल्या पैशासाठी सिक्युरिटी म्हणून ठेवून घेतो. जर तुमच्या शेअर्सच्या किमतीत घट झाली तर तुम्हाला तेवढे मार्जीन वाढवावे लागते.जर ब्रोकरच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मार्जिन  भरले नाही तर ब्रोकर कमी झालेल्या किमतीला शेअर विकून त्याचे पैसे सुरक्षित करतो. सेबीच्या नियमाप्रमाणे हे स्टेटमेंट तुम्हाला ब्रोकरने दिले पाहिजे.
नाव: Aniket
तुमचा प्रश्न : Mam maza que asa ahe ki Demat account open karnyasathi aplya bank account mde kiti balance asayla hava? And Demet account chalu zalyavr tya demat account vr survatila kiti balance asava lagto?
‘DEMAT’ अकौंट ओपन करण्यासाठी बँक अकौंटमध्ये किती पैसे पाहिजेत असा कोठलाही नियम नाही. फक्त बँकेत ‘DEMAT’ अकौंट उघडायचा असल्यास बँक तुमचा बचत अकौंट तुम्ही  समाधानकारक रीत्या चालवता की नाही ते बघू शकते.’ DEMAT’अकौंटमध्ये फक्त शेअर्सच्या खरेदी विक्रीची नोंद होत असल्यामुळे BALANCE नेहेमी शेअर्सच्या संख्येमध्ये असतो.
नाव: Tushar kamble
तुमचा प्रश्न : BTST म्हणजे काय ?
“बाय टुडे सेल टूमॉरो” म्हणजे आज खरेदी करा उद्या विका. यात आपल्याला डीलीव्हरीचे ब्रोकरेज लागत असल्यामुळे त्यापेक्षा नफ्याचे प्रमाण जास्त आहे की नाही ते पहावे. जास्त माहितीसाठी माझे पुस्तक पहावे. 
नाव: दिलीप
तुमचा प्रश्न : आपण जेव्हा एखादा शेअर्स विकतो त्या मध्ये आणि प्रोफिट मार्जिंग कित असायला हवे आणि तुम्हि पोस्ट केलेली ब्रोकर रिसिट मला पुन्हा पाहायची असल्यास मला भेटेल का
शेअर मार्केट म्हणजे अपेक्षांचे मार्केट आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनाप्रमाणे अपेक्षा करतो. पण आपण गुंतवणुकीच्या इतर प्रकारावर मिळणाऱ्या नफ्याशी तुलना करून आणी आपल्याला असलेल्या पैशाच्या आणी वेळेच्या सवडीप्रमाणे प्रत्येक शेअरच्या बाबतीत हे प्रमाण ठरवावे. आपला दृष्टीकोन लवचिक ठेवावा म्हणजे मिळणारा फायदा हातातून जात नाही. मिळणारा फायदा किती वेळात आणी किती प्रमाणात मिळतो आहे त्यावरूनही तुम्ही हे प्रमाण निश्चित करू शकता. ४ महिन्यात १०% फायदा होत असल्यास तो वर्षाला ३०% झाला.
नाव: Sudam jadhav
तुमचा प्रश्न : Mam,can i open demat account with cosmos bank
तुम्हाला हवा तिथे तुमच्या सोयीनुसार DEMAT अकौंट उघडा. फक्त ही सेवा किती वेळ आणी किती सुलभतेने उपलब्ध आहे ते पहावे.
नाव: Amar mandhare
तुमचा प्रश्न : Madam,SESNSEX and NIFTY exact brief kara na mla,mhnje doni cha arth kaay??
BSE वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी ३० निवडक कंपन्यांच्या निर्देशांकाला सेन्सेक्स आणी NSE वर लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी ५० निवडक कंपन्यांच्या निर्देशांकाला निफ्टी असे म्हणतात. या निर्देशांकात वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्सना वेगवेगळे वेटेज दिलेले आहे.
नाव: प्रतीक
तुमचा प्रश्न : IPO म्हणजे काय? चांगला IPO कसा ओळखावा? अधिक विश्लेषणात्मक माहिती हवी होती.
प्रत्येक IPO जाहीर झाल्यानंतर वर्तमानपत्रातून, दूरदर्शनच्या अर्थविषयक वाहिन्यांवरून वारंवार माहिती दिली जाते. आमच्या साप्ताहिक समालोचनातून येणाऱ्या IPO विषयी माहिती देत असतो. त्यावरून IPO चांगला आहे की नाही हा निर्णय आपण घेऊ शकता.
नाव: deepak
तुमचा प्रश्न : Good morning ,कमोडिटि मध्ये खरेदि विक्रि कशि असते,
मी कमोडीटी मार्केटविषयी अजून काही सांगत नाही.
नाव: sagar dongare
तुमचा प्रश्न : Buy silver at 43800 rs march expiary now sell this silver or hold
मी कमोडीटी मार्केटविषयी अजून काही सांगत नाही.
नाव: AMIT PATHADE
तुमचा प्रश्न : Dimat अकाउन्ट उघडण्यासाठी कीती खर्च लागतो.आणि कमीत कमी कीती रक्कम गुतवणूक करावी लागती.
DEMAT अकौंट उघडण्याचा खर्च सेबीच्या नियमानुसार लागतो. तुम्हाला जेव्हा DEMAT अकौंट उघडायचा असेल तेव्हा चौकशी करा. आपण कितीही रक्कम गुंतवू शकता.
 

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं : Sept – Dec 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: अंबादास
तुमचा प्रश्न : नमस्कार, मला ना Real Estate मधे गुंतवणुक करायची आहे. आणि मी ह्या क्षेत्रात खुपच नविन आहे. तर मला सुरवात कमीत कमी ने सुरवात करायची आहे. क्रुपया : तर मला माझा उत्तर इमेल द्वारे केला तर खुपच उत्तम ठरेल.
तुम्हाला रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची आहे की रिअल estate क्षत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे याचा अर्थबोध तुमच्या प्रश्नातून होत नाही. जर रिअल इस्टेट
क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही Rs १००० पासूनही सुरुवात करू शकता.
नाव: kishor salunkhe
तुमचा प्रश्न : मॅडम, fundamental analysis कस करावं यावर एक लेख लिहा , हि विनंती .
fundamental analysis मध्ये कंपनीची कोणकोणत्या गोष्टी पाहाव्यात आणि हि कंपनी इन्व्हेस्टमेंट साठी योग्य आहे कि नाही कसे ठरवावे ?एखादा कोइ स्टडी किंवा दोन कंपन्यांमधील comparison करून सांगावे
तुम्ही सर्व ब्लोग वाचाल तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
नाव: malhari salunkhe
तुमचा प्रश्न : PE RATIO & EPS काय आहे कृपया एखाद उदाहरण देऊन सांगाल का plz … त्यावरून काय इंडिकेट होत?
P म्हणजे करंट मार्केट किंमत आणी E म्हणजे अर्निंग पर शेअर, या दोन्हींचे गुणोत्तर म्हणजे PE रेशियो = करंट मार्केट किंमत /अर्निंग पर शेअर . यावरून शेअरची करंट किंमत स्वस्त आहे की महाग आहे हे कळते. कंपनीचा शेअर EPS च्या किती पटीत चालला आहे हे समजते.
नाव: उमेश लक्ष्मण अजेटराव
तुमचा प्रश्न : मी शे अर मार्केट मध्ये नवीन असून, मला ह्याचा काहीच अनुभव नाही आणि मी रकम रुपये ५०००/- गुंतवणुकीसाठी लाऊ शकतो . कृपा करून मला योग्य ते मार्गदर्शन करावे
सर्व ब्लॉग वाचा.नंतरच निर्णय घ्या. वहीतल्या वहीत ट्रेड करून आपले किती निर्णय बरोबर येतात हे बघा. Rs ५००० पैकी प्रथम Rs २००० वापरा. आणी वहीतल्या वहीत लिहून ट्रेड करा.
नाव: ajit bhambid
तुमचा प्रश्न : Namaskar, Q1. Mazha income rs 25000 aahe swatacha ghar nahi rs 7000 rent pay karto ani balance 2000 paryant rahato, tar kay mi stock marketmadhye investment karu shakato.
Q2. tar kay mi stock market madhye start kuthun karayach.
दर महिन्याला शेअरमार्केटमध्ये गुंतवण्यासाठी Rs ५०० बाजूला काढून ठेवा. वर्षभर मार्केटचे निरीक्षण करून अभ्यास करा. आत्मविश्वास आणि मार्केटचे चित्र स्पष्ट झाल्यावर प्रत्यक्ष गुंतवणूक करा.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : Mala issue type baddal sanga ani tyacha company kashaprakare company use karte yamadhe share ghenarani kuthlya type che issue ghyavet
इशुचे प्रकार चार IPO (INITIAL PUBLIC OFFER), FPO ( FOLLOW ON PUBLIC OFFER), OFS ( OFFER FOR SALE), RIGHTS ISSUE  
आपण कंपनीचा अभ्यास करून चांगल्या कंपनीच्या IPO किंवा OFS मध्ये शेअर्ससाठी अर्ज करू शकतो.
नाव: PRAMOD JADHAV
तुमचा प्रश्न : 1) BID PRICE आणि OFFER PRICE यामधील फरक काय ?
2) आपण एखाद्या कंपनीचा शेयर खरेदी करतो तेव्हा EXACT कोणती खरेदी PRICE आपल्याला लागू होते. BID PRICE, OFFER PRICE कि CURRENT SHARE PRICE जि चालू आहे ?
बीड प्राईस म्हणजेच मागणी किंमत ही शेअर्स खरेदी करणारा ठरवतो. ऑफर प्राईस ही किंमत शेअर्स विक्री करणारा ठरवतो. आपण जेव्हा ऑन लाईन खरेदी करतो त्यावेळी ज्या किमतीला विकण्यासाठी विकणारा तयार असेल त्या किमतीला आपले शेअर खरेदी होतात
नाव: Datta Jadhav
तुमचा प्रश्न : Me 2 IPO ghetale ahet *RBL Bank ani ICICI Prudential Life ins. co pan sadhya doghet pan down madhe ahet Ipru che IPO ter open 1% down madhe jale hya doni IPO che future kase asnar please kahi idea deu saktat ka?
RBL चा IPO छान झाला. शेअरची कींमत Rs ४०० पर्यंत गेली होती. सध्या मार्केट पडते आहे त्याला RBL आणी ICICI PRU अपवाद कसे असतील.
नाव: Sachin Gundewadi
तुमचा प्रश्न : mala demat account open karyacha ahe bank madhun kela tar trading account pan bank kadun deta ka, Kay tyacha sathi dusrikad account open karav lagat, ani tumala mahiti asel tar ek account koti kadu te saga.
‘DEMAT” अकौंट आणी ट्रेडिंग अकौंट दोन्ही एकत्र एकाच बँकेत ओपन करता येतात
नाव: Samir Gholap
तुमचा प्रश्न : 1) What is the difference between future and option ?
फ्युचर मध्ये फायदा किंवा तोटा अमर्याद होऊ शकतो. ऑप्शन मध्ये तुम्ही ठरवाल आणी रिस्क घ्याल तेवढाच होतो.
नाव: पवन nirne
तुमचा प्रश्न : मी आपले आजपर्यंत १ ते ६१ सर्व लेख वाचले आहेत. सर्वप्रथम त्यातून खूप अशी माहिती भेटली त्यासाठी आपले खूप आभार, मी माझे महाविद्यालीन शिक्षण पूर्ण केले आहे आणि मार्केट मध्ये मला खूप आवड आहे तर मी माझाभ्यास कुठून आणि कसा सुरु करावा ते सजेस्ट कराल का?आणि शेअर च्या किमती पाहण्या साठी किवा equidity पाहण्या साठी कोणती web site आहे का कि मी ती पाहून अभ्यास करू शकेन?
दूरदर्शन वर सी एन बी सी टीव्ही १८, झी बिझिनेस, सी एन बी सी आवाज, ET NOW  इत्यादी शेअर मार्केटवर लाइव कवरेज करणार्या वाहिन्यांचे लाइव कवरेज ऐका.
नाव: patil prafull
तुमचा प्रश्न : processure of invest the mony in share marke
माझ्या ब्लोग मध्ये ही माहिती सविस्तर दिली आहे. माझा ब्लोग आपण संपूर्ण वाचा
नाव: sharad
तुमचा प्रश्न : hello madam, mala marketchi mahiti jyast nahi. mi tumache sarva block vachalet. maza asa prashan ahe ki- ‘Intraday trading sathi Account madhe amount asayala havicha ka?’
होय, जी रक्कम अकौंटमध्ये ठेवाल त्यात फायदा जमा होतो आणि तोटा त्यातून वजा होतो. जोखमीसाठी ती रक्कम  ब्रोकरकडे ठेवावी लागते.
नाव: Sandeep mhaske
तुमचा प्रश्न : Respected mam Majha prashna aasa aahe ki intarday trading made stoploss or target kiti mahtwache aahe? Tasech intraday trading baddal mahiti havi aahe plz?
Thank u
मार्केटमध्ये जोखीम असते त्यामुळे STOPLOSS आणी टार्गेट हवे. माझ्या ब्लॉग वरील ३२, ३३, ३४, ३५, ३६, हे भाग वाचा.
नाव: sandip
तुमचा प्रश्न : first time kiti paise invest karave
तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करू शकता.
नाव: Geeta
तुमचा प्रश्न : Hello Mam, I am working woman and I want to invest in share market. I want to know that what is the difference in brokerage charges in Broker and banks. I heard that banks are charging high percentage.
तुम्ही जर बँकेच्या ‘DEMAT’ आणी ट्रेडिंग अकौंटवर  ऑन लाईन ट्रेडिंग करत असाल तर जास्त चार्ज पडतात. पण चार्जेसमधील फरक जास्त नसतो.
नाव: Swapnil Gangurde
तुमचा प्रश्न : Namskar ma’am,
Aapan share market baddal khup chan mahiti sangitli aahe aani sangat aahat aaplylala bhetayche hote shakya aahe kaa???
तुम्ही भेटू शकता आधी फोन करून येऊ शकता.
नाव: sanket tamhane
तुमचा प्रश्न : put call ratio mhanje kay?
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये PUT आणी CALL हे शब्द वापरतात. मंदी करणारे पुट घेतात आणी तेजी करणारे पूट  विकतात  /WRITE करतात. तेजी करणारे CALL विकत घेतात आणी मंदी करणारे CALL विकतात.
जर CALL जास्त असतील तर लोक तेजी करायला तयार असतात. जर PUT जास्त असतील तर लोक मंदी  करायला तयार असतात.
नाव: megharaj tamhane
तुमचा प्रश्न : balance sheet kshi samjun gheu kinva kshi vachavi
BALANCE SHEET म्हणजे उद्योगाची एका विशिष्ट तारखेला असलेली मालमता आणि कंपनीला असलेले देणे याचा ताळेबंद. या BALANCESHEETचा अभ्यास आपण त्या उद्योगातील मानदंड आणी इतर कंपन्यांच्या बरोबर तुलना करून करू शकता. याबरोबर येणारे नफा तोटा पत्रक म्हणजे कंपनीला होणार्या सर्व प्रकारचे इन्कम आणी ते इन्कम मिळवण्यासाठी कंपनीला किती खर्च आला याचे प्रतिबिंब असते. तसेच यावरून आपल्याला कंपनीचा उद्योग किती प्रमाणात फायदेशीर आहे हे कळते.
नाव: Ketan
तुमचा प्रश्न : BSE SOVEREIGN GOLD BOND हा नक्की काय प्रकारआहे ? त्याने मला काय आणि कसा फायदा मिळू शकतो? आणि याचा सरकार ला काय फायदा ?
इंटरनेटचा वापर करून  माहिती  मिळवा. माझा तरुण भारतला एक लेख आला होता तोही वाचा
नाव: Swapnil
तुमचा प्रश्न : मॅडम तुमचा ब्लॉग सुंदर आहे. तुम्ही कलाससेस सुरु केले आहेत. पण ते ठाण्याला असल्यानें अटेंड करता येत नाही. तुम्ही कलाससेसचे lecture रेकॉर्ड करून site वर ठेवू शकाल का? मराठी भाषिकां साठी हे सर्वोवतं ब्लॉग आहे.
आपली सुचना स्वागतार्ह आहे. मी मला शक्य आहे ते सर्व करते आहे.  सध्या तरी हे शक्य होईल असे वाटत नाही.
नाव: Anant Ulhas Awasare
तुमचा प्रश्न : Namaskar Madam, Mi Tumche Blog Vachato Tya pasun Mala Khup Mahiti Milali Ahe. Mi 30 octomberla Pahil khahi Shears Bye Kele. 44 Blog Madhe Tumhi Sangitlya Pramane Atta Pan Jar Shears Sell Karaiche Astil Tar “INSTRUCTION SLEEP” Banket Bharavi Lagate Ka? ?
तुमचा ‘DEMAT’ अकौंट जर बँकेत असेल तर शेअर विकल्यावर दुसर्या दिवशी बँकेत नेऊन द्यावी लागते. जर तुमचा DEMAT अकौंट ब्रोकरकडे असेल आणी तुम्ही ब्रोकरला PO ( पॉवर ऑफ ATTORNEY) दिली नसेल तर ब्रोकरकडे दुसऱ्या दिवशीपर्यंत नेऊन द्यावी लागते. शक्यतो ब्रोकरला PO देऊ नका. PO  दिली असेल तर मात्र INSTRUCTION SLIP द्यावी लागत नाही.
नाव: RAHUL GAIKWAD
तुमचा प्रश्न : Hi Madam,
where we getting any company latest shareholder pattern (BSE or NSE) because I checked many webside ,shareholding pattern not updated
गुगल सर्च वर शेअरहोल्डिंग PATTERN ऑफ ( येथे ज्या कंपनीचा शेअरहोल्डिंग PATTERN आपल्याला हवा असेल त्या कंपनीचे नाव टाकावे.) असा सर्च केल्यास जरूर ती माहिती मिळेल.
नाव: anil shete
तुमचा प्रश्न : Sir, Aamchya grup la navin insurance company chalu karaychi ahe tya vishai mahiti milu shakel ka aamhala thodi
विमा कंपनी कशी चालू करायची हे तुम्हाला विमा क्षेत्रातील तज्ञ समजावून सांगू शकेल.
नाव: Sandeep Dombale
तुमचा प्रश्न : tumche blog me nehami vachat asto te motya pramanat guide kartat tya badal tumche me manapausun abhari ahe.aseche blog lihat java Marathi mansana guide karat ja. mala demat account v trading account madhe je broker brokarge rate kami rate madhe trade charges lavatat tynchi mahiti dyvi manje mala manyache ahe ki saglyat changel trading account, demat account v saving bank account kute open karave manje charges kami hotil.karan prathek broker che trading charges vegle ahet. ani broker hi viswasatala manus tumala milala tasa broker sanga krupaya apla ek vachak.
ब्रोकरेज जास्तीत जास्त किती चार्ज करावे याची कमाल मर्यादा सेबीने घालून दिली आहे. या मर्यादेत प्रत्येक ब्रोकर तुमच्या ट्रेडिंग अकौंटमधील VOLUME वरून तुमच्या अकौंटला  लागू होणारे   ब्रोकरेजचे दर ठरवतो. यात मी काही मदत करू शकत नाही.
नाव: deepak mali
तुमचा प्रश्न : नमस्कार मेडम, मला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करायचे आहे. मला काय कराव लागेल? मला सविस्तर माहिती मिळेल का ?
माझा ब्लॉग पूर्ण वाचा. इकॉनॉमिक टाईम्स, फायनांसियल EXPRESS या सारखी उद्योग जगतातील घडामोडींची चर्चा करणारी वृत्तपत्रे आणी शेअर मार्केटचे लाइव कव्हरेज करणाऱ्या वाहिन्यांवरील कार्यक्रम बघा. या माहितीचा आपल्याला कसा उपयोग होईल तसा करून घ्या.
नाव: Jagriti behere
तुमचा प्रश्न : ट्रेडिंग cha किरकोळ बाजारात कसा परिणाम होतो?
ट्रेडिंगमुळे त्या कंपनीच्या शेअरचा VOLUME वाढतो आणी त्याचा कंपनीच्या शेअरच्या किमतीवर परिणाम होतो. तसेच कंपनीच्या वर्तमान तसेच कंपनीकडून भावी काळांत असलेल्या गुंतवणूकदार आणी ट्रेडर्सच्या अपेक्षा कळतात.
नाव: prakash dhaygude
तुमचा प्रश्न : share marketing kade aaplyala business mhanun career karta yeilka
करीअर म्हणून पाहता येईल. पण कडी मेह्नत आणी प्रदीर्घ अभ्यास आणि व्यासंग पाहिजे.
नाव: नितिन महादेव साखरे
तुमचा प्रश्न : सध्या मी SIP मधे INVESTMENT केली आहे ( 1)SBI BLUE CHIP 2) SBI MANGNUM 3) BALANCE FUND AND 4) FRANKLIN SMALL SCALE FUND (Rs.1000 EACH) पण आता डीमॉनेटायझेशन मुऴे MARKET घस्रत आहे. तर मी मघार घेउ की, FUTURE चा विचार करुन INVEST करत राहू
सध्या माघार घेऊन तोटाच होईल. कारण सर्व म्यूच्युअल फंडाचे NAV कमी झाले असणार.थोडी वाट बघा आपल्या खरेदीच्या किमतीच्या आसपास NAV आले म्हणजे आपण थोडे प्रॉफीट घेऊन आपली गुंतवणूक सोडवून घेऊ शकता.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : Madam tumhi long term investment sathi share buy kartana kuthalya goshtinchi kalji gheta mhanje tricks sanga
शेअर स्वस्त हवा, ब्लू चीप कंपनीचा हवा तसेच A ग्रूपचा असावा. कंपनी नफ्यात असून प्रगतीपथावर असावी.
नाव: Hemant pawar
तुमचा प्रश्न : Magchya warshi jase deewali nantar share market continuesly down hot hote tase ata chi paristithi baghun ky watatay.?
डिसेंबरमध्ये परदेशातली मार्केट नाताळच्या सुटीमुळे बंद असतात. १० जानेवारी २०१७ पासून बजेट RALLY सुरु झाल्यामुळे मार्केट सुधारेल. १ फेबृआरीला अंदाजपत्रक सादर झाल्यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.
नाव: anil gholap
तुमचा प्रश्न : how to play in share market and frist step
शेअरमार्केट हा तुम्ही एक खेळ समजता यातच सर्व आले. तरीसुद्धा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे किंवा गुंतवणूक करणे हा माझ्या मते एक अभ्यास, व्यासंग, कला, आहे. पैशाशी खेळ करणे धोकादायक आहे.
नाव: Prathamesh Ratnaparkhi
तुमचा प्रश्न : स्टेक म्हणजे काय?
कुठल्याही कंपनीत मोठ्या प्रमाणावर शेअर विकत घेणे याला त्या कंपनीत स्टेक घेणे म्हणतात. या शेअर्स खरेदीमुळे खरेदी करणारा भागभांडवलाचा तसेच जबाबदारीचा हिस्सा उचलतो.
नाव: Tushar Kamble
तुमचा प्रश्न : Multi begged share chi mahit haviy
शेअरची किंमत खरेदी केलेल्या किंमतीच्या काही पटीत वाढणे याला शेअर MULTIBAGGER झाला असे म्हणतात. उदा :- TCS, इन्फोसिस
नाव: Prakash chandrakant kale
तुमचा प्रश्न : Mala tumcha purn blog vachayacha ahe pustak milu shakel ka
जानेवारी २०१७पर्यंत  पुस्तक मिळू शकेल.
नाव: Pravin ramchandra Ganjave
तुमचा प्रश्न : Mala penny stock buy karaychet tar taya babat tumhi mala Konti company such as?
‘मूर्ती लहान कीर्ती महान’ हा माझ्या ब्लॉगवरचा ५९ वा लेख वाचा. हा PENNY STOCKS वरच लिहिलेला लेख आहे.
नाव: CHETAN SHEVKARI
तुमचा प्रश्न : thanks madam , tumchya blog khup info news milti . ek prshn asa hota ki mi kahi shares watch kartoy tyat la ek kushal trade ha continue up jatoy asa konta ch kadhi mi tari pahilela nahi. ya badal pz sanga
शेअरमार्केट मागणी पुरवठा या तत्त्वावर चालते. त्यामुळे कोणताच शेअर सतत वर किंवा सतत खाली राहू शकत नाही.

