Tag Archives: weekly market analysis in marathi

आजचं मार्केट – १५ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.७८ प्रती बॅरल ते US $ ६२.६२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.७३ ते US $ १= Rs ७१.८३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१९ तर VIX १५.०३ होते.

आज USA च्या अधिकाऱ्यांनी चीन बरोबरचे ट्रेड डील फेज १ लवकर पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारत आणि USA यांच्यामध्ये अधिकांश मुद्य्यांवर सहमती बनली आहे त्यामुळे लवकरच भारत आणी USA यांच्यात ट्रेड डील होण्याची शक्यता आहे.

आज सुप्रीम कोर्टाने पुन्हा एक महत्वाचा निकाल दिला. एस्सार स्टील खटल्यात सुप्रीम कोर्टाने असे सांगितले की NCLAT COC ( कमिटी ऑफ क्रेडिटर्स ) ने घेतलेल्या निर्णयात लक्ष घालू शकत नाही किंवा त्यात बदल करू शकत नाही. सगळ्या स्टेकहोल्डर्सचे हित लक्षात घेऊन COC ने निर्णय घेतला पाहिजे. ऑपरेशनल क्रेडिटर्स (कच्च्या मालाचे सप्लायर, वेगवेगळ्या सर्व्हिसेसचे पुरवठादार इत्यादी) आणी फायनान्सियल क्रेडिटर्स ( बँका, वित्तीय संस्था,) यांची तुलना होऊ शकत नाही. या दोन क्रेडिटर्समध्ये पैशाची वाटणी कशी करायची हा अधिकार आणी जबाबदारी COC ची आहे कारण हे फायनान्सियल डिसिजन आहे. जर नियमाप्रमाणे ३३० दिवसात रेझोल्यूशन प्रक्रिया पुरी झाली नाही तर NCLAT या साठी मुदतवाढ देऊ शकते. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आर्सेलर मित्तल यांनी एस्सार स्टील टेक ओव्हर करण्याचा मार्ग मोकळा झाला. याचा दुसरा परिणाम म्हणजे एस्सार स्टील या कंपनीला सरकारी आणि खाजगी बँकांनी दिलेल्या कर्जापैकी ९०% कर्ज वसूल होईल. या वसुलीमुळे या खात्यासाठी बँकांनी केलेली प्रोव्हिजन रिव्हर्स करता आल्यामुळे या बँकांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल थोडे सुधारतील. या बातमीनंतर या कंपनीला कर्ज दिलेल्या बँकाच्या शेअर्समध्ये तेजी आली आणी बँक निफ्टी ३१००० च्या पार झाली. यात SBI, IDBI बँक, कॅनरा बँक, PNB, ICICI बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, HDFC बँक, ऍक्सिस बँक, J &K बँक, सेंट्रल बँक, लक्ष्मीविलास बँक, यांचा समावेश आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे यामुळे क्रेडिट कल्चर सुधारेल, बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडविण्याच्या वृत्तीला आळा बसेल.
सुप्रीम कोर्टाने आज फोर्टिस हेल्थकेअरच्या सिंग बंधूंना कोर्टाच्या कंटेम्पट( अवमानना) बद्दल दोषी ठरवून Rs ११७५ कोटींचा दंड केला. तसेच फोर्टिस हेल्थकेअरच्या स्टेक विक्रीवरील स्टे कायम ठेवला. यामुळे फोर्टिस हेल्थकेअरचा शेअर पडला.

आज TRAI ( टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने सर्व स्टेकहोल्डर्सच्या बैठकीत IUC ( इंटरकनेक्ट युसेज चार्जेस) वर विचारविनिमय केला. हे चार्जेस १ जानेवारी २०२० पासून रद्द होणार होते. रिलायन्स जिओने मत व्यक्त केले की हे चार्जेस रद्द झाले तर टेलिकॉम ग्राहकांना स्वस्तात टेलिकॉम सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे हे चार्जेस रद्द करावेत. नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत TRAI याबाबतीत निर्णय घेईल.

DIVI’ज लॅबच्या LINGOJIGUDUM या तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली. त्यामुळे या शेअरमध्ये तेजी आली.

IRCTC ने राजधानी, शताब्दी, आणि दुरांतो या गाड्यांमधील कॅटरिंग चार्जेस वाढवले. चहा Rs ३५, नाश्ता चहा Rs १४०, आणि लंच Rs २४५ अशी ही वाढ करण्यात आली. यामुळे IRCTC चे उत्पन्न वाढेल. त्यामुळे IRCTCच्या शेअरमध्ये तेजी आली.

निर्यात US $ २६.३८ BN ( US $ २६.०३ MOM ) आयात US $ ३७.३९ BN (US $ ३६.८९ BN ) होती. ट्रेड डेफिसिट US $ ११.०१ (US $ १०.८६ BN) BN होती.

UPL ह्या कंपनीने चीनची YOLOO BIOTECH ही कंपनी US $ १.३३ कोटींना खरेदी केली.

येत्या १५ दिवसात स्क्रॅपेज पॉलिसी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑटो आणि ऑटो अँसिलिअरीजच्या शेअर्समध्ये तेजी आली.

इंडिगोने २३ A ३२० NEO ईंजिन्स बदलण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३५६ NSE निर्देशांक निफ्टी ११८९५ आणि बँक निफ्टी ३१००८ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १४ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.६४ प्रती बॅरल ते US $ ६२.९६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.८८ ते US $ १= Rs ७२.१५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३५ तर VIX १५.८० होते.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटींमध्ये नवनवीन अडचणी येत आहेत.आता यावर्षात रेटकट केला जाणार नाही असे USA च्या फेडनी सांगितले. इम्पीचमेंटची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे USA चे अध्यक्ष ट्रम्प हे अस्वस्थ आहेत.

चीनची औद्योगिक वाढ ऑक्टोबर २०१९ मध्ये ४.७% होती. USA आणि चीन यांच्या दरम्यान होणाऱ्या ट्रेड वाटाघाटीच्या प्रत्येक पैलूवर चर्चा चालू आहे असे चीनने सांगितले.

भारतातही IIP चे आकडे निगेटिव्ह आल्यामुळे आणि एकूणच भारताचा ग्रोथ रेट कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळे मार्केटमध्येही अस्वस्थता आहे.

