आज गुरुपौर्णिमा, माझे बाळ आता ५ वर्षाचे झाले. माझे बाळ म्हणजेच माझा ब्लॉग ‘मार्केट आणी मी’! माझे दुसरे बाळ म्हणजेच माझे प्रशिक्षण वर्ग ! हे वर्ग सुरु करून १ वर्ष पूर्ण झाले. मी माझ्या दुसऱ्या बाळाचे नाव ‘शेअर करू या शेअर मार्केट’ असे ठेवले आहे. वाचकांच्या अंगाखांद्यावर खेळून बागडून माझी मुलं मोठी झाली. या बाळांनी अनेक वाचकांना आनंदित केले. अनेकांना पैसाही मिळाला आणी मलाही भरभरून आनंद मिळाला.
या वर्षीपासून ‘अनुभव हाच गुरु’ हे सदर चालू करीत आहे. या सदरातून मला आलेले अनुभव मी आपल्याला सांगीन त्यांचा फायदा तुम्हाला शेअरमार्केट मधल्या प्रश्नांचा उलगडा करताना होईल.
ऐका हो ऐका TCS च्या ‘BUY BACK’ ची ही घटना.
आता ‘BUY BACK’ म्हणजे काय असे विचारून माझ्या अनुभव सांगण्यात अडथळा आणू नका. मी ‘BUY BACK’ बद्दल माझ्या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे. थोडी माहिती तुम्हाला ब्लॉगवरूनही मिळू शकेल
प्रथम TCS च्या ‘BUY BACK’ मध्ये मला रस नव्हता. TCS कंपनी ३% च शेअर्स BUY BACK करणार होती. प्रमोटर ‘BUY BACK’ मध्ये भाग घेणार होते. १०० शेअर्समागे ३ शेअर्स Rs २८५० नी घेणार यात काहीच फायदा नव्हता. पण TCS चे BUY BACK साठी लेटर आले.४० शेअर्स पैकी १८ शेअर्स BUY BACK करणार आहेत असे समजले. यात मेख अशी होती की ज्या शेअरहोल्डरकडे Rs २००००० पर्यंत शेअर होते त्यांच्या बाबतीत कंपनी जवळ जवळ ४०%BUY BACK करणार होती. जर वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या वाहिन्यांच्या सांगण्याप्रमाणे जाऊन ३% BUY BACK कशासाठी करायचे असे म्हणून जर कंपनीकडून आलेले लेटर न वाचता ठेवून दिले असते तर किती नुकसान झाले असते याचा विचार करा.या पुढे प्रत्येक कंपनी आपल्याला जे लेटर पाठवते ते निदान एकदा तरी डोळ्याखालून घाला.
असो मी BUY BACK साठीचे फॉर्म भरून माझ्या ब्रोकरकडे दिले. त्यांनी मला ‘BUY BACK’ साठी आवश्यक DIS ( DELIVERY INSTRUCTION SLIP) भरून दिल्या. मी एकाच बँकेच्या दोन शाखांमध्ये (त्याच्यापैकी एक NSDL शी संलग्न तर दुसरी CDSL शी संलग्न होती.) DIS देऊन घरी आले. दुपारी ब्रोकरचा फोन आला की फक्त NSDL शी संलग्न असलेल्या शाखेत भरलेल्या DIS मधील शेअर्सच बिडिंग (BUY BACK) साठी उतरवले जातील. जी बँकेची शाखा CDSL शी संलग्न आहे तेथे DIS पास करण्यात काहीतरी चूक झाली आहे.त्यामुळे हे शेअर्स बिडिंग (BUY BACK) साठी उपलब्ध असणार नाहीत. संध्याकाळी ब्रोकरकडून रीतसर तशी मेलही आली.
आता काय करावे काही सुचेना, काही कळेना ! दैव देते आणी कर्म नेते अशी अवस्था झाली. मी दुसरे दिवशी बँकेत गेले तर ते म्हणाले की आम्ही DIS बरोबर पास केली आहे.पण ब्रोकरच्या म्हणण्याप्रमाणे आमचे शेअर्स ६ जून पर्यंत ब्लॉक झाले असल्याने ‘BUY BACK’ प्रक्रियेमध्ये घेता येणार नाहीत. कुणाचे खरे आणी कुणाचे खोटे काहीच समजेनासे झाले. ‘BUY BACK’ ची शेवटची तारीख ३१ मे होती. याचा अर्थ बँकेच्या चुकीमुळे माझा BUY BACK चा चान्स हुकणार होता.
डोके ३६० डिग्री फिरले. सर्वांशी समजून, मिळून मिसळून काम करणारी मी. कोणाची तक्रार करणे स्वभावातच नाही. पण आता दुसरा उपायच नव्हता. TCS, रजिस्ट्रार टू द इशू, बँकेचे DEMAT DEPT, CDSL, सेबी ग्रीव्हन्सेस सेल या सर्वांना परिस्थिती विषद करून मदत करण्याची विनंती करणारी मेल पाठवली.मी DIS च्या स्कॅन केलेल्या कॉपीज पाठवून दिल्या. त्या मेलमध्ये स्पष्टपणे कळवले की शेअरहोल्डर या नात्याने मी जे करायला पाहिजे होते ते योग्य रीत्या केले आहे. माझी काहीही चूक नसताना माझे नुकसान झाल्यास त्याला बँक जबाबदार राहील. .बँक अजूनही चुकीची प्रक्रिया केली असूनही आमचेच बरोबर आहे असे म्हणत होती. परंतु माझ्या सुदैवाने म्हणा किंवा CDSL मधील ऑफिसरचा चांगुलपणा म्हणा CDSL ने माझ्या ई मेलची दाद घेवून मला फोन केला पुन्हा दुसऱ्या DIS भरून आजच्या आज पाठवून द्या असे सांगितले. अजूनही वेळ निघून गेलेली नाही तीनचार दिवसाचा अवधी आहे तुम्ही घाबरू मका असे सांगितले.मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन DIS भरून बँकेत दिल्या. CDSL च्या अधिकाऱ्याने मेल पाठवून बँकेच्या DEMAT DEPT ला हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. झाले! ही मेल येताच बँकेच्या DEMAT DEPT ने त्यांच्या DIS पास करण्याच्या प्रक्रियेतील दोष शोधून काढला. आधी केलेले TRANSACTION रद्द करून सुधारीत पद्धतीने नव्याने DIS पास केली.
संध्याकाळी मला माझ्या ब्रोकरकडून कळवले गेले की आता तुमचे शेअर्स ‘BUY BACK’ साठी आले आहेत. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड !पण अनुभवातून मिळणारे ज्ञान ही मोठी संपत्ती म्हणावी लागेल.
जसे एखादा मुलगा कितीही पैसे कमवत असला, कितीही चांगल्या स्वभावाचा असला तरी एकदा तो नावडता झाला की त्याला सगळीकडे महत्व देत नाहीत. तसेच काहीसे प्रत्येक बँकेत DEMAT DEPT चे आहे. जर मुंबईतल्या मुंबईत एवढी धावाधाव, इ मेल व्यवहार करावा लागतो तर छोट्या शहरात काय प्रकार असेल याची कल्पनाच केलेली बरी !
सहसा कोणाविरुद्ध तक्रार करू नये, जमवून घ्यावे, आपले मन मोठे ठेवावे ही सगळी शिकवण दिली जाते. जर तुमचे मोठे नुकसान होणार असेल तर ही शिकवण बाजूला ठेवा. आणी तुमचे काम पूर्ण होईस्तोवर त्याचा पाठ पुरावा करा. हे काम कंटाळवाणे असते, काही दिवस तुमचे थंडे स्वागत होते. पण नेहेमी रिस्क रिवार्ड रेशियोचा विचार करा आणी धडक मारा ती तुमचे काम पूर्ण होईस्तोवर!!
Tag Archives: Woman Investor in Share market
भाग ४४ – शेअरमार्केट हाची गुरु, हाची कल्पतरू
आज आहे गुरुपौर्णिमा ! आपल्या या ब्लॉगचा दूसरा वाढदिवसआणि या खास दिवशी माझे शेअरमार्केटला त्रिवार वंदन ! शेअरमार्केटनेच मला शेअरमार्केटमध्ये विश्वासाने वावरायला शिकविले.मला वेळोवेळी सावरले. प्रोत्साहन दिले. तडजोड कशी करावी, निर्णय कसे घ्यावेत हे सांगितलेआणी तेही विनामूल्य. त्यामुळेच ज्याला कुणाला मार्केट शिकायचे असेल त्यांना मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा होती.
ही माझी इच्छा मी माझ्या मुलाकडे (श्री.सुरेंद्र प्रकाश फाटक) व माझ्या सुनेजवळ (किरण गोवेकर) व्यक्त केली .त्यांनी मला ब्लॉग लिहिण्याचा मार्ग सुचविला. मी संगणक क्षेत्रातील नाही. मला या क्षेत्रांतला ओ की ठो समजत नाही.त्या दोघांनी मार्ग सुचविल्यामुळेच माझी इच्छा पूर्ण झाली.मी आपणासर्वांना मार्गदर्शन करू शकते. ब्लॉगच्या माध्यमांतून भेटू शकते. संपर्क साधू शकते. त्या दोघांशिवाय हा गड चढणे मला शक्य नव्हतेहे मला आवर्जून नमूद करावयाचे आहे.च्याच मुळे माझी इच्छा पूर्ण झाली हे कौतुकाने आणि अभिमानाने सांगावयाचे आहे.
आज मी तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहे आणी माझे अनुभव सांगणार आहे.
मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये रोज जाऊ लागले तेव्हाची ही कथा. मला मागे बसून काहीएक दिसत नसे. “‘madam’ ना दिसत नाही, पुढे जागा द्या. शाळा सुरु झाली” असे टोमणे ऐकू येत. मी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही.त्यांनी माझ्यासाठी कोपरयातली एक खुर्ची रिकामी ठेवली आणि मला सांगितले
“ही खुर्ची तुमच्यासाठी आरक्षित आहे.” नंतर हळूच एक-दुसऱ्याला सांगू लागले ,खाणाखुणा करू लागले.
“त्या जागी बसलं की घाटा होतो. एकदां घाटा झाला की madamला बरोब्बर समजेल, मार्केटमध्ये व्यवहार करणेच बंद करतील.मग आहेच आपले राज्य “.
मी आपले मुकाटपणे त्यांनी ठरविलेल्या जागी बसून व्यवहार करू लागले. मला फायदाही होऊ लागला. तेव्हां ते कुजबुजू लागले
“madam आता मालदार पार्टी होणारअसं दिसतंय.त्या खुर्चीवरसुद्धा madam ला फायदा होतो आहे”.
तेव्हा त्यांचे डोळे उघडले. फायदा किंवा तोटा तुम्ही कुठे बसून व्यवहार करता यावर अवलंबून नाही.योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हेच खरे कारण असते.