शाबासकी की शासन! – आठवड्याचे समालोचन – ३ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०१६

मागील आठवड्याचे समालोचन वाचण्यासाठी इथे क्लिक करा
MKTandMe Logoनवाकोरा आठवडा, नव्या कोऱ्या ऑक्टोबरच्या सिरीजची सुरुवात,नव्या RBI गव्हर्नरची पहिलीवहिली MPC च्या सल्ल्यासकट आलेली मॉनेटरी पॉलिसी या सर्वांची उत्सुकता यामुळे ट्रेडर्सनी नव्या पोझिशन घेतल्या. मार्केट सावरले. सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सेन्सेक्स ४०० पाईंट वाढले. ‘हम फिरसे हो गये तयार’अशी जणू घोषणा केली. मंगळवारी नव्या गव्हर्नरची पहिली पॉलिसी जाहीर झाली. बुधवार गुरुवार पुट कॉल रेशियो मध्ये फरक पडला नाही. पुट कॉल रेशियो .९७ वरच राहिला. रिझल्ट सिझनशिवाय कोणताही धोका नाही. त्यामुळे पोझिशन हेज करत आहेत असे जाणवले.यावेळी IT सेक्टरकडून चांगले निकाल येतील अशी अपेक्षा नाही. त्यामुळे IT क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडत आहेत.
आंतरराष्ट्रीय घडामोडी

 • विविध देशातील बँकिंग संस्था संकटांत आहेत. इटालियन बँकिंगची स्थिती असमाधानकारक आहे. डॉईश बँक USAच्या DEPT ऑफ जस्टीसने ठोठावलेल्या दंडामुळे अडचणीत आहे. ब्रेक्झीटच्या संभाव्य परिणामांमुळे ECB सध्यातरी क्वांटीटेटीव इझिंग मधून हात झटकू शकत नाही. USA ची अर्थव्यवस्था सुधारत आहे. त्यामुळे USA डिसेंबर २०१६ मध्ये फेड रेट वाढवू शकेल.
 • आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उत्पादन गोठवीण्याचा निर्णय झाल्यामुळे क्रूडचे भाव वाढण्यास सुरुवात झाली.
 • IMF ने भारताच्या प्रगतीचे लक्ष्य ७.६% केले.

सरकारी अन्नौंसमेंट

 • सरकार लवकरच ड्रग पॉलिसी आणण्याच्या विचारांत आहे. काही औषधे प्राईस कंट्रोल मधून बाहेर आणण्याच्या विचारांत आहे. काही औषधाच्या उत्पादनाविषयीचे नियम ढिले करणार आहे. चीनमधून आयात होणाऱ्या औषधांपासून होणार्या स्पर्धेपासून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
 • सरकार लवकरच ‘सोलार’ पॉलिसी जाहीर करण्याच्या विचारांत आहे.
 • अल्युमिनियमवरची इम्पोर्ट प्राईस वाढण्याची शक्यता आहे. कारखानदारांना आणी व्यापाऱ्यांना चीन बरोबर स्पर्धा करावी लागत आहे. हे सरकारच्या लक्षांत आले आहे.
 • सरकारने ६६ स्टील प्रोडक्ट्सची MIP दोन महिन्यांसाठी वाढवली होती. त्याची मुदत मंगळवारी संपत होती. सरकारने ही मुदत आता वाढवली जाणार नाही असे जाहीर केले होते. तरीही सरकारने ही मुदत दोन महिन्यांसाठी ४ डिसेंबर २०१६ पर्यंत वाढवली.
 • वित्त मंत्रालयाने पब्लिक DEBT MANAGEMENT सेल स्थापन केली. वर्षभरांत त्याचे अपग्रेडेशन करून PDMA स्थापन केले जाईल. ही सेल पब्लीक DEBT MANAGEMENT करेल. यामुळे RBI च्या जबाबदाऱ्या कमी होऊन RBI ला महागाई रोखण्यावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल.
 • सरकारने CNG आणी PNG या दोन्हीच्या किंमतीत कपात केली.
 • अडाणी पोर्ट मधील FII लिमिट ४०% वरून ४९% केली.
 • MCX मधील FII लिमिट २४% वरून ३४% केली.
 • सरकारचा सगळ्यांत मोठा स्पेक्ट्रम लिलाव पार पडला यातून सरकारला Rs ६५.८ हजार कोटी मिळाले. वोडाफोन आणी भारती एअरटेल या कंपन्यांनी सगळ्यांत जास्त 4G साठी लागणारे स्पेक्ट्रम खरेदी केले. आश्चर्य म्हणजे 700 MHZ BAND साठी एकाही कंपनीने मागणी केली नाही

RBI सेबी आणी इतर प्रशासनिक संस्था

 • RBIने आपली वित्तीय पॉलिसी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी जाहीर केली. RBI ने रेपो रेटमध्ये ०.२५ ची कपात केली. रेपो रेट ६.५०% वरून ६.२५% केला. रिव्हर्स रेपो रेट ५.७५ केला. CRR मध्ये बदल केला नाही. महागाईचे लक्ष्य Jan ते मार्च २०१७ या तिमाहीसाठी ५.३% केले. तसेच RBI ने NPA लोनविषयीची पॉलिसी सौम्य करण्याची शक्यता वर्तवली.
 • येस बँकेने QIPच्या नियमांचे उल्लंघन केले असे सेबीचे म्हणणे आहे. त्यामुलळे शेअरहोल्डरचे नुकसान झाले आणी मार्केट डिस्टर्ब झाले. म्हणून सेबी येस बँकेला फाईन लावण्याची शक्यता आहे. म्हणून येस बँकेचा शेअर पडतो आहे.
 • कोर्टाने जागरण प्रकाशनला त्यांचा रेडीओ बिझिनेस डीमर्ज करण्यासाठी परवानगी दिली.
 • १४ नोव्हेंबरपासून MSCI (MORGAN STANLEY CAPITAL IBTERNATIONAL) निर्देशांकांत नोठे बदल होण्याची शक्यता आहे. ब्रिटानिया, IOC, HPCL, PIDILITE बजाज फिनसर्व IDFC बँक या कंपन्यांचा या निर्देशांकांत समावेश केला जाईल.
 • बिहार सरकारने बिहार राज्यांत जारी केलेली दारूबंदी सुप्रीम कोर्टाने वैध ठरवली आणी पटना हाय कोर्टाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे आज मद्यार्काचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर पडले.
 • कॅनडाच्या पेन्शन फंडाने EDELWEISS ASSET RECONSTRUCTION कंपनीमध्ये ३०%स्टेक US $ २५० मिलीयानला आणी TVS लॉजीस्टिक्स मध्ये ४२% स्टेक US $ १८० मिलीयान्ला घेण्याचे ठरवले आहे.

