Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ८ फेब्रुवारी २०१९
आज क्रूड US $६१.१८ प्रति बॅरल ते US $ ६१.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०३ ते US $१= Rs ७१.३२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५७ होता. VIX १५.५५ होते.
USA चे अध्यक्ष ट्रम्पनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरची मीटिंग रद्द केली. HUAWEI च्या संबंधात ट्रम्पनी युरोपमधील देशांना इशारा दिला की HUAWEI कंपनी बरोबर जे देश व्यापार करतील त्या देशांना USA ने घातलेल्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल. चीनने USA मधून क्रूड आयात करायला सुरुवात केली. युरोप, उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये थंडी वाढत आहे.त्यामुळे नैसर्गीक वायूसाठी मागणी वाढत आहे पण ही स्थिती थोड्या दिवसांकरता टिकते. क्रूडचे भाव मर्यादित रेंजमध्ये राहतील अशी अपेक्षा आहे
आज जानेवारी २०१९ या महिन्यातील एकूण ऑटो विक्रीचे आकडे आले. पॅसेंजर कार्सची विक्री २.७% इतकी कमी झाली, TWO व्हिलर्सची विक्री ५.२% कमी होऊन १६ लाख युनिट्स, कमर्शियल वाहनांची विक्री २.२% ने वाढून ८७५९१ युनिट्स, वाहनांची निर्यात १३.३% वाढून ३.४४ लाख युनिट झाली.
अर्थ मंत्रालयाने आज सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना RBI ने केलेल्या रेट कट चा फायदा कर्जदारांना त्वरित पास ऑन करायला सांगितला. म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँकाही हा फायदा कर्जदारांना पास ऑन करतील असे सांगितले.
या सोमवारपासून म्हणजेच ११ फेब्रुवारी २०१९ पासून निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी सुरु होईल. पहिली एक्स्पायरी १४ फेब्रुवारी २०१९ला होईल आणि त्यानंतर दर आठवड्यात गुरुवारी निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होईल. या साप्ताहिक एक्स्पायरीसाठी निफ्टीचा लॉट ७५ युनिटचा असेल.
रिअल्टी क्षेत्रातली GST कमी करण्यावर विचार करण्यासाठी GST कॉऊन्सिलने एक GOM ( ग्रूप ऑफ मिनिस्टर्स) ची नियुक्ती केली होती. या GOM ने खालीलप्रमाणे शिफारशी केल्या.
अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर ५% GST लावला जाईल तर बिना इनपुट टॅक्स क्रेडिट अफोर्डेबल हौसिंगवर ३% GST लावला जाईल. या शिफारशी मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत मंजूर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या घोषणेनंतर रिअल्टी क्षेत्रातील कंपन्या तसेच त्या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.
रेमंड्स या कंपनीचे डायरेक्टर सिंघानिया यांचा ९१ % स्टेक असलेल्या एन्टिटीने रेमंड्स कडून Rs ९९३ कोटींची खरेदी केली आणि या एंटीटीने रेमंड्सला Rs १६१३ कोटींची विक्री केली. असे एका व्हिसलब्लोअरने जाहीर केले. यावर रेमंड्सने सांगितले वरील पार्टी रिलेटेड व्यवहार कंपनीच्या बिझिनेसशी निकट संबंधात असून पूर्णपणे पारदर्शकरीत्या केलेले आहेत आणि ते कंपनीने जाहीर केलेले आहेत. हे व्यवहार ‘प्रिंसिपल टू प्रिंसिपल’ बेसिस वर आणि स्पर्धात्मक किमतीला केलेले आहेत. कंपनीने वरील स्पष्टीकरण दिल्यावर शेअर पडायचा थांबला आणि त्यात चांगली वाढ झाली.
ब्रिटानिया या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. पण व्हॉल्युम ग्रोथ व्हावी तेवढी झाली नाही. कंपनीने सांगितले की त्यांना रूरल मार्केट्स मध्ये WEAKNESS जाणवत आहे.