त्यावेळी मी मार्केटमध्ये थोडीशी चाचपडत होते. फारसा अनुभव नव्हता. फारसं काही कळत नव्हतं, कष्ट व काटकसर या दोनच गोष्टी माहिती होत्या. पुरेसं भांडवल नव्हतं आणि कर्ज काढून भांडवल उभे करण्याचे धैर्य नव्हतं.कोणता शेअर चांगला आणी कोणता शेअर वाईट हे सांगणारही कोणी नव्हतं..
गिनी सिल्क मिल्सचे १००० शेअर्स २१.७० रुपये भावाने विकून थोड भांडवल जमा झालं. तेव्हढ्याच पैशांत सौदा पटवण एवढीच काय ती प्राथमिक अक्कल! शेअरमार्केटचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून व्यवहार करणारी कुणीही व्यक्ती मला ऑफिसमध्ये आढळली नाही.टी.व्ही वर सुद्धा एखादा शेअर वाढल्यानंतर किंवा पडल्यानंतर तो एवढा कां वाढला किंवा कां पडला याची कारण शोधतात. माणूस मरून गेल्यानंतर कारण शोधून काय उपयोग? व्यवहार करण्यापूर्वी जर माहिती मिळाली तर काही उपयोग!!
झालं काय कि ASHOK LEYLANDच्या शेअर्सचा भाव पडत होता. भाव झाला होता १८.०५ रुपये. मी १८रुपये दराने १००० शेअर खरेदीची ऑर्डर लावली. मार्केट बंद झालं तरी ऑर्डर पुरी झाली नाही. शेअर्स मिळाले नाहीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच भावाला ऑर्डर लावली.दुपारचे तीन वाजले तरी शेअर्स मिळाले नाहीत तेव्हां काका म्हणाले
“पांच पैशाने काय इकडचं जग तिकडं होणार आहे. १८०००रुपयाच्या ऐवजी १८०५० रुपये द्यावे लागतील इतकेच ! शेअर्स विकताना ते ५ पैसे वसूल करां. समजा तूम्ही ३०.५०रुपयाला विकणार असाल तर हे पांच पैसे त्यांत मिळवून ३०.५५ रुपयाला विका म्हणजे झालं”
पण त्या वेळेला एवढा सारासार विचार मला सुचला नाही. मी माझा हट्ट सोडला नाही. त्या शेअर्सचा भाव वाढतच राहिला शेअर मला खुणावत राहिला. पण वेळ निघून गेल्यामुळे उपयोग काहीही नव्हता. त्यामुळे शेअरमार्केटमध्ये हट्ट हेका किवा ज्ञानाचा दुराभिमान उपयोगाचा नाही निर्णयांत लवचिकता ठेवावी लागते हे चांगलेच समजले.
तो काळ होता शुगरसेक्टरच्या तेजीचा. त्यावेळी मी वेगळी वाट चोखाळली. शुगर सेक्टरमध्ये कोणकोणते शेअर्स आहेत ते शोधून काढले.त्या शेअर्समध्ये उलाढाल करायला सुरुवात केली. फायदाही होऊ लागला. मी बलरामपुर चीनीचे शेअर्स घेतले होते. माझ्या हिशोबाप्रमाणे १०% फायदा व १ % खर्च. म्हणजे शेअर्सचा भाव खरेदीभावापेक्षा ११ % वाढला की विकावयाचे या सूत्रानुसार मी शेअर विकले. शेअर विकल्यानंतर ‘INSTRUCTION SLEEP “ दुसरे दिवशी द्यावी लागते. परंतु दुसऱ्या दिवशी अक्राळविक्राळ पाऊस पडत होता. गाड्या बंद होत्या. फोर्टला बँकेत स्लीप द्यायला जाणे शक्य नव्हते.मी माझ्या मिस्टरांना सांगितले तुम्ही सुद्धा तडफडाट करीत स्लीप द्यायला जाऊ नका . पाऊस खूप आहे अडकून पडाल.
पण काय झाले कोणास ठाऊक, कुणीतरी ही अडचण ‘STOCK EXCHANGE’ ला कळवली. परंतु मार्केट संपण्याच्या आधी सुचना देण्यात आली की स्लीप देण्याची मुदत एक दिवस वाढवली आहे.माझा DEMAT अकौंट होता बँकेत. एक दिवस वाढवला आहे याची खबर बँकेला नव्हती त्यामुळे बँकेनी स्लीप घेण्यास नकार दिला. बँकेला पटवता पटवता नाकी नऊ आले. शेवटी काकांनी बँकेत फोन करून CIRCULARचा रेफरन्स नंबर सांगितला. STOCKHOLDING CORPORATION कडे चौकशी करायला सांगितली. बँकेनी चौकशी केली व सरतेशेवटी त्यांची खात्री पटल्यानंतर माझी स्लीप घेतली. एक दिवसाची सवलत मिळाली नसती तर AUCTION झाला असतां. खरोखर देवानेच मला वाचवले असे मला वाटले. ज्यावेळी आपली काहीही चूक नसते तेव्हां देव आपल्याला वाचवतो याची मला खात्री पटली.
अशा प्रकारे मार्केटने मला शिकवले, सावरले आणि वेळी फटकारले सुद्धा! तुम्हाला मी किती सांगू काय काय सांगू आणी कसं सांगू असं मला झालय.अनेक आठवणींची दाटी झाली आहे. मार्केट म्हणजे पैसा, मार्केट म्हणजे लक्ष्मीचे माहेरघर हे अगदी खरे आहे. आपल्या कल्पनेतल्या अनेक गोष्टी पैसा मिळाल्यास साध्य होऊ शकतात, कल्पना सत्यांत उतरू शकतात.परंतु शेअरमार्केटच्या झाडाखाली कधी उभे राहावे व कधी दूर व्हावे हे समजले पाहिजे.सावलीसाठी झाडाचा आसरा घ्या परंतु पावसापासून बचाव होण्यासाठी झाडाखाली उभे राहू नका. झाडाची फांदी डोक्यावर पडू शकते, वीज पडू शकतेहे लक्षांत घेतले घ्या. नंतर झाडाला दोष देण्यात काही अर्थ नाही !!
आज दोन वर्ष ब्लॉगच्या माध्यमातून आपण भेटत आहोत, मी माझे बरेच अनुभव तुम्हाला सांगत आलीये, तुमच्यापैकी कुणाला काही अनुभव आला असल्यास तुम्हीसुद्धा तो अनुभव सांगू शकता. त्यामुळे शेअरमार्केटचा व्यवसाय करणाऱ्यांना बाकीच्यांना मदत होईल आणि शेअरमार्केटचा हा कल्पतरू बहरेल.
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ४३ – रुक जाना नहीं, तू कही हार के !!
गृहिणी ते शेअरमार्केट हा आपला प्रवास अजून संपलेला नाही. हा प्रवास खूप लांबलचक आहे. प्रवासांत काही लहान मोठी स्टेशने येतात तश्या माझ्या प्रवासात वाचकांच्या काही शंका आल्या होत्या. काही गोष्टी समजलेल्या नव्हत्या. काही बाबतीत मी दिलेली माहिती त्यांना अपुरी वाटली. त्यामुळे त्यांनी प्रेमाने मला मध्येच थांबवून त्यांना हवी होती ती माहिती विचारली शंकांचे निरसन करावयास सांगितले. मलासुद्धा माहिती सांगताना आणी शंका निरसन करताना आनंदच झाला.माझा ब्लोग वाचून लोकांना उपयोग होतो आहे हे समजलं. आता २९ व्या भागापासून शेअरमार्केटचा प्रवास पुढे चालू करू या.
मी माझे एच. डी एफ सी. चे शेअर्स विकले व गिनी सिल्कचे शेअर्स थोडे थोडे करून विकणे सुरूच ठेवले. जसा जसा जास्त जास्त भाव मिळेल तसे तसे वरच्या वरच्या भावाला विकत राहिले. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. अडकलेला पैसाही थोडा थोडा मोकळा झाला. व दरवेळी पहिल्यापेक्षा जास्त भावाला विकत असल्याने सरासरी चांगली होऊन भाव चांगला होत गेला.यालाच मार्केटच्या भाषेत ‘STAGGERED BUYING OR SELLING’ असे म्हणतात.
विक्री कशी करायची याची प्राथमिक माहिती मला मिळाली होती .जास्त डोके चालवण्याएवढा माझ्याजवळ वेळ होताच कुठे? कारण शेअरमार्केटचा व्यवसाय करण्यासाठी मला भांडवलाची गरज होती.आता माझ्याजवळ थोडफार भांडवल तयार झालं होतं. ‘बोलाचा भात बोलाची कढी’ संपली आणि आता खरा भात करायची वेळ आली. भात चांगला झाला तर सगळे पोटभर जेवतील, भात करपला , कच्चा राहिला किंवा भाताची खीर झाली तर नावं ठेवतील व सर्वजण उपाशी राहतील. त्यामुळे प्रत्येक पाउल जपून टाकण भाग होतं
किती भांडवल गुंतवायच ? जेवढ भांडवल जमा झालय तेवढ सगळ गुंतवावं कि ५०%आता गुंतवून बाकीचे थोडे दिवसांनी मार्केट पडलं तर गुंतवावं? असा प्रश्न पडला. अशावेळी आमच्या ऑफिसमध्ये लोक ज्या गप्पा मारत त्याचा मला उपयोग झाला. ऑफिसमध्ये एक गोष्ट होत असे . कुणीही कधीही घरगुती गोष्टी बोलत नसत,कुणाचा अपमान करण किंवा कुणाला कमी लेखण नाही, किंवा मला पैसे मिळाले त्याला मिळू नयेत अशी संकुचित दृष्टी मला आढळली नाही.
मी आपली फक्त सगळ्यांच्या गप्पा ऐकून किंचित हसून प्रतिसाद देत असे. पण मला त्या गप्पांचा उपयोग झाला. “अरे, १०० शेअर्स एकदम कां घेतलेस. २५-२५ च्या गटाने घ्यायचे होतेस. मार्केटचा अंदाज घेतला असतास तर बरे नाही कां? आज दुपारी ‘I. I. P’ चे आकडे येणार तेव्हा जर मार्केट पडले तर स्वस्त पडतील वगैरे वगैरे.
अहो, तेव्हा मला ‘I. I. P.’ ‘INFLATION ‘ ‘CAD’(CURRENT ACCOUNT DEFICIT ) म्हणजे काय हे काहीच कळत नव्हते. पण मला एवढे मात्र कळले की खरेदी छोट्या छोट्या लॉटमध्ये करावी.मार्केटचा अंदाज घेवून करावी. आणी मार्केटच्या अस्थिरतेचा फायदा करून घ्यावा. मार्केटमधील अस्थीरतेलाच “MARKET VOLATILITY ‘ असे म्हणतात.