रामजन्मभूमीच्या खटल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने राफेल खटल्यासंबंधातील सर्व पुनर्विचार याचिका रद्द केल्या आणि साबरीमलाचा खटला मोठ्या बेंचकडे वर्ग केला. आता सुप्रीम कोर्टातून एसार स्टीलसंबंधातील खटल्याचा निकाल अपेक्षित आहे. या खटल्यामध्ये बँकांचे Rs ५०००० कोटींवर पैसे अडकलेले आहेत.

४ नोव्हेंबर २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद युनिट ४ च्या केलेल्या तपासणीत USFDA ने १४ त्रुटी दाखवल्या.

कॅडीलाच्या मोरेया युनिटला USAFDA ने वार्निंग लेटर दिले.

ज्यूटवरची ऍन्टीडम्पिंग ड्युटी सरकारने बांगला देशातून येणाऱ्या ज्युटलाही लागू केली. याचा फायदा CHEVIOT ला होईल.

सरकारने ‘AGR’ खाली बाकी असलेले सर्व पैसे टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांना ( यात मुख्यतः भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया या कंपन्या आहेत.) ताबडतोब भरायला सांगितले. त्यामुळे या टेलिकॉम कंपन्यांचे शेअर्स आणि त्यांना कर्ज देणाऱ्या बँकाचे (यात इंडसइंड बँक (४.४७%,) ऍक्सिस बँक ( २.८२%) HDFC बँक, कोटक बँक (२.१९%) SBI (१.६७%) या अंकांचा समावेश आहे) शेअर्स पडले.

ऑक्टोबर २०१९ महिन्यात WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) ०.१६%( सप्टेंबरमध्ये ०.३३% होते)
राहिले.

पीडिलाइटचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. जाहिरातींवरील खर्च वाढूनही व्हॉल्युम ग्रोथ १%च राहिली. पूर्वी ही ग्रोथ ११% होती.

IOC मधील आपला स्टेक विकण्याची सरकार तयारी करत आहे.

DR रेड्डीज ने शुगर फ्री एनर्जी ड्रिंक लाँच केले.

इंडियन रेल्वेज पुढील महिन्यात १००००० रेल्वे वॅगन ची ऑर्डर देणार आहे.

IRCTC ( निकाल चांगले असले तरी शेअरची किंमत ज्याप्रकारे वाढली त्या मानाने निकाल नसल्याने या शेअरमध्ये प्रॉफीटबुकिंग झाले) , RITES, थरमॅक्स, लक्स इंडस्ट्रीज, हुडको, RVNL, जय कॉर्प, अशोका बिल्डकॉन, फिनोलेक्स, डिक्सन टेक्नॉलॉजी, न्यू इंडिया ऍश्युअरन्स, FACT (कंपनी तोट्यातून फायद्यात आली) गॉडफ्रे फिलिप्स ( नफा उत्पन्न, मार्जिन यांच्यात लक्षणीय वाढ) NCL इंडस्ट्रीज, PFC, PNC इन्फ्रा,सुवेन लाईफ सायसेन्सस ( प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन यांच्यात लक्षणीय वाढ), हैदराबाद इंडस्ट्रीज ( नफा उत्पन्न वाढले वन टाइम लॉस Rs २१.२ कोटी) , MGL ( तोट्यातून फायद्यात), अपोलो हॉस्पिटल्स, ONGC( फायदा वाढला, उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले), ग्लेनमार्क फार्मा ( फायदा, उत्पन्न, मार्जिन वाढले) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

दिलीप बिल्डकॉन ( आय वाढली प्रॉफिट कमी) , धनुका ऍग्रीटेक,रुचिरा पेपर, मिंडा इंडस्ट्रीज, गेटवे डिस्ट्रिपार्क यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

शक्ती पंप्स ( कंपनी फायद्यातून तोट्यात गेली) , जयश्री टी, BF युटिलिटीज, भारती एअरटेल ( फायद्यातून तोट्यात गेली,’ AGR ‘ बाकी मुळे ) या कंपन्यांचे दुसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

वेदांताला जमखाणी या नावाचा कोळशाचा ब्लॉक मिळाला. वेदांता या कंपनीने आज आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनिला Rs २१५८ कोटी नफा झाला, उत्पन्न कमी होऊन Rs २१९५८ कोटी झाले. मार्जिन २०.६% होते. कंपनिला Rs ४२२ कोटींचा वन टाइम लॉस झाला. मार्केटला हे निकाल फारसे पसंत न पडल्याने शेअर पडला.

येस बँकेचे १ कोटी शेअर्स एका फंडाने Rs ७२ प्रती शेअर या भावाने विकले. एका व्हिसलब्लोअर कंप्लेंटची चौकशी सुरु झाली. ICRA ने सांगितले की एस बँकेचीए लिक्विडीटी पोझिशन कम्फर्टेबल आहे असे सांगितल्यामुळे येस बँकेचा शेअर वाढला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०२८६ NSE निर्देशांक निफ्टी ११८७२ आणि बँक निफ्टी ३०७४९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १३ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.४३ प्रती बॅरल ते US $ ६१.८६ प्रती ब्रेल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.६८ ते US $१=Rs ७२.०२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.३८ होता VIX १५.९० होता.

आज इराण आणि USA यांच्यातील संबंध अणवस्त्र करारासंबंधात जास्तच ताणले गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून महायुद्धाची नांदी होत आहे अशी भीती वर्तवली जात आहे.

माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे BRICKS च्या बैठकीसाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना झाले.

भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचे ऑफिस RTI ( राईट टू इन्फॉर्मेशन) च्या कक्षेत आणण्याच्या हायकोर्टाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले.

ऑक्टोबर २०१९ साठी CPI ( कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) ४.६२%( ३.९९% सप्टेंबर २०१९ साठी) होते. यामध्ये खाद्यपदार्थ, ग्रामीण , शहरी CPI मध्ये वाढ झाली. त्यामुळे महागाई सर्वत्र वाढली असा निष्कर्ष निघतो.

बामर लॉरी या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनीने तुमच्याकडे २ शेअर्स असतील तर १बोनस शेअर इशू करण्याची घोषणा केली.

JB केमिकल्स ही कंपनी २९ लाख शेअर्स Rs ४४० प्रती शेअर या दराने बाय बॅक करेल.