खाजगी कंपन्यांच्या घडामोडी

 • कोटक बँकेने ‘BSS’ ही मायक्रोफायनांस कंपनी Rs १३९ कोटीना विकत घेतली.
 • RBL या बँकेने ‘उत्कर्ष’ या मायक्रोफायनांस कंपनीतील १०% स्टेक घेतला.
 • अमेझोन आणी फ्लिपकार्ट या कंपन्यांची विक्री खूप वाढली याचा लॉजीस्टीक कंपन्यांना फायदा होईल.
 • मारुती, एस्कॉर्टस, TVS मोटर्स, टाटा मोटर्स या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांची विक्री वाढली तर ASHOK LEYLAND या कंपनीची महिन्याभरातील विक्री कमी झाली.
 • ओरीएंट सिमेंट या कंपनीने JP ग्रूपचे २ प्लांट खरेदी केले.
 • NBCC एक नॉनबँकिंग फायनांस कंपनी सुरु करणार आहे.
 • गोवा कार्बन या कंपनीचा निकाल चांगला आला. कंपनी गेल्या वेळेपेक्षा लॉस मधून प्रॉफीट मध्ये आली.
 • रुची सोया या कंपनीने पामच्या शेतीसाठी अरुणाचल सरकारबरोबर MOU केले.
 • ICRA या रेटिंग कंपनीने सुझलोन एनर्जी या कंपनीसाठी केलेले रेटिंग स्थगीत ठेवले.
 • JSPL आपले कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे. यासाठी ते त्यांचे Rs ९५० कोटींचे ASSETS विकणार आहेत. ते आपला अंगुल ऑक्सीजन प्लांट BOCला Rs ९५० कोटिला विकणार आहे. आणी BOC कडून पुन्हा २० वर्षांसाठी भाड्याने घेणार आहेत. JSPLचे रेटिंग D केले म्हणजेच ‘DEFAULTER’केले कारण JSPL त्यांच्या Rs ४०,००० कोटीच्या कर्जावर लावलेले ३० सप्टेंबर पर्यंतचे व्याज भरू शकले नाहीत.
 • JSW स्टीलला कर्नाटक मध्ये दोन आयर्न ओअर च्या खाणी मिळाल्या.
 • फिलीप कार्बन BLACK मध्ये गुडलक डीलकॉमचे मर्जर होणार आहे. टायर बनवण्यासाठी कार्बन BLACK उपयोगांत येते. ऑटो सेल्स वाढत आहेत. ऑटोसाठी टायर हवे आणी तयार उत्पादन करण्यासाठी कार्बन BLACKची जरुरी असल्यामुळे फिलीप कार्बन BLACK ची विक्री वाढेल.
 • रिलायंस इन्फ्रा त्यांचे तीन ASSETS अडानी ट्रान्समिशनला Rs २०० कोटीला विकणार आहे. अडानी ट्रान्स्मिशन रिलायंस इंफ्राचे Rs १५०० कोटींचे कर्ज ही घेणार आहे.
 • IDBI बँकेच्या शेअरहोल्डर्सनी बँकेला Rs ८००० कोटींचे भांडवल उभारण्यासाठी मंजुरी दिली. सरकार आपल्याकडे ५२% स्टेक ठेवून बाकीचा स्टेक विकण्याचा निर्णय घेणार अशी बातमी आहे. सरकारचा प्रयत्न आहे की AXIS बँकेप्रमाणे IDBI बँकही खाजगी क्षेत्रातील बँक बनेल. IDBI बँकेकडे NSE मधील स्टेक असल्यामुळे त्यांना बोनस स्प्लीट आणी अंतरिम लाभांश या सर्वांचा फायदा होईल. असाच फायदा IFCI कडे NSE मधील स्टेक असल्यामुळे इफ्चीलाही वरील सर्व फायदे होतील.
 • आय फोन 7 भारतांत लॉच होणार आहे याचा फायदा रेडिंगटन या कंपनीला होईल.
 • साउथ इंडिअन बँकेचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. नफा वाढला असला तरी ग्रॉस NPA कायम राहीले पण नेट NPA कमी झाले.

नजीकच्या भविष्यांत येणारे IPO आणी लिस्टिंग

 • या आठवड्यांत ENDURANCE TECHNOLOGY या कंपनीचा IPO ५ ऑक्टोबरला ओपन होऊन ७ ऑक्टोबरला बंद झाला. या IPO ला गुंतवणूकदारांनी थंडा प्रतिसाद दिला.
 • HPL इलेक्ट्रिक या कंपनीचे लिस्टिंग ऑफर प्राईसच्या खाली म्हणजे Rs १९१ वर झाले.
 • जेव्हा IPO चे लिस्टिंग होते त्यानंतर तो शेअर काही दिवस ‘T’ ग्रूप मध्ये असतो त्यामुळे लिस्टिंग झाल्याबरोबर या शेअरमध्ये इंट्राडे ट्रेड होत नाही. त्यामुळे लिस्टिंग नंतर तो शेअर कोणत्या ग्रूपमध्ये आहे त्याची चौकशी करा.
 • NSE (NATIONAL STOCK EXCHANGE) आपले DRHP जाने २०१७ मध्ये फाईल करेल. त्या आधी NSE ने आपल्या शेअर्सचे १० शेअर्समध्ये स्प्लिट आणी १० शेअर्स असले तर १ बोनस शेअर देण्याचे जाहीर केले. तसेच Rs ७९.५ अंतरिम लाभांश प्रती शेअर जाहीर केला.NSE चा IPO चे स्वरूप OFS (ऑफर फोर सेल) असे असेल.

या आठवड्यात मार्केटने आपल्याला काय शिकवले
पुढील आठवड्यांत मंगळवार बुधवार मार्केटला सुट्टी आहे. शुक्रवारी USA चा एम्प्लायमेंट डाटा येणार आहे. हा डाटा चांगला आला तर फेड रेट वाढवण्याची शक्यता आहे. निफ्टी आणी सेन्सेक्समध्ये फारशी हालचाल दिसत नाही. ज्या शेअरमध्ये फायदा आहे ते शेअर विकून टाकून ज्या कंपन्यांचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला येईल त्या शेअर्समध्ये ट्रेडर्स पोझिशन घेत आहेत. त्याचवेळी गुजराथमध्ये धमाका झाला अशी बातमी आली त्यासरशी मार्केट पडायला सुरुवात झाली. पण तो फटाक्याचा आवाज होता असे स्पष्ट झाल्यावर मार्केट सावरले. यावरून मार्केट कोणत्याही घटनेला किती त्वरीत आणी जोराची प्रतिक्रिया देते ह्याची कल्पना येते. .आणी शेअरमार्केट व्यवहार करणार्यांना किती सावध असावे लागते ते कळते.
सगळ्या मुलांच्या सध्या सहामाही परीक्षा आहेत. तसाच सर्व कंपन्यांनीसुद्धा ३ महिने कंपन्या चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा रिझल्ट सर्वांना समजेल आणी गुंतवणूकदारांकडून शाबासकी मिळेल किंवा अभ्यास चुकीच्या मार्गाने झाला असल्यास गुंतवणूकदार शेअर्स विकतील आणी त्या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव पडेल म्हणजेच शासन होईल. बघू या काय होते ते ! शाबासकी की शासन !
BSE निर्देशांक सेन्सेक्स २८०५४ वर आणी NSE निर्देशांक निफ्टी ८६९५ वर बंद झाला.