त्याचबरोबर मार्केट पाहणे ऐकणे निरीक्षण करणे या सवयींचा उपयोग झाला.
काही शेअर रोज किती वाढतात किंवा मार्केट पडले तर किती पडतात किंवा शेअर्सचे जे निर्देशांक (SENSEX, NIFTY ) आहेत त्यांचा शेअरच्या किमतीतील वाढीशी किंवा कमी होण्याशी काही संबध जोडता येतो कां ? हे मी माझ्या सोयीसाठी निरीक्षणाने पाहिले. शेअर्सच्या खरेदीशी या सर्व गोष्टींचा फार घनिष्ट संबंध आहे.
मी तुम्हाला कित्येक वेळेला एक गोष्ट सांगितली आहे पुन्हा सांगते शेअर खरेदीचा उद्देशच फायदा घेवून विकणे हा असतो. जतन करणे, म्युझियममध्ये ठेवणे हा कदापि नसतो. ‘TO MAKE MONEY’ हाच उद्देश हेच अंतिम ध्येय व तुम्हाला पैसा किती सुटला यावरच तुमच्या यशाची मोजदाद होते.
इथे एक गोष्ट तुमच्या कानांवर घातल्याशिवाय मला राहवत नाही. मी ऑफिसमध्ये जाताना किंवा घरी येताना काही गरजेच्या गोष्टी खरेदी करीत घरी येत असते. हे माझ्यासारख्या गृहिणींना काही नवीन नाही. घरांत काय संपले आहे काय उद्यासाठी हवे आहे., घरातील मुलांच्या मागण्या काय आहेत हे सर्व डोक्यांत ठेवूनच गृहिणी वावरत असते. ऑफिसच्या बाहेरच बसणाऱ्या फळवाल्याकडून मी फळे घेत असे. कारण त्याचा दर वाजवी असे. मालही चांगला असे. तो माझ्या ओळखीचा झाला होता. मी त्याला एकदा विचारले “तुला एवढ्या भावांत विकणे परवडते कसे? “ तेव्हा तो म्हणाला “फायदा किती घ्यावयाचा हे माझे ठरलेले असते. आज कोणता माल लावायचा , किती किमतीला मिळायला हवा, किती किमतीला विकावा, खर्च जाऊन किती पैसे मिळाले पाहिजेत हा हिशोब करूनच मी माल घेतो .२-३ तास बसतो. दुकाने उघडण्याच्या आंत माझी पाटी रिकामी मी पण रिकामा. माल चांगला असल्यामुळे गिऱ्हाईकही फिक्स्ड असते “.
यशाचे केवढे मोठे गणित तो फळवाला मला कळत-न-कळत सुचवून गेला होता. हेच तंत्र बद्या–चढ्या भाषेत बोलायचे तर वाजवी नफा ठेवायचा, टर्नओव्हर जास्त हवा, भांडवल जास्त लवकर बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे पुन्हा पुन्हा गुंतवता येतं. व तेवढेच भांडवल वापरून जास्तीतजास्त फायदा मिळवता येतो. म्हणजेच १००००रुपये गुंतवायचे ठरवले तर १००रुपये प्रती शेअर किमतीचे शेअर खरेदी करायचे. महिन्याभरांत विकायचे व पुन्हा फायदा बाजूला काढून घेवून पुन्हा १००००रुपये गुंतवायचे. म्हणजेच आपण वर्षाला १,२०,००० रुपये गुंतवू शकतो.प्रत्येक महिन्यांत १००० रुपये फायदा झाला तर वर्षाअखेरीला १००००रुपयांवर १२०००रुपये निव्वळ फायदा होऊ शकतो.
म्हणजे ज्यावेळी आपल्याजवळ भांडवल कमी असते तेव्हा ‘QUICK ENTRY, QUICK EXIT ‘ करून पुन्हा पुन्हा तोच पैसा वापरून जास्त फायदा मिळवता येतो. त्यासाठी योग्य वेळ व योग्य वेळीच योग्य निर्णय ताबडतोब घेणे यावरच यशाचे गणित अवलंबून असते. त्याचबरोबर त्या फळवाल्याने अजून एक गोष्ट सांगीतली ती सुद्धा विचारात घेण्यासारखीच!
‘माल चांगला म्हणजे गिऱ्हाईकही फिक्स्ड’ म्हणजेच शेअरमार्केटच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास चांगले शेअरच घेतले पाहिजेत. म्हणजेच कंपनीच्या अस्तित्वाबद्दल, तिच्या प्रगतीशील वाटचालीबद्दल कोणत्याही प्रकारची शंका खरेदीच्या वेळीतरी आपल्या मनांत असू नये.नाहीतर आज कंपनी अस्तित्वांत होती उत्पादन तसेच विक्री जोरांत होती, पण थोड्याच दिवसांनी बंद पडली. शेअर्सचा भाव २०पैसे झाला.म्हणजेच ‘तेल बी गेलं तूप बी गेलं आणी हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे सर्व प्रकारची खात्री झाल्यावरच खरेदी करावी. नाहीतर जमीन जशी धुपून नाहीशी होते तसे भांडवल संपून जाईल व हातांत करवंटी यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आपल्या भांडवलाची जपणूक करणे सर्वात जास्त महत्वाचं…
अजून पुढे बरंच काही बोलायचं , पण ते पुढच्या भागात …
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ४० – मार्केटमधले Window Shopping !!
नुकताच रविवारी एका वाचकाचा फोन आला होता. त्याने चौकशी केली व विचारले
“तुम्ही हल्ली ‘ब्लोग’ लिहिणे बंद केले कां?. असे करू नका आम्हाला तुमचा ‘ब्लोग’ वाचायला आवडतो. तुम्ही आम्हाला अर्ध्या वाटेवरच सोडलेत. आम्हाला सांगा आम्ही कोणते शेअर्स खरेदी करावेत? कोणत्या भावाला खरेदी करावेत.? कधी खरेदी करावेत ? कधी विकावेत ? किती फरकानी विकावेत? डोक्यात सगळा गोंधळ माजला आहे. काहीच कळत नाही. काही सुचत नाही. त्या शेअरमार्केटच्या भानगडीत जाऊ या की नको. तुम्ही हा गुंता सोडवून मार्ग दाखवणार कि नाही?”
हो! हो! त्या वाचकाचे आणि तुम्हा सगळ्यांचे प्रश्न सोडवायला मला आवडेल. तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहाराची शेअरमार्केटशी सांगड घालून पहा म्हणजे प्रश्न पटापट सूटतील. नेहमी आपण बर्याच गोष्टी गरजेपोटी करतो. म्हणजे पावसाळा आला तर छत्री रेनकोट खरेदी करतो. शेअर मार्केट मध्ये २ फरक आहेत, एक तर शेअर खरेदी करायची कुणाला ‘गरज’ नसते आणि आपण खरेदी केलेल्या वस्तू आपण विक्री करण्यासाठी खरेदी केलेल्या नसून उपयोगात आणण्यासाठी खरेदी केलेल्या असतात. त्या वस्तूची संख्या किवा त्यांचे मूल्य वाढावे अशी आपली अपेक्षा नसते.पण शेअरमार्केटमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सची किमत वाढून ते विकल्यावर आपल्या पैसे सुटावेत अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते.
मार्केट मध्ये गुंतवणूक करताना आपले अंथरूण केवढे आहे ,पाय किती लांब करता येतील व किती वेळ अंथरुणावर लोळता येईल हे मात्र पहिले पाहिजे. आपल्याजवळ किती रक्कम आहे, ही रक्कम तुमच्याजवळ किती काळ पडून राहणार आहे याचा विचार करा. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर ऑर्डर देताना हा विचार करताच ना? कारण तुम्हाला ताबडतोब बिल द्यावयाचे असते. तोच शेअर्सच्या बाबतीत विचार करावा.तुम्हाला ६ महिने पैसे लागणार नसतील तर ४ महिन्यांसाठी योजना करा कारण शेअरमार्केटमध्ये निश्चित काही सांगता येत नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी आपण रकमेची जुळवाजुळव करतो, कितीही आदर्श डोळ्यासमोर असतील तरी समाजातील काही गोष्टींचे बळी आपण ठरतो. डोनेशन भरावे लागतेच. डोनेशनसाठी जमा केलेले हे पैसे ४-५ महिने पडून राहतात. आपल्याजवळ दोन पर्याय असतात. बचत खात्यात ठेवणे किंवा ४५, ९०, १८०, दिवसांसाठी मुदत ठेवीत ठेवणे. आता नवा पर्याय शेअरमार्केटचा.
मी ३८व्या भागात सांगितल्याप्रमाणे आपण जानेवारी ते जून हा कालावधी घेतला होता. कालावधी अशासाठी की कोणत्यावेळी कोणते शेअर्स खरेदी करण्याचा विचार करावा हे सांगण्यासाठी.
आता पहा उन्हाळ्यात छत्री विकत घेतली तर स्वस्त पडते व A. C. किंवा पंखा विकत घेतला तर महाग पडतो. किंवा सणासुदीच्या दिवसात कपडे साड्या दागिने महाग पडतात.असाच विचार आपण मार्केट संबंधात करावा.
(१) आता पहा जर कंपनीचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे असेल तर जानेवारीपर्यंत तीन तिमाहीचे निकाल जाहीर झालेले असतात. त्याच्यावरून कल्पना करता येते की कोणत्या कंपन्याचा वार्षिक निकाल चांगला असेल. आपण अशा कंपनीचे शेअर्स घ्यावेत.
(२) काही कंपन्या ‘ INVESTOR FRIENDLY ‘ असतात, म्हणजेच चांगला लाभांश किंवा बोनस शेअर्स देतात. लाभांच्या बाबतीत त्यांचे रेकार्ड चांगले असते. अशा शेअर्सचे भाव लाभांशाच्या अपेक्षेप्रमाणे वाढतात.लाभांशाच्या उत्पन्नावर आयकर आकारला जात नाही.
(३) ‘ADVANCE TAX’ चे आकडे जाहीर होतात. ज्या कंपन्याना आपला नफा वाढणार असे वाटते त्या कंपन्या जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. काही कंपन्या मात्र नेहेनीच जरुरीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX ‘ भरतात. ज्या कंपनीने गेल्यावर्षीपेक्षा जास्त ‘ADVANCE TAX’भरला असेल त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत.