आता टाटा मोटर्स विषयी थोडेसे
टाटा मोटर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. तंत्रज्ञान फार वेगाने बदलत आहे. ऍसेट आणि इन्व्हेस्टमेंटची किमत खूप कमी झाली असेल तर ती बॅलन्सशीट मध्ये वर्षानुवर्षे ठेवण्यापेक्षा त्या किमतीतल्या तफावतीसाठी फायद्यातून प्रोव्हिजन करून ती ‘राईट ऑफ’ करणे यालाच ‘इम्पेअरमेन्ट’ म्हणतात. घरात रेडियो टेपरेकॉर्डर, डेक,जुने मोबाईल या गोष्टी मालमत्ता म्हणून दाखवल्या जातात पण विकायला गेल्यास त्यांना फारशी किमत येत नाही. बॅलन्सशीटमध्ये असेट्स वर्तमान बुक व्हॅल्यूवर दाखवले की त्यामुळे डेप्रीसिएशन प्रोवाइड करावे लागते,रेव्हेन्यूवर परिणाम होतो. जे ऍसेट जुने, उत्पन्न मिळवण्यास निरुपयोगी, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ‘आऊट ऑफ डेट, झाले असतील त्यांच्या व्हॅल्यूमध्ये होणारी घट म्हणजेच ‘इम्पेअरमेंट’ होय.
या प्रक्रियेमुळे घराची असो किंवा उद्योगाची असो ‘रिअल व्हॅल्यू’ बॅलन्सशीटमध्ये जाहीर होते. या बरोबरच थोडासा टाटा मोटर्सचा ग्राहकांबरोबरचा संवाद कमी झाला आहे असे वाटते कारण त्यांनी मार्केटमध्ये दाखल केलेल्या मॉडेल्सला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.
जेट एअरवेजने SBI कडून घेतलेल्या कर्जाचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यासाठी करार केला.हे मार्केटला पटले नाही.सध्या पडणाऱ्या थंडीमुळे आणि धुक्यामुळे तसेच मुंबईत काही रनवेची दुरुस्ती चालू असल्यामुळे विमान कंपन्यांना चांगले दिवस नाहीत.
CEAT च्या हलोल प्लांट मध्ये कमर्शियल उत्पादन सुरु झाले.
गुजरात गॅस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, IRCON, टिमकीन, SCI, महिंद्रा आणि महिंदा ( इतर उत्पनात वाढ), कल्याणी स्टील, JB केमिकल्स, टी व्ही टुडे, अल्केम लॅब,EIL (Rs ३.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), DR लाल पाथ लॅब, दिलीप बिल्डकॉन यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. SAIL चाही तिसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला.
VARROC ENGG, इंगरसोल रँड, REC यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.
एक्सेल कॉर्प, GSPL, झुआरी ऍग्रो, प्रिकॉल ( फायद्यातून तोट्यात), यूको बँक (NPA वाढले), VIP या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
वेध उदयाचा
आता मार्केटसाठी सर्व ट्रिगर संपले.बर्याच कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल लागले आता होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका हाच एक मुख्य ट्रिगर असेल. जागतिक मार्केटमधील कमी होणारी मागणी,USA आणि चीनमधील तणाव, ब्रेक्झिट, आणि हवामानातील होणारे प्रतीकूल बदल यांचा परिणाम मार्केटवर होत राहील. त्यातून काल डोजी पॅटर्न झाला होता.फिबोनासि सिरीजप्रमाणे काल ६१.८ ही RETRACEMENT लेव्हल आली होती. त्यामुळे मार्केटचा ट्रेंड बदलला. या प्रकारच्या मार्केटमध्ये विचारपूर्वक शेअर्सची निवड करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करावी. थोड्या प्रमाणात काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. शक्यतो मार्केटच्या ट्रेंडबरोबर राहावे. म्हणजे आपले भांडवल सुरक्षित राहून भांडवल कायम वाढत राहील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४६ NSE निर्देशांक निफ्टी १०९४३ बँक निफ्टी २७२९४ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!