३ PSU इन्शुअरन्स कंपन्यांचे मर्जर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने नोट बनवली.

ब्रिटानिया ( प्रॉफिट, उत्पन्न यात लक्षणीय वाढ) हिंद रेक्टिफायर्स, अडोर वेल्डिंग, सनफ्लॅग आयर्न, कोल इंडिया, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, सिम्फनी, भारत डायनामिक्स, महानगर गॅस ( प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन वाढले), इंडोनॅशनल , डिक्सन टेक्नॉलॉजी, ३M इंडिया ( फायदा उत्पन्न वाढले), अडानी ग्रीन ( तोट्यातून फायद्यात आली), SEQENT सायंटिफिक ( नफा, उत्पन्न, मार्जिन वाढले), ABB इंडिया ( नफा, उत्पन्न वाढले टॅक्स खर्चात बचत Rs ९ कोटी), जागरण प्रकाशन, इन्सेक्टीसाईड इंडिया, ग्लोबस स्पिरिट्स,IRCTC या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

झायडस वेलनेस ( कंपनी फायद्यातून तोट्यात गेली, उत्पन्न वाढले,), गुजरात बोरोसिल ( उत्पन्न वाढले, फायद्यातून तोट्यात) सेरा सॅनिटरीवेअर ( उत्पन्न कमी प्रॉफिट वाढले, मार्जिन कमी झाले. टॅक्स खर्च कमी झाला.) हरक्युलिस होईस्ट्स, TVS श्रीचक्र, ओरिएंट पेपर, KIOCL, BHEL ( प्रॉफिट ३६% तर उत्पन्न ८% कमी झाले), सन टी व्ही, धामपूर शुगर, पंजाब अल्कली, रेन इंडस्ट्रीज या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

उद्या भारती एअरटेल, ग्रासिम, ONGC, बाळकृष्ण इंडस्ट्रीज, ग्लेनमार्क फार्मा, युनियन बँक ऑफ इंडिया, हैदराबाद इंडस्ट्रीज, बॉम्बे बर्मा, SAIL, वेदांत हे आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०११४ NSE निर्देशांक निफ्टी ११८४० बँक निफ्टी ३०५४१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.७९ प्रती बॅरल ते US $ ६२.०३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.५० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.२५ तर VIX १६.१० होते.

आज SIAM यांनी ऑक्टोबर २०१९ साठी वाहन विक्रीचे आकडे जाहीर केले. यात पॅसेंजर वाहन विक्री ६.४% तर कमर्शियल वाहन विक्री २३.३०% ने कमी, २ व्हीलर विक्री १४.४% आणि एकूण वाहन निर्यात २.७% कमी झाली.
क्रॉस बॉर्डर इंसॉल्व्हंसी नियमांचा उपयोग करून दुसऱ्या देशातील मालमत्तेची वसुली सोपी होऊन जेट एअरवेजची रेझोल्यूशन प्रक्रिया सोपी होईल. IBC मध्ये या नियमांचा समावेश संसदेच्या हिवाळी अधिवेशनात होण्याची शक्यता आहे.
NBFC, HFC इत्यादी प्रकारांशिवाय कंपन्यांचे वर्गीकरण करून प्रत्येक प्रकारच्या कंपन्यांसाठी वेगळी रेझोल्यूशन विंडो तयार केली जाईल.

सरकार वेगवेगळ्या उद्योगांमध्ये लागणाऱ्या वस्तू आयात करण्यापेक्षा त्या वस्तू भारतातच तयार करण्यावर भर देणार आहे. यात इलेक्ट्रॉनिक, केमिकल, फार्मा, कृषी, फर्टिलायझर्स, या उद्योगांवर भर असेल. वाणिज्य मंत्रालयाच्या विविध उद्योगांबरोबर झालेल्या बैठकीत यासाठी उद्योगांकडून प्रस्ताव मागवण्यात आले.

बुधवार दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत डायव्हेस्टमेन्टच्या संबंधात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेषतः BPCL, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या डायव्हेस्टमेन्टला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
आज सप्टेंबर २०१९ साठी IIP चे आकडे आले. ही -४.३%( ऑगस्ट २०१९ मध्ये -१.१%) होते. हे आकडे IIP मधील निगेटिव्ह ग्रोथ वाढली असे दर्शवतात.

सरकारने टेम्पर्ड ग्लास आणि क्लिअर फ्लोट ग्लास यांच्यावर लावलेल्या ऍन्टीडम्पिंग ड्यूटीची मुदत वाढवली. यामुळे सेंट गोबेन आणि गुजरात बोरोसिल या कंपन्यांना फायदा होईल.

VRL लॉजिस्टिक (या कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा नफा वाढला, उत्पन्न वाढले, कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.) शलबी हॉस्पिटल्स, सूप्रजीत इंजिनीअर्स ( उत्पन्न, नफा, मार्जिन वाढले), ASTRA झेनेका ( नफा, उत्पन्न वाढले), संघी इंडस्ट्रीज ( नफा उत्पन्न वाढले) अल्केम लॅब ( नफा, उत्पन्न मार्जिन वाढले टॅक्स खर्चात घट ) NESCO ( उत्पन्न, नफा, मार्जिन वाढले) शीला फोम, GIPCL ( कंपनी तोट्यातून Rs ५२ कोटी नफ्यात आले, उत्पन्न कमी झाले) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बलरामपूर चिनी ( उत्पन्न कमी झाले,मार्जिन वाढले, Rs २.५० प्रती शेअरअंतरिम लाभांश) या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

कोलते पाटील ( कंपनी नफ्यातून १४ कोटी तोट्यात गेली. उत्पन्न कमी झाले), बॉम्बे डायिंग, हिंडाल्को या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३४५, NSE निर्देशांक निफ्टी ११९१३ बँक निफ्टी ३१११५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ८ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.८९ प्रती बॅरल ते US $ ६२.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७०.९५ ते Rs ७१.३० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९८.१० होता VIX १५.७२ होते.