(४) सरकारचे अंदाजपत्रक याच काळात जाहीर होते. २५ फेब्रुवारीला रेल्वेचे अंदाजपत्रक व २८ फेब्रुवारीला रेग्युलर अंदाजपत्रक जाहीर होते. रेल्वेशी संबंधीत शेअर्स कमी किमतीत विकत घेवून बजेटच्या आधी १-२ दिवस आधी विकावेत.उदाहरणार्थ काही रेल्वशी संबंधीत शेअर्सची नावे खालीलप्रमाणे (१) कालिंदी रेल (२) करनेक्स मायक्रोसिस्टीम्स (३)स्टोन इंडिया (४)हिंद रेक्टीफायर (५) बी ई एम एल.(६) TITAAGHAR WAGONS.या शेअर्समध्ये मिळत असेल तो नफा घेवून अंदाजपत्रक जाहीर होण्याच्या आधी बाहेर पडावे.या शेअर्सचे भाव पुन्हा वर्षभरात वाढत नाहीत. रेल्वे व खते यांच्या शेअर्सच्या भुयारात वेळेवर घुसून वेळेवर बाहेर पडावे लागते.
(५) सरकारचा भर नेहेमी शेती, शिक्षण, संरक्षण, उत्पादन, दळणवळण, लघुउद्योग आदी गोष्टींवर असतो. या क्षेत्रात विविध सवलती दिल्या जातात. करात सवलती दिल्या जातात. या क्षेत्रातील काही कंपन्यांकडे सुद्धा लक्ष ठेवू शकता
(६)या काळात दिला जाणारा हवामानाचा अंदाजही फार महत्वाचा ठरतो. विशेषतः पावसाचे प्रमाण, त्याची वेळेवर वाटणी ही फार महत्वाची ठरतात. शेतकरयाची खुशहाली शेअर मार्केटमध्येही आनंदाची लहर पसरवते. यावर्षी अल-निनो हा शब्द वारंवार कानावर येतो आहे. याचा परिणाम पावसावर होईल. पाउस कमी पडेल. तांदूळ पिकवणाऱ्या देशांवर याचा परिणाम होईल. सुदैवाने अल-निनोचे दुष्परिणाम भारतावर जास्त दिसणार नाहीत. भारत बासमती तांदुळाची निर्यात करतो. त्यामुळे तांदळाची निर्यात करणारया KRBL, LTFOODS कोहिनूर फुड्स या कंपन्यांचा फायदा होईल.अग्रो शेअर्सचा विचार करू शकता उदाहरणार्थ : जयंत अग्रो. एरिस अग्रो हेरीटेज फूड्स
(७) जानेवारी ते जून हा उन्हाळ्याचा मोसम असल्यामुळे HAVELLS(इंडिया), CROMPTON GREAVES, VOLTAS या शेअर्सचाही विचार करावा. कारण या कंपन्यांची विक्री या काळात वाढते.
(८) या काळात खतांचे शेअर्सही स्वस्त मिळतात.
महत्वाचा मुद्दा म्हणेज निरीक्षणाचा, कंपनीच्या शेअर्सचा LOWEST भाव आणी HIGHEST भाव काय हे बघायला हवे. यात वार्षिक, महिन्यातील, आठवड्यातील, त्यादिवशीचा व आत्तापर्यंतचा असे कमीतकमी आणी जास्तीतजास्त भाव प्रत्येक शेअरच्या बाबतीत मिळू शकतात.जर शेअर त्याच्या कमीतकमी किमतीच्या जवळ मिळत असेल तर त्या भावाला विकत घ्यावा. म्हणजे RISK-REWARD RATIOचे प्रमाण चांगले राहते.आपण प्रत्येक माणसाची किंवा वस्तुची कुवत पहातो. या मुलाची बुद्धी किती, याला मार्क किती मिळतील किंवा कपडे घेताना हा कपडा किती टिकू शकेल हे बघतो . त्याचप्रमाणे प्रत्येक शेअर किती वाढू शकतो याचा अंदाज निरीक्षणावरून बांधता येतो. म्हणजेच बेडूक कितीही फुगला तरी तो हत्ती होणार नाही हे लक्षात घ्यावे. म्हणजे शेअर कधी विकावा याचे गणित घालता येते. जर १०% फायदा ५-६ महिन्यात होत असेल तर तो खूप चांगला ! कधीही जास्त हव्यास करू नये.
आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू आहे मोदी FACTOR चा विचार आहे. जर तुम्ही धाडशी असाल धोका पत्करण्याची तयारी असेल तर ADANI ENTERPRISES, ADANI PORT , ADANI POWER, हे शेअर्स खरेदी करू शकता. गुजरातमध्ये असलेले किंवा गुजरात राज्याशी संबधीत शेअर्स म्हणजेच GNFC, GSFC , GUJARAAT GAS, GMDC इत्यादी. निवडणुकीचा फायदा मिडिया सेक्टर (प्रिंट मेडिया, इलेक्ट्रोनिक मेडिया ) याना होईल. कारण निवडणुकीच्या काळात जाहिरातीचे उत्पन्न वाढते. ENIL, जागरण प्रकाशन, HTMEDIA, ZEE ENTERTAINMENT हे शेअर्स पहा. मोदींच्या जाहीरनाम्यात बंदरे व उर्जा या क्षेत्रांवर भर दिला जाईल. गुजरातमधील अनुभव लक्षात घेता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना प्राध्यान्य मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे नफ्यात चालणारया व कार्यक्षमता दाखविणार्या सार्वजनिक उद्योगांचे शेअर्सही वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्येक गोष्टीचा विचार चहुबाजूनी करा. मोदि पंतप्रधान नाही झाले तर काय ? त्यामुळे ८-९ मेच्या जवळपास शेअर्स विकून कॅशमध्ये बसा आणी निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एन्ट्री घ्या. मोदि पंतप्रधान झाले नाहीत तर मार्केट कोसळेल तेव्हा शेअर्स स्वस्तात मिळतील.
तुमच्या भाषेत बोलावयाचे झाले तर शेअरमार्केटच्या फलाटावर गर्दी खूप आहे. सर्व लोकल्स भरून येत आहेत. तुम्ही चढू शकाल कां ? सुरक्षितपणे उतरू शकाल कां? घुसमट तर होणार नाही याचा विचार करा, लहानमुलाबाळांना घेवून लोकलमध्ये चढू नका. म्हणजेच दुसर्या शब्दात “A’ ग्रुपच्या शेअर्समध्ये किंवा BLUE CHIP शेअर्स मध्येच राहा. वेळेवर खरेदी विक्री करा. आपल्याला उतरायच्या स्टेशनवर गाडी थांबते ना याचा विचार करा नफ्याचे प्रमाण ठरवून आपले उतरण्याचे ठिकाण नीट ठरवा. ही खटपट मारामारी जमत नसेल तर निवडणुका होईस्तोवर भानगडीत पडू नका.
निघण्याआधी एक सांगते , मी उदाहरणासाठी ज्या शेअर्सची नावं सांगितली आहेत ती फ़क़्त उदाहरणासाठीच आहेत. ते शेअर घ्या असं मी सांगत नाहीये. या लेखातून घेण्यासारखं काही आहे तर ते विचार करायची एक पद्धत आणि शेअर मार्केटमध्ये लावता येतील असे काही निकष. बाकी मग कुठले शेअर घ्यावेत हा तुमचा तुमचा प्रश्न ..
भेटूच लवकर
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
महिला दिन विशेष !!
तुम्हाला मी सांगितलं कि नाही लक्षात नाही पण आजकाल मी ‘माझी वाहिनी’ या मराठी मासिकाच्या माध्यमातून लोकांना शेअर मार्केट बद्दल माहिती देत आहे. मार्चच्या अंकात महिला दिनानिमित्त मी माझी – ‘गृहिणी ते गुंतवणूकदार’ हि वाटचाल वाचकांना सांगावी असा आग्रह संपादकांनी केला आणि त्यासाठी प्रकाशित हा लेख आज मी ब्लोग वर पोस्त करत आहे. वाचून तुम्हाला थोड जरी प्रोत्साहन मिळालं तर लेखाचा उद्देश साध्य समजेन
********************************************
भाग्यश्री फाटक – प्रयत्ने वाळूचे कण रगडीता… शेअर मार्केटही कळे !!
इसवी सन – २००१
स्थळ – शेअर ब्रोकरचे ऑफिस
घाबरी घुब्री थोडीशी गोंधळून गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक!
“शेअरमार्केट म्हणजे काही वरणभाताचा कुकर लावणे नव्हे किंवा कांदेपोहे करणे नव्हे . येथे भल्याभल्यांची भंबेरी उडते. तुम्ही आपल्या चुलीजवळ बऱ्या. नवर्याचे असतील नसतील तेव्हडे पैसे घालवाल“
अश्या अनाहूत सल्ल्याने माझे झालेले स्वागत !
इसवी सन – २०१३
स्थळ – तेच शेअर ब्रोकरचे ऑफिस
ऑफिसमध्ये सन्मानाने गेलेली मी म्हणजेच श्रीमती भाग्यश्री प्रकाश फाटक
“मी ओळख करून देतो. ह्या ठाणे शाखेच्या मोठ्या गुंतवणूकदार , अतिशय अभ्यासू , यशस्वी शेअर मार्केट व्यावसायिक आहेत. कोणालाही काही शंका असेल तर प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण खात्रीलायक रीत्या देणारी व्यक्ती म्हणजेच या फाटक MADAM.”
आणि माझ्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालेला अमुलाग्र बदल.. माझ्या एक तपाच्या अविश्रांत मेहेनतीचे फळ…
आता मला ठणकावून सांगावेसे वाटते की वरणभाताचा कुकर लावता लावता , कांदे पोहे करता करता शेअरमार्केट करता येते. जी गृहिणी संसारातील प्रत्येक अडचणीला तोंड देवून संसार संभाळते ती कोणतीही गोष्ट यशस्वीरीत्या करू शकते. अहो मी अशिक्षित होते , मला नोकरी मिळू शकली नाही म्हणून शेअरमार्केटमध्ये शिरले असे मात्र नाही . माझ्या आयुष्याने व आजूबाजूच्या परिस्थितीने जशी वळणे घेतली त्या वाटेने मला प्रवास करावा लागला.
गेल्या १२ वर्षात माझ्यात तसे खूप बदल झाले पण तशी मी तुमच्यापेक्षा वेगळी अशी कुणी नाही किंबहुना तुमच्यातलीच एक आहे. आता तुमच्यातली म्हणजे कदाचित १९९० किवा २००० च्या काळातली मी नसेन. पण जर वाचकांमध्ये जर कोणी गृहिणी असतील ज्यांची लग्न १९७५-१९८५ मध्ये झाली असतील आणि ज्यांनी गृहिणीची भूमिका मुलं मोठी होई पर्यंत चोख पणे बजावली असेल, तर तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नसेल. आणि या पुढे मी जे सांगणार आहेत ते कदाचित तुम्हाला सर्वात जास्त जाणवेल.