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – July, August 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: GANESH WAIKAR
तुमचा प्रश्न : share market demat account badal mahiti havi ahe
तुम्ही ब्लॉग नंबर ३१ आणी ३९ वाचा. तुम्हाला हवी आहे ती माहिती मिळेल
नाव: नासिर जलील शेख
तुमचा प्रश्न : इन्टरा डे ट्रेडिंग मधे ब्रोकर ने डिमेट अकौंट मधे दिलेल्या पैस्यातून शेअर खरीदी न करता डिमेट अकौंट स्वतः च्या पैश्याने खरेदी केलेला शेअर त्याच दिवशी वीकवा लागतो काय
मला तुमचा प्रश्नच कळला नाही. विकत घेतलेले शेअर्स तुम्ही कधी विकावे हा तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. परंतु एक लक्षांत ठेवा की इंट्राडेमध्ये घेतलेले शेअर्स खरेदी केलेल्या दिवशी विकले तरच तो इंट्राडे ट्रेड होतो. पैसे कुणाचे आहेत याचा प्रश्न येत नाही.
नाव: suraj moharil
तुमचा प्रश्न : dear,,,,, mala 12th cha demat account cha project banwaycha ahe tar aapan mala madat karu shakata kay.
माझा फोन नंबर ०२२ २५३३५८९७ आणी मोबाईल नंबर ९६९९६१५५०७ आहे आपण खालील पत्यावर मला व्यक्तीशः भेटू शकता. पत्ता :- भारतीय संगीत विद्यालय, पांडुरंग निवास स्टेशन रोड ठाणे (पश्चिम) ४००६०१. ……
नाव: PRAMOD JADHAV
तुमचा प्रश्न : १) एखाद्या शेयरची किंमत १ रुपया असेल तर आपण किती शेयर खरेदी करू शकतो?
२) शेयर खरेदीला मर्यादा असते का?
३) छोट्या किमतीची शेयर खरेदी करणे योग्य आहे का
आपण किती शेअर्स खरेदी करावेत हे तुमच्या ऐपतीवर अवलंबून आहे. कमीतकमी एक आणी जास्तीतजास्त कितीही शेअर्स खरेदी करू शकता. माझा ‘मूर्ती लहान कीर्ती महान’ हा पेनी शेअर्स वरचा ब्लॉग वाचा.
नाव: chhaya
तुमचा प्रश्न : shear market madhe invesment kashi karyachi
माझ्या ब्लॉगच्या प्रत्येक भागांत शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करावी आणी तत्संबंधी सर्व गोष्टींची चर्चा केली आहे. ती वाचा.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : mi sadya konta shear gheu shakto
आता फेडच्या निर्णयातील अनिश्चिततेमुले मार्केट पडू लागले आहे. अशावेळी तुम्ही लार्ज कॅप शेअर्स वर्षभरातील शेअरची कमाल आणी किमान किंमत पाहून विकत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा कि शेवटी निर्णय तुमचा कारण फायदा आणि तोटा पण तुमचाच
नाव: Dr VISHAL SHILLE
तुमचा प्रश्न : Market depth mhanaje kay?
Market depth cha upyog share nivadanyasathi hoto ka??
NSE madhe “MARKET DEPTH” ka nahi??
लार्ज कॅप, मिड कॅप, स्माल कॅप, पेनी शेअर्स अशा सर्व शेअर्सचा समावेश असणे म्हणजेच मार्केट डेप्थ. BSE हे सर्वांत जुने आणी मोठे एक्चेंज आहे.आणी NSE सुरु होईपर्यंत BSE हे एकमेव एक्स्चेंज होते.त्यामुळे कंपन्यांना लिस्टिंग साठी निवडीला पर्याय नव्हता. NSE च्या नियमानुसार ज्या कंपन्यांची इच्छा होती त्या कंपन्या NSE वर लिस्ट झाल्या. मार्केट डेप्थ जास्त असली तर प्रत्येक प्रकारचे शेअर्स ट्रेडींगसाठी तसेच गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतात.
नाव: कुंडलीक
तुमचा प्रश्न : प्रतेक कंपनी ची शेअर प्राइस काशी ठरते व कशामुळे चेंज होते ?
प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची प्राईस SWOT ( स्ट्रेंग्थ, वीकनेस. ऑपॉरच्युनिटीज, थ्रेटस) विश्लेषणाप्रमाणे प्रायमरी मार्केटमध्ये ठरते. प्रत्येक शेअर लिस्टिंग होताना त्यांची शेअरमार्केटमध्ये प्रथम प्राईस ठरते आणी नंतर ती मागणी आणी पुरवठा असेल त्याप्रमाणे बदलते.
नाव: sachin mhetre
तुमचा प्रश्न : How to select a share ?
Entry and exit strategy of selected shate?
तुम्ही माझा ब्लॉग काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
नाव: pravin Kumar
तुमचा प्रश्न : mam, Mi maharashatra State Gove. Cha Employee ahe tar mala Shere market madhe Intra Day n karata Dirgh mudati(1te 2 varsh) karita Guntavnuk karta yeil ka. ya babat konte niy
१९६४ च्या कायद्यानुसार वारंवार शेअर्स आणी सिक्युरिटीज मध्ये खरेदी आणी विक्री केली तर ते स्पेक्युलेशन समजले जाते. आणी कोणत्याही सरकारी नोकराने स्पेक्युलेशन करण्यावर बंदी आहे. पण तुम्ही गुंतवणूक करू शकता. ठराविक रकमेपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास आपल्याला आपल्या प्रिस्क्राईब ऑथोरिटीला कळवावे लागते. आपण शेअर्स आणी सेक्युरिटीज मध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होता कामा नये. .
नाव: Samir Gholap
तुमचा प्रश्न : Namaste,
what is the difference Demat A/C and Trading A/c. and where to open it . will i need any broker or i can open in any bank?
DEMAT अकौंट तुम्ही खरेदी केलेल्या आणी विक्री केलेल्या शेअर्सची नोंद ठेवतो. आणी आता तुमच्याकडे किती शेअर्स आहेत त्याची माहिती देतो. ट्रेडिंग अकौंटद्वारे तुम्ही शेअर्स ची खरेदी आणी विक्री करू शकता. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत ( जर तेथे DEMAT सेवा उपलब्ध असेल) आणी ब्रोकरकडे किंवा STOCK होल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये DEMAT अकौंट उघडू शकता. ट्रेडिंग अकौंट मात्र तुम्हाला ब्रोकरकडेच ओपन करावा लागतो. आपल्याला सोयीस्कर, जेथे ब्रोकरेज आणी इतर दर योग्य असतील तेथे हे दोन्ही अकौंट उघडावेत. AXIS, ICICI, HDFC, कोटक बँकेमध्ये तुम्ही ट्रेडिंग अकौटही उघडू शकता.
नाव: Bapusaheb tale
तुमचा प्रश्न : Madam intraday trading chi mahiti dyavi tumhi intraday trading karta ka?
आपण माझ्या ब्लॉग नंबर ३२, ३३, ३४, ३५, ३६ वाचा. या ब्लॉगमध्ये इंट्राडेविषयी माहिती आहे.
नाव: मंदार
तुमचा प्रश्न : नमस्कार ,
ब्लू चीप शेअर्स कसे निवडावेत ? विकत घेण्याची आणि विकण्याची वेळ निश्चित कशी करावी ? चांगले शेअर्स घेतल्यानंतर तीन ते पाच किवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी होल्ड करून ठेवणे चांगले की,अपेक्षित फायदा होताच विकणे चांगले ?
A ग्रूप मधील लार्ज कॅप शेअर्स (ज्या कंपन्या प्रगतीपथावर आहेत, सतत फायद्यांत आहेत) म्हणजे ब्लू चीप शेअर्स. कमीतकमी भावाला विकत घेऊन जास्तीतजास्त भावाला विकावेत. तुमची खरेदी किंमत आणी तुमची पैश्याची आवश्यकता यावर विक्रीचा निर्णय अवलंबून असतो
नाव: vinod ghatage
तुमचा प्रश्न : जर शेयरस खरेदी करायचे आसतील तर? व ते विकायचे आसतील तर
तुम्ही ब्लॉग निट आणी संपूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला ही माहिती मिळेल.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : real brokrage keti aste intraday brokrage other taxiss kiti
aasave te sang
ब्लॉग मध्ये ही माहिती दिलेली आहे. ब्लॉग नंबर ३५ आणी ३६ वाचा. सेबीच्या साईटवर जाऊन तुम्ही वर्तमान नियम माहिती करून घेऊ शकता, तसेच या बाबतीत तुम्ही ब्रोकरशी बोलणीही करु शक्ता. सरकारी कर आहेत त्यांत सूट मिळू शकत नाही पण ब्रोकर तुम्हाला ब्रोकरेजमध्ये सूट देऊ शकतो.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : tiecknical anilesis badal kadhe lehanar
सध्या शेअर मार्केटसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. मनी प्लस मासिकातून शेअर मार्केट विषयी लेख लिहित आहे त्यामुळे जसा वेळ मिळेल तसे तांत्रिक विश्लेशणाविषयी लिहीन.
peharkar2462@gmail.com
तुमचा प्रश्न : currency option mhange kay ani yachi kharedi vikri kasi va nafa totta kay
मी करन्सी मार्केटमध्ये व्यवहार करीत नाही.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मी mannapuram finance व Jk tyres या कंपन्यांचे अनुक्रमे 100 व 50 intradag मधुन delivery मध्ये trade result च्या दिवशी केले होते तर ते shares 5-6 दिवसांनंतर विकले तर मला dividend bhetu shakto ka?
प्रत्येक शेअर्ससाठी लाभांश मिळण्याची ex डेट ठरलेली असते. या डेटच्या आधी तुम्ही शेअर खरेदी केलेले असतील तर तुम्हाला लाभांश मिळतो अन्यथा मिळत माही.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला capital structure मधील Authoried Capital,Issued capital,Paid up shares (nos.), Paid up face value अाणि Paid up capital बद्दल सविस्तर माहीती सांगा ?
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला Ratios मधील Adjusted EPS ,Adjusted cash EPS ,Reported EPS , Reported Cash EPS , Divident per share , Operating profit per share , Book value(excl rev res/incl rev res) per share , net operating income per share EPS अाणि Free reserves per share EPS बद्दल सविस्तर माहीती सांगा व यामधील कुठले Ratio वाढले किंवा कमी झाल्यानंतर कंपनीची स्थिती strong आहे असे समजते
तुमचा प्रश्न : नमस्कार मॅडम मला Ratios मधील , Operating margin ,Gross/Net profit margin, Adjusted cash margin, Adjusted return on net worth , Reported return on net worth अाणि return on long term funds बद्दल सविस्तर माहीती सांगा व यामधील कुठले Ratio वाढले किंवा कमी झाल्यानंतर कंपनीची स्थिती strong आहे असे समजते.
तुमचा प्रश्न : मॅडम OPM%, NPM%, cash EPS तसेच IIP म्हणजे काय याचा कोणत्या सेक्टरवर परिणाम होतो
ही सगळी माहिती तुम्हाला फ़यानान्सिअल management वरील कुठल्याही मराठी पुस्तकांत मिळू शकेल.
नाव: RAVIRAJ PATIL
तुमचा प्रश्न : HII MAM, MLA NEW ACCOUNT OPEN KRAYCHE AHE SHARE MARKET MDHE TR MI KUTHE N KSE OPEN KRU …..N TYACHE KAY CHARGE ASTAT… ANI SHARE MARKET MDHE TRADING KRAYLA SHIKSHANACHI GRJ AHE KA
तुम्ही ब्लॉग वाचा या प्रश्नांची उत्तरे ब्लॉग मध्ये दिलेली आहेत.
नाव: Ganesh waragade
तुमचा प्रश्न : Market chi surwat hotana te jastach wadhte tar kadhi dupari Khali yet tar kadhi shewti achank war yete intraday madhe ha samtol kasa sadhawa
जेव्हा मार्केट वाढते आहे आणी resistance लेव्हल वर आहे तेव्हा short करा आणी मार्केट पडत असेल आणी सपोर्ट लेव्हलला असेल तर खरेदी करा.
नाव: aniket
तुमचा प्रश्न : mala share market baddal janun ghenyachi khup utsukata aahe , so can u guide me ? konati pustaks mi refer karu share market basic shikanyasathi ?
आपण माझा ब्लॉग वाचा. हल्ली च शेअरमार्केटच्या प्रशिक्षणाचे वर्ग सुरु केले आहेत. त्याचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास घेऊ शकता.
नाव: sandeep Gade
तुमचा प्रश्न : Respected Madam, I read your blog regularly…Mala changla share konta he olakhta yete, pan tya share cha price (value) Mahag ahe ka he samzat nahi.
Te kase olakhave?
लाईफ टाईम हाय आणी लाईफ टाईम लो आणी ५२ वीक हाय आणी ५२ वीक लो हे दोन्ही भाव इंटरनेट वरून मिळू शकतात. त्यावरून शेअर स्वस्त की महाग हे समजू शकेल.
नाव: KOMAL
तुमचा प्रश्न : RIGHTS MHANJE KAY?
जेव्हा कंपनी काही उद्देशासाठी ( विस्तार, किंवा नवीन उत्पादन युनिट सुरु करण्यासाठी किंवा कंपनीला अन्य कोणत्याही कारणासाठी भांडवलाची गरज असेल ) आपल्या वर्तमान शेअरहोल्डर्स कडून भांडवलाची उभारणी करते त्याला राईट्स इशू असे म्हणतात. ही ऑफर शेअरच्या मार्केट प्राईस पेक्षा कमी किंमतीत केली जाते त्यामुळे वर्तमान शेअरहोल्डिंग pattern मध्ये कोणताही बदल होत नाही.
नाव: Ketan
तुमचा प्रश्न : मनी कंट्रोल .कॉम वर Philips India & Cadbury India चे पोर्टल वर Philips India is not traded on BSE in the last 30 days असे दिसते किंवा Cadbury is not listed on BSE, Cadbury is not traded याचा अर्थ काय? जर या कंपनीचे शेअर आपल्याकडे असतील तर काय करायचे ? आणि आपण या कंपनीचे शेअर विकत घेऊ शकतो का ? बरयाच मोठ्या कंपनी बाबतीत असे दिसते याचा अर्थ त्या खराब आहे असा होतो का ?
जर कंपनीचे शेअर डीलिस्ट झाले असतील (जर कंपनीला भारतिय stock एक्शेंज वर लिस्टिंग त्रासदायक वाटत असेल तर कंपनी आपले शेअर्स डीलिस्ट करते.) तर त्याचे ट्रेडिंग stock एक्सचेंज वर होऊ शकत नाही. या कंपनीची जी प्राईस डीलिस्टिंगच्या वेळेस असेल ती प्राईस आपण योग्य मुदतीत कंपनीशी संपर्क साधला तर मिळू शकते.जर मुदत संपून गेली असली तर तुम्हाला कंपनीला विशेष विनंती करावी लागते किंवा नॉनट्रेडेबल सिक्युरिटीजमध्ये ज्या फर्म्स ट्रेडिंग करत असतील त्यांना विकावे लागतात.कॅडबरीचे शेअर्स डीलीस्ट झाले आहेत पण काही शेअरहोल्डर्स Rs१८०० किंमतीलाही शेअर्स टेंडर करायला अजूनही तयार नाहीत. जर कंपनीच्या शेअर्समध्ये बराच काळपर्यंत किंवा कमी ट्रेडिंग होत असेल तर अशा शेअर्सना इल्लीक्विड शेअर्स असे म्हणतात. याची कारणे शेअर्सची किंमत, कंपनीची आर्थिक परिस्थिती, किंवा अन्य तात्कालिक कारण असु शकते.
नाव: अभय
तुमचा प्रश्न : मॅॅडम, शेअरबाजारावरील मिळणार्या लाभावर कर कसे लागतात. त्यावर माहिती द्या.
लाभ होवो किंवा नुकसान होवो तम्ही केलेल्या शेअर्सच्या व्यवहारावर तुम्हाला काही सरकारी कर द्यावे लागतात.शेअर व्यवहारांत जर तुम्हाला लाभ झाला असेल तर कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : intraday trading medhe share up down cha andaz kasa ghva
तुम्ही जर शेअर्स किंमतीतील हालचालीचे निरीक्षण करत असाल,तर असे निरीक्षण, तुमचा अनुभव, शेअरमधील VOLUME आणी आलेल्या बातमीचा प्रभाव आणी सर्किट लिमिट यावरून तुम्ही हा अंदाज बांधू शकता.
नाव: sandeep untwale
तुमचा प्रश्न : share book vealu varun kimat vadecha andaz kasa gheva
शेअरची किंमत बुक VALUEच्या किती पटींत चालली आहे हे पहा. तो शेअर ज्या सेक्टरमधला असेल त्या सेक्टरमधील कंपन्यांना बुकVALUE च्या किती पटींत किंमत मिळते ते पहा आणी शेअर महाग किंवा स्वस्त ते ठरवा.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, शेर मार्केट वर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो जसे की, एखाद्या कंपनी चे उत्पादन,विक्री किंवा कर्ज ह्या पण गोष्टींचा परिणाम होतोच तर, एखाद्या कंपनी वर किती कर्ज आहे ही माहिती कुठून मिळेल कारण INTERNET वर मी खुप शोधले पण पुर्ण Details नाही मिळाली म्हणुन एखादी वेबसाईट सुचवा.
कंपनीच्या तिमाही निकालांमध्ये ही माहिती दिलेली असते. तसेच या निकालांत गेल्या तिमाहीची तसेच गेल्या पूर्ण वर्षाची माहिती दिलेली असते. ही आपल्याला कंपनीच्या वेबसाईटवर मिळू शकते.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, 1) ब्रोकर ने आपल्याला न विचारता आपले शेर परस्पर विकन्याचा अधिकार असतो का?
आपला DEMAT अकौंट ब्रोकरकडे असला आणी आपण पॉवर ऑफ ATTORNEY दिली असेल आणी आपण खरेदी केलेया शेअर्सचे पैसे जर आपण दिले नसतील किंवा आपल्याकडून ब्रोकरला काही पैसे येणे असतील तर तेव्हड्या पैशांचे शेअर्स ब्रोकर विकू शकतो.पण ब्रोकारणे आपल्याला विकण्याआधी याची पूर्व सुचना दिली पाहिजे.
2) BSE (Bombay Stock Exchange)
NSE (National Stock Exchange)
सर्व बाबतीत या दोन्हीं पैकी कोणते मोठे आहे?
BSE हे भारतातले पहिले STOCK एक्स्चेंज आहे. त्यामुळे यावर खूप शेअर्स लिस्ट झालेले आहेत. NSEची स्थापना अलीकडच्या काळांत झाल्यामुळे त्यावर BSEपेक्षा कमी शेअर्स लिस्टिंग झालेले आहेत.
नाव: Pradip Ghalme
तुमचा प्रश्न : मॅडम, 1) Demat व Treading हे Account 3 Members मधे समान असे Group Account म्हणुन उघाड़ता येते का?2) Demat व Treading हे Account ब्रोकर्स कडून उघडतांनी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे.
आपण DEMAT अकौंटसंबंधी ब्लॉगनंबर १८ ३१ आणी ३९ वाचा. DEMAT अकौंट वरील व्यवहार करण्यासाठी सर्व संयुक्त खातेदार्रांच्या सह्या जरुरीच्या असतात.
नाव: L S UNHALE
तुमचा प्रश्न : BONAS SHEAR MHANAJE KAY
आपण बोनस शेअरवरील ब्लॉग नंबर ५६ वाचा.
नाव: पांचाळ शंकर विलासराव
तुमचा प्रश्न : नमस्कार शेअर मार्केट हि माझ्यासाठी नविन संकल्पना आहे. मला यामधले काहीच माहिती नाही तरी मित्रा कडून मिळालेली चुकीची माहिती आणि पेपर मध्ये वाचून माझी इच्छा आहे कि मी पण ट्रेडिंग करावी किंबहुना मला यामधील काहीच माहिती नाही dimat account कसे खोलायचे आणि ट्रेडिंग कशी करायची या बदल महती करून द्यावी हि विनंती
आपण माझ्या ब्लोगमधील सर्व लेख नीट आणी संपूर्ण वाचावेत. आपण विचारलेली सर्व माहिती वेगवेगळ्या लेखांत दिलेली आहे.
नाव: सुहास गोरे
तुमचा प्रश्न : नमस्कार मैडम
मला काहीप्रश्न पडलेआहेत. आपण ब्रोकरशिवाय ट्रेडिंग नाही करू शकतो का.?
आपण ऑन लाईन ट्रेडिंग करू शकता. पण ऑन लाईन ट्रेडिंग मध्येही बँकेबरोबर ब्रोकरही असतोच.
SIPमधे गुंतवणूक करण चांगल की स्वता demat ac कडून ट्रेडिंग करण चांगल.? आणि जर ब्रोकरशिवाय ट्रेडिंग करता येत असेल तर ती कशी करतात काही माहित असेल तर शेयर करा म्हणजे तुम्ही करालच 
SIP आपण ज्या म्युच्युअल फंडाकडे द्याल त्या व्यवस्थापनाच्या कौशल्यावर आणी योग्यवेळी योग्य संधी घेण्यावर तुमचा फायदा अवलंबून असतो. यांत काही संधी हुकु शकतात. पण आपण अभ्यास केला आणी ट्रेडिंग केले तर म्युच्युअल फंडांचा व्यवस्थापन खर्च आणी इतर चार्जेस वाचतात.आणी होणारा सर्वच्यासर्व फायदा तुमच्या पदरांत पडतो. म्युच्युअल फंड फक्त निवडक सेक्टरमध्ये आणी निवडक शेअरमध्ये गुंतावूक करतात. त्यामुळे तुमची गुंतवणुकीची संधी मर्यादित होते.
.आणि अजून एक मार्केटशी संभंदित जे काही शब्द आहेत ते जर माझ्या email वर send कराल pls.
प्रत्येक ऑन लाईन ट्रेडिंगचे SOFTWEAR आणी टर्म्स आणी कंडीशन वेगळ्या असतात. त्या तुम्हाला त्या त्या साईटवर जाऊन समजावून घ्याव्या लागतील. आणी मार्केटशी संबंधीत शब्द तुम्हाला माझ्या ब्लॉगवरील ‘माझी वहिनी लेख नंबर ११ दिवाळी विशेष’ यामध्ये मिळतील. .
mutulfund बदल काही माहित जस की ते काय असतात आणि त्यात कशी गुंतवणूक करावी.?
म्युच्युअल फंडावर एक ब्लॉग टाकीत आहे तो आपण वाचावा.
आणि आपले खुप खुप आभार जो ह्या प्रकार ब्लॉग लिहून तुम्ही आम्ही सारख्या खुपश्या तरुणाच्या आणि सर्व मराठी माणसाच्या मार्केट बदल बगायचा दृष्टिकोण बदलात. मी काही व्यक्तिना याआधी मार्केट बदल विचारले होते पण त्यानी मला पॉजिटिव सांगन्याचे सोडून नको ते आपल् काम नाही वगरे अशी उत्तरे दिली . आपल्या ब्लॉग मुळे खुप मदत झाली आहे. आणि मी नवका आहे मार्केट मधे तर मी इंट्राडे ट्रेडिंग करावी का.?
इंट्राडे ट्रेडिंग वाईट आहे असा दृष्टीकोन न ठेवता योग्य संधी मिळाल्यास इंट्राडे ट्रेड करण्यास काही हरकत नाही. पण हा फार वेगांत करण्याचा ट्रेड आहे हे लक्षांत ठेवावे. आणी आपल्या समोर शेअर्सची किंमत असल्याशिवाय सहसा हा ट्रेड करू नये.
नाव: sandesh palande
तुमचा प्रश्न : mala option madhe trading karayala shikayach ahe . tumhi madat karu shakatat kay
योग्य वेळी तुमच्या सुचनेप्रमाणे लेख टाकू.
नाव: mangesh
तुमचा प्रश्न : Dear madm, future ani option baddl Ek tri lekh liha..pls
योग्य वेळी तुमच्या सुचनेप्रमाणे लेख टाकू.
नाव: Arun
तुमचा प्रश्न : Renuka Sugar Stock Mi Rs.30 Ni Ghetala Aahe, Aaj To Rs.17 Rupai Aahe To Kadhi Vadel.? Tevade Sanga.? Madam Please.
साखर कंपन्यांच्या शेअर्सला चांगले दिवस येत आहेत. आपली प्राईस मिळायला थोडे महिने लागतील.
नाव: akshay kharage
तुमचा प्रश्न : madam share buy-back mhanje kay te mala samjaun sanga
आपण माझ्या ब्लोगवरील लेख नंबर ५८ वाचा त्यांत BUYBACK वर विस्ताराने लिहिले आहे
 