आज MSCI निर्देशांकाचे सहामाही पुनर्गठन झाले. या निर्देशांकात एकूण ७८ बदल करण्यात आले. डोमेस्टिक निर्देशांकात ८ कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट करण्यात आले ते पुढीलप्रमाणे :- बर्जर पेंट्स, HDFC AMC, SBI लाईफ, कोलगेट, DLF, ICICI प्रु, इन्फो एज, सीमेन्स. या निर्देशांकातून खालील कंपन्यांचे शेअर्स वगळण्यात आले. येस बँक, L & T फायनान्स, इंडिया बुल्स हौसिंग, ग्लेनमार्क फार्मा, व्होडाफोन, भेल

स्माल कॅप निर्देशांकात १३ शेअर्स समाविष्ट करण्यात आले आणी १९ शेअर्स वगळण्यात आले. नवीन फ्ल्युओरीन, पॉली कॅब ही शेअर स्माल कॅप निर्देशांकात समाविष्ट केले. हे पुनर्गठन २७ नोव्हेम्बरपासून अमलात येईल.

रेमंड्स या कंपनीने आपल्या कंपनीतून कोअर लाइफ स्टाईल बिझिनेस वेगळा काढला. या नवीन बिझिनेसचे लिस्टिंग होईल. आताच्या कंपनीकडे रिअल्टी, B २ B शर्टींग, लँड इत्यादी बिझिनेस राहतील. जर तुमच्याकडे रेमंड्सचा एक शेअर असला तर तुम्हाला नवीन कंपनीचा एक शेअर मिळेल. या बातमीमुळे या शेअरमध्ये तेजी आली.

ऑक्टोबर २०१९ मध्ये चीनची निर्यात वाढली आणी आयात कमी झाली.

मूडीज या रेटिंग एजन्सीने भारताविषयी आऊटलुक निगेटिव्ह केला. याला उत्तर म्हणून भारत सरकारनी सांगितले की सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक रिफॉर्म केले. IMF  (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) नी भारताच्या अर्थव्यवस्थेचा २०१९ या वर्षांसाठी ग्रोथ रेट ६.१% आणि २०२० या वर्षांसाठी ७% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. सरकारने जागतिक मंदीची शक्यता लक्षांत घेऊन रिफॉर्म केले आहेत. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करेल. भारत परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक स्थान आहे.

मूडीजने BPCL, HPCL,IOC, इन्फोसिस, टी सी एस, गेल, HDFC बँक, स्टेट बँक या आणी इतर मिळून एकूण १७ कंपन्यांविषयी आऊटलूक नेगेटिव्ह केला. त्यामुळे आणी महाराष्ट्रात राजकीय अस्थैर्य असल्यामुळे एकंदरीत मार्केट (सेन्सेक्स) कोसळले.

4 G आणी 5 G स्पेक्ट्रमची रिझर्व्ह प्राईस कमी होईल. या बाबत प्रस्ताव टेलिकॉम कमिशन कडे पाठवण्यात आला आहे. सध्याच्या किमतीध्ये ४०% ते ५०% घट अपेक्षित आहे. DOT ने किंमत कमी करण्याकरता नोट तयार केली आहे. स्पेक्ट्रमची किंमत कमी केली तर टेलिकॉम क्षेत्रात परदेशीय गुंतवणूक वाढू शकेल. या बाबत १ महिन्याच्या आत निर्णय अपेक्षित आहे.

आंध्र बँक, नेलकास्ट, वर्धमान टेक्सटाईल्स, अलाहाबाद बँक या कंपन्यांचे निकाल असमाधानकारक होते.

थायरोकेअर, भारत फोर्ज, EIH, MRF, M &M, गेल या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

कॅपॅसिटे इन्फ्रा, टाटा कम्युनिकेशन्स, G. E.शिपिंग, आयशर मोटर्स, A B कॅपिटल या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

कॅनरा बँकेचा कॅन फिना होम्समधील स्टेकसाठी ‘बेअरिंग’ कंपनीने स्वारस्य दाखवले आहे.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ७ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.७३ प्रती बॅरल ते US $ ६२.६० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $ १=Rs ७१.०१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.९८ तर VIX १५.१४ वर होते.

आज USA आणि चीन एकमेकांवर लावलेले टॅरिफ हटवायला तयार झाले. USA आणि चीन दोघेही ट्रेडवर सकारात्मक धोरणावर सहमती बनवण्यास तयार झाले. टप्याटप्प्याने टॅरिफ हटवण्यास सुरुवात होईल. या बातमी नंतर मेटलसंबंधीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

अपूर्ण हौसिंग प्रोजेक्ट्ससाठी सरकार एक फंड तयार करेल. एल आय सी आणि SBI यात भाग घेईल. Rs १०००० कोटी सरकार घालेल आणि Rs १०००० कोटी SBI घालेल. SBI कॅपिटल हा फंड मॅनेज करणार आहे. त्यामुळे रिअल्टी क्षेत्राला बूस्टर डोस मिळणार आहे. अपूर्ण असणारे प्रोजेक्ट्स पूर्ण होतील. बँकांचे कर्ज फिटेल आणि घरबांधणीची प्रोजेक्ट्स म्हटल्यावर सिमेंट, टाईल्स, पेंट, प्लायवूड या सर्व क्षेत्रात मागणी वाढेल. रोजगार निर्माण होतील, हौसिंग फायनान्समध्ये वाढ होईल. जे प्रोजेक्ट ५०% कम्प्लीट झाले आहेत तेच ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतील. जे प्रोजेक्ट सुरु झालेच नाहीत त्यासाठी सरकार मदत करणार नाही. जी प्रोजेक्ट न्यायप्रविष्ट आहेत त्यांना केसेस मागे घ्याव्या लागतील. अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झाले तर या प्रोजेक्टमध्ये अडकलेला पैसा सर्क्युलेट होईल.

५० लाख टन साखरेच्या निर्यातिचे लक्ष्य ठरवले होती त्याची मुदत ३१ऑक्टोबर २०१९ होतीये ही मुदत ४५ दिवसांनी वाढवली जाणार आहे.

हिरो मोटोने हिरोची BS -VI व्हेरिएशन लाँच केली.

आज FSDC च्या मीटिंगमध्ये अर्थव्यवस्थेसंबंधात मुद्द्यांवर चर्चा झाली. NBFC च्या वर्तमान अवस्थेबद्दल चर्चा झाली. चांगल्या आणि वाईट NBFC वर चर्चा झाली असे RBI ने सांगितले. NBFC साठी स्वतंत्र विंडो ओपन केली जाईल.
पेन्नार इंडस्ट्रीज आपल्या १२ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या बैठकीत शेअरबायबॅकवर विचार होईल.

DHFLमधील हेराफेरीचा मामला SFIO कडे ट्रान्स्फर केली. ही चौकशी झाल्यावर रेझोल्यूशन सुरु राहील. SFIO चौकशी पुरी व्हायला सहा महिने लागतील.