आता मी सागते त्या प्रसंगात स्वताला ठेवण्याचा प्रयत्न करा. साल २००० , ४०-४२ वर्षाची, मी २० एक वर्षांनी नोकरी शोधायला निघालेली. माझं graduation १९७४ साली झालेलं. कॉम्पुटरच्या knowledge च्या नावानी शंखनाद. बऱ्याच जागी वयाच्या अटीत मी बसत न्हवते. फारसे काही interview calls येत नव्हते. जे येत होते त्यांना काही अर्थ नव्हता. या सगळ्या मध्ये एका महाभागाने मला मुक्ती चा मार्ग दाखवला आणि मला नोकरीच्या मोहमायेतून बाहेर काढलं. तुम्ही विचार करत असाल कि त्या पठ्ठ्याने असं काय सांगितलं? ऐका तर मग –
‘तुम्ही ४० वर्षाच्या , तुम्हाला जितका पगार देणार तितक्या पगारात आम्हाला २०-२२ वर्षाची computer educated मुलं मिळतात , तर मग आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ?’
प्रश्न अगदी बरोबर होता, उत्तर माझ्याकडे बिलकुल नव्हतं.
आता मी तुम्हाला सांगते कि मी या प्रश्नापर्यंत कशी आले?. असं नाही कि मी कधी नोकरी केलेली नव्हती. लग्न आधी मी commerce graduate होते. लग्ना नंतर वकिली चं शिक्षण घेतलं. lecturer म्हणून नोकरी लागली. नोकरी करायची म्हणजे मला माझ्या लहान मुलीला शेजारी सोडावं लागे, तिच्या कडे थोडं दुर्लक्ष होई. हे सगळं मनाला पटत नव्हत. स्वताची पोळी भाजण्या साठी इतरांकडे दुर्लक्ष करण योग्य नाही असं वाटत होतं. जीवाची ओढाताण होत होती. घरातही या गोष्टींवर चर्चा होवू लागली. आयुष्यात लहानपणाची काही वर्ष फार महत्वाची असतात. त्यावेळी आईचा सहवास मिळाला नाही , संस्कार घडले नाहीत तर पोरके पण वाटतो. त्यामुळे मुलं लहान असताना नोकरी करू नये व मुलं मोठी झाल्यावर पुन्हा नोकरी करावी, स्वत:चं career करावं असं ठरलं.
आणि आधी सांगितलं ते या नंतरचं सगळं रामायण. आता मागे वळून बघितल तर हसायला येतं पण त्या वेळी मात्र ते एकून तोंडचं पाणी पळाल होतं. एक गोष्ट मात्र साफ होती, आता जे काय करायचं तिथे वयाची अट असता कामा नये, मला जे आधी पासून येतं त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या श्रमाला साजेसा पैसा त्यातून मिळाला पाहिजे. नोकरी मिळणं आता मुश्कील आहे हे साफ होतं, आणि मिळाली तरी ती काही मला पाहिजे तशी मिळणार नव्हती. हा सगळा विचार करत असताना एक सुंदर कल्पना त्या वेळी माझ्या मनात आली आणि त्याच कल्पनेचा हा सगळा प्रवास.
मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवले त्यावेळी माझ्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांनी थैमान घातले होते. मी वयाने जरी ४५ वर्षांची होते तरी शेअरमार्केटच्या दृष्टीकोणातून मी नर्सरीमध्ये होते . लहान मुलाला जसे शाळेचे नाव माहीत नसते तसेच मलाही काही माहीत नव्हते . त्यामुळे लहान मुल जसे प्रत्येक गोष्ट पाटीवर गिरवते त्याचप्रमाणे मला प्रत्येक गोष्टींच्या नोंदी वहीत कराव्या लागल्या . अगदी N.S.E. म्हणजे काय, B.S.E. म्हणजे काय, हे माहीत नव्हते .शेअर्सची नावे नवीन, ती कंपनी काय करते हे ही माहीत नव्हते. कधी कधी कंटाळा येई. परंतु स्वतःच स्वतःला उठवून पुन्हा शेअरमार्केटकडे लक्ष देणे सुरु झाले ..
माझ्या यजमानांचे ऑफिस ‘BOMBAY STOCK EXCHANGE’च्या जवळच होते. त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये शेअर्सविषयी चर्चा होत असे . शेअर्सचे अर्ज टेबलावर ठेवलेले असत. त्यानी काही शेअर्सचे अर्ज भरले होते . अगदी थोडे शेअर्स लागले होते . पण ते विकायचे कसे ते समजत नव्हते . त्यामुळे शेअर सर्तीफीकेत्सची रद्दी जमा झाली होती. ही राद्देच माझ्या स्वर्गाचे दार ठरली. ‘भांडवलाचा’ हा प्रश्न मी रद्दी झालेले शेअर्स विकून सोडवला. टाकाऊ झालेल्या कागदातून काही पैसा उगवतो का हे पहाता पहाता मी मार्केट्च कामकाज, त्यातल्या खुब्या बारकावे शिकत गेले . कारण या व्यवहारात नुकसान काहीच नव्हते . ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ हा विचार करून कामाला लागले. एकेक गोष्टीची उकल होत गेली. DEMAT ACCOUNT, TRADING ACCOUNT, उघडून तयारी करून हळू हळू शेअर्स विकून भांडवल गोळा तर झालेच पण माझे शेअर्सचे ज्ञानही वाढले पैसेही मिळू लागले. मला एक नवा व्यवसाय मिळाला. माझ्या बुद्धीला आव मिळाला. मुलाला जशी शाळेत मजा वाटू लागली की मुले स्वतः होऊन शाळेत जातात त्याप्रमाणे मलाही चटका लागला. मी कधी पहिलीत गेले म्हणजेच शेअरमार्केट्ची पहिली पायरी ओलांडली ते समजले नाही.
ब्रोकरच्या ऑफिसमध्ये बसत असल्यामुळे व्यवसायातील अनेक युक्त्या समजल्या. इतरांचे पाहून मीही कधी कधी ‘INTRA DEY TRADE’करू लागले काही लोक फक्त ‘ब्लूचीप’ शेअर्समध्ये व्यवहार करीत तर काहीजण १रु.च्या आतल्या शेअर्समध्ये व्यवहार करीत .
“१००रु.च्या शेअरचा भाव २००रु. झाला काय किंवा ४०पैसे किमतीच्या शेअरची किमत ८० पैसे झाली. काय हिशोब सारखाच ना MADAM ! फायदा १००%च होणार.” हे एका आजोबांच ज्ञान मला खूपच भावले आणी पटलेही. त्यानंतर मी माझ्याजवळ असलेल्या भांडवलाची योग्य प्रकारे वाटणी करू लागले.थोडे पैसे बाजूला ठेवून जेव्हा मार्केट खूप पडत असे तेव्हा शेअर्स विकत घेवू लागले. सर्व प्रकारच्या शेअर्समध्ये , त्याचप्रमाणे कमी किंवा जास्त किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू लागले . अशाप्रकारे प्रथम गोंधळलेल्या भाग्यश्री फाटक धाडसी विचारी भाग्यश्री फाटक झाल्या . गेल्या १०-१२ वर्षात जेव्हा जेव्हा मार्केट कोसळले तेव्हा डगमगल्या नाहीत. मार्केट कोसळते आहे म्हणजे आपल्यासारख्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे असे वाटे . आपल्या शेअरचा भाव २००रु.नी कमी झाला आहे हा विचार करत डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा कोणते चांगले शेअर्स कचऱ्याच्या भावात घेता येतील हा विचार डोक्यात असे .
हळू हळू माझ्या डोक्यात कर्ज काढून भांडवल गोळा करण्याचा विचारही डोकावू लागला.कारण अशी सुवर्णसंधी कित्येक वर्षांनी येते.कर्जावरती व्याज देवूनही मला फायदा होईल कां ?ही आकडेमोड सुरु झाली . इथेच मी गुंतवणूकदार झाले. अशातऱ्हेने मी मार्केटची 12वी पास झाले. मी नंतर देरीवेटीव(DERIVATIVE) मार्केटचा तसेच कमोडीटी(COMMODITY) मार्केटचाही अभ्यास करून त्याचा उपयोग करू लागले. केंद्र सरकार, राज्य सरकारे, रिझर्व बँक, एवढेच नव्हे तर परदेशातील सरकारांनी घेतलेल्या निर्णयांचा शेअर्सच्या किमतीवर होणारा परिणाम समजून घेतला. शेअरमार्केट मध्ये वापरले जाणारे विविध शब्द त्यांच्या अर्थ आणी उपयोगांसकट समजावून घेतले .कंपनीचे तिमाही वार्षिक निकाल समजावून घेवून त्याच्या शेअरच्या किमतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला . शेअरमार्केटच्या सतत बदलणाऱ्या महासागरातून चांगली रत्ने वेचण्याचे ज्ञान मिळाले. माझ्या व्यवसायाला स्थेर्य आले. मी बुल रन(BULL RUN) व बेअर रन(BEAR RUN) दोन्हींचाही अनुभव घेतला. आता घट्ट पाय रोवून शेअरमार्केटचा प्रवास करीत आहे. एखाद्या गृहिणीला जसा अजिबात स्वयंपाक येत नसतो तेव्हा तिचा गोंधळ उडतो. परंतु जिद्दीने शिकत शिकत ती कॅटरिंगचा व्यवसाय करू लागते , हॉटेल काढते, ५०० माणसांचा स्वयंपाक करते व रेचीपीची पुस्तके लिहिते . त्याचप्रमाणे शेअरमार्केटमध्ये चाचपडणारी मी आता ‘मार्केट आणी मी’ हा ब्लोग चालवते. ‘माझी वहिनी’ या मासिकातून लेख लिहून शेअरमार्केट विषयी मार्गदर्शन करीत आहे.
मार्केटमुळे नाव मिळाले आता अनेकांना मार्गदर्शन करता येते. त्यांनाही अर्थाजन करता येते. त्यांना होणारा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणीत होतो. मागे वळून पहाताना कधी धडपडले पडले पण माझे यजमान, माझा मुलगा सुरेंद्र व मुलगी स्वरश्री यांनी सावरण्यासाठी खूपच मदत केली . माझे यजमान तर रोज दुपारी ३.३० वाजता मार्केट संपल्यावर बँकेतून फोन करत. मग काय म्हणते तुमचे मार्केट ? माझ्या आवाजातून त्यांना जाणवत असे आज दिवस चांगला गेला की वाईट ? ते म्हणत ‘ झाले ते झाले , पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घे.’
२००२ पर्यंत मी फकत एक गृहिणी होते आणि आज २०१२ साली मी stock marketमधली एक यशस्वी गुंतवणूकदार आहे. आज मागे वळून बघताना लक्षात येतंय कि मी आरपार बदलून गेलीये. आयुष्याला एक नवीन दिशा मिळालीये. यश, संपत्ती, प्रतिष्ठा, आदर , मानसम्मान सगळं काही मिळालंय. आधी लोकांकडून stock market बद्दल सल्ले घेणारी मी आज विश्वासानी लोकांना ‘investment advice ‘ देत आहे.