नाव: SACHIN
तुमचा प्रश्न : madam mi market madhe new entry keli ti pan maagchya month madhe mala experiance naslyane mi market jeva 29000 vr hote teva stock buy kele ani aaj market padlyane majha khup loss jhala tr yasathi mala thod guide kara.
FEDची मीटिंगमध्ये जर व्याजाचे दर न वाढवण्याचा निर्णय घेतला गेला तर मार्केट पुन्हा उसळी घेईल. तुम्ही जर ब्लू चीप शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर कमी भावांत अजून काही शेअर्स खरेदी करू शकता त्यामुळे सरासरी किंमत कमी होईल. आणी मार्केटने उसळी घेतल्यावर हे शेअर्स तुम्ही थोडाफा र फायदा घेवून विकून टाका. आणी मार्केट वाढत असताना शेअर खरेदी करून फायदा होत असतानाही थांबू नका. होत असलेला फायदा घेवून मार्केटमधून बाहेर पडा. लक्षात ठेवा कि शेवटी निर्णय तुमचा आहे कारण फायदा किंवा तोटा तुमचाच होणार.

भाग 63 – GST :- एक महत्वाचा TAX REFORM

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

image courtesy - FICCI / Youtube.com

image courtesy – FICCI / Youtube.com


GST ( गुड्स आणी सर्विसेस कर):-  करप्रणाली सुधारण्याच्या दृष्टीकोनातून हे बिल फारच महत्वाचे आहे. २००६-२००७ च्या अंदाजपत्रकांत कॉंग्रेसच्या राजवटीत प्रथम GST चा उल्लेख केला गेला होता.
GST हा एक अप्रत्यक्ष कराचाच एक प्रकार आहे. हा कर गुड्सचे उत्पादन, विक्री, आयात आणी सेवा या सर्वांवरील राष्ट्रीय पातळीवरील सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर असेल. निर्यात, आयकर आणी कॉर्पोरेट TAX या कराच्या कक्षेच्या बाहेर आहेत. केंद्र सरकार आणी राज्य सरकारे जे निरनिराळे अप्रत्यक्ष कर लावतात त्या सर्व करांची जागा GST घेणार आहे. सध्या VAT(VALUE ADDED TAX), एक्साईज, आणी सर्विस tax असे तीन कर लावण्याऐवजी एकच GST हा कर लावला जाईल.
GST चे फायदे

 • कर भरणे सोपे जाईल. कर भरण्याच्या,आकारण्याच्या पद्धतीत सहजता आणी सुलभता येईल.
 • कराची चोरी किंवा कर न भरणे किंवा कमी भरणे कमी होईल.
 • देशाचे GDP (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉड्क्ट) वाढेल. प्रगतीचा वेग वाढेल.
 • संपूर्ण देशांत सामान खरेदी करण्यासाठी एकच कर (GST) आणी एकाच दराने कर द्यावा लागेल. पूर्ण देशांत एकाच किंमतीला एक प्रकारचे सामान खरेदी करता येईल. तुम्ही मुंबईला घ्या दिल्लीला घ्या नाहीतर कोलकात्याला घ्या एकाच किंमतीला मिळेल.
 • वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्यापासून सुटका होईल. करवसुली, करआकारणी, करचुकवेगिरी, यामध्ये होणारी वादविवाद, हेराफेरी बंद होईल.एकाच व्यक्तीला किंवा संस्थेला एकाच गुड्स साठी अनेक ठिकाणी वेगवेगळे कर देणे भाग पडते ते थांबेल. एकदा GST भरला की झाले. GST मुळे TAX-STRUCTURE सोपे आणी कार्यक्षम होईल. त्यामुळे सरकारकडे करापोटी जमा होणारी रक्कम वाढेल आणी वस्तूंच्या किंमती कमी होतील.
 • TAX च्या रचनेत पारदर्शकता येईल. राज्यांना मिळणाऱ्या VAT, एनटरटेनमेंट कर, लक्झरी कर, एन्ट्री कर, लॉटरी कर आणी राज्य आकारीत असलेला विक्री कर बंद होतील. सामान खरेदी करताना किंवा कोणत्याही सेवेचा आस्वाद घेताना एकूण सर्व कर मिळून ३०% ते ३५% कर द्यावा लागतो. तो २०% ते २५% इतका द्यावा लागेल.
 • त्याचवेळी भारताच्या प्रगतीचा दर १% ते १.५% ने वाढेल.
 • हा GST कर वस्तू आणी सेवा या दोन्हीवर लावला जाईल.
 • कर वाचवण्यासाठी कंपन्या आपली उत्पादने राज्यातल्या राज्यातच विकत असत. राज्याबाहेर उत्पादने विकल्यास सेन्ट्रल सेल्स कर आणी एन्ट्री कर लागत असे. कारण हे कर उत्पादनाच्या वेळेस किंवा ट्रेडिंगच्या वेळेला लावले जात नाहीत. चांगली उत्पादने जी देशाच्या एका भागांत मिळतात ती देशांत सर्वत्र मिळायला लागतील त्यामुळे ग्राहकांना निवड करायला जास्त वाव मिळेल तसेच कंपन्यांचे मार्केटही सर्व देशभर वाढेल.
 • गुड्स आणी सेवा ज्या वेळेला एकत्र पुरवल्या जातात त्यासाठी आता एकच GST लावला जाईल.फ्रीज.
 • GST अंतर्गत विविध प्रकारच्या गुड्सचे वर्गीकरण सोपे आणी साधे केले आहे. यामुळे कर लावण्यासाठीकोणत्याही गुड्सचे वर्गीकरण वादग्रस्त ठरणार नाही.
 • Retail सेक्टर  साठी LEASE रेंटल आणी इंव्हेनटरी खर्च कमी होईल.
 • भरलेल्या GSTसाठी सप्लाय चेन मधील घटकांना क्रेडीट देणे सोपे होईल.
 • GST मुळे असंघटीत उद्योगही कराच्या जाळ्यांत येईल. त्यामुळे सरकारचे उत्पन्न वाढेल आणी संघटीत आणी असंघटीत क्षेत्रातील दरी कमी होईल. संघटीतक्षेत्राला जास्त लेव्हल प्लेयिंग फिल्ड मिळेल.

GST पास होण्यांत विरोधी पक्षाच्या हरकती आहेत

 • एका राज्यांतून दुसऱ्या राज्यांत माल जाताना १% जादा कर राज्ये लावू शकतील अशी GST मध्ये तरतूद आहे ती वगळण्यांत यावी
 • १८% ही GST कराची कमाल मर्यादा असावी. आणी ती घटनेमध्ये नमूद करावी
 • GST बाबतीत असलेले वादविवाद सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यांत यावी. कायदेशीर अडचणी आहेत त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे.

या  सुचना सरकारने मान्य केल्या आहेत पण GSTचा कमाल दर १८% घटनेत नमूद करण्याला मात्र सरकारचा विरोध आहे.
GST चा  परिणाम 
विविध राज्ये एकाच वस्तूवर वेगवेगळ्या दराने कर लावत त्यामुळे एकाच वस्तूची वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी किंमत असे. आता असे होणार नाही. आता राज्ये आकारत असलेले विविध कर रद्द झाल्यामुळे राज्यांच्या करापासून मिळणाऱ्या उत्पनांत बरीच घट होईल असे राज्य सरकार्राना वाटते. त्यामुळे GST लागू होण्याच्या सुरुवातीच्या काळांत राज्य सरकारांना बर्याच सवलती देण्यांत येतील. प्रत्येक राज्यसरकारला कराच्या उत्पन्नांत येणारे नुकसान केंद्र सरकार ५ वर्षेपर्यंत राज्यांना देईल. GST लागू झाल्यामुळे लॉजिस्टिक, इ-कॉमर्स, ऑटोमोबाईल, FMCG, एन्टरटेनमेंट, या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल.
ज्या कंपन्यांच्या मालाची आंतरराज्यीय वाहतूक होते, आणी माल या गोदामातून त्या गोदामातून, किंवा या शहरातून त्या शहरांत वाहतूक होते त्यांच्या या वाहतुकीवर लागणाऱ्या करांत बचत होईल.कराची रकम ठरवणे कर जागोजागी भरणे तसेच त्यांच्या पावत्या सांभाळून ठेवणे हे सर्व कागदपत्रांचे काम कमी होईल.प्रत्येक टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी लांबच लांब लाईन लागणे कमी होईल. तसेच यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल. त्यामुळे मालाची नेआण करण्याच्या वेळांत बचत होईल,यामुळे कंपन्यांनी कमी इंव्हेनटरी ठेवावी लागल्यामुळे एकूण खर्चांत बचत होईल. विविध क्षेत्रातील कंपन्या ज्यांना GST मुळे फायदा होईल या खालीलप्रमाणे

 • लॉजिस्टिक :- TCI, VRL, SNOWMAN, गती. गेटवे डीस्ट्रीपार्क, ALLCARGO, कंटेनर कॉर्पोरेशन. लॉजिस्टिकचे ऑऊटसौर्सिंग करणे फायदेशीर आणी सोपे होईल. त्यामुळे लॉजिस्टिक कंपन्यांचा बिझिनेस वाढेल.
 • FMCG :- ब्रिटानिया,बाटा, एक्झाईड, अमर राजा, इमामी, डाबर, GODFREY फिलिप्स, ITC, RELAXO, INDAG रब्बर, ज्योती lab, पेंट्स, टाईल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या. या कंपन्यांना GST चा थेट फायदा झाला नाही तरी कमी वेअरहॉउस खर्च, अधिक कार्यक्षम सप्लाय चेनचे नियोजन आणी योग्य इंव्हेनटरी नियोजन यामुळे अप्रत्यक्ष फायदा होईल
 • प्लास्टिक उद्योग :- या उद्योगांत असंघटीत क्षेत्र जास्त आहे,त्यामुळे असंघटीत क्षेत्रातील उद्योजक डीलर्सना जास्त मार्जिन डेट असत. आता GST मुले ते कराच्या जाळ्यात आल्यामुळे पूर्वीइतके मार्जिन देऊ शकणार नाहीत. याचा फायदा PLASTIBEND सारख्या कंपन्यांना होईल.
 • ऑटो :- मारुती, महिंद्रा,VST एस्कॉर्टस या क्षेत्राला थेट फायदा होईल. सध्या एक्साईज आणी VAT मिळून जेवढी रक्कम द्यावी त्यापेक्षा कमी रक्कम GST म्हणून द्यावी लागेल.
 • एन्टरटेनमेंट :- डिश टी व्ही, PVR, INOX LEISURE. BOX रेव्हेन्यू प्रमाणे कर आकारतात. हा कर प्रत्येक राज्यांत वेगवेगळ्या दराने आकारला जातो. हा कर लावताना १०० % ऑक्यूपन्सी गृहीत धरली जाते. त्यामुळे या कंपन्यांचा GST मुळे फायदा होईल.

पुढे काय 
GST हा फिस्कल रिफॉर्मचा एक ‘टर्निंग पाईंट’ आहे. करप्रणाली सोपी झाल्यामुळे कराचे प्रशासन सोपे आणी पारदर्शक होईल. परंतु ही एक करप्रणालीतील सुधारणा असल्यामुळे याचे फायदे मिळण्यास वेळ लागेल.परंतु GST विधेयक मंजूर होण्यासाठी संसदेच्या दोन्ही सदनामध्ये २/३ बहुमत आवश्यक आहे. या सदनांत आवश्यक त्या बहुमताने विधेयक मंजूर झाल्यावर ५०% राज्यांनी ते RATIFY करणे आवश्यक आहे. जवळजवळ 2 वर्षे राज्यसभेत २/३ बहुमत नसल्याने रखडलेले GST विधेयक पावसाळी अधिवेशनांत मजूर करण्यासाठी सरकारचा सर्व आघाड्यांवर निकराचा प्रयत्न चालू आहे.
भारतीय शेअरमार्केटला फेड रेट, ब्रेक्झीट, आणी चीनमधील कटकटी, ह्यांनी ग्रासले असताना एकतर पावसाचा शिडकावा आणी GST पास होण्याची शक्यता या मुळे शेअरमार्केटला दिलासा मिळेल.
 