सिंडिकेट बँक FY १९ प्रोव्हिजन डायव्हर्जन्स Rs ११८४ कोटी होते.

आज MSCI निर्देशांकाचे सहामाही परीक्षण होईल. यात असे अपेक्षित आहे की ICICI बँकेचे वेटेज वाढेल. ग्लेनमार्क फार्मा, इंडिया बुल्स हौसिंग, व्होडाफोन येस बँक हे MSCI निर्देशांकातुन बाहेर पडतील. तर SBI लाईफ, ICICI प्रु, सीमेन्स, बर्गर पेंट्स, कोलगेट यांचा समावेश होईल. ज्या कंपन्यांवर पुष्कळ कर्ज असेल त्या कंपन्या MSCI निर्देशांकातून बाहेर काढल्या जातील.

सिटी युनियन बँक, व्हर्लपूल, पनामा पेट्रोलियम, एरिसलाईफ सायन्सेस ( नफा उत्पन्न वाढले मार्जिन वाढले), सन फार्मा, अमृतांजन ( नफा, आय, मार्जिन वाढले), अडानी ट्रान्समिशन(नफा, उत्पन्न, यात चांगली वाढ, मार्जिन वाढले), IPCA LAB ( नफा, उत्पन्न मार्जिन यात चांगली वाढ) यूको बँक ( तोटा कमी, NII वाढले, NPA मध्ये थोडी सुधारणा), सन फार्मा ( तोट्यातून नफ्यात, नफा Rs १०८६ कोटी, उत्पन्न Rs ८१२३ कोटी, मार्जिन वाढले) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

UPL ( नफा कमी, आय Rs ७८१७ कोटी, टॅक्स खर्च कमी झाला, वन टाइम लॉस Rs २२० कोटी), गुजराथ अल्कली, यांचे निकाल असमाधानकारक होते.

VIP, सेंच्युरी एंका, BASF, HPCL यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

उद्या आयशर मोटर्स, M & M, नेस्ले, गेल यांचे दुसर्या तिमाहींचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०६५३ NSE निर्देशांक १२०१२ बँक निफ्टी ३०६३३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.४३ प्रती बॅरल ते US $ ६२.७३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१=Rs ७०.९७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.८२ तर VIX १५.८५ होते.

USA चे भारतबद्दल असलेले धोरण बदलत आहे. आज USA ने भारताचा GSP( जनरलाइझ्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस) मध्ये समावेश करण्यासाठी अनुकूलता दाखवली. या कराराप्रमाणे भारताला USA ला निर्यात होणाऱ्या गुड्सवर ड्युटी भरावी लागत नाही. आधी या अग्रीमेंटमध्ये समाविष्ट असलेल्या वस्तूंची USA मध्ये $६०० कोटींची निर्यात होत होती. परंतु ५ जून २०१९ पासून भारताला या योजनेमधून USA ने बाहेर काढले. भारत GSP मध्ये १००% दर्जा परत मिळावा ही अट ठेवेल. USA हळूहळू हा दर्जा १००% पर्यंत देईल अशी शक्यता आहे. हा दर्जा मिळाल्यास ज्युवेलरी, टेक्सटाईल्स, केमिकल्स, स्टील, ऑटो अँसिलिअरीजची USA ला ड्युटी फ्री निर्यात होऊ शकेल.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वाटाघाटी फेज १ मध्ये काही अडचणी येणार नाहीत असे USA ने जाहीर केले.

आज मार्केटने सेन्सेक्स चा ४०६०६ हा इंट्राडे रेकॉर्ड आणि निफ्टीने १२००२ चा इंट्राडे टप्पा पार केला. सरकारकडून रिअल्टी क्षेत्रातील कंपन्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे जाहीर झाले, पर्यावरण संबंधी नियमात बदल, एथेनॉल उत्पादक कंपन्यांना मंजुरी, इन्फ्रा प्रोजेक्टसाठी पर्यावरण मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया सोपी करणे, यावर भर दिला जाईल. यामुळे साखर, रिअल्टी क्षेत्र, आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपन्यांमध्ये तेजी होती. USA च्या भारताविषयी बदललेल्या धोरणामुळे निर्यात क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये तेजी होती.

पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्यासाठी आधी कंपन्यांना टर्म्स ऑफ रेफरन्स फाईल कराव्या लागत होत्या. सरकारने आता ही तरतूद रद्द केली. त्यामुळे आता ही मंजुरी आता ४ महिन्यात मिळू शकेल. सरकारने मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत आणखीही काही बदल केले आहेत.

पर्यावरण मंत्रयांनी सांगितले आता शुगर उत्पाद कंपन्यांना आता जर त्यांच्या इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्लांटची क्षमता वाढवायची असेल तर पर्यावरणासाठी मंजुरी घ्यायची गरज नाही. याचा फायदा इथेनॉल संबंधित साखर उत्पादक कंपन्यांना होईल. उदा :- प्राज , इंडिया ग्लायकॉल इंडस्ट्रीज. द्वारिकेश शुगर .

औरोबिंदो फार्माच्या हैद्राबाद युनिट नंबर २च्या केलेल्या तपासणीत USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.

PC ज्युवेलर्स विरुद्धच्या केसमध्ये Rs १९.१० लाख सेटलमेंट चार्जेस स्वीकारून सेबीने ही कायदेशीर कारवाई पुरी केली.

अडाणी पॉवरच्या ऑगस्ट २००९ मध्ये आलेल्या IPO ची प्राईस Rs १०० होती.गेल्या आठवड्यापासून अडानी पॉवरच्या शेअरमध्ये हालचाल दिसून येत आहे. सध्या शेअर २०१२च्या किमतीला ट्रेड होत आहे.

सुप्रीम कोर्टाने JP इंफ्रासाठी बोली लावण्यासाठी JP असोसिएटला मनाई केली. NBCC आणि सुरक्षा रिअल्टीना नवीन बोलि लावण्यासाठी मुदत दिली.