ज्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर फार कमी प्रमाणात असे, तिथे मी आज पाय घट्ट रोवून उभी राहिले आहे. गेल्या दहा वर्षात अनेक वादळे आली , तरीही मी अजून खंबीर उभी आहे. ईश्वरी कृपा, अफाट प्रयत्न आणि नशीब यामुळे हे सगळं शक्य झालेल आहे. कधी कधी शेअर्स विकले जायला हवेत तेव्हा विकले जात नसत. थांबावे लागे . त्यावेळी वर्किंग कॅपिटल मुले पुरवत असत . माझी मुलगी माझ्या शेअर्सची EXCELSHEET तयार करून सर्व नोंदी UPTODATE ठेवत असे. कधी डबा करण्याच्या घाईत पेपर वाचायला वेळ झाला नाही तर महत्वाच्या बातम्या माझे यजमान मला सांगत असत. आता दोन्ही मुलांची लग्ने झाली आहेत. माझी सून किरण आणी माझे जावई अमेय जोगळेकर कौतुकानी शेअरमार्केट्ची चौकशी करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या माणसाशिवाय माझा हा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता ते म्हणजे आमचे काका (व्यास्थापक व ब्रोकर ) श्री मधुसूदन कुलकर्णी ज्यांनी मला सर्वप्रकारे मदत केली.
खरं पाहता हि माझ्या आयुष्याची दुसरी खेळी म्हणावी लागेल. ज्या वयात सर्व जण ऐछिक निवृत्ती घेत होते, त्याच वेळी मी हा नव्याचा शोध घेत होते. घरात कोणतीही आबाळ होवू न देता माझी हि महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली. तुम्हाला हि हा सगळं अनुभव घेता यावा, यातली मजा चाखता यावी हा माझा प्रयत्न आहे.
एक अजून गोष्ट साधायची आहे मला. गेल्या 10 वर्षात मला कळलंय कि share market हे इतकं भीतीदायक नाहीये. share market हे खरं तर खूप मजेशीर आहे, ते एका क्रिकेट च्या match प्रमाणे रोमांचक आहे. फ़क़्त त्यातली मजा कळायची देर आहे. तीच मजा, तोच अनुभव, तीच रोमांचकता तुमच्या पर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
माझ्यासारखाच ज्या स्त्रीयांचा परिस्थितीमुळे कोंडमारा झाला असेल त्यांच्यासाठी शेअरमार्केट,हा सुरेख पर्याय आहे. माझ्या अनुभवाचा आणी ज्ञानाचा उपयोग अनेक महिलांना व्हावा यासाठी हा प्रपंच. माझ्या महिला मैत्रिणींनो जर कधी तुमच्या आयुष्याच्या मध्यावर सर्वबाजूंनी कोंडी झाल्यासारखी वाटली आणि आपल्याला असलेल्या रिकाम्या वेळेचा , शिल्लक असणाऱ्या पैशाचा उपयोग फायदेशीर रित्या कसा करावा हा प्रश्न पडला तर शेअरमार्केट हा पर्याय अवश्य लक्षांत असू द्या. कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन पाहिजे असल्यास मला कधीही संपर्क करू शकता. शेअरमार्केटमध्ये महिलांचा सहभाग वाढावा हीच माझी सदिच्छा!
भेटूच लवकर ..
********************************************
भाग ३७ – फट(FAT) म्हणता ब्रह्महत्या !!
मी तुमच्या विनंतीला मान देवून माझी कथा अर्धवट सोडून “मागणी तसा पुरवठा’ या उक्तीप्रमाणे D-MAT अकौंट उघडण्याची प्रक्रिया ( ब्लोग नंबर ३१ ) मराठीतून खुलासेवार सांगितली. त्यानंतरच्या भागातून डेट्रेडविषयी स्पष्टीकरण केले. डेट्रेडसाठी तांत्रिक विश्लेषणाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.ज्यावेळी तांत्रिक विश्लेषण व मुलभूत विश्लेषण याविषयीची चर्चा येईल तेव्हा त्याबद्दल बोलूच.
आज मी तुम्हाला माझ्या कथेत पुढे काय झालं ते सांगणार होते पण इतक्यात मार्केटमध्ये एक मजेशीर घटना घडल्यामुळे या घटनेकडे तुमचं लक्ष वेधावं असं मला वाटलं. मार्केट मध्ये संगणकाच्या वापरामुळे चुका कधीच होत नाहीत असा जर तुमचा समज असेल तर तो आज दूर होईल.
आजची घटना ज्या चुकीमुळे घडली तिला मार्केटच्या भाषेत ‘FAT FINGER ERROR ‘ असे म्हणतात. काही नाही हो! ‘नाव मोठे लक्षण खोटे ‘ घाबरू नका. यात न समजण्यासारखे काही नाही. संगणकावर काम करताना चुकीचे बटण दाबले गेले तर अशी चूक होते. यालाच ‘FAT FINGER ERROR’ असे म्हणतात.यामुळे जो ट्रेड होतो त्याला ‘FREAK TRADE’ असे म्हणतात. नेहमीच या चुकांमुळे मोठे नुकसान होते असे नाही. वेळेतच चूक लक्ष्यात आल्यास सावरता येते. ‘ENTER’ केलेला चुकीचा व्यवहार अमलात आला नाही तर नुकसान टळतं. पण २८.११.२०१३ रोजी असाच एक “FAT FINGER ERROR” झाला. तो एक “PUNCHING ERROR’ होता. एका डोमेस्टिक ब्रोकरने निफ्टी ६२५० असं पंच केलं. त्यामुळे १.१२कोटींचा तोटा झाला. अशीच एक चूक ऑक्टोबर ३ २०१३ ला झाली होती . निफ्टी ५८९६च्या ऐवजी ५९९६ एन्टर केले त्यामुळे ८.०० कोटी रुपयांचे नुकसान झालं.
आता असं बघा प्रत्येक गृहिणी स्वयंपाक करते, चहा करते. समजा चहामध्ये साखर घालायला विसरली,किंवा भाजी-आमटीत मीठ घालायला विसरली तर फारसे नुकसान होत नाही. मूड जातो इतकच! साखर किंवा मीठ ऐनवेळी घालून घेता येते. परंतु साखरेच्या ऐवजी मीठ किंवा मिठाच्या ऐवजी साखर घातली तर पदार्थ फेकून द्यावा लागतो . आणि जर चुकून ‘GAS’ बंद करायचा विसरला किंवा तेल तापत ठेवलेलं विसरलं तर घराची राखरांगोळी होते. चूक दिसायला लहान असते पण त्या चुकीचा परिणाम मात्र खूप मोठा होतो. तसच काहीतरी मार्केटचं आहे. चूक छोटी असेल आणि सुधार्ण्यासारखी तर ठीक नाहीतर बोंबला!!
सांगायचा मुद्दा असा कि मार्केटमध्ये असल्या चुका होण्याची हि पहिली किंवा दुसरी वेळ नव्हे. एप्रिल २०, २०१२ला एका दिवसात दोन वेळा ‘FAT FINGER ERROR’ झाली. ‘NIFTY FUTURES’ मध्ये ५००० ची एन्ट्री झाली. दुसर्या वेळी वेळेला इन्फोसिसचे शेअर्स ‘FUTURES” मध्ये रुपये २४५०.०० च्या ऐवजी १९५० एन्टर केले गेले. यात ७ कोटी ते ८ कोटीचा तोटा झाला.
जून २ ,२०१० रोजी झालेल्या ‘ FAT FINGER ERROR’ मध्ये शेअर्सविक्रीच्या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे 64000 शेअर्स ८४० रुपयांना विकण्यास ठेवल्यामुळे शेअरमार्केटमध्ये घबराट माजली. कारण त्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाव रुपये १०४० चालू होता .१०४० रुपयाला रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर विकला जात असताना हा माणूस रुपये ८४० ला ६४००० शेअर्स का विकतोय हे समजत नव्हत. नंतर असं समजलं की ‘ICICIBANK’ च्या कोडनंबर ऐवजी रिलायन्स इंडस्ट्रीजचा कोड नंबर ‘PUNCH’ केल्यामुळे ही चूक झाली. त्यामुळे ‘ICICI BANK’या कंपनीच्या शेअर्सेऐवजी रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स ‘ICICI BANK’ या कंपनीच्या भावाप्रमाणे विक्रीस ठेवले गेले या व्यवहारामध्ये २८ कोटींचा तोटा झाला. ही चूक लक्ष्यात येताच ती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हढ्या वेळात ६०००० शेअर्स विकले गेले होते त्यामुळे चूक फारशी सुधारता आली नाही.
हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे आजकाल लोक ‘ ON LINE TRADING’ चा वापर करतात . त्यावेळेला अशा पध्दतीची चूक होऊ शकते. मी मार्केटमध्ये शिरले तेव्हा ही सुविधा नव्हती.ब्रोकरमार्फतच सर्व व्यवहार करावे लागत असत . ब्रोकरमार्फत ट्रेड करताना सुद्धा तिथल्या ‘BOLT OPERATOR’नी तुमची ऑर्डर बरोबर टाकली कि नाही याची खातरजमा करून घ्या .तुमच्या वहीत सुद्धा केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवावयास विसरू नका .
मी तुम्हाला पुढच्या भागापासून शेअर्सची खरेदी कशी करावी, महाग स्वस्त चांगले वाईट शेअर्स कसे ओळखावेत हे सांगेन.आता आपली भेट पुढील भागात…………………
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ३५ – दोन्ही ट्रेड शेजारी पण वेगळे शेअर मार्केटच्या बाजरी
मी तुम्हाला गेले २ – ३ भाग डे ट्रेडबद्दल सांगतीये पण त्याचा अर्थ असा नव्हे कि डे ट्रेड आणि नेहेमीची गुंतवणूक फार वेगळी आहे. काही गोष्टी वेगळ्या आहेत पण बरयाच सारख्या पण आहेत.
आपण मिरच्या कोथिंबीर खरेदी करताना, ड्रेसवर किंवा साडीवर साजेशा बांगड्या , खोटे दागीनी खरेदी करताना खूप विचार करत नाहीत. परंतु फ्रीज ,टी व्ही , संगणक खरेदी करताना जास्त विचार करतो. त्यापेक्षा जास्त विचार घर खरेदी करताना करतो . जसं गोळ्या बिस्कीट, पाणीपुरी खाणे व जेवण करण यात फरक आहे तोच फरक डे ट्रेड व गुंतवणुकीत आहे. डे ट्रेड साठी आपण त्या शेअर्सची गुणवत्ता विचारात घेत नाही तर शेअर्सच्या किमतीत होणारी हालचाल विचारात घेतो. त्यामुळे तो शेअर गुंतवणूक करून बरेच वर्ष ठेवण्याच्या लायकीचा असेलच असे नाही. त्यामुळे डेट्रेडचे रुपांतर गुंतवणुकीत करून फायदा होईलच असं नाही .