तुमचे प्रश्न – माझी उत्तरं – May – June 2016

आधीची प्रशोन्त्तरे वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तुमचे प्रश्न - माझी उत्तरं

Image courtesy – wikipedia


नाव: Archit
तुमचा प्रश्न : Madam , mazyakade R COM share aahet purchase rate 72 Rs.. Aajacha bhav 50 Rs. aahe. Aata R COM share MSCI madhun kadhalyavar tyacha rate ajun khali yeil ka
माफ करा हं ! आपला प्रश्न समजला पण ठराविक शेअरच्या बाबतीत मी माझे मत मांडत नाही. MSCI इंडेक्स मध्ये टाकल्याची कारणे आणी काढल्याची कारणे तपासा म्हणजे तुमचे उत्तर तुम्हाला मिळेल
नाव: ROHIT
तुमचा प्रश्न : maza eka brokar kade equiti acount ahe. pan to mala trading karayachi ahe. to mazyakade det nahi ani suport hi nahi karat fund transfer nahi karat me kay karu.
तुमचा ब्रोकर असे कां करतो आहे असे तुम्हाला वाटते ते तूम्ही कळवले नाही. वैयक्तिक काही कारण असेल पण साम्यानतः असे घडत नाही
नाव: sudam
तुमचा प्रश्न : demat & treading account both are same or diffrant ?
तुम्ही माझा संबंधीचा ब्लोग वाचा. DEMAT अकौंट शेअर्स चा हिशेब ठेवतो आणी लॉकरसारखे जपून ठेवतो. आणी ट्रेडिंग अकौंट शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी वापरला जातो.त ट्रेडिंग अकौंटचा वापर करून खरेदी केलेले शेअर्स DEMAT अकौंटमध्ये जमा होतात आणी ट्रेडिंग अकौंटचा वापर करून विकलेले शेअर्स DEMAT अकौंटमधून वजा होतात.
नाव: krushna tapke
तुमचा प्रश्न : सर मी करेन्सी मार्केट मध्ये ट्रेडिंग करतो पण मी नवीन आहे मला मार्केट चा अन्दाज काढता येत नाही. त्यामुळे खूप नुकसान होत आहे . तरी मला मार्गदर्शन करावे
तुम्ही सुरुवातीलाच करसी मार्केटमध्ये व्यवहार सुरु केल्याने तुमचा गोंधळ उडतो आहे. प्रत्येक देशाच्या करन्सीवर त्या त्या देशांतील अर्थव्यवस्थेचा मोठा परिणाम होतो. त्यासाठी तुमचा बर्याच गोष्टींचा व्यासंग हवा. लहान तोंडी मोठा घास होईल पण तुम्ही करन्सीमार्केट मधील व्यवहार थांबवून इक्विटीमध्ये व्यवहार चालू करा. सध्या बुल रन आहे फायदा होईल.
नाव: Hemant Chaudhari
तुमचा प्रश्न : Namaskar,Madam…
Tumche serva blogs vachlet khup mahathachi mahiti bhetli. Mala khup upyog hoil thumchya blogs cha. Mala delivary treding chi mahiti milu shakel ka???
मी सगळे ब्लॉग कॅश मार्केटमध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग वरच दिले आहेत. वायदा बाजारांत (F& O ) मी ट्रेडिंग करत नाही. डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे वेगळे काही नसून शेअर्स खरेदी करून फायद्यांत म्हणजे फायदा होत नसेल तर थांबा आणी फायदा होत असेल तर विकुन टका.. भाजीपाला, धान्य, कपडा, घेताल्याप्रमाणेच आहे. फक्त शेअर्स विकत घेण्याचा मुळ उद्देशच फायदा घेवून विकणे हा असतो. उगीचच लोक घाबरतात. कंपनी कोणती चांगली आहे कां वाईट आहे आपण फसू कां ? याची भीती वाटते.
नाव: narendra
तुमचा प्रश्न : Good morning mam…
1.Mansoon jawal yet ahe…. Konte Ashe stocks ahet je mansoon mule changle return detil…?
2. Kontya bankeche results changle ahet… 7 tarkechya RBI meeting mule kahi effect hoil ka….?
माझा ब्लोग मधील भाग ४०, ४१ वाचा. त्यावरून कोणते शेअर्स कधी घ्यावेत हे समजेल. कोणत्या बँकेने किती अडवान्स आयकर भरला ते पहा. कोणत्या बँकेने कोणाला लोन दिले ज्यांनी लोन घेतले ते त्यांनी ते फेडले कां ? की ज्यामुळे NPA कमी होतील किंवा बँकेच्या तिमाही निकालांमध्ये ग्रोस NPA, नेट NPA, NPA साठी केलेली प्रोविजन या गोष्टीनवर लक्ष द्या. गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीत प्रगती झाली कां अधोगती झाली याचा मागोवा घ्या. RBI ने व्याजाचा दर कमी केला आणी त्या पाठोपाठ बँकांनी व्याजाचा दर कमी केला तर उद्योगाला कमी व्याज भरावे लागते. त्यामुळे उद्योगाचे नफ्याचे प्रमाण वाढते. आणी मार्केटला सपोर्ट मिळतो.
नाव: gajanan rathod
तुमचा प्रश्न : shair market baddal informtion what is mean by sensex,nefty
BSE ( बॉम्बे STOCK EXchange) चा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स आणी NSEचा निर्देशांक म्हणजे NIFTY
नाव: sangmeshwar venkatrao Naik
तुमचा प्रश्न : Madam mi gavat rahto tar mala share market mady invest kearache ahe tar mi online dmat aani trading account bank my kadta yet Ki broker made,mala purn vyavar on line Karta yet ma ,please lavkr reply pathva
आपण गावांत राहत असाल तरी आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावी SBI किंवा इतर DEMAT आणी ट्रेडिंग अकौंटची सोय असलेली बँक असेल तेथे आपण ओंन लाईन DEMAT आणी ट्रेडिंग अकौंटची चौकशी करावी. आपण ऑन लाईन पूर्ण व्यवहार करू शकता. फक्त तुमचा सेविंग अकौंट DEMAT आणी ट्रेडिंग अकौंटशी जोइंट करतात.
नाव: विशाल उल्हासराव येवले – इनामदार
तुमचा प्रश्न : समजा एखाद्या अबक कंपनीचा शेर ची face value १ रु. आहे आणि जर त्या शेर ची किमत वाढत जाऊन ५० रु थांबली तर ह्यामध्ये त्या सदर कंपनीला direct किवा indirect कोणता फायदा होतो? व कसा होतो? किवा शेर चा भाव उतरल्यास कंपनीला काही आर्थिक फटका सहन करावा लागतो का? शेर च्या चढ व उताराचा कंपनीवर काय EFFECT होतो? Treading मध्ये शेर ची किमत कमी जास्त होण्यामागे कंपनीचे काही लाभ व नुकसान असते का?
कंपनीजवळ काही शेअर्स असतात, प्रमोटर्सजवळ काही शेअर्स असतात, काही शेअर्स तारण ठेवून कंपनीने कर्ज घेतलेले असते. शेअरच्या भावानुसार मार्केटकॅप बदलते. त्यामुळे भाव कमी झाला तर कंपनीची बाजारातील पत कमी होते.
नाव: Balaji Telang
तुमचा प्रश्न : Resp. Madam mi ek government employee aslyane share market made investment Karu shakto Kay?
प्रत्येक ठिकाणचे नियम वेगळे असतात. तुम्ही तुमच्या खात्यांत चौकशी करावी. CCS (कॉनड्क्त रूल ) १५ सब रुल 4 प्रमाणे तुम्ही कोणत्याही व्यवसायांत भागीदार होऊ शकत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करायला पूर्णपणे मनाई केलेली नाही. पटापट खरेदीविक्री केल्यास त्यास स्पेक्युलेशन समजतात. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करू शकता. पण दर तीन महिन्यांनी तुम्ही काही खरेदी विक्री केल्यास त्याची माहिती द्यावी लागते. नोकरीला लागण्यापूर्वीची गुंतवणूक असल्यास कधीही विकू शकता पण कळवावे लागते. डीपार्टमेंटसुद्धा तुमच्याकडे कधीही माहिती मागू शकते. A आणी B C आणी D या ग्रेडमधील अधिकाऱ्यांसाठी रक्कम ठरलेली असते. त्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केल्यास कळवावेच लागते. आपण आपल्या कार्यालयांत नीट चौकशी करूनच गुंतवणूक करावी.
नाव: sudha chavan
तुमचा प्रश्न : Nifty Future Option madhey trading kartana konti kalgi gheyvi? please guide kara
मी वायदा बाजाराची माहिती देईन तेव्हा तुमच्या प्रश्नाचा विचार केला जाईल.
नाव: manoj
तुमचा प्रश्न : marketchi survatch mahit nahi .konte sher ghyaiche aani bhav phaida kasa hoto he sanga.
तुम्ही सर्व ब्लोग शांतपणे वाचा.. तुमच्या सारख्या गुंतवणुकीत रस असणार्या लोकांसाठीच मी ब्लोग लिहित आहे.
नाव: VISHAL SHILLE
तुमचा प्रश्न : Namaste madam .
maza question khup vichitra vatel.
“JAR MI SHARES VIKAF GHETALE ANI TE SHARES NA VIKATA SWATAKADE TASECH THEVALE TAR??” SHARES TRADE KARAYALACH PAHIJE ASHI SAKTI AHE KA??
तुम्ही शेअर स्वतःकडेच ठेवू शकता. पण ती कंपनी चांगली हवी. प्रगतीपथावर हवी. तुमचे भांडवल नेहेमी वाढत राहते. लाभांश, बोनस ,राईट्स शेअर्स असे फायदे तुम्हाला मिळत राहतात. पण कंपनीचा बिझीनेस तोट्यांत चालत असला तर शेअर्सचा भाव कमी कमी होतो. आणी तुम्ही घेतलेल्या शेअर्समध्ये नुकसान होऊ शकते. आपण बँकेत पैसे ठेवल्यास किती फायदा होईल तेवढा फायदा आपल्यास आपल्याजवळ शेअर्स ठेवून व्हावयास पाहिजे. तुम्ही विकत घेतलेले शेअर्स विकावेत किंवा ठेवावेत, किती काळ ठेवावेत याबाबतीत कोणतीही सक्ती गुंतवणूकदारावर नाही.
नाव: Jayant Khadilkar
तुमचा प्रश्न : Dear Sir,
I hold some shares of Reliance Industries. Last 5 years this share is not performing well. Can it is possible for Reliance what Colgate did in past.
What Colgate did :
10 paid up share converted into Re.1 paid up not by splitting but returning back Rs. 9 to share holders. Due to this share capital became 1/10.
For Reliance
If same is done for Reliance Its Rs. 3000 Cr. share capital will become 1/10 to Rs;300 Cr.
All other fundamentals will remain same. There is no impact on share price because share is not splitted but Rs. 9 returned back to share holders.
On a capital of 300Cr net profit of Rs. 25000Cr why not share will go up ? Your opinion Please.
आपला प्रश्न वाचून आश्चर्य वाटले. कंपनीने काय करावे हे सर्वस्वी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणी शेअरहोल्डर्स बहुमताने कंपनीच्या ध्येयधोरणानुसार ठरवतात. सहसा किरकोळ गुंतवणूकदार त्याला कंपनीची कॉर्पोरेट एक्शन किंवा आर्थिक परिस्थिती योग्य वाटत नसली तर त्या कंपनीचे शेअर्स फायद्यांत असले तर विकून टाकतो. अन्यथा शेअरहोल्डर वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सर्वसाधारण सभेत त्याच्या काही सुचना किंवा हरकत असली तर ठराव मांडू शकतो. कोलगेटची योजना २००७ मध्ये आली होती. पण तशीच योजना दुसऱ्या कंपनीने आणल्यास त्याला योग्य तो आणी तसाच प्रतिसाद मिळेलच असे नाही. कारण आपण केस स्टडी करत असल्यास या दोन्ही केसेसमध्ये देशांतील आर्थिक परीस्थेती,.कंपनीची आर्थिक परिस्थिती., कंपनीची ध्येयधोरणे यांत खूप फरक आहे. याची आपण नोंद घ्यावी.
नाव: Sagar Patil
तुमचा प्रश्न : Namaskaar Madam. Maza prashn aahe shares buy kartaana ‘order type-limit or market’ yacha arth kay?
तुम्ही शेअर खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी एक मर्यादा ठरवता. त्या किंमतीला किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला शेअर खरेदीची मर्यादा घालता, त्याचप्रमाणे विक्रीसाठी त्या किंमतीला किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीला शेअर्स विकावेत अशी मर्यादा घालता. यालाच ऑर्डर टाईप लिमिट on मार्केट असे म्हणतात.