इन्फोसिसचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन नंदन निलेकणी यांनी सांगितले की अज्ञात लोकांकडून कंपनीची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कंपनीच्या संस्थापकांवर केलेले आरोप असमर्थनीय असून सर्व सहसंस्थापक कंपनीच्या दीर्घ प्रगतिसाठी कटीबद्ध आहेत. कंपनी या आरोपांची चौकशी करून आपला रिपोर्ट पब्लिक करेल.कंपनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे पालन करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. कंपनी गेली १५ वर्षे व्हिसलब्लोअर पॉलिसी राबवत आहे. आमच्या कंपनीच्या धोरणात इमानदारी आणि पारदर्शिता यांना फार वरचे स्थान आहे. CEO सलील पारेख यांच्याकडे मजबूत प्रगतीचे श्रेय जाते.

RAVVA ब्लॉक साठी वेदांताला १० वर्षांची मुदतवाढ आंध्र सरकारने दिली.

गोदरेज कंझ्युमर्सचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले .प्रॉफिट Rs ४१४ कोटी, उत्पन्न Rs २६३० कोटी व्हॉल्युम ग्रोथ ७% आणि मार्जिन २१.७% होते. कंपनीने Rs २ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
ALKYL AMINES ( उत्पन्न नफा मार्जिन वाढले), सिप्ला ( उत्पन्न, मार्जिन,नफा वाढले) ल्युपिन( तोटा Rs १२७ कोटी, वन टाइम लॉस ५४६.५ कोटी, टॅक्स खर्चात Rs १४० कोटींची बचत, उत्पन्न Rs ४३६० कोटी, मार्जिन १६.८ % आणि इतर उत्पन्न Rs १३३ कोटी होते.) इमामी (प्रॉफिट Rs ९६ कोटी, उत्पन्न Rs ६६० कोटी, मार्जिन २९.२% ), V-गार्ड यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बजाज इलेक्ट्रिकल्स ( प्रॉफीटमधून लॉस मध्ये गेली. उत्पन्न आणि मार्जिन कमी झाले.),, एक्साइड ( Rs २३७ कोटी नफा, उत्पन्न Rs २६११ कोटी, मार्जिन १४.१% आणि टॅक्सखर्च ६२ कोटींनी कमी) ,फर्स्ट सोर्स सोल्युशन्स ( नफा कमी, आय किरकोळ वाढली मार्जिन कमी झाले)

BOSCH ( नफा ७६.६% नी कमी (YOY) Rs १३०.२० कोटी वन टाइम लॉस, उत्पन्न Rs २३१३ कोटी, मार्जिन कमी झाले.) या कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

कॅनरा बँक ( प्रॉफिट Rs ३६५ कोटी, ग्रॉस NPA ,आणी नेट NPA यांच्या थोडी सुधारणा, NII Rs ३१३० कोटी, लोन ग्रोथ ४.८%, प्रोव्हिजन वाढली) आणि कॉर्पोरेशन बँक ( प्रॉफिट Rs १३० कोटी, NII Rs ४००७ कोटी, GNPA आणि NNPA मधी किंचित सुधारणा) यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

टाटा स्टीलचे (कन्सॉलिडिटेड प्रॉफिट Rs ३३०२ कोटी, उत्पन्न Rs ३४५७९ कोटी, मार्जिन ११.१%, अन्य आय Rs १८४ कोटी कंपनीने वित्तीय खर्चात लक्षणीय बचत केली) ठीक आले.

अडानी पोर्टची लॉजिस्टिक सबसिडीअरी गेटवे डिस्ट्रिपार्कची लॉसमध्ये असणारी सबसिडीअरी स्नोमॅन लॉजिस्टिक या कंपनीला खरेदी करणार आहे.स्नोमॅन लॉजिस्टिक या कंपनीला कर्जही पुष्कळ आहे..

फोर्टिस हेल्थकेअर ही कंपनी तोट्यातून फायद्यात आली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०४६९ NSE निर्देशांक निफ्टी ११९६६ बँक निफ्टी ३०६०९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६२.१२ प्रती बॅरल ते US $ ६२.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६८ ते US $१=Rs ७०.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.५३ तर VIX १५.९८ होते.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्रपतींना ट्रेड अग्रीमेंट फेज १ साठी USA मध्ये येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे आता या फेज मधून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल अशी आशा वाटते. या बातमीमुळे मेटल्स संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली.

ISMA ने देशात २०१९-२०२० या वर्षात होणाऱ्या साखरेच्या उत्पादनाचा अंदाज २.६८ कोटी टनांपर्यंत कमी केला.
आज NSE या स्टॉक एक्स्चेंजने पंचवीस वर्षे पूर्ण केली. भारतातील शेअर मार्केटच्या प्रगतीमध्ये या स्टॉक एक्स्चेंजचा सिंहाचा वाटा आहे. भविष्यात त्यांची अशीच भरभराट होवो या शुभेच्छा.

कतार एअरलाईन्सने आपण इंडिगोमध्ये स्टेक खरेदी करणार आहोत या बातमीचा इन्कार केला. पण इंडिगो बरोबर कमर्शियल डील होऊ शकते आणि ते कोड शेअरिंग व्यवस्थेसारखे असू शकते असे सांगितले.

क्लास 8 ट्रकची विक्री गेले तीन महिने सतत वाढत आहे त्याबरोबरच या ट्रकसाठी ऑर्डर्सचे प्रमाण वाढते आहे. याचा फायदा भारत फोर्ज ला होईल. त्याप्रमाणे आज या शेअरमध्ये तेजी आली.

SMS लाईफ सायन्सेस या कंपनीला USFDA ने ‘RANTIDIN’ या औषधाच्या उत्पादनासाठी परवानगी दिली.
ज्या कंपन्यांच्या प्रमोटर्सनी जास्त प्रमाणात शेअर्स तारण ठेवून कर्ज घेतले असेल अशा कंपन्यांच्या वायद्यामध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर १ नोव्हेम्बर २०१९ पासून ३५% मार्जिन ठेवावे लागेल. पूर्वी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १५% ते २०% मार्जिन ठेवावे लागत होते. त्यातील काही कंपन्या पुढीलप्रमाणे :- बजाज कन्झ्युमर , डिश टी व्ही, सदभाव इन्फ्रा, GMR इन्फ्रा.

USFDA नी बायोकॉनच्या बंगलोर युनिटला क्लीन चिट दिली.

मारुतीने सुपर कॅरीचे पेट्रोल व्हर्शन Rs ३.९३ लाख किमतीला लाँच केले.

ज्युबिलण्ट इंडस्ट्रीजचे लॉन्ग टर्म इशुअर रेटिंग ‘FITCH’ या रेटिंग एजन्सीने स्टेबलवरून पॉझिटिव्ह केले.

गोदरेज प्रॉपर्टीजचे दुसर्या तिमाहीकरता उत्पन्न कमी झाले, प्रॉफिट वाढले, EBITDA निगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये आले. बुकिंग ऍडव्हान्स आणि विक्री एरियात वाढ झाली.

प्रिझ्म जॉन्सन या कंपनीचे उत्पन्न कमी झाले, तोट्यात लक्षणीय वाढ झाली, मार्जिन कमी झाले. हे निकाल असमाधानकारक म्हणावे लागतील.

डाबर या FMGC क्षेत्रातील कंपनीचे व्हॉल्युम ग्रोथ ४.८% , उत्पन्न वाढले, मार्जिन कमी झाले, वन टाइम लॉस Rs ४० कोटी होता.

आज PNB या सार्वजनिक क्षेत्रातील दोन नंबरच्या बँकेने आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ग्रॉस NPA आणि

नेट NPA, प्रोव्हिजनिंग, फ्रेश स्लीपेजिसमध्ये वाढ झाली. त्यामुळे ऍसेट गुणवत्तेच्या बाबतीत कामगिरी असमाधानकारक राहिली. NII Rs ४२६४ कोटी तर इतर उत्पन्न Rs २२६५ कोटी होती. बँकेला Rs ५०७.१० कोटी फायदा झाला. स्टेट बँकेच्या निकालामुळे वाढीस लागलेली या क्षेत्रातील सुधारणेच्या आशेवर IOB, बँक ऑफ इंडिया, PNB यांच्या निकालांमुळे पाणी पडले.

फ्युचर एंटरप्रायझेस, JMC प्रोजेक्ट्स, टायटन, टेक महिंद्रा ( उत्पन्न मार्जिन आणि प्रॉफिट वाढले.), बर्जर पेंट्स ( उत्पन्न कमी फायदा वाढला), P & G ( उत्पन्न वाढले प्रॉफिट कमी झाले ) या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
REC, NCC, यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. इंटलेक्च्युअल डिझाईन इरेना या कंपनीचे निकाल असमाधानकारक होते. (कंपनी फायद्यातून तोट्यात गेली ).

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०२४८ NSE निर्देशांक निफ्टी ११९१७ बँक निफ्टी ३०२१९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – ४ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ६१.३५ प्रती बॅरल ते US $ ६२.२२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६६ ते US $१ = Rs ७०.७४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२२ तर VIX १६.१० होते.

चीन आणि USA यांच्यातील ट्रेड वॉरमध्ये दोन्हीही बाजूंना पसंद पडेल असा समझोता होण्याची शक्यता आहे.

आज दक्षिण भारतातील सिमेंट उत्पादक कंपन्यांनी सिमेंटचे भाव Rs ४५ ते Rs ९० प्रती बॅग वाढवले . त्यामुळे दक्षिण भारतातील सिमेंट उत्पादक कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

आज इन्फोसिसने सांगितले की व्हिसलब्लोअरने केलेल्या तक्रारीसंबंधात केलेल्या प्राथमिक चौकशीत तक्रारीत केलेल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे मिळाले नाहीत. कंपनीच्या या स्पष्टीकरणानंतर इन्फोसिसचा शेअर Rs ७३२ पर्यंत इंट्राडे वाढला.

प्रकाश इंडस्ट्रीजच्या ओडिशामधील ‘SIRKGUTU’ या खाणीचे काम पुन्हा सुरु झाले.

कॅडीला हेल्थकेअरच्या मोरैया येथील युनिटच्या केलेल्या तपासणीत या युनिटला वॉर्निंग लेटर इशू केले. त्यामुळे कॅडीलाच्या शेअरमध्ये मंदी आली.

JSPL ने गारे पामा IV१ या खाणीसाठी Rs २३० प्रती टन या दराने सर्वोच्च बोली लावली. यासाठी Rs १५० ही रिझर्व्हड प्राईस होती.

मॉईल या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची १४ नोव्हेंबर २०१९ रोजी शेअर्स बायबॅकवर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे

आज हाऊसिंग फायनान्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी HDFC चे दुसऱ्या तिमाहीचे निकाल आले. कंपनीला Rs ३९६२ कोटींचा नफा झाला. टॅक्स खर्च Rs १०२२ कोटींवरून Rs ५६९ कोटी झाला. लाभांशाचे उत्पन्न Rs ५.८ कोटींवरून Rs १०७४ कोटी होते. NII Rs ३०७८ कोटी तर NIM ३.३% होते. ग्रॉस NPA १.३३% होते. लोन ग्रोथ १२% होती. एकूण उत्पन्न Rs १३४८७ कोटी होते. AUM (ऍसेट अंडर मॅनेजमेंट) १७% ने वाढले. या चांगल्या तिमाहीए निकालांनंतर HDFC चा शेअर Rs २२०० प्रती शेअरपर्यंत इंट्राडे वाढला.

सुंदरम फासनर्स, WABCO, IOB ( बँकेला Rs २२५४ कोटी तोटा झाला, NII Rs १२०४ कोटी होते तर ग्रॉस NPA मध्ये किंचित सुधारणा झाली), SPARC या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

किर्लोस्कर BROS, सतलज टेक्सटाईल्स, HT मेडीया, व्हील्स इंडिया यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक होते. वरूण बिव्हरेजीस, कॅन फिना होम्स, पर्सिस्टंट सिस्टिम्स, या कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. RANTIDIN या औषधाच्या संबंधात स्ट्राईड फार्मा यांनी जाहीर केली की NDMA चे प्रमाण नियमानुसार आहे. DR रेड्डीजने या औषधाच्या बॅचेस परत मागवल्या. हाच प्रॉब्लेम ऑरोबिंदो फार्माच्या RANTIDIN मध्ये आहे.

उद्या टेक महिंद्रा आणि टायटन या कंपन्या आपली दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०३०१ NSE निर्देशांक निफ्टी ११९४१ बँक निफ्टी ३०३३३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १ नोव्हेंबर २०१९

आज क्रूड US $ ५९.६६ प्रति बॅरल ते US $ ५९.७५ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७०.९० ते US $ १ =Rs ७०.९४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.२४ तर VIX १६.२८ होते.