डे ट्रेड असो किंवा नेहेमीची गुंतवणूक असो काही नियम बदलत नाहीत. शेवटी दोन्हीकडे शेअर खरेदी करायचे आणि विकायचे. डे-ट्रेडमधे फरक इतकाच कि तुम्ही खरेदी विक्री एकाच दिवशी करता. त्यामुळे हि खरेदी विक्री होण्यासाठी त्या शेअरमधे liquidity हवीच, त्याशिवाय तुम्ही शेअर विकणार कसे? त्यामुळे liquidity चा विचार कायम मनात ठेवा. आपण याआधी liquidity बद्दल बोललोच आहे. तरी काही शंका असतील तर जरूर विचारा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन.
डे ट्रेड sfचा दुसरा भाग म्हणजे त्याच दिवशी खरेदी विक्री. याचाच अर्थ असा कि एकाच दिवसात तुम्हाला पैसे मिळवायचेत. तुम्हाला असा शेअर सोधायचाय कि जो एका दिवसात वाढेल आणि तुम्हाला एकाच दिवसात खरेदी विकी करून पैसे कमवता येतील. मग आता पुढचा प्रश्न , कि असा शेअर शोधायचा कसा?
त्यासाठी मी तुम्हाला आता एक समीकरण सांगते
तुमचा डे ट्रेडचा फायदा = (तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ x तुम्ही विकत घेतलेले एकूण शेअर) – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
आता आपण या समीकरणाचा एक एक भाग नीट समजावून घेवू
१ – तुम्ही निवडलेल्या शेअरमधे एका दिवसात झालेली प्रती शेअर वाढ
तुम्ही 100 रुपायला १ असे १० शेअर घेतलेत आणि ११० ला विकलेत तर तुमची प्रती शेअर वाढ १० रुपये. आणि तुम्हाला एकूण १०० रुपयाचा फायदा झाला. पण आता हे १०० रुपये सगळे तुमच्या हातात येणार का? तर नाही !!
शेअरची निवड करताना तो एका दिवसात किती वाढू शकेल हा एकच विचार करून उपयोग नाही.
मला सांगा १०० रुपयाचा शेअर ११० होणं सोपं कि १००० रुपयाचा शेअर ११०० होणं? नीट बघितलं तर दोन्ही शेअर १०% वाढले पण १०० चा शेअर ११० होणं सोप हे तर तुम्हालाही कळलच असेल.
अजून एक विचार करा,
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
- तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ) X १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
- तुमचा फायदा = १ (प्रती शेअर वाढ) X १०० (एकूण विकलेले शेअर) = १०० – (ब्रोकरेज आणि इतर taxes)
तुम्हाला काय वाटत कि कोणत्या व्यवहारात तुम्हाला जास्त नफा होईल? दोन्ही व्यवहारात एकूण फायदा १०० रुपये होणार पण तुमच्या हातात सारखेच पैसे येणार का? ते ठरणार आपल्या समीकरणाच्या पुढच्या भागांनी…
२ – ब्रोकरेज आणि इतर taxes
ब्रोकरेज म्हणजे ब्रोकेरच कमिशन. हे कमिशन तुमच्या व्यवहाराच्या एकूण रकमेवर लावल जात. तुम्ही कसला पण ट्रेड करा डे ट्रेड करा नाहीतर गुंतवणूक म्हणून करा ब्रोकर त्याचं कमिशन लावणारच. आता हे कमिशन तुमच्या ट्रेडच्या एकूण रकमेवर लागत. एकूण रक्कम जास्त असेल तर ब्रोकरेज जास्त आणि रक्कम कमी असेल तर ब्रोकरेज कमी. तुमचा फायदा किंवा तोटा किती झाला याचा ब्रोकर ला काही फरक पडत नाही. तुम्ही एकूण ट्रेड किती रक्कमेचा केला त्या हिशोबानी तुम्हाला ब्रोकरेज लागणार.
आता थोड्या वेळासाठी आपल्या उदाहरणाकडे जावूया
तुम्ही १० रुपयाचे १०० शेअर ११ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
- तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१० X १००) + विक्री (११ X १००) = २१००
आणि १००० रुपयाचे १०० शेअर १००१ रुपये भाव झाल्यावर विकले म्हणजे
- तुमच्या ट्रेड ची एकूण रक्कम = खरेदी (१००० X १००) + विक्री (१००१ X १००) = २,००,१००
हे तर तुम्हालाही लक्षात आलं असेल कि १००० रुपयाच्या ट्रेड वर ब्रोकरेज जास्त पडणार. आणि हे विसरू नका कि दोन्ही ट्रेडमधे तुम्हाला १०० रुपयेच मिळालेले आहेत. सागायचा मुद्दा असा कि १००० रुपयाच्या ट्रेड मधे तुमचा निव्वळ फायदा कमी होईल कारण तुमचं ब्रोकरेज जास्ती जाईल.
बाकीचे taxes थोडे कमी जास्त का होईना दोन्ही ट्रेडला लागणारच. महत्वाची गोष्ट म्हणजे कि या मला वाटत कि आपण या बाबतीत बोललोय आधी. तुम्हाला अजून काही शंका असतील तर नि:संकोच विचारा.
डे ट्रेड करताना हा हिशेब नेहेमी डोक्यात असण गरजेच आहे. त्याशिवाय तुम्हाला नक्की पैसे किती मिळतात हे तुम्हाला कळणार नाही. याबद्दल थोडं अजून सांगायचं पण ते पुढच्या भागात. असा विचार करतीये कि तुम्हाला माझ्या एकाद्या डे ट्रेड ची पावती दाखवूनच सगळं समजावून देईन. बघते काय जमतंय ते..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ३२ – dayट्रेडचं वेड !!
आज रविवार ! सकाळीच फोन आला – ‘ओळखा पाहू कोण बोलतो आहे ते’
मी म्हणाले ‘मला ओळखू येत नाही.. माफ करा’
‘ अहो बाई माफी कसली मागता, मी विद्यार्थी तुमचा. १०वर्षापूर्वी तुमच्याकडे गाण्याच्या क्लासला येत होतो. मी तुमचा ब्लोग वाचला आणि विचार केला कि फोन करावा. मला शेअर्स विषयी माहिती हवी आहे. तुम्हाला वेळ आहे का तर ४ वाजता भेटायला येवू का ?’
‘अवश्य या’ अस सांगून मी फोन ठेवला . नोट विद्यार्थी आणि त्यांचे तीन मित्र असे चौघेजण दुपारी आले .थोड्या गप्पा झाल्या .
मीच मुद्द्याला हात घातला – ‘बोला काय हवय?’
‘मार्केटमध्ये थोडेसे पैसे गुंतवून ,थोडासा धोका पत्करून आम्हाला थोडी कमाई व्हावी असा काहीतरी विचार आहे. आमचा थोडासा वेळही जायला हवा आणि आमचे जे खाजगी आणी वैयक्तिक खर्च निघतील इतके पैसे सुटायला हवेत. याबाबतीत तुम्ही काही सल्ला देवू शकाल का?’
‘तुम्ही तुमच्या ब्लोग वर सांगता कि मार्केटचा अभ्यास करायला हवा. आता आमचा थोडा प्रोब्लेम असा आहे कि जेव्हा अभ्यास करायला हवा होता तेव्हा केला नाही आता काय अभ्यास करणार आम्ही! नंन्नाचीच बाराखडी समजा. तस आम्ही आवश्यक ते अकौंट उघडलेत.’
मी मनातल्या मनात हसले आणि मग त्यांच्याशी बोलायला सुरवात केली
‘तुमची समस्या समजली . तुम्ही त्याला अभ्यास म्हणा किवा समजून घेणे म्हणा काहीही फरक पडत नाही. जर लोकलने कुठे जायचे असेल तर स्टेशन कुठे आहे , गाडी किती नंबर फलाटावर लागते , fast आहे स्लो आहे, तिकीट कुठे मिळतं हे जस समजावून घेता तसच आहे मार्केट.
१५ दिवस मार्केटकडे लक्ष ठेवा. मार्केट मधल्या ब्लू चीप शेअर्सच्या भावाकडे लक्ष्य द्या. त्यापैकी कोणता शेअर वाढतो आहे, कोणता पडतो आहे, किती रुपयाच्या फरकाने वाढतो किवा पडतो आणि का वाढतो किंवा पडतो त्याची कारणे शोधा . जो शेअर विनाकारण पडत असेल तो शेअर घ्या . शेअर्सची संख्या कमी किवा तुमच्या गुंतवणुकीच्या अंदाजपत्रकाप्रमाणे ठेवा . शेअरच्या किमतीत दलाली कर इत्यादी मिळवा थोडाफार फायदा मिळत असेल तर लगेच विकून टाका . सुरुवातीला जास्त फायदा मिळवण्याच्या भानगडीत पडू नका . अन्यथा मुद्दल गमावून बसाल.
madam माझे दोघे तिघे ओळखीचे आहेत त्यांच्या ऑफिसच्याजवळच शेअर ब्रोकरचे ऑफिस आहे . त्याना मध्यॆ २ तास फ्री असतात . त्यानी त्याच ब्रोकरकडे अकौंट उघडले आहेत ते डबे तेथेच खातात . ट्रेडिंग करतात. पुन्हा ऑफिसमध्ये येवून काम करतात . आणि ऑफिस सुटले की घरी जातात . पण सांगायचे कारण म्हणजे त्या २ तासातही २०० ते ४०० रुपये मिळतात असे म्हणत होते. मग हे कस काय?
मला मनातल्या मनात अजून हसू आलं. याच प्रश्नाची वाट मी बघत होते
‘हे पहा तुम्ही कधी शेअर्स खरेदी करावे आणी कधी शेअर्स विकावे याला मार्केटच्या वेळेव्यतिरिक्त काहीच बंधन नसते .शेअर्सची खरेदी आणी विक्री त्याच दिवशी झाली तर दलाली कमी बसते. यालाच मार्केटच्या भाषेत “INTRA -DAY ” ट्रेड असे म्हणतात.’ ( हा काय प्रकार असतो ते नंतर तुम्हाला सांगेनच)
तुम्ही तुमच्या मित्रांना विचार कि ” त्यांना कधी घाटा होतच नाही का ? कारण प्रत्येक माणूस काळी बाजू कधी सांगत नाही.’
‘ कधी घाटा होतो कधी फायदा होतो. रोज सकाळी तुम्ही कामाला जाता. एखाद्या दिवशी तुम्ही धावत बस पकडता, रस्ता पटकन क्रॉस करता आणि फलाटावर गाडी उभीच असते, त्यामुळे तुम्ही वेळेवर आणी त्रास न होता पोहोचलता. पण असं रोज होतं का? घाईमध्ये पाय सरकतो आणि एखाद्यावेळी तुम्ही पडतासुद्धा. ज्या दिवशी पडता त्यादिवशी ते सगळ्यांना सांगता का? सांगा बघू!