नाव: Satyajit mane
तुमचा प्रश्न : Tata metaliks ka vadhat aahe ? & me market madhe navinach survat keli aahe; so Sip suru karu ka?
SIP सुरु करायला काहीच हरकत नाही. पण मार्केट स्वतः केल्यामुळे एकतर तुमचे ज्ञान वाढते, आणी योग्य संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी दुसऱ्यांवर ( म्युच्युअल फंडाच्या लोकांवर) अवलंबून रहावे लागत नाही. तसेच SIPच्या रक्कमेत तुम्ही तुमच्या पसंतीनुसार शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवू शकता.
नाव: amita
तुमचा प्रश्न : hiii, mam mi tumcha blog vachat aahe..mla tyatun pushkal mahiti milali. maza ek prashna asa aahe ki news nkki kothe vachavyat jss tumhi weekly samalochan deta tasha news kuthe miltil
आपण वर्तमानपत्रे, विशेषतः इकॉनॉमिक टाईम्स, दूरदर्शनच्या शेअरमार्केटवर सतत FEEDBACK देणाऱ्या वाहिन्या, BSE आणी NSE च्या साईटवरील कंपनी अन्नौंसमेंट, तसेच आर्थिक आणी कॉर्पोरेट जगातील घडामोडी यावर सतत लक्ष ठेवावे लागते.या घडामोडी यांचे कंपन्यांच्या कारभारावर होणारे परिणाम यांचे योग्य मूल्यमापन करून आपला निर्णय घ्यावा लागतो. म्हणून कण कण वेचावेत त्याप्रामाने जिथून मिळेल तिथून माहिती मिळवा. .
नाव: akshay
तुमचा प्रश्न : mam tumhi kiti rs pasun surwat keli hoti share market madhe kay 10000 pasun surwat hou shakte please mala guide kara
कितीही रुपयांपासून सुरुवात करा. अगदी Rs १००० पासून सुरुवात करा. रीलायन्स्चा एक किंवा ONGC चे ५ शेअर्स घेऊन सुरुवात करा हे शेअर्स थोडा फायदा घेऊन विका. कमी रकम गुंतवल्यास नफा कमी होईल पण ज्ञान मिळेल हे नक्की. हळू हळू मुद्दलांत फायदा मिळवून गुंतवणूक करीत राहिल्यास रक्कम वाढेल.
नाव: Ketan
तुमचा प्रश्न : जे स्माल कॅप आणी मिडकॅप शेअर चालतात त्यांत volume आहे कां ते पहावे आणी ट्रेड करावा. डिलिव्हरी volume जास्त असेल तर short टर्म ट्रेड करावा. पण ट्रेडिंग volume जास्त असेल तर stoploss ठेवून इंट्राडे ट्रेड करावा.याचा नक्की अर्थ काय . हे Volume म्हणजे काय ?आणि ते moneycontrol.com वर कुठे बघायचे? Volume नेहमी बदलत असतात का की फिक्स असतात? डिलिव्हरी volume and ट्रेडिंग volume मध्ये फरक काय ?
volume म्हणजे शेअर्सला असणारी मागणी. VOLUME नेहेमी बदलतो. जेव्हा आपण एखाद्या शेअरचा VOLUME चार्ट बघतो तो २ रंगांत असतो. एक रंग डिलिवरी VOLUME साठी तर दुसरा ट्रेडिंग VOLUNEचा. डिलिव्हरी VOLUME जास्त असेल तर या शेअरमध्ये काही दिवसांत काहीतरी बातमी अपेक्षित आहे उदा :- बोनस, स्प्लिट, buyback या बातमीचा फायदा घेण्यासाठी लोक शेअर्सची डिलिव्हरी घेत आहेत.ही घटना घडून त्याचा फायदा होईस्तोवर हे शेअर्स आपल्याजवळ ठेवायचा त्यांचा विचार असतो. त्यामुळे ह्या शेअरची किंमत नजीकच्या काळांत वाढेल असा अर्थ होतो. ट्रेडेड volume जास्त असेल तर शेअरच्या किंमतीतील चढ उतार पाहून त्याचा फायदा ट्रेडर्स त्याच दिवसांत खरेदीविक्री करून पदरांत पाडून घेतात. त्याला इंट्राडे ट्रेड असे म्हणतात.
नाव: ABHIJIT
तुमचा प्रश्न : नमस्कार मँडम तुम्हाला मार्केटबद्दलची एवढी सर्व माहीती कशामधुन भेटते अाणि तुम्ही ती कशाप्रकारे नाेट करता ? तुमच्या ब्लाँग वरील लेखांचे एकत्रित मासिक आहे का? असेल तर मी ते कशाप्रकारे मिळवु शकतो ? spectrum म्हणजे काय त्याबद्दल माहिती सांगा.
वर्तमानपत्र, दूरदर्शनवरील शेअरमार्केटशी संबंधीत वाहिन्या, इंटरनेटवरील शेअर्ससंबंधीत माहिती देणार्या साईट्स या सर्वांवरून तुम्हाला माहिती मिळू शकते. मी पुस्तक काढणार आहे तेव्हा तुम्हाला ब्लॉगवरून कळवीनच, स्पेक्ट्रम म्हणजे रेडिओ लहरी. या दोन प्रकारच्या असतात. दृश्य आणी अदृश्य या लहरी डोळ्यांना दिसत नाहीत किंवा कानाला ऐकू येत नाहीत किंवा या लहरींमुळे वातावरणाला इजा पोहोचत नाही. दळणवळणाच्या उपकरणांत ज्या रेदिओ लहरी वापरल्या जातात त्यांना स्पेक्ट्रम असे म्हणतात. याची मालकी देशाची असते आणी सरकार वेळोवेळी या स्पेक्त्राम्चा लिलाव करते, या लिलावांत टेलीकॉम क्षेत्रांत काम करणाऱ्या कंपन्या भाग घेतात.
नाव: प्रकाश बाबा हुलगे
तुमचा प्रश्न : मी या क्षेत्रात नवीन आहे त्यामुळे मला यामध्यले काही माहीत नाही त्यामुळे माझे असे नोवेदन आहे की तुम्ही मला या क्षेत्राची माहीत देऊ शकता अर्थात A/क ओपनिंग वगेरे काहीही त्याच्यक मुले मला या क्षेत्र मध्ये कळेल 
नवीन शिकणार्यांसाठी ब्लॉगमध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्यावरून मार्केट शिकता येईल
नाव: sATISH sHEDGE
तुमचा प्रश्न : MADAM, MALA FUTURE AND OPTION BADAL MAHITI HAVI AHE TUMCHA BLOGS MADHUN SAMAJAL KI TUMHI F AND O MADHEY MAHITI NAHI THEVAT TAR MALA DUSARE KONI MARATHI MADHEY MAHITI DEU SHAKTE KA PLS INFORM US.
F&O म्हणजेच वायदा बाजार. थोडे थांबा मला वेळ मिळेल तेव्हा मी माहिती देईन.
नाव: Roshan Lawhale
तुमचा प्रश्न : Madam mazya kade 1 mahinya sathi 8000 rs ahet kontya shares madhe investment karavi…tumch mat dya pls
तुम्ही कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची हे तुमचे तुम्ही मार्केटचे निरीक्षण आणी अभ्यास करून ठरवायचे असते.
नाव: malhari salunkhe
तुमचा प्रश्न : Madam , khup chan ani sopya padhtin lek lihle ahet yabaddal tumche aabhar. maza prashn ase ahet ki , 
1) long term or short term shares ghenyasathi compny kashi nivdavi….bcs anek sector ahet tyat anek companya ahet …tyatli nakki kontya compnya nivdavyat …….?
शेअरची निवड कशी करावी हे मी अनेकवेळेला ब्लॉग मध्ये सांगितले आहे. ते वाचा लक्षांत ठेवा आणी त्याप्रमाणे निर्णय घ्या.
नाव: yogesh j.
तुमचा प्रश्न : hello… mam… cine line india sarkya small cap company madhe invest karne kitpat risky aahe
सिनेलाईन असो किंवा कोणतीही कंपनी असो धोकां किती आणी फायदा किती याचा योग्य तो ताळमेळ घालून निर्णय घ्या. ..
नाव: Tushar Sutale
तुमचा प्रश्न : Madam stock market ani mutal fund,bonds Ya madhe kay diffrence ahe
शेअरमार्केट म्हणजे कंपनीच्या भागभांडवलाची खरेदीविक्री. म्युच्युअल फंड म्हणजे लोकांकडून थोडे थोडे पैसे गोळा करून तयार झालेली मोठी रक्कम तज्ञांच्या मार्गदर्शंनाने शेअर्समध्ये कर्जरोख्यांत, BOND मध्ये गुंतवणे. BOND हे DEBT INSTRUMENT आहे. तुम्ही एखाद्या ENTITYला किंवा सरकारला काही ठराविक दीर्घ मुदतीसाठी आणी ठराविक व्याजाने रक्कम देता. bonds सहसा गव्हर्नमेंट इशू करते यामध्ये धोका आणी उत्पन्न दोन्हीही कमी असते.
नाव: PRAMOD JADHAV
तुमचा प्रश्न : १. एखादा शेयर्स विकत घेतला की तो लगेच १ मिनिट मध्ये विकता येतो का? त्याला इतर विकलेल्या शेयर्सपेक्ष्या जास्त दलाली द्यावी लागते का?
२. प्रत्येक शेयर्स मागे तो विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी किती पैसे दलालाला द्यावे लागतात.
शेअर विकत घेतला की एका मिनिटांत तो विकता येतो. हा इंट्राडे ट्रेड होय. याला इंट्राडे ट्रेडसाठी आकारली जाणारी दलाली द्यावी लागते. ही दलाली डिलिव्हरी ट्रेडवर आकारल्या जाणार्या दलालीपेक्षा कमी असते. मी दालालीबाबत लिहिले आहे. आणी नमुन्यासाठी बिल सुद्धा दिले आहे.
नाव: malhari salunkhe
तुमचा प्रश्न : मी कॅन्डलस्टिक चार्ट चा अभ्यास चालू केला आहे . तर माझा प्रश्न असा आहे की या चार्ट चा मला उपयोग होईल का ? झाल्यास किती उपयोग होईल ?
कॅनडलस्टिक चार्ट हे शेअरमार्केट विषयीच्या तांत्रिक अभ्यासांतर्गत येते. शेअरच्या किंमतीवर अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो.. त्यामुळे आपल्याला तांत्रिक तसेच फंडामेंटल आणी शेअर्सच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागेल.
नाव: Tushar Sutale
तुमचा प्रश्न : dalal street ani stock exchenge madhe kay relation ahe
शेअरमार्केटच्या स्थापनेपासून शेअर मार्केट तेथे आहे. शेअरमार्केटमधील दलालांची वर्दळ तेथे असे म्हणून त्या रस्त्याला दलाल स्ट्रीट असे नाव पडले.
नाव: tamhane sanket
तुमचा प्रश्न : mi 21 vrshancha aahe maja qus. asa ahe ki mi min. kiti rupye shear market mdhe guntvu shakto? maji takat jastit jast 3000 rupye/month ahe. me ya pekshya jast nahi guntvnuk nahi kru shakat. karan me ajun vidyarthi ahe ani gharchyani kharch krnya sathi dilelya paisyatun mi thode far vachavun guntvnuk krnar ahe. tri tumhi delela salla mla molacha asel. thanks.
तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता. पैसे न गुंतवताही शिकू शकता. यामुळे ज्ञान मिळेल. पण मार्केटमध्ये पैसा घालूनच पैसा काढावा लागतो. कमी पैसे गुंतवले तर फायदा कमी होतो इतकेच. मुद्दल+फायदा असे सतत गुंतवत गेल्यास ४-५ वर्षानी चांगली रक्कम जमते.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : option var bola kahi
ऑप्शन वर बोला काही म्हणजे काय मला समजले नाही. ऑप्शन वर बोलून तुमची कोणतीही शंका दूर होणार नाही.
नाव: santosh
तुमचा प्रश्न : nse kiva bse ekhadya share la ban karte manje kai
एळाद्या शेअरच्या ट्रेडिंगमध्ये काही चुकीचे किंवा घालून दिलेल्या प्रक्रियेच्या विरुद्ध काही घडत आहे असे वाटल्यास त्या शेअरमधील ट्रेडिंग पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगीत ठेवले जाते. म्हणजे त्या शेअर्समध्ये खरेदीविक्री होऊ शकत नाही.
नाव: yogesh j.
तुमचा प्रश्न : namaste mam… mala angel broking madhe demat aani treding ac open karayache aahe tari tyani ac opening sathi margin chq. magitale aahe,,, chq. dene garajeche aahe ka?
चेक किती रकमेचा मागितला आहे आणी कां मागितला आहे आणी त्या मागे हेतू काय याची चौकशी करा योग्य वाटल्यास द्या नाहीतर देऊ नका. प्रत्येक ब्रोकरचे नियम वेगळे असतात,
नाव: प्रदीप घालमे
तुमचा प्रश्न : मॅडम IPO म्हणजे काय? मी 47 नंबर चा Blog वाचला पण नेमके IPO म्हणजे काय ते नाही कळाले,Please थोड़े अजुन समजेल असे सांगता का?
तुम्ही पुन्हा एकदा ४७ नम्बरचा ब्लोग वाचा व ह्यातील काय समजले नाही ते विचारा त्या ब्लोगमध्ये सर्व खुलासेवार दिले आहे..
 

भाग 62 – शेअर मार्केट आणि ब्रेक्झीट

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
brexit-1477615_640ब्रेक्झीट म्हणजेच ब्रिटनचे एक्झिट म्हणजे बाहेर पडणे, कुठून बाहेर पडणे तर युरोपिअन युनियनमधून. ब्रिटनच्या जनतेबे सार्वमताचा कौल देवून आता आपल्या देशाला युरोपिअन युनियनमधून बाहेर पडावे लागेल असे बहुमताने सांगितले. ही एक प्रकारे जागतिकीकरणाच्या प्रगतीचा विचार करता एक नकारात्मक घटना आहे. हा काही वर्षांच्या नकारात्मक आणी असंतोषाचा परिणाम आहे. यापाठीमागे सामाजिक, आर्थिक, राजकीय, कांरणे होती त्यामुळे ब्रेक्झीटचे परिणामही आर्थिक सामाजिक आणी राजकीय झाले हे निश्चितच.
सर्वात आधी आपण युरोपिअन युनियनची पार्श्वभूमी पाहुया. युरोपिअन युनियनच्या स्थापनेच्या वेळी USSR( UNION OF SOCIALIST SOVIET REPUBILCS) ची छकले होऊन तेथे वेगवेगळी आणी सार्वभौम संघराज्ये निर्माण झाली.त्याचवेळी USA उर्फ अमेरिका प्रबळ होऊ लागली. आर्थिक,राजकीय सर्वच बाबतीत अमेरीकेशी वाटाघाटी करण्याची शक्ती कोणांत राहिली नाही. अशा वेळेला युरोपमधील छोट्या छोट्या राष्ट्रांनी एकत्र येऊन युरोपिअन युनियन ही संघटना स्थापन केली. त्यांनी सभासद देशांमध्ये गुड्स, सेवा, भांडवल आणी लोक यांच्या हालचालींवर असलेले निर्बंध सैल केले. आपले नवीन युरो हे चलन काढून सुप्रस्थापित केले. यामुळे US$ शी स्पर्धा करण्यासाठी एक चलन उपलब्ध झाले. सर्व युरोपिअन युनियनच्या सदस्य देशांचे व्यवहार युरो मध्ये चालू केले.या साठी एक सामाईक करप्रणाली सुरु केली.
UK (युनायटेड किंग्डम) प्रथमपासूनच EU चा सभासद राहूनही अलिप्त राहिले. त्यांनी आपले चलन GBP हे वेगळे ठेवले आणी इतर देशांशी सर्व व्यवहार GBP मध्येच करणे चालू ठेवले. आपले विसा, पासपोर्ट या संबंधीचे नियम अलग ठेवले. आपली सामाजिक सुरक्षा स्कीम वेगळी ठेवली. अशा तऱ्हेने EU चा सदस्य असूनही आपले वेगळेपण जपले.
हा EU चा प्रयोग अवघड होता खरा पण हळू हळू यशस्वी व्हायला लागला. युरो एक चलन म्हणून व्यवहारांत सुप्रस्थापित झाले. पण मग झाले तरी काय ? एवढ्या मेहेनतीने स्थापन केलेल्या EU मधून UK ला बाहेर पडावेसे कां वाटले? सर्व देशांची मोट बाधून सर्वांच्या हिताचा विचार करणे एवढी संत महंत वृत्ती कोणाजवळ असते! आपल्या देशांत अटलबिहारी वाजपेयीन्सारख्या धुरंधर आणी कुशल नेत्यालाही २३ पक्षांची मोट असलेले सरकार चालवण्यांत अनंत अडचणी आल्या नव्हत्या कां ?
सदस्य देशाना EUने दिलेले कर्ज आणी त्यांचे GDP यांच्यांत योग्य तो ताळमेळ राहिनासा झाल्यामुळे ब्रेक्झीटचे प्रकरण उद्भवले. EU मधील जर्मनीचे वर्चस्व ब्रिटनला खुपत होते. ब्रिटनमध्ये सामाजिक सुरक्षाप्रणाली चांगली असल्यामुळे EU मधील इतर देशातून आलेल्या नागरिकांवर खर्च होऊ लागला. तसेच या EU मधील देशातून आलेल्या लोकांमुळे UK मधील नागरिकांना नोकऱ्या, उद्योग यातील उपलब्धता कमी झाली. त्यामुळे UK चे नागरिक कर भरतात आणी त्याचा फायदा मात्र इतर EU देशांतील लोकांना मिळतो आणी त्यांनी मिळविलेले सर्व उत्पन्न ते त्यांच्या देशांत पाठवितात. असे UKच्या नागरिकांना वाटत होते.तसेच UKच्या समृद्ध्रीच्या मार्गांत EUचे सदस्यत्व एक अडसर आहे असेही UKमध्ये सर्व साधारण लोकमत तयार झाले. त्यातच तात्कालिक कारण झाले सिरीयातून आलेले निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे. EUने सदस्य राष्ट्रांना या नागरिकांना आश्रय देण्याचे आवाहन केले. UK मध्ये या विरुद्ध खूपच असंतोष निर्माण झाला.
यासर्व पार्श्वभूमीवर UKने EU मधून बाहेर पडावे अशी मोहीम चालू झाली. पंतप्रधान कॅमेरून( हे UK ने EU मध्ये राहावे या मताचे पुरस्कर्ते आहेत आणी ते एक वर्षापूर्वीच बहुमताने निवडून आले होते) यांनी या प्रश्नावर सार्वमत घेण्याचे ठरवले. सार्वमत ब्रेक्झीटच्या बाजूने येईल अशी शंका कोणालाही नव्हती. ब्रेक्झीट आणी EU मध्ये UKने राहावे यासाठी दोन्ही बाजूंनी प्रचार झाला. २३ जूनला सार्वमत घेतले गेले आणी २५ जून ला UK मधील नागरिकांनी ५२%ने ब्रेक्झीटच्या बाजूने कौल दिला. सामान्य नागरिक एका बाजूला तर शिकलेला आणी उच्चभरू समाज दुसऱ्या बाजूंला अशी विभागणी झाली आणी समाजकारणाने अर्थकारणावर मात केली. या सार्वमताचा निर्णय UK सरकारवर बंधनकारक नव्हता. भारतासारखी लिखित घटना UK मध्ये नाही पण EU तील बाकी सर्व देशांनी UK ला आवाहन केले की जेवढ्या लवकर ब्रेक्झीट होईल तेवढे बरे असे जाहीर केल्यामुळे UK सरकारला ब्रेक्झीटला पर्याय उरला नाही.
यांत पहिला राजकीय परिणाम म्हणजे पंतप्रधान कॅमरून यांनी राजीनामा दिला. दुसरा परिणाम म्हणजे इतर सदस्य देशांत EU मधून बाहेर पडण्याच्या बाजूने असणाऱ्या लोकांना समर्थन लाभले. तिसरा परिणाम म्हणजे EU मध्ये जर्मनीचे वर्चस्व निर्विवाद प्रस्थापित झाले. जे देश आणी त्या त्या देशांतील कंपन्या UKमध्ये सर्व युरोपमधील व्यवहार सुलभतेने करीत होत्या त्यांना आता हे तेवढे सोपे राहणार नाही याची कल्पना आली. ब्रिटनमध्ये राहणारे EUमधील नागरिकांत तसेच या देशांत राहणाऱ्या ब्रिटीश नागरिकांत एकप्रकारे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले.
ब्रेक्झीटची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी EU च्या घटनेनुसार दोन वर्षाची मुदत दिली आहे तसेच या ब्रेक्झीट साठी एक वेगळा करार UK आणी EU मध्ये होईल. तो पर्यंत या ब्रेक्झीटच्या परिणामांना तोंड देण्याची सर्व संबंधीत पक्षांना वेळ मिळेल.
पण हे सर्व घडले कां ? कसे किंवा परिणाम काय व किती याचा विचार किती लोक करतात. तर फारच थोडे ! पण घाबरतात मात्र सगळेच!  ब्रेक्झीटमुळे मार्केटमध्ये एक प्रकारचे नैराश्याचे, अनिश्चिततेचे वातावरण पसरले. मार्केट या घटनेमुळे अस्वस्थ झाले. मार्केटला अनिश्चिततेचे वातावरण अजिबात आवडत नाही. पटत नाही.
अहो आज ब्रेक्झीट झाले की लगेच त्याचा काही परिणाम होतो कां ? तर नाही. पण मार्केटचा स्वभाव आततायी आणी आपले मत व्यक्त करण्याची घाई आणी भीती, याचा फायदा उठवतात सट्टेबाज आणी यांत भरडले जातात ते किरकोळ गुंतवणूकदार. ते अगदी टोकाची भूमिका घेतात आणी शर्यतीला उभे असल्यासारखे आपल्याजवळ असलेले शेअर्स विकून टाकण्याची घाई करतात. इतकी घाई करतात की मार्केट जणू काही पळून चालले आहे. अशी विक्री झाली की मग जे लोक शांतपणे विचार करतात त्याना स्वस्तांत शेअर्स खरेदी करता येतात. आणी ज्यांनी शेअर्स घाईघाईत विकले त्यांना तोटा होतो. कोणत्याही चांगल्या किंवा वाईट घटनेचा परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागतो.२४ जून या दिवशी जगातील सर्व मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळली आणी आता BLACK FRIDAY साजरा करावा लागतो की काय अशी वेळ आली. पहिल्यादिवशी भारतीय मार्केट १०८० पाईंट (सेन्सेक्स) कोसळले. पण या घटनेचा परिणाम फक्त UK आणी जास्तीतजास्त युरोपमध्ये कारभार करणाऱ्या कंपन्यांवर होईल असे विश्लेषण होताच मार्केट त्याच दिवशी ४५० पाईंट सुधारले.
ज्या कंपन्यांचा युरोपशी व्यवहार आहे (उदा  टाटा स्टील, टाटा मोटर्स, मदरसन सुमी, भारत फोर्ज) त्या कंपन्यांवर याचा परिणाम होईल. या कंपन्यांना आपला तोटा कमी करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी मिळणार आहे.
पण यामध्ये एक गोष्ट अशी झाली की ज्या कंपन्यांचा युरोपबरोबर कारभार कमी आहे त्यांचे शेअर्स वाढले. आणी बर्याच गुंतवणूकदारांनी FMCG क्षेत्रातील कंपन्यांमध्ये स्वीच करणे पसंत केले.त्यामध्ये कोलगेट, डाबर, मेरिको, HUL, आणी अगदी मनपसंद बिव्हरेजीस सुद्धा. आणी छोट्या चहा, साखर, तांदूळ करमणूक हॉटेल या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या. काही प्रमाणांत लोकांकडे पडून असलेले या कंपन्यांचे शेअर्स लोकांना विकता आले. small कॅप मिडकॅप शेअर्समध्ये तेजी दिसली. एक प्रकारे ब्रेक्झीट ही भारतीय मार्केटच्या दृष्टीने इष्टापत्तीच ठरली.
येथे एक नमूद करावेसे वाटते की ब्रेक्झीटच्या वेळी आलेला समाधानकारक पाउस , सरकारने वाढविलेला सरकारी खर्च, निरनिराळी प्रगतीपथावर जाण्यासाठी उचललेली पावले याचा शह बसला. आणी मार्केट सतत पडण्याच्या ऐवजी गेले आठ दिवस सतत वाढत आहे.
भारतीय मार्केटने हा ब्रेक्झीटचा धक्का लीलया पचवला. अजूनही काही जणांच्या मनांत पाल चुकचुकते आहे की वरवरची तेजी आहे एक दिवस मार्केट खूप कोसळेल. पण आपण आशा करावी की मार्केटचा हा सुंदर बुल रन चालू राहील आणी गुंतवणूकदारांच्या डोक्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहील. म्हणजेच ब्रेक्झीट हे मार्केटच्या दृष्टीने शाप नसून वरदान ठरले.
 

भाग 61 – P notes म्हणजे नक्की काय?

आधीचा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Image source - Wikipedia

Image source – Wikipedia


गेल्या एका समालोचनात मी ‘P नोट्स’ या शब्दाचा उल्लेख केला P नोट्स म्हणजेच पार्टीसिपेटरी नोट्स.P नोट्सलाच ‘OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENT’ असे म्हणतात.हे instrument देशातल्या देशांत वापरले जात नाही.P नोट्स CONTRACT नोट सारख्याच असतात. या P नोट्स ENDORSEMENT आणी DELIVERYने TRANSFER करता येतात. FII (FOREIGN INSTITUTIONAL INVESTORS) जी गुंतवणूक करतात त्यापैकी ६०% गुंतवणूक P नोट्सच्या माध्यमातून होते.
 
 
सेबीने परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी १९९२ च्या करारानुसार परवानगी दिली आहे. पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते.काही विदेशी गुंतवणूकदारांना रजिस्ट्रेशन करायचे नसते. पण त्याच्याकडे असलेला पैसा गुंतवण्यासाठी ते मार्ग शोधत असतात.काही देशांतील करविषयक धोरणांचा फायदा घेण्यासाठी P नोट्सचा वापर करतात. भारतासारख्या विकसनशील देशाला विकास योजना पूर्ण करण्यासाठी पैशाची जरुरी असते. विकसित देशापेक्षा विकसनशील देशामधून अधिक चांगले उत्पन्न मिळू शकते. इंडियाबेस्ड ब्रोकरेजीस आणी FPI(FOREIGN PORTFOLIO INVESTORS) हे सेबीकडे रजिस्टर केलेले असतात. ते विदेशी गुंतवणूकदारांसाठी इंडियाबेस्ड सिक्युरिटीजची खरेदी विक्री करतात. आणी परदेशी गुंतवणूकदाराना P नोट्स इशू करतात आणी होणारा कॅपिटल गेन्स आणी लाभांश त्या गुंतवणूकदाराना ट्रान्स्फर करतात. म्हणजेच रजिस्ट्रेशन न करता परदेशी गुंतवणूकदारांना P नोट्स द्वारे भारतीय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता येते.
भारतीय नागरिकांना खाते उघडताना KYC (KNOW YOUR CUSTOMER) फॉर्म भरावा लागतो. PAN कार्ड, अड्रेस प्रूफ, ओळखीचा प्रूफ द्यावा लागतो.अशी कोणतीही सक्ती P नोट गुंतवणूकदारांवर नाही. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांची कोणतीही माहिती मिळणे कठीण जाते. ठराविक सिक्युरिटीजचे BENEFICIAL मालक कोण हे समजत नाही.अशा गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून पैसा काढून घेतला की मार्केट VOLATILE होते.
FOREIGN HNI (HIGH NET WORTH INDIVIDUALS), HEDGE फंड्स आणी इतर विदेशी गुंतवणूकदार P नोट्सचा वापर करून भारतीय शेअरमार्केटमध्ये सोप्या रीतीने सहजपणे गुंतववणूक करू शकतात. DIRECT रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारा वेळ आणी पैसा वाचतो. त्यामुळेच P नोट्स हे instrument त्यांच्यामध्ये लोकप्रिय आहे.
P नोट्सची पद्धत डीस्क्रीमिनेटरी आहे असे गुंतवणूकदाराना वाटते. कारण भारतीय गुंतवणूकदारांना सर्व नियम पाळावे लागतात पण विदेशी गुंतवणूकदारांना मात्र कोणत्याही अटी किंवा नियम न पाळता पैसा कमवता येतो. त्यामुळे परदेशी नागरिकांना भारतीय ENTITIES ACQUIRE करता येतात किंवा त्यावर स्वतःचे कंट्रोल प्रस्थापित करता येते. यामुळे कंपनीच्या निर्णयांवर ते परिणाम करू शकतात. NBFC(NON BANKING FINANCIAL COMPANY) च्या माध्यमातून अनलिस्टेड कंपन्यातही गुंतवणूक करता येते. .
P नोट्सच्या द्वारे बराच बेहिशोबी पैसा देशांत येण्याची शक्यता असते.त्यामुळे सरकार याविषयी अतिशय दक्ष आहे. हल्ली स्वित्झर्लंड सारखे देशही KYC नॉर्म्स कडक करत आहेत.या विदेशी नागरिकांच्या उत्पन्नाचे स्त्रोत विचारायचे नाहीत पण त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळाली पाहिजे या साठी प्रयत्नांत असते.
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमने P नोट्सवर काही बंधने असणे जरुरीचे आहे अशी शिफारस केली होती. त्यानुसार सेबीने P नोट्स ( OFFSHORE DERIVATIVE INSTRUMENT) वरील बंधने वाढविली. आता P नोट होल्डरला P नोट दुसऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना ट्रान्स्फर करण्यासाठी किंवा इशू करण्यासाठी ज्या इशूअरने प्रथम ती P नोट इशू केली असेल त्याची आधी परवानगी घ्यावी लागेल. आणी P नोट्स फक्त PRE APPROVED लिस्टमधील गुंतवणूकदारांच्या नावे ट्रान्स्फर करता येईल. सेबीने सर्व P नोट इशू करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी इशू केलेल्या P नोट्सच्या महिन्याभरातील ट्रान्स्फरची माहिती सेबीला रिपोर्ट करायला सांगितले आहे. P नोट इशुअरने प्रत्येक BENEFICIARY OWNER साठी भारतातील नियमाप्रमाणे KYC नॉर्म्सचे पालन केले पाहिजे. P नोट्स इशूअरला P नोट्ससाठी SUSPICIOUS TRANSACTION रिपोर्ट FIU( FINANCIAL INTELLIGENCE UNIT) कडे फाईल करायला सांगितले. तसेच P नोट्स इशुला भारतीय ANTI MONEY LAUNDERING कायद्याच्या प्रोविजन लागू होतील. आणी प्रत्येक वर्षी KYC रिपोर्ट अपडेट करायला सांगितले. याचा परिणाम FII ज्या कंपन्यांमध्ये आहे त्या कंपन्यांच्या शेअर्स वर होईल.उदा :- इंडसइंड बँक, ग्रासिम
P नोट्सवर सेबी बंधने आणणार असे समजताच मार्केटमध्ये घबराट निर्माण होते आणी मार्केट कोसळते. विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेतात. या कारणाने १७ ऑक्टोबर २००७ रोजी शेअरमार्केट १७४४ पाईंट कोसळले होते. १ तास ट्रेडिंग थांबवावे लागले होते.ही परदेशी गुंतवणूकदारांच्या दृष्टीने स्वर्गाची वाट असली तरी भारताच्या दृष्टीने अतिशय असुरक्षित आहे. धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था सरकारची सुद्धा होते.
गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना त्या कंपनीमध्ये FII ची गुंतवणूक आहे कां आणी असल्यास किती आहे या कडे लक्ष द्यावे आणी P नोट्सच्या बाबतीत काही बातमी येणार असल्यास सावध राहावे.