चीन आणि USA यांच्यामध्ये चिली या देशात वाटाघाटी होणार होत्या. त्या चिलीमधील राजकीय अस्थैर्यामुळे आता रद्द झाल्यावर दुसऱ्या कोणत्या तरी ठिकाणी वाटाघाटींची फेरी होईल. या वाटाघाटींना फेज I डील म्हटले आहे. सुरुवातीला ज्या उत्पादनांवर टॅक्स लावले होते ते रहीत होतील.

USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाअभियोगाला मंजुरी मिळाली.

काल DII ची थोडीशी विक्री दिसली ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होत असेल तेथे प्रॉफिट बुकिंग करा. ट्रेंलिंग स्टॉप लॉस वापरा. या मार्केटमध्ये ‘बाय ऑन डिप्स’ ही स्ट्रॅटेजी योग्य ठरेल.

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. बजाज ऑटोची विक्री YOY कमी झाली असली तरी MOM (मंथ ऑन मंथ) वाढली. एस्कॉर्टसची ट्रॅक्टर विक्री MOM २३% ने वाढली.त्यामुळे या शेअर्समध्ये तेजी आली, अशोक लेलँडची विक्री ३५% ने कमी झाली पण अनुमानापेक्षा जास्त झाल्याने शेअर स्थिर राहिला. मारुतीची विक्री ४.५% ने वाढली ( १.५३ लाख झाली) आणि MOM २५.४% ने वाढली.अतुल ऑटोची विक्री ५.५% ने घटली. SML ISUZU ची विक्री ३७.९% ने घटली. M & M ची विक्री ११% ने कमी झाली. TVS मोटर्सची विक्री १८.८% ने घटली.आयशर मोटर्सची विक्री ३७५५ युनिट झाली ( ३५०० चे अनुमान होते)

भारतात ऊस गाळप हंगामाला उशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस या वर्षी उशिरा सुरु झाला होता. ऑक्टोबर संपला तरी पाऊस सुरु आहेच साखरेच्या किमती वाढत आहेत. ठीकठिकाणी आलेल्या पुरामुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. साखरेचे देशांतर्गत आणि निर्यातीसाठी दर वाढतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आज साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. यामध्ये अवध शुगर,उगार शुगर, बजाज हिंदुस्थान, मावाना शुगर, KCP शुगर, त्रिवेणी शुगर्स, बलरामपूर चिनी, उत्तम शुगर, द्वारिकेश शुगर इत्यादींचा समावेश होता.

पावसाळा यावेळी ऑक्टोबर महिना संपला तरी जोर पकडून आहे. प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आजारपणही वाढत आहे हे समाजाच्या दृष्टीने चांगले नाही पण आजारपण आले की वेगवेगळ्या तपासण्या कराव्या लागतात. त्यामुळे मेट्रोपोलीस हेल्थकेअर, लाल पाथ लॅब,नारायणा हृदयालय, अपोलो हॉस्पिटल्स, थायरोकेअर ह्या अशा तपासण्या करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

काल येस बँकेचा पूट Rs ६० चा आणि कॉल Rs ८० चा होता. या वरून अंदाज येतो की शेअरची किंमत किती खाली आणि किती वर जाईल. डिलिव्हरी बेस्ड खरेदी फक्त १२% होती. म्हणजेच बाकी सर्व इंट्राडे व्हॉल्युम होते. या शेअरची बुकव्हॅल्यू Rs ९८ आहे. आज येस बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी हाँगकाँगच्या SPGP होल्डिंग या कंपनीच्या US $ १२० कोटीच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली का ? आणि ही गुंतवणूक खरोखरचे येते आहे का ? तसेच दुसऱ्या तिमाहीतील ऍसेट गुणवत्ता, प्रोव्हिजन आणि फ्रेश स्लीपेजिस यांची पोझिशन बघितल्यावर या शेअरमध्ये पोझिशन घेतली जाईल.

येस बँकेला Rs ६०० कोटी तोटा झाला. NPA साठी वाढत्या प्रमाणावर प्रोव्हिजन करायला लागली. NII कमी झाले. लोन मध्ये डिग्रोथ झाली.

A ३२० NEOS विमानांचे इंजिन बदलण्याचे आदेश DGCA ने इंडिगोला दिले. १९ नोव्हेम्बरपर्यंत ७ विमानांची इंजिन बदलायची मुदत आहे.जर ही इंजिने बदलली नाहीत तर ३१ जानेवारी २०२० नंतर एकंदरीत २३ विमाने ग्राउंड होतील. यामुळे शेअर पडला.

जेट फ्युएलची किंमत Rs २२६७ प्रती किलो लिटरने कमी झाली. आता ही किंमत Rs ६२६७२ प्रती किलो लिटर होईल.
सबसिडीशिवाय LPG गॅसची किंमत Rs ७६.५० नी वाढेल. आता सिलेंडरची किंमत Rs ६८१.५० होईल.

मार्केट तेजीत असल्यामुळे ट्रेडर्स,गुंतवणूकदार मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत त्यामुळे स्टॉक एक्सचेंजीस आणि ब्रोकर्स यांना फायदा होतो. यात AB मनी, JM फायनान्सियल्स, एडेलवाईज, मोतीलाल ओसवाल, ICICI सिक्युरिटीज, चोला फायनान्स इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व शेअर्स तेजीत होते.

F & O मार्केटमध्ये ट्रेड होणाऱ्या ५ शेअर्सची लॉट साईझ कमी झाली.

करूर वैश्य बँकेचे NII वाढले ऍसेट गुणवत्तेत किरकोळ सुधारणा झाली. फायदा कमी झाला.

हॉकिन्स, मिश्र धातू निगम, कन्साई नेरोलॅक यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

बँक ऑफ इंडिया, हिंदुस्थान मेडिया व्हेंचर यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

GIC हाऊसिंग, JSW एनर्जी यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

DR रेडिजचे प्रॉफिट वाढले असले तरी टॅक्स क्रेडिट आणि लायसेन्सिंग फीच्या विक्रीचे प्रोसिड्स( इतर उत्पन्न) यांचे Rs ७२३ कोटी मिळाले. एकूण प्रॉफिट Rs १०९३ कोटी झाले. त्यामुळे शेअरमध्ये तेजी आली नाही.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ४०१६५ NSE निर्देशांक निफ्टी ११८९० बँक निफ्टी ३०३३० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!