तुम्हाला लाटेवर स्वार होऊन पलीकडच्या किनारयाला जायचं असेल, पण लाट मध्येच विरली तर बुडण्याचा धोका असतो. मार्केटचं पण तसच आहे. कोणत्याही व्यवसायात घाटा होतोच पण तो कमी कसा होईल याची खबरदारी घ्यावी लागते. साठी तुम्ही टी व्ही समोर किंवा ब्रोकरच्या ऑफिसात BOLT समोर असला पाहिजेत . मार्केटच्या वेळात एखादी चांगली बातमी आली तर बातमीशी संबधित असलेले शेअर्सच्या किमती वाढण्याची शक्यता असते . शेअरची किमत वाढण्यास सुरुवात झाली की तो लगेच विकत घ्यायचा आणी किमत १-२रुपयांनी वाढली की तो विकून टाकायचा. जर खराब बातमी आली आणी शेअर्सची किमत कमी व्हायला लागली की तो प्रथम विकायचा आणी नंतर विक्रीच्या भावापेक्षा कमी भावात खरेदी करायचे . पण ते असतं मार्केट ! ते आपल्या आज्ञेनुसार किवा आपल्याला हव तस वागत नाही .
अहो आजकाल आपली मुले, बायको तरी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतात का? नाही ना? मग मार्केटकडून काय अपेक्षा ठेवणार . रोज intra -day ट्रेड करून काही लोकांना मार्केटची सवय होते. हळू हळू मार्केट थोडं थोडं कळायला लागत. आणि मग थोडे थोडे दुध भाजीचे पैसे सुटायला लागतात. त्यामुळे लोक जसा महिन्याचा हिशेब ठेवतात तसा ठेवून महिनाखेर किती पैसे मिळतात ते पहा.करून पहा आणी सांगा मला काय होते ते.’
त्यापुढे मी त्यांना जे सांगितल ते तुम्हाला पण सांगते. Day-trade करताना काही गोष्टी लक्षात ठेवा
- जे काही कराल ते एका प्रमाणात करा. ५ किंवा १० शेअरपासून सुरवात करा आणि जोपर्यंत आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत तिथेच थांबा.
- तुम्ही किती नुकसान सहन करू शकता हे ठरवा आणि तुमचा व्यवहार त्या हिशोबानी करा
- Day-trade सुरवातीला ब्लू चीप शेअर मधेच करा. जर शेअर विकता आले नाहीत तर ब्लू चीप शेअर तरी हातात येती.ल
- जोपर्यंत तुम्हाला Day-trade पूर्णपणे कळत नाही तोपर्यंत फार रिस्क घेवू नका
काही मदत लागली तर मी आहेच. बोलूच लवकर..
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भाग ३० – एक वर्ष झालं आणि मार्केट जवळ आलं !!
भाग २९ – शेअर्स असो कि पाणी, नेहेमी खेळतं राहिलेलं बरं !!
HDFC बँकेचे लग्न तर लागलं.. अगदी थाटामाटात झालं.. आता संसार सुरु झाला..
माझ्या अकौंटवरचे शेअर्स तर विकले गेले. त्या DEMAT अकौंटसाठी असलेले INSTRUCTION स्लीप बुक पण घेतलं. पण मला स्लीप काही भरता येत नव्हती. मग ऑफिसमध्ये गेले आणि भरून घेतली. मी सही केली .
आधी सांगितलं तसं माझा DEMAT account फोर्टमधल्या DEMAT साठीच्या special branch मध्ये होता. त्यावेळी एक बरं होतं कि ऑफिस मधला एक शिपाई INSTRUCTION स्लीप घेवून जायचा. DEMAT चार्जेस भरण्यासाठी मी त्याच्याजवळ पैसे दिले. हे चार्जेस DEMAT अकौंटमध्ये खरेदी केल्येल्या किंवा विकलेल्या शेअर्सची नोंद करण्यासाठी आकारले जातात . या चार्जेसबद्दल नंतर सविस्तर सांगेनच.
INSTRUCTION स्लीप भरताना कार्बन टाकून २ कॉपी काढतात. वरची स्लीप DMAT account जेथे असेल ते लोक घेतात. कार्बन कॉपी तारीख असलेला शिक्का मारून स्लीप मिळाल्याची ACKNOLODGEMENT म्हणून परत देतात. स्लीपवर ज्या दिवशी स्लीप जमा करतो ती तारीख टाकतात .
मी स्लीप दिली व ऑफिसमध्ये बसून राहिले .
HDFC बँकेचे शेअर्स चांगल्या भावाला विकले गेले होते आणि आता मला GINI SILK मिल्सच्या शेअर्सच्या मागे लागायचं होतं.
“गिनी” च्या शेअर्समध्ये LIQUIDITY, VOLUME कमी असे. आता मला इतक समजलं होतं कि आपली ओर्डर टाकण्याआधी मार्केटमध्ये बाकीच्या काय ओर्डर आहेत हे बघून घ्यायचं. त्या दिवशी १४ रुपयाच्या भावाला ४८९ शेअर्ससाठी कोणीतरी खरेदीसाठी ओर्डर टाकली होती. १३.८०ला १२५ शेअर्ससाठी खरेदीची ओर्डर होती आणि १३.५० ला ५० शेअर्सची खरेदी ओर्डर होती. हे सगळं बघितलं आणि मग इकडे तिकडे अनुभवी लोकांना विचारलं तेव्हां सगळ्यांचं असं मत पडलं कि “तुम्ही ४८० शेअर्स १४च्या भावानी विकायला ठेवू शकता . बघा तुम्हाला पटतय का?”
मला पण ते ठीक वाटलं आणि मी ४८०शेअर्स १४च्या भावाने विकायला लावले आणी बसून राहिले . ते शेअर्स अविनाशने स्क्रीनवर आणले पण किती तरी वेळ ट्रेड झालाच नाही . थोड्या वेळाने पाहिलं तर १४ च्या भावाची खरेदीसाठीची ओर्डर रद्द झाली होती आणि १२.१०च्या भावाने ५०० शेअर्ससाठी खरेदीसाठीची ओर्डर कुणीतरी लावली होती .
“ अविनाश हे बघ काय झाले ते ? ओर्डेर गायब झाली रे ! १४ची खरेदीसाठीची ओर्डर गेली कुठे रे ती?”
“तुम्ही जश्या खरेदीच्या ओर्डर बघून तुमची विक्रीची ओर्डर टाकली तेच त्या लोकांनी केलं. तुम्हाला जास्तीत जास्त किमतीत विकायचेत आणि खरेदी करणार्यांना कमीत कमी किमतीत घ्यायचेत. ओर्डेर बदलून बदलून कमीत कमी भावात , जास्तीत जास्त शेअर स्वस्तात खरेदी करण्याचा प्रयत्न चाललाय त्यांचा.
अहॊ, नेहमीचा व्यवहार आहे हा!”
“समजा पाऊस खूप पडतो आहे. विकणाऱ्याला घरी जाण्याची घाई झाली आहे . वस्तू किंवा माल टिकाऊ नाही अशावेळेस तो विक्रेता भाव कमी करतो . माल भरभर विकतो व घराचा रस्ता धरतो . त्यावेळेस आपल्यास स्वस्तात स्वस्त माल मिळतो . कधी कधी लोंकाची गरज ओळखून किमत वाढवली जाते . दिवाळी आली की साखरेचे भाव वाढतातच की !”
माझ्या ज्ञानात भर पडत होती !!
“बघा madam तुमचे HDFC बँकेचे शेअर्स विकले गेले आहेत . थोडेसं भांडवल जमा झालय. आता घाई करायचं कारण नाही . फक्त १४ऐवजी कोणी १५ च्या भावाला विकत घ्यायला तयार आहे का त्याच्या कडे लक्ष ठेवा. तसा या शेअर्समध्ये नेहमी ट्रेड होत नाही पण आज व्यवहार होताना दिसतो . सरकारतर्फे कापड उद्योगाला चालना देण्यासाठी काही सवलती देण्यात येणार आहेत अशी बातमी पसरली आहे . तुम्हीसुद्धा हळूहळू , धीर धरून, सबुरीने थोडे थोडे करून शेअर्स विकू शकता . आता तुम्ही ऑर्डर टाकली आहे न यापेक्षा जास्त काही करू शकत नाही . आता तुम्ही मार्केटकडे ध्यान द्या.”
मी मार्केट बघतच होते. ऑफिसमध्ये शेअर्समार्केटचे CHANNEL बदलून बदलून लावत होते . त्यामुळे माझ्या एक गोष्ट लक्ष्यात आली कि प्रत्येक CHANNEL वरच्या टिकरवर वेगवेगळे शेअर्स व त्यांचे भाव दाखवतात. अजुन एक गोष्ट जाणवली की काही शेअर्स NSE आणि BSE म्हणजेच NATIONAL STOCK EXCHANGE व BOMBAY STOCK EXCHANGE असे दोन्हीकडे असतात . त्यांचे दोन्ही EXCHANGEवरचे वेगवेगळे भाव दिसतात. HDFC बँकेचे शेअर्स दोन्ही EXCHANGESवर लिस्टेड आहेत . त्याच्या दोन्ही EXCHANGEच्या भावात रुपये २ते ३ चा फरक असतो. या फरकाचा पण लोक उपयोग करतात पैसे कमवण्यासाठी !! पण ते नंतर बोलूच…
मार्केट बघता बघता वेळ कसा निघून गेला ते कळलेच नाही. माझे BOLT कडे लक्ष होतंच आणि टी. व्ही. वर काय सांगत आहेत तेही ऐकत होते . तेव्हढ्यात BOLT च्या तळाकडे असलेल्या टिकरकडे माझे लक्ष गेले . तेथे ऑर्डर पूर्ण झाली म्हणजेच ट्रेड झाला की खरेदी असेल तर निळ्या रंगात दिसते आणी विक्री असेल तर लाल रंगात दिसते . तेथे ४८०चा आकडा लाल रंगात दिसला मी अविनाशला विचारले ” माझे शेअर्स विकले गेले का ते बघ रे ” अविनाश म्हणाला “MADAM तुमचेच शेअर्स विकले गेलेत. याची सुद्धा INSTRUCTION स्लीप उद्या द्या! आता MADAM तुमची दिवाळी आहे. आज गिनी सिल्कमध्ये VOLUME आहे थोडे थोडे करून रोज विका आणी मोकळ्या व्हा. अशा शेअर्सच्या बाबतीत कायम सांभाळून रहा. शेअर्स असो कि पाणी, नेहेमी खेळतं राहिलेलं बरं !!”
मार्केटमध्ये असे गुरु आणि गुरुमंत्र बरेच मिळाले आणि त्याच शिदोरीवर हा प्रवास चालू आहे. प्रवासातला पुढचा टप्पा पुढच्या भागात !!
पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा